साहित्यः
रेडी क्रॅब मिट स्टिक्स - १ पॅकेट
ब्रेड क्रम्ब्स - १/२ वाटी
अंडे - १
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
तिखट - २ चमचे
हिंग - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
लिंबु - १/२
मिठ चवीनुसार
तेल
कृती:
१. रेडी क्रॅब मिट स्टिक्स ह्या frozen मिळतात. त्या defrost करुन घ्याव्यात.
(हा फोटो internet वरुन घेतला आहे)
२. ह्या सर्व स्टिक्स पॅन मधे थोड्या तेलावर shallow fry कराव्यात.
३. ह्या fry केलेल्या स्टिक्स मिक्सर मधे एकदम बारीक करुन घ्याव्यात.
४. ह्या मधे १ अंडे, आले-लसुण पेस्ट, १/२ लिंबु, तिखट, हळद, हिंग, धणे पावडर व चवीनुसार मिठ टाकावे.
५. हे सर्व मिक्स करुन त्यात बसेल, किंवा त्याचे हाताने कटलेट करता येतील, एवढे ब्रेड क्रम्ब्स टाकावे.
६. ह्या मिश्रणाचे हाताने कटलेट करुन घ्यावेत.
७. पॅन मधे थोडे तेल टाकुन, ते गरम झाल्यावर कटलेट shallow fry करावेत.
८. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा चिंच-खजुराच्या चटणी सोबत गरम serve करावे.
प्रतिक्रिया
30 Jun 2011 - 5:00 am | स्वाती२
छान फोटो पण मला इमिटेशन क्रॅबमिट फारसे आवडत नाही. क्रॅबमिटचे ओल्ड बे सिझनिंग वापरुन केलेले क्रॅबकेक्स मला खूप आवडतात. :)
30 Jun 2011 - 2:30 pm | सानिकास्वप्निल
छानच गं :)
30 Jun 2011 - 2:41 pm | इरसाल
पहिला फोटो बघून दचकलोच. म्हटलं गवत कुठे कसे कधी ?
बाकी कटलेट छान दिसतायेत .
राग मानू नका पण चटणीची डिझाइन बदला.
30 Jun 2011 - 2:54 pm | Mrunalini
धन्स.. :)
हो, आणि चटणीची डिझाइन काय पटकन सुचली नाही.. त्यामुळे अशीच केली. पुढ्च्या वेळी वेगळी करेल नक्की. :)