गाभा:
आजच मटामध्ये ही मजेशीर बातमी वाचली आणि मटाची पातळी कुठवर उतरलीय याचे परत एकदा प्रत्यंतर आले.
या निमित्ताने काही प्रश्न मनात उभे राहीले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9282021.cms
१) लग्न झाल्यावर कुत्री व मांजरी दिल्या घरीच राहायला जाणार का?
२)सासरी गेल्यात तर त्यांच्या पालनपोषणाचा खर्च कोण उचलणार?
३) काही कुत्रे व बोके घरजावई होउन राहणे तयार असल्यास दोघांचेही मालक त्यास तयार होतील काय?
४)लग्न न होणारी कुत्री फिट नसतात काय?
५)आपले लग्नमुहूर्त प्राण्यांसाठी पण लागू असतात काय?
६)कुत्र्या, मांजरांच्या पिल्लांवर हक्क कोणाचा?
७)जोड्यांमध्ये वा मालकांमध्ये वाद झाल्यास घटस्फोटाची कायदेशीर तरतूद आहे काय? तसे नसल्यास दुसरी काय व्यवस्था आहे?
८)गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण कधी करणार?
प्रतिक्रिया
19 Jul 2011 - 2:23 pm | मृत्युन्जय
गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण कधी करणार?
हा काथ्याकूट प्रथमदर्शनी वाटतो तेवढा साधा दिसत नाही. मटाच्या खांद्यावर बंदूक ठेवुन गविंवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न दिसतोय :P
19 Jul 2011 - 2:57 pm | गणेशा
और गिटार-६ इथपर्यंतच वाचले होते मी.
आज ब्राऊ -१ पाहिला .. य धाग्याचे तेच श्रेय माझ्यासाठी ..
गवि लिहा हो पुढे.. नाहितर आज मटाची बातमी आणायला लागली .. उद्या आनखिन कसल्यातरी बातम्या आणाव्या लागतील
19 Jul 2011 - 2:43 pm | मेघवेडा
>> मटाच्या खांद्यावर बंदूक ठेवुन गविंवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न दिसतोय
तर.. तर! शीर्षकसुद्धा कसं दिलंय पाहा की.. "काय गवि, यंदाच्या वर्षात गोष्ट पूर्ण करणार ना?" हेच त्यांनी किलोमीटरभर वळसा घालून विचारलंय आणि काय! ;)
19 Jul 2011 - 2:23 pm | स्पा
खिक....
मटा आता संध्यानंद ला मागे टाकणार अस दिसतंय :)
19 Jul 2011 - 2:31 pm | स्मिता.
मटामधील बातमी टाईम्स गृपला साजेशी आचरट असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून फक्त ८व्या प्रश्नावर चर्चा व्हावी.
गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण कधी करणार?
19 Jul 2011 - 2:36 pm | गणपा
त्या पिवळ्या कागदा वाल्या मटावर इथे चर्चा घडवुन मिपाची बँडविड्थ आणि आपली शक्ती व वेळ का खर्ची घालावा?
गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण कधी करणार? असा एकोळी धागा होउ नये म्हणुन तर हा प्रपंच नाही ना ? ;)
19 Jul 2011 - 2:39 pm | प्रचेतस
म्हटला तर आहे, म्हटला तर नाही ;)
19 Jul 2011 - 2:47 pm | गवि
अरे देवा..एवढे लोक्स वाट पाहताहेत?
प्रदीर्घ उशिराबद्दल क्षमस्व.. मधे जरा काहीच लिहायला जमत नव्हतं (प्रतिसादांशिवाय.. :) ) बी.पी.ओ. ही आधी लिहिलेलीच होती. ती फक्त पोस्ट केली.
आजारपण वगैरे चालू होतं. शांतता नव्हती.
पण आता कारणं बंद. लवकरच ब्राऊ पुन्हा भेटीला येईल..
आता मनाने घेतलंय हे प्रतिसाद पाहून..
19 Jul 2011 - 4:48 pm | गणेशा
मनापासुन आभारी
19 Jul 2011 - 4:52 pm | गवि
अरे आभार कसले त्यात.
तुम्हाला वाचून जेवढा आनंद मिळतो तेवढा किंवा जास्तच मलाही तुम्ही वाचल्यावर मिळतो. तेव्हा फायदा माझाच जास्ती आहे त्यात. तेव्हा तुम्हा सर्वांचेच आभार्स.. :)
20 Jul 2011 - 10:11 am | ऋषिकेश
धाग्याचा उद्देश सफल!
वाट पाहतोय!
19 Jul 2011 - 3:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आता मनाने घेतलंय हे प्रतिसाद पाहून..
हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड हे धत्ताड तत्ताड

:)
19 Jul 2011 - 3:18 pm | मी ऋचा
बास्स! मिशन अक्म्प्लिश्ड! आता धागा वाचनमात्र केला तरी हरकत नाही! ;)