पत्र

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
10 Aug 2011 - 12:16 pm
गाभा: 

प्रिय धनाजी राव,
हे पत्र फक्त तुम्हालाच नाही. आत्मशुन्य, सुनील व इतर समविचारी सदस्याना सुद्धा आहे.
मासे पकडायला गळ वापरतात.
गळाला आमिष लावतात(बहुधा गांडुळ).
एखादी विचारसरणी खुप जणापर्यंत पोचवायला विरोध हासुद्धा एक हत्यार म्हणुन वापरला जातो.
तसा तुमचा वापर होतो आहे असे तुम्हाला वाटते आहे का?
मला ज्या वेळेला वाटले त्यावेळी मी माघार घेतली.
तुम्ही सुद्धा माघार घ्यायची घोषणा केली.
पण ती पाळली नाहीत.
तुम्ही ती घ्यावी की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न.
पण आमिष होणे तुम्हाला मान्य आहे का?
एक जबाबदार माणुस म्हणुन एखाद्या मुर्खपणाला विरोध दर्शवणे हे मला मान्य आहे.
मी पण केला.
पण त्याचा सुद्धा वापर होत आहे हे माझ्या लक्षात आले तेंव्हा मौन पाळणे हे योग्य वाटले.
हे तुम्ही सुद्धा पाळावे असा माझा आग्रह नाही.
ज्याना विश्वास आहे त्याने ह्या मुर्खपणात जरुर सामील व्हावे.
पण ज्या तळ्यात का मळ्यात 'बॉर्डर लाईन्'(खरे का खोटे) केसेस असतात ते 'ऑर्डर' मधे येतात आणि साध्य सिद्ध होते.
आणि अशानाच मळ्यात ओढण्यासाठी हा 'माइंड गेम' खेळला जातो.
आजच नाही हजारो वर्ष खेळला गेला आहे.
मग त्यात तुम्ही तुमच्या विरोधाचा इनपुट देणार आहात का?
मी देणार नाही.
तुम्ही काय करणार आहात?
आणि तुम्ही जो आक्षेप्(मी आणि इतर सुद्धा) घेत आहात त्या बद्दल जबाबदार मंडळीना काहीही वाटत नसेल तर त्याला आपण काय करणार? कदाचित तुम्ही आणि चुकत असु.
आपलाच विप्र.
जाता जाता: स्टुपिडीटी अँड अबिस आर सिनॉनिमस वर्ड्स.

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 12:26 pm | युयुत्सु

हा हा हा हा हा हा आवडलं

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 12:47 pm | आत्मशून्य

नक्की काय आवडलं ते जरा इस्कटून सांगाल काय . (इथचं ब्लोगवर नको)

विनायक प्रभू's picture

10 Aug 2011 - 3:34 pm | विनायक प्रभू

व्हॉटेवर

प्रिय विप्र,

आपले पत्र पोचले. आपली रोखठोक विचार आवडले.

माझा वापर होतोय का वगैरे विचार मी केला नाही. करणारही नाही. मीही त्या धाग्यावर वाचनमात्र व्हायचे ठरवले होते. तुम्ही म्हणताय तशी मी माझी घोषणा पाळली नाही हे जरी खरे असले तरी मी मुळ मुद्दयावर प्रतिक्रिया देणे केव्हांच बंद केलं आहे. आता ज्या प्रतिक्रिया देतोय त्या हलक्याफुल़़क्या आहेत. निदान मला तरी तसे वाटते.

मुळ मुद्दयावर मी जर गांभिर्याने प्रतिक्रिया देत राहीलो असतो तर एव्हाना धागा द्वीशतकी झाला असता :)

असो.

आपली कळकळ मनाला पटली.

आपलाच,
धनाजीराव वाकडे

प्रभू गुर्जी.. एकदम साच बात कही आपने

अशा लोकांना अनुलेखाने मारण हेच बरोबर...

प्रचेतस's picture

10 Aug 2011 - 12:36 pm | प्रचेतस

तुमची सही तर वेगळेच काही सांगतेय. :)

तुमची सही तर वेगळेच काही सांगतेय

काहीं लोक.. आमच्या सही पलीकडची असतात..... :D
वर गुर्जी म्हणाले तसं.. विरोधाचं हत्यार वापर करून त्याचा publicity साठी छान वापर करतात

विनायक प्रभू's picture

10 Aug 2011 - 12:43 pm | विनायक प्रभू

नाय कळ्ळ.
मे बी आय अ‍ॅम अ स्टुपिड.

प्रचेतस's picture

10 Aug 2011 - 1:08 pm | प्रचेतस

काय गुर्जी, तुम्ही तर क्रिप्टिक लिहिण्यात पटाईत. :)

श्री श्री स्पावड्या महाराजांची ही सही
________________________________________
स्पावड्या
आमचे येथे श्री कृपेकरून, सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार उठवल्या जाईल

युयुत्सुंचा धागा यापैकी एक असूनही श्री श्री स्पावड्या महाराजांनी त्यांना अनुल्लेखाने मारायचे ठरवले हे आम्हास त्यांच्या सहीशी विसंगत वर्तन वाटले.

वेताळ's picture

10 Aug 2011 - 12:43 pm | वेताळ

मास्तरांचे लिखाण पहिल्यादांच पहिल्या प्रयत्नात समजले.

छोटा डॉन's picture

10 Aug 2011 - 12:58 pm | छोटा डॉन

मास्तरांशी सहमत नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नेमके लिहले आहे.

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 1:38 pm | धमाल मुलगा

पत्र उत्तम.
परंतु एक सुधारणा सुचवू इच्छितो. मिपाच्या परंपरेला अनुसरुन पत्र हे 'अनावृत्त' असावे. ते तसे आहे हे शिर्षकात कळवण्याची व्यवस्था व्हावी.

अवांतरः मास्तर, वावटळीत धार मारायची सवय कधी सुटणार? किती वेळा अंगावर उडवून घेणार?

बेष्ट! आवांतर.
=))
च्यायला पडलोच खुर्चीवरुन.

नगरीनिरंजन's picture

10 Aug 2011 - 2:01 pm | नगरीनिरंजन

=))

यकु's picture

10 Aug 2011 - 3:18 pm | यकु

धन्य ते धमालपंत आणि धन्य ती वावटळ !!!

वपाडाव's picture

10 Aug 2011 - 5:51 pm | वपाडाव

बाब्बौ =))=))=))=))

प्रभो's picture

10 Aug 2011 - 7:29 pm | प्रभो

=)) =)) =)) =))

धम्स,
आता शिवांबू प्राशनावर लेख नाही लिहिलास म्हणजे मिळवली.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2011 - 3:37 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतरः मास्तर, वावटळीत धार मारायची सवय कधी सुटणार? किती वेळा अंगावर उडवून घेणार?

सांगुन सांगुन थकलो :)

विजुभाऊ's picture

10 Aug 2011 - 5:33 pm | विजुभाऊ

मिपाच्या परंपरेला अनुसरुन पत्र हे 'अनावृत्त' असावे. ते तसे आहे हे शिर्षकात कळवण्याची व्यवस्था व्हावी.
एकूणातच तुमचा अनावृत्त या शब्दावर फार लोभ दिसतोय.
कळावे लोभ असावा

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:24 pm | धमाल मुलगा

>लोभ असावा
अनावृत्त लोभ असावा असं नाही म्हणालात.

-(आवृत्त) ध.

विनायक प्रभू's picture

10 Aug 2011 - 4:07 pm | विनायक प्रभू

बरोबर आहे रे तुझे परा.
जाता जाता मधे विप्र पण घालायला पाहीजे.

विजुभाऊ's picture

10 Aug 2011 - 5:30 pm | विजुभाऊ

एक इंग्रजी वाक्य आठवले
प्रॉब्लेम इन मडरेसलिंग विथ अ पिग इज..... नॉट दॅट यू गेट डर्टीयर.बट द पिग एन्जॉईज इट

राजेश घासकडवी's picture

10 Aug 2011 - 5:36 pm | राजेश घासकडवी

एनी पब्लिकशिट्टी इज गुड पब्लिकशिट्टी असं जे कोणा थोर विचारवंताने म्हणून ठेवलेलं आहे ते काही चूक नाही.
जो उद्देश साधायला जातो आहोत त्याच्या बरोब्बर विरुद्ध परिणाम होतो आहे का? सर्वांनी आपल्या सहभागाविषयी पुनर्विचार करावा.

पंगा's picture

10 Aug 2011 - 5:46 pm | पंगा

प्रत्येकी पाचशे रुपये इतके का स्वस्त झाले आहेत, आणि नेमके कोणाला आणि नेमके काय सिद्ध करायला, आणि नेमके कशासाठी, हा प्रश्न उरतोच.

हं, आता असा स्टान्स घेतल्याने प्रतिपक्ष 'जितं मया' म्हणत फिरायला मोकळा होतो खरा, पण हू केअर्स?

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:18 pm | धमाल मुलगा

>>प्रत्येकी पाचशे रुपये इतके का स्वस्त झाले आहेत
रुपयाचं अवमुल्यन वगैरे काहीबाही वाचनात येतंय हल्ली. त्याअन्वये तर स्वस्त झाले नसतील ना? ;)

पप्पु अंकल's picture

10 Aug 2011 - 9:02 pm | पप्पु अंकल

बदनाम होने से भी नाम होता है

वपाडाव's picture

10 Aug 2011 - 5:51 pm | वपाडाव

चला त्यो धागा त्यजला...
आता ह्याला शंभरीकडे नेउया...
हातभार लावा रे मंडळी...

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:25 pm | धमाल मुलगा

हातभार काय नाही जी...जरा टेकू लावतोय.
चालतंय का?

आदिजोशी's picture

10 Aug 2011 - 6:41 pm | आदिजोशी

अश्लील कॉमेंट्स टाकणं बंद करा आता.

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:44 pm | धमाल मुलगा

अश्लिल?
मी काय अश्लिल लिहिलं जोशीसाहेब?

-साळसूद.

सध्या त्याचा ('न'अवरता)ध झालाय. ;)

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:58 pm | धमाल मुलगा

का माझ्या जीवावर उठलायस? :D

मन१'s picture

11 Aug 2011 - 8:50 am | मन१

मुळात विरोधाने प्रसिद्धी मिळेल म्हणुन आपण स्वतः गपगुमान रहावे का?
त्यातही मिपावर जे ज्योतिष विरोधक्/चिकित्सक नियमित येतात त्यांना हे सर्व वाचुन मनस्ताप होतो त्यांनी तो मुकाट्याने सहन करावा काय्? आणि तोही केवळ आपले मत आपण व्यक्त केले तर आपल्या विरोधकाची प्रसिद्धी होइल ह्या गोष्टीची धास्ती घेउन?
तुम्ही म्हणता तसे कित्येक कुंपणावरले असतीलही(समजा ह्यांची category A) . पण काही कुंपणावरले असेही असतात ज्यांना निदान ह्या चर्चा वाचुन एकदा तरी स्वतःचे डोके वापरावेसे वाटते. अंधविश्वास ठेवण्याऐवजी स्वतः गोष्टी निदान पडाताळुन पहाव्यात ह्याची जाणीव होते, त्यांच्या सुप्त conscience ला फुंकर घातली जाते.(समजा ह्यांची category B).
समजा जर केवळ पुन: पुनः इथे मिपावर किंवा आपल्या समाजात कुठेही एखादी धादांत खोटी गोष्ट अफाट आत्मविश्वासाने उच्चारवात दीर्घकाळ सांगितली गेली व ती unchallenged (निर्वाव्हानित) व unchecked(निर्शह) तर निव्वळ डोंगराएवढा(खोटा आत्मविश्वास),पुनर्कथन ह्या भांडवलाने अशी प्रवृत्तीपुढे कित्येक विचारी मनेही गंजुन जात हळुहळु असत्यपूजनात व्यग्र होतात.(category A तर समग्र इथे जातेच पण बहुसंख्य category B सुद्धा जातेच) हे असे खरेच होते हे तुमच्यासारख्या अभ्यस्त व सिनियर लोकांना मी सांगणे विनोदी दिसेल, पण आठवण करुन द्याविशी वाटली.
एक ताजे उदाहरण म्हणजे केवळ "अनुभव घ्या","अनुभव घ्या" असे म्हणणार्‍या नाडीवाल्यांमुळे इथल्या कित्येकांना खरोखरच त्यात तथ्य आहे असे वाटु लागले आहे.(category A). आता अशांसाठी एक गोष्ट सांगणे क्रमप्राप्त ठरते ती ही की स्वतःच्या दमड्या खर्चुन श्री आत्मशून्य ह्यांनी नाडी पाहिली त्यात त्यांना काहीही प्राथमिक निरिक्षणात तथ्य आढळले नाही. समजा आत्मशून्य ह्यांनी हे सांगणेच टाळले तर? इतर कित्येक जण शेकडोंच्या संख्येने रांग लावण्यास तयार. जर अनुभव घेउनही त्यात काहीही तथ्य नाही जे जाण्वत असेल, आणि सांगावेसे वाटत असेल, तर ते सांगितलेच पाहिजे. तुम्ही म्हणता तशी उलट प्रसिद्धी होण्याचा धोका पत्करुनही.

अजुन एका बाजुने विचार कराय्चा झाल्यास मुळात चाचणी घेण्यास हरकत काय आहे? जर खरोखर काही फॅक्ट असेल तर ती हाताला तरी लागेल.
संपादकाना स्वतःला ह्या व्यासपीठावर मिपावर असल्या गोष्टींची जाहिरात झालेली चालत असेल, त्यांची त्या प्रकारला संमती असेल, तर त्याच संपादकांनी एखाद्याला त्याचे विरोधी विचार मांडायचेही स्वातंत्र्य दिले आहे. ते मांडणे ह्या व्यासपीठाच्या आरोग्यासाठी आणि स्वतः विरोधकाच्या मनस्वास्थ्यासाठी उचितच आहे.
दुर्ल़क्ष करुन सगळ्याच गोष्टी थांबवता येत नाहीत्. तुम्ही म्हणता तसे गपगुमान राहिल्यामुळे असल्या प्रकारांचा प्रभाव वाढत जाण्याचाच धोका अधिक दिस्तोय. कसा ते नाडीसंदर्भात वरतीच लिहिले आहे.

सुनील's picture

11 Aug 2011 - 9:11 am | सुनील

सहमत. म्हणूनच मी पदरचे दीड्-दोन हजार घालायला तयार आहे पण युयुस्तुरावांनीच माघार घेतलीय!

मला एक कळत नाही.. श्री. युयुत्सु आता आव्हान स्वीकारायला तयार झाले आहेत ना? मग आपण आजूबाजूच्या चर्चा आणि मुद्दे उकरुन त्या प्रोसेसला खीळ कशाला घालायची. जे आहे ते सत्य समोर येऊ दे ना.

त्याला आव्हान म्हणू नये आणि या प्रोसेसच्या आधीच एकमेकांचे खंडन करु नये अशी माझी विनंती आहे.
फी / पैसे हे इथे दुय्यम आहेत. ते मागावेत का? कोणी ठेवावेत किंवा घ्यावेत, "हरल्यास" परत करावेत की दान करावेत.. या मुद्द्यांपेक्षा मूळ ज्योतिष विषयाची आणि युयुत्सुंच्या दाव्यांची रिलायेबिलिटी सिद्ध होणे हा तळाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे असं वाटतं.

युयुत्सुंना जर त्यांच्या विषयाबद्दल आत्मविश्वास असेल तर त्यांनी चॅलेंज करणार्‍यांकडून फी मागणे गैर नाही असे पुन्हा विचार करता वाटते. तसेही त्यांनी काही लाखोंनी पैसे मागितलेले नाहीत.

इन एनी केस, आपला उद्देश काय आहे हे तपासणे जास्त महत्वाचे ठरेल. युयुत्सुंना प्रसिद्धी मिळते आहे की नाही / पैसा मिळतो आहे की नाही हा.. की त्यांना खोटे पाडणे एवढाच..?

की मुळात शास्त्रशुद्ध तपासणी करणे हा..

मन१'s picture

11 Aug 2011 - 10:03 am | मन१

माझ्या प्रतिसादात शेवटुन सातव्या आठव्या ओळीत हेच म्हटलय. हेच म्हणाय्चं होतं.

पंगा's picture

11 Aug 2011 - 10:43 am | पंगा

की मुळात शास्त्रशुद्ध तपासणी करणे हा..

शास्त्रशुद्ध तपासणी करण्याची गरज नेमकी कोणाला आहे? तुम्हाला? की त्यांना?

त्यांचे माहीत नाही, पण तुम्हाला याची शास्त्रशुद्ध तपासणी करण्याची नेमकी गरज का वाटावी? की तुम्हालाच 'कदाचित हे थोतांड नसेल, कदाचित यात काही तथ्य असू शकेलही' अशी काही शंका आहे? (असल्यास ती नेमकी कशामुळे उद्भवावी?)

यात नेमके कोण कोणाला च्यालेंज करीत आहे?

(त्यापेक्षा, 'तुमचे लेख कदाचित भयंकर रोचक असतीलही, पण दुर्दैवाने आम्हाला त्यात काही रस नाही बॉ' असा सरळसरळ स्टान्स का घेऊ नये? अ‍ॅम्वेवाल्यांना कटवण्याचा? व्हाय आर्ग्यू?)

'तुमचे लेख कदाचित भयंकर रोचक असतीलही, पण दुर्दैवाने आम्हाला त्यात काही रस नाही बॉ' असा सरळसरळ स्टान्स का घेऊ नये? अ‍ॅम्वेवाल्यांना कटवण्याचा?

पंगाशेठ, असा स्टान्स घेउनही अ‍ॅमवेवाले कटत नाहीत हो. कुठून एकदा अवदसा आठवली आणि एका "इंडीयनला" वॉलमार्टमध्ये मोबाईल नंबर दिला... आणि जे भोग सुरु झाले ते अमेरिका सोडल्यावरच संपले :)

जे भोग सुरु झाले ते अमेरिका सोडल्यावरच संपले

नेमका नं कुणाला दिलेला होता हे कळेल का....
इंडीयनला का इंडियनीला.....

नेमका नं कुणाला दिलेला होता हे कळेल का....

ते तुम्हाला काय सांगावं महाराजा... भारतात अ‍ॅमवेवाले फारसे दिसत नाहीत. कुणी भेटला तर तुमचा नंबर देतो त्याला... तुम्ही स्वतःच अनुभवा मग :)

आमच्या १०वी-१२वीच्या काळात आमच्या पिताश्रींनी यात पैकं गुंतवलं वुतं....
फुडं त्या अ‍ॅमवेचं अन त्या पैक्याचं काय झालं आमाला काईच खबर-बात न्हाई....

अनेक मार्ग आहेत, ज्याचा त्याने निवडावा.

वेळ असल्यास असल्या भोंदूची खिल्ली उडवावी, विचार करु शकतील असे लोक त्यातून घ्यायचा तो बोध घेतील. ज्यांना विचार करता येत नाही त्यांना एनीवे काही फरक पडेल की नाही कोणास ठावूक. अधिक वेळ, रुची आणि छंद म्हणून खोट्याला खोटे सिद्ध करणे हा असाच अजून एक मार्ग आहे, आता या बदल्यात थोडी निगेटिव्ह पब्लिसीटी मिळत असेल तर मिळो बापडी.

धन्या's picture

11 Aug 2011 - 3:42 pm | धन्या

अगदी अगदी... सहमत आहे नाईलराव...

या मुद्दयावर हेच मत समोर ठेऊन आम्ही धुरळा उडवला... अर्थात यामध्ये उनको निगेटीव्ह पब्लिकशीट्टी (साभारः घासुगुरुजी) मिळण्याबरोबर आमचीही अक्कल रस्त्यावर आली... हरकत नाही... तुम्ही म्हणताय तसं विचार करु शकतील असे लोक त्यातून घ्यायचा तो बोध घेतील... बास हेच हवंय... :)

बाकी आमचे समुपदेशन करणारे मास्तरच समुपदेशन पुरे म्हणताना पाहून आमचे ड्वाळे पाणावले! मास्तर ते जाउंद्या, आपलं काहीतरी क्रिप्टीक येउंद्या बरं!