मौज वाटली वाचून

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट
17 Jul 2011 - 10:14 am
गाभा: 

नमस्कार,
आज सकाळी एक बातमी वाचली की म्हणे उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असे सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपमुख्यमंत्र्य...ांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे मला तीव्र दु:ख झाले असून 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करु नये तसेच वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नयेत. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याबरोबरच स्फोटातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

थोडक्यात म्हणजे मी कोणालाही न समजता तो साजरा करणार .

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

17 Jul 2011 - 12:08 pm | मराठी_माणूस

हे राजकारणी दांभीक असतात. एव्हढी मोठी दुर्घटना होउन सुध्दा , हे लोक निर्लज्ज पणे बीसीसीआय च्या निवडणुकीत मश्गूल होते.

इंटरनेटस्नेही's picture

18 Jul 2011 - 10:51 am | इंटरनेटस्नेही

अतिशय खेदजनक टीका.

मृत्युन्जय's picture

18 Jul 2011 - 11:13 am | मृत्युन्जय

थोडक्यात म्हणजे मी कोणालाही न समजता तो साजरा करणार

असा ग्रह का करुन घेतलात आपण?

अजित पवार या व्यक्तीबद्दल मला काडीचा आदर नाही. पण त्यांनी जर अशी काही घोष्णा केली असेल तर ती स्वागतार्हच आहे. खाजगीमध्ये ते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास मुखत्यार आहे. पण उपमुख्यमंत्र्याचे जोडे उचलण्यास तयार असलेल्या लाळघोट्या बगलबच्च्यांनी उगाच नसता भपका उडवुन देउ नये अश्या स्वरुपाचे आव्हान दिसते आहे हे. नाहीतर जागोजागी पोस्टर्स लागतील, फलक उभारले जातील, सभा घेतल्या जातील, जीवेत शरदः शतम ची जाहिरातबाजी केली जाइल. हे सगळे करु नये याचे आवाहन दिसते आहे हे. मला तरी उगाच टीका करण्यासारखे काही वाटले नाही याच्यात,

एक तारा's picture

18 Jul 2011 - 12:04 pm | एक तारा

हेच म्हणतो

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

मौज वाटली वाचून

अरे रे ! देशावर असा वाईट प्रसंग गुदरलेला असताना, आपल्याला कुठल्या गोष्टीची का होईना पण मौज वाटते हे पाहून अपार दु:ख झाले.

वेदना, दु:ख, करुणा अशा भावनांशिवाय इतर कुठल्याच भावनेला आता १३ दिवस आयुष्यात स्थान नसले पाहिजे. असे कसे हो तुम्ही भारतीय?

नितिन थत्ते's picture

18 Jul 2011 - 12:24 pm | नितिन थत्ते

>>अरे रे ! देशावर असा वाईट प्रसंग गुदरलेला असताना, आपल्याला कुठल्या गोष्टीची का होईना पण मौज वाटते हे पाहून अपार दु:ख झाले.

फक्त दु:खच? एक मिपाकर म्हणून शरम नाही वाटली?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त दु:खच? एक मिपाकर म्हणून शरम नाही वाटली?

आता मी मला शरम वाटली असे म्हणालो तर माझा स्वतःचा तरी विश्वास बसेल का थत्ते चाचा? ;)

बादवे, तुम्ही* लोक फूट पाडण्यात एकदम एक्सपर्ट आहात. ही वेळ एक भारतीय म्हणून एकत्र येण्याची आहे ! मी मिपाकर, मी मुंबईकर, मी पुणेकर, मी चित्तपावन असे करणे योग्य नाही.

तुम्ही = महात्मा ;)

नितिन थत्ते's picture

18 Jul 2011 - 12:52 pm | नितिन थत्ते

>>बादवे, तुम्ही* लोक फूट पाडण्यात एकदम एक्सपर्ट आहात.

हो बुवा. आम्ही सर्टिफाईड फूटपाडे आहोत. ;)

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Jul 2011 - 12:00 pm | श्रीयुत संतोष जोशी

धन्य आहे तुम्हा लोकांची.
कुठलीही फालतु गोष्ट तुटेपर्यंत ताणायची कशी हे मिपाकरांकडून शिकावे.
आणि मला वाटली मौज मग काय झालं . (श्री.परा ) तुमच्या घरी येऊन जावं म्हणतो . किती दु:ख झालय हे बघीन म्हणजे मलाही तसं नाटक करता येईल.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2011 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

धन्य आहे तुम्हा लोकांची.
कुठलीही फालतु गोष्ट तुटेपर्यंत ताणायची कशी हे मिपाकरांकडून शिकावे.

आहेतच मिपाकर तसे ग्रेट.

आणि मला वाटली मौज मग काय झालं .

काय होणार ? एक धागा प्रसवला गेला आणि मग आम्ही त्यावर मत नोंदवले.

(श्री.परा ) तुमच्या घरी येऊन जावं म्हणतो . किती दु:ख झालय हे बघीन म्हणजे मलाही तसं नाटक करता येईल.

वा वा ! अहो या की. येतान चकणा वैग्रे घेउन या. म्हणजे गच्चीत खुर्च्या टाकुन बसु. दोन्-दोन पेग लावु आणि दिलातला दर्द जुबान वर आणु.

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Jul 2011 - 12:10 pm | श्रीयुत संतोष जोशी

ये हुवी ना मिपकरोंवाली बात.
आता घरी आल्यासारखं वाटलं.

गणपा's picture

19 Jul 2011 - 2:24 pm | गणपा

"बालकथा" आवडली. ;)