गाभा:
मला आता पर्यंत दिलेली आह्वाने कुणितरी संकलीत करण्याची गरज आहे. जर आह्वाने पुरेशी गोळा झाली असतील तर पुढची प्रस्तावित पायरी ठरते ती "योग्य" आहेत की नाही हे ठरविण्याची. त्या साठी आवश्यक समितीच्या गठनाबद्दल आता विचार करू या. आता पर्यंत जमा झालेल्या २०-२५ पत्रिंका वरून निष्कर्ष नक्की काय काढला जाणार हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच.
प्रतिक्रिया
10 Aug 2011 - 11:32 am | सुनील
आता पर्यंत जमा झालेल्या २०-२५ पत्रिंका वरून निष्कर्ष नक्की काय काढला जाणार हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच.
दोन महत्त्वाच्या गोष्टी -
१) प्रश्न भूत काळातील असतील, भविष्यात काय होणार याबद्दल नाही. पडताळा ताबडतोब करता आला पाहिजे.
२) पश्न आणि त्यांची उत्तरे ही नि:संदिग्ध असली पाहिजेत. गोलमाल पसारा नको.
हे मान्य असेल तर पुढे बोलू.
10 Aug 2011 - 12:45 pm | आत्मशून्य
तसचं,
हे आव्हांन लोकांनी दीले असल्याने ते स्विकारणार्या व्यक्तीला जर ते झेपलं नाही तर पेनल्टीची सोय असलीच पाहीजे. आव्हान स्विकारणार्या व्यक्तीच्या कश्टाचा योग्य मोबदला देऊ पण त्याबरोबरच सदरील व्यक्तीवरही कोणते तरी दडपण आवश्यक आहे नाही तर सदरील आव्हान स्विकारत बसणे व पैसे कमवणे हा पोरकटपणाचा खेळ बनेल. जर रीझल्ट्स अत्यंत नीराशाजनक असतील तर लोकांचा वेळ आणी पैसा वयैक्तीक हेकटपणापोटी वाया घालवल्याबद्दल योग्यती पेनल्टी अत्यावश्यक आहे. अशा परीस्थीतीत सदरील पैसा यूयूत्सूनी परत दीला नाही तरी चालेल पण त्यावरचा हक्क त्यानीही सोडला पाहीजेच. व तो कोठेतरी योग्य ठीकाणी दान केला जाऊन त्याचा व्यवस्थीत विनीयोग व्हावा ही अपेक्षा आहे.
10 Aug 2011 - 4:08 pm | युयुत्सु
मी चाचणी दडपणा खाली द्यावी असा हेतू असल्यास चाचणीचे रिझल्ट्स चूकू शकतात हे लक्षात घ्यावे. खेळादूना मॅच हरण्या बद्द्ल जर दंड होणार असेल तर कोणीही खेळणार नाही. सबब अशा दडपणयुक्त सदोष चाचणीत मला रस नाही.
10 Aug 2011 - 4:11 pm | आत्मशून्य
.
10 Aug 2011 - 4:11 pm | आत्मशून्य
.
10 Aug 2011 - 4:14 pm | आत्मशून्य
थोडक्यात तूम्हाला तूमच्या शास्त्रावर विश्वास नाही होय ना ? उगाच तूम्ही तूमची तूलना डॉक्टर, खेळाडू वगैरेशी करत आहात, एका सामान्य माणसाप्रमाणे सामोरे या. स्वतःला हॅरी पॉटर मानू नका. एकूणच तूमची कामगीरी खालवते हे मान्य करायला तूम्ही इथच सूरूवात केली हे बघून डोळे पाणावले.
बाकी पैसा मागत आहात तर सोडायलाही शिका. पैसा घेतानाच जर घेतलेल्या पैशाला जागायच तूमच्यावर दडपण आलं आणी भविष्य चूकलं तर ?
10 Aug 2011 - 4:17 pm | युयुत्सु
.
तुम्ही हवा तो तर्क करायला मोकळे आहात. अशा अनेक लखलखत्या तर्कांनी सध्या आकाशात अनेक नवीन तार्यांची भर पडली आहे. त्यांचा आता अभ्यास करावा म्हणतो.
10 Aug 2011 - 4:37 pm | आत्मशून्य
हम्म, तूमच्या तर्कांना पैसे पडतात व ते भेटले नाही की दडपणाखाली तर्क चूकायची शक्यता असते असे जे आपण वर सूचवले आहे ते वाचून मनापासून वाइट वाटले.
आणी कृपया डॉक्टर खेळाडूंना तूमच्या रांगेत बसवून त्यांचा अपमान करू नका, इथे तूम्हाला तूमच्या परफॉर्मन्स बाबत तूमचे समाधान होत नाही तो पर्यंत उत्तर बदलायची/फायनल करायची संधी असेल. खेळाडू अथवा डॉक्टरसारखे नाही की टायमींग चूकलं आणी होत्याच न्हवतं झालं.. तेव्हा प्लिज स्वतःला तेव्हड महान समजू नका. जोपर्यंत तूम्ही तूमचे उत्तर फायनल म्हणनार नाही तो पर्यंत तूम्हाला संधी उपलब्ध असेल. तेव्हा फूकट आव्हान स्विकारायची हीम्म्त दाखवा व तूमच्या ज्ञानाची कींमत जगाला कळूद्यायची संधी घ्या. बेस्ट ऑफ लक. तूम्ही म्हणत असलेली अत्यंत घाणेरडी पोर्णीमा तूम्हाला लकी ठरो हीच इछ्चा.
10 Aug 2011 - 5:39 pm | शाहिर
युयुत्सुंची फाटली...आता काय कुठे इचारत बसु नका !!
10 Aug 2011 - 11:52 am | गवि
पश्न आणि त्यांची उत्तरे ही नि:संदिग्ध असली पाहिजेत. गोलमाल पसारा नको
म्हणजे क्लोज्ड एंडेड ना? हो / नाही.
कारण सब्जेक्टिव्ह पडताळा कठीण असतो.
शिवाय पुढील सहा महिने / वर्ष एवढ्या काळातल्या भविष्यकालीन घटनाही सांगायला काय हरकत?
हा प्रयोग डबल ब्लाईंड असण्याची आवश्यकता नाही. कारण यात कंट्रोल ग्रुप आणि प्रयोगात भाग घेणारा ग्रुप असे दोन भाग नाहीत.
सिंगल ब्लाईंड टेस्ट असावी. म्हणजेच पन्नास लोकांनी आपापली सत्य माहिती पंचांकडे द्यावी. त्यावर नाव लिहू नये. मात्र ठरलेल्या प्रश्नांची उत्तरे (स्वतःविषयी) त्यात आधीच लिहिलेली असावीत.
मग त्यातून रँडमली वीस माहिती पंचांनी उचलाव्या. अर्थात याही माहितीवर नुसता नंबर असेल.
यामुळे युयुत्सुंना आपण कोणाची केस पाहतो आहोत हे समजणार नाही आणि उलट्या दिशेने आपलीच माहिती पाहिली जात आहे हे सहभागी व्यक्तींनाही कळणार नाही. यात सर्व बायस टाळले जातील.
विश्लेषण झाल्यावर युयुत्सुंनी उत्तरे केवळ नंबरवार पंचांकडे परत द्यायची. पंचांनी फक्त नंबरानुसार मूळ कँडिडेट्सनी दिलेली उत्तरे तपासायची.
प्रश्न ठरलेले असावेत आणि उत्तरेही सहभागकर्त्यांनी हो / नाही अशी "आधीच" पंचांकडे देऊन ठेवलेली असावीत. म्हणजे फक्त ताडून पाहणे बाकी राहील. उत्तर मिळाल्यावर ते नाकारले अशी शक्यता राहणार नाही.
10 Aug 2011 - 12:03 pm | सुनील
म्हणजे क्लोज्ड एंडेड ना? हो / नाही.
बरोबर.
शिवाय पुढील सहा महिने / वर्ष एवढ्या काळातल्या भविष्यकालीन घटनाही सांगायला काय हरकत?
पडताळा लगेच करता येणार नाही. वाट पहावी लागेल. निष्कर्ष काढणे शक्य होणार नाही.
जे भाग घेणार त्यांनी स्वतःचीच माहिती द्यावी असे नाही. ते आपल्या ओळखीच्या एक किंवा अनेक व्यक्तींची माहिती (जन्मतरीख, वेळ आणि जागा) यांची माहिती युयुत्सु यांना देऊ शकतात. जमा होणार्या एकूण पत्रिकापैकी किमान ५०% तरी युयुत्सु यांनी तपासाव्या. आणि त्याप्रमाणे पैसे घ्यावेत (प्रत्येकी रु. ५००)
रामदास यांनी पंच म्हणून काम करावे अशे सुचना मी मांडतो.
10 Aug 2011 - 3:12 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
या चाचणीत जे प्रश्न आहेत ते त्याची उत्तरे एका लिफाप्यात घालून पंचांकडे द्यावेत. मूख्य म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना याची उत्तरे देण्यास मूभा असावी. ही उत्तरे पण पंचाकडे द्यावीत व एकदमच ती सगळी जाहीर करावीत. म्हणजे जोतिषी व इतर जण यांच्यात काही फरक नाही हेही सिद्ध होईल.
कारण युयुत्सुंना जोतिष येत नाही हा मुद्दा चाचणीचा नसून हे असले काम कोणीही करू शकते हे सिद्ध करण्याचा असावा. किंवा यात काहीही अर्थ नाही असे असावा. याचाच दुसरा अर्थ ... सांगायला नको.....
10 Aug 2011 - 5:04 pm | पक्या
जन्मतारीख देताना वेळ चु़कीची दिली गेली तर?
नीटसे आठवत नाहीये (म्हणजे कुणी , कधी सागितले ते) पण असे काहितरि ऐकले होते की डॉक्टरने बाळ जन्माला आल्या आल्या घड्याळ पाहिले नाही आणि वेळ सांगताना २-३ मि. फरक पडेल अशी वेळ सांगितली तरी पत्रिकेत नोंदवताना मात्र डॉक्टरांनी सांगितलेलीच वेळ नोंदवली गेली. तर अशा २-३ मि. च्या बदलाने ज्योतिष कथनात काही फरक पडू शकतो काय? माझ्या मते २-३ मि.ने पडत नसावा पण काही जास्त मिं. ने मात्र पडत असावा.
दुसरे असे की देणार्याने (आवाहन कर्त्याने) वैयक्तिक आकसापोटी / खोडसाळ पणाने / गंमत म्हणून मुद्दामच एखाद्या व्यक्तीचा खोटा विदा दिल्यास काय? त्या सदस्याची विश्वासार्हता कोणत्या कसोटीवर तपासायची? कदाचित युयुत्सु प्रामाणिकपणे काम करतीलही पण मिळालेला विदाच चु़कीचा असेल तर? परस्पर विश्वास हे म्हणणे ठीक आहे पण अशा चाचणीच्या वेळेस ते प्रॅक्टीकल वाटत नाही. कशावरुन एखादा सदस्य मुद्दाम चुकीची माहिती देणार नाही?
त्यामुळे या बाबतीत इथे असे म्हणावेसे वाटते की जर भविष्य/ भूतकाळ ह्याचे निदान चु़कीचे आले तर मिपावर युयुत्सुंनी किंवा आवाहन कर्त्यांनी ते तसे प्रसिध्द करावे ही जी अट आहे तिथपर्यंत ठीक आहे पण पेपरमध्ये किंवा जालावर इतरत्र प्रसिध्द करावे हे जरा अती वाटते. शिवाय त्यावरुन त्या व्यक्तीची मानहानी होणे, त्यांची पध्दत साफ चुकीची आहे असा निष्कर्ष काढणे हेही चुकीचे वाटते. अशा वेळी निष्कर्ष प्रसिध्द करताना खाली एक तळटीप टाकण्याचे सुचवावेसे वाटते ती अशी की 'वरील निष्कर्ष सर्व विदा अचूक आहे हे गृहीत धरून प्रसिध्द करण्यात आले आहेत. '
बाकी, निदान / निष्कर्ष चुकीचे आल्यास युयुत्सुंनी मिळालेले पैसे योग्य ठिकाणी दान करावेत असे कुणी म्हटले आहे ते योग्य वाटले.
10 Aug 2011 - 6:45 pm | अशोक पतिल
ज्योतिष हे काही थोतान्ड नाही. परन्तु हे शास्र वेगळे आहे, त्याचा आध्यात्मशी सम्बध आहे. ज्याचि चेतना उन्नत झालेली असते, त्याला भुत व भविष्य जानता येण्याची पात्रता असु शकते. जसे, टेकडीवर उभे राहुन मागचे/पुढ्चे पाहता येणे.
11 Aug 2011 - 8:42 am | मन१
प्र का टा आ
11 Aug 2011 - 7:05 am | आशुडि
लोकांचा विरोध ज्योतिषाला आहे कि या ज्योतिशिंना????
@ज्योतिशि..
तुम्हि घेतलेले मुळ पैसे परत करायला काय प्रॉब्लेम आहे??Its challenge not surgery or international game!
11 Aug 2011 - 11:46 am | साती
युयुत्सु,एकाच अक्षांश रेखांशावर जन्माला आलेल्या जुळ्यांच्या पत्रिका सारख्याच असतात का?
साधारण जन्मवेळेत किती मिनिटांचा फरक असल्यास अश्या जुळ्यांच्या पत्रिका बदलतील?
(हा जेन्युईन प्रश्न आहे, खेचण्यासाठी विचारत नाही याची कृपया नोंद घेणे.)
11 Aug 2011 - 12:07 pm | वसईचे किल्लेदार
विषाची परिक्शा घेताय ... जरा सावध रहा!
12 Aug 2011 - 12:46 am | शशिकांत ओक
समजा,
जर आव्हान प्रक्रियेत फक्त ३ कुंडल्या हाताळल्या गेल्या त्यातील कथने बंद पाकिटातून मिळालेल्या माहितीशी शत प्रतिशत अचुक जुळली
तर तो डेटा किरकोळ होता आणखी मोठ्या संख्येत कसोटी घ्यावी लागेल, असे म्हणत म्हणत लाखोंच्या संख्येने बंद लिफाफे उघडून त्यातूनही अचुक माहिती उघडकीस आली तरी आणखी मोठा डाटा घेतल्याशिवाय खरी कसोटी होऊ शकत नाही असे म्हटले जाईल व शास्त्राची मान्यता देण्यास नकार दिला जाईल.
या विपरीत जर पहित्या प्रथम फेरीतील किरकोळ संख्येच्या लिफाफ्यातील माहितीशी अचुकता साधली गेली नाही तर ज्योतिषाला काडीचा आधार नाही असे सिद्ध झालेले आहे असा निवाडा तात्काळ होईल. बरोबर ना....
13 Aug 2011 - 9:50 am | युयुत्सु
+१
ओक साहेब तुम्ही लोकांच्या शेपटीवर पाय दिलात
13 Aug 2011 - 10:47 am | गवि
दोन्ही प्रतिसाद खेदजनक आणि सर्व वाचकांचा (ज्यांच्या जोरावर आपण लिहितो) उघड अपमान करणारे आहेत.
लोकांच्या शेपटीवर पाय? लाखोंच्या संख्ये ने सिद्ध होऊनही लोक अजून जास्त पुरावा मागतील?
अहो आधी दहावीस च्या संख्ये ने तरी काही सिद्ध होऊ दे..
.
पण जाऊदे. आता मात्र ख रेच इच्छा नाही.
दोन्ही प्रतिसादकर्ते वयाने जाणते आहेत. ही वरील विधाने काहीजणांनाच उउद्देशून आहेत असं ते म्हणू शकतील. पण भ्रमनिरास झाला इतके म्हणून थांबतो.
13 Aug 2011 - 11:04 am | ईश आपटे
गगनविहारी
आपला ज्योतिषावर विश्वास आहे का नाही हे मला माहिती नाही. पण ज्योतिष विषयक वैज्ञानिकांनी घेतलेल्या चाचण्या या अशाच पक्षपाती राहिलेल्या आहेत. ते जे प्रश्न उपस्थित करतात सामान्यतः ते सांगायचा दावा कोणत्याही ज्योतिषाने केलेला नसतो असले हास्यास्पद व विचित्र प्रश्न असतात.
मध्ये नारळीकर-दाभोळकरा गँगने चाचणी ९०% यशस्वी यायला हवी अशी हास्यास्पद मागणी केली होती. व त्यात ही कुणाच्या पत्रिका द्यायच्या त्याचा अधिकार हे लोक स्वतःकडे ठेवतात.
म्हणजे चाचणी घेण्या अगोदरच ज्योतिष हे फोल सिध्द करायचेच आहे असा त्यांचा पूर्वग्रह असतो व चाचण्या त्यानुसार प्लॅन केल्या जातात.
तात्पर्य सेन्सिबल ज्योतिषी असल्या पक्षपाती चाचण्या द्यायला तयार होत नाहीत.
बाकी ओक साहेबांशी पूर्ण सहमत..........
13 Aug 2011 - 11:41 am | नितिन थत्ते
मग दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा. दावा काय आहे ते स्पष्ट सांगा.
13 Aug 2011 - 12:02 pm | ईश आपटे
कसला दावा?
कसला दावा?
कसला दावा?
13 Aug 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
दावा हा अक्षय कुमार, रवीना टंडन आणि नौसिरुद्दिन शहाचा एक जबर्याट शिणीमा आहे. त्यात 'दिल में है तू..' टायीपची फडकती धडकती गाणी पण आहेत.
13 Aug 2011 - 12:23 pm | ईश आपटे
क्लासिक... बर्याच वर्षांनी ह्या गाण्याची आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद... अक्की रविनाचे सॉलिड गाणे आहे हे........ वन ऑफ फेवरिट साँग इन दोज डेज :)
13 Aug 2011 - 4:23 pm | आत्मशून्य
19 Aug 2011 - 8:48 pm | शशिकांत ओक
गवि आणि अन्य मित्र हो,
मिपावर आणि अन्य साईटच्या चावडीवर अगदी मोजक्या संख्येत तरी
ज्योतिषशास्त्राची सत्यता सिद्ध करा असा पेच आपण टाकलात खरा.
म्हणजेच पर्यायाने नाडीग्रंथांची सत्यता ही अशीच सिद्ध करा असा आपला सुर
आहे. वक्तव्य म्हणून ते कदाचित ठीक असेल.
मात्र मिपावर 'काथ्याकूट' सदरात फक्त विचार सादर केले जातात. ह्या
साईट्स आव्हाने वा प्रतिआव्हाने देण्या वा घेण्याच्या जागा नाही.
आमच्यासारखे काही नाडी ग्रंथांवर अनेक प्रकारे अनुभव घेऊन त्यातील मर्मे
लोकांना मनोरंजन करून काही प्रमाणात विचार करायला उद्युक्त करतात.
तर काही लोकांना फावला वेळात बसल्या बसल्या नाडी वा ज्योतिषशास्त्राचा
काथ्या कुटायला मिळतो. पण म्हणून मिपा वा अन्य साईट्स या अशी शहानिशा
करायची जागा नाही.
स्वतः अनुभव घेणार नाही पण ओकांनी आम्हाला मान्य होतील असे पुरावे सादर
करावेत अशी फरमाईश केली जाते.
मित्रहो, मोजक्या संख्येचे सोडा लाखांच्या संख्येने नाडी ग्रंथंची कसोटी
लोक आपापले कथन ऐकून करून घेऊन आले आहेत. त्यातील "साक्षी" म्हणून नाडी
ताडप'ट्ट्यातील मजकूर वाचून सांगितली जाणारी कथने १०० ट्क्के खरी येतात.
कारण कोणी ही आपल्यासाठी साक्षी म्हणून सांगितल्या जाणाऱ्या मजकुरात जरा
जरी बदल असेल तर तो मान्य करणार नाही.
समजा एखाद्याच्या वडिलांचे नाव जगन्नाथ असेल तर बाकी सर्व माहिती अगदी
बरोबर पण ताडपट्टीतील व्यक्तीच्या वडिलांचे नाव जनार्दन असे म्हटले असेल
तर ती व्यक्ती ती ताडपट्टी मला लागू होत नाही असे म्हणेल. ती पट्टी माझी
असे तो मान्य करणार नाही. त्यासाठी बंद लिफाफे वगैरे करायची गरज ही
नाही. पण आपल्या साईटवरील लोकांना त्याची किंचितही गंधवार्ता नाही वा
असेल तरी त्याची वाच्यता करायची ते साहस दाखवत नाहात. एखादी मृगनयनी
धिटाईने आपले अनुभव कथन करायला सरसावते पण शाब्दिक वारांनी तिला घायाळ
केले जाते. ते पाहून अन्य नाडी ग्रथांचे अनुभव घेतलेलेही बावचळतात.
असो.
मतितार्थ इतका की एखादा नाडीग्रंथ अभ्यास गट किंवा फोरम बनवू या त्यातून
मग नाडी ग्रंथांवरील कथनांची शहानिशा कशी करावी असे आधी ठरवता येईल
यासाठी मी इच्छुक लोकांना योग्य ती साधन सामुग्री उपलब्ध करून देईन असे
आश्वासन देतो. मात्र मला मधे घालून खोटे खोटे हो हो म्हणून नाडी
ग्रंथांवर व ते न जमल्यास माझ्यावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी या फोरमचा
उपयोग होऊ नये. ही विनंती.
22 Aug 2011 - 9:46 am | गवि
मिपावर आणि अन्य साईटच्या चावडीवर अगदी मोजक्या संख्येत तरी
ज्योतिषशास्त्राची सत्यता सिद्ध करा असा पेच आपण टाकलात खरा.
म्हणजेच पर्यायाने नाडीग्रंथांची सत्यता ही अशीच सिद्ध करा असा आपला सुर
आहे. वक्तव्य म्हणून ते कदाचित ठीक असेल.
मोठी गैरसमजूत.. त्यामुळे ती काढणे आले.. म्हणून लिहीत आहे.
तुम्ही आणि युयुत्सुंनी ज्योतिष या विषयावर चाललेल्या या धाग्यावरील चर्चेतच आपापली मते (लाखोंच्या संख्येने वगैरे उल्लेख आणि शेपटीवर पाय इत्यादि) दिली आहेत. त्यामुळे माझा प्रतिसादही फक्त ज्योतिष आणि संबंधित प्रयोग (मी याला आव्हान / कसोटी वगैरे म्हणणे आणि मानणे कटाक्षाने टाळत आलो आहे हे माझे आधीचे प्रतिसाद वाचून दिसेलच) याविषयीच होता. नाडीचा तर इथे विषयही नाहीये. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेतून नाडीविषयी काही ध्वनित होत असल्यास ते मनातून काढून टाकावे.
मतितार्थ इतका की एखादा नाडीग्रंथ अभ्यास गट किंवा फोरम बनवू या त्यातून
मग नाडी ग्रंथांवरील कथनांची शहानिशा कशी करावी असे आधी ठरवता येईल
नाडीविषयक कट्टा / चर्चा / भेट झाल्यास मी तिथे उपस्थित राहण्याची सकारात्मक तयारी दाखवली होती आणि आहे. अर्थात अन्य सदस्यांसोबत.
अन्य काही कारणांनी तो योग जुळून येत नसेल तर त्यामधे माझा काही दोष नाही.