डिजिटल शब्दांच्या शोधात...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
6 Aug 2011 - 9:04 am
गाभा: 

या लेखात मला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल सर्वसमावेशक चर्चा (थोडक्यात खर्‍या अर्थाने काथ्याकूट) करायची आहे आणि त्याद्वारे सर्वांचाच फायदा होईल असा मला विश्वास आहे.

तसे या विषयावर लिहिण्याचे कधीपासूनच मनात होते पण वेळही मिळत नव्हता.
पण आता लिहिण्यामागचे तत्कालीक कारण असे की अगदी कालपर्यंत गुगल डिक्शनरी उपलब्ध होती आणि जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमधील शब्दांचे अर्थ त्यात शोधण्याचा पर्याय उपलब्ध होता.
इंग्रजी ते मराठी साठी सुद्धा आणि तेही अगदी चांगल्या पद्धतीने.
मोबाईल मधल्या इंटर्नेटवरून सुद्धा शब्द शोधणे त्यामुळे सोपे होते कारण गुगलवर युनिकोड मराठी चा वापर असल्याने मोबाईलमध्ये वेबपेजवर मराठी शब्द जसाच्या तसा दिसतो. फॉण्ट डाउनलोड करावा लागत नाही.
युनिकोड पद्धतीने मराठी लिहायला खुप सोपे जाते (मिसळपाव वर सुद्धा आपण त्याच पद्धतीने लिहितो)
[जेव्हा आपल्याला मराठी शब्दाचा पर्यायी इंग्रजी शब्द शोधायचा असतो तेव्हा पटकन लिहिण्यासाठी खालील लिंक वर जावू शकता- http://www.gamabhana.com/gamabhana_ex/
मी तर म्हणेन की प्रत्येकाने आपापले मराठी फोण्ट विकसीत करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा मराठी साठी फक्त एक आणि एकच फॉण्ट म्हणजे युनिकोड म्हणजे फोनेटीक पद्धतीचा सर्वमान्य करावा.]
तर मी सांगत होतो गुगल डिक्शनरी बद्दल!
ती लिंक होती - http://www.google.com/dictionary
पण काल पासून खालीलप्रमाणे संदेश येतो आहे -
Google Dictionary is no longer available.
You can use Google web search to find definitions or Google Translate for your translation needs.
जर आपण Google Translate वर गेलो तर त्यात भारतातल्या सगळ्या भाषा आहेत, शब्द आणि वाक्ये पण भाषांतरीत करता येतात पण त्यात मराठी मात्र वगळण्यात आली आहे. असे का?
कुणाला कारण माहिती असल्यास येथे सांगू शकता.
तसेच, ऑनलाईन पण युनिकोड पद्धतीचे मराठी असलेली इंग्रजी ते मराठी किंवा मराठी ते इंग्रजी डिक्शनरी आहे का?
असल्यास येथे सांगावे.

तसेच, ऑनलाईन मोफत इंग्रजी ते मराठी डीक्शनरी साठी खांडबहाले (http://www.khandbahale.com/englishmarathi.php) हा पर्याय आहे पण, त्यातला मराठी शब्द मोबाईल मधे वेबपेज ओपन केल्यावर दिसत नाही कारण त्यांचा स्वतःचा फॉन्ट आहे. मात्र कॉम्प्युटर वर दिसतो.

खांडबहालेंची मोबाईलसाठी ऑफलाईन डिक्शनरी मिळते. तीनशे रुपये देवून कोड विकत घेवून ती अ‍ॅक्टीव्ह करता येते.
पण, जर ती काही कारणास्तव मोबाईल फॉरमॅट करावा लागला तर पुन्हा इन्स्टॉल करण्यासाठी परत दोनशे रुपये देवून कोड विकत घ्यावा लागतो.
(http://www.4shared.com/file/Uyy_CLBm/Dictionary_English_Marathi_for.html)

मात्र, मोबाईलसाठी इंग्रजी ते इंग्रजी पूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्यास खाली आहेत. डाउनलोड करून लाभ घ्यावा:
http://www.4shared.com/file/AXTVdL9g/Dictionary41.html
http://www.4shared.com/file/uRybMdIV/Webster_Complete_Dictionary.html
http://www.4shared.com/file/JWAJpMez/Dictionary9-en-en_for_mobile.html

तसेच, आपल्या कॉम्प्युटरसाठी संपूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्या खाली मिळतीलः
मोफत ऑक्सफर्डः
http://www.4shared.com/file/Ok38_-kL/POD_for_windows.html
मोफत वेबस्टरः
http://www.4shared.com/file/8MUmy4E7/WEBSTER_for_windows.html
मोफत मराठी ते इंग्रजी:
http://www.4shared.com/file/2M6AmCs4/Marathi_English_Basic_Dictiona.html

मोल्सवर्थ या लेखकाची पीडीएफ स्वरूपातली डिक्शनरी लि़क खाली देत आहे:
लिंक खाली देत आहे:
http://www.archive.org/details/acompendiummole00molegoog

आणखी काही इंग्रजी ते इंग्रजी पीडीएफ-
http://www.4shared.com/document/b6_Yky43/Thesaurus_Oxford.html
http://www.4shared.com/document/EJ9QgB2M/Thesaurus_Roget.html

वाचकांना विनंती आहे की कुणाला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल आणखी काही माहिती असल्यास येथे सांगावी म्हणजे सगळ्याना त्याचा लाभ होईल.
जास्त करून मोबाईलसाठी इंग्रजी ते मराठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बद्दल माहिती असल्यास सांगावे कारण मोबाईल सतत आपल्या जवळ असतो आणि पटकन शब्दाचा अर्थ शोधता येतो.

प्रतिक्रिया

खांडबहालेंची मोबाईलसाठी ऑफलाईन डिक्शनरी मिळते. तीनशे रुपये देवून कोड विकत घेवून ती अ‍ॅक्टीव्ह करता येते.
पण, जर ती काही कारणास्तव मोबाईल फॉरमॅट करावा लागला तर पुन्हा इन्स्टॉल करण्यासाठी परत दोनशे रुपये देवून कोड विकत घ्यावा लागतो.

वाचकांना विनंती आहे की कुणाला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल आणखी काही माहिती असल्यास येथे सांगावी म्हणजे सगळ्याना त्याचा लाभ होईल.

जास्त करून मोबाईलसाठी इंग्रजी ते मराठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बद्दल माहिती असल्यास सांगावे कारण मोबाईल सतत आपल्या जवळ असतो आणि पटकन शब्दाचा अर्थ शोधता येतो.

खां.बां.ची जाहीरात फसली मालक.. मजकूर पुन्यांदा लिवा!

कृपया, खरोखर सर्वांना उपयुक्त होईल अशी चर्चा करावी. :-)

पैशांचा उल्लेख असलेला मजकूर, मग तो कुठल्याही व्यक्तिच्या माध्यमातून मिपाच्या बोर्डावर पडू शकतो काय?
व्यापारी उत्पादनांच्या जाहिरात टाईप लिखाणाबद्दल मिपाचे अधिकृत धोरण काय आहे?
यासंदर्भात आधिकारिक स्पष्टीकरण झाल्यास उत्तम.

निमिष सोनार's picture

6 Aug 2011 - 10:38 am | निमिष सोनार

ती जाहिरात नसून माझा आलेला अनुभव आहे, की जर ती डिक्शनरी चुकून अन- इन्स्टॉल झाली तर पुन्हा इन्स्टॉल करतांना पुन्हा पैसे द्यावे लागतात. हा एका अर्थाने सावधानतेचा इशारा आहे. यात कसली आली जाहिरात?
कृपया, उगाच मुळ मुद्दा सोडून वाचकांचे लक्ष इतर गोष्टींकडे का वळवता आहे बरे?
:-)

वाचकांचे लक्ष वळवविणे किंवा न वळविणे माझ्या हातात नाही.
जिकडे वळायचे असेल तिकडे ते वळेल, किंवा वळणार नाही किंवा कसेही*. ( * साभार मिपा शब्दकोश )

मी फक्त आधिकारिक स्पष्टीकरणाबद्दल बोललो.
:)
:)
:)

पुन्हा पुन्हा तोच उल्लेख करून तुम्हीच खांडबहालेंची जाहिरात करताय

निमिष सोनार's picture

6 Aug 2011 - 10:54 am | निमिष सोनार

तुमच्या सिन्गेचर मध्ये दैनिक दिव्य मराठी चा दुवा दिलेला आहे, मग मी त्याला जाहिरात मानायची का?
काय आपलं उगाच काहितरी?
:-)

तिथं क्लिक केलं तर फुकट एक पेपर वाचायला मिळेल. (पण त्यासाठी तुम्हाला बँड्वीड्थ जाळावी लागणार )
आणि मी पेपर किती रुपयांना मिळतो व पुसट छापून आला असेल तर पुन्हा एकदा विकत घेण्याची नौबत येऊ शकते वगैरे असले काही सांगितलेले नाही.

..आपले लक्ष लेखातील मूळ मुद्याकडे वळवू या का?

जिथल्या तिथे गोष्टी व्हाव्यात म्हणून मी प्रतिसाद दिले.

..आपले लक्ष लेखातील मूळ मुद्याकडे वळवू या का?

मी वळवू नका म्हटले तर आपण वळणारच नाही का?
आणि मूळ मुद्दा, लक्ष वळवू या का वगैरे वाचून तुम्ही ट्यूशन घेत आहात असे उगाच वाटुन गेले.. :)
असो.
हा शेवटचा प्रतिसाद.

पक्या's picture

7 Aug 2011 - 2:32 am | पक्या

काय येड लागलय का यश्वंत महाराज? कसले फालतू मुद्दे उकरून काढत आहात.
बाकी दैनिक दिव्य ची जाहिरात आपण केली आहे पण फारच सपक झालीये.:)

यकु's picture

8 Aug 2011 - 8:02 pm | यकु

धन्यवाद!

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 10:06 am | सौन्दर्य

"जर आपण Google Translate वर गेलो तर त्यात भारतातल्या सगळ्या भाषा आहेत, शब्द आणि वाक्ये पण भाषांतरीत करता येतात पण त्यात मराठी मात्र वगळण्यात आली आहे. असे का?"

तुमचा हा लेख वाचताक्षणीच मि 'google transliterate' वर जाऊन पाहिले असता मराठीचे ओप्शन दिसले.

तुम्हाला वेगळे काही म्ह्णावयाचे आहे का ?

सौन्दर्य

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Aug 2011 - 12:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Translate आणि Transliterate यात फरक आहे.

Translate म्हणजे भाषांतर आणि transliteration चा अर्थ जालावर The spelling of a word in one language with the alphabet of another language असा सापडला.

म्हणजे त्यात इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ शोधता येतो की फक्त मराठीत टाईप करता येते?

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 10:33 am | सौन्दर्य

मराठीत शब्द टाइप करता येतो, अर्थ शोधता येत नाही.

सौंदर्य

निमिष सोनार's picture

6 Aug 2011 - 10:41 am | निमिष सोनार

की असे कसे होईल?
म्हणजे थोडक्यात असे की, गुगलने इंग्रजी मराठी शब्दकोशाचे ऑप्शन काढून टाकले आहे हेच खरे.
पण प्रश्न आहे की, का काढले?

खांडबहाले चा शब्दकोश मला अजिबात आवडत नाही. निव्वळ इंग्रजी शब्दकोशाचे भाषांतर वाटते. चांगला मराठी शब्दकोश मलाही हवा आहे. मिळाला नाही अजून. "शब्दकोश" (http://www.shabdkosh.com/) तसा खुला शब्दकोश आहे. आपणच शब्द टाकून त्याला चांगला बनवू शकतो.

निमिष सोनार's picture

6 Aug 2011 - 5:29 pm | निमिष सोनार

अजून एक सापडली:
http://www.dictionary.tamilcube.com/marathi-dictionary.aspx

निनाद's picture

7 Aug 2011 - 12:34 pm | निनाद

फायरफॉक्स वापरत असाल तर अ‍ॅडऑन्स आहेत जे अतिशय उपयोगी पडू शकतात.
तुम्हाला मराठीच्या ऐवजी हिंदी शब्द चालत असतील तर हिंदी पॉप अप वापरा. येथून उतरवा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/hindi-pop-up-184619/

निनाद's picture

7 Aug 2011 - 12:40 pm | निनाद

फायरफॉक्सवर चालणारा मराठी शब्दकोश येथे Marathi Dictionary
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary
हे पण मोफत आहे.

वरील माहितीबद्दल धन्यवाद. मोबाईलसाठी ऑफलाईन इंग्रजी ते मराठी डिक्शनरी नाही का?

निनाद's picture

8 Aug 2011 - 4:41 am | निनाद

नोकिया (इ-६३ संच) वर इंग्रजी-इंग्रजी-हिंदी शब्दकोश मी अनेक महिने वापरला आहे. हा ऑफलाईन असून नोकियाच्या संचात बसतो त्यामु़ळे तो निश्चित ऑफ लाईन आहे.
ओव्ही वर शोधा!
नोकियावर जगातील बहुतेक सर्व भाषांचे शब्दकोश फुकट मिळतात - आपल्या करंटेपणाने यात फक्त मराठी शब्दकोश नाही!
मला नोकियाच्या ओएस चे प्रोग्रामींग विषयक ज्ञान नाही - अन्यथा मला असा शब्दकोश बनवण्यात रस आहे!

तसेच तुम्ही आयफोन वापरत असाल तर त्यातही मराठी वगळता इतर सर्व शब्दकोश फुकट मिळतात!

धन्या's picture

8 Aug 2011 - 5:16 am | धन्या

नोकियाचे S40, S60 आणि S80 असे तीन मोबाईल प्लॅटफॉर्म आहेत. यातले S40 आणि S60 हे कस्टम प्लॅटफॉर्म असून यात कुठल्याही प्रकारची ओएस वापरलेली नसते. S80 प्लॅटफॉर्म हा हाय एन्ड मोबाईल्ससाठी वापरण्यात येतो आणि तो सिम्बियन ओएसवर आधारीत आहे.

अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामरला ओएसच्या विशेष ज्ञानाची गरज नसते. कामचलावू ज्ञान पुरेसं असतं. डेव्हपलमेंट प्लॅटफॉर्मच्या एखादया एपिआय संदर्भात गरज भासलीच तर केव्हाही ओएसचा तेव्हढाच भाग खोलात अभ्यासता येऊ शकतो.

मात्र मोबाईल डिव्हाईससाठी प्रोग्रामिंग करताना मोबाईल हार्डवेअर प्लॅटफॉर्मचे सखोल ज्ञान असणे मात्र आवश्यक असते.

निमिष सोनार's picture

8 Aug 2011 - 9:17 am | निमिष सोनार

नोकियावर जगातील बहुतेक सर्व भाषांचे शब्दकोश फुकट मिळतात - आपल्या करंटेपणाने यात फक्त मराठी शब्दकोश नाही!

वरील वाक्य अगदी बरोबर बोललात आपण.
मला वाटते कुणीतरी मराठी व्यक्तीनेच गुगलला सांगितले असावे की फ्री ऑनलाईन इंग्रजी मराठी ऑप्शन काढून टाका म्हणून!!

मला वाटते कुणीतरी मराठी व्यक्तीनेच गुगलला सांगितले असावे की फ्री ऑनलाईन इंग्रजी मराठी ऑप्शन काढून टाका म्हणून!!!

या शोधासाठी आपल्या नावाची नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करायला हरकत नाही :)

" मला वाटते कुणीतरी मराठी व्यक्तीनेच गुगलला सांगितले असावे की फ्री ऑनलाईन इंग्रजी मराठी ऑप्शन काढून टाका म्हणून!!!"

मी हे वाक्य लिहिले आहे हे बरोबर आहे.
मला त्यातून असे म्हणायचे आहे की:

बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांकडून विकत मिळणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन इंग्रजी ते मराठी मोबाईल साठी तसेच कॉम्प्युटरसाठी शब्दकोश आहेत. पण ते उगाच स्वतःचा फॉण्ट विकसीत करत बसून त्याला मर्यादा आणतात.
आणोत बापुडे.
पण, गुगल मध्ये पूर्वी युनिकोड पद्धतीने गुगल डिक्शनरी या ऑप्शन द्वारे इंग्रजी मराठी ऑनलाईन डिक्शनरी उपलब्ध होती. अचानक काही दिवसांपूर्वी ते ऑप्शन बंद झाले.
त्या ऐवजी आणखी चांगले म्हणजे ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट हे ऑप्शन गुगलने सुरु केले आहे.
म्हणजे इंग्रजी शब्दाचे तसेच पूर्ण वाक्याचे भाषांतर जगातील इतर अनेक भाषांमध्ये तेथे होते.
हे स्वागतार्ह आहे. पण, ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट मधून मराठी भाषा वगळली गेली आहे.
ती का म्हणून?
गुगलने ट्रान्स्लेट आणी ट्रान्सलिटरेट सुरू करण्या आधी मराठीतील तज्ञांना विचारले असेलच ना?
मग, मराठी ऑप्शन बंद का झाले?
तज्ञांना आनंद झाला असला पाहिजे होता.
जगभरातल्या तमाम मराठी लोकांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब होती हो!
पण, आपापल्या विकसित केलेल्या फोण्ट च्याच फक्त ऑनलाईन डिक्शनरी लोकांनी वापराव्या व विकत घ्याव्या, आणि युनिकोड पद्धत जी जगातील सोपी पद्धत आहे त्याचा फायदा सर्व मराठी बांधवांना व्हावा असे त्यांना वाटत नसेल
असे मला वाटले म्हणू मी वरील विधान केले आहे.
म्हण्जे, आपणच आपली प्रगती रोखतो आहोत.
पाय खाली खेचत आहोत.
या अर्थाने मी तसे म्हटले आहे.
खाली दिलेल्या लिंक वर जा.
http://translate.google.com/#
इंग्रजी ते हिंदी सिलेक्ट करा आनि बघा काय आधुनिक टेक्नॉलॉजी चा चमत्कार आहे ते!
फक्त शब्दच नाही तर इंग्रजीची वाक्यची वाक्य, परिच्छेद हिंदीत (गुजराती, मल्यालम, कन्नड, तमील, आणि जगभरातील इतर भाषेत) भाषांतरीत करता येतात.
फक्त तेथे मराठी ऑप्शन नाही आहे. ते का?
पूर्वी गुगल डिक्शनरी होती तेव्हा त्यात इंग्रजी ते मराठी शब्द शोधता येत होता.
मग, आता मराठी का वगळण्यात आली?

पाषाणभेद's picture

8 Aug 2011 - 9:26 am | पाषाणभेद

http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

हा शब्दकोश खरोखर worth आहे.

मोबाईलवर मराठी कसे टाईप करता येईल ? इन्डि एसएमएस सारख्या अ‍ॅप्लिकेशनमधे एसेमेस टंकून तो स्वतःला पाठवून मग फॉरवर्ड बटन दाबून चोप्य पस्ते करणे याखेरीज काही उपाय नाही का?

उपरोक्त उपाय हा काही लिमिटेड शब्दांपुरता ठीक आहे. छोटे छोटे एसेमेस लिहायचे आणि ते पैसे खर्चून सेन्ड केल्याशिवाय कॉपी पेस्ट मोडमधे येत नाहीत. तेव्हा इथे मिपावर जसे सरळ टाईप करत जातो तसे मोबाईलवर करता येईल का? बरहा वगैरेचेही मोबाईल अ‍ॅप्लिकेशन नाही दिसत.