येथे अनेक शब्दकोश मोफत मिळतील..!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
4 Jul 2011 - 12:56 pm
गाभा: 

(१) आपल्या मोबईल हॅण्डसेटसाठी "जावा अर्काइव्ह" (jar) या फॉरमॅट मधली संपूर्णपणे मोफत डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी) हवी असल्यास मला sonar.nimish@gmail.com या इमेलवर विनंती पाठवा. मी डिक्शनरी अ‍ॅटॅच करून पाठवेन.

त्याची साईझ 11 MB आहे. ती आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाउनलोड करा आणि नंतर ब्लूटूथ द्वारे किंवा वायर्ड कनेक्शन USB cable द्वारे मोबाईलमध्ये कॉपी करून इन्स्टॉल करा. ही डिक्शनरी मला इंटरनेट वर खुप शोध केल्यानंतर मिळाली आहे.

ती आहे वेबस्टर डिक्शनरी. यात फक्त प्रत्येक शब्दाचा फक्त अर्थच नाही, तर त्याचे सविस्तर वर्णन, माहिती, व्याख्या आणि समानार्थी (synonyms ) शब्द सुद्ध त्यात दिले आहेत. काही वेळा विरुद्धार्थी शब्द (antonyms) सुद्धा दिलेले आढळतात.

(२) तसेच, मोल्सवर्थ कृत मराठी- इंग्रजी शब्दकोश (pdf) स्वरुपात माझेकडे आहे. तसेच अनेक प्रकारच्या pdf डिक्शनरीज माझेकडे आहेत. हवी असल्यास मला sonar.nimish@gmail.com या इमेलवर विनंती पाठवा.

माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या: http://thinknimish.blogspot.com

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2011 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या मोबईल हॅण्डसेटसाठी "जावा अर्काइव्ह" (jar) या फॉरमॅट मधली संपूर्णपणे मोफत डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी) हवी असल्यास मला sonar.nimish@gmail.com या इमेलवर विनंती पाठवा. मी डिक्शनरी अ‍ॅटॅच करून पाठवेन.

काय गरज आहे ?
त्यापेक्षा ती एखाद्या फाईल शेअरींग संस्थळावरती अपलोड करा आणि त्याची लिंक इथे द्या ना. विनामोबदला फाईल शेअरींग संस्थळांवर देखील कमित कमी ७ दिवस फाईल शेअरींग साठी ठेवता येते.

आणि रागावु नका पण ह्या डिक्शनरी अगदी सहजपणे आंतरजालावर उपलब्ध आहेत.

मोल्सवर्थ ५२ एमबी आहे. ४शेअर्ड वर अपलोड साठी ट्राय करून पाहातो.

कुणाकडे चाऊस डिक्शनरी (मराठी - इंग्रजी) pdf आहे का?

सुनील's picture

4 Jul 2011 - 1:54 pm | सुनील

pdf नाही पण कागदी प्रत (विकत घेतलेली) आहे!

pdf बनविण्यासाठी कुणाला हौस (आणि वेळ) असल्यास मी ती प्रत काही दिवसांकरीता देऊ शकतो!

चाऊस ची कागदी प्रत माझेकडेही आहे...पण दर वेळेस ती आपण सगळीकडे सोबत घेवून जावू शकत नाही. त्यापेक्षा लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये टाकून अगदी चोवीस तास, मिटींग मध्ये, सेमिनारमध्ये असतांना एखादा शब्द अडल्यास पटकन लॅपटॉपवर शब्द बघू शकतो किंवा लॅपटॉप नसल्यास मोबईल तर प्रत्येका जवळ असतोच की! म्हणून मी विचारले.
चाऊसची कायदेशीर pdf कुठे नेटवर उपलब्ध आहे का? कुणाला माहित असल्यास कळवावे.
तसेच इंग्रजी मराठी डिक्शनरी मोबाईलसाठी विकत हवी असल्यास http://www.khandbahale.com या वेबसाईटवर मिळते.

निनाद's picture

4 Jul 2011 - 2:05 pm | निनाद

पिडिएफ बनवू नये! हा कोश युनिकोडमध्ये आला तर उपयोग जास्त होईल. शिवाय अनेक अ‍ॅप्लिकेश्न्स ना जोडता येईल. हे सर्व जर त्याचा प्राताधिकार संपला असेल तरच.

अन्यथा ही चोरी ठरणार नाही का?

निमिष सोनार's picture

4 Jul 2011 - 2:55 pm | निमिष सोनार

तेच म्हणतो मी. चाऊसची pdf बनवू नये.
फक्त कायदेशीररित्या आधीच उपलब्ध असेल तर सांगावे.
मी वरही असेच म्हणालो आहे...

निमिष सोनार's picture

4 Jul 2011 - 2:54 pm | निमिष सोनार

मोल्सवर्थ ची साईझ खुप जास्त असल्याने (५२ एम. बी. ) ती मेलवर पाठवायला कठीण आहे. त्या ऐवजी त्याची लिंक खाली देत आहे:
Molesworth Link:
http://www.archive.org/details/acompendiummole00molegoog