ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
9 Aug 2011 - 1:54 pm
गाभा: 

एक निवेदन

मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...

- आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन

- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.

- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे

- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.

- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.

प्रतिक्रिया

सुनील's picture

9 Aug 2011 - 2:15 pm | सुनील

निकष साधारणतः असे -
तुम्हाला व्यक्तीची जन्मतातीख्, जन्मवेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. त्यावरून तुम्हाला पुढील बाबी सांगायच्या आहेत -
१) सदर व्यक्ती स्त्री आहे का पुरुष
२) सदर व्य्क्ती जिवंत आहे का मृत
३) सदर व्यक्ती अविवाहित आहे/होती का विवाहीत
४) सदर व्यक्तीस स्वतःची अपत्ये होती का नाही
५) ..... (इतरांनी यादीत भर टाकावी. किमान १० प्रश्न तरी व्हावेत)

असे १० व्यक्तींबाबत करावे. थोडक्यात एकूण १०० प्रश्न (१० x १०). त्यावरून यशाची टक्केवारी काढता येईल.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 2:56 pm | युयुत्सु

त्या यशाच्या टक्केवारीवरून तुम्ही काय ठरवणार?

बरोबर आहे.. ज्यांच्या बाबतीत अंदाज चुकतील त्यांचे पैसे बुडायचेच.
पण ज्यांच्या बाबतीत अंदाज बरोबर येतील त्यांना समाधान मिळेल की जोतिष्य हे थोतांड नव्हे....
पण तुम्हाला काय मिळणार सुनिलकाका?
बुडीतखात्यावाल्यांच बहुतेक त्या लिष्ट मध्ये नाव आलं असेल. :)

दहापैकी पाच किंवा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून ५०,००० रु. परत दिले पाहिजेत!

आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे मात्र जर अंदाज चुकले तर काय या बद्दल कोणीच काही बोलत नाही.
अंदाज बरोबर आले तर विचारणाराने भविष्य वगैरे शास्त्र आहे यावर विष्वास बसेल मात्र अंदाज चुकले तर भविष्य सांगणारा हा व्यवसाय सोडून देईल आणि भविष्य सांगणे वगैरे निव्वळ थोताम्ड असते असे चार जणांना सांगेल का?

व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर वाटत नाही. निदान काय ते स्पष्ट होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल हेसुद्धा थोडे नाही.

त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 12:39 pm | आत्मशून्य

हे आव्हांन लोकांनी दीले असल्याने ते स्विकारणार्‍या व्यक्तीला जर ते झेपलं नाही तर पेनल्टीची सोय असलीच पाहीजे. आव्हान स्विकारणार्‍या व्यक्तीच्या कश्टाचा योग्य मोबदला देऊ पण त्याबरोबरच सदरील व्यक्तीवरही कोणते तरी दडपण आवश्यक आहे नाही तर सदरील आव्हान स्विकारत बसणे व पैसे कमवणे हा पोरकटपणाचा खेळ बनेल. खरे तर एखादी गोश्ट आव्हान असेल तर आर्थीक लाभ हा केवळ जिंकणार्‍याच्या बाजूने असावा , हारणार्‍याने स्पर्धा केल्याबद्दल पैसा मीळावा अशी अवास्तव मागणी ठेऊ नये .

त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.

लोकानी आताही ठरवले आहेच काय मानायचे आहे ते मग आता यूयूत्सूनां हारण्यासाठी पैसा का द्यावा ?

बाळकराम's picture

10 Aug 2011 - 1:36 am | बाळकराम

युयुत्सुंच्या ह्या अटींवरून असे वाटते की हे गृहस्थ काय ज्योतिष-बितिष सांगतात म्हणजे लोकांवर लई उपकार करतात! "ह्या अटी मान्य नसतील तर पुरवणी अटी आहेत" वगैरे- एकदम माजोरडी भाषा आहे!! लोक काय ह्याला सीरियसली घेत बसलेत, राव?!

"यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल."

हेच ज्यांचं तत्त्वज्ञान आहे त्यांच्यासाठी कशाला वेळ फुकट घालवायचा म्हणतो मी?

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 3:01 pm | विनायक प्रभू

बघा सुनील भौ निघाला की नाही तुमची अक्कल?

प्रियाली's picture

9 Aug 2011 - 3:08 pm | प्रियाली

योग्य ठिकाणी आह्वानशुल्क मागितलेत. इतर काही नाही तरी तुमचे बँक बॅलन्स भक्कम होईल असे माझे भाकित आहे. ;)

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 3:11 pm | विनायक प्रभू

शुल्क भरणारे बिन अकलेचे आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

हेच वदवून घेण्यासाठी देवा, केला अट्टाहास :)

बाकी आम्ही अंमळ वायझेडच असल्यामुळे आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण आम्हाला अक्कल नाही. त्यामुळे आम्ही इथेच थांबतो.

तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा. नाही म्हणायला यात आम्हीही तुम्हाला विरोध करुन का होईना पण मदतच केली आहे. ;)

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 3:22 pm | युयुत्सु

त्यामुळे आम्ही इथेच थांबतो.

धन्यवाद

तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा.

जरूर

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 3:23 pm | युयुत्सु

त्यामुळे आम्ही इथेच थांबतो.

धन्यवाद

तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा.

जरूर

आव्हानशुल्क हा प्रकार विचित्र वाटला. ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण.

आव्हान / टक्केवारी / उपयुक्तता वगैरे सर्व बाजूला ठेवून एक पद्धतशीर ट्रायल म्हणून पाहता येईल का?

यात एकच ज्योतिषतज्ञ असून उपयोग नाही. ट्रायल अशी व्हावी की त्यात या पद्धतीची सेन्सिटिव्हिटी / स्पेसिफिसिटी / रीप्रोड्युसेबिलिटी / क्रॉस ट्रायल असे सर्व आले पाहिजे.

ज्योतिषविरोधक आणि ज्योतिषसमर्थक अशा प्रकारच्या तटबंदींनी ते व्हायचे नाही.

दोन वेगळे ज्योतिषी.

दोन असंबंधित वेगळे मनुष्यगट (एकाच प्रमाणित संख्येइतके उदा. १०, स्त्री पुरुष एकसमान संख्येने. वयाबाबत रँडम डिस्ट्रिब्युशन पण ज्योतिष्यांना माहीत नसलेले. पूर्ण अनामिक.)

-इनपुट म्हणून दिले जाणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (जन्मतारीख, वेळ, ठिकाण, अक्षांश, रेखांश आणि काही आवश्यक असल्यास ते..पण आधी ठरवून घेतलेले आणि निश्चित फॉर्मॅटमधे)

-आउटपुट म्हणून ज्योतिष्यांकडून येणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (मृत्यूचे स्टेटस, विवाहित स्टेटस (हे जन्मतारखेवरुन बर्‍यापैकी ओळखण्यासारखे असते, चाळिशीपुढेही अविवाहित राहणे दुर्मिळ आहे. त्यामुळे वेगळा पॅरामीटर घेता येईल..), नोकरी धंद्याविषयी माहिती, परदेशगमन, शारिरिक स्वास्थ्याविषयी इतिहास आणि स्थिती इत्यादि.. ठरवून घेतलेले)

दहा जणांचा एक गट एका ज्योतिष्याकडून तपासला जाईल. मग तोच गट दुसर्‍या ज्योतिष्याकडून तपासला जाईल.

यापैकी निम्मे (पाच) लोक प्रत्येक गटातून फॉल्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टाळण्या/तपासण्यासाठी आपली जन्मतारीख चुकीची देतील किंवा एकमेकांची देतील.

खरेच गांभीर्याने ट्रायल घेण्याची असल्यास तशी नीट घेता येईल. पण घेणार्‍याने किंवा देणार्‍याने कोणीच आपण आव्हान देऊन किंवा स्वीकारून फार मोठे आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करतो आहोत अशा अ‍ॅटिट्यूडने करता कामा नये.

आपल्या मार्गावर आपला विश्वास आहे आणि त्याला एक प्रमाणीकरण मिळावे म्हणून करायचे असेल तर त्यात अर्थ आहे.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 3:29 pm | युयुत्सु

ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण.

पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे.

गवि's picture

9 Aug 2011 - 3:39 pm | गवि

मुद्दा प्रथमदर्शनी पटण्यासारखा.

पण तेच उदाहरण पुढे नेऊन म्हणतो की क्लिनिकल ट्रायल्स (उंदीर किंवा मनुष्य कोणावरही) करताना फक्त एमओयूसदृश काही केले जाते. पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही, किंवा पेशंट्सही क्लिनिकल ट्रायलमधे भाग घ्यायला मिळावा / मिळाला म्हणून काही रक्कम भरत नाहीत.

संशोधकाच्या बाजूने औषधाची जेन्युइनिटी सिद्ध झाल्यावर होणारे भावी उत्पन्न त्याठिकाणी धरलेले असते , पेशंटच्या बाजूने या उपायाने काही बरे झाले तर चांगले, त्याबदल्यात या परिक्षण न झालेल्या औषधाची रिस्क घ्यायला मी तयार आहे, अशी विचारपद्धती असते.

ज्योतिषविषयक अशा "परीक्षा", "आव्हाने" यांच्या चर्च्या खूप झाल्या आहेत. तुम्ही अशी स्पष्ट कसोटी करून त्यातले तत्व सिद्ध केलेत तर नीट प्रसिद्धी देऊन तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल (एक व्यवसाय म्हणून हवा असल्यास. हा व्यवसाय आहे हे तर तुमच्या शुल्काच्या अपेक्षेवरुन स्पष्टच आहे.)

पण अशी टेस्ट घेताना स्वतःच्या अनेक अटी घालणे आणि त्यातून टेस्ट अवघड करणे हे नक्कीच आपल्या पद्धतीविषयी खात्री नसल्याचे लक्षण आहे. समजा अगदी काटेकोर गणिती सिद्धता नाही झाली तरी निदान प्रमाणित एरर काय आहे ती तरी कळेल..!

पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही,

मी आह्वानकर्त्याकडुन शुल्क मागत आहे. जातका कडुन नाही. क्लिनीकल ट्रायल कोणी चॅरीटी म्हणून करत नाहित. करणारे त्यांचा मोबदला घेतातच.

शिवाय एकतर्फी अटी कोणता व्यावसायिक घालत नाही? मीच काय पाप केलं आहे?

बाळकराम's picture

10 Aug 2011 - 1:44 am | बाळकराम

होय केला जातो- डॉक्टर ची चूक आहे असं सिद्ध झालं तर! बाकी मेडिकल सायन्स आणि ज्योतिषी थोतांड याची तुलना तुम्ही कुठल्या आधारावर केलीत? तुम्ही ज्योतिष चुकल्यावर पैसे परत करता का? जर करत नसाल- आणि ते ही भोन्दूगिरी करून- तर मेडिकल शास्त्राकडून ही अपेक्षा कशासाठी करता?

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 3:34 pm | विनायक प्रभू

डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 3:41 pm | युयुत्सु

डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.

ते मिपावर जाहिरात करत नाहित हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते जाहिरातच करत नाहीत असे म्हणायचे असेल तर मात्र माझा त्याला आक्षेप आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Aug 2011 - 3:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काका, ज्योतिषशास्त्रात काही अर्थ आहे हे सिद्ध होणे ही आव्हानकर्त्याची गरज नाही, असलीच तर तुमची गरज आहे. त्यामुळे सर्व भुर्दंड त्याने भरायचा हे जरा अजबच आहे.

एकूणच कुणी तयार होणार नाहीत अशा अटी घालू आणि मग "मी आव्हान स्वीकारायला तयार होतो, कुणी पुढे आले नाही" असा युक्तिवाद करायला आपण मोकळे राहू अशी विचारसरणी दिसते.

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:09 pm | पंगा

नेमके.

(माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल, इ. इ.)

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 4:12 pm | युयुत्सु

असलीच तर तुमची गरज आहे.

ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत?
मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Aug 2011 - 5:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत?
मला माहित असलेली माहिती आणि थोडासा तर्क यावरून खालील प्रमाणे
१) तुम्हाला ज्योतिषशास्त्रात गती आहे आणि तुम्ही त्यासाठी लोकांकडून मानधन घेऊन त्यांना माहिती / सेवा देता
२) अनेक लोकांचा ज्योतिषावर विश्वास नाही म्हणून ते त्याच्या वाटेला जात नाहीस (शिवाय प्रसंगी -ve पब्लिसिटी पण करतात)
३) ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे हे सिद्ध झाले तर वरीलपैकी काही / अनेक जण या सेवांचा लाभ घेऊ इच्छितील.
४) त्यामुळे ज्योतिषशास्त्रात गती असणाऱ्यांची मागणी वाढेल.
५) मुद्दा १ आणि मुद्दा ४ यांची सांगड घातली असता, तुमचा फायदा होईल असे कळते.
६) म्हणून असलीच तर ही तुमची गरज आहे.

>>मला तरी काहीही सिद्ध करायची गरज नाही.
मग धागा काढायचे प्रयोजन काय होते?

या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही.

बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Aug 2011 - 7:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही
तुम्ही म्हणालात म्हणून परत एकदा धागा वाचला. खालील एक वाक्य वरील संदर्भात लागू पडते. पुढे अटी सुरु होतात.

"मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे."

१) इथे मला खालील गोष्टी कळल्या. तुम्ही आव्हाने स्वीकारत नाहीत हि तुमच्या विरुद्ध सर्वसाधारण तक्रार आहे.
२) अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले (कृपा करून खटकले नाही म्हणू नका).
३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे.

इथे तक्रार होते तुमच्या विरुद्ध, ते खटकते तुम्हाला, म्हणून तुम्हीच आव्हान स्वीकारता आहात. मग हे आव्हान स्वीकारणे ही तुमची गरज का नाही? तुम्ही समाजसेवा म्हणून तर नक्की करत नाही आहात (तसे असते तर फुकट केले असतेत किमान)

>>बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन
तर्कशास्त्र आमचे नाही हो. कालिजात शिकवले होते. १२वी ला. कला आणि विज्ञान दोन्ही शाखांना शिकवतात. तुम्हाला पण शिकवले असेलच की. नसेल तर व्यनी करा, मी शिकवतो, ते पण फुकट, ५०० पैसे पण नाही घेणार.

बाकी कवी होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप होती, पण माझ्या पत्रिकेत कवी होण्याचा योग नाही असे एकाने सांगितले, म्हणून नाही होऊ शकलो. ;-)

तळटीप :- मी पराकोटीचा विज्ञाननिष्ठ नाही आणि १००% पत्रिका द्वेष्टा पण नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 7:27 pm | युयुत्सु

श्री मेहेंदळे

अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले

ही परत एक कवि-कल्पना

३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे.

ही दूसरी कविकल्पना

मी आह्वान स्वीकारायचे ठरवले (विशिष्ट चवकटीत) एव्हढेच यातले सत्य आहे.

बाळकराम's picture

10 Aug 2011 - 1:48 am | बाळकराम

युयुत्सु साहेब,
तुमचं तर तर्कशास्त्रच गंडलं आहे राव! आणि तरी लोकाना गंडवण्याची कामं करता!!

भारी समर्थ's picture

9 Aug 2011 - 3:55 pm | भारी समर्थ

ओ युयुत्सु, त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय. तिकडे जाऊन करा काय खरं-खोटं ते. इकडे उगाच अ.श.पु.प्र. करू नका. त्यांचे आव्हान स्विकारून व त्यानंतर हरवून त्यांना गप्प करा मग इकडचे ’बेअक्कल’ लोक तुमच्यासारख्या ’अक्कलवान’ लोकांची पूजाच बांधतील.

अवांतर: ते श्याम मानव डिपॉझिट वगैरे काही चार्ज करत नाहीत बहूतेक.

भारी समर्थ

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 4:01 pm | युयुत्सु

त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय

श्याम मानवांना माझ्या अटी मान्य असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.

भारी समर्थ's picture

9 Aug 2011 - 4:25 pm | भारी समर्थ

सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या.

आणि एवढाच तुमच्या शास्त्रावर तुमचा विश्वास आहे ना, तर मग एक कराच काका. श्याम मानवांची फेसबुक प्रोफाईल आहे. त्यावर तुमच्या अटींसह त्यांना आव्हान स्विकारल्याबद्दल सुचित करा. आणि काय ती प्रोग्रेस आहे त्याची अपडेट देत र्‍हावा.

इकडे मानवांएवढे निष्णात ’ज्योतिष-किलर’ नसावेत बहुदा.

अवांतर: तुमची प्रोफाईल पाहिली. ’आयआयटीयन’ जोतिष? काय राव उपाध्ये काका?

भारी समर्थ

शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या

इतक रामायण झालं तरी रामाची सीता कोण म्हणून विचारता?

सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या.

तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 5:23 pm | युयुत्सु

तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.

श्याम मानवांचा ज्याना कळवळा आहे त्यांनी हे कष्ट घ्यायला काहीच हरकत नाही.

भारी समर्थ's picture

9 Aug 2011 - 5:35 pm | भारी समर्थ

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.

ही पुरवणी सीता कवा भाइर काडणार? आणि श्याम मानवांच्या प्रोफाइलवर जाऊन आव्हान केव्हा स्विकारणार ते बोला काका. कारण कसं आहे ना, इकडे पैसे वगैरे भरून तुम्हाला खोटं वगैरे पाडण्या च्या फंदात कोणी पडेल असं वाटत नाही. मानवांचं आव्हान तुम्ही स्विकारलत ना, की दुधाचं दुध आन् पाण्याचं पाणी होईल.

आणि मी तुमच्यापेक्षा वयाने बराच लहान असल्याने मला अरे-तुरे केल्यास माझी हरकत नाही.

जमल्यास खालील दुवे पाहून आपल्या प्रतिक्रिया संबंधितांकडे जरूर कळवाव्यात.

बाकीही बरंच आहे. पण तुर्तास एवढच.

भारी समर्थ

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 3:56 pm | विनायक प्रभू

मिपावर जाहिरात करत नाहीत आणि त्याचा आर्थिक फायदा घेत नाहीत.
बाहेर काय करतात ह्याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही.
तुम्ही तशी सुरवाती पासुन करताहात हा आक्षेप आहे.
त्या बाबत तुम्ही सोयिस्कर मौन बाळगत आहात यूयूस्तू राव.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 4:06 pm | युयुत्सु

मी माझा सल्ला मागायला या असे मिपावर कधिही म्हटल्याचे आठवत नाही. असे अ सताना मी जाहिरात केलि असे कसे म्हणता तुम्ही.

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 4:24 pm | विनायक प्रभू

आणखीन एक जिलेबी.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 3:56 pm | युयुत्सु

असलीच तर तुमची गरज आहे.

ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत?
मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:22 pm | पंगा

...आपल्या ज्योतिषविषयक सेवेची गरज येथे कोणालाच आहे, असे वाटत नाही.

सबब, (गरज असल्यास) आपल्या तेलाच्या बाटलीचा खर्च आपणच उचलावा, आणि (आपले नाही तरी आपल्या ज्योतिषविषयक लेखांचे) प्रस्थान येथून हलवावे, हे उत्तम, असे सुचवावेसे वाटते.

गणपा's picture

9 Aug 2011 - 4:30 pm | गणपा

का म्हणुन युयुत्सुंनी त्यांचे इथले लेखन हलवावे?
जर कुणाला पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या धाग्यांना प्रतिसाद देउ नयेत.
जर त्यांच लेखन मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर त्या बाबतीत सर्वाधिकार संम आणि संचा यांचा आहे.

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:32 pm | पंगा

असे सुचवावेसे वाटते.

बाकी चालू द्या.

पंगा यांचे विधान आधीच्या संवादाच्या संदर्भाने ओघात आलेले असावे असे मला वाटते. ..

"असलीच तर तुम्हाला आहे"
"मला सिद्ध करण्याची गरज नाही"

तर मग

"..त्याचप्रमाणे..."

मला वाटते त्यांना ते विधान इफ देन स्वरुपात म्हणायचे असावे.

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:43 pm | पंगा

.

धन्या's picture

9 Aug 2011 - 5:04 pm | धन्या

अरेरे पंगाशेठ, तुमचं वैचारीक अधःपतन होतंय... ही वैचारीक, तात्विक चर्चा आहे... त्यामुळे ती कोणत्याही परिस्थीतीत वैयक्तिक होऊ नये असे आम्हांस वाटते.

त्यांनी त्यांच्या अकलेप्रमाणे आपली अक्कल काढली म्हणून आपण का त्यांच्याच पातळीवर जाऊन त्यांचे लेखन काढण्यास सुचवावे? त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे?

असो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे :)

पंगा's picture

9 Aug 2011 - 5:12 pm | पंगा

दुआकाटा.

पंगा's picture

9 Aug 2011 - 5:10 pm | पंगा

त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे?

कारण आम्हालाही ष्टेक आवडते म्हणून.

बाकी चालू द्या.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 4:33 pm | युयुत्सु

पंडित गागाभट्ट

मिरच्या झोंबल्या म्हणायच्या

धन्या's picture

9 Aug 2011 - 5:06 pm | धन्या

युयुत्सुराव, तुमचा तोल गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते...

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 5:27 pm | युयुत्सु

युयुत्सुराव, तुमचा तोल गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते...

माझा तोल गेला असे मला वाटत नाही. त्यांनी ्तेलाची भाषा वापरली मी मिरच्यांची वापरली. फिट्टंफाट.

फिट्टंफाट

ईयत्ता कितवी?

विनायक प्रभू's picture

9 Aug 2011 - 4:35 pm | विनायक प्रभू

धोरणात बसत असेल तर माझ्या सर्व प्रतिक्रिया सखेद परत.
नसेल तर बाटली चा खर्च माझा.
रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते?
(पाकृ करता वापराबद्दल बोलतोय हो)

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:41 pm | पंगा

रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते?

कॉड लिवर ऑइल? ;)

धाग्याचा खफ न करता तुमच्या खवत उत्तर दिले आहे. :)

प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या गोष्टीत असते. काहींचे कलेमध्ये असते, काहींचे ज्योतिषामध्ये काहिंचे विज्ञानामध्ये.
मला असे वाटते ज्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नाही त्याच गोष्टींसाठी इतरांची परिक्षा पाहण्याची आपली कुवत नाहि असे समजुन आपण वागले पाहिजे.
पुढच्याच्या गोष्टी आपल्याला पटत नसेल(किंवा पुढची व्यक्ती योग्य वाटत नसेल) तर त्याकडे दुर्लक्ष करावे, हा जर कोणी आपल्याला वयक्तीक येवुन आपले म्हणणे ठासुन सांगत असेल तर वेगळी गोष्ट. पण मिपा म्हणजे स्वत:चे हक्काची जागा नाहि. त्यामुळे वयक्तिक कोणावर काही आरोप केले असतील तर त्याने प्रथम बोलावे. उगाच हा जाहिरात करतो तो जाहिरात करतो हे सांगणे हे संपादकिय मंडळींचे काम आहे इतरांचे नाही.

@ युयुत्सु

मला असे वाटते, आपले ज्ञान आपल्या कार्यात छान आहे, आपण जी शक्ती .. वेळ येथे उत्तरे देण्यात घालवत आहात, तोच वेळ तुम्ही तुमच्या कामात घालवला तर तो सत्कारणी लागेल. या काळात एका जरी व्यक्तीसाठी तुम्ही योग्य योगदान देवु शकला तर येथे १००० रिप्लायमध्ये जे सांगताल त्या पेक्षा जास्त आनंद मिळेल असे वाटते.
आपल्या बद्दल शंका नाहि... पण .
----------

असो थांबतो. मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे.
त्यामुळे कुठल्या गोष्टींकडे किती कधी आणि का लक्ष द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे.

गणेशाभाऊ, वरच्या तीन वाक्यांमधील मधलं वाक्य काढलं की परस्परविरोधी दोन वाक्ये एका पाठोपाठ एक येतात. :)

अमोल केळकर's picture

9 Aug 2011 - 4:51 pm | अमोल केळकर

छान प्रतिसाद. मुद्दे पटले.

अमोल केळकर

पंगा's picture

9 Aug 2011 - 4:54 pm | पंगा

...फॉर ऑल गुड मेन टू कम टू द एड ऑफ देअर पार्टी? ;)

@गणेशा -
युयुत्सुंची जाहिरात नक्कीच होते आहे असे वाटते. (संपादक म्हणून म्हणत नाही, सध्या सुटीवर असल्याने).
लोकांना आधी भिती घालायची (अमूक पौर्णिमा अनर्थकारी आहे) आणि मग आपल्या ब्लॉगकडे बोलवायचे हा युयुत्सुंचा नेहमीचा खाक्या झाला आहे. जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात ते युयुत्सुंना त्यांच्या सेवेचे ग्राहक म्हणून मिळत असतील. यातून जो वैयक्तिक थेट आर्थिक फायदा त्यांना होतो आहे त्याबद्दल मिपाला कसलेही मानधन मिळत नाही किंवा युयुत्सु मिपाला ग्राहक मिळवून दिल्याचे नावापुरतेही क्रेडिट देत नाहीत.

मी युयुत्सुंना जे आव्हान दिले होते त्याला उत्तर असे मिळाले http://misalpav.com/node/18744#comment-328880. यात जे तांत्रिकी कारण असल्याने माझे आव्हान ते घेत नाहीत ते नक्की काय आहे? जे सॉफ्टवेअर वापरून एवढी मोठी लिस्ट त्यांनी बनवली आहे तशी लिस्ट त्यांना मागते आहे. ती वन इन टू मेनी असली तर आत्ता दिलेली लिस्टही वन इन टू मेनी आहे. मिपाकरांचे नुसते नव्हे तर मिपाकरांच्या मित्रांचे, सुहृदांचे आणि आप्तांचे वाढदिवस त्या मोठ्याच्या मोठ्या लिस्टमध्ये आहेत. नीट पाहिले तर युयुत्सुंचे सॉफ्टवेअरच त्यांना भरपूर क्लायंट मिळवून देते आहे हे कळेल.

त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे.

@ युयुत्सु:
>>पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी >>लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे.

हे लॉजिक कळले नाही. तुमचे 'उपचार' वैज्ञानिक आहेत किंवा काही कसोट्यांवर घासून सिद्ध झाले आहेत, रीपीटीटिव आहेत असा तुमचा दावा आहे का?

आणि उत्तरासाठी डोकेफोड करण्याची काय गरज? तुमच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअरमध्ये केवळ तारखा घालायच्या आणि उत्तर काढायचे एवढेच काय ते. आव्हान देणार्‍या व्यक्तीकडून पाचशे घ्यायचे याचा अर्थ त्याला ग्राहक करून घेतल्याशिवाय काही करायचे नाही. मुळात जी व्यक्ती आव्हान देते ती तुमचा ग्राहक होण्यास नकार देत असते. आधीच अशा व्यक्तीकडून पैसे काढायचे याची गंमत वाटते. इथे जाहिरात केली म्हणून आव्हानाचा प्रश्न आला. तुम्ही जाहिरात करू नका, तर आम्ही आव्हान देत नाही. इतके सगळे साधे असताना हा प्रकार म्हणजे आव्हानापासून पळून जाणे आहे.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 7:56 pm | युयुत्सु

त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे.

चित्रातै,

तुम्ही इतकी पराकोटीची गल्लत कराल असे मला वाटले नव्हते. "समग्र ग्रंथ वाचल्यावाचून" या उक्तीची आठवण झाली. माझे सॉफ्ट्वेअर काय करते आणि काय नाही हे प्रत्यक्ष न बघता तुम्ही ही विधाने कशी काय केलीत. तसेच एक प्रयोग मी अपवाद म्हणुन "गंमत" म्हणून स्वीकारायला तयार आहे पण अनेक प्रयोग/आह्वाने मी फुकट स्वीकारावीत हे सध्या तरी मला शक्य नाही.

चित्रा's picture

9 Aug 2011 - 8:11 pm | चित्रा

सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाही हे तुम्हीच मान्य केले आहे.
http://www.misalpav.com/node/18744#comment-329035

चित्रा जी,
प्रथमता आपण संपादक मंडळात आहात हे माहित नव्हते( ऐकुन छान वाटले.)
दूसरी गोष्ट माझे हे म्हणणे नाहियेच की ते जाहिरात करत नाहि. त्यांना संपादक मंडळ का उत्तर देत नाहि ते कळत नाही
त्यामुळे मग असे वयक्तीक रोश.. रिप्लाय येत राहतात आणि मग संपुर्ण मिपा जे एकदम छान लिखानानी सजलले असते ते असल्या धाग्यात आरोप गृप यांच्या मागे लागते.

बाकी मला एव्हडेच म्हनावयाचे होते.
तुम्हाला व्यक्ती आवडत नाहि किंवा त्यांनी चालवलेल्या कृती तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे बोला पण त्याच्या ज्ञानावर, अभ्यासावर, भले सॉफ्टवेअर असो नाहि तर काही पण पध्दतीवर विनाकारण बोलु नये.

माझ्या मते व्यक्तीला शिव्या दिल्या तरी चालतात पण त्याच्या कार्यावर किंवा कलेवर्(कलाकार असला तर) आघात केला तर ती व्यक्ती कधीच शांत बसत नाहि.

आपण सर्वांनी मिपाच्या सिमामध्ये राहावे हिच इच्छा होती.

वयक्तीक माझे मत ( मुद्दामुन लिहितो नाहि तर विनाकारण गृपबाजी बोलतात म्हणुन स्पष्ट लिहितो) हे आहे की, युयुत्सु यांनी असे धागे टाकलेले मला अजिबात आवडत नाहि.. मी शक्यतो त्या धाग्यांवर जात नाहि आणि गेलो तरी विशेष काही लिहित नाहि.. पण संपादक मंडळ काही म्हणत नाहि तर आपण वयक्तीक लेवल ला जावुन का बोलायचे.
जर आपल्याला नाहि आवडले तर तसे व्यव्स्थीत संपादक मंडळाला सांगावे.

असे नसेन तर उद्या कोन्ही उठेल आणि काहि म्हणेन. (कृपया मला हे म्हणाय्चे नाहि मी खालील थ्रेड चा नियमित वाचक आहे)
एखादा म्हणेन कलादालनात कायम स्वताच्या बागेतलेच फोटो देणारे धागे बंद करा.
एखादा म्हणेन शेतकर्‍यांचे प्रश्न घेवुन उगाच सारखे तेच तेच लिहुन स्वताचे मत मांडणे बंद व्हावे.
एखादा उठुन बोलेन रोज हा अमुक का कविता टाकतो.

हे प्रश्न सांपादक मंडळाकडुन सोडवले नाहि गेले तर वातावरण खराब होते आहे.

असो कोणीही माझे रिप्लाय वयक्तीक घेवु नये.

आणि हा धनासाहेब.
त्या ३ ओळीनंतरची चौथी ओळ पण वाचा की त्याबरोबर.

चित्रा's picture

9 Aug 2011 - 8:51 pm | चित्रा

प्रथम अनेक धन्यवाद, कारण तुम्ही इथे स्पष्ट आणि खरेखुरे मनापासून आलेले लिहीले.

तुमच्याप्रमाणेच मलाही या धाग्यांवर येण्याचा उत्साह नसतो. पण युयुत्सु यांनी टाकलेली मोठी लिस्ट बघून राहवले नाही.

एक स्पष्टीकरण देते - ग्रहतारे यांचा अभ्यास, अगदी हवेतर जन्मवेळेचा आकाशस्थ ग्रहांचा नकाशा मांडणे चुकीचे आहे असे मी समजत नाही. माझे मत यापुढच्या फलज्योतिषासंबंधी आहे.कुंडलीत अमूक ठिकाणी हा ग्रह असला म्हणजे अमूक एक फळ मिळते असे समज लोकांमध्ये असतात. यामुळे अनेकांची लग्ने मोडली आहेत. अनेक मुलींना मंगळाच्या मुली म्हणून आयुष्यभर मन मारून लग्न न करता राहावे लागले असेल. अनेक तरुणांचे थोराड पुरुष होईपर्यंत विवाह झालेले नाहीत. आणि कुठचीतरी शांत केली की असे ग्रह सुधारतात, वेडावाकडा प्रभाव टाकत नाहीत असे समज आयुष्यभर धरून आपण किती खुजे आयुष्य जगत राहतो. किती ठिकाणी स्वतःला बंदिस्त करून घेत असतो. हे सर्व लक्षात घेतले तर कळेल ही कला महत्वाची नाही.कुंडली मांडण्याइतपतच मदत घेतली तर वेगळे आहे, पण पुढचे फळ सांगून आपण मुले जन्मल्यापासून त्यांना कुठच्यातरी दूरस्थ ग्रहांच्या विळख्यात अडकवून टाकतो, त्यांचे आयुष्य खुलण्याआधीच भितीने दाबून टाकतो.

युयुत्सुंच्या कलेचा उपयोग अमूक तारीक किती सुखाची आहे हे सांगायला ते कधी का करत नाहीत असा विचार करून पहा. ते असे करत नाहीत याचे कारणभितीपोटी ग्राहक मिळतात. सुखात असताना कसले आले आहेत ग्राहक?*

(*नंतर जोडलेली टीपः युयुत्सु यांनी शुभकारी अमावस्येबद्दलही लिहीले आहे. पण तेथे त्यांना ग्राहक मिळवण्यासाठी थेट लिहावे लागलेले आहे. http://misalpav.com/node/15999 येथे "पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (**)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल." असे म्हटलेले दिसले. )

तुम्ही जे काही म्हटले आहे - उदा. बागेतले फोटो, कविता, या सर्व कला, एक्स्प्रेशन आहेत. त्या मनाला आनंद देतात, आपली जगाकडे बघण्याची बुद्धी विकसित करतात. त्यातून जाहिरात झाली तरी म्हणूनच मिपावरील कोणी फारसा आक्षेप घेतलेला दिसणार नाही.

युयुत्सु यांच्या या लेखांना कलेचा आविष्कार म्हणवत नाही. ते कधी आकाशस्थ ग्रहांचा नकाशा कसा तयार करायचा यावरून लेख टाकतात का? त्यांची खरी कला तेव्हा दिसेल जेव्हा ते काही शिकवतील, नुसतीच भिती घालणार नाहीत. सॉफ्टवेअरबद्दल लिहीले कारण ते जे न्यूरल नेटवर्क वगैरे लिहीत आहेत ते लोकांना आकर्षित करून घेण्याचे उद्योग आहेत. न्यूरल नेटवर्क हे या फलज्योतिषासाठी कसे वापरतात, कसले ऑप्टिमायजेशन करतात हे सगळे त्यांनी जरूर सांगावे, तर त्यांची ही कला आहे हे मी मान्य करेन.

असो. बाकी मी अधिक लिहीत नाही. मला वातावरण गढूळ करण्याची इच्छा नाही. गैरसमज नका करून घेऊ.

आणि तुम्ही-मी म्हटले म्हणून युयुत्सु लेख लिहायचे थांबवणार आहेत का? :-)

धनंजय's picture

9 Aug 2011 - 10:14 pm | धनंजय

सदस्य युयुत्सु यांच्याकडून जाहिरात होते आहे, आणि मिसळपावावर होऊ नये याबाबत अनुमोदन.

वरील मुद्द्यांबाबत चित्रा यांचे समर्थन करतो आहे.

वपाडाव's picture

9 Aug 2011 - 5:08 pm | वपाडाव

आज युयुत्सुंची हालत १७५(१५४) चेंडुत अशी काहीशी होणार असं दिस्तंय....
पण तरीही सामना ऑसीच जिंकतील...
काय म्हंता ???
वाकडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.....

नेहमीचेच गाणे आज जोरात आहे इतकेच

मोहे आयी न जग की लाज
मै इतना जोरसे नाची आज
के घुंगरु टूट गये!

http://youtu.be/nx-8lLwrqSY

सहजराव,

पायात घुंगरू नाहीच आहेत.

मैं नाचू बिन पायल घुंघरू टूट गये तो क्या? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Aug 2011 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

युयुत्सुंना कॉर्नर करण्याचा प्रयत्न !

निषेध !!

युयुत्सु काका 'कुणी वंदा कुणी निंदा....' असे म्हणत तुम्ही तुमचे कार्य चालु ठेवा बरे.

उगाच शब्दानी शब्द कशाला वाढवायचा ? तुम्ही सगळ्यांचे एकाचवेळी समाधान करु शकणार नाही हे तर सत्य आहे ना ? मग कशाला विनाकारण वादाल वाद वाढवायचा ? एकदा सष्ट शब्दात सांगायचे. लोक पटवून घेतील नाहीतर तुमच्या सामर्थ्याची टिंगल तरी करतील. जे टिंगल करतील त्यांना करु द्या. योग्य वेळेची वाट बघा :)

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 6:00 pm | युयुत्सु

परा,

तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे मला वाटते

परिकथेतील राजकुमार's picture

9 Aug 2011 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार

परा,

तुमचा प्रतिसाद आवडला.

धन्यवाद :)

पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही.

कुठल्या गोष्टीला आव्हान मानायचे आणि कुठल्याला आरोप हे शेवटी आपल्यावरच नसते का?
एकदा का चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरली की मग धाग्याचा खप आणि जुने स्कोर सेटल करण्याचे नंदनवन ह्याशिवाय तुमच्या हातात काही पडणार नाही.

मुळात तुम्ही तुमचे अभ्यासू मत / भविष्य हे जे इथे मांडता ते त्या गोष्टीवर अथवा तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार्‍यांसाठी असते. त्यातून त्यांचा काही फायदा व्हावा आणि त्यांनी तुमच्याशी संपर्क साधुन अजुन काही मदत मागीतल्यास तुमचा आर्थिक फायदा व्हावा असे साधे सोपे गणित ह्यामागे आहे. असे असताना आव्हान किंवा आरोप आलेच कुठे मध्ये ?

क्षणभर आपण तुम्हाला दुकानदार आणि तुमच्या भविष्याला वस्तु समजु. अशावेळी ह्याला वस्तुची किंमत, उपयोग, सामर्थ्य, फायदा इ. पटले तो पुन्हा पुन्हा येणार आणि इतरांना देखील सांगणार. तुम्हाला त्रास करुन घ्यायची गरजच नाहीये. आणि ज्यांना ह्या वस्तुच्या विषयी विश्वासच नाहीये त्यांच्याशी वाद घालुन उपयोगच नाहीये. ना तुमचा काही फायदा आहे ना त्यांचा.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 6:00 pm | युयुत्सु

परा,

तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे वाटते

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2011 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा

तुमचं '' हे'' आव्हान हींमत असेल तर महाराष्ट्र अंधःश्रद्धा निर्मूलन समितीला तुंम्हीच द्या...आणी वरील काही प्रतिक्रीयांमधील तुमच्या म्हणण्या प्रमाणे अंनीसनी हे आव्हान जगातल्या सगळ्या ज्योतिषांना ऑल रेडी देउनच ठेवलेलं आहे...तेंव्हा त्यांनी तुंम्हाला आव्हानाचा सामुदाईक नारळ कधीच देउन ठेवलाय...तेंव्हा आता तुमचीच जबाबदारी आहे,तिकडं जाण्याची.उगीच आमची अक्क्ल काढायच्या फंदात पडू नका. किंवा आपल्या मिपाचेच १ सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या ब्लॉगवर जा. म्हणजे कळेल तुंम्ही कशाचं समर्थन करताय ते. किंवा नरेंद्र दाभोलकरांचं श्रद्धा/अंधःश्रध्दा हे पुस्तक वाचा...

'' आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन''...इती युयुत्सु...

आंम्ही आव्हान करते आहोतच,पण करवीते तुंम्हीच आहात हे नीट लक्षात ठेवा.आणी आधी तुंम्ही भविष्य म्हणून जी जी माण्डणी करताय, ती बेअक्कल आहे हे लक्षात घ्या. आणी तुंम्हाला आव्हान देणाय्रा समीतीत तुमचे लोक कशाला? हे म्हणजे गुन्हे नियंत्रण समीतीत न्यायालयानी कलम ठरवायला चोरांना सहभागी करुन घेण्यासारखं आहे...जो बिनधास्त आव्हान स्वीकारणारा असेल तो असली कुडमुडी भाषा वापरणार नाही...बाकी तुमच्या अभ्यासाच्या क्क्षेत आंम्ही तुंम्हाला आव्हान आणुन द्यायच...म्हनजे शत्रूला तुंम्ही रनगाड्याचे गोळे माझ्या जवळ द्या,आणी मला मारून दाखवा म्हणण्या सारखच आहे...

तुंम्ही जी जी भाकीतं वर्तवता ती खरी येण्यामागे फक्त एकच कारण आहे.लॉ ओफ प्रोबीब्लीटी...संभाव्यता शास्त्र...किंबहुना जे खरं होण्याचे जास्तीत जास्त चानसेस आहेत अश्याच गोष्टी तुंम्ही ज्योतिष शास्त्राच्या नावाखाली सांगत असता,,,त्यात तुमच्या शास्त्राची कर्तबगारी ''चलाख भाषा'' या पलीकडे काहीही नाही...

आणी सर्वात महत्वाचं ---तुमच्या इच्छेप्रमाणे मी शाम मानव यांच्याशी अताच बोललो आहे...१५ तारखे नंतर ते पुण्यात येणार आहेत...तेंव्हा तुंम्ही आव्हान स्वीकारणार कुठे ती जागा याच धाग्यावर मला कळवा...

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 7:01 pm | युयुत्सु

पराग दिवेकर यांस

आह्वान कोण कोणाला देतय याची तुम्ही बरीच गल्लत केली आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. अंनिस च्या कुणाची सावली पण मी स्वत:च्या अंगावर पडू देणार नाही. ते लोक चर्चा किती "मोकळेपणाने" करतात हे काही वर्षांपूर्वी याची देही याची डोळा अनुभवले आहे. तेव्हा गरज असेल तर ते माझ्याकडे येतील मी त्यांच्या कडे कशाला जाऊ.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2011 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा

यालाच म्हणतात पळकाढू...असो...ठीक आहे माझी गल्लत झाली...तुमचा मोबॉईल क्रमांक व्यनी करा.आंम्हीच तुमच्या पर्यंत येऊ...का हेही तुमच्या शास्त्रात बसत नाही तेही कळवा...म्हणजे विषयच मिटेल...बाकी मोबॉईल क्रमांक द्यायच आव्हान स्वीकाराल ना?

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 8:51 am | युयुत्सु

मोबाईल देउ शकत नाही. पण इमेल देउन ठेवतो... म्हणजे सर्व नोंदी व्यवस्थित राहतील.

इमेल upadhye.rajeev@gmail.com

आत्मशून्य's picture

9 Aug 2011 - 7:02 pm | आत्मशून्य

मी ५०० रू देऊन एका जन्म तारखेबाबत आव्हान द्यायला तयार आहे पण जर त्याबाबत भूतकाळ व भविष्य व इतर माहीती अचूक वर्तवण्यात चूक झाली तर

०) मी कोणत्याही परीस्थीती आपल्याला दीलेली ५०० रूपये वर्गणी परत मागणार नाही.

१) मला झालेल्या मनस्तापाबद्दल रू ७०० भूर्दंड भरावा लागेल .

२) यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने)

३) रूपये ८०,००० फक्त एखाद्या समाजसेवी संस्थेला बेनामी दान करावे लागतील (शक्य नसल्यास हे दान मिसळपाव.कॉम नावाने करावे लागेल). व संस्था कोनती असावी याबाबत मान्यवरांचे विचार व कौल याद्वारे निर्णय घेण्यात येइल.

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 7:10 pm | युयुत्सु

मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे परत देतो का? जो पर्यंत वैद्यकीय व्यावसायिक असे पैसे परत देत नाहीत तोपर्यंत असे मी प्रॉमिस मी पण देउ शकत नाही.

आत्मशून्य's picture

9 Aug 2011 - 7:21 pm | आत्मशून्य

डॉक्टर नाटक्या असेल, तर त्याला अद्दल घडवायची जाब विचारायची व नूकसान भरपाइ मागायची सोय कायद्यात आहे. तूम्ही कोण ? कायाद्यासमोर सगळे समान, विसरू नका, तूमच्या कोणत्याही घटनाबाह्य अटी मी स्विकारणार नाही. कायद्यचा/न्यायालयाचा मान ठेवा.

जर तूम्ही मला मनस्ताप दीला नाहीत तर तूम्हाला मिळालेल्या पैशाला (रू ५००) टॅक्स व्यतीरीक्त आरकीमीडीजचा बापही हात लावू शकणार नाही. निश्चींत रहा, पण जर कोणी तूम्हाला रू ५०० देऊन विकतच दूखण दारी आणेल अशी अपेक्शा ठेवत असाल तर तूम्ही नक्किच चूकताय. याला आव्हान न्हवे स्वार्थीपणा म्हणतात. तूम्ही डोक्टरच काय डेंटीस्टही वा कंपाऊंडरही म्हणू शकणार नाही असे आव्हान देत बसलात तर....

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 7:44 pm | युयुत्सु

हे बघा आत्मशून्य,

तुम्ही घटनेच्या चवकटीची गोष्ट काढलीत म्हणुन सांगतो. तुमच्या घटनाबाह्य अटी मी मान्य कराव्यात असे तुम्हाला कसे वाटते. वर अनेक जणानी मला क्लिनिकल ट्रायलचे उदाहरण दिले. अशा ट्रायल मध्ये तुम्ही भाग घेतला आणि तुम्हाला मनस्ताप किंवा इतर त्रास झाला तर कोणतीही भरपाई (माझ्या माहिती प्रमाणे मिळत नाही). तुम्हाला ज्योतिषाची ट्रायल तर घ्यायची आणि मनस्ताप स्वीकारायची तयारी नाही हे कसे काय ते कळत नाही.

आत्मशून्य's picture

9 Aug 2011 - 7:56 pm | आत्मशून्य

ते ऊदाहरण मी दिले आहे का ? अथवा माझ्या प्रमाणे वरील अनेक जणांनी तूमच्या मूळ अटी न मोडता आव्हान दीले आहे का ? मग त्यांची उदाहरणे माझ्यावर का लादताय ? यूयूत्सूराव एक मीपाकर म्हणून आपल्यामधे जो बंध आहे त्याचा मान राखून मी तूम्हाला रू २०० ची रोख सवलत देतो. जर मला मनस्ताप झाला तर मी केवळ रू५००चे परत घेइन पण इतर कोणत्याही अटी आता बदलायला लावू नका.

मी तूमच्या मूळ अटी कोठेही मोडल्या नसताना तूम्ही माझ्या पण तूमच्या अटींना पूरक अशा अटीमधे दूरूस्ती कशाला दाखवत आहात ? तूम्हाला भिती वाटते काय की खोटे ठराल म्हणून ? तसं असेल तर स्पश्ट बोला, मी अटी घालतोय कारण मला शंका आहेत की मी देलेले आव्हान मला जिंकता येइल की नाही याबाबत. पण तूमचं तर तसं नाहीये ना? तूम्ही इतक्या वर्षांचे अभ्यासक आहात स्वतःवर ठाम आहात मग आव्हानातील उसन अवसान आता आत्मविश्वासामधे बदललेले दीसून यासाठी प्राणांची बाजी देखील लावायला बिंधास्त तयार व्हा हो..... कूठे घटनाबाह्यता वगैरे तपासायचा भित्रेपणा दाखवताय ? तूमच्या माझ्यात तेव्हडा तरे फरक ठेवा की राव ? जर तूम्ही जिंकणारच आहात तर हारल्यानंतर मी मसणात जाइन असे सूध्दा कबूल करायला फार फरक पडतो काय ? बघा बूवा ... तिन्हीलोक आव्हानाने भरून जाऊदेत तूमचे भविष्य खरे ठर्ण्यासाठी कसोटी होऊ दे!

युयुत्सु's picture

9 Aug 2011 - 8:03 pm | युयुत्सु

आत्मशून्य,

तुमच्या या मुद्द्यांना मी उद्या उत्तरे देईन. आता फॅमिली टाईम चालू झाला आहे.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 10:16 am | आत्मशून्य

बास झालं बालीश कारण देऊन पळ काढणं, आता रिंगणात उतरा...

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 10:40 am | युयुत्सु

बास झालं बालीश कारण देऊन पळ काढणं, आता रिंगणात उतरा...

जी व्यक्ती माझ्या वैयक्तिक प्राधान्यक्रमाचा आदर ठेवू शकत नाही, त्या व्यक्तीचे आह्वान मी का स्वीकारावे असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 10:47 am | आत्मशून्य

हे पार्था मायेच्या पाशातून स्वतःला मूक्त कर आणी कर्तव्याला सामोरे जा. कारण बालीश कारणांची रांग लावून मैदानातून पळ काढणे तूझ्यासारख्या नरोत्तमाला शोभत नाही.

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 11:12 am | युयुत्सु

मी गीता मानत नाही

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 11:22 am | आत्मशून्य

मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे पूढील ओळी चिकटवायचे काय प्रयोजन ?

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः|
मूढोयंनाभिजानाति लोकः मामजमव्ययम् || भ. गी.

योगमायेने वेढला असल्यामुळे माझे खरे स्वरुप कुणालाच सहसा कळत नाही. मी जन्म घेत नाही आणि नाश ही पावत नाही हे मूर्ख लोकाना हे समजत नाही.

________
आता लगेच प्रोफाइल एडीट करून वरील ओळी बदलू नका.

राव तुम्ही हा गीतेचा श्लोक आहे एव्ह्ढंच पाहीलंत. जरा अर्थही पाहा की त्या श्लोकाचा.

... हे बेअक्कल लोक मला ओळखत नाहीत, ते मलाच जन्म मरणाला कारणीभूत समजतात. :)

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 11:33 am | आत्मशून्य

जाउदे कोणाचा दोष नाहीये २० अंश ३६ मि.वर होणारी ही पौर्णिमाच अत्यंत घाणेरडी आहे ;)

मी गीता मानत नाही.

कधीतरी थोडासा रुचीबदल म्हणून यावर एक लेख लिहू शकाल का? मोहमायेच्या पलिकडे जाऊन डो़क्याला कुठल्याही प्रकारचा शॉट लावून न घेता चिल पिल घेत आयुष्य कसं जगावं हे सांगणारी गीता आपण का मानत नाही हे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. :)

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 11:29 am | युयुत्सु

या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.

हरकत नाही... शक्य असेल तर खरड किंवा व्यनिमध्ये दुवा दया...

मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 11:51 am | आत्मशून्य

मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

ते सांगतील तेव्हां सागतील, पण याबाबतीत मी माझे मत सांगू का ?

@ यूयूत्सू

या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.

प्लीज तूमच्या ब्ल्~ओग वर श्रीकृष्णानं यूध्दाला प्रारंभ करण्यापूर्वी तूमच्या आमावस्या पोर्णीमेचा सल्ला मानला नाही असं काही तूम्ही लीहलं नसावं अशी अपेक्शा आहे, हो कारण उगाच का तूम्ही त्याने सांगीतलेला श्लोक प्रोफाइलमधे मीरवाता व वरती मी गीता मानत नाही असे छातेठोकपणे सांगाता ? बाकी असो जर त्या ब्लोगवरील कथेचा वापर करून तूमचा पैसा कमवायचा डाव असेल तर त्या ब्लोगच्या जाहीरातबाजी बद्दल तूमचा त्रीवार धीक्कार करेन. असो... वेगळा धागा काडू त्याबाबत.

आत्म्शुन्यराव, जरा दमाने घ्यावे अशी नम्र विनंती.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Aug 2011 - 7:13 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त एक शंका :-

यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने)

हे सर्व वेधशाळेच्या बाबतीत देखील लागू केले तर ? ;) त्यांचे तर सगळेच अंदाज / आडाखे कायम चुकतच असतात.

तिमा's picture

9 Aug 2011 - 7:15 pm | तिमा

ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे. ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेले असतात ते विश्वास ठेवतात, बाकीचे ठेवत नाहीत. या देशात लोकशाही आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आणि मिपासारख्या सुजाण सदस्यांच्या संस्थळावर हे घडू नये असे वाटते. कारण तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येणे म्हणजे आपण सर्वांनीच आपल्या आवडत्या मिपाची पातळी खाली आणण्यासारखे आहे.

शुचि's picture

9 Aug 2011 - 7:21 pm | शुचि

सुंदर प्रतिसाद.
________________
पण सर्वांनाचह तसं वाटत नाही.
स्वतःचं मत दुसर्‍यावर थोपलं नाही तर जग कसं चालणार? :(

धन्या's picture

9 Aug 2011 - 7:25 pm | धन्या

सहमत...

हा धागा तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येतोय हे लक्षात येताच तसे दोन्ही बाजूंच्या निदर्शनास आणून आम्ही वाचनमात्र झालो. :)

आत्मशून्य's picture

9 Aug 2011 - 7:27 pm | आत्मशून्य

ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे

अत्यंत चूकीच मत वाटतयं. कारण हा एखद्या व्यक्तीच्या अधीकाराचा न्हवे तर एखाद्या शास्त्राच्या अचूकतेचा मामला आहे. इथे यूयूत्सूच्यां जागी बराक ओबामा जरी असते तरी आव्हान असेच दीले पाहीजे. कारण ही व्यक्तीच्या वैयक्तीक नैपूण्याची कसोटी न्हवे की ज्यामधे एखादा तेंडूलकर निपजावा तर एखादा रोहन गावस्कर.... हे जर खरचं शास्त्र आहे तर इथे यूयूत्सू असो वा शिल्पा शिरोडकर... शास्त्रातून प्रेडीक्षन हे अचूकच येणार असले पाहीजे. ज्याचा त्याचा अनूभव हे गोश्ट शास्त्राला/विज्ञानाला लागू पडत नसते.

शाहिर's picture

9 Aug 2011 - 7:31 pm | शाहिर

नाडी मध्ये पाय गुंतवू नका !!
अवघड जागा आहे ती मि पा वरची ..धागा हजारी होइल ..
नाडी समर्थक विरोधक गरळ "ओका" यला सुरुवात करतिल..

युयुत्सु चा आव्हान / प्रति आव्हान सम्पु दे ..मग नाडी ला हात घालू ..

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2011 - 8:09 pm | प्रकाश घाटपांडे

या ज्योतिषाच काय करायच?
आपल आवाहन आहे कि युयुत्सुरावांकडून एकदा बिअर प्यायची ब्वॉ!

सुनील's picture

9 Aug 2011 - 8:26 pm | सुनील

युयुस्तुराव, तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे. बघा तुम्हाला पटते का.

१) मी ३ ते ५ व्यक्तींच्या जन्मतारखा, वेळा आणि ठिकाणे तुम्हाला देईन.
२) माहिती दिलेल्या प्रत्येक व्यक्तीगणिक रु. ५०० या प्रमाणे पैसे देण्यास मी तयार आहे.
३) प्रत्येक व्यक्तीबाबत सुमारे ५ ते ७ प्रश्न मी विचारीन.
४) हे सर्व प्रश्न हो/नाही स्वरूपाचे (निसंदिग्ध) असतील.
५) सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या दोघांना मान्य अशा व्यक्तीकडे बंद लिफाफ्यात मी देऊन ठेवीन.
६) तुमची उत्तरे आली की ती सर्व ताडून पाहिली जातील.
७) आलेले निश्कर्ष मिपावरच नव्हे तर अन्यत्रही तुमच्या नाव-पत्यासहित जाहीर करण्याची मुभा मला असेल.

बघा पटतयं का?

Nile's picture

10 Aug 2011 - 2:17 am | Nile

७)आलेले निश्कर्ष मिपावरच नव्हे तर अन्यत्रही तुमच्या नाव-पत्यासहित जाहीर करण्याची मुभा मला असेल.

असे असल्यास मी ही काही जन्मतारखा इ. देईन, प्रत्येक व्यक्तीचे रु. ५०० प्रमाणे सुद्धा देईन. आलेला निष्कर्ष जाहीर पेपरात वगैरे छापण्यास लेखी परवानगी द्यायची तयारी आहे ना?

मीपण काही पैसे खर्च करायला तयार आहे, फक्त हे सगळं कुणीतरी व्यवस्थीत ऑर्गनाइझ करा राव..

उदय's picture

10 Aug 2011 - 8:49 am | उदय

प्रत्येक व्यक्तीचे रु. ५०० प्रमाणे १० जणांसाठी ५००० रुपये द्यायला तयार आहे.

आव्हान पुढीलप्रमाणे:
Astrologers and palmists, who hoodwink the gullible by saying that astrology and palmistry are perfectly “Scientific”, can win the award if they can pick out correctly-within a margin of five percent error-those of males, females, and living and the dead from a set of ten palm prints or astrological charts giving the exact time of birth correct to the minute, and places of birth with their latitudes and longitudes.

संदर्भ: इथे पहा

युयुत्सु खोटे ठरले तरीही त्यांनी ५००० रुपये स्वतःकडे ठेवायला माझी हरकत नाही. फक्त १ अटः मिसळपाववर जाहीर माफी मागावी आणि आलेला निष्कर्ष जाहीर पेपरात छापण्यास (त्याचा खर्च मी करीन) लेखी परवानगी द्यावी.

बोला, आहे कबूल?

मी ही ५ जणांची फी भरायला आनंदाने तयार आहे. वर उदय यांनी म्हटले आहे त्यातील

"Astrologers and palmists, who hoodwink the gullible by saying that astrology and palmistry are perfectly “Scientific”, can win the award"

या वाक्याच्या टोनमधे एक पूर्वग्रह आहे. (दूषित म्हणत नाही.. कदाचित तो ज्योतिष खरे नसल्याबद्दलचा आत्मविश्वासही असेल) पण तेवढा पूर्वग्रहसुद्धा न बाळगता मी हे अशा प्रयोगाचे (आव्हानाचे नव्हे) फलित जाणून घ्यायला उत्सुक आहे.

युयुत्सु असा प्रयोग करायला तयार असतील तर पाच लोकांची फी २५०० मी त्यांनी दिलेल्या कोणत्याही अकाउंटला कधीही ट्रान्स्फर करेन.

मिसळपाव हे केवळ संवादाचे माध्यम असले तरी यातील आर्थिक भागाशी मी मिसळपावचा कोणताही संबंध जोडणार नाही. या प्रयोगातील आर्थिक किंवा कोणत्याही भागासाठी मिसळपाव जबाबदार असेल अशी अपेक्षा ठेवणार नाही आणि इतरांनीही ठेवू नये. अन्यथा हे नियमबाह्य होऊ शकेल असे वाटते.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 10:40 am | आत्मशून्य

मी सूध्दा ४ जणांची फी भरायला आनंदाने तयार आहे. कोणताही परतावा नसो फक्त येणारे रीझल्ट यूयूत्सूरावाच्या नाव पत्ता व फोटोसह कोणत्याही माध्यमात आमच्या खर्चाने केव्हांही कोठेही कधीही व कसेही प्रसीध्द करायची लेखी परवानगी यूयूत्सूरावानी द्यावी. नंतर याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.

चाचणी होण्यापूर्वी मी कुठलाही आरोप करत बसणार नाही.(आरोप करण्याइतपत वेळेची उपलब्धताही नाही म्हणा.)
पण माझ्या तर्फे मी ५००X२=१००० इतकी रक्कम देण्यास तयार आहे. हल्लीच्या काळात युयुत्सु ह्यांच्याविषयी किंवा त्यांच्या ज्योतिषाविषयी मी कुठलीही तीव्र विरोधी मते दिलेली नाहित. त्यामुळे त्यांनी त्या बाबतीत(पूर्वग्रह वगैरे) निश्चिंत असावे. आत्मशून्य, गवि,सुनील हे काय schedule ठरवतात ते बघाय्चे आता.

सुनील's picture

10 Aug 2011 - 10:37 am | सुनील

युयुत्सुराव, बघता बघता २०-२५ पत्रिका झाल्या. आता तपशिलाचे ठरवू या का?

रामदास's picture

10 Aug 2011 - 10:46 am | रामदास

चार उरकून घेईन म्हणतो.

मुख्य म्हणजे जे कँडिडेट पहायचे ते आपण स्वतः नसावे. किंवा मिपाकरही नसावे.

शक्यतो एकमेकांशी अ‍ॅनॉनिमस असलेले लोक निवडावेत.

मी एका प्रतिसादात ढोबळ पद्धत सूचित केली आहे. त्याला सर्वानुमते सुधारुन एक काँक्रीट रूप द्यावे.

एकूण वीस लोकांना यात समाविष्ट करता येईल हे वरील प्रतिसादांवरुन दिसतेच आहे.

रामदासकाकांनी काहीही उरकू नये आणि न्यूट्रल पंच बनावे अशी इच्छा आणि विनंती. सर्वानुमते मान्य होण्यास योग्य अशी व्यक्ती म्हणून प्रथम त्यांचेच नाव नजरेसमोर येत आहे.

शक्यतो एकमेकांशी अ‍ॅनॉनिमस असलेले लोक निवडावेत.

आधी युयुत्सुंना मैदानात तर उतरू द्या? :-)

बाकी माझ्याबद्दल कीतीही माहिती शोधली तरी मी दिलेल्या व्यक्तींची माहिती तिसर्‍या मार्गाने मिळू शकणार नाही अशा तारखा द्यायचा माझा प्रयत्न असेल.

धन्या's picture

10 Aug 2011 - 11:12 am | धन्या

छान चालले आहे... चालू दया... या धाग्यावरचा शंभरावा प्रतिसाद :)

जयंत कुलकर्णी's picture

10 Aug 2011 - 2:16 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

या चाचणीत जे प्रश्न आहेत ते त्याची उत्तरे एका लिफाप्यात घालून पंचांकडे द्यावेत. मूख्य म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना याची उत्तरे देण्यास मूभा असावी. म्हणजे जोतिषी व इतर जण यांच्यात काही फरक नाही हेही सिद्ध होईल.