गाभा:
बर्याच दिवसांन पासून काही प्रश्न मला भेडसावत आहेत.. ह्या चर्चेतून ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणाचा एक प्रयत्न..
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात?
त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्या ह्याचे भान का नसते?
अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना?
रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना?
(व्यथित) केशवसुमार
प्रतिक्रिया
19 May 2008 - 4:34 pm | मुक्तसुनीत
बर्याचदा आपण कलाकार आणि तुमच्याआमच्यासारखा माणूस या गोष्टींमधे गल्लत करतो. कलाकार शेवटी माणूसच. जोवर तो लिहीतो, गातो, नृत्य करतो, अभिनय करतो तोवरच्या क्षणांमधे आपल्यापेक्षा वेगळा; इतकेच. बाकी तो/ती तुमच्या आमच्यासारखेच , कमी अधिक फरकाने. त्यांनाही गरजा आहेत , त्यांनाही विकार आहेत.
शेवटी एक कलावंत म्हणून तो/ती आपल्याला काय सांगत आहेत, आपल्या नेहमीच्या जगातून त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीत ते कितपत परिणामकारकरीत्या नेऊ शकतात ते महत्त्वाचे. त्यांच्या "रोजमर्रा की जिंदगी में" ते आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत.
19 May 2008 - 4:39 pm | केशवसुमार
ते हे मान्य का करत नाहीत? तेही नाही आणि त्यांच्या भोवती आसलेले त्यांचे भाट ही नाही..
सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का?
केशवसुमार
19 May 2008 - 4:42 pm | आनंदयात्री
>>सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का?
सहमत.
19 May 2008 - 4:44 pm | केशवसुमार
वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात..
19 May 2008 - 5:09 pm | हेरंब
अशा व्यसनी कलाकारांना जवळच्या लोकांनी समज द्यायला पाहिजे. नाटकातले एक थोर कलाकार माझे मित्र आहेत. दारु हा संध्याकाळचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांचे मत आहे. तसेच ते जरी सरळमार्गी असले तरी इतर कलाकारांच्या भानगडींचे समर्थन करतात. हे मला पटत नाही असे मी त्यांना अनेकदा स्पष्ट सुनावले आहे.
19 May 2008 - 6:05 pm | आर्य
काही कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ असतात हे खरे पण सगळी च मंडळी नसतात-
ती आपल्या कला निर्मीतीत ईतकी गुंग असतात की भोवतालच्या जगाचे ज्ञानच ऊरत नाही.
याची धुंदी कधी ऊतरुच नये अश्या वाटण्यातून सृजनाची नवी संधी न-शोधता त्याच निर्मीतीचा आनंदात बुडून जातात. कदाचीत हे त्याचे परीणाम !
या यशोधुंदीतुन बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नव निर्मीती अशक्य आहे.
(कलंदर) आर्य :D
19 May 2008 - 6:41 pm | स्वाती दिनेश
सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का?
वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात..
अगदी सहमत! हे स्वत:ला 'डिस्काउंट देणे'च झाले..
19 May 2008 - 6:43 pm | राजे (not verified)
शक्यतो... कलाकृती निर्माण झाल्यानंतर अथवा निर्माण करताना... जो आनंद / दुखः ते लोक अनुभवत असतील त्याचे निराकरण करण्यासाठी शक्यतो ते व्यसनाचा मार्ग पकडत असतील असे मला वाटते.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
19 May 2008 - 6:49 pm | कुंदन
व्यसनी लोकांना फक्त निमित्त हवे .... भले ते आनंद साजरा करण्यासाठी असो अथवा दुखः विसरण्यासाठी असो.
19 May 2008 - 7:14 pm | स्वाती राजेश
यांना लहान वयात पैसा, प्रसिद्धी मिळालेली असते..
त्यामुळे त्यांच्यासमोर लक्ष्य (एम)असे काही नसते....आता पुढे काय करायला नसल्यामुळे ही मंडळी अशी व्यसनी होतात असे वाटते.
19 May 2008 - 7:25 pm | चतुरंग
चंगीभंगीपणा, विक्षिप्तपणा हवाच किंवा असणारच हा एक फार मोठा गैरसमज बर्याचवेळा असतो - त्या कलाकार व्यक्तीचा आणि आजूबाजूच्या लोकांचा.
त्या माणसाच्या कलेचा आणि ह्या इतर गोष्टींचा अन्योन्य संबंध लावून आपण त्या माणसाला माफ करुन टाकतो. किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ते लक्षात जरी आले तरी त्याची कानउघाडणी करण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसते कारण एकतर त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही ही भीती किंवा त्या कलाकाराला मिळणारे यश, पैसा, मानमरातब ह्यांने आलेले मिंधेपण.
अनेक मोठे लोक ह्यातून सुटले नाहीत. (एक उदाहरणच घ्यायचे झाले तर - असामान्य गायकनट बालगंधर्व यांची अखेरच्या दिवसात झालेली अवस्था बघवत नसे असे लोक सांगतात. मराठी रंगभूमीवरचा हा चमत्कार तितक्याच विचित्र पद्धतीने अस्तंगत व्हावा हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.)
कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी व्यक्ती म्हणून, व्यवहाराचे भान असलेला एक माणूस म्हणून ते ह्या जागी कमीच पडले असे खेदाने म्हणावे लागते.
ह्या मोठया लोकांना एकप्रकारे देवत्व बहाल करुन आपणच त्यांच्या कित्येक भल्या/बुर्या गोष्टी ह्या असामान्यत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवतो.
त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. कलाकारातला विवेक जागा असेल तर तो अशा भूलभुलैय्याला बळी न पडता त्यातला माणूस जागा ठेवून वाटचाल करु शकतो. कित्येकदा आयुष्यातले मोठे अपघात त्या व्यक्तीला जागेवर आणायला कारणीभूत ठरतात. कित्येकदा कशानेच त्यातला माणूस हा ह्या जगात येत नाही आणि त्यांची दुरवस्था होते.
कोणत्याही कारणाने व्यसनाधीन होणे हा मनाचा कमकुवतपणाच म्हणायला हवा. ती पळवाट आहे. काही छोट्या कलाकारांना त्यांच्या भोवतालचे लोभी वर्तुळ स्वतःच्या लाभापायी सत्याची जाणीव करुन देत नाहीत.
सर्वसामान्य रसिकाच्या मनात त्याच्या कलेविषयी आदरही असतो आणि व्यसनीपणा/विक्षिप्तपणाबद्दल दु:ख, वेदना, सलही असतो. फक्त ती वेदना व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्यात नसते कारण त्यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला आपण पारखे होऊ ही भीती असावी.
तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्याला झाकोळून टाकणारे प्रसिध्दी, कला, ह्यांचे वलय आपल्याभोअवती नसते त्यामुळे आपण लगेच उघडे पडतो. समाजाच्या दबावापयी, काही नैतिक बंधनांपायी आपण स्वतःला जबाबदार्यांपासून सहजासहजी तोडून टाकू शकत नाही. कारण त्यामुळे होणार्या मानहानीला तोंड देण्यासाठी लागणारे सुरक्षा कवच आपल्याकडे नसते. (ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे त्यातलेही बरेच लोक असे वागताना आपण वाचतो/पाहतो/ऐकतो पण ह्याठिकाणी तो विषय नव्हे.)त्यामुळे कलाकारातला माणूस त्यातले गुण-दोष आणि आपल्यातला माणूस आपल्यातले तसेच गुण-दोष ह्यातला मुख्य फरक हा प्रसिध्दीच्या वलयामुळे आलेला असतो.
हे वलय दूर व्हायचा अवकाश की ते धाडदिशी कोसळलेच म्हणून समजा.
आपल्या पूर्वसूरींचे यशापयश, मानमरातब आणि मानहानी, उदंड कीर्ती आणि उध्वस्त करुन टाकणारी अपकीर्ती ह्यातून जे शिकतात ते कलाकार माणूस म्हणूनही मोठे ठरतात.
आपण आधी माणूस आहोत, मग कलाकार आणि हे जग सोडून जातानाही माणूस म्हणूनच जाणार आहोत ह्याचे भान जे सोडत नाहीत त्यांच्या चरणी आपण लीन होतो.
चतुरंग
20 May 2008 - 9:09 am | केशवसुमार
चर्चेत भाग घेतलेल्या आणि चर्चेत भाग न घेतलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार
20 May 2008 - 9:42 am | विसोबा खेचर
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात?
हम्म! ह प्रश्न थोडा मोघम वाटतो. जसे बरेच कलाकार व्यसनी, विक्षिप्त व गचाळ असतात त्याचप्रमाणे अनेक कलाकार निर्व्यसनी, सुस्वभावी व स्वच्छही असतात! तेव्हा व्यक्ति तितक्या प्रकृती!
आता केशवा, तुझंच उदाहरण घे. तू एक कलाकार आहेस, शिवाय निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्वच्छ व नीटनेटका आहेसच की! :)
त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्या ह्याचे भान का नसते?
हे विधानही मोघम आहे. अशीही अनेक माणसं आहेत की जी कलाकार नाहीत व त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्या ह्याचे भान नसते, व असेही अनेक कलाकार आहेत की ज्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्या ह्याचे भान असते!
अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना?
माझ्या मते कलेचे कौतुक करावे! कुणी कसं वागावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्ही कसं वागताय हे तो कलाकार बघायला येतो आहे का? त्याचा तुम्हाला जाब विचारतो आहे का? मग तो कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा वागतो ह्यासंबंधी कॉमेन्टस पास करण्याचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला तरी काय अधिकार? तुमचा मतलब फक्त त्याच्या कलेशी! तिच्याबद्दल आवडली, आवडली नाही याबद्दलच फक्त तुम्ही बोलू शकता!
आत आमचे रहिमतखासाहेब! रात्रंदिवस अफूच्या नशेत असायचे. परंतु त्यांच्या गायकीत जी जादू होती ती केवळ अवर्णनीय होती! आपण फक्त कला बघावी. कलाकारही शेवटी माणूसच असतो, तो कुणी देव नसतो! त्यामुळे तुमच्याआमच्या सामान्य माणसात असलेले सर्व गुणदोष त्याच्यातही असतात!
रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना?
मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला??
तात्या.
20 May 2008 - 9:55 am | मनिष
सहमत!!!
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.
20 May 2008 - 10:06 am | विसोबा खेचर
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.
फक्त कलाकारच का?
आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन!
तात्या.
20 May 2008 - 10:46 am | केशवसुमार
कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन!
हे मान्य..
फक्त कलाकारच का?
सामान्य जनतेच्या बाबतीत ही हे लागू आहे.. पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे अनुकरण लगेच होते...त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे?
(परखड)केशवसुमार
20 May 2008 - 11:11 am | विसोबा खेचर
लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते..
त्याला कलाकाराचा काय इलाज? माझं अनुकरण करा असं तो सांगतो लोकांना?
त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही..
त्यांचं इतर वागणं चांगलं की वाईट ह्याकडे लक्ष देणारे किंवा दुर्लक्ष करणारे तुम्ही कोण? तुम्हाला न्यायासनावर कुणी बसवलं??
उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे?
चोरी, खून, दरोडा, इत्यादी कायदेशीर गुन्हे झाले. त्याबाबत न्यायापेक्षा कुणीच मोठा नाही. परंतु केशवराव, आता तुम्हीच चर्चा भरकटवत आहात. आपला स्वत:चाच चर्चाविषय आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा अशी आपल्याला विनंती!
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात?
त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्या ह्याचे भान का नसते?
अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना?
रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना?
वरील चार प्रश्न आपण उपस्थित केले होतेत! आता खूनाचा मुद्दा आपण नव्यानेच मांडत आहात व चर्चा भरकटवत आहात असं वाटतं! कलाकाराने खून केल्यास त्याचा खुनाचा गुन्हाही माफ व्हावा असं मीही कुठे म्हटलेलं नाही! म्हटले असल्यास कृपया दाखवून द्या!
तात्या.
20 May 2008 - 11:11 am | भाई
हा आपला माझा सुसाट तर्क आहे, यामागे अभ्यास नाही.
कला हा प्रकार इतर मानवी व्यवहारांपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे हिशोब चालत नाहीत. उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. (मी फक्त खरोखरच्या प्रतिभावंतांबद्दल लिहितोय; सर्वच होतकरूंनाही प्रतिभावान म्हणवले जाण्याच्या आजच्या काळात हे मुद्दाम नमूद केले पाहीजे.). असे लोक तुम्हाआम्हासारखे जगण्याचे हिशोबही करत नसावेत. त्यांचे जगणेही तसेच निव्वळ एका उर्मीतून दुसर्या उर्मीकडे असे जात असावे. आपण आपल्या मापाने ते हिशोब मोजणे योग्य होणार नाही. हे त्याचे जेनेटिक प्रोग्रॅमिंग असावे. नाहीतर इतक्या मुलांची जबाबदारी असताना दीनानाथ आर्थिक सुरक्षिततेला न दुर्लक्षित करते. पण, एक सामान्य (नॉर्मल) माणूस नाटक कंपनी काढायचा विचारही करु शकणार नाही. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. पण हे फक्त फार वरच्या पातळीच्या कलाकारांबाबत लागू होते.
राहीला मुद्दा अनुकरणाचा आणि प्रभावाचा. ते दुर्दैवी वास्तव आहे. लोकमान्याचा अडकित्ता घेतला जातो, गीतारहस्य नाही. हा मानवी स्वभाव काही प्रमाणात संस्कारांनी नियंत्रित करता येतो.
-भाई (काहीही कला न येणारा अत्यंत हिशोबी माणूस)
20 May 2008 - 11:17 am | विसोबा खेचर
उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते.
घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही.
क्या बात है, भाईशी सहमत आहे...
हिशेबी माणसं फक्त २ + २ = ४ करण्यातच धन्यता मानतात! तसं कलाकारांचं नसतं! ते अवलिया असतात,कलंदर असतात!! त्यांची गणीतंच वेगळी असतात!
तात्या.
20 May 2008 - 11:11 am | पिवळा डांबिस
तुम्ही म्हणाल यात काय नाविन्य आहे म्हणा!!!!:))
आय डोन्ट केअर!!!
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते..
असहमत!!!!
लोक/जनता यांच्यावर कोणीही ओझं दिलेलं नसतं की कलाकारांचं अनुकरण करा म्हणून! ही सामान्य लोकांनी आपल्या दोषांचे समर्थन करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे!!!!
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!
तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!!
सर्वसामान्यांना गोंजारायचे दिवस संपले!!!!
20 May 2008 - 11:22 am | विसोबा खेचर
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!
हा हा हा! हा मुद्दा खरा आहे रे डांबिसा...!
तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!!
अगदी सहमत आहे...!!
आपला,
(सर्वसामान्य रसिकाच्या भूमिकेतून कलाकाराच्या कलेचा मनमुराद आस्वाद घेणारा परंतु त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघण्याची शाणपट्टी व असभ्यपण न करणारा!) तात्या.
20 May 2008 - 11:30 am | केशवसुमार
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते..
असहमत!!!!
पिंडाशेठ / तात्या ..मग प्रश्नच संपला... ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्या...आदर्श, अनुकरण, प्रभाव पाडणे ह्या सर्व मुर्ख कल्पना आहेत..
असो..
20 May 2008 - 11:44 am | पिवळा डांबिस
ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्या
आत्ता तुम्ही मुद्द्यावर आलांत!!:))
सामाजिक जाणिवा आणि नैतिक जबाबदार्या असतांत, पण त्या "कलाकारांवर" जास्त आणि "सर्वसामान्यांवर" कमी हे म्हणणे आमच्या मते तरी भोंदूपणाचे लक्षण आहे.
त्या सर्वांवर सारख्याच असतात!!
कलाकार त्याच्या कलेच्या प्रदर्शनाचे प्रसंग सोडले तर इतर वेळी सर्वसामान्य नागरीकच असतात!! त्यांच्याकडून असामान्य नागरी लक्षणांची अपेक्षा करणे व ती पूर्तता झाली नाही म्हणून निराश होणे. अथवा कलाकारांच्या व्यसनांचे आपल्या व्यसनांसाठी समर्थन देणे हा भोंदूपणा आहे हेच आमचे म्हणणे होते!!!!
अवर "सर्वसामान्य" नागरीक नीडस् टू ग्रो अप!!
तुम्हाला नाही वाटत असे?
20 May 2008 - 12:16 pm | विसोबा खेचर
केशवराव,
आत्ताच आपल्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. सबब, तूर्तास आम्ही हा विषय इथेच थांबवत आहोत...
कळावे,
आपला,
(स्नेहांकित) तात्या.
21 May 2008 - 10:59 pm | केशवराव
केशवराव आणि केशवसुमार हे वेगवेगळे आहेत.
22 May 2008 - 6:19 pm | हर्षद बर्वे
" प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!...................."
क्षमस्व परंतू या मुद्द्याशी मी असहमत आहे.
व्यक्तीचे प्रौढत्व त्याच्या वयावर अवलंबून असते.
आणि काय बरोबर आणि काय चूक ते कळणे याला प्रगल्भता यावी लागते.
प्रगल्भता येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे असते.
काही व्यक्तींना त्यांचा सहस्रचंद्रदर्शन ़सोहळा आटोपला तरी प्रगल्भता येतेच असे नाही.
याची जिवंत उदाहरणे प्रत्येकांस आपल्या आजुबाजूला बघावयास मिळतील.
तरी यावर विचार व्हावा.....
आप्ला..
हर्षद
20 May 2008 - 11:25 am | मराठी_माणूस
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते
९ ते ५ नोकरी करणार्या सामान्य माणसाचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असते (तो / ती कीतीही मोठ्या पदावर असला/ली तरीही) . कलाकार प्रसिध्धीच्या झोतात असल्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त असते.