वामचा रस्सा आणि सुके (Eel fish)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
10 Aug 2011 - 4:39 am

माझ्या आईकडे हि वाम एकदम आवडती पाकृ आहे. आमच्याकडे हिला "वाम" म्हणतात, पण ह्याला दुसरे काही नाव असल्यास मला महित नाही. हि वाम नदित व समुद्रातही सापडते. नदीतील वाम समुद्रातील वाम पेक्षा छोटी असते.
परवा, इथे मार्केट मधे फिरताना मला हि एकदम fresh वाम मिळाली. एवढी fresh वाम बघुन मी फक्त त्या मार्केट मधे उड्या मारायचे बाकी होते. ;)
घरी त्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी हेच होते. त्याचीच पाकृ इथे देत आहे.

साहित्यः

वाम - फ्रेश वाम १/२ किलो
कांदा - १ मध्यम बारीक चिरुन
सुके खोबरे - १ मध्यम तुकडा किंवा १/४ कप किसलेले सुके खोबरे
कोथिंबीर - १/४ कप
बडिशेप - १ चमचा
धणे - १ चमचा
आले - १ इंच
लसुण - ५-६ पाकळ्या
हळद - २ चमचे
लाल तिखट - ४ चमचे
धणे पावडर - १ चमचा
हिंग - १ चमचा
लिंबु - १ सजावटीसाठी
मिठ चवीनुसार

कृती:

१. वाम स्वच्छ धुवुन त्याचे तुकडे करुन घ्यावेत. ह्या तुकड्यांना १/२ चमचा हळद व हिंग लावुन ठेवावा.
२. मिक्सर मधे कांदा, खोबरे, कोथिंबीर, बडिशेप, धणे , आले व २-३ लसुण पाकळ्या टाकुन एकदम बारीक वाटुन घ्यावे. हे वाटण खुप smooth वाटावे लागते.
३. कढई मधे तेल गरम करावे. त्यात २ लसुण पाकळया ठेचुन टाकाव्यात. त्या थोड्या परतल्यावर त्यात वाटलेले वाटण टाकुन परतावे.
४. वाटण थोडे परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट व धणे पावडर टाकावी. तेल सुटेपर्यंत वाटण परतावे.
५. तेल सुटल्यावर त्यात २-३ कप पाणी व चवीनुसार मिठ टाकावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळद व हिंग लावुन ठेवलेले वामचे तुकडे टाकावेत. हे माशे शिजायला जास्त वेळ लागत नाही पण रश्श्याला चव येण्यासाठी ५-१० मिनिटे हे उकळुन घ्यावे. रस्सा उकळताना तो चमच्याने हलवु नये, नाहितर सगळ्या तुकड्यांचा गाळ होइल.

vaam 1

७. आता हा रस्सा तयार झाला. ह्याला माझ्या आईकडे "कांजी" म्हणतात.
८. तुकड्यांचे सुके करण्यासाठी पहिले कढईतील कांजी दुसर्‍या पातेल्यात काढुन घ्यावा. पण कढईत २-३ चमचे कांजी आणि तुकडे तसेच ठेवावेत.
९. कांजीच्या पातेल्यात वामचा शेपटीचा किंवा तोंडाचा भाग असल्यास तो टाकुन ठेवावा आणि गॅसवर कमी आचेवर उकळत ठेवावा.
१०. आता कढईतील तुकड्यांवर १ चमचा कच्चे तेल टाकुन गॅस चालु करावा. त्यात वरतुन हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मिठ टाकुन निट परतावे. त्यातील रस्सा आटल्यावर वरतुन कोथिंबीर टाकुन गॅस बंद करावा. सुके टुकडे तयार आहेत.

vaam 2

११. असा गरम गरम कांजी, सुके तुकडे, गरम तांदुळाची भाकरी आणि भातासोबत खावा. ह्या पेक्षा दुसरा स्वर्ग नाही.

vaam

प्रतिक्रिया

सहज's picture

10 Aug 2011 - 6:20 am | सहज

उनगी सुशी खाणे होते आता वाम कालवण करुन पाहू. स्टींग रे देखील असेच करुन बरे लागावेत.

बादवे अश्या प्रकारे केलेल्या वामला अन्य माश्यांच्या तुलनेत जरासा उग्र वास असतो का?

सुनील's picture

10 Aug 2011 - 10:17 am | सुनील

उग्र वास घालवण्यासाठी त्यात तिरफळे घालावीत काय?

मी तरी कधीच ह्या रश्श्या मधे तिरफळे वापरली नाहियेत. वाम फ्रेश असेल तर तीला एवढा वास येत नाही. थोडाफार वास असेल, तर तो कमी होण्यासाठीच त्याला हिंग आणि हळद लावुन ठेवली होती.

श्रावणात अश्या पाकृ टाकुन अन्याय करीत आहात असे नाही का वाटत??? ;)

नाहि हो. इथे श्रावण पाळायला लागलो, तर रोज त्याच त्याच भाज्या खाउन वेड लागायची वेळ येइल. ;) त्यामुळे आम्ही श्रावण पाळत नाही.

विसरलोच.

"इथे"तरी सगळेजण थोडेच पाळतात श्रावण :)

इरसाल's picture

10 Aug 2011 - 10:16 am | इरसाल

मृणालिनी वाम छानच. कमी काट्यांमुळे आपल्याला जाम आवडतात.
कोकणात काही ठिकाणी ह्याला वाव म्हणतात कदाचित लांबी वावभर असल्यामुळे असेलही.
नदीमध्ये पोकळ ओंडके टाकून १ दिवसाने काढले कि २/३ वाम नक्कीच.

(समुद्री आणि नदीतील वाम/वाव खालेल्ला ) वामपंथी इरसाल

कमी काट्यांमुळे आपल्याला जाम आवडतात.

आँ..? मला तर त्यात अत्यंत धारदार काटे आणि मांसल भाग तुलनेत फारच कमी, म्हणून टेस्टी असूनही मजा आली नव्हती.

पाकृ एकदम चमचमीत. मूळ (चिरण्यापूर्वी) वाम (वांब) चा फोटो टाकला असता तर अजून छान.

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 12:02 pm | सोत्रि

मला तर त्यात अत्यंत धारदार काटे आणि मांसल भाग तुलनेत फारच कमी, म्हणून टेस्टी असूनही मजा आली नव्हती.

आँ..? नक्की वामच खाल्ली होती का?

- (वामपंथी) सोकाजी

हो. बारकी होती. जाड्या वाम मिळत असतील तर माहीत नाही. मुंबई ठाण्यात पट्टीसारख्या विकायला ठेवलेल्या दिसतात.

दोनतीनदा खाल्ली. त्यात तुलनेत मांस कमी आणि सिंगल पण मोठा काट्याचा भाग आढळला.

(साधारण सिताफळासारखे. गर थोडा, बी जास्त. अतएव गिळणे कमी थूथूथू जास्त.)

पण जेवढा गर होता तो खूप टेस्टी होता हे खरे.

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 2:10 pm | सोत्रि

या घरी एकदा!
मस्त वाम हादडवतो (नदीतली) .

- (वामपंथी) सोकाजी

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 2:13 pm | धमाल मुलगा

मीपण येऊ?

-(हावरट) ध.

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 2:16 pm | सोत्रि

काका ??

आता तर अजिबात बोलावणार नाही :angry:

- (पुतण्या) सोकाजी

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 2:18 pm | सोत्रि

प्रकाटाआ

चिंतामणी's picture

11 Aug 2011 - 3:04 pm | चिंतामणी

ह.ह.पु.वा.

:D :D :D

=)) =)) =)) =)) =)) =))

Mrunalini's picture

10 Aug 2011 - 1:23 pm | Mrunalini

धन्यवाद.
नदितील वाम समुद्रातील वाम पेक्षा कमी काटे असतात. समुद्रातील वाम मधे जरा जास्त काटे असतात, त्यामुळे ती खाताना सांभाळुन खावी लागते.

कच्ची कैरी's picture

10 Aug 2011 - 12:09 pm | कच्ची कैरी

वॉव !!!!!!!!काय मस्त वाव बनली आहे !आम्ही याला वाव असेच म्हणतो मलाही हा प्रकार खूपच आवडतो.

गणपा's picture

10 Aug 2011 - 1:15 pm | गणपा

वाव/वाम कधी खाल्ला नाही.
रस्सा तर एकदम जबरा दिसतोय.

ओम्बाट म्हणतात.एकदा खाल्ले होते.मला आवडले नाही.

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 1:51 pm | धमाल मुलगा

आग लागली त्या श्रावण पाळण्याला!
आता वामची सोय पहायला पाहिजे. :)

कितीतरी वर्षात वाम खायला मिळालंच नाही राव. बारामतीला असताना एका मित्राच्या घरचा डबा आठवणीनं माझ्यासाठी दरवेळी यायचाच. जेव्हा जेव्हा वाम करतील तेव्हा तेव्हा माझी आठवण राहणारच अशी गत!

जियो मृणालिनीताई..जियो!

-(वाममार्गी) ध.

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 2:14 pm | सोत्रि

वामची सोय पहाताना माझीही सोयिस्करपणे, सोयिस्कर ठिकाणी, सोय करण्याचे करावे!

- (वामपंथी) सोकाजी

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 2:57 pm | धमाल मुलगा

तुमच्याच घरी सोय करुया का? :P एकदम सोयीस्कर आणि श्रेयस्कर ठिकाण राहिल. ;)

- (वाममार्गी पुतण्या) ध.

पुण्यात किंवा मुंबईत असल्यास मी नक्की.

सोत्रि's picture

10 Aug 2011 - 6:42 pm | सोत्रि

मालक, आता तुमच्या 'घरगुती' कट्ट्याला 'वाम'चीही सोय झाली की माझी :D

गवि, व्यनी करतो धम्याचा घरगुती कट्टा ठरला की ;)

- (वामपंथी) सोकाजी

धमाल मुलगा's picture

10 Aug 2011 - 6:47 pm | धमाल मुलगा

टाकल्या आमच्याच तंगड्या आमच्या गळ्यात? ;)

मला काहीच प्रॉब्लेम नाये शेठ. पण वाम रांधणं मला ह्या जन्मी शक्य नाही, अन आमची कारभारीण तिच्या गेल्या सात पिढ्यांपासून अतिशुध्द शाकाहारी आहे.
वाम काय बाजारातून आणून कच्चेच खायचे का आपण? हां, आता रांधण्याची जबाबदारी तुम्ही घेत असाल तर माझी काहीच हरकत नाही. :D

हाच एक मासा आहे जो आम्ही खात नाही. का कुणास ठाउक पण माहेरी पण कधी आणला नाही आणि सासरीही.

बाकी पाकृ मस्तच.

सानिकास्वप्निल's picture

12 Aug 2011 - 10:38 pm | सानिकास्वप्निल

मी पण हा मासा कधी खाल्ला नाही..कालवण मस्तच दिसत आहे :)

नूतन सावंत's picture

10 Aug 2018 - 11:48 pm | नूतन सावंत

मीपण हा मासा कधीच खाल्ला नाही,एकदा करू। पहाते मृ तुझया रेसीपीने.

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 11:59 pm | सतिश गावडे

ताईंचा धागा मोजून सात वर्षांनी वर आला.

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 12:20 am | रंगीला रतन

सध्या फ्याशन आहे जुने धागे वर काढायची!

वाम मीही कधी खाल्लेली नाही. पाककृती छान आहे. पण माश्याच्या कालवणात सुकं खोबरं घालणं कधी जमेल असं वाटत नाही! मेंटल ब्लॉक, दुसरं काय :)