गाभा:
नुकतीच ही बातमी वाचनात आली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9084482.cms
ह्यात म.टा. ने कुठल्याश्या गणिततज्ञाचा संदर्भ देऊन असा दावा केला आहे कि जुलै महिन्यात
५ रविवार येण्याचा योग (संदर्भ जुलै २०११) हा अतिशय दुर्मिळ असून साधारणतः ८२३ वर्षानी हा योग येतो.
वास्तविक पाहता ज्या महिन्याचे ३१ दिवस असतात व महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार असेल अशा सर्व महिन्यात ५ शुक्रवार,५ शनिवार व ५ रविवार येतात. जुलै महिना देखील ह्याला अपवाद नाहि.
२००५, २०११,२०१६,२०२२,२०३३,२०३९,२०४४,२०५०,२०६१,२०६७,२०७२,२०७८,२०८९ व २०९५ अशा सर्व वर्षात जुलै महिन्यात असा योग आहे.
तर मला पडलेला प्रश्न असा कि ८२३ हा आकडा आला कुठून?
प्रतिक्रिया
3 Jul 2011 - 2:54 pm | कुंदन
म टा बरोबर कुठे डोके लावतोस राव?
3 Jul 2011 - 3:09 pm | तुझ्याच शोधात....
बरोबरय.. नका लावु डोक.. उगाच खाजवाव लागेल..
शेवटी सगणकावर कळ्तच की....
3 Jul 2011 - 3:44 pm | आंबोळी
तुम्ही आपले नाव अभिढ का करून घेत नाही?
3 Jul 2011 - 5:06 pm | चिरोटा
गरज नसली तरी प्रोग्रॅम लिहून बघितला. ३ जुलैला रविवार किती वेळा आले ते बघायला.११८० पासून ते आतापर्यंत. ११८३ साली प्रथम असेच झाले आहे.नंतर ५,६,११,६,५,६,११,६,५,६,११... असा पॅटर्न आहे.
म्हणजे ह्या आधी असेच- १९७७,१९८३,१९८८,१९९४,२००५ साली झालेले आहे.
मटावाले स्वतःच गणितज्ञ झालेले दिसतात.
मटाच्या मोठ्या भावाने http://timesofindia.indiatimes.com/india/After-823-yrs-5-weekends-this-J... ही बातमी दिली. बातमी देणारे चित्तरंजन टेंभेकर आहेत.
(मटाने) उचलली बातमी लावली साईटवर.
3 Jul 2011 - 9:10 pm | यकु
नेहमीसारखीच!
3 Jul 2011 - 6:10 pm | मदनबाण
मटावाले सध्य परिस्थीत गंडलेलेच दिसतात... ;)
4 Jul 2011 - 10:59 am | महेश काळे
बहुतेक त्यान्नी अर्धवट माहीती दिली आहे...
या महिन्यात ५ शुक्रवार ५ शनीवर आणी ५ रवीवार आहेत..
असा योग बर्याच वर्षानी येतो..
4 Jul 2011 - 11:21 am | अभिज्ञ
या महिन्यात ५ शुक्रवार ५ शनीवर आणी ५ रवीवार आहेत..
असा योग बर्याच वर्षानी येतो..
हे देखील खरे नाही.
मे २००९ मध्ये प्रत्येकि ५ शुक्रवार,शनिवार व रविवार आले होते.
ढकलपत्रातून असा मेल येणे व म.टा. ने तो कुठलीहि शहनिशा न करता छापणे ह्याचे मात्र आश्चर्य वाटते.
अभिज्ञ.
4 Jul 2011 - 1:33 pm | गणपा
>>ढकलपत्रातून असा मेल येणे व म.टा. ने तो कुठलीहि शहनिशा न करता छापणे ह्याचे मात्र आश्चर्य वाटले नाही.
गेल्याच महिनाय असं ढकल पत्र आल होत. ज्याने पाठवलं त्याला मे २००९ चच उदाहरण दिलं. तर म्हणे मी फक्त ढकलायच काम केलं.
अभिज्ञा डोक बाजुला ठेवुन काम करणारे कमी नाहीत या जगात. ;)
4 Jul 2011 - 2:24 pm | महेश काळे
तुम्ही नक्की कोणत्या महिन्या बद्दल बोलता आहात??
२००९ मध्ये मला असा एकही महीना सापडला नाही..
क्रुपया कोणता महीना ते सं सांगु शकाल का ?
4 Jul 2011 - 2:39 pm | गणपा
काय काका सपष्ट लिव्हलय की.
मे २००९
4 Jul 2011 - 3:11 pm | महेश काळे
धन्यवाद!! गणपा...
4 Jul 2011 - 12:51 am | कार्लोस
इथे खाज..... साठी पण वेळ नाही आणि कुठे ८२३ वर्ष्यांच्या गोष्टीत वेळ घालवताय चला आप आपले काम करूया
4 Jul 2011 - 11:13 am | गवि
ढकलपत्रातून फिरणारा मजकूर मटाच्या कोणाकडेतरी पोचला असणार आणि तो काही शहानिशा न करता छापून मोकळे..
चालायचंच..
4 Jul 2011 - 4:03 pm | धमाल मुलगा
म.टा.चे मिपावरिल प्रवक्ते श्री.परिकथेतील राजकुमार ह्यांच्या विशेष टिप्पणीच्या प्रतिक्षेत.
(पळा तिच्यायला....हाणतंय ते पर्या आता...)
9 Jul 2011 - 11:34 am | कुंदन
"सकाळ" सोडला काय त्यांनी ?
9 Jul 2011 - 12:37 pm | श्रावण मोडक
'स्वयंघोषीत' शब्द राहिला का रे? ;)
9 Jul 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
काय हलकट लोकं आहेत.
(मिपावर प्रेम असणार्यांनी मटा वाले हलकट आहेत असा अर्थ घ्यावा आणि मटा प्रेमींनी मिपावाले हलकट आहेत असा बोध घ्यावा)
9 Jul 2011 - 1:02 pm | श्रावण मोडक
आपण मित्र, की नै? ;)
9 Jul 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
तसे आपण गेली ८२३ वर्षे मित्र आहोतच.
पण सध्या तुम्ही चुकीच्या मर्गानी चालला आहात असे मत नोंदवतो ;)
9 Jul 2011 - 1:07 pm | श्रावण मोडक
बास्स. बास्स!!! आता पुढं काहीही लिही; कारण मार्ग हा शेवटी दृष्टिकोनाचाच भाग असतो. ;)