<बॅचलर चहा>

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in पाककृती
11 Aug 2011 - 8:08 pm

सध्या आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या पदार्थांची पाककृती मिपावर टाकण्याची टूम निघाल्यामुळे अशाच एका दैनंदिन पदार्थाची पाककृती इथे देत आहे.

ऑनसाईट व्हायच्या बेतात असण्यार्‍या मिपाकरांसाठी काही टिप्स या पाककृतीतून मिळतील.

पाककृती फोटोसह आहे त्यामुळे चहा किती झटपट करता येतो हे दिसून येईल.

साहित्य:

-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)

कृती:

१. कपामध्ये पाणी उकळावे.
२. उकळत्या पाण्यात टी बॅग सोडावी.

३. तीन-चार मिनिटे मुरू दिल्यावर ४-५ वेळा पाण्यात हलवून मग टी बॅग काढून टाकून द्यावी. चहाचे पाणी आणखी २-३ मिनिटे तसेच ठेवावे. म्हणजे ते थोडे थंड होईल.
४. मग यात डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे मिश्रण भुरभुरत टाकावे. एकदम बचकन टाकू नये. गुठळ्या होतील. चमच्याने ढवळून घ्यावे. चहा तयार. व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.

टीप : वरच्या साहित्याच्या फोटोत मोठा मग दाखवला आहे कारण हीटर पाण्यात पूर्ण बुडावा लागतो. पाणी मगमध्ये गरम केले तरी चहा नॉर्मल कपात बनवावा.

*डेअरी व्हाईटनर मध्ये साखर असते त्यामुळे डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे ३:२ या प्रमाणात मिश्रण मी वापरतो. त्याने चहा फार गोड बनत नाही. मिश्रण करून ठेवण्याचा दुसरा फायदा म्हणजे साखर असल्यामुळे ते चहात टाकताना तरंगत नाही आणि गुठळ्या होत नाहीत. नेसलेचे "एव्हरीडे" हे "अमूल्या"पेक्षा अधिक चांगले रिझल्ट देते.

** गोडे पाणी वापरले की हीटरच्या कॉईलवर कालांतराने मिठाचा थर बसत नाही.

आधी दूध बनवून त्यात टी बॅग टाकली तर चहाचा अर्क नीट उतरत नाही.

सूचना: ज्यांना चहा गॅसवर उकळून डायरेक्ट घशात ओतण्याइतका गरम लागतो त्यांच्यासाठी हा चहा कामाचा नाही. :(

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

11 Aug 2011 - 8:21 pm | धमाल मुलगा

ओ चच्चा....
खारी आन टोस कुडंयत?

*पहिल्या फोटोतील मगशेजारील उभी वस्तू पाहून आधी दचकलोच. नंतर नीट पाहिलं तेव्हा कळलं ती पाण्याची बाटली आहे म्हणोन. :D

गणपा's picture

11 Aug 2011 - 8:23 pm | गणपा

छ्या छ्या छ्या छ्या ....
चच्चा चच्चा तुम्ही सुद्धा बिघडलात.
ते शिंगं मोडुन का काय म्हणतात तस.... ;)

मनीषा's picture

11 Aug 2011 - 8:41 pm | मनीषा

अरे वा .... !!!!
मस्त आणि उपयोगी

मी सुद्धा ही पाकृ. (कधी कधी ) अशीच करते.

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2011 - 8:42 pm | राजेश घासकडवी

पाकृ आवडली.

'बॅचलर दात घासणे' याची पाककृती कोणीतरी टाकावी. खरी तर ती या पाककृतीच्या आधीच यायला हवी होती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2011 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याही आधी तुम्ही 'बॅचलर अंथरूणातून बाहेर येणे' ही पाकृ लिहा, पथ्यांसकट.

पाकृ आवडली. चिच्चा आता असे देवाधर्माच्या कामाला लागलेले पाहून चाचींचे करवा चौथ कामी आले असे म्हणण्यास हरकत नाही.

साहित्य : जागवलेली रात्र (पार्टी झाली असेल तर उत्तम ), परीक्षा सोडून कुठलाही दिवस (थंडी असल्यास बरे असते ), चुरगळलेली चादर, ६ महिने ना धुतलेली बेडशीट..
सोबत लौकर उठून पूजा करणारा रूममेट ...( लौकर फोन करणारी गर्लफ्रेंड असल्यास रेसिपी छान जमते ..)

पूर्व तयारी : सर्व खिडकी चे पडदे रात्री लावावे
सूर्य डोक्यावर आला तरी (नेहेमी प्रमाणे) लोळत पडावे ... गाजराचे घड्याळ कोकलून बंद झाले तरी उठू नये ..ज्यांना त्रास होतो ते बंद करतीलच , गजर वाजू लागला कि उशी कानावर घेऊन कूस बदलावी ..पुन्हा झोपावे ..नंतर तडका साठी तुमचा रूममेट काहीतरी खाट-खुट करत असेल किंवा बड बड करत असेल तर यथेच्च शिव्या घालाव्या ..पुन्हा झोपावे ...
तेवढ्यात गर्लफ्रेंड चा फोन येईल ..तिला शक्य तेवढे खोटे बोलून कटवावे ..जास्त पकवत असेल तर फोन स्वीच ऑफ करावा ..भांडू नये असे केल्याने ती सतत फोन करत राहते ..
नंतर पुन्हा झोपावे ....
नित्य कर्म रोखणे अगदीच अशक्य झाले कि उठावे ..शक्य तेवढे लौकर आटपून लोळत पडावे ..नंतर अचानक एखादे काम आठवते (फी भरणे , फॉर्म भरणे , बँक ची कामे ) ..तोव्वर उशीर झालेला असतो ..मग उठून अंघोळ ना करता बाहेर पडावे ..

अशा रीतीने उठला कि बॅचलर अंथरूणातून बाहेर येणे हि पाक कृती मस्त जमून आली असे समजावे

पण असो. यामुळे निदान साखरेचे भाव वाढुन शेतकर्‍याना चांगला उसाला दर मिळेल अशी आशा करतो.

प्रचेतस's picture

11 Aug 2011 - 8:46 pm | प्रचेतस

चाचा चाचा, चहाची पाकृ व वर्णन एकदम झक्कास पण ते हीटर असताना पण कपामध्ये पाणी का उकळलं ते काय कळलं नाय ब्वा. कदाचित ती खास ब्याचलरांची पद्धत असेल. ;)

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 9:12 pm | नितिन थत्ते

असं उकळायचं कपात हीटर ठेवून.

प्रचेतस's picture

11 Aug 2011 - 10:53 pm | प्रचेतस

अस्सय होय. :)

पल्लवी's picture

11 Aug 2011 - 8:46 pm | पल्लवी

.

स्मिता.'s picture

11 Aug 2011 - 9:20 pm | स्मिता.

आमच्या इकडचं पाणी जरा जड आहे. त्यामुळे या चहासाठी पॅकेज्ड वॉटर वापरले तर चालेल का?

तसेच ही पाकृ टी बॅग न वापरता करता येईल का?

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 9:31 pm | नितिन थत्ते

>>आमच्या इकडचं पाणी जरा जड आहे.

कॉलिंग आनंद घारे काका.... जड पाण्याचा स्रोत सापडला. :)

पॅकेज्ड वॉटर खारे असेल तर चालेल/धावेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2011 - 10:52 pm | बिपिन कार्यकर्ते

कित्ती मस्त नै! या विकांताला करून बघेन.

पैसा's picture

11 Aug 2011 - 11:00 pm | पैसा

ही पाकृ चहा न घालता कशी करता येईल?

प्रभो's picture

11 Aug 2011 - 11:23 pm | प्रभो

अंडे घालून..

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2011 - 1:32 am | अत्रुप्त आत्मा

धन्य...धन्य त्या प्रतिक्रीयावादाची...:bigsmile:

प्राजु's picture

11 Aug 2011 - 11:22 pm | प्राजु

अय्या!
वेग्ळीच बाई पाकृ!!
येत्या शनिवारी नाष्ट्याचा मेनू ठरला! ;)

रेवती's picture

11 Aug 2011 - 11:56 pm | रेवती

झकास पाकृ!
फोटू (न)नेहमीप्रमाणेच फँटाष्टीक!
या पाकृवरून त्याच त्या पदार्थांचे रतिब घालणार्‍या पब्लिकनं धडा घ्यावा असे सुचवण्याचे धाडस कर्ते.

प्रास's picture

12 Aug 2011 - 12:02 am | प्रास

लई भारी पा. कृ. आहे.

साहित्यांची जमवाजमव करायची सुरुवात करून टाकतो.....

बाय द वे चच्चाजी,

व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.

दूध फुटते की फाटते हो?

(दोन्ही होताना आवाज जोरदार येत असावा, नाही?) ;-)

मनराव's picture

12 Aug 2011 - 10:25 am | मनराव

फुटून फाटते........ :)

श्रावण मोडक's picture

12 Aug 2011 - 12:23 am | श्रावण मोडक

कुणाची विकेट घ्यायची होती? फेक वाया गेली बहुतेक.

कवितानागेश's picture

12 Aug 2011 - 12:27 am | कवितानागेश

या असल्या ( तुच्छतादर्शक स्मायली) हीटरला वीज जास्त लागते. त्यापेक्षा ब्याचलरांनी वीजेवरच चालणारा महागडा कॉफी मेकर वापरावा. :)
नाव कॉफी मेकर असले तरी त्यात चहा करता येतो.
कुठल्याही पद्धतीत चहा झाल्यानंतर ब्याचलरांना कमीत्कमी ३ भांडी ( २ मग्ज + १ चमचा) विसळावी लागतील, याची पूर्वसूचना दिली गेली पाहिजे.
शिवाय कुठल्याही कारणाने दूध फाटल्यास स्वच्छ पांढरा दोरा सुइत घालून ते ताबडतोब शिवावे!

शिवाय कुठल्याही कारणाने दूध फाटल्यास स्वच्छ पांढरा दोरा सुइत घालून ते ताबडतोब शिवावे!
अगं माऊ नीट वाचलं नाइयेस तू...

व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.
दूध फुटते गं फाटत नाही. त्यामुळे स्टीकफास्ट अथवा तत्सम अ‍ॅधेसीव.. लागेल. फेव्हीकॉल चालेल बहुधा.

त्यामुळे ब्यॅचलरांनी २ कप चहामध्ये साधापाव२ चमचे फेव्हीकॉल घालावे म्हणजे दूध फुटणार नाही.

अनब्रेकेबल दूध कुठे मिळते का? 'इकडे''तिकडे' अशी सगळी उत्तरे चालतील. (त्या-त्या भागात राहणार्‍या लोकांना उपयोगी पडेल ना)

बाकी, थत्तेचिचांना इनंती की त्यांनी अनब्रेकेबल दुधाची बॅचलर पाकृ कुठूनही मिळाल्यास द्यावी.

नितिन थत्ते's picture

12 Aug 2011 - 10:27 am | नितिन थत्ते

.

ही घ्या.

वैधानिक इशारा : ही पाककृती ट्राय करून ते दूध पिण्याचा प्रयत्न करू नये.

विसुनाना's picture

12 Aug 2011 - 6:05 pm | विसुनाना

कुतुहल म्हणून विचारतो, या सिंथेटिक दुधाचे दही लागत असेल का? (हे दूध फुटत/फाटत नाही. म्हणजे लागत नसावे.)

कुंदन's picture

12 Aug 2011 - 12:40 am | कुंदन

>>. केटल बरीच महाग असते
काय चाचा , ओन साईटला र्‍हाणार्‍यांना कसली हो महागाई?

नितिन थत्ते's picture

12 Aug 2011 - 7:10 am | नितिन थत्ते

>>काय चाचा , ओन साईटला र्‍हाणार्‍यांना कसली हो महागाई?

अवो, आमी इण्ड्यातच ऑनसाईट र्‍हाणार्‍यांचा विचार क्येला.

कवितानागेश's picture

12 Aug 2011 - 10:18 pm | कवितानागेश

अहो, इंड्यात रहाणारे स्वतः कशाला करतील चहा?
कोपर्‍यावरच्या टपरीवर जायचे उठून, दात न घासताच.
भय्या देतो मस्त उकळलेला गरम चहा, डायरेक्ट घशात ओतायला.

पंगा's picture

12 Aug 2011 - 11:15 pm | पंगा

कोणास ठाऊक, कदाचित पाणीपुरी प्रकरणानंतर धसका घेतला असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2011 - 11:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कसलं काय घेऊन बसलात पंगाशेठ? चव नको का यायला?

आत्मशून्य's picture

12 Aug 2011 - 5:30 am | आत्मशून्य

.

सहज's picture

12 Aug 2011 - 5:42 am | सहज

डोंबलाची लाइट नस्ती आमच्याकडं ..
आम्ही आपलं एक टायमाला पिठलं किंवा मूग गिळून बसणारं पब्लीक!

स्पंदना's picture

12 Aug 2011 - 8:01 am | स्पंदना

ह्या! ह्यो चा जिवंत हाय!
आमाला उकळुन उकळुन त्याचा जीव जाइस्तोवर उकळुन केलेला 'चा' च आवडतो.

बाकि एक अ‍ॅड आठवली..."भाडे के बुलडोझर पे बैठे, किराये के टट्टु...."

धमाल मुलगा's picture

12 Aug 2011 - 12:51 pm | धमाल मुलगा

च्या कसा लाऽऽलभडक्क झाला पायजे. पयल्याच घोटाला डोळ्यावरची गुंगी खाडकन उडली पायजे..तोंडात मस्त गोडसर-कडवट चव घोळली पायजे. कोपभर च्या प्येला की आपुन च्या प्येलो का तंबाखूचा बार भरला असा प्रश्न पड्ला पायजे! तर च्या प्येण्याची मजा. आसला पुड्या बुचकळून करायचा मेंगळा विंग्रजी च्या काय कामाचा? :D

चच्चाजान,
तुमची पाकृ वाचून आज सकाळी चहा करुन बघायचा प्रयत्न केला. हिटर नसल्याने एलपीजीच्या शेगडीवरच भांडं तापत ठेऊन त्यात टी बॅग गरम करत ठेवली. पाणी आणायला गेलो तर परत येईतो टी बॅग काळीठिक्कर पडली होती आणि किचनमध्ये खूप धूर झाला होता. मग त्यातच पाणी घालून पुन्हा गरम केलं आणि म्हशीचे दूध (आमच्याकडच्या इंडिया स्टोअर्समध्ये व्हाईटनर मिळत नाही..समोरच बांधलेल्या म्हशीचं दूध काढून देतात.) बचकन ओतलं...ते 'लिक्विड फॉर्म'मध्ये असल्यामुळं भुरभुरत टाकता आलं नाही. ब्राऊन शुगर मात्र भुरभुरत घातली. छान मुरु दिल्यानंतर एक घोट घेतला आणि..... सगळा मग बेसिनमध्ये रिकामा करुन सरळ खाली जाऊन टपरीवर एक कटिंग च्या पिऊन आलो.

बहुतेक माझी पाकृ कुठेतरी चुकली असावी. काय झालं असेल सांगू शकाल का?

नितिन थत्ते's picture

12 Aug 2011 - 1:09 pm | नितिन थत्ते

ग्यासवर च्या कशी बनवायची ते ठाऊक नाय.

"ब्राऊन शुगर" हा शिग्रेट्च्या चांदीवर गरम करून हुंगायचा पदार्थ म्हणून माहिती आहे. तुम्ही त्यो च्यामधी घातला म्हंजी काय कळेना बुवा.

>>बहुतेक माझी पाकृ कुठेतरी चुकली असावी. काय झालं असेल सांगू शकाल का?

उद्या घाणेरडी पौर्णिमा असल्याने असं झालं अशेल.

धमाल मुलगा's picture

12 Aug 2011 - 1:49 pm | धमाल मुलगा

ब्राऊन शुगर म्हंजे कमी क्यालरीवाली असते ती. जरा डाएट फॉलो करायला इझी जातं नं, त्यामुळे आम्ही ब्राऊन शुगर वापरतो हो.

>उद्या घाणेरडी पौर्णिमा असल्याने असं झालं अशेल.
चॅक्क! त्याचा इंप्याक्ट उद्यापासून आठ दिवस आहे. प्रि-लॉन्च कसा होईल?

त्याचा इंप्याक्ट उद्यापासून आठ दिवस आहे. प्रि-लॉन्च कसा होईल?

ओ... ओ...ओ....
आठ दिवस मागे अन पुढे अशी लागते त्यात...
खात्री नसेल तर पुन्हा सर्व धागे उकलुन वाचा.....

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 2:03 pm | बिपिन कार्यकर्ते

पुन्हा सर्व धागे उकलुन वाचा.....

प र त ? ! ? ! ?

नको नको! त्याने पौर्णीमा घाणेरडी हेच सिद्ध होईल.

पिंगू's picture

12 Aug 2011 - 8:56 am | पिंगू

हाहाहा.. बॅचलर चहा वाचून भलतीच करमणूक झाली. माज्याकडे इतका छोटा हीटर नाय, इचार करतोय आणायचा का नाय ते.

- पिंगू

छोटा डॉन's picture

12 Aug 2011 - 9:32 am | छोटा डॉन

सुरेख पाककृती, अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले.

मात्र सध्या आम्ही 'श्रावण' पाळत आहोत.
सबब सदर पाककृती 'श्रावण-फ्रेंडली' पद्धतीने कशी करता येईल हे लिहावे.
धन्यवाद

- छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

12 Aug 2011 - 10:16 am | नितिन थत्ते

पाळलेल्या श्रावणला हा चहा चालेल का माहिती नाही. मोडकांच्या श्रावणला चालतो बहुतेक.

विनायक प्रभू's picture

12 Aug 2011 - 10:53 am | विनायक प्रभू

डीप ईट लिटील लाँगर इफ यू वाँट इट स्ट्राँगर हे लिहायला विसरलात का?

ते डिप करुन काय फायदा मास्तर?

अभिज्ञ's picture

12 Aug 2011 - 11:36 am | अभिज्ञ

इतक्या स्वच्छ भांड्यात चहा?
अजिबात जमणार नाही.

;)

अभिज्ञ.

छोटा डॉन's picture

12 Aug 2011 - 11:44 am | छोटा डॉन

ऑ ?
स्वच्छ भांड्याचे एक सोडा, पण अभिज्ञ एकंदरीतच कशातच चहा करेल असे वाटत नाही.
छ्या, काही काय राव, म्हणे चहा करा.

- छोटा डॉन

हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून आपण अमूल्य विनिमय चलनात बचत करू शकतो
हीटरची कॉईल घरी करण्याची कृती
१) एक लाकडी पट्टी घ्यावी ( लाटणे चालेल)
२) खिडकीच्या पडद्याची स्प्रिंग काढून घ्यावी
३) ती स्प्रिंग लाकडी पट्टीवर गुंडाळावी
४) स्प्रिंग च्या दोन्ही टोकाना विद्यूतभार वाहून नेणार्‍या तारेची टोके जोडावीत.
बघा घरच्याघरी हीटर तयार झाला की नाही?
हाच हीटर बादलीभर गरम पाणी तयार करण्यासाठी देखील वापरू शकता
वि सू : हीटर ऑन असताना पट्टीला हात लावू नये. कुंडलिनी जागृत झाल्याचा अध्यात्मिक अनुभव मिळण्याची दाट शक्यता असते

कुंदन's picture

12 Aug 2011 - 12:25 pm | कुंदन

>>हाच हीटर बादलीभर गरम पाणी तयार करण्यासाठी देखील वापरू शकता

मॅगी बनवायला देखील वापरू शकता का ?

स्मिता.'s picture

12 Aug 2011 - 1:32 pm | स्मिता.

मॅगीवरून आठवण झाली... कोणी मॅगी बनवण्याची पाकृ येथे देवू शकते का? खूप दिवसांपासून करण्याचे मनात आहे.

ओ काय बादलीभर म्यागी करताय काय ?

हवांतर:माझ्या एका मित्राकडे होता हा हीटर. कॉफी/चहा बनवणे आणि हिवाळ्यात दाढी साठी मग्गाभर पाणी तापवणे ह्या कामासाठी उपयोगी होता.

इजुभौ सल्ला आवडला. हे काम कोलेज ला असताना केलेले आहे. फक्त आम्ही पडद्याच्या तार न वापरता इलेक्ट्रिक शेगडीच्या कॉईल वापरायचो.

चच्चा पाकृ अतिशय आवडली आहे, याचा लेमन टी करता येईल का ??

नितिन थत्ते's picture

12 Aug 2011 - 2:20 pm | नितिन थत्ते

>>याचा लेमन टी करता येईल का ??

आमचे लिमिटेड कौशल्य उघडे पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निषेध.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 2:28 pm | बिपिन कार्यकर्ते

लिमिटेड वगैरे ठीक आहे, पण कौशल्य? असो.

नि३सोलपुरकर's picture

12 Aug 2011 - 2:51 pm | नि३सोलपुरकर

समस्त मिपाकराच्या विनोद बुध्दीला त्रिवार सलाम .....

// वि सू : हीटर ऑन असताना पट्टीला हात लावू नये. कुंडलिनी जागृत झाल्याचा अध्यात्मिक अनुभव मिळण्याची दाट शक्यता असते //

(@ विजुभो.. बेक्कार हसतोय)

कुंदन's picture

12 Aug 2011 - 3:06 pm | कुंदन

इतका त्रास करुन घेण्यापेक्षा एखादी स्वयंपाकीण का नाही ठेवत.

सगळे तुझ्या सारखे नशिबवान नसतात रे.
;)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

गण्या, हळू बोल. त्याच्या घरी कळलं तर मरेल तो! ;)

धमाल मुलगा's picture

12 Aug 2011 - 3:24 pm | धमाल मुलगा

बाई ठेवायची असं म्हणायचंय का रे कुंद्या?

"काम" वाली बाई म्हणायचं का तुम्हाला ?

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मेलं तिच्यायला कुंद्या फुडच्या भारत दौर्‍यात!

वपाडाव's picture

12 Aug 2011 - 3:35 pm | वपाडाव

त्याची काय गरज नाय....
भारतानं लांब पल्ल्याची शस्त्रे (मिसायलं) डेव्हलप केलंय न्हवंका...
मंग त्येवडं पुरं झालं की !!!!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Aug 2011 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार

तोंपासु.

पहिला फटू तर कसला खत्तरनाक आलाय ?

भारतात असताना अरण्येश्वर कॉर्नरवर एक निग्रो सारखे दिसणार्‍या काकांची चहाची टपरी होती. ते कपान चहा ओतला की तो कॉफीत बुडवलेल्या चमच्याने ढवळून द्यायचे. काय अप्रतिम चव असायची त्याची. त्या भागात राहणारे कोणी आहे का मिपावर ? अजून ती टपरी आहे का तिथे ? ते काका देखील खूप म्हातारे झाले असतील आता.

चला आता ह्या विकांताला इथे गोडे पाणी कुठे मिळते ते शोधणे आले.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते

मेलो!

=)) =)) =)) =)) =))

विजुभाऊ's picture

12 Aug 2011 - 6:44 pm | विजुभाऊ

चला आता ह्या विकांताला इथे गोडे पाणी कुठे मिळते ते शोधणे आले.
अरे बापरे मुळामुठेतले गोडे पाणी आटले? हरहर हर..........
निदान नागझरी त तरी मिळेल ( नागझरी: दारुवाला पुल ज्यावर बांधला आहे ते ठिकाण)
नाहीतर बिठुर ला मिळेल बहुतेक......

विजुभाऊ's picture

12 Aug 2011 - 6:45 pm | विजुभाऊ

चला आता ह्या विकांताला इथे गोडे पाणी कुठे मिळते ते शोधणे आले.
अरे बापरे मुळामुठेतले गोडे पाणी आटले? हरहर हर..........
निदान नागझरी त तरी मिळेल ( नागझरी: दारुवाला पुल ज्यावर बांधला आहे ते ठिकाण)
नाहीतर बिठुर ला मिळेल बहुतेक......

स्वाती दिनेश's picture

12 Aug 2011 - 5:04 pm | स्वाती दिनेश

चहा आवडला, आता ब्याचलर कॉफीची पाकृ पण येऊ दे.. ;)
परा, तू उल्लेख केलेली अरण्येश्वरची टपरी.. अरे काय आठवण करुन दिलीस रे, छे.. फार म्हणजे फारच नॉस्टेलजिक केलेस.. आता उरलेला दिवस त्याच आठवणीत जाणार..
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2011 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढच्या विकांताला ट्राय करून बघेन...

पाकृ आणि स्वातीताई असे काँबिनेशन बघितले की हाच प्रतिसाद येतो ऑपॉप!

प्राजु's picture

12 Aug 2011 - 8:46 pm | प्राजु

हो.. आणि बिनंड्याचे कसे करायचे..?
असाही येतो प्रतिसाद. :)