गाभा:
शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?
ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?
( एखादा शेअर वर जाईल म्हनून रुमर/अफवा पसरवणारे यात इन्क्ल्युड केलेले नाहीत. रोजच्या ट्रेडिंगसाठी टिप्स सांगणारे, तशा वेबसाइट्स हे इथे अपेक्षित आहे. )
हॅपी ट्रेडिंग !
प्रतिक्रिया
18 Jul 2011 - 10:28 am | सविता००१
अजिबात नको.
व्य.नि.पहावा
18 Jul 2011 - 10:50 am | सुकामेवा
मी स्वतः दलाल स्ट्रीटच्या pop update या सेवेचा एक वर्षभर अनुभव घेतला आहे
हि सेवा चांगली आहे पण तुम्हाला लक्ष ठेवता आले पाहिजे, कधी कधी sms मुळे पण खूप प्रोब्लेम येतो व लॉस होण्याची शक्यता वाढते.
त्याच प्रमाणे ते देतील त्या बऱ्याच शेअर्सवर margin trading उपलब्ध आहे कि नाही ते सुद्धा बघायला लागते. मी स्वतः icici direct चे खाते वापरत असल्याने मला कधी कधी या गोष्टीमूळे समस्या यायची.
या उलट मी म्हणेन कि स्वतः २ कंपनीचे शेअरच्या किमतीचा थोडासा महिनाभर अभ्यास केला तरी साधारण आपल्याला अंदाज येतो.
मी suzlon आणि MRPL या शेअर्सचा अभ्यास करून बऱ्यापैकी पैसे कमवले.
18 Jul 2011 - 10:56 am | सविता००१
पाठवता येत नाहीये. मदत करू शकाल का?
18 Jul 2011 - 10:57 am | JAGOMOHANPYARE
इथेच लिहा.. चालेल.
18 Jul 2011 - 12:28 pm | सविता००१
जरा कामात होते म्हणून उशीर झाला उत्तर द्यायला.
मी कुठ्लाही सल्ला देण्याइतकी जाणती नाही शेअर मार्केट मध्ये. पण http://sharesprofitsure.blogspot.com पहा.
मला स्वतःला यांच्या सेवेचा चांगला अनुभव आहे.
बाकी मी सुद्धा भरपूर साईट्स पाहिल्या. पण फक्त याच साईट्ला पैसे भरले आणिते वाया गेले नाहीत. तुम्हाला हवा तो प्लान घ्या. योगेश सरन म्हणून माणूस या ब्लोग चा मालक आहे.
हॅपी ट्रेडिंग !
अवांतरः तुमचेही या बाब्तीतले अनुभव वाचायला आवडतील.
तुम्ही कशात ट्रेड करता? म्हणजे निफ्टी, इन्ट्राडे की एफ एन ओ?
18 Jul 2011 - 12:54 pm | JAGOMOHANPYARE
मी फ्युचरमध्ये करतो.. पण एखादी चाम्गली सर्विस मिळाली तर शोधत आहे. वेब साइट पाहिली.. धन्यवाद.
18 Jul 2011 - 1:04 pm | सविता००१
मी पण. माझ्याकडे आयसीआय आणि जिओजीत अशी २ पोर्टल आहेत. पैकी जिओजित मस्त आहे. त्यांच्याही फ्यूचर टीप्स चांगल्या असतात.
तुम्ही कोणते पोर्टल वापरता?
18 Jul 2011 - 2:55 pm | आत्मशून्य
एकदम २-३ हजार ब्रोकरेज भरलं अडवान्समधे तर अत्यंत कमी ब्रोकरेजवर ट्रेडींग करता येते. प्लस रीअल्टाइम अपडेट्स चालूच असतात. अकूणच मस्त सेवा आहे त्यांची.
18 Jul 2011 - 3:09 pm | प्रचेतस
आम्ही आपले आयसीआयसीआय डायरेक्ट वापरतो. बचत खात्याला जोडले गेलेले असल्याने उत्तम प्रकारे वापरता येते. डोक्याला काही तगतग नाही. एफडी, ट्रेडिंग, फ्युचर्स, आयपीओ सगळे एकाच ठिकाणावरून करता येते.
19 Jul 2011 - 5:34 pm | आत्मशून्य
सूविधा चांगली आहे पण ब्रोकरेज फार हेवी असतं यांच, अर्थात गूतवणूक म्हणून जर शेअरची खरेदी करत असाल तर ठीक आहे, पण उत्पनाचा प्रमूख स्त्रोत म्हणून जर वापराल तर आयसीआयसीआय डायरेक्ट उलाढालींसाठी अत्यंत महाग आहे. शेर्खान वरील सर्व देतेच पण रीअल्टाइम अपडेट्स व फार अॅड्वान्स इंटर्फेस आणी ऑप्शन देते. तसचं इंट्राडे, शोर्ट सेलींग वगैरेला क्रेडीटही दीले जाते, म्हणजे १०० खात्यात असतील तर ४०० चे व्यवहार करता येतात. आणी ब्रोकरेज बहूधा सगळ्यात कमी. मला तसच स्वतःला आयसीआयसीआय सेविंग अकाऊंट डीमॅट सोबत जोडायचे न्हवतेच म्हणूनच शेर्खानकडे गेलो. पण त्यांच्या सोयी बघून एकदम खूष. त्यांच ट्रेड टायगर टर्मीनल तर अप्रतीमच जर घरातील डेस्कटॉप वा स्वतःच्या लॅपटॉपवरून व्यवहार करणार असाल.
26 Sep 2011 - 11:24 am | मृत्युन्जय
शेयरखानचे ब्रोकरेज सगळ्यात कमी नाही आहे. इंट्राडे ला ५ पैसे आणि डिलीव्हरीला ३० पैसे लावणारे बरेच सापडतील. शेयरखान अनुक्रमे १० पैसे आणि ५० पैसे लावतो.
शेयरखानचा टर्मिनल ऐन मोक्याच्या क्षणी बंद पडल्याचा अनुभव किमान १० वेळी घेतला आहे. मार्केटवर हेवी लोड असेल, मार्केट जोरात गडगडले असेल किंवा चढले असेल तर टर्मिनल बंद पडलेला आढळु शकतो.
शेयरखानची सर्विस थर्ड ग्रेड आहे. तुमच्या अकाउंट मध्ये काही लोच्या झाल्यास, काही क्वेरी असल्यास कित्येक दिवस उत्तर मिळत नाही. फोन केल्यास १० ठिकाणी फिरवतात आणी मग तुम्हाला इमेल करु असे उत्तर मिळु शकते. अर्थात लगेच उत्तर मिळेल अशी काही शाश्वती नाही.
ज्यांना कस्टमाइज्ड सर्विस हवी आहे त्यांनी शेयरखानच्या वाटेला जाउ नये कारण त्यांच्या स्क्वेयर ऑफची सीस्टिम दुर्दैवाने खुप चांगली आहे आणि ऑटोमेटिकली मार्जिनच्या अगेंस्ट ट्रेडिंग केले असेल तर शेअर्स विकले जाउ शकतात (ड्युज ठराविक दिवसांपेक्षा जास्त दिवस असतील तर)
मध्ये एकदा मार्केट पडलेले असताना सुद्धा इंडेक्स वरती दाखवत होते. अर्थात शेयर्सचा भाव बरोबर चालु होता.
अर्थात त्यांचे ट्रेडिंग टर्मिनल एरवी बरेच चांगले आहे.
18 Jul 2011 - 1:14 pm | नरेशकुमार
Esignal, वापरा
18 Jul 2011 - 5:02 pm | JAGOMOHANPYARE
हिस्तरी पाहिली.... ए ग्रुपचे स्तॉक नाहीत. पण प्रोफिट आहे. http://www.dsij.in/Products/PopStocks.aspx
18 Jul 2011 - 8:39 pm | निवेदिता-ताई
एंजल ब्रोकींग वापरा..छान आहे.
18 Jul 2011 - 10:13 pm | शानबा५१२
मी एका अकाउंटमधे काही ४०००० गुंतवले होते,आज दोन महीन्यानंतर त्या अकाउंटमधे ८४९ रुपये आहेत.
फायद्यातले ३० % त्याचे व ७० माझे ह्या बेसीस वर मी एकाला अकाउंट चालवायला दीले होते.आज त्याला काही तीन चार महीने झाले.
पहीले टाटा स्टीलमूळे ~७५०० चा तोटा झाला,नंतर एकदा दोन-चार हजारची पेआउट ऑर्डर टाकावी म्हणुन संपर्क केला तर अकाउंट मधे ८४९ रुपये होते,मी कधीच मार्केटमधे काय चाललय हे विचारले नाही कारण मी ईतर कामात गुंतलो होतो.
तर प्रश्न असा आहे की,
अशा व्यक्तींना पैसे मला न समजता स्वःतासाठी काढ्णे व नंतर त्याला तोट्याचे नाव देणे शक्य आहे का?
18 Jul 2011 - 11:54 pm | कुंदन
खीक .....
कोण हो तो ? ठाणेकर की काय ?
19 Jul 2011 - 1:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>मी कधीच मार्केटमधे काय चाललय हे विचारले नाही.
ही पहिली आणि सगळ्यात मोठी चूक. आपल्या पैशाची काळजी आपणच नाही घेतली तर दुसरा कोण घेणार ?
>>अशा व्यक्तींना पैसे मला न समजता स्वःतासाठी काढ्णे व नंतर त्याला तोट्याचे नाव देणे शक्य आहे का?
सहज शक्य आहे. मात्र तुम्ही हिशोब तपासले तर हे शोधून काढणे पण शक्य आहे. सगळ्या व्यवहारांची लिस्ट मागवा. कुठल्या दिवशी कुठले शेअर कितीला घेतले आणि कितीला विकले याची लिस्ट बघा. मार्केट च्या त्या दिवशी च्या भावाशी ते जुळते आहे का हे बघा.
मागील दोन महिन्यात 40k नुकसान होणे कठीण नसले तरीही त्यासाठी माणूस खूपच नवखा असला पाहिजे. इतकीही वाईट परिस्थिती नाही आहे सध्या.
20 Jul 2011 - 2:49 pm | शानबा५१२
प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे धन्यवाद,
माझे खाते असीत सी मेहता मधे होते.
ह्या घटनेला आता दोन आठवडे झाले.मार्केट पडत होते ईतकेच समजत होते.
'क्रेडीट' वर शेअर घेतल्याने तोटा वाढला.माझ्याकडे सर्व स्लीप्स आहेत पण त्यवरुन ईतका तोटा होईल असे कधी वाटले नव्हते,मी बारकाईने कधी पाहीले नाही.
आता काही हजारांच्या सुरुवातीने पुन्हा काहीतरी सुरु केले तरी नुकसान भरुन काढायला ठोस फायदा होईलच ह्याची हमी हवी,असा काही स्त्रोत आहे का?
पण एक धडा शिकलो....आपल्या पैश्याची कींमत ही आपल्यापेक्षा जास्त कोणालाच नसते व आपण बेफीकीर राहीलो की सर्व आपल्याच अंगाशी येते.
मला ह्यातुनत मार्ग नाही पण नक्की काय झाले हे माहीती कसे करावे ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
20 Jul 2011 - 5:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आता काही हजारांच्या सुरुवातीने पुन्हा काहीतरी सुरु केले तरी नुकसान भरुन काढायला ठोस फायदा होईलच ह्याची हमी हवी,असा काही स्त्रोत आहे का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजाराकडे जुगार किंवा झटपट श्रीमंत होण्याचे साधन म्हणून बघतो, असा माझा अनुभव आहे. शेअरबाजार हा दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे. आणि ते जर नीट केले तर त्यासारखे दुसरे गुंतवणुकीचे साधन नाही.
त्यामुळे माझा सल्ला असा आहे, की तुम्हाला मुळात गुंतवणूक करायची आहे की ट्रेडिंग हे आधी नीट ठरवा. गुंतवणुकीत झटपट फायदा मिळणार नाही. कदाचित तुमचा तोटा भरून यायला अनेक महिनेही लागतील. पण धोकाही तितकाच कमी असेल. चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्या आणि विसरून जा. (विसरून जा, हे आलंकारिक अर्थाने)
ट्रेडिंग मधून कमी काळात जास्त पैसे मिळू शकतात पण तसेच जाऊही शकतात. शिवाय ते काम पूर्ण वेळ करणार असाल तर त्याला अर्थ आहे. कारण तिथे वेळेला महत्त्व असते. सकाळी १०० रु ला २०० शेअर घेतले आणि दुपारी तो १०२ झाला म्हणून विकणार असाल तर नोकरी सांभाळून ते कसे करणार. आणि केले तरी मग निम्मे लक्ष कामाऐवजी तिथे राहील. त्यामुळे, नोकरदार लोकांनी त्या फंदात पडू नये असे माझे मत आहे. असो, ट्रेडिंग करायचे असेल तर मला त्यातले काहीही कळत नाही, म्हणून त्या बाबतीत मत प्रदर्शन नाही करत.
>>'क्रेडीट' वर शेअर घेतल्याने तोटा वाढला.
कर्ज काढून शेअर मध्ये पैसे टाकू नका. नजीकच्या भविष्यकाळात ज्या पैश्याची गरज नाही असेच पैसे शेअर मध्ये पैसे टाका.
>>पण एक धडा शिकलो....आपल्या पैश्याची कींमत ही आपल्यापेक्षा जास्त कोणालाच नसते व आपण बेफीकीर राहीलो की सर्व आपल्याच अंगाशी येते.
या शिकवणीची किंमत ४०००० म्हणजे खरे तर फार नाही, नीट केलेत तर उद्या ४ लाख कमवाल.
आणि सर्वात महत्त्वाचे, जी खरेदी कराल ती अभ्यास करून करा. आणि स्वतःच्या फायद्यातोट्याची जबाबदारी आपलीच आहे हे लक्षात ठेवा (काही जण कुणीतरी टीप दिली म्हणून पैसे टाकतात आणि नुकसान झाले तर टीप देणाऱ्याला दोष देतात. हे चुकीचे आहे.)
All the best !!!
वि.मे.
22 Jul 2011 - 10:49 am | सोत्रि
+१००
आपला घामाचा पैसा कुठेही गुंतवताना आपलीच अक्कल वापरणे खरच फार गरजेचे असते.
आजच्या जगात कोण दुसर्याचा फायदा व्हावा म्हणुन दुकान थाटून बसेल काय ?
शेअर बाजारासाठी हा मंत्र फार मोलाचा आहे:
'दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ'
- (नॉन ट्रेडर, इंव्हेस्टर) सोकाजी
19 Jul 2011 - 5:16 pm | JAGOMOHANPYARE
पैसे काढून घेणे शक्य नाही. पैसे फक्त तुमच्या बँक अकाउम्तला ट्रान्स्फर करता येतात.
तुमच्या पत्त्यावर व्यवहार झाल्याच्या स्लिपा आल्या असतीलच. त्यात दिसेल सगळे.
अकाउम्तला ऑटो पे इन असेल तर तुमच्या अकाउंटवरुन शेअर घेऊन ते त्याने स्वतःच्या अकाम्ट्ला ट्रान्स्फर केले असे होऊ शकेल एक वेळ, पण तेदेखील तुम्हाला स्लिप पाहून कळेलच. त्याची शक्यता कमी वाटते.. टाटा स्टीलमध्ये ७००० लॉस झाला, म्हणजे फार मोठ्या वॉल्युमच्या ट्रान्झॅक्शन असणार... असे वारंवार झाल्यास पैसे संपणे अवघड नाही.
19 Jul 2011 - 5:57 pm | मृत्युन्जय
मोठ्या अमाउंटची ट्रान्झॅक्शन्स करुन इंट्रा डे लॉस केला असेल तरच कदाचित शक्य आहे. अन्यथा तुम्हाला चक्क लुबाडले गेले आहे असे समजा. विमेंनी दिलेल्या सल्ल्याबरहुकुम वागलात तर खरेच तोटा झाला आहे की नाही हे कळु शकेल.
अर्थात रोज मोठ्या अमाउंट्ची ट्रान्झॅक्शन्स आंधळेपणाने आणि बेफिकीरपणे केली असल्या काहीच अशक्य नाही
18 Jul 2011 - 11:52 pm | ajay wankhede
एन्ट्राडे,फ्युचर,ओप्शन ट्रेडिन्ग मधिल
शोर्ट टर्म लास/ गैन वर येणार्या इनकम ट्याकस बद्दल कुणि माहिति देईल काय?
20 Jul 2011 - 3:15 pm | आत्मशून्य
जर नविन आहात जितेन्द्र गाला यांनी लिहलेलं शेअर बाजाराची ओळख हे पूस्तक अवश्य वाचा. Buzzing stock Publishing House Mumbai ने पब्लीश केलयं. पानोपानी प्रचंड शूध्दलेखनाच्या चूका असून सूध्दा हे मी रेकमेंड करतो. यात सर्व काही आहे जे मूलभूत प्रश्न व त्यातून अजून गोधळून टाकणारे उपप्रश्न या सर्वांचे शंका निरसन करतं आयपी ओ पासून ते एन्ट्राडे,फ्युचर,ओप्शन ट्रेडिन्ग वगैरे वगैरे वर फार चांगली माहीती देतं.
हे घडलं की साधाराण ५०के ते ७०के लॉस सहन करायचाच हे मनाशी गृहीत धरूनच मार्केटमधे या, पाण्यात पडलं की पोहायला जमतच या न्यायाने माणसे व मार्गदर्शन मिळू लागतेच. पण काठावर बसून पोहणं शिकवणार्यांपासून सावध रहा. अक्कल विकत घ्यावी लागते हे लक्षात असूदे आणी त्यासाठी योग्य किंमत मोजायची तयारी ठेवलीत व अति लोभ सोडला तर घसघशीत फायदा मिळतोच. इंट्राडे पासून लांब रहा कमी गूतवणूक व जोखीम असून सूध्दा १ दीवसाचा तोटा मागील अठवड्याभराचा फायदा पूसून टाकतो, तेव्हां लाँग टर्म इन्वेस्टमेंट म्हणूनच सूरूवात करा, हळू हळू काँन्फीडन्स वाढेल अंदाज बरोबर येऊ लागले की जोखीम वाढवा. एकूणचं अत्यंत संयम, धैर्य, चिकाटी आणी उत्पनाचे इतर स्त्रोत असतेल तरच यात पडा. हे मध्यमवर्गीय माणसासाठी उपजीवीकेचे साधन आहे असं माझं मत नाही.
अवांतर :- हे पूस्तक न वाचता शेअर बाजारात उडी म्हणजे पॅराशूट न बांधता विमानातून उडी मारणे होय अशी जाहीरात करण्यात येणारी काही पूस्तके मला वैयक्तीकदृश्ट्या फार भावली नाहीत.
19 Jul 2011 - 11:05 pm | सोत्रि
मी इन्व्हेस्टर आहे ट्रेडर नाही म्हणून पास.
पण वाचतो आहे, फार मजेशिर आह्रे हा धागा, पैसे आहेत, पैसे कमवायची हौस पण आहे, पण कमवायची अक्कल नाही. कोणी अक्कल उधार देता का उधार...छान !
- (शेरखान) सोकजी
26 Sep 2011 - 11:12 pm | खुसपट
माझ्याकडून घ्या. व्य. नि. करा.
खुसपट ( राव )
20 Jul 2011 - 9:15 am | JAGOMOHANPYARE
:)
20 Jul 2011 - 9:38 am | श्री
शेअर बाजारातील गरजुंनी आणि पिडीतांनी येथीलच तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा ना ? आपल्या जबाबदारीवर ..........
अधिक माहीती साठी - http://misalpav.com/node/403
20 Jul 2011 - 10:08 am | सहज
जुने जाणते श्री. श्री एका लिंकवर एक लिंक फ्री नाही दिलीत. अत्यावश्यक निवेदन का तुम्ही सब ब्रोकर आहात म्हणायचे?
20 Jul 2011 - 10:16 am | श्री
सब ब्रोकर म्ह्णजे काय हो ?
20 Jul 2011 - 9:50 am | प्रकाश घाटपांडे
मूळात शेअर मार्केटवरच कितपत भरवसा ठेवावा?
20 Jul 2011 - 10:05 am | सहज
आणि टिप्स बाबत म्हणायचे झाले तर खुद्द तात्यानी (वर मिपाकर 'श्री' यांनी लिंक दिलेल्या विसोबा खेचर यांनी )तुम्हाला एकदा उपप्रतिसाद देताना लिहले होते की
आम्ही बाजारात असे अनेक टिपर पाहिले आहेत. त्यांच्या ९ टिपस् चालतात व १० वी टीप सगळं साफ करून घेऊन जाते!
26 Sep 2011 - 11:17 pm | खुसपट
तुम्हाला ठेवता येइल तेव्हडा ठेवा.ज्योतिषावर ठेवलात त्याहून थोडा कमी ठेवा फारतर !!!!. काय ?
खुसपट ( राव )
25 Sep 2011 - 7:43 pm | अजितजी
शेअर बाजारा संबंधी मिळणाऱ्या टिप्स वर अजिबात अवलंबून राहू नये . कारण जेव्हा कोणाला शेअर विकायचे असतात तेव्हाच अश्या टिप्स बाहेर येऊ लागतात . मग दोन/तीन दिवस तो शेअर वाढतो ही
मग तुम्ही त्यावर विश्वास ठेऊन खरेदी करता आणि एकदा मागणी आली कि विकणाऱ्या ला त्याचे शेअर विकायची संधी मिळते आणि तो आपले शेअर फुकून टाकतो . आणि तुम्ही त्या शेअर ला कवटाळून बसता . अजून वाढेल अजून वाढेल ही वेडी आशा ठेऊन--. तुम्हाला ती बोकड आणि कोल्ह्याची गोष्ट माहित आहे ना? कोल्हा एका खड्यात पडून अडकला असतो आणि एक बोकड त्याला पाहतो आणि विचारतो तू काय करतो आहेस ? कोल्हा म्हणतो मी येथे गोड पाणी पीत आहे . तुला हवे आहे का? मग खाली ये . जसा बोकड खाली उतरतो तसा कोल्हा त्याच्या शिंगा वर पाय देऊन खड्या बाहेर पडून पसार होतो .बिचारा बोकड त्या खड्यात अडकून राहतो --तेव्हा शेअर बाजाराचे पंटर ( सौरी -सल्लागार ) हे टीप देण्या साठी " खरेदी " केले जातात . आणि त्यांच्या बोलवित्या धन्या चे शेअर विकून झाले पंटर टिप्स देणे बंद करतात .
या पेक्षा आपण स्वतः च अभ्यास करावा . P /E रेशिओ ,P /B रेशिओ , हाय लो याचा अभ्यास करावा आणि ठरवावे कोणता शेअर घ्यायचा ते --सोपी पद्धत म्हणजे A ग्रुप चे त्यात ही INDEX चे शेअर घेणे कधी ही नुकसान देत नाही ---कधी ही घ्या आणि योग्य संधी ची वाट पहा--नक्की फायदा देऊन जातात ते शेअर - एकाच कंपनीचे किवा ग्रुप चे न घेता तुमची गुंतवणूक सगळ्या क्षेत्रात करा
26 Sep 2011 - 11:22 pm | खुसपट
अगदी खरी गोष्ट लिहीलीत. माझे काम तुम्हीच केलेत.
खुसपट ( न काढ्णारा )
26 Sep 2011 - 10:53 pm | खुसपट
मी चार्टर्ड अकौंटंट आहे. गुंतवणूक व्यवस्थापन हा विषय शिकवतो.गेली ३५ वर्षे शेअरबाजाराचा अभ्यास आहे. बाकी व्य.नि. करा. मी फी घेत नाही.
खुसपट ( राव )
28 Sep 2011 - 9:45 am | लॉरी टांगटूंगकर
मुख्य पैसे गुंतवण्या आधी व्हर्चुअल पैशानी व्यवहार करावा.असे करणाऱ्या अनेक वेब साईट आहे.www.khelostocks.com
moneybhai.com
msnची पण अशी सर्विस आहे.या साईट वर खाते उघडले की १० लाख अशी व्हर्चुअल रक्कम मिळते,आणि मार्केटशी लिंक असल्या मुळे खऱ्या व्यवहाराचा अनुभव येतो.तोटा झाला तरी आपले पैसे जात नाहीत .थोडक्यात टायर बांधून पोहण्या सारखे आहे.