गाभा:
मित्रहो,
लोकायत संस्थळ समूहाचे सन्माननीय संचालक श्री. नीलकांत हे ऑगस्ट महिन्यातील तिसर्या रविवारी (२१/२२ तारखेस) हैदराबाद मुक्कामी येणार असल्याचे समजते. ही सुवर्णसंधी साधून त्यांच्या समवेत हैदराबाद येथे शनिवार दि. २१ ऑगस्ट २०११ रोजी समस्त मराठी संस्थळ बंधू-भगिनींचे एक स्नेहसंमेलन करावे असा एक विचार होत आहे.
हैदराबाद येथे असे स्नेहसंमेलन आयोजित केल्यास त्यास किती जण उपस्थित राहू शकतील? आणि त्याचे स्वरूप काय असेल? याचा आराखडा तयार करण्यासाठी मी हे प्राथमिक निवेदन देत आहे.
कृपया हैदराबादस्थित आणि त्या काळात हैदराबादला असू शकणार्या सर्व सभासदांनी आपली मते मांडावीत.
शुद्ध मराठीत -
नीलकांत येत्या २१ तारखेला हैदराबादला असणार. तेव्हा हैदराबादला कट्टा केला तर कोणकोण येणार?
प्रतिक्रिया
3 Aug 2011 - 10:49 am | विसुनाना
क्षमस्व! वरच्या तारखांमध्ये काही चूक आहे -
शनिवार २० ऑगस्ट २०११
रविवार २१ ऑगस्ट २०११
शनिवारी म्हणजे २० ऑगस्ट २०११ ला रात्री स्नेहसंमेलन + सहभोजन.
3 Aug 2011 - 10:50 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!! कट्टा कीडा चावतोय सगळ्यांना! ;)
आमच्या आधीच शुभेच्छा!
अवांतर: नीलकांतला जरा कोपच्यात घ्या हो नानासाहेब! गायपच आस्तंय ते!
4 Aug 2011 - 4:54 pm | प्रशांत
अवांतर ला सहमत..
नानासाहेब,
बिका म्हणातात ते बरोबर आलेली संधि सोडायची नाय...
3 Aug 2011 - 10:55 am | रत्नागिरीकर
मी तयार आहे...कुठे करायचा कट्टा??
3 Aug 2011 - 1:58 pm | विवेक मोडक
मी आहे.
3 Aug 2011 - 2:41 pm | धमाल मुलगा
मस्तच हो!
होऊन जाऊद्या! करा मज्जाऽऽ.. :)
3 Aug 2011 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत.
जोरदार कट्टा करा.
विसुभौ माझे पण तिकिट पाठवून द्या. ह्यावेळी ते मी दूसर्या कोणाला न विकता नक्की हजेरी लावीन. ;)
3 Aug 2011 - 2:55 pm | विसुनाना
सर्वांचे - कट्ट्यावर स्वागत आहे.
4 Aug 2011 - 8:26 am | ५० फक्त
मस्त रे करा करा कट्टा करा आणि छान छान फोटु आणि रिपोर्ट टाका इथं.
4 Aug 2011 - 10:33 am | सुनील
जरूर भेटा. रद्द वगैरे करू नका!
4 Aug 2011 - 11:28 am | विसुनाना
ऐनवेळी क्वळसा वडणार्यांपैकी आम्ही नव्हेत. ;)
('कोळसा ओढणे' या वाक्प्रचाराच्या अर्थासाठी कोणत्याही कोल्हापूरकरास व्यनि करावा.)
4 Aug 2011 - 6:53 pm | नीलकांत
हैद्राबादला जायचं खुप दिवसांपासून मनात आहे. यावेळी ते शक्य होतंय. रमजानचा खास मुहूर्त येतोय त्यामुळे हैद्राबादला भटकायला मजा येईल. विशेष म्हणजे हैद्राबादकर विसुनानांनी खास बेत केलाय त्यामुळे ही हैद्राबाद भेट अविस्मरणीय होईल असेच दिसते. हैद्राबादेतील सर्वांना भेटायची इच्छा आहे. सर्वांनी कट्याला यावं ही विनंती.
अवांतर - या बिकांकडे बघावं म्हणतो आता. ;)
- नीलकांत
4 Aug 2011 - 7:07 pm | धमाल मुलगा
माझ्यासाठी हलीम, पेश्शल बिर्याणी आणि नवाबी हुक्का अशी सप्रेम भेट आणशीलच मित्रा. ;)
परतीचा प्रवास व्हाया पुणे करावा ही णम्र इनंती. ;)
4 Aug 2011 - 7:36 pm | आनंदयात्री
>>हलीम, पेश्शल बिर्याणी आणि नवाबी हुक्का
आमच्यासाठी भोपळ्याची खीर आणा. जमले तर सेलमधले शर्टही आणा !!
आयला, हा पोरगा सरकारी अधिकारी झाल्या झाल्या इफ्तार पार्टी (कोण रे तो भगवा भगवा ओरडला.) आयोजित करायला लागला !! पावलं राजकारणाकडे वळतायेत का ? म्होरल्या वर्षी कॉर्पोरेटर का ? (का उच्चायुक्त ;) )
-
आंद्या शेख
4 Aug 2011 - 8:08 pm | धमाल मुलगा
बघताँय हाँ मी....
सायबांन्ला आमचा सक्रिय पाठिंबा हाये. त्यांनी फक्त तिकीटासाटी अर्ज करावा. पुढचं आमी बघुन घेऊ. ;)
5 Aug 2011 - 5:14 am | शुचि
तू बघतोयस म्हणूनच अर्ज करत नाहीयेत. ख्या ख्या!!!
4 Aug 2011 - 7:09 pm | श्रावण मोडक
तू त्याच्याकडं पहात रहा. तो तुझ्याकडं पहात राहील. आम्ही मिपा पहात राहू. ;)
5 Aug 2011 - 12:34 am | बिपिन कार्यकर्ते
माझ्यासाठी पॅरेडाइजची बिर्याणी आण... तुझे सगळे गुन्ही माफ करतो.
5 Aug 2011 - 8:41 am | कुंदन
अरे पण तुला तर पाव भाजी आवडते ना ?
5 Aug 2011 - 11:50 am | प्रशांत
>>>हैद्राबादला जायचं खुप दिवसांपासून मनात आहे.
हैद्राबाद भेट अविस्मरणीय होईल(बिर्याणि न खाता) कारण श्रावण महिन्यात नॉनवेज खात नाहिस ना...
>>>>अवांतर - या बिकांकडे बघावं म्हणतो आता.
म्हंजे पुण्याला येणार का?