देल्ही बेलीज फार बीभत्स आहे काय??

ईश आपटे's picture
ईश आपटे in काथ्याकूट
17 Jul 2011 - 9:02 pm
गाभा: 

आजच एका वृत्तपत्रात वाचल, रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली. व हा घाणेरडा प्रकार काय आहे असा त्याला जाब विचारला.
भारतीय सेन्सॉरचा मी ही काही फॅन नाही. दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य असल पाहिजे ह्या मताचा मी आहे. व प्रौढ विनोद व बोल्ड प्रणय दृष्ये हिन्दी व मराठी चित्रपटात दाखवली गेली पाहिजेत ह्या मताचा मी आहे. पण देल्ही बेलीज हा कलात्मकते मध्येच कमी पडतो , व त्यामुळे निव्वळ शिवीगाळ व संडास दाखवण्याकरता चित्रपट काढलाय असा समज होतो. थेटर मध्ये खीखी करणार्‍यांच्या विनोद बुध्दीची अक्षरश: कीव येते.
आमीर खानची तो एक पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल आहे ही प्रतिमा ह्या वेळेस प्रथमच खंडीत होते. व संडासजोक्स लोकांना दाखवणे म्हणजे काही नवीन क्रांती करणे हा त्याचा दावा फोल ठरतो...
हा चित्रपट आपल्याला कलाकृती म्हणून कसा वाटतो ?? व ह्यातील विनोद आपण सहन करु शकला का ???

अवांतर- बर्‍याच मराठी कलात्मक चित्रपट पाहाणार्‍यां रसिकांना हा चित्रपट कसा वाटला ह्याची ही उत्सुकता आहे

प्रतिक्रिया

पंगा's picture

17 Jul 2011 - 9:22 pm | पंगा

(चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे...)

भडकमकर मास्तर's picture

17 Jul 2011 - 10:17 pm | भडकमकर मास्तर

माझ्या शाळेत चौथीमध्ये एक मित्र होता तो संडासजोक चाम्पियन होता.... शी अणि इतर तत्सम शब्दांवर तो शीघ्रकाव्य करून धमाल आणत असे... काही काळ असल्या विनोदांनी करमणूक होणे म्हणजे काय हे माहित आहे... पण सिनेमात हे कितपत चालेल, चालावे हा ज्याचात्याचा प्रश्न...

मी सिनेमा पाहिला...
काही संडासजोक अति सुमार होते.... पण पाहूच शकलो नाही असे झाले नाही....
गोष्ट फास्ट होती,, अभिनय बर्‍यापैकी... ( पन इन्टेन्डेड)...

सुरू हो ऊन कम्टाळा यायच्या आत पिच्चर संपला...
एखाद्या मित्राच्या ल्यापटापातून उचलून वगैरे ( म्हणजेच फुकट) पहायला हरकत नाही...

काही सिचुएशन्स अत्यन्त मजेदार आहेत... लोकांनी "या सिनेमात घाण संडासजोक आहेत" असा अति कालवा केल्याने मी तर मनाची इतकी तयारी केली होती.. आणि पाहून वाटले, ह्या ... हे तर कैच नै"

काही जोक किळसवाणे होते अगदी हातातला खात असलेला केक मी फेकुन दिला. इतर मित्रांना ही जोक फारच गलिच्छ वाटले. काही लोक आपल्या लहान मुलांना ही घेउन आले होते. ती म्हणजे हद्द होती.
हा खरा अ‍ॅडल्ट मुव्ही आहे हिन्दी मधला हे बर्‍याच जणांना माहित नव्हते. दुसर म्हणजे महिला व युवतीमध्ये आश्चर्यकारकरीत्या हा चित्रपट लोकप्रिय बनला आहे. ;)

ऋषिकेश's picture

17 Jul 2011 - 10:51 pm | ऋषिकेश

चित्रपट पाहिला.. प्रसंगी बालिश असला तरी त्याने माझे मनोरंजन झाले. (कोणालाही कीव आली तरीही) मी त्यातील अनेक प्रसंगांना, दृश्यांना, संवादांना हसलो.

चित्रपटाचे रेटिंग ("ए") व आमिरखानने वेगवेगळ्या मुलाखतीत दिलेली वॉर्निंग नजरेआड करून आपल्या पालकांबरोबर / (१८ वर्षांपेक्षा लहान) मुलांबरोबर चित्रपट बघणार्‍या (मुर्ख?) लोकांची मात्र कीव येते. तशी ती कलात्मकता किंवा विनोद हा फक्त तथाकथित सुसंस्कृत असावा असे समजणार्‍यांचीही येतेच म्हणा

ईश आपटे's picture

18 Jul 2011 - 9:39 am | ईश आपटे

कथा म्हणून ह्यात काही ही नावीन्य नाही... जोनी गद्दार सारख्या अनेक चित्रपटातुन गैरसमजातुन हिरोच्या मागे विलन लागणे व त्यानुसार ब्लॅक कॉमेडी हा प्रकार अनेकदा झाला आहे,
विनोदांवर आक्षेप ते प्रौढ आहेत म्हणून नाही तर बालिश आहेत म्हणून आहे ........ ;)

खादाड_बोका's picture

17 Jul 2011 - 11:03 pm | खादाड_बोका

ग्रो उप गाईज....रीयल लाईफ टाईप मुवी. मला एक तरी व्यक्ति दाखवुन द्या, जो शिव्या कधीच देत नाही. अशे आणखीन सिनेमे पुढे यायला पाहीजेत.

इंटरनेटस्नेही's picture

18 Jul 2011 - 3:48 am | इंटरनेटस्नेही

सदर चित्रपट हा चांगला चित्रपट नाही. चित्रपट म्हणजे निखळ मनोरंजन करणारा असायला हवा.

आपल्याला तर गाणि आवडली बाबा..
भाग भाग डी. के. बोस डी. के. बोस डी. के बोस.
डॅडी मुझसे बोला तु गलती है मेरी, तुझसे ये झिन्दगानी गिल्टी है मेरी.
साबुन की शकल मे निकला तु तो झाग.. झाग...झाग...
भाग भाग डी. के. बोस डी. के. बोस डी. के बोस .....

बाकी तो टट्टी वाला सिन जरा जास्तच ओव्हर वाटला

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jul 2011 - 7:50 am | बिपिन कार्यकर्ते

संडासजोक? काय सांगता? बघितलाच पाहिजे... :)

आपल्याला तर ब्वॉ ते डीकेबोसचे गाणे आवडले.

धमाल मुलगा's picture

18 Jul 2011 - 6:03 pm | धमाल मुलगा

बरं बरं ;)

धनंजय's picture

23 Jul 2011 - 2:41 am | धनंजय

यूट्यूबवर गाणे बघितले. दादा कोंडके प्रकारचा शब्दखेळ गाण्यात बसवलेला आहे.
गंमत आहे.

स्पा's picture

18 Jul 2011 - 8:32 am | स्पा

चित्रपट पहिला...( अर्थातच फुकटात )

पण तो चांगला किंवा वाईट हे ठरवण्याच्या आत संपला... :D

विनोद वगेरे ठीक ठाक...
याच्यापेक्षा संडासजोक .. वापरत असल्याने.. १८ वर्षाच्या आतील मुलांना बघायला द्यायला हवा

गाणी छानच आहेत
आणि चित्रपटात त्याचा छान वापर करून घेतला आहे

सगळ्यात " बेदर्दी राजा" गाण फर्मास जमल आहे
ज्याच्या कडे गाडीत अथवा घरी वुफर वेग्रे आहेत त्याने त्या गाण्याच " ग्रींड मिक्स " जरूर ऐकावे
खतरनाक वाजत

प्रचेतस's picture

18 Jul 2011 - 9:10 am | प्रचेतस

अमिताभचा 'बुढ्ढा' बघा.
परत एकदा अमिताभचा दमदार अभिनय, निखळ मनोरंजन.

स्पा's picture

18 Jul 2011 - 9:16 am | स्पा

बघितला... एकदम टुकार

नरेशकुमार's picture

18 Jul 2011 - 9:37 am | नरेशकुमार

आपन तर बुवा सोर्सकोड बघितला.
everything will be alright !

छोटा डॉन's picture

18 Jul 2011 - 10:34 am | छोटा डॉन

पिक्चर तद्दन भिकार, फालतु, रद्दड आहे.
आक्षेप संडासजोक वगैरे दाखवले ह्याला नाही तर ते ज्या किळसवाण्या पद्धतीने दाखवले त्याला आहे, मुर्खपणाचा कडेलोट झाला आणि पाचकळपणाची परिसीमा ओलांडली की असे विनोद(?) सुचतात.
फ्रीजमधल्या ज्युसने आपला पार्श्वभाग धुवावा अशा सीन्सच्या आयडिया ज्यांच्या डोक्यात येतात त्यांच्या विनोदाच्या समजेची कीव करावीशी वाटते.

बाकी ह्या सिनेमावर काही जणांच्या 'जणु काही माझ्या रुमचे/फ्लॅटचे/घराचे चित्रण आहे' अशा कमेंट्स पाहुन त्यांची जागा रुम्/फ्लॅट वगैरे नसुन वेड्याचे इस्पितळ आहे असे म्हणावे वाटते.

- छोटा डॉन

किसन शिंदे's picture

18 Jul 2011 - 11:55 am | किसन शिंदे

अतिशय घाणेरडा आहे हा चित्रपट..भिकारडे शिव्यामिश्रीत डॉयलॉग...
आणी तो सुध्दा आमीर सारख्या अभिनेत्याने बनवावा याचे खुप दु:ख होतेय.

मराठी_माणूस's picture

18 Jul 2011 - 12:12 pm | मराठी_माणूस

काही प्रतीक्रिया वाचुन खरेच आश्चर्य वाटले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2011 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिक्चर तद्दन भिकार, फालतु, रद्दड आहे. आक्षेप संडासजोक वगैरे दाखवले ह्याला नाही तर ते ज्या किळसवाण्या पद्धतीने दाखवले त्याला आहे, मुर्खपणाचा कडेलोट झाला आणि पाचकळपणाची परिसीमा ओलांडली की असे विनोद(?) सुचतात. फ्रीजमधल्या ज्युसने आपला पार्श्वभाग धुवावा अशा सीन्सच्या आयडिया ज्यांच्या डोक्यात येतात त्यांच्या विनोदाच्या समजेची कीव करावीशी वाटते.

छो. डॉन यांच्या प्रतिक्रियेतील शब्दा-शब्दाशी सहमत.

-दिलीप बिरुटे
(सहमतीपूरता उरलेला)

सुमो's picture

18 Jul 2011 - 11:07 am | सुमो

अजुनी पाहिला नव्हता.

आणि एकंदरीत प्रतिक्रियांवरुन ५०० रु.वाचले असं वाटतंय..:)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

आमीर खानची तो एक पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल आहे ही प्रतिमा


हा उपहास आहे अशी मनाची समजूत घालुन घेतल्या गेली आहे.

ज्याला धड चित्रपटांच्या कथेच्या चोर्‍या करता येत नाहित तो पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल ? मी तर आमीर खान हे नाव कुठल्याही प्रकारे जोडले गेलेल्या चित्रपटाला दुर्लक्षित कतो :) त्याचे चित्रपट आजकाल कथा, अभिनय, संगीत ह्यामुळे कमी आणि विवादांमुळे जास्ती गाजतात :) आणि ते ही नाही जमले तर मग ज्या गोष्टीतली आपल्याला काडीची अक्कल नाही त्या गोष्टींवर, उदाहरणार्थ नर्मदा प्रकरण ह्यांच्या मुलाखती चालु होतात.

Escape to Victory वरुन चोरलेला 'लगान'.
All My Sons वरुन ढापलेला 'रंग दे बसंती'.
Kramer Vs Kramer वरुन चोरलेला 'अकेले हम अकेले तुम'.
Memento ची सरळ सरळ नक्कल असलेला 'गझनी'.

हे सर्व करुनही हा माणूस पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल ? हा हा हा.

नाही, मान्य आहे की सगळे लोक हेच करतात पण विषय आमीरचा निघालाय म्हणुन त्याचे उदाहरण दिले येवढेच.

परा

सहमत... मला ही ती प्रतिमा खोटी आहे असच म्हणायच आहे. मध्ये ह्रतिक रोशन ने ही आमीरचा कोणता गुण जास्त आवडतो अस विचारल्यावर, त्याच मार्केटिंग स्किल अस मार्मिक उत्तर दिल होत............

योगप्रभू's picture

18 Jul 2011 - 1:36 pm | योगप्रभू

पराशी अगदी सहमत..

'तारे जमीं पर' बघून जरा कुठे कौतुक करायला जावे, तेवढ्यात 'थ्री इडियट'मधून आमीरसाहेबांनी शारीरिक उत्सर्जनाबद्दलची स्वतःची एक्स्ट्रॉ पॅशन दाखवून दिली. त्यात किळसवाणे काय काय बोलायचे आणि दाखवायचे बाकी ठेवले आहे? दारु पिऊन डीनच्या घराच्या गेटवर लघुशंका करणे, कमोडवर बसलेल्या स्थितीत दाखवणे, पार्श्वभागाच्या आकारातील आसनावर बसून आल इज वेल गाणे म्हणणे, चतुर हा क्लासमेट कायम वायू सोडत असलेला दाखवणे, महान मित्रापुढे पँट काढून पार्श्वभाग दाखवत 'शहेनशहा तुसी ग्रेट हो' म्हणणे, मित्राच्या आजारी वडिलांची छाती आई लाटण्याने खाजवून त्यानेच पोळ्या लाटते त्यात ते तो केसांचा पुंजका दाखवणे, याशिवाय स्तन, बलात्कार हे शब्द मुबलक वापरुन केलेले विनोद.

परदेशी चित्रपटांत अतिशयोक्तीपूर्ण विनोदाच्या नावाखाली काहीही आचरटपणा चालतो. परवा 'स्कॅरी मूव्हीज' नावाचा एक चित्रपट दाखवत होते. त्यातील हिरॉइन बोलण्याच्या नादात एका म्हातार्‍या बाईला तिच्याच बेडपॅनमधील युरीनने स्पंजिंग करताना दाखवली. हॉटशॉट, द नेकेड गन अशाही विनोदी चित्रपटांत विडंबनाच्या नावाखाली बरेच शॉट बीभत्स आहेत. ही घाण भारतात कशाला घेऊन यायची. शिवाय त्याला तरुणाईची भाषा म्हणून मुलामा चढवायचा.

देल्ही बेलीमधील ज्यूसने पार्श्वभाग धुण्याचे दृश्य ऐकून मला वाटते आमीरच्या पुढच्या पिक्चरमध्ये डायरेक्ट शॉटही बघावे लागतील.

मैने किया 'हाय'!, तू बोली 'बाय'!
तू नहीं कोई और सही तेरे नाम पे 'फाय'

याच धर्तीवर किस-पिस, हार्टबीट-बुलशीट अशी यमके जुळवून 'इंटेलेक्चुअल' गाणीही लोकप्रिय होऊ शकतील.
आमीर! क्या बोलता तू?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी सहमत आहे मालक.

आणि 'तारे जमीं पर' चे येवढे कौतुक करण्याची गरज नाही कारण तो पण एका कथेवरुन ढापलेला आहे. (Thank You, Mr. Falker by Patricia Polacco.) जसा 'मन' चित्रपट An Affair to Remembe वरुन ढापलाय ;)

मृत्युन्जय's picture

18 Jul 2011 - 2:18 pm | मृत्युन्जय

(Thank You, Mr. Falker by Patricia Polacco हा चित्रपट आहे की पुस्तक? चित्रपट असल्या ढापला आहे असे म्हणता येइल (कथा नीटशी माहिती नाही तरी कदाचित असु शकेल.) मात्र पुस्तक असेल तर तसे म्हणण्यात काय हशील?

बाकी गजनी ढापलेला होता हे मान्य. तद्दन बकवास चित्रपट होता तो.

बाकी जिथे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वोत्तम चित्रपट "शोल" देखील ढापलेला होता तेव्हा इतर चित्रपटांची काय कथा?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार

(Thank You, Mr. Falker by Patricia Polacco हा चित्रपट आहे की पुस्तक?

लिंकाळलोय ना तिकडे. क्लिक करुन बघा की मालक.

चित्रपट असल्या ढापला आहे असे म्हणता येइल (कथा नीटशी माहिती नाही तरी कदाचित असु शकेल.) मात्र पुस्तक असेल तर तसे म्हणण्यात काय हशील?

अ‍ॅ ? बाउंसर गेला बे :(

म्हणजे चित्रपटावरुन चित्रपट ढापला तर चोरी म्हणायचे आणि एखाद्या पुस्तकावरुन / कथेचा आधार घेऊन परवानगी न घेता चित्रपट काढला तर चोरी नाही ?

चेतन भगत का चुक्याच की मग ;)

मृत्युन्जय's picture

18 Jul 2011 - 3:10 pm | मृत्युन्जय

लिंकाळलोय ना तिकडे. क्लिक करुन बघा की मालक.

पुस्तक दिसले म्हणुनच विचारले

अ‍ॅ ? बाउंसर गेला बे

त्यात बाउंसर काय होते रे? पुढे प्रश्न बरोबर विचारलास ते

म्हणजे चित्रपटावरुन चित्रपट ढापला तर चोरी म्हणायचे आणि एखाद्या पुस्तकावरुन / कथेचा आधार घेऊन परवानगी न घेता चित्रपट काढला तर चोरी नाही ?

येस्स. तर मग ढापला असे म्हणता येणार नाही. हॉलीवूड वाले सगळे नट काय स्वतळ्च्या पिकचराच्या ष्टोर्‍या स्वतः लिहितात असे वाटले काय तुला?

हा परवानगी न घेता काढला असेल तर तो कॉपीराइट कायद्याचा भंग होउ शकतो पण ढापलेला म्हणता येणार नाही. एक चित्रपट म्हणुन तो ओरिजिनल ठरतो.

चेतन भगत का चुक्याच की मग

चुक्याच, कारण चेतन भगत ची आणि त्याची क्रेडिट्स वरुन जुंपलेली होती. दुसरे म्हणजे तो चेतन भगत आणि दिग्दर्शकामधला मामला होता. तिसरे म्हणजे नंतर स्वतः भगत साहेबांनी नंतर काहीही कायदेशीर कारवाई केली नाही. राजु हिराणींनी त्याला योग्य ती कल्पना दिली होती असे कळते.

बाकी चोरीच म्हणायची तर दिल है की मानता नही चोरलेला होता इट हॅपन्ड वन नाइट वरुन किंवा जो जीता ढापलेला होता ब्रेकिंग अवे वरुन (थोडा थोडा)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार

येस्स. तर मग ढापला असे म्हणता येणार नाही. हॉलीवूड वाले सगळे नट काय स्वतळ्च्या पिकचराच्या ष्टोर्‍या स्वतः लिहितात असे वाटले काय तुला?

अरे पण त्या पुस्तकाचा कुठे कॄतज्ञतापुर्वक उल्लेख देखील नाहिये. मग ह्याला आता काय म्हणायचे ?

अवांतर :- तुझ्या एका कथेवरुन मागे झालेला धिंगाणा तुला आठवत असेलच. अर्थात तू दोन कथांमधील समनतेबद्दल अज्ञानी होतास पण आमीर आणि अमोल गुप्ते बद्दल अथवा चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या येवढ्या लोकांबद्दल हेच म्हणता येईल काय ?

मित्रांनो,
'माझे नावडते संगीतकार' या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातील काही भाग पुन्हा खरडतोय. बघा पटतंय का?

आवडलेल्या एखाद्या गाण्याची चाल घेऊन त्याला भारतीय रुपडे दिले असेल तर त्याला चोरी म्हणू नये. चित्रपट कथांच्या बाबतीत असे सर्रास म्हटले जाते. इरिक सीगलच्या 'मॅन, वूमन अँड चाईल्ड' या कादंबरीवरुन प्रेरणा घेऊन 'मासूम' हा चित्रपट तयार केलाय. पण भारतीय वातावरणाला चपखल बसलाय की नाही?

छाया चित्रपटातील 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे घ्या. याची चाल म्हणजे मोझार्टची क्र. ४० ची सिंफनी. संगीतकार सलील चौधरी यांनी त्याचा वापर करुन इतके सुंदर गाणे बनवले आहे आणि तलत व लतानेही त्यात बहार आणली आहे. आता याला आपण चोरी म्हणू का?

मला असे वाटते, की शॉट बाय शॉट प्रसंग जसेच्या तसे चित्रीत केले असतील तर ती चोरी ठरते, पण मध्यवर्ती कल्पना घेऊन ती आपल्या वातावरणात फुलवली असेल तर तिला चोरी म्हणावे का?

काहीवेळा चोर्‍या करतानाही आपले लोक वाट लाऊन टाकतात.

डान्स डान्स चित्रपटातील 'मेरे दिल गाये जा जु जु जुबी जुबी जुबी' हे गाणे 'लुवी लुवी' गाण्याची चाल आणि शब्दात किरकोळ फेरफार करुन भप्पी लाहिरीने सादर केली. ही भिकार चोरी म्हणता येईल.

'अग्निसाक्षी' हा चित्रपट ज्युलिया रॉबर्ट्सची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्लिपिंग विथ द एनिमी' वरुन बनवला. मूळ चित्रपटात दुष्ट नवर्‍याचा पाठलाग असह्य झालेली ज्युलिया शेवटी त्याला ज्या पद्धतीने खतम करते, तो खरा शेवट. आपल्याकडे त्याची कशी वाट लावली? नाना पाटेकरपासून स्वतःला वाचवणारी मनिषा कोईराला शेवटपर्यंत घाबरुनच राहाते. शेवटी नानालाच दया येऊन तो 'मला गोळी घाल' असे सुचवतो. मग ती जॅकी श्रॉफला मिळते. हॅपी एंड. गाणी/मालमसाला भरपूर. हीपण भिकार चोरी म्हणता येईल.

'तारे जमीं पर' चे कौतुक यासाठी केले होते, की तो चित्रपट भारतीय वातावरणाला फिट बसला. डिस्लेक्सियाची समस्या आपल्यायेथील मुलांमध्येही आहेच.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

मला असे वाटते, की शॉट बाय शॉट प्रसंग जसेच्या तसे चित्रीत केले असतील तर ती चोरी ठरते, पण मध्यवर्ती कल्पना घेऊन ती आपल्या वातावरणात फुलवली असेल तर तिला चोरी म्हणावे का?

काहीवेळा चोर्‍या करतानाही आपले लोक वाट लाऊन टाकतात.

अगदी मान्य आहे मालक.

मी तद्दन शॉट्च्या शॉटच कथेसकट कॉपी करणार्‍या चित्रपटांची फक्त नावे दिली आहेत. तुम्ही म्हणत असलेले भारतीयकरण मान्य आहे आणि त्याला आक्षे नाहीच. Breaking Away चे भारतीय रुपांतर 'जो जिता वोही सिकंदर' आम्ही डोक्यावर घेतलेच की. पण म्हणुन 'व्हेर ईगल्स डेअर' चे भयाण रूप 'तेहलका' म्हणून स्विकारावे लागते तेव्हा शॉट लागतो हो डोक्याला.

ही संपादित यादी आणि खाली मी विमेंना लिहिलेली खरड इथे देत आहे.

* Naqaab < Dot The I
* Speed < Cellular
* Jigar < Kickboxer
* Rakshak < Hard Target
* Judwa < Suang Long Hui (Twin Brother)
* Pyar Ka Saaya < Ghost
* Saaya < Dragonfly
* Akele Hum Akele Tum < Kramer VS. Kramer
* The Rundown < Naksha
* The Killer < Collateral
* Krrish < Paycheck
* Rang De Basanti < All My Sons and Jesus of Montreal
* Zinda < Oldboy
* Ek Ajnabee < Man On Fire
* Chocolate < The Usual Suspects
* Salaam Namaste < Nine Months
* Main Aisa Hi Hoon < I Am Sam
* Kyon Ki... < One Flew Over The Cuckoo's Nest
* Aabra Ka Dabra < Harry Potter
* Dhoom < The Fast And The Furious and Torque and Ocean's Eleven
* Hum Tum < Harry Met Sally
* Taarzan: The Wonder Car < Christine
* Koi...Mil Gaya < E.T. The Extra-Terrestrial and Forrest Gump
* Aapko Pehle Bhi Kahin Dekha Hai < Meet the Parents
* 3 Deewarein < The Shawshank Redemption
* Kucch To Hai < I Know What You Did Last Summer
* Chor Machaaye Shor < Blue Streak
* Awara Paagal Deewana < Whole Nine Yards
* Deewangee < Primal Fear
* Raaz < What Lies Beneath
* Mere Yaar Ki Shaadi Hai < My Best Friends Wedding
* Yeh Kya Ho Raha Hai < American Pie
* Kuch Khatti Kuch Meethi < The Parent Trap
* Kyo Kii...Main Jhuth Nahin Bolta < Liar Liar
* Kartoos < Point of No Return
* Baadshah < Nick of Time and The Mask and Rush Hour and Mr. Nice Guy
* Ek Chhoti Si Love Story < A Short Film About Love
* Papi Gudia < Child's Play
* Fareb < Unlawful Entry
* Sauda < Indecent Proposal and The Deal
* Khamosh Khauf Ki Raat < Identity
* Karobaar < The Business of Love
* Yaarana and Agni Sakshi and Daraar < Sleeping With The Enemy
* Criminal < The Fugitive
* Hum Hain Kamaal Ke < See No Evil, Hear No Evil
* U Me Aur Hum < The Notebook and A Moment To Remember
* Sholay < Once Upon A Time and The Seven Samurai
# Akayla < Cobra
# Main Azaad Hoon < Meet John Doe
# Maalamaal < Brewster's Millions
# Madhosi < Beautiful Mind
# Musafir < U Turn
# Taxi 9112 < Changing Lanes
# Kasoor < Forbidden Sins
# Bluff Master < Nueve Reinas (Nine Queens)
# Shukriya < Till Death Do Us Apart
# Pyar To Hona Hi Tha < Addicted To Love
# Maine Pyaar Kyun Kiyaa < Cactus Flower
# Alag < Powder
# Naina < The Eye
# Janbaaz < Duel In The Sun
# Munnabhai MBBS < Patch Adams
# The Burning Train < Shinkansen Daibakuha
# Bichhoo < Lion
# Hum Kaun Hai < The Others
# Bazigar < A Kiss Before Dying
# 36 China Town < Once Upon A Crime
# Aitraaz < Disclosure
# Fool N final < Snatch
# Phir Hera Pheri < Lock, Stock and Two Smoking Barrels
# Badal < The Devil's Own
# Jism < Body Heat
# The Train < Derailed
# Zehar < Out of Time
# Hey Baby < Whipped and Three Men And A Baby
# Chak De India < Mighty Ducks
# Raghu Romeo < Tie Me Up! Tie Me Down!
# Dansh < Death and The Maiden
# Sangharsh < Silence of The Lambs
# Paap < Witness
# Ek Din 24 Ghante < Run Lola Run
# Parichay < The Sound of Music
# Humraaz < A Perfect Murder
# Josh < West Side Story
# Welcome < Micky Blue Eyes
# God Tussi Great Ho < Bruce Almighty
# Deewane Huye Paagal < There is Something About Mary
# Mann < An Affair To Remember
# Mohabbatein < Absolution
# Life In A Metro < Apartment
# Yeh Dillagi < Sabrina
# Mujhse Shadi Karoge < Anger Management
# Partner < Hitch
# Kaante < Reservoir Dogs
# Qayamat < The Rock
# Tathastu < John Q
# Mr. Ya Miss < It's A Boy Girl Thing and Hot Chick
# Murder < Unfaithful
# Ghajini < Memento

पराशेट, गझनी हा मेमेंटो ची नक्कल नाही आहे हो. तुम्ही मागेही एका धाग्यात असा उल्लेख केला होता. दोन्ही चित्रपटांची पटकथा खूप वेगळी आहे. समान म्हणाल तर केवळ कथाकल्पना (one-liner म्हणता येईल अशी). एका माणसाच्या पत्नीचा खून होतो आणि त्याच हल्ल्यामुळे त्याच्या स्मृतीला धक्का पोहोचतो आणि तरीही तो अंगावर गोन्दवणे, पोलोराईड फोटो काढणे असे उपाय करून खुनी माणसाला शोधून सूड घ्यायचा प्रयत्न करतो. इतकेच साम्य आहे. बाकी पूर्ण पटकथा वेगळी आहे. गझनी ही साधीसरळ गोष्ट आहे, हिरो सूड घ्यायचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. मेमेंटो मध्ये पूर्ण वेगळा मुद्दा मांडला आहे. सादरीकरणात तर जमीन अस्मानाचा फरक आहे. तुमच्या सारख्या नामवंत समीक्षकांना आम्ही हे सांगायचे का आता ?

हे सोडले तर गझनी मध्ये उरलेच काय ? बाकी असिन - आमीरचे प्रेमप्रकरण किंवा गझनी गुंडाचे उपदव्याप ह्यांना तुमच्या सारख्या रसीकाने तरी पटकथा समजु नये विमे.

अहो चित्रपटाची मुख्य कथाच जर सरळ सरळ उचललेली असेल (अगदी तुम्ही देखील मान्य कराल की मेमेंटो मधले काही प्रसंग देखील जसेचा तसे उचलले गेलेले आहेत) तर फक्त एखाद दोन दृष्यात अथवा सो-कॉल्ड पटकथेत वेगळेपण समजुन आपण डोळेझाक का करुन घ्यावी. अशा प्रकारे आपण ह्या लोकांना एक प्रकारे नैतीक पाठबळच देत नाही का ?

बरं ह्या संदर्भात आमीरने स्वतः काही मत का व्यक्त केले नाही ? पटकथा वेगळी आहे असा स्टँड त्यानी का घेतला नाही ? मी कुठेही हा चित्रपट मेमेंटोचा रिमेक आहे असे म्हणत नाहीये पण ती भ्रष्ट नक्कल नक्की आहे. मग तो तामिळ गझनी असो किंवा हिंदी.

मध्ये अशाच एका प्रश्नावर उत्तर देताना जमा (संपादन) केलेले काही मुद्दे इथे देतो. अर्थात भाषांतर करण्याच्या भानगडीत न पडता.

1. Both movies deal essentially with the story of a young man suffering from an unusual disability – the inability to form new memories for longer than a few minutes (As Leonard Shelby explains in Memento to the motel clerk: If we talk for too long, I’ll forget how we started).

2. Both movies focus on a young male protagonist who is extremely focused on extracting revenge for the murder of his loved one (wife in the case of Memento and girlfriend in Ghajini).

3. Both movies have a male protagonist whose short-term memory problems are caused by a violent blow to the head as he rushes to save his wife/girlfriend from a brutal attack.

4. Both movies highlight the use of tattoos by the protagonist on his body as a technique to remember important facts because it’s a permanent way of keeping a note (as Leonard says in Memento).

5. Both movies have the protagonist using a polaroid camera to take instant pictures of people and objects to aid his memory and organize his life.

6. Both movies highlight a striking and unforgetable tattoo on the male protagonist’s chest – Find Him…Kill Him.

7. Both movies display a protagonist who photographs the people he kills.

8. Both movies have a protagonist who keeps the camera on the left side of his body inside a coat.

9. Both movies feature a woman who helps the male protagonist in ultimately killing the murderer (Natalie in Memento and Chitra in Ghajini).

10. Both movies feature a bloody murder by the male protagonist in the first 15 minutes or so.

11. Both movies show the protagonist shaking the polaroid picture with his left hand after it comes out of the camera (after the first murder).

12. Both movies present the protagonist using an elaborate paper chart on the wall with photographs to keep track of the bad fellas involved in the death of his loved one.

13. Both movies include a scene in which the protagonist trusses up a person with duct tape and hides him into a closet

14. Both movies showcase the constant use of polaroid photographs by the protagonist to distinguish between friends (Natalie in Memento, Chitra in Ghajini) and enemies (Teddy in Memento, Lakshman in Ghajini).

15. Both movies make it clear that the last indelible memory of the protagonist is the murder of the wife/girlfriend.

16. Both movies have a pointer on the left thigh of the protagonist reminding him to shave. Yes, the protagonist does shave the left thigh in both films.

17. Both movies show the male protagonist explaining early in the movie to a key person near his place of residence (to the apartment security guard in Ghajini and to the motel clerk in Memento) that he has a memory issue. Yes, both the security guard and motel clerk are already familiar with the protagonist’s peculiar condition.

आणि राहिला मुद्दा सादरीकरणाचा तर जेम्स बाँड बेडमध्ये नायीकेकडून सत्य / रहस्य कसे काढून घेत असतो हे आपण कायम बघतोच पण तेच हिंदीत तशेचा तसे घेता येईल काय ?

हे सोडा आता तर पोस्टर्स देखील सर्रास कॉपी होत आहेत.

Nile's picture

18 Jul 2011 - 5:20 pm | Nile

असल्या सुंदर पाठी दाखवणार असतील तर पोस्टर्स चोरी करायला कायद्याची पण संमती असते! ते जाऊदे, ति हिरवीन कोण आहे रे?

असल्या पाठी पहायच्या सोडून काय काय पाठ करतोस रे शिंच्या! ;-)

ईश आपटे's picture

18 Jul 2011 - 5:48 pm | ईश आपटे

चांगली यादी.......... मध्ये साजिद खान त्याच्या शो मध्ये ही तुलना शॉट बाय शॉट करायचा...
जुहु मध्ये एक डीव्हीडी लायब्ररी आहे, ज्याचे बहुतेक प्रोड्य्सुर मंडळी सभासद आहेत. तेथुन सीडी आणणे व लेखकाला स्क्रिप्ट व डायलोग लिही अस बजावणे ही हिन्दी चित्रपटसृष्टीची क्रिएटिव्हीटी आहे. असे खुद्द मधुर भांडारकरने एका स्क्रिप्ट रायटिंग वर्क्सशॉप मध्ये सांगितले होते. व सगळ्या उत्साही लेखकांचा उत्साह पार धुळीला मिळवला होता..............
बाकी मराठी मध्ये ही आता हे चोरीचे वादळ आले आहे..........

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Jul 2011 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

* 3 Deewarein < The Shawshank Redemption

या दोन्ही चित्रपटांचा काहीही संबंध नाही.*
'शॉशँक रिडम्प्शन' आणि 'तीन दीवारें' मधे काही साम्य असेल तर एवढंच, दोन्ही चित्रपटांत बायको किंवा प्रेयसीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक झालेली आहे; दोन्ही चित्रपटांत तुरुंगाचा संदर्भ, चित्रीकरण आहे.

'तीन दीवारें' हा चित्रपट संपूर्णतः ओरिगिनलच असेलच असं नव्हे, (माझा तेवढा अभ्यास नाही), पण एक अतिशय चांगला चित्रपट नक्कीच आहे. स्साला नेटफ्लिक्सवर नाही अजून हा! अमेरिकेतल्या भारतीयांनो, एक व्हा आणि या चित्रपटाची मागणी करा.

*चित्रपट पाहिलेले नसून त्यांत रस असल्यास पुढचे वाक्य वाचू नये, भांडाफोड आहे.
'३ दीवारें'मधे तुरूंगातून सुटका कशी होते हे नीटसं आठवत नाही, पण त्यात एकटा माणूस, फक्त स्वतःच्या हिकमतीने पलायन करतो असं नाहीये असं अंधुकसं आठवत आहे; 'शॉशँक रिडम्प्शन'मधे मात्र एकट्याच्या हिकमतीवरच मुख्य पात्र तुरूंगातून निसटते.

# Bichhoo < Lion

मूळ इंग्रजी चित्रपटाचं (आणि चित्रपटातल्या प्रमुख पात्राचंही नाव) Lion नसून Leon आहे. पर्‍या, शुद्धलेखन सुधर आता तरी. लायन कुठे, लेऑन कुठे? आणि हो, 'लेऑन'मधे 'जीवन में जाने जाना' सारखी सोज्ज्वळ-विनोदी गाणीही नाहीत. अगदीच यूसलेस!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2011 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

मूळ इंग्रजी चित्रपटाचं (आणि चित्रपटातल्या प्रमुख पात्राचंही नाव) Lion नसून Leon आहे.

सहमत.
चुक मान्य केल्या गेली आहे.

पर्‍या, शुद्धलेखन सुधर आता तरी.

शुद्धलेखानची तळमळ असणार्‍यांनी कृपया पल्याडच्या मानसीक रुग्णालयात लॉगईन करावे.

३ दिवारें बद्दल सविस्तर उत्तर लवकरच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2011 - 7:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुद्धलेखानची तळमळ असणार्‍यांनी कृपया पल्याडच्या मानसीक रुग्णालयात लॉगईन करावे.

'लेऑन - द प्रोफेशन'ला तुम्ही 'लायन' बनवणार आणि वर मानसिक रूग्णालयातही धाडणार. पुण्यातच असलं एक रूग्णालय आहे, यात नवल नाही!

३ दिवारें बद्दल सविस्तर उत्तर लवकरच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

कधी?

आठवण करून देण्यात आल्या गेलेली आहे.

आता उगाच अवांतरः माझ्या परदेशातल्या प्रथम वास्तव्यात, टीव्हीवर पाहिलेला हा पहिलाच चित्रपट. पहिल्या काही सीन्समधेच हा पिक्चर 'बिच्छू'ची कॉपी आहे हे समजलं. मग प्रत्येक गाण्याच्या सिच्युएशनला लेऑनच्या दिग्दर्शकाने कसं 'वेस्ट'* केलेलं आहे आणि तिथे लहान मुलीच्या जागी तरूणी असती तर कसे किसींग सीन्स वगैरे घालता आले असते अशी फोडणी दिल्यानंतर मी इन्स्टंटली सर्व हाऊसमेट्समधे जगप्रसिद्ध झाले.

*ही कोटी आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jul 2011 - 11:46 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>३ दिवारें बद्दल सविस्तर उत्तर लवकरच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
आमच्याकडूनही मेमेंटो आणि गजनी या वर उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. लगेच देता येत नाही कारण मेमेंटो पाहून बरेच दिवस झाले, आणि तो तसाही थोडा किचकट चित्रपट आहे.

मलाही ३ दिवारें अतिषय आवडला होता.

आत्मशून्य's picture

18 Jul 2011 - 9:40 pm | आत्मशून्य

फटूमधे असलेला बॅड गाय चित्रपट कोणाचा आहे ?

सोत्रि's picture

18 Jul 2011 - 5:16 pm | सोत्रि

योजप्रभू,

शोल्लीट प्रतिसाद.

आरडी बर्मन हे माझे दैवत आहे, आणि तोही चो र्‍या करायचा, पण चोरी करून जे काही निर्माण करयाचा त्याला तोड नसायची.
चित्रपटांचेही तसेच आहे. ज्यांना चोरी करायची अक्कल असते ते सुंदर कलाकृती निर्माण करू शकतात. मासूमचे उदाहरण एक्दम सही.

ज्या भागातील लोकांना परदेशातील कलकृती बघणॆ शक्य नसते त्यांना अश्या कलकृतींची कॉपी करून केलेल्या कलकृतींमुळे ती संधी मिळू शकते. उदाहरणार्थ 'What Women want' हा खेडेगावातील जनतेने बघायचे काही कारण नाही, पण त्यावर बेतलेला 'अग बाइ अरेच्चा' त्यांना बघायला मिळू शकतो. (केदारने त्याचीही थोडीफर माती केली आहे म्हणा)

त्यामुळे मला व्यक्तीश: ह्या एका मुद्यावरून गदारोळ करणे महत्वाचे वाटत नाही.

- (कॉपीबाज) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

त्यामुळे मला व्यक्तीश: ह्या एका मुद्यावरून गदारोळ करणे महत्वाचे वाटत नाही.

मालक, मुद्दा असा हे की अशा चोर्‍या सर्रास करुन वर आणि त्याची माती करणार्‍यांना उगा डॉक्यावर बसवावे का? त्यांना 'पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल' म्हणावे का?

@निळ्या

पहिली कोणितरी फर्नांडिस आहे आणि बॅड गाय वाली 'Won Seo' आहे.

मराठी_माणूस's picture

18 Jul 2011 - 5:49 pm | मराठी_माणूस

अशा चोर्‍या सर्रास करुन वर आणि त्याची माती करणार्‍यांना उगा डॉक्यावर बसवावे का? त्यना 'पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल' म्हणावे का?

एकदम बरोबर . हे म्हणजे स्वतःची प्रतीभा शक्ती हरवल्याचे लक्षण आहे.

(अवांतर : आपल्या चित्रपटावर आधारीत (चोरलेला ?) ईंग्लीश चित्रपट (पाश्चात्यानी बनवलेला) आहे का ?)

सोत्रि's picture

18 Jul 2011 - 6:53 pm | सोत्रि

>> (अवांतर : आपल्या चित्रपटावर आधारीत (चोरलेला ?) ईंग्लीश चित्रपट (पाश्चात्यानी बनवलेला) आहे का ?)

आपली खरच इच्छा आहे का असा चित्रपट बघण्याची?

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2011 - 10:47 pm | अप्पा जोगळेकर

थ्री इडियट चित्रपटाला नावे ठेवणारे लोक अस्तित्वात आहेत हे कळल्यामुळे आनंद झाला. मी आजवर या चित्रपटाची अत्यंत अवाजवी अशी स्तुती आणि स्तुतीच फक्त ऐकली आहे जिचा वीट आला आहे.

शाहिर's picture

18 Jul 2011 - 8:05 pm | शाहिर

The movie is based on the 1961 Hungarian film drama Két félidő a pokolban ("Two half-times in Hell")

ह्यानी पण ढापला तर !!
मुळ शोधत कुठवर जावे लागणार कोणास ठावुक

अजून बघितला नाहीये.. पण "झ" दर्जाच्या विनोदावर मी हसू शकते...फक्त त्यासाठी २०० वगैरे दमड्या मोजायची तयारी नसल्यामुळे पायरेटेड सीडी आणून पाहिल्या जाईल.

बाकी कोण काय विचार करतो याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही!

सोत्रि's picture

18 Jul 2011 - 5:23 pm | सोत्रि

सहमत पण, फक्त ह्या एका मुद्यावर,
>>बाकी कोण काय विचार करतो याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही!

दिल है के मानता नाही.. म्हणजे राज कपुरचा चोरी चोरी

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार

दिल है के मानता नाही.. म्हणजे राज कपुरचा चोरी चोरी

आवरा !

दिल है के मानता नही आणि चोरी चोरी हे दोन्ही ज्यावरुन चोरलेत तो १९३४ सालचा It Happened One Night.

जागो रे जागो रे जागो रे ;)

सोत्रि's picture

18 Jul 2011 - 7:15 pm | सोत्रि

पण राजकपुर ने त्याची माती केली असे म्हणणे आहे का?
तसे असल्यास बोलणेच खुंटले.

बाकी चालू राहु द्या.

- (चोरी चोरी, चोरी करणारा) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 7:18 pm | परिकथेतील राजकुमार

ओ सोत्रे आपण तसे काय बोललेलो नाय काय !
फक्त योग्य माहिती पुरवली.

बाकी राजकपुरने चार्ली चॅप्लीनची माती केली असे मी एकवेळ म्हणेन देखील ;)

आत्मशून्य's picture

20 Jul 2011 - 1:11 pm | आत्मशून्य

आज मराठीत देल्ही बेलीज सारखे चित्रपट निघत नाहीत हीच तर खरी खंत आहे :(

लहान पोरं जस आइ अथावा बाबा म्हणायला लागले की इतरांचे कौतूक मिळवतात व ते मिळत आहे असे लक्षत आल्याने पोरग जसं येता जाता आइ व बाबा हेच शब्द पून्हा पून्हा हूरूप येऊन म्हणत राहते व त्यातच त्याचे जग सामावलेले असते.. अगदी तीच अवस्था काही कार्ट्यांची "फक व शीट आणी इतर काही " अपशब्दांच्या ओळखी बाबत झालेली असते व येता जाता तेच ते बरळणे त्याना अत्यंत अभिमानाचे व आनंददायी वाटत राहते त्यापलीकडे त्यांना दूसर काही सहजतेने सूचू शकत नाही अशा अवखळ, नवख्या, उत्साहाने भारलेल्या पण उर्जा गमावलेल्या बालीश पोरां टोरांसाठी हा चीत्रपट आहे. मराठीत असे चीत्रपट निघत नसल्याने आज मराठी मूले यासाठी इंग्रजी व हींदी चित्रपटांकडे वळत आहेत म्हणून मराठीत असे बिभत्स चेत्रपट येणं आवश्यक आहे.

फारएन्ड's picture

18 Jul 2011 - 5:41 pm | फारएन्ड

हिन्दी च्या मानाने बीभत्स नक्कीच आहे, पण जे हॉलीवूड चे चित्रपट पाहतात त्यांना साधारण त्या टाईपचा वाटेल (गाय रिची या ब्रिटिश दिग्दर्शकाचे चित्रपट असतात तसा आहे असे जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. ज्यांना कल्पना नाही त्यांनी "लॉक स्टॉक अॅण्ड टू स्मोकिंग बॅरल्स बघावा, आपला फिर हेरा फेरी त्यावरूनच घेतलेला आहे).

टॉयलेट जोक्स अतिशय भंगार आहेत हे खरे आहे. काहीजणांना हे शॉट्स म्हणजे बिग टर्न ऑफ होत असेल. पण त्यापलिकडे बघितले/त्याकडे थोडे दुर्लक्ष करून बघितले तर अतिशय धमाल चित्रपट वाटला मला. गलिच्छ शॉट्स, पोट बिघडल्याची दृश्ये ई.ई. जरा इग्नोर करा आणि तरीही चित्रपट हसवेल.

बाकी आमिर परफेक्शनिस्ट वगैरे कौतुके ऐकली आहेत. पण त्यानेही बरेच भिकार चित्रपट दिलेले आहेतच. थ्री इडियट्स मधे टुकार विनोद काय कमी होते? (तो दिग्दर्शक नाही हे माहीत आहे. पण तो काम करतो त्या चित्रपटात त्याची ढवळाढवळ बरीच असते हे ऐकलेले आहे. कधी ती जमून जाते, कधी नाही).
हॉलीवूड मधे टॉयलेट ह्यूमर ला फक्त कॉलेज्/हायस्कूल कॉमेडीतच सहन केले जाते. स्केरी मूव्ही वगैरे ब दर्जाचे सुद्धा समजले जात नाही. नेकेड गन (१ व २) आणि हॉट शॉट्स (दोन्ही) हे उच्च स्पूफ्स आहेत. पण त्या सिरीज मधे (नेकेड गन ३) जेव्हा पातळी खाली घसरली तेव्हा लोकांनी ते नाकारले.

नितिन थत्ते's picture

18 Jul 2011 - 5:45 pm | नितिन थत्ते

डेल्ही बेल्ली मध्ये रुखवताच्या कल्पक आयड्या आहेत का?

रमेश देवने घालण्याची सूचना दिली होती रुखवताची सजावट, थत्ते काका, म्हणून तर त्या एम टीव्ही च्या व्हीजे ने एका पेक्षाएक रुखवत डिजाईन्स दाखवले आहेत. अगदी तोंड एका कागदी पिशवीत लपवुन ही डिझाईनसाठीच सीन घेतले आहेत. व महान विनोद केले आहेत ............

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

नाही.

त्यात तुमचा उत्कर्ष कसा होईल व ध्यान धारणेचे महत्व अशा पटकथा हाताळल्या आहेत.

तसेच चित्रपट अर्धवट सोडून जाणार्‍यांना किंवा त्यावर टिका करणा‍र्‍यांना ' गाढव' असे लिहिलेले सर्टिफिकेट वाटतात म्हणे.

प्रियाली's picture

18 Jul 2011 - 6:15 pm | प्रियाली

तसेच चित्रपट अर्धवट सोडून जाणार्‍यांना किंवा त्यावर टिका करणा‍र्‍यांना ' गाढव' असे लिहिलेले सर्टिफिकेट वाटतात म्हणे

ही वाटावाटी कोण करते? या लेखाच्या लेखिका का?

असोत नसोत, पण डी.के.बोस हे गाणं मुलीकडचे लोक मंगलाष्टकांच्या चालीत सहज खपवू शकतील असं वाटतं.

भारी समर्थ's picture

20 Jul 2011 - 4:48 pm | भारी समर्थ

बरा वाटाला.माझ्या शेजारच्या दोन मुली तर प्रत्येक जोक वर हसत होत्या. प्रथम काही जोक ज्यादाच बोल्ड वाटले पण पोरी जर एन्जॉय करत असतील तर आपण कशाला विचार करायचा ? पण घरच्या लोकाना दाखवण्याबाबत विचार करावा लागेल. उदा. हिरोईनला हिरोची दाढी टोचते तो सीन....

पण घरच्या लोकाना दाखवण्याबाबत विचार करावा लागेल.

आता ग बया ..........;) ह्यावर विचार ???????????? इम्रान खानचा एक ए सीन आहे त्याबाबत न बोललेच बर .. आपण पाहिलेला असेलच..तसा इंग्लिश ए पटातुन ही जनरली असत नाही............

स्पा's picture

18 Jul 2011 - 8:09 pm | स्पा

हिरोईनला हिरोची दाढी टोचते तो सीन....

=))

=))

=))

५० फक्त's picture

19 Jul 2011 - 7:22 am | ५० फक्त

''उदा. हिरोईनला हिरोची दाढी टोचते तो सीन....''

मी आधी हिरोला हिरोइनची दाढी टोचते तो सीन असं वाचलं, मग पिक्चर पहावा असं वाटलं, पुन्हा एकदा वाचलं म्हणुन वाचलो.

आत्ताच सिनेमा पाहिला. एकदम धमाल सिनेमा आहे, ९० मिनीटांची धमाल! . जे शिट, फक वगैरे शब्द उच्चारायला घाबरतात त्यांनी त्याचं ट्रेलर सूद्धा पहायला जावू नये.

सहज's picture

19 Jul 2011 - 12:52 pm | सहज

नाव सांगायची तसदी घ्याल काय?

आत्मशून्य's picture

19 Jul 2011 - 5:14 pm | आत्मशून्य

जे शिट, फक वगैरे शब्द उच्चारायला घाबरतात त्यांनी त्याचं ट्रेलर सूद्धा पहायला जावू नये.

आपल्या या विधानाबाबत सहमत व्हावे की नाही याचा विचार चालूच आहे पण अजून एक शंका याच अनूशंगाने विचारतो, जे लोक आपण सांगत असलेले वगैरे शब्द उच्चारायला घाबरतर अजिबात नाहीत पण त्याच अत्यंत निर्लज्ज प्रदर्शनही करतात त्यांनी ट्रेलर पहायला जावू की नये. या बाबत काय मत आहे ? का शिनूमा फक्त अशाच लोकांसाठी आहे ?

शाहिर's picture

19 Jul 2011 - 3:56 pm | शाहिर

रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली ??
कोण ओ हे देव ??

आपले मराठी मधले कि काय ?

परस्पर विरोधी विधाने
१. रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली.
२.देल्ही बेलीज फार बीभत्स आहे काय?

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 11:08 am | मुलूखावेगळी

सरदारजी- पंडितजी मुझे संस्कृत सिखनी है.
पंडितजी- क्यु?
सरदारजी- अगर मै मरने बाद मे स्वर्ग मे गया तो, वहा की भाषा संस्कृत है ना
पंडितजी- और गर नरक मे गये तो
सरदारजी- तो गालियोंका डिप्लोमा तो मैने देली बेलीसे लिया है ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jul 2011 - 12:09 pm | बिपिन कार्यकर्ते

कालच हा चित्रपट बघितला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, हा चित्रपट फुकटात बघितल्याबद्दल मी स्वतःचे कौतुक केले.

वर भडकमकर मास्तरांनी म्हणले आहे तसेच म्हणतो. कोणत्याच जोकला हसू आले नाही. किळसही वाटली नाही. बयाचशा शिव्या नेहमीच्याच ऐकण्यातल्या आहेत त्यामुळे खटकल्याही नाहीत.

मात्र, चित्रपटात दाखवलेला बीभत्सपणा हा ओढून ताणून आणलेला आहे असे वाटले. म्हणजे मुद्दाम काहीतरी शॉकिंग दाखवावे असे ठरवून केलेला. अजरामर 'संडास आणि ज्यूस' दृश्य समजा चित्रपटात नसते तर काय बिघडले असते? त्यामुळे काहीच फरक पडला नसता. पण तरीही तत्सम दृश्य आणि त्यावर आधारित काही संवाद हे कशासाठी आहेत हे कळतच नाही. एक दोन दृश्य तर अगदीच सॉफ्ट पॉर्न आहेत. विशेषतः कुंटणखान्यातील वेश्येला फोटो काढण्याबद्दल पैसे देतानाचे. हे दृश्य आपल्या सेन्सॉरने पास केले आहे का ते माहित नाही.

कथाही काही नाविन्यपूर्ण नाहीये. हे कथानक किमान पंचवीसशेतीसवेळा तरी येऊन गेले आहे. आमिरखानचे शेवटचे गाणेही अनाकलनिय. त्यावरूनही काही टीका झाली होती म्हणे. अदखलपात्र आहे ते गाणे. मला तर आमिरखान कंपूने स्वतःच वावड्या उठवून दिल्या होत्या असे वाटते. शेवटी 'आमिरखान मार्केटिंग' ना!

डीकेबोसचे गाणे मस्त आहे. पण ते तर चित्रपटात केवळ बॅकग्राउंडला येते थोडेसे. इम्रानखान कोणत्याही अँगलने 'ताशी दोरजी ल्हाटू' वाटत नाही, ना त्याचे आई वडिल तसे वाटत. फोटोग्राफर मित्र अचानक डोक्याला बँडेज / फडके का गुंडाळतो ते ही कळले नाही.

थोडक्यात काय तर, हाइप्ड अप चित्रपट आहे. फुकटात बघायला मिळत असेल तर जरूर बघा. नाहीतर गेला भो**त! ;)

नितिन थत्ते's picture

20 Jul 2011 - 4:15 pm | नितिन थत्ते

दहशतवादी हल्ला होऊन आठवडाही उलटला नसताना, माणसं रस्त्यात किडेमुंग्यांसारखी मरत असताना, परदेशी भारतीय आक्रोश करीत असताना, मृतांचे आणि जखमींचे सांडलेले रक्त सुकलेही नसेल तोच आत्मकेंद्रित मिपाकर तद्दन बीभत्स चित्रपट एन्जॉय करण्यात गुंग झालेले पाहून एक मिपाकर म्हणून शरमेने मान खाली गेली.¦

परदु:ख शीतल म्हणतात तेच खरे !!!

मराठी_माणूस's picture

20 Jul 2011 - 4:17 pm | मराठी_माणूस

परदेशी भारतीय आक्रोश करीत असताना,

हे मनाला भिडले

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2011 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

षंढांकडून तुमच्या अजून काय अपेक्षा होत्या थत्ते चाचा ?

षंढकथेतला कंडकुमार

सहज's picture

20 Jul 2011 - 4:30 pm | सहज

जाउ द्या हो थत्ते. :-( भोगवादी इंडीयानिवासींना खर्‍या भारताशी व भारतीयांच्या सुख दु:खाशी काहीही घेणे देणे नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. कशाला तुम्ही आरसा दाखवता? तुम्हालाच संस्थळाची बदनामी करतो म्हणतील लोक.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2011 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हालाच संस्थळाची बदनामी करतो म्हणतील लोक.

सहमत आहे.
आधीच त्यांना संघाची बदनामी करणारे म्हणतातच.

*हाणतायत आता थत्ते चाचा*

आत्मशून्य's picture

20 Jul 2011 - 4:48 pm | आत्मशून्य

भोगवादी इंडीयानिवासींना खर्‍या भारताशी व भारतीयांच्या सुख दु:खाशी

हा इंडीया काय प्रकार आहे ?

हिंदी ज्याचा अपभ्रंश गोर्‍यांनी इंडी असा केला, व मागे त्यांच्या सवयीनूसार ए लावला... जस चीन ला मागे ए लावला म्हणून चायना झाला अथवा राम च्या मागे विंग्रजीत ए लावून रामा केलं जातं ... तसचं इंडीच्या मागे ए लागून इंडीया झाला.. मग त्या लोकांना जो उच्चार करायचा असेल तो करू देत आपण त्यांचा उच्चार हिंदी व हिंदू वा हिंदूस्थान कधी करणार.. तसही विग्रजीत स्पेलींग फाट्यावर मारल्याने आपल्याला काय फरक पडतो ? विंग्रजीतही इंडीया म्हणने हाच मूळात एक जोक आहे. किंव्हा सरळ भारत म्हणूया, कीती सूदर नाव आहे ते वापरायला.

बाकी चालूदे... सर्वप्रतिक्रीया रोचक.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2011 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार

हा इंडीया काय प्रकार आहे ?

काय हे आत्मशून्य हा प्रश्न तुम्हाला पडावा ?

गेले कित्येक महिने / वर्षे भारतात आता भारताला मानणारे आणि इंडीयाला मानणारे असे दोन गट पडू लागले आहेत असे मिपाचे विचारवंत गळे फाडून सांगत आहेत. तुमचे लक्ष कुठे आहे ?

हे वाचा बरे जरा.

आत्मशून्य's picture

20 Jul 2011 - 5:03 pm | आत्मशून्य

वाचून डोले पाणावले, तिथलं पूढील वाक्य तर लय भारीच.

One Chinees or Russian or Japnees leaders never speaks in English. But Indian leaders feels proud to speak in English in any International forum.

वा वा वा धाल्याला नवे नवे फाटे फुटु लागले.
सेंचुरीसाठी धागाकर्त्याला आगाउ शुभेच्छा. :)

अजातशत्रु's picture

21 Jul 2011 - 4:50 pm | अजातशत्रु

+१

हेच म्हणायला आलो होतो,

हल्ली मिपाकर सुमार दर्जाच्या फडतूस चित्रपटांचे समिक्षण झेलत असतात,
असे चित्रपट त्या पुर्वी पत्र्याच्या तबकडीत काचेच्या भिंगातून पहायचो तसे दोन हात लावून पहाणयाच्या लाकयीचे नाहित,
चित्रपट आवडला नाहितर लोक बघणार नाहीत,
जाईल डब्यात,
उगा असं आहे तसं आहे, म्हणून चित्रपटांचे मार्केटिंग चालू आहे

.

{ बोलपटातील बोलबच्चन कुमार }

ह्या धाग्याचा उद्देश नव्या प्रौढ विनोदावर साधक बाधक चर्चा व्हावी, असे विनोद असलेले व प्रौढ दृष्ये असलेले चित्रपट हिन्दी किंवा मराठीत यावेत का ?ई. विषयांवर देवाणघेवाण व्हावी हा होता. पाहतो तर बरीच वयस्कर मंडळी प्रौढ पांचट चित्रपट आहे म्हंटल्यावर मुद्दामुन वेळ काढून बघून आलेली दिसतात. आणि आपण पुन्हा गलिच्छ शिव्या देण्यात डेरिंग दाखवतो हे सिध्द करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत(जसा बालिश प्रकार दिग्दर्शकाने केला आहे)
काय हा अभिरुचीचा अधःपात :)
अवांतर- वरती एक चित्रपटसृष्टीविषयी अज्ञ माणसाने रमेश देवचा काय संबंध असा प्रश्न विचारला आहे. तर अभिनय देव हे रमेश देव ह्यांचे सुपुत्र आहेत.

(आम्ही चित्र तारकांच्या वंशावळी पहात नाही..)

भारी समर्थ's picture

20 Jul 2011 - 4:45 pm | भारी समर्थ

भुवयांइतकाच जाड आवाज असलेला आणि त्याहून शतपट बकवास काम करणारा ’इम्रान खान’ नावाचा उच्छाद सहन करण्याची ताकद नसल्यामुळे त्याचे वाईट, बरे किंवा चांगले (अतिशयोक्ती!) चित्रपट पाहतच नाही आपण.

त्यादिवशी ’मुंबई-पुणे-मुंबई’ पाहिला. शिव्यांशिवाय आजचं युथ चित्रीत करणं हे वास्तवतेपासून किती कोसो दूर आहे याची जाण राजवाडेसारख्या माणसाला नसल्याची खंत वाटली.

असो...

भारी समर्थ

रेवती's picture

22 Jul 2011 - 7:39 pm | रेवती

इम्रान खान ह अ‍ॅक्टर नाहीच्चे!
त्याच्या आईनं आमिरला रक्षाबंधनाच्या दिवशी (?) गळ घातली असेल या बाळाला शिनेमात वेंट्री करायला.
मग भैय्याने राखी का बंधन निभवायला याला शिनेमा दिला असं मला वाट्टय.;)
दिल्ली बेलीनंतरच मला हा मनुष्य अस्तित्वात असल्याचा साक्षातकार झाला.
आधी तो इम्रान हाश्मी म्हणजे इम्रान खान वाटत होता.
बाकी बॉम्बे-पूना-बॉम्बेबद्दल सहमत.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2011 - 11:16 pm | अप्पा जोगळेकर

कॉपी करणे या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ वरील काही प्रतिसादांमधे लावला गेला आहे असे वाटते आहे. या हिशोबाने 'द फिशरमन' वरुन प्रेरित होऊन 'एका कोळियाने' लिहिणारे पु.ल. देशपांडे; मार्क ट्वेन, बर्नार्ड शॉ, मोलियर आणि नोएल कॉवर्ड ( ज्याच्या निव्वळ संवादाच्या सामर्थ्यावर नाटके लिहिण्याच्या पद्धतीची 'साष्टांग नमस्कार' मधे सही सही नक्कल केलेली आहे असे आचार्य अत्रे यांनी स्वतः 'कर्‍हेचे पाणी' मध्ये लिहिलेले आहे.) आणि राम गणेश गडकरी याम्च्या लिखाणावरुन प्रेरणा घेऊन लिहिणारे आचार्य अत्रे किंवा लोकमान्य टिळक आणि आचार्य अत्रे यांच्या शैलीमध्ये शिवराळपणा मिसळून लिखाण करणारे बाळ ठाकरे हे सगळेच साहित्यचोर ठरतील. मला स्वतःला तरी तसे अजिबात वाटत नाही. मागे एक्दा कोणीतरी 'मुंबई-पुणे-मुंबई' आणि 'अगबाई अरेच्चा' हे चित्रपटदेखील कोणत्यातरी चित्रपटाची कॉपी आहे असे लिहिलेले होते हे वाचून अत्यंत आश्चर्य वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तर निव्वळ संवादांवर आधारलेला आहे तर मग एक भारतीय तरुण-तरुणी आणि परदेशी तरुण-तरुणी यांच्यातील संवादांचे संदर्भ दूर्दूरपर्यंत तरी मॅच होऊ शकतील काय ? मला वाटतं की असे क्रायटेरिया लावायचे ठरवले तर जगातील ऐंशी टक्के कलाकॄती कॉप्याच ठरतील.