कबिर च्या एका वचनचा अर्थ....??

अनुरोध's picture
अनुरोध in काथ्याकूट
13 Aug 2011 - 9:56 am
गाभा: 

मधे कबिर च एक दोहा ऐकण्यात आला.... पण आपली अर्थ लावन्यात जरा गल्लत होतेय तर जर मदत कर दोस्तहो....

' कबिरा खडा बझार मे, मान्गे सबकी खैर,
ना कहो एसे दुश्मनि ना कहो एसे बैर... '

प्रतिक्रिया

मदतीसाठी आव्हान चु चु चु आपलं आवाहन केलंत ते बरं केलंत,

अवांतर - मलापण कबिरांविषयी त्यांच्या लिखाणाविषयी बरंच आकर्षण आहे, माझा एक जुना साहेब आहे यातला तज्ञ त्याला विचारुन सांगतो मंगळ्वारी किंवा बुधवारी.

अति अवांतर - यातुन जे मला कळालं ते असं की कबिर आणि ज्ञानेश्वर हे बहुधा याठिकाणी एकाच लेवलला असावेत, मांगे सबकी खैर म्हणजे ' जो जे वांछिल तो ते लाहो' असंच ना, 'सर्वपि सुखिनं सन्तु ..' असंच ना म्ह्ण्यायचंय आपल्या आपल्या भाषेत, मग अडतंय कुठं, वैर कोण करणार आहे, दुश्मनि कोण करणार. दुष्मनी करणार ते ज्यांना हे सगळ्यांनी सुखी होणं नकोय, कुणाच्या तरी दुखाचा धंदा करुन ज्यांना आपलं पोट भरायचं आहे त्यांचं कसं व्हायचं मग, त्यांच्या मनात या सर्वांना सुखी करु इच्छिणा-यांना शत्रु मानावंच लागेल ना,

आजचं उदाहरण देतो पटायला जरा आडवळणाचं आहे, बघा अ‍ॅंटिव्हायरस विकणारा लिनक्स किंवा इतर ओपन सोर्सवाल्याला आपला शत्रुच मानणार ना, कसं आहे मान्य ओ लिनक्स मध्ये व्हायरसचा त्रास नसतो सगळे,अगदि माझ्यासारखे मंदबुद्धी लोकं पण बिनधास्त संगणक वापरु लागतील पण मग या अँटीव्हायरसवाल्याचा धंदा कसा चालायचा सगळेच लिनक्स वापरुन निश्चिंत झाले तर..

'वैष्णव जन तो तेणे कहियज पिड परायी जाने रे' या मध्ये परायाला पिडच नसेल तर वैष्णव जन जानणार काय अन ती पिड निवारण्यासाठी करणार काय, त्यामुळं कुणीतरी कुठंतरी दुखी असणं अतिशय महत्वाचं, म्हणुन मी तर म्हणतो की आपल्या मनात परोपकाराची भावना येणं हेच मुळात सगळ्या दुखाचं / त्रासाचं / पापाचं कारण आहे, मी कुणावर तरी परोपकार केल्याशिवाय मी मोठा होत नाही मग कुणीतरी माझ्याकडुन परोपकार करुन घेणारा हवा ना मला मोठा होण्यासाठी, आणि हे कबिर अन ज्ञानेश्वर अशा सगळ्यांना माझ्याकडुन काही न घेता डायरेक्ट त्या ईश्वराकडुन सुखी होण्याचा मार्ग सुचावायला लागले तर मग व्हायचं कसं ओ.

अनुरोध's picture

19 Aug 2011 - 1:28 pm | अनुरोध

त्याच काय आहे ना राव, आमच्या नावातच अनुरोध आहे ना म्हणुन आसेल कदाचित(नावचा आपल्या स्वभावावर प्राभाव असतो असा ऐकण्यात आहे... यासाठी वेगला धागा टाकावा म्हणतो...)

बाकी आम्हि उत्तराचि वाट पाह्तो आहे.....

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

कबिरा खडा बझार मे, मान्गे सबकी खैर,

कबिरा स्पिकिंग......

ओ कबिरा, बोले तो काय हाय आधीच इदर श्रावण चालुय, उस्के मुळे मच्छीचा धंदा मंदा है, तुम काहेको फोन करताय रस्ते में खडा रह्के, जाव बाबा जाव अबी नवरात्र के अच्छेसे न्हा धो के आनेका मग बादमें फोन करनेका हा भुलनेका नाह बरंका नही तो मै घरपे आके फोन करनेको बोलुंगा समज्य का

मित्रवर्य,
आपण या दोह्यामधली दुसरी ओळ

ना कहो एसे दुश्मनि ना कहो एसे बैर

अशी उद्धृत केली आहे.
ती

ना काहू से दोस्ती ना काहू से बैर

अशी दुरुस्त करून घ्या.म्हणजे अर्थ लावणे सोपे होईल.

धन्यवाद.