पुरावे नष्ट करण्यासाठी यांना फाईली गायब करायला वेळ मिळाला नाहि ना
महिना दोन महिने कमी पडलेकी काय लपवा छपवी करायला?
बाकी इतरांसारख छातीत कळ येण्याच जुनं नाटक न करता कलमाडींनी नवा मार्ग दाखवुन दिलाय.
काय 'डोक्यालिटी' आहे. वाह !!!
ते बाहेर गावी होते अटक टाळण्यासाठि अटक पुर्व जामिन मिळवणयाच्या प्रयत्नात होते,
पण तो मिळाला नाहि,
मग रेड कॉर्नर जारी होण्या आधी स्वाधीन व्हा, असे वकिलाने हताशपणे सांगितले असणार असे मी कुठेतरी वाचलेय,
आता मलाहि ते आठवत नाहि ;)
आणखी काही दिवस चौकशी चालली की मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर होईल, डिस्लेक्सिया होईल, स्किझोफ्रेनिया सुध्दा होईल.
शेवटी काय है ना, डॉक्टर्स झाले, पोलिस झाले, सगळ्यांना पोटं असतात, घरच्या जबाबदार्या असतात, शिकणारी लेकरंबाळं असतात...मायबाप सरकार किती टिकल्या टेकवतं हो पगाराच्या नावाखाली? मग असं राजकारण्यांना काहीबाही त्रास होऊ शकतात...अगदी सर्टिफाईड त्रास!
आय.सी.यु.मध्ये पडून रहावं लागेल ना भौ! त्यापेक्षा डोक्यावर परिणाम झाल्याचं नाटक सर्वात बेष्ट! चारचौघांशी सल्लामसलतही करता येते, प्ल्यानिंगही करता येतं..आणि पुन्हा, असा असा त्रास असल्याने अमुक तमुक कृती करुनही ती ग्राह्य धरु नये वगैरे वकिलांची बकबकही जिंकून जाऊ शकते. कसें?
सगळ्याच राजकारण्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार असतोच. त्यात विशेष ते काय? डिमेन्शियाच्या अनेक कारणांपैकी काही महत्वाची कारणे अशी:
१. एकटेपणा
२. कुपोषित आहार
३. नैराश्य
सध्या बिचारे कलमाडी कुठल्या प्रकारच्या मानसिक विटंबनेतुन जात आहेत हे तर तुम्ही जाणताच. नैराश्य तर येणारच, शिवाय तिहारचा आहार म्हणजे कुपोषण तर होणारच (पैसे खाल्ल्यामुळे अपचन झाले असे काही पाषाणहृदयी लोक म्हणु शकतात. त्यांना आम्ही योग्य त्या ठिकाणी मारतो). शिवाय तुरुंगात एकटे असतात बिचारे. आप्तस्वकीय जवळपास नाहीत, मित्र नाहीत, एखाद्या जेलरने दयाबुद्धी दाखवुन, आपुलकीने चहा प्यायला बोलावले तर त्या जेलरवर पण बिचार्यावर कारवाईची टांगाती तलवार ठेवणारे नराधम नौकरशहा आणि जज लोक. डिमेंशिया होणार नाही तर काय हो?
डॉक्टरला समजा ५० लाख आणि तिहारच्या तुरुंगाधिकाऱ्याला २५ लाख दिले तर हि बाब अगदीच अशक्य नाही. एवढ्या घोटाळ्यातले लोटाभर दिले तर...... कि फर्क पैंदा है?
स्मृतिभ्रंश काय कलमाडी नावाचा कोणी नाहीच हे सुद्धा सिद्ध होणार ?
इतर दोघे,
ते ए राजा अन् करुणानीधिंची कन्या कणी मोझीडी,ळी,ली,णी हिचे नाव मिडीयालाही घेता येत नाही, मग आम्ही कोण पामर?
हे आता काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे,
आता यांच्या किडन्या,हार्ट फेल झाले तर आश्चर्य नको,
त्यांना जर सोनीयाजी अथवा राहूलजी या टू-जीं समोर उभे केले आणि जर त्यांनी या दोघांनाही विचारले, "आपण कोण?" तर कदाचीत स्मृतीभ्रंश झाला असे कदाचीत म्हणता येईल.
इंग्लिश कायद्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जरदारींनीही असाच आपण "मानसिक रुग्ण" असल्याचा बहाण केला होता असे वाचल्याचे आठवते. ही गोष्ट कलमाडींना नेमकी आठवली असावी व नंतर त्यांनी ताबडतोब जरदारींची 'शिकवणी' लावली असावी!
आता-आताच त्यांनी स्वतःला कोर्टात नेण्यासाठी वेगळे वाहन द्यावे अशी मागणी केली होती. तोपर्यंत तरी त्यांची स्मरणशक्ती शाबूत असावी असे वाटते. मग अचानक काय झाले बॉ?
जय हो!
सगळ्या नतद्रष्ट प्रतिक्रिया आहेत. त्यांच्याशी अजीबात सहमत नाही. पुण्याच्या माणसाचा अन त्यातही मराठी माणसाचा उत्कर्ष सार्या भारताला पाहवत नाही. अहो त्या पुण्याच्या माणसाने, पर्यायाने मराठी माणसाने एवढी प्रसिद्धी मिळवली त्यात आनंद मानायला हवा. भ्रष्टाचार काय फक्त लालू, मुलायमनेच करायचा का?
अहो हा आजार काही सर्वसामान्य नाही. लाखो लोकांतून एखाद्याला होतो. त्या आजाराने त्यांना घेरले यात त्यांची काय चुक?
तुरूंगअधिक्षक, वैद्यकिय अधिकारी, न्यायालय, त्यांचे सहकारी हे त्यांच्याशी सदबुद्धीने वागतील अशी आशा आहे.
प्रतिक्रिया
25 Jul 2011 - 1:22 pm | नन्दादीप
हा हा हा,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देव त्यांना चांगली बुद्धी देवो.....
25 Jul 2011 - 1:28 pm | अविनाशकुलकर्णी
नाटक करतात...
वर अधिका~यांची त्याला साथ.....
काय मनावर घायच?..
पैसे वसुल होणार आहेत का? प्रोप्र्टीवर टाच आणुन?..
ते महत्वाचे..बाकि सारे खेळ...
25 Jul 2011 - 10:18 pm | नर्मदेतला गोटा
प्रॉपरटी कसली प्रॉपरटी
कुणाची प्रॉपरटी मला काहीच आठवत नाही
It's common wealth
25 Jul 2011 - 1:34 pm | भारी समर्थ
नो कमेन्ट्स ही जर एक कमेन्ट असेल तर ती ग्राह्य धरण्यात यावी.
भारी समर्थ
25 Jul 2011 - 1:38 pm | अजातशत्रु
पुरावे नष्ट करण्यासाठी यांना फाईली गायब करायला वेळ मिळाला नाहि ना,
मग काय करता..
स्वतःची स्मृतीच गायब केली ;)
(भ्रष्टाचारी -मालगाडी)
25 Jul 2011 - 1:49 pm | गणपा
महिना दोन महिने कमी पडलेकी काय लपवा छपवी करायला?
बाकी इतरांसारख छातीत कळ येण्याच जुनं नाटक न करता कलमाडींनी नवा मार्ग दाखवुन दिलाय.
काय 'डोक्यालिटी' आहे. वाह !!!
25 Jul 2011 - 2:42 pm | अजातशत्रु
ते बाहेर गावी होते अटक टाळण्यासाठि अटक पुर्व जामिन मिळवणयाच्या प्रयत्नात होते,
पण तो मिळाला नाहि,
मग रेड कॉर्नर जारी होण्या आधी स्वाधीन व्हा, असे वकिलाने हताशपणे सांगितले असणार असे मी कुठेतरी वाचलेय,
आता मलाहि ते आठवत नाहि ;)
25 Jul 2011 - 1:38 pm | नितिन थत्ते
रोनाल्ड रीगन यांची आठवण झाली.
25 Jul 2011 - 4:58 pm | चिंतामणी
(विवेक मोडकांचे) लाडके नेते मा.श्री. सुरेशभाई कलमाडीजी साहेबांची तुलना (नकळत) अमेरीकेच्या माजी अध्यक्षांबरोबर केल्याने मन भरून आले. :(
29 Jul 2011 - 12:46 pm | श्रीरंग
या "सुरेश"मुळे ५स्टार खाणारा सुरेश आठवला.
25 Jul 2011 - 1:46 pm | रणजित चितळे
मग त्यांनी संसदेत जाऊ द्यावे असा अर्ज एकीकडे कसा केला आहे. संसदेत स्मृतीभ्रंश झालेले राज्यकर्ते चालतात का.
25 Jul 2011 - 1:47 pm | घाशीराम कोतवाल १.२
मायला त्यांना येरवडयाच्या येड्याच्या हास्पिटलात भरती करा....
25 Jul 2011 - 1:48 pm | विजुभाऊ
आठवा..... मला आठवत नाही फेम रामराव आदीक
25 Jul 2011 - 1:52 pm | छोटा डॉन
कोण कलमाडी ?
च्यायला मला आजकाल काहीच आठवेना झालयं.
- डॉन्या कलमाडी
25 Jul 2011 - 2:02 pm | धमाल मुलगा
आणखी काही दिवस चौकशी चालली की मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर होईल, डिस्लेक्सिया होईल, स्किझोफ्रेनिया सुध्दा होईल.
शेवटी काय है ना, डॉक्टर्स झाले, पोलिस झाले, सगळ्यांना पोटं असतात, घरच्या जबाबदार्या असतात, शिकणारी लेकरंबाळं असतात...मायबाप सरकार किती टिकल्या टेकवतं हो पगाराच्या नावाखाली? मग असं राजकारण्यांना काहीबाही त्रास होऊ शकतात...अगदी सर्टिफाईड त्रास!
25 Jul 2011 - 2:59 pm | इरसाल
आयला..........
ह्या सगळ्यापेक्षा गधडीचा 'कोमात' गेला हा विकार कसा राहील . १००% शाश्वती
25 Jul 2011 - 3:07 pm | धमाल मुलगा
आय.सी.यु.मध्ये पडून रहावं लागेल ना भौ! त्यापेक्षा डोक्यावर परिणाम झाल्याचं नाटक सर्वात बेष्ट! चारचौघांशी सल्लामसलतही करता येते, प्ल्यानिंगही करता येतं..आणि पुन्हा, असा असा त्रास असल्याने अमुक तमुक कृती करुनही ती ग्राह्य धरु नये वगैरे वकिलांची बकबकही जिंकून जाऊ शकते. कसें?
25 Jul 2011 - 2:06 pm | विजुभाऊ
कोण कलमाडी ?
च्यायला मला आजकाल काहीच आठवेना झालयं.
उसमेसे "कल" निकाल देना मग आठवेंगा ना?
25 Jul 2011 - 2:18 pm | स्मिता.
जेलर लोक पण विनोदच करतात... आवडला आपल्याला!
25 Jul 2011 - 2:39 pm | मृत्युन्जय
सगळ्याच राजकारण्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार असतोच. त्यात विशेष ते काय? डिमेन्शियाच्या अनेक कारणांपैकी काही महत्वाची कारणे अशी:
१. एकटेपणा
२. कुपोषित आहार
३. नैराश्य
सध्या बिचारे कलमाडी कुठल्या प्रकारच्या मानसिक विटंबनेतुन जात आहेत हे तर तुम्ही जाणताच. नैराश्य तर येणारच, शिवाय तिहारचा आहार म्हणजे कुपोषण तर होणारच (पैसे खाल्ल्यामुळे अपचन झाले असे काही पाषाणहृदयी लोक म्हणु शकतात. त्यांना आम्ही योग्य त्या ठिकाणी मारतो). शिवाय तुरुंगात एकटे असतात बिचारे. आप्तस्वकीय जवळपास नाहीत, मित्र नाहीत, एखाद्या जेलरने दयाबुद्धी दाखवुन, आपुलकीने चहा प्यायला बोलावले तर त्या जेलरवर पण बिचार्यावर कारवाईची टांगाती तलवार ठेवणारे नराधम नौकरशहा आणि जज लोक. डिमेंशिया होणार नाही तर काय हो?
25 Jul 2011 - 2:46 pm | इरसाल
डॉक्टरला समजा ५० लाख आणि तिहारच्या तुरुंगाधिकाऱ्याला २५ लाख दिले तर हि बाब अगदीच अशक्य नाही. एवढ्या घोटाळ्यातले लोटाभर दिले तर...... कि फर्क पैंदा है?
स्मृतिभ्रंश काय कलमाडी नावाचा कोणी नाहीच हे सुद्धा सिद्ध होणार ?
एक रात्र मंतरलेली ......आठवा.
25 Jul 2011 - 2:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
या बातमीने फक्त घड्याळकाकांना बरं वाटले असेल.
26 Jul 2011 - 1:18 pm | अजातशत्रु
इतर दोघे,
ते ए राजा अन् करुणानीधिंची कन्या कणी मोझीडी,ळी,ली,णी हिचे नाव मिडीयालाही घेता येत नाही, मग आम्ही कोण पामर?
हे आता काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे,
आता यांच्या किडन्या,हार्ट फेल झाले तर आश्चर्य नको,
25 Jul 2011 - 3:31 pm | यकु
जर्मन शेफर्ड कुत्रे पाठीमागे लाऊन कॉमनवेल्थच्या ट्रॅकवरुन पळवा म्हणाव..
झटक्यात सगळे लक्षात येईल.
25 Jul 2011 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार
अहो कुत्रे झाले म्हणून काय, त्याला पण काही मान अपमान आहे का नाही?
26 Jul 2011 - 7:11 am | चतुरंग
काहीतरी काय उगीच? कुत्र्याला स्मृतिभ्रंश व्हायचा! ;)
25 Jul 2011 - 5:00 pm | ऋषिकेश
ही गोष्ट एमाराय स्क्यान ने सिद्ध करून घेतली गेली आहे असे समजते.
भाततातील विचित्र मशीन्सः
१. लाय डिटेक्टर मशीन
२. इवीएम
आणि आता एमाराय स्क्यान मशीन्स
तसंही आपली सही आणि स्वीस ब्यांक अकाऊंटचा पासकोड इतके लक्षात असले तरी पुष्कळ आहे. बाकीचे लक्षात ठेवायची गरज काय?
25 Jul 2011 - 5:26 pm | मदनबाण
खी खी खी ख्या ख्या ख्या...
चला... चालता फिरता गझनी लोकांना पहायला मिळतोय ! ;)
25 Jul 2011 - 7:43 pm | तिमा
एरवी एकोळी धाग्यांना हिणवणारे आता भरभरुन प्रतिसाद देताहेत हे बघून अंमळ आश्चर्य वाटले. का सगळ्यांनाच स्मृतीभ्रंश झालाय ?
25 Jul 2011 - 8:33 pm | चिरोटा
कलमाडी ह्या शब्दातच बरेच मटेरियल आहे साहेब म्हणून एक ओळ पुरे आहे.
कडी
माडी
डील
माल
डी* !!
मालक
25 Jul 2011 - 7:49 pm | ssnaik
ससदेत जायचे बरे लक्षात आहे ... ईतर वेळेला स्मृतीभ्रंश ... सगळ जप्त करा ... लगेच शुध्धिवर येतिल ...
25 Jul 2011 - 8:52 pm | मराठे
अंदाज अपना अपना मधल्या टीलू ची आठवण झाली... त्याला दिलेलं औषध इथेही मस्त लागू होईल..
"इन्हे दवा और दंडे की जरूरत है! दंडे मारना ना भूलिये!"
25 Jul 2011 - 9:33 pm | विकास
त्यांना जर सोनीयाजी अथवा राहूलजी या टू-जीं समोर उभे केले आणि जर त्यांनी या दोघांनाही विचारले, "आपण कोण?" तर कदाचीत स्मृतीभ्रंश झाला असे कदाचीत म्हणता येईल.
25 Jul 2011 - 9:50 pm | सुधीर काळे
इंग्लिश कायद्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जरदारींनीही असाच आपण "मानसिक रुग्ण" असल्याचा बहाण केला होता असे वाचल्याचे आठवते. ही गोष्ट कलमाडींना नेमकी आठवली असावी व नंतर त्यांनी ताबडतोब जरदारींची 'शिकवणी' लावली असावी!
आता-आताच त्यांनी स्वतःला कोर्टात नेण्यासाठी वेगळे वाहन द्यावे अशी मागणी केली होती. तोपर्यंत तरी त्यांची स्मरणशक्ती शाबूत असावी असे वाटते. मग अचानक काय झाले बॉ?
जय हो!
26 Jul 2011 - 12:55 am | नर्मदेतला गोटा
झरदारी १० % नाही ना विसरत
25 Jul 2011 - 10:46 pm | पैसा
कलमाडीसाहेब एका सकाळी उठून "मै कहां हूं?" असं हिंदी पिच्चरमधल्यासारखं म्हणाले की काय?
26 Jul 2011 - 8:26 am | पाषाणभेद
सगळ्या नतद्रष्ट प्रतिक्रिया आहेत. त्यांच्याशी अजीबात सहमत नाही. पुण्याच्या माणसाचा अन त्यातही मराठी माणसाचा उत्कर्ष सार्या भारताला पाहवत नाही. अहो त्या पुण्याच्या माणसाने, पर्यायाने मराठी माणसाने एवढी प्रसिद्धी मिळवली त्यात आनंद मानायला हवा. भ्रष्टाचार काय फक्त लालू, मुलायमनेच करायचा का?
अहो हा आजार काही सर्वसामान्य नाही. लाखो लोकांतून एखाद्याला होतो. त्या आजाराने त्यांना घेरले यात त्यांची काय चुक?
तुरूंगअधिक्षक, वैद्यकिय अधिकारी, न्यायालय, त्यांचे सहकारी हे त्यांच्याशी सदबुद्धीने वागतील अशी आशा आहे.
26 Jul 2011 - 10:37 am | विनायक बेलापुरे
१० व्या बंगल्यापर्यंत पोचू शकतील अश्या काही लिंक्स असतील तर अश्या तर्हेने अखेरीस विस्मृतीच्या पडद्याआड ढकलल्या गेल्या.
27 Jul 2011 - 12:46 am | बाळकराम
भडव्याच्या ....वर ४ फटके मारा, सगळी "स्मृती" जागेवर येइल!
च्यायला, हेच ऐकणं बाकी होतं राव-च्यायची ह्या कलमाडीच्या!
27 Jul 2011 - 6:35 am | ५० फक्त
27 Jul 2011 - 7:00 am | पुण्याचे वटवाघूळ
मला शक्य झाल असत तर मी चामदी लोलवली अस्ती या हलकटाची. नातक्या लेकाचा.खालेला एकेक पैसा ओकालया लावायला हवा याला.
वटवाघूळ
29 Jul 2011 - 12:49 pm | श्रीरंग
आजचा सकाळ वाचा. सुरेशला आता सग्ग्ळं सग्ग्ळं आठवतंय. आपला स्म्रुतिभ्रंश झाला होता हेच विसरलाय तो.