अजून एक अतिरेकी जमात!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
1 Aug 2011 - 6:06 pm
गाभा: 

ही बातमी पहा.
http://www.saamana.com/2011/August/01/Link/Mumbai15.htm

मेधा पाटकर ह्यांचे समर्थक आणि विरोधक त्यांना मनुवादी, हिंदुत्ववादी म्हणणार नाहीत. परंतु त्यांनी असे एक विधान केले की संविधान म्हणजे काही होली काऊ नाही त्यात बदल, सुधारणा होऊ शकतात.
त्यावर हे कुणी विष्णू शिंदे खवळून उठले. त्यांना त्यात मेधा पाटकरांचा "छुपा मनुवाद" दिसला.

हा अतिरेकीपणा कशाला? केवळ आंबेडकरांनी लिहिली आहे म्हणून भारतीय घटना जणू देवानेच लिहिली आहे असे मानायचे आणि त्यात बदल करायची सूचना करणार्‍यांनाही झोडपायचे हा काय मूर्खपणा आहे? कुठल्याही प्रगत देशाची घटना वेळोवेळी बदलली जाते त्यात सुधारणा होतच असतात.

आंबेडकर हे दलितांचे नेते होते ह्यात शंका नाही पण म्हणून त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लिखाणाला धर्मग्रंथ मानण्याचा खुळचटपणा का बरे चालू आहे?

हा विष्णू शिंदे म्हणजे फार प्रसिद्ध माणूस आहे, त्याच्यामागे फार मोठी शक्ती आहे असे नाही पण असले प्रकार वाढत आहेत हे घातक आहे. आणि अर्थातच आंबेडकरांना मानणारा (निवडणुकीच्या दृष्टीने) एक महत्त्वाचा अल्पसंख्य गट असल्यामुळे त्याविरुद्ध बोलण्याची कुठल्या राजकीय पक्षाची हिंमत होणार नाही. त्यामुळे ह्या काट्याचा नायटा होऊ नये अशी आशा!

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

1 Aug 2011 - 6:17 pm | फारएन्ड

मलाही आश्चर्य वाटले. मग ९४ अमेंडमेट्स केल्या ते काय होते?

पाटकरांनीही होली काऊ हा सर्वसामान्य भारतीय ज्याच्याशी अपरिचित आहेत तो शब्द का वापरला कळत नाहीत. त्यातही माझ्या मते सॅक्रीड काऊ हा जास्त बरोबर आहे. होली काऊ आजकाल इतरच अर्थाने वापरलेला दिसतो.

सूर्यपुत्र's picture

1 Aug 2011 - 6:37 pm | सूर्यपुत्र

:(

अवांतर : "चर्चा" यावर क्लिकले असता, अजून एक अतिरेकी जमात! : मुम्बईतील मिपाकर असे वाचले.....
;)
(मेलो.... ठारलो...... पळा आता....)

-सूर्यपुत्र.

५० फक्त's picture

2 Aug 2011 - 12:26 am | ५० फक्त

आता तर ' अजुन एक अतिरेकी जमात! : मुम्बईतील मिपाकर - फक्रुद्दिनची व्यथा ' असं एका खाली एक दिसतंय,

आंबेडकरांनी त्या काळाला अनुरूप अशी घटना लिहिली होती.
त्यात बदल करायलाच हवेत.
फक्त ते केले की बहुजन समाजाची प्रगती थांबली असा अर्थ होत नाही.
पण वाद घातले नाहीत तर मग राजकारण कसं चालणार?

बाबासाहेबांचं योगदान हे "घटना समिती" का "मसुदा समिती"चे अध्यक्ष म्हणुन नक्कीच मोठे आहे.
त्यांनी एकट्यानी असं काहीही केलेलं नाही घटनेबाबत. कित्येकदा त्यांच्या नावाने बोटे मोडाणारेही हे विसरतात की घटना समितीत इतर सदस्य होते. घटना ही तत्कालीन संसदेने आणि लोकनियुक्त व्यवस्थेने स्वीकारलेली होती.
बाकी चालु द्यात.

--मनोबा

शाहिर's picture

1 Aug 2011 - 8:00 pm | शाहिर

तुमच्या नावा मधेच मनु वाद आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2011 - 8:08 pm | बिपिन कार्यकर्ते

भारतियांची आंधळी व्यक्तीपूजा काही संपणार नाही हेच खरं...

०१. काही आठवड्यांपूर्वी आयबीएन-लोकमतवर अण्ण हजारेंची जाहिर / लाइव्ह मुलाखत झाली होती. त्यात एका प्रेक्षकाने दूरध्वनीवर असे विचारले की दलितांमधे असे पसरवले जात आहे की बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या बाहेर जाऊन तुम्ही काही मागत आहात इत्यादि... त्यावर अण्णांचे उत्तर तर अजूनच मजेशीर. "बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलण्याचा आम्ही विचारदेखिल करू शकत नाही..." वगैरे...

०२. आजच एका इंग्रजी मासिकाच्या जुन्या अंकात वाचले : कॉम्रेड ज्योती बसू यांचे देहावसान झाल्यावर त्यांचे शरीर वैद्यकीय कारणासाठी वापरण्याकरता दान केले होते. तर ते ज्या वैद्यकिय महाविद्यालयाला देण्यास आले तेथील डॉक्टरांनी त्यांच्या पार्थिवाचे शैक्षणिक कारणाकरता विच्छेदन करण्यास नकार दिला. कारण हेच की, त्यांच्याबद्दल आम्हाला अपार श्रद्धा आहे आणि त्यामुळे आम्ही हे करू धजत नाही. तिथेच अजूनही काही कॉम्रेडांचे पार्थिव देह प्रक्रिया करून ठेवण्यात आल्याचाही संदर्भ त्या लेखात होता. वाचून गंमत वाटली.

बाबासाहेब नक्कीच मोठे होते. त्यांनी केलेलं कार्य केवळ एक दोन नव्हे तर लाखो लोकांचा उत्कर्ष साधून गेलं / साधत आहे / साधेल. पण म्हणून अशी आंधळी व्यक्तिपूजा त्याज्य आणि निषेधार्हच.

बाकी राजकारण वगैरे चालु द्या... त्यातूनही सुटका नाही हे ही आहेच.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार

भारतियांची आंधळी व्यक्तीपूजा काही संपणार नाही हेच खरं...

ह्या विधानाशी असहमत आहे, अत्यंत खेदजनक विधान.

काही भारतिय व्यक्तीपूजा, देवपूजा करत असतील देखील पण आमच्यात कुठल्याच पूजेला, कर्मकांडाला स्थान नाही. बाबासाहेबांना आम्ही मनाच्या देव्हार्‍यात बसवलेले आहे.

बाबासाहेबांनी अत्यंत विचारपूर्वक पुढच्या कमीत कमी १०० वर्षांचा विचार करुन घटना लिहिलेली आहे. त्यात बदल करण्याचा कोणाला अधिकार नाही, लायकी नाही आणि बुद्धी त्याहून नाही.

ह्या आधीची आमची पिढी अशिक्षित, समजापासून दूर असल्याने तिला फसवुन तुम्ही प्रस्थापितांनी घटनेशी आणि आमच्याशी फार खेळ केलेत पण आताची पिढी जागरुक झाली आहे. ह्यापुढे तुमची एकही चाल आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

जय भिम !

भारी समर्थ's picture

2 Aug 2011 - 1:40 pm | भारी समर्थ

ते ताम्हणकर ताम्हणकर म्हणतात ते तुम्हीच का हो? नाय, ते तुम्ही असाल तर एवढच सांगणं आहे की ’परा’कोटीचा सारकाझम बरा नोहे मिस्टर.

भारी समर्थ
आय से, तुम्ही माझी ही पहाणार असाल तर आधी आपले हे काळे करून घ्या.

प्यारे१'s picture

2 Aug 2011 - 2:49 pm | प्यारे१

हे बगा भारी नाय तं हलके जशे असाल तशे समर्त सायेब,

आमचे णेते माणणीय श्री पराजी यांणी जे पन काही म्हनलेले आहे त्याला आमचा पूर्न पाटीम्बा आहे.
आमी आम्ची मतं लोक शायी पद्धतीणं मांडत आलो हावोत. तुमचं जे काही ऑब्जेक्शण आसेल ते तुम्ही संध्याकाळी आमच्या नगरात येऊन मांडा.
गौतम बुद्धाणं मूर्तीपूजेला येकदम विरोध क्येला हुता. आमीबी क्येला. सगळे द्येव दगडं धोंडे देव्हार्‍यातणं उचलून फेकूण दिले. आता आमचे श्रद्दास्थाण गौतम बुद्द आणि आमचे आदर्श परम पूजणीय डॉ. बाबासायेब यांचा एक एक पुतळा आमी आमच्या घरात ठेवलेला आहे.
त्यंच्या चित्रावर जरी कुनी शाई उडवली तरी आमी त्यांचे मुस्काड रंगवतो. कार्न अहिम्सा हा आमचा धर्म आहे. तशे नसते तर त्ये व्यक्तिला जिवम्त ठेवलं नसतं.

जास्त वेळ घेत णाही. आपल्याला जे काही शंका आस्तील त्या तुम्ही आमच्या णगरात येऊन मांडा. आपन बसू, चर्चा करु. दवाखाणा जवळच आहे.

- जय भीम जय बुद्ध.

आयु. प्यारेलाल गायकवाड.

भारी समर्थ's picture

2 Aug 2011 - 5:42 pm | भारी समर्थ

तुमारे नेतेकु तुमारा (और तुमारे आख्खे ग्रुप का) पूरा पाठिंबा हमेशाच र्‍हयता उसके बारे मय कायको रे आब्जिक्शन खाउ...तुम दोनो कुचबी धिंगाणा घालो ना आपने को क्या उसका....

तुमारे नेता लोकशाइ में मानते ये सुनके अच्चा लगाना भौ. क्या हुवा बोले तो, मेरको लगा की इधर वो हमेशा आता तो इधरीच बात बोल डालता मय मेरा. खालीपिली मय तुमारे गली और तुम मेरी गली, सतरा चकरा कायको मारना.

अभी बाकी सब वो बुद्ध अउर आंबेडकर बाबा करके गएले वो पाचवी की पुस्तक में शिकीवत्यात ना. उन के बारे में कशाला कोन बोलतंय. तरीबी येक सांगाच गैक्वाड साब, तुमारा श्रद्दास्तान सिरफ येकच हाय आन तरीबी तुमच्या आंबेडकरी नेत्यांची तोंडं अलग अलग दिशेला का बरं हैत? मय बोलू क्या, तुमको अगर किसीको झोडनेका है ना तो पयले उनको पकडो.

अबी येक साधा सवाल पुचा तो तुम तुमारे नगर में बुलातेहो म्हणल्याव कैसे चलेगा राव. उत्तर नही देनेका तो मत देव ना लोकशाइ में अधिकार है तुमको उसका. आमीबी अल्लानंतर लोकशाइलाच मानतो.

बाकी हमारे नगर मे तुमको नय बुलाएगा राव आपुन. हमारा गण्या दंडुकेसे सबकी टिरीया सुजाता है. दवाखाना आसू नाय तर नसू तीन दिन आदमी बैट नइ सकता.

जांदो. अगले इलेक्शनमदी पोरं लागली तर सांगून ठिवा.

खुदा हाफीज.

बागवान चाचा

प्यारे१'s picture

2 Aug 2011 - 6:08 pm | प्यारे१

क्या चिच्चा आप भी?
अरे या हुच्चवर्नीय लोकांणी आपल्या मागास आनि अल्पसंक्य लोकांला वेगवेगळे णेहमीच ठीवले आहे. आता आपन आपले सगळे वेव्हार एकत्र करुण या भिकारी लोकांणा दाकवूण देऊ या की आपली ताकद काय आहे. (तुमच्या गल्लीतली झुबेदा चांगली हाय. पन त्यो वेगळा विषय आहे)

तुमी मला प्रश्ण केलाय (च्यायला टीव्हीवाल्या पोरी पन आपलंच शिकल्या बरं... 'प्रश्ण' म्हन्त्यात. शुद्द पयल्यापसणंच बोल्तो आपन) की आमच्या णेत्यांची तोंडं धा दिशेला का?
आता मी तुमाला प्रश्ण करतो. या हुच्चवर्नीय लोकांचा द्येव कोन? राम. आपन एक बी द्येव माणत नाय. आमची आन देवांची दुश्मणी. आपसुक आमचा आदर्श कोन हुतो? लंकाधिपती महाराज रावन. कोन? रा व न. त्येला त्वांडं किती? धा.
मग आमच्या णेत्यांणी त्येचा आदर्श ठीवला तर बिगाडलं कुटं?

बाकी चिच्चा तुमी तर लय गलतफैमी करुण घेतली की! आमी तुमाला इफ्तार प्यार्टी साटी बुलावलं. रोजे सुरु आहेत णा?
आमच्या दवाखाण्याच्या भाईर जेवडी सोच्च जागा हाय त्येवडी कुडंच मिळनार नाय म्हनून.

वाट बगतू. लौकर या. आमदार आनि आमचे णगरशेवक पन यनार आहेत.

आपकी इत्ती खातिरदारी की तयारी देक्खे तो मेरे तो डोलेमेच पानी आया राव. पारखने मे थोडा चूक्या तुमकु गैक्वाड भौ. अबी हम समदु:खी (समलिंगी नाही, ती रिकाम’टेकुं’ची थेरं), तो मय मेरे पुरे मुसलमानवाडे के साथ आयेगा. हमारा सवाल रदबातल कर दो, तुमको पुछेला और तुमारे नेते को पुछेला भी. लै पुणवान राव नेता तुमचा, काय सोन्यावानी मानसं जमीवल्येत.

जुबेदा का नाम निकाला और मयने तबीच समजा की तुमारा देव रावनच होना. दस त्त्वांडं तो था उसकू लेकीन तुमने उस्के इस डोल्याकाच गुन उचल्या राव. लै चालू चीजेत भौ तुमी तर....

भाबीकु सलाम बोलना हां.

तुमारा भाइ
बागवान चाचा
अरे, बागवान-गैक्वाड युतीचा विजय असो!

प्यारे१'s picture

3 Aug 2011 - 10:38 am | प्यारे१

>>>> तो मय मेरे पुरे मुसलमानवाडे के साथ आयेगा.

अब्बी आपको आपकी भाषा में बोलना होना मेरकु|

चिच्चा, आप नेता बनने के बिल्कुलईच काबिल नै | क्या के आप सब्कु साथ लेके चलने की भाषा बोल्ते ना चिचा |
इफ्तार आपके अकेले लिए रक्खा ना चिचा? बाकी लोगोंका कामच नै ना वहा| आप गुप्चुप आने का, खाने का और वट लेने का| कैसे आपसे कुच्च उम्मीद रख सकताय मै? कल कु आप बोलेंगे की पैसे भी मिलबाँट के खाता तो कैसा होता चिचा? ऐसे करु नक्को ना रे बुढाऊ|

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Aug 2011 - 8:38 pm | चेतन सुभाष गुगळे

व्यक्तिपुजा करायलाही हरकत नाही, पण निदान त्यांचे अनुकरण तरी पूर्णत: करा.

१. त्यांनी १६ / १८ तास कष्ट करून विदेशात उच्च शिक्षण घेतले.
२. त्यांचे छायाचित्र नीट पाहा, त्यात त्यांची मुद्रा प्रसन्न दिसतेय. चेहरा गुळगुळीत व स्वच्छ दाढी केलेली आहे. डोक्यावरील केस नीट विंचरून व्यवस्थित भांग पाडलेला. शर्टाच्या सर्व गुंड्या लावल्या असून त्यावर नेकटाय व कोटही परिधान केलाय.
३. मुद्देसूद व सौम्य आवाजात ते आपले बोलणे मांडत.

गंमत म्हणजे त्यांच्याशी संबंधित (जयंती / पुण्यतिथी / परिवर्तन दिन) उत्सवांमध्ये जे लोक मिरवणूकांत नाचत असतात त्यांच्यापैकी अनेक जण
१. अर्धशिक्षित / अशिक्षित असतात.
२. शर्टाच्या दोन चार गुंड्या तुटलेल्या अवस्थेत किंवा शर्ट नसून केवळ बनियन (गडद रंगाचा), दाढी अस्ताव्यस्त वाढलेली, केस विस्कटलेले व भांग तर दिसतच नाही (भलतीच भांग चढलेली असते).
३. कर्कश्श आवाजात ओरडत, मुन्नीच्या गाण्यावर गात ठेका धरत कसेही नाचत असतात.

ही व्यक्तिपूजा म्हणायची का? यापेक्षा मोठा अपमान तो दुसरा कोणता?

त्यांची खरंच व्यक्तिपूजा करायची असेल तर असे अजून शेकड्याने, हजाराने बाबासाहेब घडवा. केवळ त्यांचा समाजच नव्हे तर देशही प्रगतिपथावर जाईल.

निदान त्यांचे अनुकरण तरी पूर्णत: करा.
छे छे! ते कसं जमेल?
कष्ट आहेत त्यात!
स्वत:चा उत्कर्ष स्वत: च साधला तर काय मजा आहे का त्यात?
दुसर्‍यानी भरवला तरच घास गोड लागतो आम्हाला!

रेवतीताई अनेकांना स्वतःचा घास स्वतः खावासा वाटतही असेल. पण राजकारणीच कदाचित प्रश्न भडकाऊन ठेवत असतील. त्यामुळे सरसकट सब घोडे १२ % धरता येणार नाही असे वाटते.

* घोडे १२% ही म्हण म्हणून वापरली आहे त्यावर गदारोळ नको.
_______________

विष्णू शिंदे यांनी "तोंडास काळे फासण्याची" दिलेली धमकी अतिशय आक्षेपार्ह आहे. अतिरेकी स्वरूपाचीच ही धमकी आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला हवी खरं तर.

रेवती's picture

1 Aug 2011 - 9:56 pm | रेवती

मान्य.
सगळे तसेच नसतील.

:) ..... उडदामाजी काळे गोरे. पण हा प्रश्न सुटायला पाहीजे खरा.

क्लिंटन's picture

1 Aug 2011 - 9:29 pm | क्लिंटन

अजून एक अतिरेकी जमात!

म्हणजे यापूर्वीपासून कमितकमी एक तरी अतिरेकी जमात अस्तित्वात आहे असा तुमचा म्हणायचा अर्थ दिसतो. म्हणून -१

बाकी डॉ.आंबेडकरांना मी मानत असलो तरी राज्यघटनेत दुरूस्ती किंवा ती पूर्णपणे बदलून नवी राज्यपध्दती स्विकारणे यात आंबेडकरांच्या मोठेपणाचा अपमान होतो असे मला व्यक्तिश: अजिबात वाटत नाही.स्वत: आंबेडकर व्यक्तिपूजेच्या विरोधात होते आणि त्यांच्याच नावाने माजविलेले व्यक्तिपूजेचे स्तोम ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे.मोठ्या नेत्यांचा सर्वात मोठा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हेच खरे!! आणि तुमचे हे मत मान्य म्हणून +१

तिमा's picture

2 Aug 2011 - 11:40 am | तिमा

घटना वा कायदे बदलून सुध्दा या देशात काही बदल होणार नाही. लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. लहानपणीच प्रत्येक मुलाला, समंजस नागरिक बनण्याच्या दृष्टीने शिकवण दिली पाहिजे तर निदान पुढच्या पिढीनंतर काही बदल दिसू लागतील.

हा विष्णू शिंदे म्हणजे फार प्रसिद्ध माणूस आहे, त्याच्यामागे फार मोठी शक्ती आहे असे नाही पण असले प्रकार वाढत आहेत हे घातक आहे. आणि अर्थातच आंबेडकरांना मानणारा (निवडणुकीच्या दृष्टीने) एक महत्त्वाचा अल्पसंख्य गट असल्यामुळे त्याविरुद्ध बोलण्याची कुठल्या राजकीय पक्षाची हिंमत होणार नाही.
व्यक्तीपुजेचा फायदा राजकारण्यांसाठी फार लाभाचा होतो... आणि मिळेल ती संधी ते (राजकारणी) कधी सोडणार नाहीत...
आता एक ताजेच उदाहरण पहा ना :--- दादर स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न !
दादरला बॉब्मस्फोट घडु नये यासाठी मात्र हेच राजकारणी काही "निर्णायक" पावले उचलणार नाहीत... कारण त्यांना नामांतराचे राजकारण खेळण्यात रस आहे...जनतेचे रक्षण हा मुद्दा गौण झाला.
राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे आहेत्...त्याच राज्यात बलात्कार/दरोडे/घरफोड्या यांची कमी नाही. :(
असो... हिंदुस्थानी जनता जो पर्यंत विकासाच्या आधारावर मतदान करायला शिकत नाही तो पर्यंत हे सर्व असेच चालत राहणार ! :(

जाता जाता :--- सध्या "आरक्षण" हा चित्रपट प्रदर्शन करण्यास विरोध होत आहे. या विषयावर लवकरच वर्तमानपत्र/वृत्त वाहिन्या भरभरुन माहिती देतील.

स्वर भायदे's picture

3 Aug 2011 - 9:47 am | स्वर भायदे

घटना पूर्ण बदलयाची झाली तर घटना समितीचा अध्यक्ष कोणाला करवा ?
१) दिग्विजय सिंग
२) कपिल सिब्बल
३) राहूल गांधी
.....यावर कौल फोडाव असं म्हणतोय

चेतन सुभाष गुगळे's picture

3 Aug 2011 - 11:22 am | चेतन सुभाष गुगळे

फार मोठी दुर्घटना होईल.