चित्र समिक्षा

सहज's picture
सहज in काथ्याकूट
25 Jul 2011 - 10:24 am
गाभा: 

मिपाकरांना नमस्कार,

नुकतेच आपले मिपाकर श्री चित्रगुप्त यांच्या समर्थ कुंचल्यातुन उतरलेले एक चित्र पहायचा योग आला. अतिशय सुरेख चित्र!


दुवा येथे

चित्र सुंदर आहे यात प्रश्नच नाही. परंतु चित्राबद्दल तिथे काही माहीती नाही. शिवाय आपले विलासराव म्हणतात त्याप्रमाणे चित्रकाराच्या मनात नेमके काय आहे, चित्राचा अर्थ काय हे कळत नाही. की चित्रकाराला विचारायला हिंमत होत नाही. मग शेवटी जनता जनार्दनालाच विचारायचे ठरवून हा धागा काढला.

माझे परिक्षण -

ह्या चित्राचे नाव नक्कीच 'पाशवी' असावे. चार स्त्रियांच्या ह्या चित्राला कदाचित युयुत्स्यु 'एक भयस्वप्न (नाईटमेयर)' असेही नाव देतील. मला वाटते की सर्वात पुढे दिसणारी ही एक आजची स्त्री आहे. तिच्या मागे तीन माना टाकलेल्या स्त्रीया आहेत. कदाचित हा सांख्यीकी विदा असेल की दर ताठ मानेच्या स्त्री मागे किमान तीन मानमोडक्या स्त्रीया असतात. किंवा आजच्या मुक्त स्त्रीच्या मागे तिच्या आई, आज्जी, पणजी यांचे मान मोडेस्तोवर घेतलेले परिश्रम संघर्ष कारणीभूत आहे. भले सर्व स्त्रीयात दिसणारा वर वरचा फरक असेलही (जो वेगवेगळ्या केसांच्या रंगावरुन आला आहे) सौंदर्यप्रेमी चित्रकाराने वेगवेगळ्या कालखंडातील स्त्रीयांच्या'फॅशन'ला योग्य मान दिला आहे असे मला त्या वेगळ्या रंगावरुन वाटते . किंवा भारताच्या इतिहासात आर्य स्त्री ते मधे मुघल पारतंत्र्यातील ते आजची लोकशाही भारतातील असा रंगछटांवरुन प्रवास दाखवला असेल.

मोर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुन दाखवला आहे व तो आजच्या स्त्रिच्या हातून दाणे खाताना म्हणजे ते स्वप्न आजच्या स्त्रीने खरे केले आहे हे दाखवायला काढला असावा.

असो तरी तुम्हाला काय वाटते? काय अर्थ असावा? प्लीज समजवून सांगा.

डिस्क्लेमरः माननीय श्री चित्रगुप्त यांच्या पूर्वपरवानगीने काढलेला धागा. चित्रकला या विषयावर गमतीदार अंगाने का होईना साधकबाधक चर्चा व्हावी हा उद्देश. श्री. चित्रगुप्त यांनी जरुर विवेचन करावे.

प्रतिक्रिया

पंगा's picture

25 Jul 2011 - 10:36 am | पंगा

किंवा भारताच्या इतिहासात आर्य स्त्री ते मधे मुघल पारतंत्र्यातील ते आजची लोकशाही भारतातील असा रंगछटांवरुन प्रवास दाखवला असेल.

तसे असल्यास, काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, 'मुघल पारतंत्र्या'तील स्त्रीची मान ही त्या मानाने फारच ताठ असल्याचे जाणवते, एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो.

अर्थात, केसांच्या रंगांचे याहून वेगळे असे कोणतेच प्लॉज़िबल इंटरप्रेटेशन मला सुचत नाही, हेही येथे कबूल करणे भाग आहे.

मृत्युन्जय's picture

25 Jul 2011 - 10:37 am | मृत्युन्जय

ऑन अ मोअर सिरीअस नोट, मला असे वाटते की हे द्रौपदीचे रुपक असावे

पंगा's picture

25 Jul 2011 - 10:38 am | पंगा

?

सहज's picture

25 Jul 2011 - 10:40 am | सहज

पण कसे तेही सांगा ना प्लीज. पांचाली/पाच पांडव इ पण इथे चारच रुपे दिसत आहेत म्हणुन नक्की कसे ते लक्षात येत नाही आहे ...

मृत्युन्जय's picture

25 Jul 2011 - 11:22 am | मृत्युन्जय

माझे चित्रकलेतले ज्ञान अगाध आहे. त्यामुळे माझे मत चुकीचे आहे याची माझी मलाच खात्रा आहे

पण जर माझी निरीक्षणशक्ती दगा देत नसेल तर शेवटच्या स्त्रीच्या मागे एक हात दिसत आहे आणि तो सकृतदर्शनी तरी त्या चौथ्या बाईचा नाही. याचाच अर्थ ५ स्त्रिया आहेत.

प्रत्येक स्त्रीच्या चेहेर्‍यावरचे भाव बघा. वेगवेगळे आहेत. सर्वात समोर दिसते त्या स्त्रीच्या चेहेर्‍यावरचे हावभाव आणि प्रतिक्रिया थोडी सुखवस्तु, समाधानी, थोडे करारी दिसत आहेत. इतर ३ स्त्रिया विचारमग्न, किंचित दु:खी, हळव्या किंवा थोड्याश्या भांबावल्यासारख्या आहेत. पण पाचव्या स्त्रीला चेहेरा नाह.. त्यामुळे तिच्या भावना कळत नाहीत. द्रौपदीचेही थोडेफार असेच होते. सगळ्या गदारोळात तिच्या नक्की या "अ‍ॅडजस्टमेंट" बद्दल भावना काय होत्या त्या शेवटपर्यंत नीट्श्या कळत नाहीत (अगदी स्वर्गारोहणाच्या वेळेसही जे काही बोलतो ते युधिष्ठीर बोलतो. द्रौपदी काहीच बोलत नाही). म्हणुन शेवटचा अदृष्य चेहेरा देखील बराच "बोलका" आहे.

अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे माझे चित्रकलेतले ज्ञान अगाध असल्याकारणाने माझे मत चुकीचे असण्याची १००% हमी देता येइल :)

सहज's picture

25 Jul 2011 - 11:38 am | सहज

अच्छा! महाभारताची जुजबी माहीती आहे त्यामुळे स्वर्गारोहण इ घटना माहीत नाहीत.

पण हेही खरेच की तो एक हात आहे. अज्ञाताचा हात म्हणावे की कोणतरी पुढे येण्यामागे कोणाचा तरी हात असतोच असा गर्भितार्थ काढावा!

पण मृत्यंजय, तुमची मीमांसा रोचक आहे. द्रौपदी असुही शकेल. शिवाय ते चित्रकारांना रामायण, महाभारतातून जाम म्हणजे खूपच प्रेरणा मिळत असते हेही ऐकीवात, बघण्यात आहेच.

मृत्युन्जय's picture

25 Jul 2011 - 11:47 am | मृत्युन्जय

आंणि हो तो मोर कृष्णाचे रुपक असु शकतो (कॄष्ण = मुकुटातले मोरपीस)

आता कोणीतरी रोचक आहे असे म्हणतेच आहे तर दाबुन मत द्यायला काय हरकत आहे ;)

विलासराव's picture

25 Jul 2011 - 11:10 am | विलासराव

वाचतोय.
बघु चर्चेतुन काय अर्थ निघतोय ते?
माझ्या चित्रकलेबद्दल अगाध ज्ञानाची कबुली तर मी आधीच दिली आहे.

असेच म्हणतो.

या चर्चेतून वरील चित्राचा अर्थ कळेल अशी आशा आहे.

________________________________________
अगाध अज्ञानी....... सुमो.

पंगा's picture

25 Jul 2011 - 11:36 am | पंगा

काही नाही, हे केसांचे रंग (हेअरडाय) बनवणार्‍या कोणत्यातरी कंपनीची जाहिरात म्हणून काढलेले चित्र आहे. वेगवेगळ्या बायकांनी (मॉडेल्सनी) वेगवेगळ्या रंगांचे हेअरडाय वापरलेले आहेत, आणि ते सर्व वेगवेगळे हेअरडाय वापरलेली चारही मॉडेल्स ही एकाच फ्रेममध्ये बसावीत, पण त्याचवेळी त्यांचे केस प्रकर्षाने दिसावेत, म्हणून गरजेप्रमाणे त्यांच्या माना वाकवलेल्या आहेत.

शिवाय, ग्रूप फोटोमध्ये बसवतात तसे चौघीजणींना खुर्च्यांवर एका रांगेत बसवता आलेही असते. पण सध्या जसे बसवले आहे तसे बसवण्यात एक फायदा आहे. तो म्हणजे, चौघीजणींचे केस वेगवेगळ्या कोनांत हवेत सस्पेंड होऊन उठून दिसतात, शिवाय चौघीजणींना आपापल्या केसांशी वेगवेगळे चाळे करता येतात, ज्याचा एकूण 'इफेक्ट' नैसर्गिक आणि आकर्षक दिसतो. सामान्य ग्रूप फोटोच्या शिस्तीत हे शक्य होत नाही.

बाकी त्या दाणे टिपणार्‍या मोरात काही विशेष गहन अर्थ दडलेला असावा, असे आम्हांस वाटत नाही. त्याला एक 'प्रॉप' म्हणून, केवळ 'बरा दिसेल' असे कलाकाराला वाटल्यामुळे घुसडला आहे, असे वाटते. किंवा कंपनीच्या वेगवेगळ्या हेअरडायच्या रंगांची तुलना मोराच्या रंगांशी करून दाखवण्याचा उद्देश असू शकेल. (हिरव्या आणि निळ्या डायनी रंगवलेले केसवाल्या बायका मोराला खेटून बसलेल्या आहेत, याची विशेष नोंद घ्यावी.)

मोर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुन दाखवला आहे व तो आजच्या स्त्रिच्या हातून दाणे खाताना म्हणजे ते स्वप्न आजच्या स्त्रीने खरे केले आहे हे दाखवायला काढला असावा.

हे स्पष्टीकरण भारदस्त वाटण्यासारखे असले, तरी दुर्दैवाने याहून खूपच सोपे असे स्पष्टीकरण शक्य आहे, असे सुचवावेसे वाटते.

मूळ प्रश्न, 'फक्त लाल केस असलेल्या बाईकडूनच दाणे टिपणारा मोर का आहे, चारही बायकांकडून दाणे टिपणारे मोर का नाहीत' असा आहे. त्याच्या समाधानाकरिता:

- 'मोर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून दाखवला आहे',
- 'त्या चार स्त्रिया या वेगवेगळ्या काळांतील स्त्रीची प्रतीके आहेत', आणि
- 'तथाकथित आजच्या स्त्रीच्या हातून मोर दाणे खात आहे म्हणजे तथाकथित आजच्या स्त्रीने ते स्वप्न खरे केले आहे',

ही तीनही गृहीतके पूर्णपणे अनावश्यक आहेत, असे सुचवावेसे वाटते.

वर म्हटल्याप्रमाणे 'मोर हा कसलेही प्रतीक नसून केवळ प्रॉप म्हणून किंवा हिरव्या आणि निळ्या हेअरडायच्या रंगांच्या तुलनेकरिता उभा केलेला आहे', आणि 'चारही स्त्रिया या कंटेंपररी मॉडेल्स आहेत' असे जरी मानले, तरीही या बाबीचे स्पष्टीकरण देता येऊ शकते. 'चार मोर एका फ्रेममध्ये बसवणे शक्य झाले नसते' आणि 'एक मोर कोणत्याही एका क्षणी - चित्र ज्या क्षणाचा स्नॅपशॉट आहे त्या क्षणी - फक्त एकाच बाईकडून दाणे टिपू शकतो', एवढे लक्षात घेतले, तरी पुरे.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी. अर्थात, सदर चित्रात तो राजकीय सत्तेचे रुपक म्हणून आला आहे. चारही स्त्रीया सांप्रतच्या भारतीय राजकारणातील प्रभावशाली अशा चार महिलांचे रुपक आहेत, असे मानण्यास जागा आहे.

उजवी कडील, खालच्या बाजूस असलेली निळ्या केसांची स्त्री म्हणजे मायावती. पददलित असल्याची चर्या आणि केसांचा निळा रंग हे तेच प्रतीत करतात, नाही का?

तिच्याच डाव्या बाजूला बसलेली, लाल केसांची स्त्री म्हणजे जयललिता. सत्तेचा माज पहा कसा तिच्या रोमारोमात भिनलेला दिसतोय!

हिरव्या केसांची, शांतीचा संदेश देत असलेली स्त्री म्हणजे सोनिया गांधी. इतर कोणी काय वैयक्तिक टीका-टिपणी करते आहे, त्याला शांतपणे फाट्यावर मारत बसली आहे.

सर्वात मागची आहे ती सुषमा स्वराज. यदा-कदाचित सोनिया अथवा राहुल पंतप्रधानपदावर बसलेच तर, नुकताच राजघाटावर केला त्यापेक्षा अधिक भयंकर असा तांडव नाच करण्याची प्रॅक्टीस करीत आहे.

थोडक्यात, भारताच्या सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे हे चित्र, नकीच अतिशय महान आहे.

सहज's picture

25 Jul 2011 - 12:43 pm | सहज

हे विश्लेषण फार आवडले.

विजुभाऊ's picture

25 Jul 2011 - 1:55 pm | विजुभाऊ

सर्वात मागची आहे ती सुषमा स्वराज.
मग त्यांच्या मागे असलेला हात हा संघाचा हात समजायचा का?
( पळा आता..............)

निनाद's picture

25 Jul 2011 - 12:12 pm | निनाद

सहज एकदम जबरी माणूस आहे - साष्टांग नमस्कार!

अविनाशकुलकर्णी's picture

25 Jul 2011 - 12:19 pm | अविनाशकुलकर्णी

हे केसांचे रंग (हेअरडाय) बनवणार्‍या कोणत्यातरी कंपनीची जाहिरात म्हणून काढलेले चित्र आहे
+११

विसुनाना's picture

25 Jul 2011 - 12:41 pm | विसुनाना

चित्र आवडले. गडद निळ्या-काळ्या पार्श्वभूमीवरील उठावदार रंगांमुळे आकर्षक आहे. वापरलेले रंगही मुद्दाम भडक (फ्लुरोसंट) वापरले असावेत असे वाटले.

चित्राचा विषय 'स्त्री' हा आहे हे तर स्पष्टच आहे.
चित्रकाराला हे चित्र काही विशिष्ट कथानक विषद करण्यासाठी काढावेसे वाटले असेल असे नाही. त्याच्या प्रत्येक चित्राने काही 'सुफळ संप्रुण कहाणी' सांगायला हवी असे नव्हे. चित्रकारातल्या माणसाने एका विशिष्ट दृष्टीकोनातून चित्रविषयाकडे पाहिले तर त्याने काय विचार केला असेल त्याचे एक प्रतिक म्हणून या चित्राकडे पाहता येईल.
किंवा प्रेक्षकही एकूण 'स्त्री'बद्दल कसा विचार करतात त्याचेही द्योतक म्हणजे या चित्राचा संदिग्ध 'अर्थ' म्हणता येईल.

चित्रकाराने हे चित्र द्रौपदीचे म्हणून काढले असते तर त्याला द्रौपदी/पांचाली अथवा तत्सम नाव दिले असते. पण तसे नाही. म्हणूनच हे चित्र कोणत्याही विशिष्ट स्त्रीचे नाही हे स्पष्ट आहे.येथे याच चित्रकाराच्या 'पिजन गर्ल्स' या नावाच्या चित्राचा उल्लेख करतो. या चित्रात स्त्री आणि कबुतर यांच्यातले दुहेरी साम्य चित्रकाराने दाखवले आहे. सौंदर्य आणि पारतंत्र्य यांचा संयोग त्या चित्रात दिसतो. असा त्या चित्राचा मला थेट अर्थ लागतो.(इतरांना तो तसा लागावा असा आग्रह नाही.)

मला तरी हे वर दिलेले चित्र दोन स्त्रियांचे वाटले. दोन स्त्रियांचे बाह्यरूप आणि अंतर्रूप. एक सामान्य, एक सशृंगार. एकूण चार प्रतिमा. पुन्हा, मी जो विचार केला तसाच इतरांनी करावा असे नाही.

स्वतः चित्रगुप्त यांना कोणता अर्थ अभिप्रेत असावा तो त्यांनी सांगावा असा आग्रह आहे. आणि मी लावलेला अर्थ फारच ताणलेला वाटला तर हसून सोडून द्यावा. :)

बद्दु's picture

25 Jul 2011 - 5:36 pm | बद्दु

दोन स्त्रियांचे बाह्यरूप आणि अंतर्रूप. एक सामान्य, एक सशृंगार. एकूण चार प्रतिमा.

वरील मताशी सहमत. फक्त दुसरी प्रतिमा पहिल्या प्रतिमेचे अंतरंग दाखविते असे म्हणता येईल ...

भडकमकर मास्तर's picture

25 Jul 2011 - 12:49 pm | भडकमकर मास्तर

सहजरावांचा अर्थ माझ्या मनातील अर्थाच्या बराच जवळ जाणारा आहे...

इतर प्रयत्न म्हणजे..
१.भारतीय संस्कृती.. विविधतेतून एकता.. आणि ( वरचे राजकारणाचे भारी उल्लेख वगैरे) वगैरे.. मोर राष्ट्रीय पक्षी.. भारत देश

२. आंतरराष्ट्रीय राजकारण... भारताची बाजारपेठ ( मोर राष्ट्रीय पक्षी.) क्याप्चर करू पाहणार्‍या मायावी आंतरराष्ट्रीय शक्ती वगैरे कोनही याला लावता येइल... लाल केस चीन / कम्युनिझम वगैरे... आणि उगीच ओढाताण करून बाकीचे कलर वाटप इतर देशांना .
३.महाराष्ट्राच्या राजकारणात शिरावे... रिडालोस आघडी बनली तेव्हा जे एकत्रीकरण झाले त्यावेळचा हा प्रसंग आहे.... मोर हे सत्तेचे प्रतीक आहे... वगैर वगैरे

अवांतर : चित्रगुप्तांच्या खिलाडू वृत्तीला धन्यवाद ..... मी त्यांच्या जागी असतो तर माझ्यासकट सार्‍या मंडळींनी तोडलेले हे तारे पाहून काय वाटले असते कल्पना करवत नाही...

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2011 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार

'पाय नसलेला मोर आणि कंबरेखालचा भाग नसलेल्या बायका' ह्या चित्रातून चित्रकार पोलिओ निर्मुलनाचा संदेश देत आहे.

एम्.एफ. परुसेन

धमाल मुलगा's picture

25 Jul 2011 - 2:00 pm | धमाल मुलगा

शिवाय, रेखाटलेल्या चित्रातील स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रप्रावरणे पाहून त्या स्त्रिया स्वधर्मीय असाव्यात असाही कयास लावता येतो.

- ( ) ध.

अर्धवटराव's picture

25 Jul 2011 - 11:45 pm | अर्धवटराव

फुटलो हसुन ...
तुमच्या सिरियस अ‍ॅनॅलिसीसवर हसलो म्हणुन रागाऊ नका हां पराशेठ !!

(पिकासो) अर्धवटराव

गणपा's picture

25 Jul 2011 - 1:17 pm | गणपा

लोकांच्या बुद्धीला आणि कल्पना शक्तीला खतपाणी घालणारा उत्तम धागा काढल्या बद्दल सहजमामांचे आभार. (या निमित्ताने का होईना ते लिहिते झाले.)
चित्रकलेशी दुर दुर वर आमचा कसलाही संबंध नाही. तस्मात उगाच आपल्या अकलेचे काय तारे तोडावे?
धाग्यावर नजर ठेवुन आहे.

चित्रगुप्तांनाही विनंती की त्यांनी यथावकाश या धाग्यावर येउन त्यांनी या चित्राबद्दल थोडे भाष्य करावे.

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2011 - 9:41 am | स्वाती दिनेश

लोकांच्या बुद्धीला आणि कल्पना शक्तीला खतपाणी घालणारा उत्तम धागा काढल्या बद्दल सहजमामांचे आभार. (या निमित्ताने का होईना ते लिहिते झाले.)
अगदी,अगदी...गणपासारखेच..
स्वाती

चित्रगुप्त's picture

25 Jul 2011 - 1:47 pm | चित्रगुप्त

चालूद्या चालूद्या... खूपच छान लिहीत आहेत सर्व जण ...

नितिन थत्ते's picture

25 Jul 2011 - 1:58 pm | नितिन थत्ते

मला वाटते सर्व स्त्रिया मॊडर्न जमान्यातल्याच आहेत. त्यांच्या माना कललेल्या आहेत कारण त्या मोबाईलवर बोलत आहेत.

त्यांचे हात आपल्या कानाजवल आहेत. परंतु तेथे ब्लॆकबेरी दाखवावा की आयफ़ोन दाखवावा याचा निर्णय न होऊ शकल्याने चित्रकाराने ती कल्पना करण्याचे काम पाहणायांवर सोडले आहे.

तिसरीकडे साधा फ़ोन आहे पण ती फ़ोनवर बोलता बोलता कामही करत आहे म्हणून तिने तो फ़ोन कान आणि खांदा यांमध्ये पकडला आहे. त्याचवेळी कामाच्या चिंतेने तिने कपाळालाही हात लावला आहे.

सर्वात समोरची, चवथी स्त्री, जी मोरांस दाणे चारत आहे, तिने कानात हँड्सफ्री ब्लुटुथ लावले असावेत हा कयास थत्तेचाचांनी दिला नसल्यामुळे समीक्षा अर्धवट राहिलेली आहे असे नमुद करतो...

पंगा's picture

26 Jul 2011 - 11:44 am | पंगा

...कान केसांनी झाकले गेल्याने ते दिसत नसावेत, अशी अटकळ आम्ही बांधतो.

बाकी, हा मुद्दा आपण उपस्थित करेपर्यंत सदरहू व्यक्तीच्या कानांकडे आमचे लक्ष वेधले गेले नव्हते, हे येथे प्रामाणिकपणे नमूद करतो.

वपाडाव's picture

26 Jul 2011 - 5:16 pm | वपाडाव

ह्यालाच जिज्ञासु वृत्ती म्हणतात.
सर्वांगावर चर्चा होतेय ना..
मग त्यावर(ही) लक्ष देणे हे क्रमप्राप्तच...

कवितानागेश's picture

25 Jul 2011 - 3:33 pm | कवितानागेश

:D

विनायक प्रभू's picture

25 Jul 2011 - 4:11 pm | विनायक प्रभू

मला तर बॉ ही वादळापुर्वीची शांतता वाटतेय.

श्रावण मोडक's picture

25 Jul 2011 - 6:07 pm | श्रावण मोडक

बायका चार दिसतात. हात मात्र सात दिसतात. त्यापैकी चारच हातांची दोन बायकांशी सांगड घालता येते. इतर तीन हातांची सांगड अशक्य. एकूण, चार बायका एकत्र आल्या की काय आणि कसा गोंधळ होऊ शकतो याचे प्रतिबिंब या चित्रात उमटले आहे. मोर काय, रंगबेरंगी केस काय, वेगवेगळ्या अंगछटा काय, चेहऱ्यावरचे भावनाकल्लोळ काय... ;)

पुष्करिणी's picture

25 Jul 2011 - 4:37 pm | पुष्करिणी

मागच्या ३ स्त्रीया मोराला दाणे खाउ घालणार्‍या बाईंच्या मनातील विचार आहेत असं वाटतय. तिचा एकटीचाच आख्खा चेहरा आणि हात एकाच रंगाचे आहेत. बाकीच्या बायकांचं कपाळ + नाक उरलेल्या चेहर्‍यापेक्शा वेगळ्या रंगाचं आहे.

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2011 - 5:25 pm | मुक्तसुनीत

सहजराव जिंदाबाद ! एकेक प्रतिसाद वाचतो नि हसतो आहे. सुषमा स्वराज एकदम भारी. लगे रहो.

इंटरनेटस्नेही's picture

26 Jul 2011 - 12:11 am | इंटरनेटस्नेही

=))

शशिकांत ओक's picture

26 Jul 2011 - 12:30 am | शशिकांत ओक

चारचौघींचे नयनसुख
अनेकांनी जे कथन केले आहे ते नेमके खुद्द चित्रगुप्ताला चित्र साकार करताना तसेच वाटत होते का असा प्रश्न पडतो.
ते चित्र आहे. पहाणाऱ्याने आपल्या कल्पनाशक्तीचा विवेकी वापर करून त्याला आपापल्या मनाने अर्थ द्यावा.
प्रत्येक वेळी कलाकृती मधून काही अर्थ शोधला पाहिजे असे नाही.
फक्त नयनसुख घ्या .

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2011 - 9:00 am | राजेश घासकडवी

चित्रांची सांकेतिक भाषा वगैरे मला नीटशी कळत नाही. अमुक रंगाचा अर्थ तमुक मूडशी संबंधित असतो वगैरे मला कुठचा राग कुठच्या वेळी गायचा यासारखंच वाटतं. काही गाणी आवडतात, भारावून टाकतात, तसं चित्रांचंही होतं.

या विशिष्ट चित्राकडे मी काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संकल्पचित्र म्हणून पहातो आहे. लहानपणी आपल्याला तीन त्रिकोण, चार वर्तुळं, दोन रेषा वगैरे काढायला सांगून त्यात रंग भरायला सांगायचे. अशा चित्रात अर्थापेक्षा रंगसंगती, मांडणी, तोल साधणं, जमलंच तर पोत इत्यादीनीच चित्र खुलतं. तसंच या चित्राचं आहे.

पहिल्यांदा दिसतं ते चार बायका, सात हात, आणि त्यांचे विविधरंगी झगझगीत पेहराव व केस. पण नीट बघितलं तर त्यामध्ये एक काहीतरी लय जाणवते. या स्त्रियांचे चेहेरे व हात बघितले तर त्यांची मांडणी एका मोहक पॅटर्नमध्ये आहे. मी खाली चित्रात आउटलाइन काढून दाखवला आहे.

सरळ चेहेऱ्याची स्त्री हा फोकल पॉइंट आहे. सर्व हातांनी तिच्याभोवती एक महिरप केलेली आहे. ताटाभोवती रांगोळी काढावी तसा काहीसा त्यातून फील येतो. महिरपीला भोवती कुयऱ्या काढाव्या त्याप्रमाणे इतर तीन चेहेरे फुललेले आहेत. स्त्रियांच्या कपड्यांवरच्या रेषादेखील या महिरपीच्या मुळाला जोडल्या की त्या स्त्रीच्या चेहेऱ्याभोवती कोंदण करतात. एकंदरीत चित्राच्या मांडणीला एक भारतीय डूब आहे. ती केवळ स्त्रियांच्या कपड्या-आभूषणांतून, रंगसंगतीतून, मोर असण्यातूनच नाही, तर या रचनेतूनही दिसते.

मग इतर तीन स्त्रिया या पहिलीचीच वेगवेगळी रूपं आहेत का? शक्य आहे. चेहेरेपट्टी तर मिळती आहे. कदाचित शृंगार, सख्याची वाट पहाणं, व अखेर थकून जाणं अशा तीन अवस्था दाखवल्या असतील. हा निव्वळ अंदाज आहे.

या चित्रात मला खटकलेली गोष्ट एकच. ती म्हणजे हिरवे केस (की दुपट्टा?). इतर रंगांच्या मानाने तो अधिक भडक असल्यामुळे लक्ष विचलित करतो.

मला यामध्ये दबंग च्या मुंनीच च दर्शन घडल

सर्व बायकांच्या माना मुरगळलेल्या आहेत :D
त्या ,'आम्हाला लावायला झंडूबाम द्या' असे सुचवत असाव्यात

सहज's picture

26 Jul 2011 - 9:17 am | सहज

प्रतिसाद आवडला. एखादे फूल त्यातील वेगवेगळ्या दिशेला वळलेल्या पाकळ्या तसे स्त्री व तिचे वेगवेगळे भाव.

कवितेतील शब्दांचा अर्थ वाचक वेगवेगळ्या प्रकारे लावतो. कवीच्या मनात तसे असेलच असे नाही. इथे तर चित्र आहे. त्यामुळे चित्रकाराची दृष्टी, विचार समजुन घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. चित्रकाराची चित्रामागची भूमीका कळली तर चित्रे बघायची वेगळी दृष्टी मिळेल व पुढल्या वेळी कलाप्रदर्शन बघण्यात अजुन रस निर्माण व्हावा, रसास्वाद घेणे अजुन आनंददायी व्हावी ह्याच विचाराने धागा काढला आहे.

महीला सदस्य मिपाकरांकडून अजुन प्रतिसाद अपेक्षीत आहेत.

भडकमकर मास्तर's picture

26 Jul 2011 - 10:55 am | भडकमकर मास्तर

महीला सदस्य मिपाकरांकडून अजुन प्रतिसाद अपेक्षीत आहेत.

कविता मागवा सहजराव...
प्रचंड येतील...
"गद्यात काय मज्जा नाय वो"

सहज's picture

26 Jul 2011 - 11:07 am | सहज

शरदिनी अक्कांना चित्र कसे वाटले हे जाणुन घ्यायला आवडेल हो मास्तर!

काय आहे हे चित्राचा विषय 'स्त्री' आहे. काढले आहे पुरुष चित्रकाराने. तर हे चित्र, चित्रकाराचे (पुरुष) सृजन / अविष्कार आहे की चित्रकाराने तटस्थपणे कॅमेरात भाव पकडावे तसे नैसगीक भाव पकडले आहेत हे अजुन चांगल्याप्रकारे समजुन घेण्याकरता स्त्रीयांचा या चित्राविषयी विचार महत्वाचा वाटतो म्हणुन.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jul 2011 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

अंगभर कपडे घातलेल्या स्त्रीयांची चित्रे काढणार्‍यास चित्रकार म्हणावे काय? तसेच सदर सदस्य अनवाणी हिंडतात, का चप्पल घालून हे कळल्याशिवाय एकदम त्यांना चित्रकार म्हणून मान्यता देणे चुकीचे वाटते.

छोटा पॉर्न

आनंदयात्री's picture

26 Jul 2011 - 8:02 pm | आनंदयात्री

प्रकाटाआ

"मिळून सार्‍याजणी"च्या मुखपृष्ठासाठी मागणी आली म्हणून काढले का?

मनीषा's picture

26 Jul 2011 - 4:28 pm | मनीषा

अतिशय सुरेख चित्र .. ...

या चित्रात सर्वात लक्षवेधी वाटतात ते म्हणजे या स्त्रियांचे डोळे ..
त्या डोळ्यातून अनेक भाव प्रकट होत आहेत (असं मला वाटतं)
स्त्रीची अनेक रूपे येथे रेखलेली असावी असे वाटते. कदाचित एका स्त्री ची विविध प्रसंगातली, परिस्थितीतील आणि कालातील रेखाचित्रे असू शकतील , किंवा अनेक स्त्रीयांच्या एकाच कालातील विविध भावमुद्रा असतील.
यात हिरवे , निळे इ. रंगाचे दुपट्टा , अथवा पदर असावे असे वाटते. ( रंग हे मनातील भावना दर्शवतात असे म्हणतात ),
या चार स्त्रीयांच्या मागे सुद्धा हात आणि नंतर काही आकृती (रेषा) दर्शवलेल्या दिसतात . त्याही स्त्रीयांच्याच आकृती असाव्यात,पण ज्यांचे चेहरे दिसत नाहीत, कदाचित त्याचा अर्थ असा असेल कि आपण बघू शकतो अशा दर्शनीय भाव भावनां व्यतिरिक्त अनेक भाव आहेत जे रेखाटता येत नाहीत पण त्याचे अस्तित्व जाणावते.
त्यातील सर्वात पुढची (मोराला दाणे देणारी ) स्त्री म्हणजे समाजासमोर येणारं (आणि सामाजमान्य ) स्त्री रुप . स्त्री म्हणजे माया , ममता , वात्सल्य यांचं प्रतिक मानलं जातं . मोराला दाणे देणारी स्त्री हे स्त्री जातीचं प्रातिनिधिक रुप असावं ..

अर्थात हा मी लावलेला अर्थ ..
(अन्यथा मला 'चित्रं छान आहे' याहून जास्तं काही कळत नाही )

सहज's picture

26 Jul 2011 - 4:51 pm | सहज

छान अर्थ लावलात तुम्ही. आता सर्वात मागची (सुषमा) ही सुखस्वप्नात रंगलेली , त्यापुढील (सोनीया) किंचित स्तब्ध, गंभीर झालेली, त्यापुढील (माया) जास्त चिंतीत व पुढची (जया)ही वास्तवात असलेली आपल्या भावना चेहर्‍यावर न दिसण्याची काळजी घेणारी वाटतेय खरी. :-)

धन्यवाद.

धागा अतिशय उत्तम आहे. अशा चर्चा नेहेमी वाचायला मिळोत.
मध्यंतरी नॅन्सी फ्रायडे चं "पॉवर ऑफ ब्युटी" पुस्तक वाचत होते. काही कारणाने अर्धवट टाकून यावे लागले. या पुस्तकात अर्थातच "सौंदर्य" या विषयाचा बहुअंगाने उहापोह झाला आहे. बर्‍याच लहानपणी लेखिकेला लक्षात आले की स्त्री ची लायकी ही पुरषाच्या "नजरेने" तोलली जाते आणि त्याला सुंदर वाटावे म्हणून तिने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अनेक स्त्री-मुक्ती वाल्यांना हे विधान "रिडीक्युलस" वाटेल, मूर्खपणाचे वाटेल पण वास्तव हेच आहे की स्त्रिया पूर्वीपासून ते अजूनही शृंगार करतात, स्वतःला सजवतात आणि ते फक्त स्वतःसाठी किंवा अन्य स्त्रियांसाठी नसते. असो.
_________
या चित्रातील प्रत्येक स्त्री ही मूळात कशीही असो पण मनातून अभिसारीका आहे. सौंदर्यगर्विता आहे. त्यापैकी मोराला (आत्मसमाधान) एकच स्त्री दाणे घालते आहे. ती तेथवर पोचली आहे. तिला तिच्या सौंदर्याची पोचपावती मिळाली आहे. आणि ती आहे देखील सर्वोत्तम. पाणीदार डोळे, पुष्ट शरीर, सरळ नासिका!!
अन्य स्त्रियांची मात्र केवळ धडपडच चालू आहे. या जन्मी त्या मोरापर्यंत (आत्मसमाधान) पोहोचतील अथवा नाहीही पण त्या प्रयत्न करत राहणार.

वपाडाव's picture

26 Jul 2011 - 6:02 pm | वपाडाव

Clapping Smiley
केवळ अप्रतिम....
अव्वल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2011 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा......! मस्त धागा. :)

-दिलीप बिरुटे

मी त्यांनी दिलेल्या दुव्यावर जाऊन बघीतली. प्रत्यक्ष चित्र बघणे आणि जालावर बघणे यात बराच फरक पडतो. महत्वाचा फरक असा की चित्राचे पोत जालावर कळत नाही.
मला या चित्रात पाच स्त्रियांचे अस्तित्व जाणवले.पाचवी व्यक्तीरेखा लपलेली आहे. हातामुळे आणि पदरामुळे आहे ते कळते पण लपलेले अस्तित्व काय आहे ते कळत नाही. निळ्याशार गूढ आणि खोल पार्श्वभूमीवर या अविष्काराची गूढता आणखी वाढली आहे.एकाच स्त्रीची पाच रुपे असेही म्हणता येईल.लपलेल्या स्त्रीपासून विपुलस्तना स्त्रीपर्यंतचे दर्शन एकाच व्यक्तीचे असावे असे वाटते. आधी लपून विचार करणारी -त्यानंतर दोलायमान अवस्थेतील नंतर विचारपूर्वक मोराला हवे ते देणारी अशी स्त्री मला या चित्रात दिसली . पुन्हा एकदा विचार केला तर सुप्तावस्थेतून -जागृतावस्थेपर्यंत येणारी स्त्री पण मला भासली. हा झाला या पेंटींगचा सरसरे मुआयना. तंत्राविषयी म्हणावे तर काही बाबी खटकल्या. रेषांना वळण चांगले असले तरी सर्व रेषांना एक सहजसा फ्लो नाही. (यात दोष कॅन्वास आणि पेपरचाही असू शकतो.)लमाणी स्त्रीयांसारख्या प्रतिमांचा वापर केल्यामुळे चित्राला मर्यादा आल्या आहेत. पण याहूनही न जमलेली बाब म्हणजे फ्लुरोसंट पेंटच्या वापराने चांगल्या चित्राचे पोस्टर झाले आहे. माझ्या उजव्या म्हणजे चित्रात डाव्या बाजूस असलेल्या स्त्रीच्या हाताची (पंजाची) लांबी इतर दृक परीमाणाच्या मानानी वेगळी झाल्याने चित्र कललेले वाटते.
फार मोठी टिप्पणी लिहावी इतका माझा अभ्यास नाही पण जे समजले ते लिहीले.

पैसा's picture

26 Jul 2011 - 8:52 pm | पैसा

सुनील, थत्ते, पंगा, परा, धम्या सगळ्यानीच मस्त धमाल आणलीय. शुचीचा प्रतिसादही उत्तम.

चित्राकडे थोडं गंभीरपण पहायचं तर राजेश घासकडवीचा प्रतिसाद आणखी पुढे नेत म्हणते, की एखाद्या फुलांच्या गुच्छासारखी चित्राची रचना केली आहे. चित्रातले रंगही आकर्षक, प्रसन्न असेच वापरले आहेत. प्रवाही रेषा आणि चमकदार रंग चित्र आणखीच उठावदार करतायत. सढळ हाताने वापरलेला गुलाबी रंग प्रेम आणि आश्वासकता दाखवतो.

या चारही स्त्रिया वेगवेगळ्या वयाच्या आहेत असं मला वाटलं नाही, पण त्यांची अंगकांती मात्र वेगवेगळ्या प्रकारची आहे. सावळी, गोरी, पीतवर्ण आणि गव्हाळ असे त्वचेचे चार रंग इथे दिसतात. त्या अर्थाने या स्त्रिया जगातल्या सर्व स्त्रियांच्या प्रतिनिधी आहेत. मागच्या तिन्ही स्त्रियानी मळवट भरावा तसे कपाळावर रंग लेपले आहेत, आणि त्या तिघींच्याही माथ्यावर ओढण्या आहेत. या तिघीही माथ्यावरच्या ओढण्या सावरतायत. म्हणजे स्त्रियानी माथ्यावर पदर घ्यावा ही रुढी त्या पाळत आहेत. या तिघीजणी रुढीत अडकलेल्या स्त्रिया आहेत. आणि त्यांची संख्या अर्थातच जास्त आहे!

चित्रातल्या दोन स्त्रियानी बंजारा स्त्रियांप्रमाणे हस्तिदंती कड्यांचा सौभाग्यालंकार घातला आहे आणि त्यांच्याच कपाळावर बिंदी आहे.या दोघी विवाहित तर उरलेल्या दोघी अविवाहित असाव्यात. या चित्रातला मोर, म्हणजे प्रत्येकाचं श्रेय आहे, की ज्याचा शोध घ्यावा. ज्या स्त्रीने माथ्यावरची रुढींची ओढणी बाजूला सारली आहे, तीच मोराला म्हणजे तिच्या मनातल्या निळ्या पाखराला भेटून दाणे खाऊ घालते आहे.

चित्रकाराला कदाचित हा संदेश द्यायचा असेल, किंवा सोपं स्पष्टीकरण म्हणजे त्याने एक असं चित्र काढलंय जे पाहणार्‍या प्रत्येकालाच आल्हादकारक वाटेल!

माझ्या चित्रावर घडत असलेली चर्चा अतिशय प्रगल्भ, विचारपूर्ण अशी आहे. मनोरंजक तर आहेच.
एवढ्या वेगवेगळ्या भूमिकातून एका चित्राकडे बघितले जाऊ शकते, हे मला अद्भुत वाटते.
मी हे चित्र किंबहुना एकंदरित चित्रे काढतानाची भूमिका, तंत्र वगैरेवर लेख लिहिण्याच्या काहीसा तयारीत आहे, म्हणजे हा विषय मनात घोळत आहे.
लवकरच प्रत्यक्ष लेखन करेन.

स्वतः चित्रगुप्त तसेच चिंतातुर जंतू यांचे विवेचन वाचण्यास आवडेल.

धनंजय's picture

28 Jul 2011 - 2:44 am | धनंजय

चित्र अतिशय सुंदर आहे.

श्री. राजेश घासकडवी म्हणतात, थोडाफार त्याच्यासारखाच माझा विचार आहे.

चित्रावर केलेली पुढील रेखांकने बघा (चित्राच्या समीक्षेकरिता श्री. चित्रगुप्त यांची अनुमती आहे, असे त्यांच्या प्रतिसादावरून गृहीत धरलेले आहे) :

नैरृत्येकडील स्त्री ही काही (आदमासे) समकेंद्री वर्तुळांचे केंद्र आहे. एक स्पष्ट वर्तुळ हातांनी बनलेले आहे (काळे वर्तुळ), चेहर्‍या-नयनांनी एक वर्तुळ बनलेले आहे, तर बाह्य वर्तुळ प्रत्येक स्त्रीचे डावीकडचे केस वा ओढण्यांनी बनलेले आहे (सफेत वर्तुळ). या बाजूला जे हात आहेत, त्यांची दिशादेखील या वर्तुळावरच आहे.
केंद्राकडून बाहेर पडणार्‍या अनेक किरणवजा आकृती आहेत : हातांची मनगटे-बोटे, प्रत्येक स्त्रीचे उजवीकडचे केस किंवा ओढण्या. तसेच मोर आणि त्याचा पिसारा. यातील मोठे पट्टे एचएसव्ही चक्रातील परस्परपूरक रंगांनी आलटूनपालटून रंगवलेले आहेत : गुलाबी (फ्यूशिया/फूक्शिया) आणि हिरवा (लाइम ग्रीन)

(रंगचक्र विकिपेडियावरून - क्रिएटिव्ह कॉमन्स प्रत-अधिकार)
(दुसरी एक बाब : या चित्रात निळा आणि शेंदरी हे दोन परस्परपूरक रंगसुद्धा वापरलेले आहेत.)

सर्व स्त्रिया मिळून एक मयुराकृती तयार करतात. चेहरे आणि डोळे म्हणजे या पिसार्‍यावरचे "डोळे"च होत. केंद्रापासून बाहेर पडणार्‍या किरणाकृती आकृती म्हणजे लांबलांब पिसे होत.

या मयुराकृतीला शिर-तुरा आणि वळणदार मान देखील आहे : ही आकृती केंद्रवर्ती स्त्रीच्या हातांनी तयार होते. अतिशय बारीक सफेत लेखणीने मी ही आकृती ढोबळपणे रेखाटलेली आहे. केंद्रवर्ती स्त्रीचा केशसंभार हा समकेंद्री वर्तुळांचा पिसारा मयुराकृतीच्या देहाला जोडतो.
- - -
मयुराकृतीचा हट्ट सोडून सुद्धा या चित्राच्या मांडणीमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत : प्रत्येक स्त्री ही बर्‍याच बाबतीत अन्य स्त्रियांसारखी आहे, पण कुठल्यातरी एका बाबतीत विलक्षण आहे. उदाहरणार्थ उत्तरेकडची (=वायव्येकडची) स्त्री ही एकटी तिच्या उजवीकडे कटाक्ष टाकत आहे. त्यामुळे तिच्या कटाक्षात काही कथा सांगितली जाते आहे.
- - -
एचएसव्ही रंगसंगती ही अलीकडच्या-अलीकडच्या दशकांत प्रचलित झालेली आहे. यातील "सब्ट्रॅटिव्ह" रंग पूर्वीच्या काळी फक्त रंगीत काचांनी बनवलेल्या चित्रांत दिसत असत. चित्रातील स्त्रिया मात्र कुंकू-दागिने आणि चारपैकी दोघांच्या डोक्यावर पदर असल्यामुळे पारंपरिक आहे. हा नव्याजुन्याचा मिलाफ आवडण्यासारखा आहे.
पारंपरिक असून सुद्धा स्त्रियांच्या डोळ्यांत शांत का होईना कामुकता आहे. नैरृत्येकडल्या स्त्रीचा पदर ढळला असूनही ती कामिनीच वाटते, वखवखलेली वाटत नाही.
- - -
सर्व रेषांना अलगद बाकदारपणा आहे. त्यामुळे चित्राला एक मृदुता येते. दोन "कोनदार" पुरुष तत्त्वे चित्रात आहेत : नैरृत्येच्या कापडावरील सरळ रेषा/कोनांचे डिझाईन, आणि आग्नेयेकडचा मोर डौलदार, पण "नर"पक्षी.
- - -
हिरवा रंग आधी थोडा आवडला नव्हता. पण निरखून बघता आवडू लागला आहे.

सोत्रि's picture

28 Jul 2011 - 9:34 am | सोत्रि

मला तर एकदम डॅन ब्राउनच्या 'द दा विंची कोड' च्या धर्तीवर 'द दा चिगु कोड' वाचतो आहे अस्सा भास झाला क्षणभर.

- (दा विंची भक्त) सोकाजी

सहज's picture

28 Jul 2011 - 10:52 am | सहज

आधी भडक वाटणार्‍या रंगाचा खुलासा मस्तच केला आहे.

धन्यवाद धनंजय.

सोत्रि's picture

28 Jul 2011 - 10:00 am | सोत्रि

अरे ही तर मुघलकालीन, ऐतीहासिक अशी 'अनेकभार्या शैली' आहे.

एखाद्या मुघल सुल्तानाच्या अनेक बेगमांचे हे चित्र आहे.
सुल्तान लढाइ जिंकौन परत येता झाला आहे अशे खबर नुकतीच आली आहे.

आणि त्यामुळे आता 'मेरा नंबर कब आयेगा' ह्या विवंचनेत असलेल्या त्याच्या ह्या बेगमा आहेत.

जी भार्या मोराला दाणे टाकत आहे ती आवडती, 'पट्टराणी' आहे. बघा तिच्या चेहेर्‍यावरचा चिंताविरहीत तजेला (माझाच नंबर पहिला हा आत्मविश्वास) , डोक़्यावर मुकुट, तिचा एकंदर डौल.

निळ्या केसांची भार्या बिचारी 'अडचण' नेमकी आत्ताच यावी ह्या विचाराने डोक्याला हात लावून बसली आहे. तीच्या चेहेर्‍यावरचा 'रक्तिमा' हा गुप्तपणे ही 'अडचण' दर्शवत आहे. (रंगांच्या अधिक माहितीसाठी, बघा धनंजय ह्यांचा प्रतिसादातील रंगचक्र)

सर्वात मागची ह्यावेळी फारच आशावादी आहे, तीच्या पाठी असलेला एक हात "भीउ नको मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून तीचा आत्मविश्वास वाढवत आहे, तीच्या चेहेर्‍यावरचा हा आत्मविश्वास आवडतीच्या सडेतोड आहे

हिरव्या केसांची भार्या एकदम शांत आहे. 'पदरी पडले आणि पवित्र झाले' असा धीर्गंभीर विचार करणारी काहिशी विरक्त अशी भार्या आहे. हिरवा रंग तीची ही धीर्गंभीरता दर्शवतो आहे.

- (अनेकभार्या शैलीचा पुरस्कर्ता) सोकाजी

सहज's picture

28 Jul 2011 - 10:55 am | सहज

हा हा हा.

बाकी भगवान देता है तो छप्पर फाडके प्रमाणे अडचण आली तर ती फार मोठ्याप्रमाणावर देखील येउ शकेल बर का! मग नाही आवडायची बहुभार्या शैली. बघा आपले पूर्वज हुशार चा पुन्हा एकदा पडताळा आला. आपल्याकडे बहुभार्या शैलीपेक्षा, अन्यत्र अंगवस्त्र पद्धत जास्त प्रचलित!

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2011 - 10:09 am | स्वाती दिनेश

प्रतिक्रियांमधील वेगवेगळे अर्थ वाचते आहे, चर्चा आवडते आहे.
स्वाती

विसुनाना's picture

28 Jul 2011 - 10:57 am | विसुनाना

पुन्हा एक समिक्षण. यावेळी थोडे ह. घ्या. स्वरूपातले.
हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट शैलीतले स्मिता पाटील - शबाना आझमी यांचे पोर्ट्रेट आहे.
मागच्या दोन स्मिता पाटील - सर्वात मागची निशांतमधली, पुढची अर्थ मधली.
पुढच्या दोन शबाना आझमी - मागची निशांतमधली, पुढची अर्थ मधली.
मोर म्हणजे पुरुष. ;)

सर्वांनी अतिशय आत्मियतेने प्रतिसाद दिले, अत्यंत उद्बोधक, मनोरंजक विचार मांडले, याबद्दल सर्वांचे आभार.

चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
असा लेख लवकरच येतो आहे.

सहज's picture

8 Aug 2011 - 7:32 am | सहज

धाग्यात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद.