भारताची "रहमदिल" न्यायालये

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
3 Aug 2011 - 8:39 am
गाभा: 

http://www.saamana.com/2011/August/03/AGRALEKH.HTM

हा अग्रलेख वाचा.
उच्च न्यायालयाने म्हणे असा आदेश काढला आहे की रोझे पाळणार्‍या कैद्यांना "उचित" आहार देणे हे तुरुंगाच्या अधिकार्‍यांचे "कर्तव्य" आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून मुस्लिम कैद्यांना शीरकूर्मा, खजूर, फळे, सुकामेवा वगैरे दर्जेदार आहार रमजानच्या काळात मिळेल.
हेच न्यायालय गणेश चतुर्थीला तमाम मराठी हिंदू कैद्यांना उकडीचे मोदक खायला घाला असा आदेश काढेल काय?
तमाम ख्रिस्ती कैद्यांना ख्रिसमसला केक आणि भेटवस्तू द्या असा आदेश निघणार काय? आणि मग होळी आणि दिवाळीचे काय?

कैद्यांचे चोचले पुरवायला तुरुंग ही काय त्यांची सासुरवाडी आहे का? असला अक्कलशून्यपणा करण्यापेक्षा न्यायालयांनी तुंबलेल्या केसांचा लवकर निकाल लावला तर बरे. त्यातही लाखो, अब्ज लाख रुपयांचा घोटाळेखोरांना त्वरित शिक्षा ठोठावाव्यात.

एक तर शिक्षाबिक्षा देऊन झालेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपले सरकार कच खाते त्यात आता असला मेवा कैदी मागणार त्यात पुन्हा भ्रष्टाचार होऊन तुरुंग अधिकारी खरा मेवा खाणार.

तुरुंग हा धाक वाटावा असे ठिकाण आहे का आपल्या मनाप्रमाणे धर्माचरण करता येईल असे तीर्थक्षेत्र आहे ह्याचा विचार केला पाहिजे.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

3 Aug 2011 - 9:03 am | नितिन थत्ते

न्यायालयांबद्दल काय बोलायचं काम नाय हां, सांगून ठेवतोय !!!

न्यायालयेच आपल्याला सगळ्या राजकारण्यांनी केलेल्या बजबजपुरीतून वाचवणार आहेत. :)

निखिलेश's picture

4 Aug 2011 - 12:50 pm | निखिलेश

न्यायालयेच आपल्याला सगळ्या राजकारण्यांनी केलेल्या बजबजपुरीतून वाचवणार आहेत???

चिरोटा's picture

5 Aug 2011 - 5:24 pm | चिरोटा

मिपावर हो!. शुक्रवार आहे. बिर्याणी खायचा विचार होता पण श्रावण चालु त्यामुळे ताकाची कढी + भेंडीची भाजी.

ऋषिकेश's picture

3 Aug 2011 - 9:14 am | ऋषिकेश

केलेले कायदाबाह्य कृत्य व त्यासाठी शिक्षा आणि धार्मिक 'सवयी' यात गल्लत होऊ नये असे वाटते

कहिसे अवांतरः १८५७ चा उठाव आपल्या नोकर-सैनिकांच्या धार्मिक भावनांना दुखावल्याने / दुर्लक्ष केल्याने झाला होता हे आठवले

१८५७ चा उठाव आपण दर्शवता त्या कारणानी झालेला नाही...तो दिल्लीच्या बादशाची गादी परत मिळवता यावी याच एकमेव उद्देशानी घडवण्यात आला होता...ज्यांनी हे त्या काली जाणल होत ते म्हणुनच या पासुन दुर राहिले होते...या विषयाच्या संपूर्ण माहीतीसाठी - नांदेडच्या श्री.शेषराव मोरे सरांनी (सप्रमाण) अलीकडेच लिहिलेला -"१८५७ चा जिहाद" हा अभ्यासग्रंथ वाचावा...

मिळण्याचे ठीकाण-साधना मिडीया सेंटर शनिवार पेठ पुणे...

टीप-मोरे सरांचे बरेचसे ग्रंथ जालावर पण उपलब्ध आहेत...

या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…

या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,

“वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”

आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..!

यातिल हिंदूस्थान फक्त हिंदूचाच असा संकूचित अर्थ कधिच नव्हता, तो सर्वांचा होता. हिंदूस्थानला धर्माचे राजकारण चढलेले नव्हते.

ती हिंद भूमी होती. !

इंग्रजांना दिल्लीच्या बादशाची गादी नष्ट करणे म्हणजे भारताचे अस्तित्व मिटविणे होते.

अंग्रेजी सल्तनत को हिंद की सर- जमींपर अपना रुतबा कायम करना था और वोह भी हमारा वजूद मिटा कर !

लेकीन आज भी हमें फक्र हैं , हम हिंद के निवासी हैं चाहे कोई कितना भी फसादी माहोल पैदा करें

हिंद भूमी के निवासी सभी जन एक हैं,
रंग, रूप, धर्म, भाषा चाहे अनेक हैं !!

~ PROUD TO CALL MYSELF INDIAN वाहीदा

धन्यवाद दिवेकर,
किस्सा आठवून दिल्याबध्द्ल (काही संदर्भ जालावरुन साभार)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Aug 2011 - 6:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> हिंदूस्थानला धर्माचे राजकारण चढलेले नव्हते.
बाकी प्रतिसाद छान आहे, पण वरचे वाक्य नाही पटले. धर्माचे राजकारण फार पूर्वी पासून चालू आहे. शिवछत्रपती वाचून तरी तसेच वाटते.

वाहीदा's picture

3 Aug 2011 - 7:16 pm | वाहीदा

राज्यकारण अन राजकारण यात फ़रक आहे साहेब

पूर्वेचे राजे, महाराजे, बादशहा हा धर्माचा वापर राज्य करण्यासाठी करत असत.

धर्म , वंश , जात-पात याचे घाणेरडे राजकारण हल्लीचे गलिच्छ राजकारणी करतात कारण राज्य करण्याची या राजकारणी लोकांची मूळात लायकीच नाही.

अन शिवाजी महाराजांच्या नावाखाली तर अजूनही हे खेळ अधिक नीच पणाने खेळले जातात याचे नक्कीच वाईट वाटते.

शिवाजी महाराजांच्या मुद्रेतही ’मुद्रा भद्राय राजते’ आहे ’मुद्रा धर्माय राजते’ असे अजिबात नाही
भद्र म्हणजे रयत / जनता. ते जनतेचेच राजे होते. पण ते घाणेरडे राजकारण कधीच खेळले नाही. अन बहादुर शहा जफर ही कधी खेळले नाहीत. त्यासाठी वाघाची छाती असावी लागते. शेर के खाल में भेडीये कीस काम के ?

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।"
Meaning:
The glory of this Mudra of Shahaji's son Shivaji will grow like the first day moon,
it will be worshiped by the world
& it will shine only for well being of people.

पंगा's picture

3 Aug 2011 - 7:53 pm | पंगा

शिवाजी महाराजांच्या मुद्रेतही ’मुद्रा भद्राय राजते’ आहे ’मुद्रा धर्माय राजते’ असे अजिबात नाही
भद्र म्हणजे रयत / जनता.

माझ्या कल्पनेप्रमाणे 'भद्र' याचा अर्थ येथे 'भले, चांगले, कल्याण/कल्याणकारी, शुभ' असा काहीसा व्हावा. ('ही मुद्रा चांगल्याकरिता, भल्याकरिता, कल्याणाकरिता "राजते" = शोभते? चमकते? ("राज्य करते" असा अर्थ बहुधा नसावा. चूभूद्याघ्या.)) अन्य संदर्भांत त्याचा अर्थ बहुधा 'समृद्ध/समृद्धी, भाग्य/भाग्यवान, सर्वोत्तम' असाही व्हावा.

मात्र, 'भद्र'चा अर्थ कोणत्याही परिस्थितीत 'रयत/जनता' असा होतो असे वाटत नाही.

(बंगालीत 'भद्रलोक' हा शब्द काहीसा 'gentleman/gentlemen' अशा अर्थी वापरला जातो खरा, परंतु तेथेही तो नेमका 'रयत/जनता' अशा अर्थी लागू होतो, असे वाटत नाही. 'समाजातील प्रतिष्ठित' असा काहीसा अर्थ त्यातून प्रतीत होतो, असे वाटते. म्हणजे काहीसा मराठीतील 'श्रीमंत'सारखा. म्हणजे, साधारणतः पेशव्यांना उद्देशून 'श्रीमंत' ही उपाधी ज्या अर्थाने वापरली जात असे, त्या अर्थाने; 'पैसेवाला' अशा अर्थाने नव्हे. 'भद्रलोक'मध्ये रयत/सामान्य जनता समाविष्ट होत असावी, असे वाटत नाही. बंगालीतज्ज्ञांनी कृपया योग्य तो खुलासा करावा.)

>>“वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”

वाहीदातै.. अर्थाचा अनर्थ होतो ना गं..

मी ऐकलेला मूळ शेर असा आहे...

“गाज़ीयों मे बू रहेगी जब तलक ईमान की
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”

>>आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..!
हे मात्र पटलं

धमाल मुलगा's picture

3 Aug 2011 - 9:02 pm | धमाल मुलगा

ज़फर ह्यांच्या शेरातल्या पहिल्याच ओळीतला पहिलाच शब्द काय आहे?
"गाझी"
आता, गाझीचा अर्थ काय आहे? तर गाझीचा अर्थ आहे, 'मुस्लीम धर्मयोध्दा'! (अधिक माहितीसाठी गरजूंनी इंटरनेटावर वगैरे शोधाशोध करावी. )

तर मग शहेनशाह-ए-हिंदोस्ता बहादूरशाह ज़फर ह्यांच्या शेराचा अर्थ काय घ्यायचा?
इंग्रजांविरुध्द चाललेले युध्द हे हिंदोस्ताँ साठी होतं की धर्मयुध्द?
च्च च्च...माझा फारच गोंधळ उडतोय. कुणी जाणकार मदत करतील काय?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2011 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा

प्रथम तुंम्ही केलेल्या चुका सांगतो-
१)बहाद्दुरशहाला तबक पेश करणारे हुजरे म्हणतात-

''दुमदुमाए दम नही,अब खैर मांगो जान की
ए जफर ठंडी हुई,समशेर हिंदुस्तान की''...

बादशहा बाणेदारपणे उत्तरला-

''गाझीयोंमे बू रहेगी,जब तलक 'ईमान' की
तब तो लंडन तक चलेगी,तेग हिंदुस्थान की"...मूळ शेर व प्रसंग असा आहे.तो तुंम्ही अर्धवट व चुकीचा सांगितला.

२)यातील हिंदुस्थान हींदूंचाच असा संकुचीत अर्थ कधीच नव्हता,तो सर्वांचाच होता---आमचं म्हणणं असं की-हिंदुस्थान सगळ्यांचा होता याचा खरा अर्थ,तो कुणाचाच कधीच नव्हता...ब्रिटिशांची जुलमी राजवट आल्यानंतर तो पहील्यांदा एका कायद्या खाली एका छत्राखाली आला,त्यापूर्वी इथे फक्त शिवाजीमहाराज आणी काहीसा सम्राट अकबराचा अपवाद वगळता कुणीही सगल्या प्रजेला एका न्याय्य राजवटीखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला नव्हता.धर्म विरहीत राजकारण किंवा राज्यकारण या दोघांनीच केलेलं आहे,,,बाकी सगळे राजे आपापल्या धर्मांचे पाईकच होते...आणी राजकारणात धर्म पुरेपुर वापरत होते..तेंव्हा धर्माचं राजकारण चढलेलं नव्हतं...हा तुमचा मुद्दा भोंगळ व दिशाभूल करणारा आहे

३)इंग्रजांना दील्लीच्या बादशहाची गादी नष्ट करणे म्हणजे भारताचे अस्तित्व मिटवणे होते.---दील्लीच्या बादशहाची गादी म्हणजे भारताचे अस्तित्व हे वाक्य अतीशय निराधार आहे.अनाभ्यासूही आहे.

४)''अंग्रेजी हुकुमत को--इथपासुन ते--फसादी माहौल पैदा करे'' इथ पर्यंतचं आपलं विधान माझ्यावर अप्रत्यक्षपणे उलटा आरोप कर णारं असलं तरी प्रत्यक्षात ते तुंम्हालाच अडचणीत आणून हास्यास्पद बनविणारं आहे...अहो बाई,तुमच्या-म्हणजेच तुंम्ही म्हणता- त्या,...त्या काळातल्या बाहाद्दुरशहाच्या आणी इंग्रजांच्या राजवटीत फरक असा कीतीसा होता हो?(म्हणुन तर मोरे सरांनी त्यांच्या पुस्तकात एके ठीकाणी विवेचन करताना अस सूचकपणे म्हटलय- की एक राजवट जाउन,दुसरी राजवट येणे हा हिंदूंसाठी फक्त "मालक" बदल होता.)आपको एसा कहना है क्या,की जो वजूद था वो ''वजूद'' बची हुई बगैरमुस्लिम जनता के लिये बडा अच्छा था उसमे उनकी गुलामी नही थी?...मुझे बताइये उस वजूद की बुनीयाद क्या थी?...और आप जैसे हिंद के निवासी एसा शक क्युं करते है,के हमे फसादी माहौल तय्यार कर रहे है?सच को सबके सामने लाना फसादके बराबर है?या फसाद मिटाने की तरफ बढाया हुआ पहला कदम?आप क्या मानती हो?

५)आणी-''हिंद भूमी के निवासी"...हे शेवटचं सुभाषीत,...लिहीणाय्रानी कीतीही चांगल्या उद्देशानी लिहिलेलं असो,आणी तुंम्ही ते उध्रुत केलेलं असो...ते निव्वळ भावनीक स्वरुपाचं आहे...व्यवहारात सर्व जण इच्छेनी/अनीच्छेनी/नाइलाजानी/लबाडीनी(ही)स्वत:चा धर्म/जात पाळुनच जगत आहेत,आजचा भारत फुटीर आहे...आणी त्यातुनही तुंम्ही खय्राखुय्रा भारतीय आहात,व आमच्या सारखे निष्कारण संशय घेतात असं मानत असाल तर भारतीय असण्याच्या मुलभूत किंवा किमान अटी काय आहेत त्या मला सांगा?नुसतं वंदे मातरम/ हमारा हिंदोस्था वगैरे म्हणुन काहीही होत नसतं...

अता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या-

१)हे स्वातंत्र्ययुद्ध कुणाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी होतं?
२)ह्या स्वातंत्र्ययुध्दाची सुरवात म्हणजेच बीजरोपण कुणी व कधी आणी का केले?
३)बाहाद्दुरशहा जफरची राजवट न्याय्य/लोकशाहीवादी होती का ती इस्लामी मुल्यांवर आधारीत होती?आणी असेल तर इस्लामी मुल्याधारीत राजवट लोकशाही वादीच असते असं तुमच म्हणणार का?
४)आणी ज्या ईमानची तुंम्ही बाजू घेता ते इमान इस्लामिक मुल्यांशी बांधील असलेलं इमान आहे/का लोकशाही वादी मुल्यांशी बांधील असलेलं इमान आहे?तुमचा अंदाज काय?
५)आणी इस्लामिक असो,हिंदू असो,शीख असो वा ख्रिश्चन असो,कींवा आणखी कोणत्या धर्मातनं आलेलं ईमान असो...ते कधीतरी लोकशाही वादी/भारतवादी/एकात्मदेशवादी असू शकतं का?आणी असल्यास कसे ते सांगा?

अवांतरः-वस्तुतः मी प्रतिक्रीयेत मोरे सरांच्या पुस्तकाचं दिलिलं नाव व त्यापूर्वीचा संदर्भ हा निव्वळ माहीती देण्याच्या स्वरुपाचा होता...त्यात कुठलाही अन्य हेतू नव्हता... एइतिहासिक सत्य उजेडात आणणं हे राष्ट्र्हिताचं काम अशी आपली आमची कल्पना...असो,कुणाला कसं लागावं हे काही आपल्या हातात नाही,तेंव्हा आलीया भोगासी असावे सादर...या उक्ती नुसार एवढं तरी उत्तर दीलच पाहीजे म्हणून हा प्रतिक्रीया प्रपंच...

आपला-पराग भारतीय...

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2011 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll

..ब्रिटिशांची जुलमी राजवट आल्यानंतर तो पहील्यांदा एका कायद्या खाली एका छत्राखाली आला,
असहमत. आमच्या मते भारत राजकीयदॄष्ट्या एक नव्हता इतकेच खरे आहे. सांस्कृतिकदृष्ट्या भारत एकच होता. म्हणूनच "विद्वान सर्वत्र पूजयेत" वगैरे सारखी सुभाषिते अस्तित्वात होती. म्हणूनच भारतभरात कुठेही अंत्येष्टी करताना देखील मृतदेहावर दर्भाने तीन रेघा मारायची पद्धत सर्वत्र दिसते.
अकबर बादशहाने स्वतःच्या दिन-ए-इलाही नावाच्या धर्माची किंवा पंथाची स्थापना केली होती असे ऐकिवात येते. असे धर्म पंथ इस्लामला मान्य आहेत का नाही हे माहीत नाही.

असो. दिवकरांच्या प्रतिसादातील एकूण भावनेशी सहमत आहे.

तसेच तो एकात्मतेकडे जाण्याचा मार्गही नव्हे.सांस्क्रुतिक ऐक्य हे त्या त्या संस्क्रुतीपुरत आणी तेही मर्यादीत अर्थानी ऐक्य असतं... फारफार तर त्याला मानवतावादी ऐक्य म्हणता येइल.पण तेही राष्ट्रीय ऐक्याला फारसं उपकारक असत नाही.ते कामचलाऊ स्वरूपाच असतं.आणी भारतात परस्पर विरोधी तसेच भिन्न संस्क्रुती अनेक आहेत,त्याचे काय?

''विद्वान सर्वत्र पूज्यते'' या वचनाची पार्श्वभूमी सुभाषित स्वरूपाची नाही.ते स्म्रुती/सूत्र ग्रंथातलं वाक्य आहे.त्याचा वापर जातपात न बघता झालेला असला तरी तात्वीक द्रुष्ट्या तो अर्थ उपमर्दकारक व विषमता वादी आहे...आणी ही अवस्था या एका वचनाची नाही,सगळ्या ''चांगल्या" वचनांची हीच हालत आहे...'यत्र नार्यस्तू पूज्यंते' प्रमाणेच...तेंव्हा त्याचा हवाला देण चूक आहे.आणी दर्भाने तीन रेघा मारायची पद्धत दिसते त्याच कारण धार्मिक आहे...काही गोष्टी वैदीक संस्क्रुतीतल्या मूळ तर बाकी ज्या सार्वत्रीक आणी जनमान्य दीसतील त्याची ऊचल हे त्यामागचं कारण आहे.तो ऐक्याचा आधारही नाही,पुरावाही नाही.

अकबर हा स्वभावतः उदारमतवादी व काहीसा राजकीय द्रुष्ट्या चलाखही होता.या दोन्हीचा उत्तरोत्तर त्याच्यावर होत गेलेला परीणाम म्हणजेच त्याने आयुष्याच्या शेवटा शेवटात स्थापन केलेला दीन-ए-इलाही हा धर्म.याचं मूळ जरी इस्लाम सारखं दीसत असलं,तरी तो एक मानवतावादी धर्म होता.सदसदविवेक बुद्धी व निरनिराळ्या धर्मातल्या चांगल्या तत्वांचा विवेकपूर्ण वापर हा दीन-ए-इलाही चा गाभा होता.पण त्याकाळीही जातवाद /सनातनी धर्म मूल्य सोडून कोणीही या धर्माकडे आक्रुष्ट होउ शकले नाही...अकबराचे काही निकटवर्तीय सोडलेतर दीन-ए-इलाही ला अनुयाइच फारसे मिळाले नाहीत.हिंदु/मुस्लिम/इसाई पंडीत अकबराशी इबादतखान्यात(सर्व धर्म चर्चा ग्रुह) चर्चेला येत,पण आपला मूळ धर्मच कसा चांगला आहे, ''हे'' अकबरच्या माथी मारण्यात त्यांना रस होता...त्यामुळे या धर्माला इस्लाम्ची मान्यता तर नव्हतीच...पण इतरही कुणी याला जवळ केले नाही.अगदी राजा मानसींग हा अकबराचा मित्र ही एकवेळ इस्लाम स्वीकारतो,पण दीन -ए-इलाही नको म्हणत होता तीथे इतरांची काय कथा?...कुणालाही हा धर्म नको होता याचं कारण एकच होतं,,,त्यातला मानवतावाद आणी आधुनिक समतावादी मुल्य...लोकांना हेच नको होतं...अकबराचा धर्म त्याच्या सारखाच जोरात आला आणी गेलाही. एखाद्या मातेला सुपुत्र होण्याचं स्वप्न पडावं तो तसा तीच्या पोटात वाढावाही, पण जन्माला मात्र तो म्रुतवत यावा,असं काहीसं दीन-ए-इलाहीचं नशीब होतं...असो प्रतिक्रीयेच्या निमित्तानी आमचीही आज बरीच उजळणी झाली,त्यामुळे त्याचा तुंम्हाला (पु.पे) धन्यवाद...जय हिंद

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2011 - 5:37 pm | llपुण्याचे पेशवेll

तसेच तो एकात्मतेकडे जाण्याचा मार्गही नव्हे.सांस्क्रुतिक ऐक्य हे त्या त्या संस्क्रुतीपुरत आणी तेही मर्यादीत अर्थानी ऐक्य असतं... फारफार तर त्याला मानवतावादी ऐक्य म्हणता येइल.पण तेही राष्ट्रीय ऐक्याला फारसं उपकारक असत नाही.ते कामचलाऊ स्वरूपाच असतं.आणी भारतात परस्पर विरोधी तसेच भिन्न संस्क्रुती अनेक आहेत,त्याचे काय?
तसच राष्ट्रीय ऐक्य म्हणावं तर ते आम्हाला आताही आहे असे वाटत नाही. फारतर स्वातंत्र्य मिळवण्यापुरतं सगळे लोक एकत्र आले (जसे पूर्वी चंद्रगुप्ताच्या छत्राखाली एकत्र आले होते तसं) एखादे मोठे आक्रमण भारतावर पुन्हा एकदा झाले तरच या दाव्यात किती दम आहे हे पुन्हा एकदा लक्षात येईल. सांस्कृतिक ऐक ब्रिटीश येण्यापूर्वी होतेच. अंत्येष्टी मधला एक संस्कार हे वानगीदाखल दिलेले उदाहरण होते. अशा अनेक गोष्टी दिसतील उदा. पंचायतन पूजा . आणि अशी सांस्कॄतिक एकता होती म्हणूनच त्या काळातही काशीला धर्मपीठ म्हणून सर्व भारतभर मान्यता होती. राहीला प्रश्न भिन्न संस्कृतींचा तर मूळ धागा समान राहूनही वातावरणाप्रमाणे घडलेल्या संस्कॄती असल्याने त्यात विविधता अपरिहार्य आहे. कोकणातला माणूस केवळ राजापुरी पंचावर राहू शकत असेल म्हणून त्या प्रकारे उत्तरेतला माणूस तसा राहू शकत नाही. कारण थंडीमुळे ते शक्यही नाही मग तिथल्या वेषभूषा वगैरे तिथल्या वातावरणानुसरच येणार. परंतु मूळ सांस्कॄतीक गाभा संस्कार भारतभरात बहुतांशी सारखेच दिसतात.


आणी ही अवस्था या एका वचनाची नाही,सगळ्या ''चांगल्या" वचनांची हीच हालत आहे...'यत्र नार्यस्तू पूज्यंते' प्रमाणेच...तेंव्हा त्याचा हवाला देण चूक आहे.

असा हवाला देण्यात काहीही चूक नाही कारण याप्रकारची पद्धत किंवा अनेक पद्धतींमधले बदल मुसलमानी अंमलामधे बायका मुली पळवणे सुरु झाले म्हणून आली.
बाकी अकबराच्या दिन-ए-इलाही बद्दल बोलायचं झालं तर अकबर स्वार्थी होता म्हणून त्याचा धर्म बिर्म कोणी ऐकला नाही अशा गोष्टी निस्वार्थी माणसाच्याच ऐकल्या जातात.

नितिन थत्ते's picture

5 Aug 2011 - 5:59 pm | नितिन थत्ते

>>मुसलमानी अंमलामधे बायका मुली पळवणे सुरु झाले

काय सांगता? :O

असो. 'ते यत्र नार्यस्तु' किंवा न 'स्त्री स्वातंत्र्यमर्हते' मनुस्मृतीतलं आहे. आणि मनुस्मृती लेटेस्ट इ स २०० मधली म्हणजे अरबस्तानात इस्लामचा उदय होण्यापूर्वीची आहे. [आणि ती सहाव्या शतकापासून म्हणजे इस्लाम भारतात यायच्या आधीपासून कोणताही बदल न झालेली आहे.]

पंगा's picture

5 Aug 2011 - 11:15 pm | पंगा

(रामायण ही सत्यकथा आहे की निव्वळ कपोलकल्पित काव्य आहे या वादात शिरू इच्छीत नाही, पण) रावणाने सीतेचे जे 'हरण' केले, ते Do-a-deer-a-female-deer-छापाचे नसावे, अशी शंका आहे.

(रामायण हे निव्वळ काव्य आहे असे जरी मानले, तरी याचा अर्थ एवढाच व्हावा, की ही (दुसर्‍यांच्या बायका पळवण्याची) कन्सेप्ट आपल्याकडे पूर्वापारपासून होती, टेक्निकल नो-हाउसुद्धा होता*. फक्त, रामायण हा त्याच्या इंप्लिमेंटेशनचा पुरावा होऊ शकत नाही, त्याकरिता अधिक शोध घ्यावा लागेल.)

अवांतर: मनुस्मृती ही रामायणाच्या मानाने बर्‍यापैकी अलीकडची असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

* (कदाचित, 'जे-जे काही म्हणून विकसित होते, ते-ते इतरांनी आपल्याकडून उचलले', या तत्त्वास अनुसरून, हे तंत्रज्ञानसुद्धा 'त्यांनी' आपल्याकडून उचलले असावे काय?)

सुनील's picture

6 Aug 2011 - 7:25 am | सुनील

रामायण हे निव्वळ काव्य आहे असे जरी मानले, तरी याचा अर्थ एवढाच व्हावा, की ही (दुसर्‍यांच्या बायका पळवण्याची) कन्सेप्ट आपल्याकडे पूर्वापारपासून होती, टेक्निकल नो-हाउसुद्धा होता*.
असेच काहीसे द्रौपदी वस्त्रहरणाबाबतदेखिल म्हणता येईल काय, की विनयभंगाची कन्सेप्ट आणि नो-हौ आपल्याकडे पूर्वीपासून होते?

पंगा's picture

6 Aug 2011 - 11:59 pm | पंगा

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2011 - 7:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पंगा आणि सुनीलशेटना साष्टांग नमस्कार.

सुनील's picture

7 Aug 2011 - 7:42 am | सुनील

(रामायण-महाभारत यांतील परंपरेला साजेसा आशीर्वाद द्यावा काय?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2011 - 8:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा आशीर्वाद किती 'फळ'तो याबाबतीत मी साशंक आहे, त्यामुळे द्या तुम्ही बिनधास्त आशीर्वाद!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2011 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा

संस्क्रुतीप्रेमी लोकांचं हे पक्क ग्रुहीतक असतं...की आपल्या धर्मात परंपरेत संस्क्रुतीत मूळात काही(ही) चूक नसतं,,,तुंम्ही ऐतीहासीक पुरावाच दीला.त्यामुळे कामच झालं...धन्यवाद नितीनजी

परागजी,

ऐसा लगता है, तुम्हें हमारे बारेमें या हमारे रेप्लाय के बारेमें कोई गलतफहमी हैं.

शायद हमारा इल्म इस जंग के बारेमें कम होगा लेकीन तुम्हारे बारेमें हमने कतई यह नहीं सोचा के तुम खुद एक फसादी माहोल पैदा कर रहे हो.

यहां मिपापर फसादी चुन चुन कर भरे पडे हैं, जीन फसादीयोंने गौर करना था बदकिस्मती उन्होंने उसके बारेमें सोचा भी नहीं, न जाने तुमने अपने उपरही क्यूं ले लिया ? प्लिज !

खैर, अब रमझान रोजे की गडबडी हैं ऑर हमारे ऑफीस के कामसे हमें फुरसत नहीं मिलती के हम चंद लम्हें मिपापर गुजारें.

हमारे वजह से तुम्हें कोई चोट पहोंची हो तो यकीन मानिये हमारा वोह इंटेन्शन नहीं था (तुम्हें क्यूं बुरा लगा हम नहीं जानते.)

बादमें फुरसत में जरुर बातें होंगी ! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2011 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

फुरसत में बातें जरूर करेंगे...

धन्या's picture

7 Aug 2011 - 5:32 am | धन्या

@ वाहीदा - आपने जो भाषा इस्तेमाल की हैं वो हिंदी हैं क्या उर्दू हैं?

हमने पाचवीसे सातवीतक हिंदी सिखी हैं. (फीर बादमें हमने आठवीसे संस्कृत लिया.) तो उसमें कहीभी कतई, इल्म, फसादी ऐसे शब्द नही होते थे. मतलब वैसे तो सब वाक्य "यह गमला हैं, वह गमले हैं" ऐसेही रहते थे. और आजकल के जो हिंदी सिनेमा हम देखते हैं उसमेभी ऐसी हिंदी नही होती.

सिर्फ एक जंग शब्दही हमने पहचाना. क्योंकी वोह बहुत हिंदी पिच्चरोंके नाममे होता हैं.

हमारा यह प्रतिसाद मराठी अनुवादीत हिंदी (या फीर इंग्रजी अनुवादीत हिंदी, कैसाभी) ऐसा हैं. और हमने सिर्फ जाननेके लिये लिखा हैं. कृपया गलतफहमी मत किजीये. (गलतफहमी इस शब्द के लिये धन्यवाद. हम तो जबसे हिंदी बोलने लगे हैं तबसे गलतफॅमिली ऐसाही बोलते थे)

ऋषिकेश's picture

3 Aug 2011 - 1:19 pm | ऋषिकेश

माहितीबद्दल धन्यवाद! पुस्तक मिळाल्यास नक्की वाचेन.
मात्र डुकराच्या चरबीची काडतुसे वगैरे गोष्टी भंपक आहेत असा तुमचा दावा आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2011 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

मी एक बय्रापैकी वाचक आहे,अभ्यासक वगैरे नाही.मला फक्त सत्य उजेडात आणणे आवश्यक वाटले...ते मी आणले.तरीही सांगतो,''काडतुस-चरबी'' हे एक अनुषंगिक कारण आहे .तशी इतरही अनेक कारणे आहेत...मोरे सरांच्या ग्रंथातही या सगळ्याचा नीट उहापोह केलेला आहे, तो वाचावा.

धमाल मुलगा's picture

3 Aug 2011 - 9:11 pm | धमाल मुलगा

>>''काडतुस-चरबी'' हे एक अनुषंगिक कारण आहे .तशी इतरही अनेक कारणे आहेत...
+१

केवळ चरबीमुळे धर्मभ्रष्टतेच्या भितीमधून संपूरण उठाव होणे शक्य आहे का ह्याचा प्र्याक्टिकल विचार केला तर ते अशक्य वाटते. हां, सुरुवात करायला म्हणून निमित्त ठरणे हे मान्यच आहे.

अर्थात, ऋष्याच्या मुळ मुद्द्याकडे दुर्लक्ष न व्हावे, की धार्मिक भावना दुखावणे कसे धोकादायक ठरु शकते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Aug 2011 - 9:30 am | विश्वनाथ मेहेंदळे

काडतूस हे तात्कालिक कारण होते, त्यामुळे फक्त ठिणगी पडली हे शाळेत जितक्या वेळेला १८५७ वर धडा होता तितक्या वेळेला स्पष्टपणे लिहिले होते. शिवाय उठावाची कारणे लिहा असा प्रश्न होता आणि त्याला संस्थाने खालसा केली, भारतीय सैनिकांना इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार होता वगैरे वगैरे १०-१२ कारणे लिहावी लागत.

असे असून सुद्धा इथे परत त्यावर चर्चा व्हावी याचे आश्चर्य वाटते.

रणजित चितळे's picture

4 Aug 2011 - 1:29 pm | रणजित चितळे

''काडतुस-चरबी'' हे एक अनुषंगिक कारण आहे

१८५७ चे स्वातंत्र्य समर पण असेच म्हणते.

धमाल मुलगा's picture

4 Aug 2011 - 1:51 pm | धमाल मुलगा

'१८५७ चे स्वातंत्र्यसमर' ह्याचा मूळ हेतू थोडा वेगळा होता असे वाचल्याचे स्मरते.
१९०८/०९ मध्ये जन्माला आलेलं हे लेखन स्वातंत्र्यलढ्यासाठी जनामनात स्फुल्लिंग चेतवण्यासाठी प्रामुख्याने लिहिलं गेलं होतं असं आठवते.
(विषयांतर होत असल्यास खव/व्यनि/फोनवर गप्पा मारुया :) )

जाऊ द्या खाऊ द्या हो.. त्यात काय एवढं चिडायचं?

तुम्ही कधी शिरखुर्मा खाल्ला नाहीत का? मस्त असतो..
:) :) :)

चिरोटा's picture

3 Aug 2011 - 11:09 am | चिरोटा

निर्णय नीट वाचला(http://www.milligazette.com/news/1798-conditions-of-prisoners-in-jails )
सामनाची नेहमी प्रमाणे थापेबाजी आहे.
हायकोर्ट आणि जेल मॅन्युअल प्रमाणे कैदींना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करायला मोकळीक आहे. मॅन्युअलनुसार रमझानच्या काळात ३० दिवस (मुस्लिम)कैदी फळे वगैरे मागवू शकतात. ह्याचा खर्च कैदींनी करावा असे आहे. अनेक कैदी गरीब असल्याने त्याचा खर्च धार्मिक संस्था करतात्.सरकार् नव्हे. . ह्या धार्मिक संस्थांच्या अन्न पुरवायच्या मागणीकडे तुरुंगाधिकारी जाणूनबुजुन किंवा सुरक्षेच्या कारणास्तव दुर्लक्ष करतात.
न्यायालयाचा निर्णय ह्या दुर्लक्ष करण्यासंबंधीत आहे. सरकारने खर्च उचलावा असे म्हंटलेले नाही.
गणेशोत्स्वाच्या काळात उकडीचे मोदक, दिवाळीच्या काळात लाडु, करंज्या धार्मिक संस्था कैद्यांना देवू शकतात

आमच्या आवडत्या 'संध्यानंद' ला सामना आणि विवेक च्या रांगेत बसवल्याबद्द्ल जाहिर णिषेध.

बाकी लिंक नाही म्हणून अमान्य करायचे का? सोयिस्कर पत्रकारिता विसरता का?

प्रतिक्रिया लिहीपर्यंत वरची प्रतिक्रिया बदलली गेली असली तरी आमची प्रतिक्रिया तीच राहील.

सुनील's picture

4 Aug 2011 - 10:29 am | सुनील

सामनाची नेहमी प्रमाणे थापेबाजी आहे
द्विरुक्ती केल्याबद्दल णिषेध!

हुप्प्या's picture

7 Aug 2011 - 1:33 am | हुप्प्या

निव्वळ सामनाच नव्हे तर अन्य वृत्तपत्रांनी हेच म्हटले आहे. आपण दिलेल्या लिन्केत मुंबई न्यायालयाने काय म्हटले ह्याचा आजिबात उल्लेख नाही.

http://www.dnaindia.com/mumbai/report_be-good-to-prisoners-during-ramzan...

http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-08-02/mumbai/29841776_1...

http://www.afternoondc.in/city-news/give-appropriate-ramzan-food-to-pris...

court had directed the state government to consider providing non-vegetarian food to prisoners at least once a week and eggs for breakfast.

कुठल्याही बातमीत असे लिहिले नाही की ह्याचा खर्च कुठली तिसरी व्यक्ती वा शक्ती करणार आहे. तुम्ही अमके पुरवा, तुम्ही फळे व मांसाहाराची सोय करा असे न्यायालयाने तुरुंगाच्या अधिकार्‍यांना बजावले आहे. उगाच काहीच्या काही लिहू नका.
वरची सगळी वृत्तपत्रे दूधखूळी आणि तुम्ही तेव्हढे खरे असे तुम्हाला वाटते काय?
सामन्याच्या लेखात अतिरंजितपणा आहे पण तो वस्तुस्थितीला सोडून नाही.
खरे तर तुरुंग वाल्यांनी रमझान मधे रोझे पाळू द्यावेत आणि वेळ झाली की तुरुंगाचे नेहमीचे खाणे द्यावे. हे मांसाहार आणि अन्य चोचले पुरवायची जबाबदारी तुरुंगाची कशी काय बुवा?

सुनील's picture

3 Aug 2011 - 11:13 am | सुनील

रमझान सुरू झाल्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! एकाद्या संध्याकाळी महंमद अली रोडची वारी करायला पाहिजे!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Aug 2011 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

परवाच महंमद अली रोडवर एक कट्टा करायची योजना आखत होतो. कोण कोण येणार?

रामदास आणि तात्या यांना नाही आले तर उचलून नेऊ. काय म्हणताय?

सुनील's picture

3 Aug 2011 - 12:15 pm | सुनील

सहमत!

रामदास आणि तात्या यांना नाही आले तर उचलून नेऊ
तात्यांना "अंमळ" कठिण जाईल असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Aug 2011 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

करू व्यवस्था! ;)

श्रावण मोडक's picture

3 Aug 2011 - 8:01 pm | श्रावण मोडक

वजनं पेलायची सवय आहेच तुम्हाला नाही तरी. ;)

कुंदन's picture

3 Aug 2011 - 12:36 pm | कुंदन

तात्या येणार असेल , तर मला पण कळवा रे.
त्याच्याकडुन पार्टी घ्यायची आहे.

अरेरे..... तु श्रावण मोडणार?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Aug 2011 - 5:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>कोण कोण येणार?
मी येणार. नक्की कळवा, जाल तेव्हा.

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2011 - 11:58 am | JAGOMOHANPYARE

ईद मुबारक...

मदनबाण's picture

4 Aug 2011 - 9:35 am | मदनबाण

हुप्प्या हे कसं वाटतं बघ ? कसाबला बिर्याणी तर कैद्यांना शिरखुर्मा ! ;)

हुप्प्या's picture

7 Aug 2011 - 1:35 am | हुप्प्या

हे सगळे खाणे कुठल्या छिद्रातून आत सारायचे हे निवडायची तुरुंग अधिकार्‍यांना पूर्ण मुभा द्यावी मग काहीही खिलवा. अगदी शीग कबाबही!