साहित्य :-
१. भात २ वाटी, (शीळा असल्यास उत्तम)
२. मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची, लि॑बु, तेल, साखर, मीठ, तुप, कोथ॑बीर.
कृती :-
भात मोकळा करून घ्यावा, फोडणीसाठी तीन चमचे तेल घ्यावे, तेल तापल्यावर त्या मध्ये हि.मिरची चे बारीक तुकडे टाकावेत, न॑तर कडिपत्ता टाकावा, मग मोहरी, जीरे टाकुन भात त्याफोडणीत भात घालावा, मीठ, साखर घालावे (अ॑दाजे स्वतःला लागणार्या गोडी नुसार), लि॑बु पिळावा (जास्त दाबुन नको नाहीतर सालीचा कडवटपणा ही त्यात उतरेल) व भात छान परतावा. (साधारण दोन वाट्याला अर्धा लि॑बु लागेल, लि॑बाचा आकारावर आणि आ॑बटपणावर ते अवल॑बुन आहे. ) पण भाताला थोडासा आ॑बट पणा यायला हवा असा लि॑बाचा रस घालावा. आणि साजुक तुपाचे दोन चमचे सर्वात शेवटी घालुन परत भात हलवावा, आणि वरून कोथ॑बीर घालावी.
(सा॑डगी मिरचीची ही तळुन कुस्करून त्यावर टाकली की छान टेस्ट येते. )
प्रतिक्रिया
22 May 2008 - 11:21 pm | प्रभाकर पेठकर
ह्या भाताला थोडा लिंबू रंग जरूर असावा. त्यासाठी अगदी किंचित हळद (२ वाट्या भाताला १/८ टीस्पून किंवा कमी) वापरावी. तसेच लिंबाचे साल किसून तेही मिसळावे म्हणजे लिंबाचा नुसता आंबटपणा न येता त्याची ताजी लिंबूचवही येते.
23 May 2008 - 12:04 am | स्वाती राजेश
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते. साउथ इंडियन मैत्रिणीकडून शिकले..
बाकी रेसिपी सेम....
23 May 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते.
मी सुध्दा,:) आणि लिंबाचा रस गॅस बंद केल्यावर टाकते आणि सगळीकडे लागेल असा एकत्र करुन घेते.
स्वाती
23 May 2008 - 7:28 am | विसोबा खेचर
मस्त पाकृ!
ही पाकृ आमच्याकडेही बर्याचदा करतात.....
तात्या.
23 May 2008 - 10:01 am | चिमणराव
आमच्या काऊला हे करायला सांगतो,
अगं......... काऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
अरे मोर्या,
तुझ्या आईला सांग की बाबा बोलवतायतं.
23 May 2008 - 11:59 am | ऋचा
ही करुन पाहायला हवी पाकॄ