गाभा:
फार वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात एक संघटना होती राष्ट्र सेवा दल
त्यांच्या शाखा लागत. समाजातील सर्व स्तरातील युवक शामील व्हावे हा प्रयत्न असे
समाजवादी विचार हा पाया होता
साने गुरुजी संस्थापक होते
विचारानी कॉंग्रेसशी जवळची होती ही संघटना
याची कलापथकेही होती, त्यामधे अनेक थोर लोक शामील होते
निळू फुले, राम नगरकर, पुलं देशपाण्डे, दादा कोण्डके, गदिमा असे
आज यांच्या शाखा कुठे आहेत
कॉंग्रेसच्या नेत्यांच्या तोण्डी राष्ट्र सेवा दल चा उल्लेख असतो
अशा सेवा दलासारख्या संघटनेतून घडलेले कडवे कार्यकर्ते हीच कुठल्याही संघटनेची, आन्दोलनाची ताकद असते
या राष्ट्र सेवा दला बाबत काही कुणाला माहीती आहे का ?
प्रतिक्रिया
29 Jun 2011 - 1:42 am | निमिष ध.
मी सुद्धा लहानपणी राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जायचो. आमच्या जवळच त्यांचा एक कार्यकर्ता राहायचा तो नेहमी शाखा भरवायचा.
खेळ खेळण्या बरोबर साने गुरुजींचे गाणे, गोष्टी आणि कधी कधी काही श्रमदान असायचे. सेवादलाचे कार्यकर्ते कडवे नक्कीच नव्हते. समाजवादी होते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे.
काँग्रेस च्या जवळ असेल कारण त्यावेळेस समाजवादी विचार आणि काँग्रेस (नेहरू) यांचे विचार जुळत होते. पण नंतर नुसत्याच झुंड शाही मध्ये या शाखा कुठे गेल्या माहिती नाही. नंतर बरेच कार्यकर्ते (निदान आमच्या गावात ) काँग्रेस च्या नेत्यांचा प्रचार करू लागले. आणि मग निवडणुकीमध्ये तिकीट धनदांडग्यांना मिळाल्यावर स्वप्नभंग होऊन विरोधात उतरले. अजूनही काही कार्यकर्ते खेडेगावांमध्ये विविध समस्यांवर लढताना दिसतात. संगमनेर (जि. नगर) मध्ये अजूनही त्यांचे कार्यालय आहे.
सेवा दलाच्या काय आणि संघाच्या काय ... सध्या कुठल्याच शाखा मला तरी दिसत नाहीत. शाखा या एक विचार घडवणाऱ्या संस्था होत्या पण त्या विरळ होताना आजचा युवक दिशाहीन आणि संघटना हीन होतो आहे. तो सध्या मग अण्णा हजारेंमध्ये कोणी तरी दिशादर्शक पाहतो आहे. पण मला तरी कोणता पक्ष सध्या शाखा भरवताना दिसत नाही.
शाखेत म्हटले जाणारे एक गाणे होते " पणती जपून ठेवा अंधार फार झाला - थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला " त्याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण आता पटतो आहे .
29 Jun 2011 - 2:15 am | शुचि
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला | थोड़ा उजेड ठेवा, अंधार फार झाला ||
आले चहुदिशांनी तुफान विस्मृतीचे | नाती जपून ठेवा, अंधार फार झाला ||
शिशीरातल्या हिमात हे गोठतील श्वास | ह्रदये जपून ठेवा, अंधार फार झाला ||
वणव्यात वास्तवांच्या होईल राख त्यांची | स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला ||
काळ्या ढगांत वीज आहे पुन्हा टपून | घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला ||
शोधात कस्तूरीच्या आहेत पारधी हे | हरणे जपून ठेवा, अंधार फार झाला ||
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता | हातात हात ठेवा, अंधार फार झाला ||
ह्रदयात तेवणार्या जखमा तुम्हीच आता | कंदील एक लावा, अंधार फार झाला ||
29 Jun 2011 - 2:29 am | निमिष ध.
धन्यवाद शुचि ताई .. खरच अप्रतिम गाणे आहे ते. लहानपणी काही अर्थ कळला नव्हता. तेव्हा नुसते गम्मत म्हणून म्हटले होते.
आत्ता मी पण शोधले तर दिसते आहे की कवी आहेत हिमांशू कुलकर्णी. त्यांच्या कविता उद्ध्वस्त रात्रींच्या या कवितासंग्रहातील आहे.
खालील दुवा http://kharedi.maayboli.com/shop/Kavita-Udhavsta-ratrichya.html
29 Jun 2011 - 3:27 am | शिल्पा ब
<<कॉंग्रेसच्या नेत्यांच्या तोण्डी राष्ट्र सेवा दल चा उल्लेख असतो
जे नाव घेतल्याने फायदा होतो तेच नाव कांग्रेसजनांच्या तोंडी असते असे आमचे मत आहे.
29 Jun 2011 - 9:22 am | रणजित चितळे
नर्मदेतला गोटा आपली राष्ट्रसेवा दला बद्दलची माहिती आवडली.
माझ्या मते लहान मुलांना घेऊन मोठ्यांनी खेळ खेळले पाहिजेत. मग तो 'ग्राउन्ड' घेणारा एखादा तरुण असो, संघाची शाखा असो, सेवा दलाची शाखा असो पण काही तरी तत्सम असले पाहिजे. नुसतीच मुले सुटी असली की उनाडक्या करतात किंवा हल्ली कॉम्प्यूटर कॅफे मध्ये कॉम्प्यूटर गेम्स खेळतात. त्यांना सुसंबद्धरीतीने दिशा दाखवणारे प्रौढ शिक्षक हवेत. हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. असे माझे मत आहे. ह्याला मी शाळे बारेरच्या शाळा म्हणतो.
29 Jun 2011 - 3:59 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे रणजित. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायलाच पाहीजेत. संस्कार हे असेच होत असतात. लहान मुलांना असं कशाला सांगा, तसं कशाला सांगा असं म्हणणार्यांची मला फार गम्मत वाटते. मुले तशीही मोठी झाली की स्वतःला हवं त्तेच करणार पण म्हणून आपण आपली जबाबदारी का बरं पार पाडू नये.
29 Jun 2011 - 10:03 am | चिरोटा
ह्या संघटनेचे नाव फक्त ऐकले आहे. मध्यम वर्गात काँग्रेसचा प्रचार करणारी संघटना असा माझा (गैर) समज होता.
इथे त्याग करुन राष्ट्रसेवा करण्यापेक्षा निवडून येवून राष्ट्र 'सेवा' चांगल्या पद्धतिने करता येते हे लोकांना उमगले त्यामुळे शाखा बंद झाल्या असाव्यात.
29 Jun 2011 - 11:59 am | विसुनाना
राष्ट्र सेवा दलाचे एक गाणे -
"आहोत बच्चे नाही भिणार
आहोत बच्चे, बच्चे विरांचे नाही भिणार
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे नाही भिणार
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे नाही भिणार
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे नाही भिणार"
आता 'बच्चे' या शब्दांऐवजी 'बगलबच्चे' असे म्हणावे लागेल.
अवांतर :
'शामिल' असा शब्द मराठीत नाही. तो 'सामिल' असा आहे.
29 Jun 2011 - 1:49 pm | इरसाल
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे, काँग्रेस राहुलचे नाही भिणार.
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे, राहुल सोनियाचे नाही भिणार.
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे, सोनिया राजीवचे नाही भिणार.
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे, राजीव इंदिराचे नाही भिणार.
आहोत बच्चे, बच्चे विरांचे, वीर दलाचे, दल काँग्रेसचे, इंदिरा नेहरुचे नाही भिणार.
29 Jun 2011 - 3:38 pm | नितिन थत्ते
मा़झ्या माहितीप्रमाणे राष्ट्र सेवा दल हे समाजवादी लोकांचे होते आणि काँग्रेसचे काँग्रेस सेवादल म्हणून अजून एक वेगळे होते. तेव्हा राष्ट्र सेवादलाच्या धाग्यावर नेहमीची गरळ नको. त्यासाठी वेगळ्या धाग्यांचा रतीब घालावा.
29 Jun 2011 - 3:59 pm | विसुनाना
असे काय? गाणे मागे घेतो. :) घेतो काय? अहो घेतलेच!
वरच्या लेखात काँग्रेस पुढार्यांचा उल्लेख आहे त्यामुळे गल्लत झाली.
या दोन्ही दलांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक होता काय? स्वातंत्र्यापूर्वी हे दोन्ही एकच होते काय?
इथे मात्र एकदम नवीनच 'राष्ट्र सेवा दल' दिसले.
अवांतर :
राष्ट्र सेवा दल , चिन्मय मिशन वगैरे संस्था वधुवरसूचकमंडळांसारखेही कार्य करत अशी अफवा ऐकली होती. हे खरे आहे काय?
29 Jun 2011 - 4:39 pm | इरसाल
इतपत असेलसे वाटले नव्हते. असो.
राशी प्रमाणे आमची वागणूक.
उगा कुणाला मायेचा काटा नको .लिहिलेले सगळे कॉंग्रेस काढून वाचावे.
बाकी नावांना तुमचा आक्षेप नसावा.
जसे राहुल - रॉयांचा
राजीव - खन्डेलवालाचा
सोनिया- 'सोनियाचा दिनू' ची
इंदिरा - जगतापांची
नेहरू- जसा सचिन सच्हू तसा नेहरा नेहरू.
हे बाकी कै च्या कैच.
29 Jun 2011 - 5:29 pm | श्रावण मोडक
अंधारात उजेड पाडण्याची तुम्हाला का घाई झाली? थोडा वेळ अजून जाऊ द्यायचा ना राव. छ्या... या थत्तेचाचांचंही ना... ;)
29 Jun 2011 - 9:59 pm | विकास
मा़झ्या माहितीप्रमाणे राष्ट्र सेवा दल हे समाजवादी लोकांचे होते आणि काँग्रेसचे काँग्रेस सेवादल म्हणून अजून एक वेगळे होते.
माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रसेवादल हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे जेंव्हा समाजवादी हे कॉग्रेसचे होते तेंव्हा पासूनचे होते. नंतर पन्नासच्या दशकात प्रजासमाजवादी पार्टीच्या स्थापनेनंतर समाजवादी काँग्रेसमधून विभक्त झाले त्यानंतर काँग्रेस सेवा दल तयार झाले.
अजून एक गोष्ट म्हणजे, "काँग्रेसचे काँग्रेस सेवादल म्हणून अजून एक वेगळे होते" नसून "आहे". त्यांचे आपले सायलेंट वर्क चालू असावे इतकेच काय ते. ;)
30 Jun 2011 - 1:09 am | अनिवासि
namaskar
First of all my apologies for writing in English. It is not that I cannot read or write Marathi but I am finding it verey difficult to type! just wrote 3/4 paragraphs- took me over 45 mins and then suddenly all that vanished. so pls forgive this intrusion.
Writing about seva Dal brought back loads of memories and I just felt that I had to put them down. If it upsets/ annoys some people- so be it!
I think the first Shakaha of the Dal was held at Pantncha Goat in Sadashiv peth Pune. The year would be around 41-43. I was one of the earliest member of the shakaha at the age of 8/10. It was a hugh ground and every night it was full of young enthusiastic boys. We played all sorts of games including American Baseball, HuTuTu,and all such deshi games.
Our leaders at the time included Pradhan sir, Bhausaheb Ranade, Vasantrao Bapat and so on.
Those were the magical daysof pre independence. Every night we heard stories about the independence struggle,general politics( suitable for our ages) and of course lots of wonderful stories!
Just before independence - August 47 we were involved enthusiatically in making new flags, buntings etc and selling it to all the shopkeepers etc.
On the night of 14/15th August we marched with torches to the Collectors office to watch the Union flag come down and repalced by the TRICOLOURS.A night to remember for ever.
Yes, those were the magical days in more ways that one. I made some wonderful friends whom I still see when ever I visit India. I had the great fortune to meet up with Pradhan sir, Nilu Phule, Shaheer Hegade, and of course Vasantrao Bapat who wrote such wonderfully stirring songs for us youngsters. A few years ago, just before his death, I spent a lovely evening with him and we sang my favourite song of his-Samaajawadi sathi gatti----.. at the top of our voices!-- me 70+ and sir older than me!
My knowledge of politics is very limited. As far as I remember, we started as Rashtra Seva Dal. , Then the samajwadi faction left the congress party and so we had congress seva dal and rashtra seva dal. For us youngsters, this did not mean much. we went with our seniors- mostly to RSD. By this time we had moved to a new place in Navi Peth and both CSD and RSD met right next to each other.
Looking back, I think these organisations- RSD, CSD and , yes. RSS moulded the character of that generation.
I believe that whatever I have achieved today has its roots in my family, my schools ( primary& secondary) and my membership of the Rashtra Seva dal.
I am very proud of having been a SAINEEK!
30 Jun 2011 - 1:28 am | विकास
श्री. अनिवासि यांना अनेक धन्यवाद!
राष्ट्रसेवा दलाबद्दल आणि त्यातील सन्माननीय सदस्य-शिक्षकांबद्दलच्या वैयक्तीक आठवणी येथे सांगून आपण हा धागा सार्थकी लावलात आणि खर्या अर्थाने परत गाडी रूळावर आणलीत! :-)
मला कल्पना आहे की कदाचीत सुरवातीस मराठीत टंकणे तुम्हाला अवघड जात असेल. पण विश्वास ठेवा, तुमच्याच पिढीतील आमच्याकडील वडील माणसांचे अनुभव पहाता तुम्हाला देखील नक्की जमू शकेल याची खात्री आहे.
अजूनही त्या मंतरलेल्या दिवसांबद्दलच्या आणि राष्ट्रसेवादलातील तुमच्या शिक्षकांबद्दलच्या आठवणींबद्दल येथे लिहावेत ही विनंती!
30 Jun 2011 - 9:11 am | रणजित चितळे
Looking back, I think these organisations- RSD, CSD and , yes. RSS moulded the character of that generation.
I believe that whatever I have achieved today has its roots in my family, my schools ( primary& secondary) and my membership of the Rashtra Seva dal.
सर आपला प्रतिसाद वाचला मला छान वाटले. खरे आहे आपले म्हणणे. मागे मी शाळे बाहेरच्या शाळा म्हणून ह्याच संकेतस्थळावर लेख लिहिला होता. मला वाटते ह्या बरोबर किर्तन व प्रवचनांचे महत्व पण खुप आहे माणसाला घडवण्यात.
http://www.misalpav.com/node/15453
30 Jun 2011 - 10:13 am | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम प्रतिसाद.
सर, तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल जरूर जरूर लिहा. टंकायला जमेल हळूहळू.
1 Jul 2011 - 8:11 am | प्रदीप
माहिती. प्रतिसाद आवडला.
प्रा. वसंत बापटांच्या उल्लेखाशिवाय राष्ट्रसेवा दलाचा इतिहास अपूर्ण राहिला असता, त्यांच्या सविस्तर उल्लेखाने बरे वाटले.
राष्ट्रसेवा दलाच्या तेव्हाच्या भारलेल्या दिवसांविषयी अजून सविस्तर जरूर लिहावे, अशी मीही अनिवासींना विनंती करतो.
1 Jul 2011 - 9:07 am | नगरीनिरंजन
त्या काळात आजच्याइतक्या संशयी नसलेल्या वातावरणातल्या व्यक्तीकडून आणखी अनुभव वाचायला मिळाले तर आनंद वाटेल.
दादा कोंडके, निळू फुले वगैरे कलाकार मंडळीही सेवा दलाच्या पथकांतूनच पुढे आली असं वाचल्याचं आठवतंय.
3 Jul 2011 - 6:19 pm | अप्पा जोगळेकर
मराठीत लिहिण्याचा थोडासा सराव केलात तर नक्कीच जमेल. 'नरहर कुरुंदकर' देखील राष्ट्र सेवा दलाचेच होते काय ? माझ्या माहितीनुसार होते. तरी खात्री नाही. बाकी साने गुरुजींच्या बद्दल काय बोलावे. थोर माणूस. विशिष्ट वर्गाचा द्वेष करण्याचे बाळकडू देनार्या संघटनेपेक्षा 'राष्ट्र सेवा दल' सारख्या संस्था केंव्हाही चांगल्याच.
पण अशा संस्थेच्या सदस्यांवर सतत एक प्रकारचा नैतिकतेचा मानसिक दबाव असतो असे निरीक्षण आहे.
म्हणजे अशा एखाद्या संस्थेच्या एखाद्या सदस्याला सिगरेट पिण्याची/ दारु पिण्याची/ मर्डर-२ पाहायला जाण्याची इच्छा असूनही तो माणूस या गोष्टी करु शकणार नाही. किंवा केल्याच तर चोरुन चोरुन करेल. निदान त्याच्या सदस्य मित्रांना/ ज्येष्ठ सदस्याना ते कळू नये याकरता आटोकाट प्रयत्न करेल. या गोष्टी चांगल्या की वाईट हा वादाचा मुद्दा नाहीच. मुद्दा हा आहे की जबरदस्त इच्छा झालेली असतानासुद्धा अशी एखादी गोष्ट नैतिकतेच्या बंधनामुळे न करणे अथवा चोरुन करणे कितपत योग्य आहे ? अशा नैतिक बंधनांमुळे (जी तोडून टाकावीत असे मनातून वाटत असते) माणसाची नैसर्गिक उर्मी दाबली जाण्याची जी प्रक्रिया आहे तीचा तिटकारा वाटतो.
1 Jul 2011 - 9:42 am | ऋषिकेश
वा! सध्या विविध अंगांनी नॉस्टाल्जिआ बहरतोय मिपावर
हा पावसाळी वातावरणाचा परिणाम असावा का?
चर्चा प्रस्ताव व चर्चा आवडली हेवेसांन
2 Jul 2011 - 10:35 pm | अविनाशकुलकर्णी
राष्ट्र सेवा दल
त्यांच्या शाखा लागत. ...............फेकु नका
शाखा फक्त रा.स्व.संघाच्या लागायच्या.....
दल हे दल होते..
दलात व शाखेत हाणामा~या व्हायच्या असे अंधुकसे आठवते..
या राष्ट्र सेवा दला बाबत काही कुणाला माहीती आहे का ?
सा~या विसर्जन झाल्या..कारण त्या विसर्जन होण्याच्या लायकिच्याच होत्या..शोक करु नका...
{ता.क.}रा.स्व.स. अजुन जिवंत आहे..