तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ?
मी असा विचार अधून मधून करत आलेलो आहे, आणि अश्या याद्या रोजनिशीत बनवल्याही आहेत, परिणामी कधीतरी का होइना, त्यातील बर्याचश्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्याही आहेत. उदहरणार्थ, कालिंजर चा किल्ला बघणे, लूव्र व वर्साय बघणे, विजयनगर - हंपीच्या अवशेषात पाच-सात दिवस पायी भटकणे वगैरे.
या झाल्या आवडीच्या गोष्टी, परंतु अशी यादी काही कर्तव्यांच्या बाबतीत केली नाही, याचे वैषम्य वाटते.
उदाहरणार्थ, मी आठ दहा वर्षांचा असल्यापासून माझी आई मला सांगायची की श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती तिला हवी होती, ती आणायला माझ्या (बाहेरगावी नोकरी करणार्या) मोठ्या भावांना तिने सांगून ठेवले होते, का कुणास ठाउक, आपापल्या प्रपंचात गुंतलेल्या भावांनी तशी मूर्ती कधीच आणली नाही.
पुढे आईने आशा सोडून दिली असावी, कारण मी मोठा झाल्यावर तिने कधी या गोष्टीचा उल्लेख केला नाहे, मी पण (कलेच्या आणि प्रपंचाच्या नादात) लहानपणची ही गोष्ट विसरून गेलो होतो. १९९५ साली वयाच्या ८५ व्या वर्षी तिचा मृत्यु झाल्यावर मला ही गोष्ट अचानक आठवली, पण आता फार उशीर झालेला होता....
अजून सुद्धा मला कुठे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसली की ती खरेदी करतो आणि अश्रू गाळतो...
तुमच्या आयुष्यात्तील असे काही प्रसंग?
प्रतिक्रिया
30 Jul 2011 - 4:11 am | शुचि
मुलीचे लग्न आणि तिचे यशस्वी बाळंतपण :प
आपल्या बुवा फार इच्छा नाहीत :)
पण शतावरी, बाळंतकाढा, सर्व पौष्टिक पदार्थ (हळीवाचे लाडू, खीर) , सेवा, जागरण यात कुठेही माझी दिरंगाई होऊ नये ही ईच्छा. खूप खूप स्वप्न आहे याबाबतीत.
________________________________________________
यावरून एक विनोद आठवला - भाषण चालले होते आणि वक्ता म्हणत होता "अमकं केल्याने टमकं केल्याने ९० वर्षे जगाल" कोणीतरी म्हटले "च्या** इथे ९० वर्षे जगायचे आहे कोणाला?" मागच्या बाकावरून हळूच आवाज आला - ८९ वर्षाच्या माणसाला :)
30 Jul 2011 - 3:43 am | इंटरनेटस्नेही
१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी.
२. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत ;)
दॅट्स ईट!
-
इंट्या, वय वर्षे २२, मुंबई.
30 Jul 2011 - 4:14 am | आत्मशून्य
सविस्तर प्रतीसाद नंतर दिल्या जाइल.
30 Jul 2011 - 2:48 pm | सहज
इंट्याच्या लखलखत्या बाशिंगाचा प्रखर उजेड डोळ्यावर आल्याने आधीक लिहण्यास असमर्थ असेच ना?
31 Jul 2011 - 10:36 pm | रमताराम
इंट्याच्या गुढग्यावरील बाशिंगाचा उजेड तुमच्या डोळ्यावर आला म्हणजे इंट्या काय १४-१५ फूट उंच आहे की तुम्ही 'देढफुट्या' क्याटेगरीत आहात?
1 Aug 2011 - 7:58 am | सहज
प्रकाशाची तिरिप खालुन वर येउ शकत नाही काय?
आणि हो, आजोबा तुमच्या पुढे मी कायम घुटनो के बल + नतमस्तक असतो त्यामुळे तुमच्यापुढे देढफुट्याच.
30 Jul 2011 - 3:23 pm | ५० फक्त
१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी.
२. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत
दॅट्स ईट!
बोंबला, म्हणजे ती व्यक्ती (हा शब्द बरोबर आहे, इंट्याने टाइपलेला नाही) मुलगीच असायलाच हवीच असा तुझा आग्रह नाही तर,
आणि तुझी वयाची अट पाहुनच राखी रामदेवबाबांच्या मागे लागली वाटतं, नाहीतर...
31 Jul 2011 - 9:31 am | रेवती
काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय बाळा?
31 Jul 2011 - 4:01 pm | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म जोरदार... सुरु आहे अभ्यास रेवती ताई.. पुढच्या वर्षी साधारण जुलय महिन्यापर्यंत आर्टीकलशिप सुरु होईल! :)
-
(प्रगतीपथावर स्वार) बाळ इंटेश. ;)
2 Aug 2011 - 9:27 pm | पंगा
"Weights" नाही बे! "Weighs".
तसेच, एकदा "Although" म्हटल्यावर "yet" अनावश्यक आणि अस्थानी आहे.
शिवाय, शेवटचे उद्गारचिन्ह अतिरेकी आहे. पूर्णविराम बरा.
Although the tongue weighs very little, very few people are able to hold it.
किंवा,
The tongue weighs very little. Yet, very few people are able to hold it.
2 Aug 2011 - 4:04 pm | मनराव
>>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी.<<<
मायला, याच्या प्रेमात पडायला पण अटी आहेत......
2 Aug 2011 - 5:01 pm | अन्या दातार
अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे!
आणि त्याचे वय बघ, तुझे वय बघ! ;)
2 Aug 2011 - 6:41 pm | विजुभाऊ
अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे!
हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात ;)
2 Aug 2011 - 6:45 pm | इंटरनेटस्नेही
विजुभाऊ.. थिअरी वाचुण वाचुण / प्रॅक्टीकल बघुण बघुण क्ंटाळा आला.. आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला!
2 Aug 2011 - 7:03 pm | आत्मशून्य
डू प्राक्टीस.. बी अ म्यान... कॉझ प्राक्टीस म्येक मॅन परफ्येक्ट........
3 Aug 2011 - 10:58 am | वपाडाव
काय वांझोटे रिप्लाय देताय...
शोभतंय का आपल्याला...
@इंट्या :: बाळा, आत्ताच कुठे घराबाहेर पडाया शिकला आहेस...
उगाच त्रागा का करुन घेतोयस.. जीव सांभाळ...
आजकाल फक्त मुलीच असुरक्षित नाहीयेत... (याचे २ अर्थ होतात जो काढायचा तो काढा....)
2 Aug 2011 - 7:06 pm | अन्या दातार
>>आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला!
त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो! ;)
(सूचक) अन्या.
2 Aug 2011 - 9:11 pm | इंटरनेटस्नेही
याला उत्तर दिले तर माझा (एकुलता एक) आयडी बॉल्क होईल, म्हणून व्यनीतुन बोलु.. ;)
2 Aug 2011 - 6:42 pm | इंटरनेटस्नेही
णुसत्या प्रेमाणे पोट भरत णाही! पुरुषा सोबत स्त्रीनेही त्याच्या बरोबरीने कमावतं असायलाच हवं!
-
(व्यावहारिक) इंटरनेटप्रेमी!
30 Jul 2011 - 4:58 am | सोत्रि
दसविदानीया बघितलात काय हो इतक्यात ? असो.
मला आयुष्य 'जगायचे' आहे.
- (आयुष्य 'जगण्याची' ओढ असलेला ) सोकाजी
30 Jul 2011 - 5:28 am | Nile
फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंग (http://en.wikipedia.org/wiki/Cave_diving), सोलो स्कायडाईव्हिंग करायचे आहे. २४ इंच किंवा त्यापेक्षा मोठा स्वतःचा टेलिस्कोप घ्यायचा आहे. अंतराळात जायचं आहे... ही लांबच्यालांब लिस्ट टाईपण्यात फार वेळ घालवायला नको...
30 Jul 2011 - 1:54 pm | विनायक प्रभू
डायविंग साठी क्लास लाव रे निळ्या आधी.
31 Jul 2011 - 4:42 am | Nile
पण काही गोष्टी अनुभवाने शिकण्यातच जास्त मजा असतो ना मास्तर? मग! ;-)
31 Jul 2011 - 10:15 am | पाषाणभेद
अच्छा, म्हणजे सोलोच शिकायचे आहे हे पक्के आहे तर.
31 Jul 2011 - 11:27 am | Nile
'काही' गोष्टी सोलो करण्यातच मजा असते, हे तुम्हा सोबतीची वाट बघणार्यांना काय कळणार म्हणा.
30 Jul 2011 - 10:05 pm | वपाडाव
हा ताजा खुमार "झिन्दगी ना मिलेगी दोबारा"चा हँगओव्हर आहे असे वाटत नाही काय?
निरिक्षण नोंदवले... बाकी बघा...
आपल्याला तर बाबा इटलीत जाउन व्हेनिस, झेकमध्ये प्राग अन अम्रिकेत कोलोराडो व मायामी ह्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा आहे........
करायचंच म्हंजे...
मरण मायबापाच्या चरणी यावं ही ई. प्रा......
31 Jul 2011 - 4:45 am | Nile
१. तो सिनेमा पाहिलेला नाही.
२. सिनेमाच्यापुढे विचार करत चला कधीतरी.
1 Aug 2011 - 7:52 pm | आत्मशून्य
.
30 Jul 2011 - 7:11 am | प्रियाली
मला माझ्यापेक्षा अधिक भयंकर भुताला भेटायचं आहे. चेटूक शिकायचं आहे. एखाद्या सैतानाला वश करायचं आहे. एखाद्यावर करणी करायची आहे, चेटूक करून पाहायचं आहे. (कोणी वॉलंटियर असतील तर कळवा प्लीज) परकाया प्रवेश करायचा आहे. प्लँचेट करायचं आहे. ऑटोमॅटिक रायटींगची कला शिकून घ्यायची आहे.
बस एवढंच!
ऑन ए सिरिअस नोट, मला इजिप्तला जायचं आहे. ममीज आणि पिरॅमिड्स बघायला. ;)
30 Jul 2011 - 10:10 pm | वपाडाव
काय म्हंता ??? म्हंजे आम्हाला चुकीचे स्टॅट्स तर नाहीना कळाले....
का तुम्हाला सुद्धा गजनीची जडण झालीये ???...
31 Jul 2011 - 4:42 am | Nile
.
30 Jul 2011 - 8:16 am | मी-सौरभ
विचार बरेच आहेत....
उदा:
काय होतय ते बघूया
सध्या तरी प्रतिसाद मात्र राहून खूष आहे :)
30 Jul 2011 - 8:19 am | नरेशकुमार
मला एक खुप मोठ्ठा मोठ्ठा (न डिलिट करता येन्यासारखा) लेख लिहायचा आहे.
अॅट्लिस्ट एक खुप मोठ्ठा प्रतिसाद द्यायचा आहे.
बाकि सगळ्या इच्छा पुर्न झालेल्या आहेत.
I am completely happy man.
30 Jul 2011 - 9:33 am | स्पा
काय मालक.. जिलबीचा साचा घेतलाय का नवीन...
नाय मजबूत जिलब्या पाडता आहात हल्ली , म्हणून विचारले ;)
30 Jul 2011 - 2:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
जौ दे रे स्पा (जाऊ दे नाही, जौ दे). मिपा हे केवळ आपलेच बागडण्याचे कुरण आहे आणि इतरांनी मात्र सांभाळून वागावे, असे मानून इतरांवर टीका करत सुटणारे नग आधीच आहेत मिपा वर. तू कशाला त्या दिशेने जातोस ??
बाकी कुणी काय करावे..निरीक्षण.... वगैरे नेहमीचे.
30 Jul 2011 - 9:48 am | पराग पाटील
मजा तर आहेच, पण त्याशिवाय गरजू लो़कांना मदत करायला आवडेल. जालावर अशा बर्याच संधी दिसतात, पण प्रत्यक्ष म्हणजे स्वत: तिथे राहून पैशाची, अन्नाची किंवा रोजगार पूरवण्यासाठी संस्था काढायची इच्छा आहे. कमीत कमी प्रयत्न नक्की करेन.
अवांतर - Bucket List / दसविदानिया ची आठवण झाली.
30 Jul 2011 - 10:28 am | सूर्यपुत्र
एक माणूस म्हणून जगायचे आहे. :)
-सूर्यपुत्र.
30 Jul 2011 - 11:07 am | ५० फक्त
जगी सर्व सुखी असा कोण आहे ? या समर्थांच्या प्रश्नाला ' मी' असं उत्तर द्यायचं आहे.
30 Jul 2011 - 11:08 am | सहज
सदरे दान करणार की बोली लावायची?
1 Aug 2011 - 2:32 am | पंगा
.
30 Jul 2011 - 11:13 am | पात्र
आत्ता तरि लग्न करायचे ठरवले आहे
30 Jul 2011 - 11:41 am | यकु
मला एक सुंदरसा अबलख इराणी घोडा घेऊन शेतात रहायचं आहे.
बस्स एवढंच.
31 Jul 2011 - 10:17 am | पाषाणभेद
इराणी?? अरबी म्हणायचे आहे काय? आमच्याकडे बरेच अरबी घोडे आहेत. पण ते आमच्याच उपयोगाचे आहे. वेळप्रसंगी वापरावे लागतात.
29 Oct 2013 - 1:53 pm | कपिलमुनी
:(
एवढ तरी करायचा !!
30 Jul 2011 - 1:39 pm | अन्या दातार
माझी लिस्टः
१. विम्बल्डन फायनल बघायची आहे.
२. मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे आहे :)
30 Jul 2011 - 1:58 pm | आत्मशून्य
बस फक्त जगायचे आहे.
“पिघले नीलम सा बहता हुआ यह समाँ
नीली नीली सी ख़ामोशियाँ
ना कहीं हैं ज़मीन
ना कहीं आसमान
सरसराती हुयी टहनियां, पत्तियाँ
कह रही हैं की बस एक तुम हों यहाँ
सिर्फ मैं हूँ मेरी सांसें हैं और मेरी धडकनें
ऐसी गहराइयाँ
ऐसी तनहाइयाँ
और मैं सिर्फ मैं
अपने होने पे मुझको यकीन आ गया”
30 Jul 2011 - 10:14 pm | वपाडाव
वाह...वाह...मित्रा तु तर डुंबलास की रे चक्क चक्क......
1 Aug 2011 - 7:00 pm | आत्मशून्य
.
30 Jul 2011 - 2:34 pm | स्मिता.
पाण्याची भिती बाजूला सारून पोहणं शिकायचंय आणि मग मालदिवला जावून कमीतकमी १ आठवडा रहायचंय.
30 Jul 2011 - 3:28 pm | ५० फक्त
पाणी बाजुला सारायला शिकलात ना का लगेच येतं पोहायला, आपण कामं करायला कसं शिकतो तसंच, आलेली कामं दुस-याकडं सारुन देता येणं यालाच काम करता येणं म्हणतात, तसंच सेम टु सेम, एकदम सोपं.
मी तर पुढच्या दोन वर्षात मालदिवला नोकरी हुडकतोय, घरचे पैसे घालुन कोण जाणार फिरायला.
एक बुडांतर शंका - मालदिवला पोहत पोहत जाणार का ? कुठपासुन ? रुट कोणता आहे ?
30 Jul 2011 - 3:31 pm | नितिन थत्ते
मालदीवपर्यंत पोहत जाणार ठीक आहे पण मुंबईपासून पोहत जाणार की कन्याकुमारीपासून?
30 Jul 2011 - 9:33 pm | कार्लोस
अस वाटते कि एक तरी मंत्री आणि दहशदवादि ठार करावा
अशी खूप इच्छा आहे .
30 Jul 2011 - 9:35 pm | कार्लोस
सर्व मिपाकराना भेटावेसे वाटते
30 Jul 2011 - 11:13 pm | नगरीनिरंजन
हजारों ख्वाईशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले.
कधी तरी या इच्छांवर विजय मिळवलाच पाहिजे.
31 Jul 2011 - 10:08 am | नितिन थत्ते
स्विस ब्यांकेत प्रायव्हेट/सिक्रेट खातं उघडायचं आहे.
1 Aug 2011 - 8:50 pm | पंगा
आणि हे जाहीररीत्या सांगत आहात.
धन्य आहे.
(अवांतर: स्विस ब्यांकेत 'ओपन सीक्रेट' अशी काही खात्याची क्याटेगरी असते काय?)
31 Jul 2011 - 11:07 am | मदनबाण
संपूर्ण हिंदुस्थान भ्रमण करावे आणि भरपुर फोटो काढावे अशी फार मनापासुनची इच्छा आहे. :)
31 Jul 2011 - 12:52 pm | रामदास
लेटेष्ट तेव्हढे सांगतो .
हिना रब्बाणी सोबत कराचीला कट्टा जमवायचा आहे.
31 Jul 2011 - 1:03 pm | सहज
यावर बिच्चारे आमचे प्रभु मास्तर म्हणतात - मै करु तो साला, कॅ....
31 Jul 2011 - 4:11 pm | मदनबाण
हिना रब्बाणी सोबत कराचीला कट्टा जमवायचा आहे.
आयला... ;)
खी खी खी... काकांशी पूर्णपणे सहमत. ;)
काही पण म्हणा बाई आहे मात्र टच्च मसाला ! ;)
संदर्भ :--- मुत्सद्देगिरीला आभा सौंदर्याची! http://alturl.com/ae6ix
31 Jul 2011 - 4:24 pm | अन्या दातार
रामदास काका, तुम्ही एकटेच जा हो कराची कट्ट्याला. मबांना घेऊन जाऊ नका. :)
अवांतरः जसा पुण्यात सिक्रेट रेव्ह पार्टी कट्टा झाला, तसा झाला तर उत्तमच, फक्त मला बोलवायला विसरु नका म्हणजे झाले ;)
1 Aug 2011 - 9:00 pm | पंगा
'खी खी खी'? अॅज़ इन, 'KHI KHI KHI'???
एवढे ऑब्सेशन बरे नव्हे... तै एवढ्या आवडल्या वाटते?
31 Jul 2011 - 1:59 pm | इरसाल
आयला सगळे जण मुन्नाभाई मधल्या जहीर सारखे अंतिम इच्छा असल्यासारखे प्रतिसाद देतायेत.
1 Aug 2011 - 8:51 am | चतुरंग
विश्वनाथन आनंद बरोबर बुद्धीबळ खेळायचं आहे. सचिनला प्रत्यक्ष फलंदाजी करताना बघायचं आहे.
अजून इच्छा आहेत पण आत्ता ह्या दोन चटकन आठवल्या! ;)
-इच्छाधारी रंगा
1 Aug 2011 - 6:11 pm | चित्रा
कल्पना चांगली आहे. पण भरपूर मोठी यादी आहे. काय काय लिहू?
इजिप्त, पिरॅमिड बघायचेच आहेत. नाईल नदी.
किलीमांजारो. आणि वाळवंटे बघायची आहेत.
एकदा तरी स्कूबा डायविंग करायचेच आहे.
कुंभाराच्या चाकावर मातीचे भांडे तयार करायचे आहे. इ. इ.
1 Aug 2011 - 6:55 pm | चित्रगुप्त
माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... पश्चात्तापदग्ध अनुभव नाहीत का कुणाचे ?
आता इतक्या काळानंतर सुद्धा माझे मन मला खाते...की आपण मिळवते झाल्यावर का नाही लक्षात ठेऊन आईची ही लहानशी इच्छा पूर्ण केली ?
1 Aug 2011 - 7:08 pm | मराठे
तुम्ही म्हणताय थोडा तसाच अनुभव माझा पण आहे. मी बंगलोरला असताना बाळकृष्णाची पितळेची मूर्ती आणली होती. ती आमच्या घरी देवघरात ठेवली होती. काही दिवस माझी आजी राहायला आलेली असताना तिला ती मूर्ती फार आवडली. "पुढच्या वेळी जाशील तेव्हा माझ्यासाठीपण आण हो नक्की" असं तिने बोलून पण दाखवलं. पण पुन्हा तिथे जाणं झालंच नाही. आज आजी नाही. आजीने माझ्याकडे कधीच काही मागितलं नव्हतं. एकदाच मागितलं पण मी ते पूर्ण करू शकलो नाही.
1 Aug 2011 - 7:12 pm | आत्मशून्य
माझी पोस्ट निगेटीव्ह समजली जाइल म्हणून मी सांगायला थोडा कचरत होतो पण लेखकाला असेच अनूभव अभिप्रेत होते ज्यामधे काहीतरी कायमचं निसटून गेल्याची जाणीव वा खंत आहे.... याचा अंदाज आला होता. असे काही अनूभव नक्किच आहेत पण ते उघड करायचं धाडस नाही.... :(
1 Aug 2011 - 8:01 pm | सूड
अगदी पश्चात्तापदग्ध वैगरे नाही, पण अशा आहेत खर्या एक-दोन गोष्टी ज्या आता पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही.
असो.
1 Aug 2011 - 8:13 pm | चित्रगुप्त
हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु हाही होता की जसे आम्ही आपल्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करण्यात इतके दंग राहिलो, की वृद्ध आई वडिलांची लहानशी इच्छा पूरी करण्याचे भान राहिले नाही, तसे तरूण मिपाकरांचे होउ नये ...
1 Aug 2011 - 8:31 pm | स्मिता.
आम्ही आपल्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करण्यात इतके दंग राहिलो, की वृद्ध आई वडिलांची लहानशी इच्छा पूरी करण्याचे भान राहिले नाही, तसे तरूण मिपाकरांचे होउ नये ...
तुमचा हेतु खरोखर फार उदात्त आहे, विचार करण्याजोगाच आहे. (शब्द जरा कठोर वाटतील) पण काही अनुभव घेतल्याशिवाय त्यांची जाणीव होईल की नाही याबाबत साशंक आहे.
मला वाटतं कधी कधी आपण अश्याच गैरसमजात असतो की आपले आई-वडील, कुटुंबातल्या जिव्हाळ्याच्या व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या सोबतच असतील. त्यामुळे आपण त्यांच्या 'लहान-सहान इच्छा' फारश्या मनावर घेत नाही किंवा कामाच्या व्यापात त्या आपल्या लक्षात रहात नाहीत.
या जवळच्या, प्रेमाच्या व्यक्तींच्या निधनानंतर जेव्हा आपल्याला त्यांच्या कमतरतेमुळे एक पोकळी भासायला लागते तेव्हा आपण त्यांच्या निरनिराळ्या आठवणींनी ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न करत असतो. अश्याच वेळी या 'लहान-सहान इच्छा' आपल्याला अचानक आठवतात. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कमी-अधीक तीव्रतेचे असे पश्चात्तापदग्ध अनुभव प्रत्येकजण बाळगत असावा असं वाटतं.
3 Aug 2011 - 10:10 am | चित्रगुप्त
आताच मिपावर कुठेतरी वाचले...
.... जग चुकते, त्या चुकीविषयी ऎकते, पण शिकत मात्र नाही ! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी...
2 Aug 2011 - 10:44 pm | आनंदयात्री
कुणास ठाउक कशी, मास्तरांच्या टोचणीची आठवण झाली अन रडुन मोकळा झालो.
2 Aug 2011 - 3:41 pm | विजुभाऊ
कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे
2 Aug 2011 - 4:52 pm | इरसाल
ढयाण ट ढयाण...........................विजुभो काय हे
इथल्या प्रत्येक प्रतीसादकाच्या हृदयाला साद घातलीत.
टुकार : गुल गया गुलशन गया गयी होटोकी लाली
कॉलेजवालिका पीछा छोडो वो हो गयी बच्चो वाली .
................................इर्शाद, नौशाद, दंगा-फशाद.......................................
2 Aug 2011 - 5:00 pm | गणपा
=))
इजुभौंच्या सौंना एक प्रिंट काढुन द्या रे कुणी तरी वरिल प्रतिसादाची.
2 Aug 2011 - 5:05 pm | अन्या दातार
सारा काड्या तुम्ही!
कुणाचे चांगले होत असलेले बघवत नाय का ओ? (ह.घे.हे.वे.सां.न.ल.)
20 Oct 2013 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले
मला उर्वरीत आयुष्यात एकदा तरी पृथ्वी प्रदक्षिणा करायचीये ...यॉट मधुन ...जमलेच तर एकट्याने !!
(आणि खंत वाटेल असं काही सांगायचय तर खुप मोठ्ठं असं काही नाही फक्त कॉलेजात स्टॅटच्या ऐवजी मॅथ्स घ्यायला पाहिजे होतं यार...साला ह्या कॉर्पोरेट कल्चरमधे पडायलाच नको होतं ...फार मोठ्ठी चुक झाली :( )
21 Oct 2013 - 6:19 am | कंजूस
लिहून ठेवलेले नाही पण लक्षात आहे .(१)रेखाटन करण्याची इच्छा होती पण पुढे कळले रेखाटनांतून भाव आणि गतिमानता न दिसता गिरगिरेट्या वाटतात .(२)नोकरी लागल्यावर फोटोग्राफी करू .त्याप्रमाणे कैनन एई१ किट घेतले .पॉटरेट बरी आली पण नेचर आणि वाईल्डलाईफ खास नाही जमले .लवकरच फिल्म कैमेर्याचे दिवस संपले .(३)हंपि बदामिची भटकंती करायची होती ती एकट्याने पूर्ण केली पण मोबाईलने फोटो काढले .फोटो आणि व्हिडिओ अनपेक्षितपणे चांगले आले .(४)विनोबा भावेंना चौदा भाषा येत होत्या म्हणून बंगाली ,तमिळ ,कानडी ,मल्याळम ,जर्मन आणि फ्रेंच भाषेची पुस्तके जमा केली .खटाटोप सुरू आहे .(५)सह्याद्री एकट्याने भटकणे गेली पंधरा वर्षे करत आहे आता कर्नाटकमधिल भाग कुमार पर्वत माडिकेरी वगैरे भटकायचा आहे त्यासाठी कानडी आले तर बरे .(६)कैरो म्युझिअम पाहायचे आहे (७)हेरिटेज रेल्वे आणि जर्मनी जपानच्या फास्ट रेल्वेने प्रवास करायचा आहे .(?)आई वडिलांना मोठ्या घरात राहायला न्यायचे ही इच्छा अपुरीच राहिली .¿
21 Oct 2013 - 6:23 am | वेल्लाभट
धाग्याचा विषय वाचून बकेट लिस्ट चित्रपटाची आठवण झाली
29 Oct 2013 - 4:27 pm | मराठी कथालेखक
जीवन म्हणजे मृत्यू येईपर्यंतचे "वेळ घालविणे" :)
29 Oct 2013 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आई वडीलांना वर्ल्ड टुर ला पाठवायचं आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे (पुढ्च्या गुढीपाडव्याला उत्घाटन करायच्या बेतानी काम चालु आहे) :). झालचं तरं एक झक्क ऑडी ए-४/ए-६ घ्यायची आहे.
31 Oct 2013 - 9:40 am | उद्दाम
मैं औरंगजेब बनना चाहता हूं !
3 Nov 2013 - 10:02 pm | काळा पहाड
और मैं हर औरंगजेब का "गुजरात" बनाना चाहता हूं.
5 Nov 2013 - 2:32 pm | उद्दाम
की फर्क पडता है? जगाच्या पाठीवर ते २५ % आहेत आणि तुम्ही १२ % . ते सगळ्या जगात आहेत. तुमचा हा आसिंधुसिंधु एकच देश आहे. इथले दोन चार कमीजास्त करुन हिरवा सागर आटणार नाही की भगवे डबके वाढणार नाही.
:)
5 Nov 2013 - 5:45 pm | टवाळ कार्टा
हिरवा "सागर" असेल तर असुदेकी... भगवे "डबकेच" असायला पाहिजे का???
3 Nov 2013 - 10:06 pm | सुबोध खरे
म्हणजे आत्ता तुम्ही ते नाही?
3 Nov 2013 - 5:00 pm | अप्पा जोगळेकर
ड्युक्स नोज वर चढाई,ग्रॅन्ड कॅनियन पाहणे,शॉट मारणे आणि अर्थातच आहेत त्याच्या चार-पाच पटींनी अधिक पैसे मिळवणे.
4 Nov 2013 - 2:33 pm | खटासि खट
आहेत आहेत. याद्या आमच्याही कडे आहेत
प्राधान्यक्रमाने..
१. व्यायामासाठी मुहूर्त शोधत आहे. एकदा मिळाला कि सिक्सपॅक अॅब्ज बनवणे, डोलेशोले बनवणे
२. सलमान खान सारखे दाट केस उगवणे
३. धंदा टाकणे ( धंदा तुफान चालल्यास काय काय करायचे याची सेप्रेट यादी आतल्या कप्प्यात हाय. ऐनवेळी गोंधळ नको)
४. नकोच. बॅन होईन.
4 Nov 2013 - 2:34 pm | खटासि खट
४ वाचून काय विचार मनात आले ?
इतका पण वाइट नाही हं तुम्ही समजता तितकं. फक्त अनाहिता मध्ये टेंपररी एण्ट्री मारणे ( हे करायचंच आहे :D)
5 Nov 2013 - 4:47 am | रेवती
अहो ख ख साहेब, ही काही तुम्हा एकट्याची शिक्रेट इच्छा नाही. ;) गंमत अशी आहे ना (पुरुषांसाठी) अत्यंत कंटाळवाणे प्रकार चाललेले असतात. हिरव्या सलवार कुडत्यावर निळ्या फुलांची एम्बॉयडरी कशी दिसेल? किंवा त्यावर घुंगरांच्या बांगड्या शोभतील का? या प्रश्नांचा तुम्हाला कंटाळा येईल हे नक्की. फारतर अय्या, ते नवीन प्रकारचे भांडे बाजारात आलेय ते इंडक्षन टॉपला चालते का? मी या नव्या प्रकारच्या सहा कप बश्या घेतल्यात. कश्या वाटतायत ते लगेच सांगा. या चर्चा मुख्य बोर्डावर आल्या तर काय होईल याची कल्पना करा. उगीच का सुखाचा जीव दु:खात घालताय?
5 Nov 2013 - 1:54 pm | चित्रगुप्त
हे 'अनाहिता' काय प्रकरण आहे, हे समजले नव्हते, (असेल एकादे 'चांदनी बार' सारखे ठिकाण, असे वाटले होते) पण रेवतीताईंच्या प्रतिसादावरून वाटले, की हे मिपाच्या 'फक्त (खर्याखुर्या) स्त्रियांसाठी' असलेल्या बंदिस्त विभागाचे नाव असावे.
यावरून आमचा एक जुना धागा आठवला.
5 Nov 2013 - 12:59 pm | आदूबाळ
सिक्स पॅकवरून आठवलं: एका आरंभशूर व्यायामी मित्राने परत जिमला प्रवेश घेतला. आम्हाला सांगत होता
व्यायामी मित्रः (सुटलेल्या पोटावर हाताने दाखवत) अशी सहा सहा बिस्किटं आली पाहिजेत, बिस्किटं. असा व्यायाम करणारे...
दुसरा मित्रः (त्याच्या पोटावरून हात फिरवत) हो, सध्या कणीक आहे ना...
4 Nov 2013 - 3:33 pm | माम्लेदारचा पन्खा
विचारी मना तूच शोधुनी पाहे....!!