मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार वि वि,
आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :)
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते. त्या फलकावर शरदमामा पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आजच्या बर्याच धुरीणांची चित्रे तर होतीच, शिवाय फलकाच्या सुरवातीलाच शिवछत्रपती, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज यांचीही चित्रे टाकण्यात आली आहेत.
शिवछत्रपती तर आपले राष्टदैवतच होत. शिवाय महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज ह्या व्यक्तिही आपल्या आत्यंतिक आदराचीच स्थाने आहेत आणि नेहमीच राहतील. त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.
आज फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीचे नाव सामाजिक सुधारणा, स्त्री-शिक्षण या विषयात प्रामुख्याने घेतले जाते, जी वस्तुस्थितीही आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या सामाजिक ह्क्क परिषदेच्या फलकावर या त्रयीची चित्रे असणे हे देखील औचित्याचेच आहे.
पण मग प्रश्न असा उरतो की समाज घडवण्यात, सुधारण्यात, तसेच विधवा-विवाह, स्त्री-शिक्षण या महत्वाच्या कार्यात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे यांचा काहीच वाटा नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते का?
मला असे मुळीच म्हणायचे नाही की आगरकरांना किंवा महर्षी कर्व्यांना कुणा राष्ट्रवादीच्या फलकावर झळकण्याची काही गरज आहे. तरीही वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न इतकाच उरतो की यांचे फोटो अगदी हटकून न देणे हा राष्ट्रवादीचा ब्राह्म्णद्वेष आहे की याला सोयिस्कर विसरभोळेपणा म्हणायचे..?! :)
असो..
जमल्यास नोंदवा पाहू आपापली मते. नायतर द्या सोडून..! :)
आपला,
शरदतात्या अभ्यंकर.
मिसळपाववादी!
प्रतिक्रिया
10 Jun 2011 - 4:02 pm | आगाऊ कार्टा
शं. ट. सहमत.
10 Jun 2011 - 4:06 pm | सन्दीप
शरदतात्या
फुले-शाहू-आंबेडकर ह्या नावानी मते मागता येतात्(मिळतात). भटा च्या मताला काय किमत हाय ह्या दिसात ?
10 Jun 2011 - 4:10 pm | प्यारे१
आपलं काय ठरलंय?
रामदास तुमचे, तुकाराम आमचे.
बाजीराव तुमचे, शिवाजी महाराज आमचे.
ज्ञानेश्वर तुमचे, नामदेव, गोरा,सेना, सावता आमचे.
.
.
.
.
.
.
.
मतं मिळणार आहेत का? कशाला उगाच फ्लेक्सचा खर्च वाढवा? भांडायचं कशासाठी?
विषय संपला.
अवांतर : तात्या हा प्रश्न तुला पडावा?
10 Jun 2011 - 4:14 pm | यकु
फोटोंचं काय घेऊन बसलात तात्या, आत्ताच श्रीमान शरद पवारांनी त्या कार्यक्रमात आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा पैकी काही ओळी वाचून दाखवल्या..
मी ब्राम्हणांकडून श्राध्द/ पुजा करुन घेणार नाही.. मी रामाला देव मानणार नाही वगैरे वगैरे..
आणि या शपथा घेतलेले रामदास आठवले 'हिंदुहृदयसम्राट' व 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' मानणार्या पक्षासोबत गेले म्हणून लेक्चर दिले..
मला कळत नाही नेमक्या कुठल्या काळात जगतात ही माणसं..
10 Jun 2011 - 5:21 pm | रेवती
मला कळत नाही नेमक्या कुठल्या काळात जगतात ही माणसं..
ही माणसं अगदी जेटयुगातच जगत असतात पण बदलाची मानसिकता नसलेल्यांना जुन्या काळातच ठेवलं की झालं. खुर्ची मिळाल्याशी आणि टिकल्याशी कारण!;) हक्काचे नोकरचाकर कसे मिळणार नाहीतर......
10 Jun 2011 - 6:13 pm | धमाल मुलगा
पर्फेक्ट बोल्लासा तुमी. आमी सहमत हौत.
10 Jun 2011 - 6:21 pm | मृत्युन्जय
मी ब्राम्हणांकडून श्राध्द/ पुजा करुन घेणार नाही.. मी रामाला देव मानणार नाही वगैरे वगैरे
ब्राह्मणांकडुन पुजा करुन घेणार नाही हे समजले. ब्राह्मणद्वेष असावा. पण रामाने काय घोडे मारले आहे यांचे? की ती शंबुकाची कथा ऐकुन अशी प्रतिज्ञा केलती?
10 Jun 2011 - 4:33 pm | धमाल मुलगा
सध्या महाराष्ट्रात ब्राम्हणद्वेषाचा धुमाकुळ घालणार्या कुठल्या कुठल्या संघटना (की टोळ्या?) ह्यांना कोणता राजकीय वरदहस्त आहे हा एक अभ्यासाचा विषय ठरावा असं मला नेहमी वाटत आलं आहे.
10 Jun 2011 - 4:57 pm | Dhananjay Borgaonkar
धम्या लेका घड्याळात बघ्..सगळी उत्तर आपोआप मिळतील.
10 Jun 2011 - 4:47 pm | चन्द्रशेखर सातव
राष्ट्रवादी काँग्रेस हि फक्त एकाच विशिष्ठ समाजाची प्रायवेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी आहे.हि मंडळी बाकी सर्व समाज हि मंडळी फक्त तोंडी लावण्यासाठी वापरतात,किवा कडीपत्त्या सारखे वापर झाल्यावर बाजूला काढून टाकतात.(पक्षाची कार्यकारिणी बघा )थोरल्या पवार साहेबांच्या राज्यात इतर समाजांना जरा तरी स्थान होते,धाकल्या साहेबांची तर उन्मादी अवस्था झाली आहे.चांगल्या वाईट सगळ्या ब्रिगेडस चे लोक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी खास संबंध राखून आहेत "टगेगिरी "पंथाचे अधर्वू माननीय श्री श्री अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचा राज्याभिषेक करताना त्यांच्या ७१ पैकी ५७ अत्यंत विश्वासू सरदारांनी जी तत्परता दाखविली त्याला तोड नाही. पिंपरी -चिंचवड आणि पुण्या मध्ये राजकारण आणि समाजकारण(राजकीय दहशत ) मधील "स्कार्पिओ" संस्कृतीचे रुजवण्याचे थोर कार्य यांनी केले ज्याचे आता राज्यभर अनुकरण होते आहे.आजच्या काळातील फ़्लेक्समय राजकारणाचे श्रेय द्वितीय "जाणत्या राज्याच्या"प्रखर अनुयायांच्या कडे जाते.१९९९ साली साहेबांच्या षष्टब्दी पूर्ती सोहोळ्या निमित्त पुण्यात नेमक्या ठिकाणी फ़्लेक्स लावण्याची क्रांतिकारी योजना साहेबांच्या अनुयायांनीच पार पाडली,एवढी थोर दिशा दाखविल्यावर आपला अनुकरणप्रिय समाज थोडाच मागे राहणार ? याच थोर विचारांच्या रोपट्याचा आता निर्विवाद महावृक्ष झाला आहे.
10 Jun 2011 - 6:25 pm | रेवती
"स्कार्पिओ" संस्कृतीचे रुजवण्याचे थोर कार्य
मस्तच! पटले.
11 Jun 2011 - 4:33 pm | उदय ४२
अगदि बरोबर आहे,
राष्टवादी म्हनजे मराठ्यांची मुस्लीम लीगच आहे अगदी...
10 Jun 2011 - 4:48 pm | मराठी_माणूस
जाज्वल्य देशभक्त सावरकरांचे नाव घेण्याचे बरेच राजकारणी टाळतात . एव्हढेच नव्हे तर मणिशंकर सारखे त्यांचा अवमान करतात आणि आपले शंढ राजकारणि ते खपवुन घेतात .
10 Jun 2011 - 4:59 pm | अविनाशकुलकर्णी
असरानिच्या जुन्या सिनेमाचे नाव आठवते..
हम कभि नहि सुधरेंगे....
10 Jun 2011 - 5:22 pm | किसन शिंदे
हम कभि नहि सुधरेंगे....
अशा नावाचा सिनेमा होता... कि त्याचा शोलेमधला अजरामर डॉयलॉग आहे?
10 Jun 2011 - 6:19 pm | मृत्युन्जय
अश्या नावाचा चित्रपटदेखील आहे. असरानीने स्वतःच दिग्दर्शित केला आहे.
10 Jun 2011 - 6:10 pm | शाहिर
१. राश्त्रवादी मराठा लोबि चा पक्ष आहे
२. त्यानि काय लावयचा हा त्यान्चा प्रश्न आहे...(जिथे फायदा तेच ते लावणार)
३. आणि हे वर्तन त्यान्ची राजकीय सोय आहे ... (त्याना फुले- डॉ आंबेडकर, शाहू महाराज या बद्दल प्रेम - आदर नाहिये)
अन्यथा फक्त नामन्तराचा भान्दवल न करता त्यानि भरीव काम केला अस्ता..
10 Jun 2011 - 6:16 pm | मी-सौरभ
नका मनाला लावून घेउ...
मनोहर जोशी शिवसेनेचे वरिष्ठ नेते असूनही ते सावरकर, टिळक, आगरकर, कर्वे यांना विचारत नाहीत मग हे रा.काँ. वाले कशाला विचारणार?
आणि मला सांगा बामणांच्या मतावर किती सीट्स फिरतात?
तेवा राजकारण घाला गाढवाच्या ****
आपल गाण्याबजावण्याबद्दल बोला. :)
10 Jun 2011 - 6:29 pm | धमाल मुलगा
>आणि मला सांगा बामणांच्या मतावर किती सीट्स फिरतात?
आता कसं मुद्द्याचं बोलल्लात द्येवा.
किती बामणं मतं द्यायला जातात? कुणाला देऊ, का देऊ म्हणून वायफळ गप्पा मारायला पुढं, पण एकत्रित एकगठ्ठा मतांची ताकद दाखवायचं डोकं चालत नाही म्हणून सगळं सोसावं लागतं. बाकी काही नाही.
आत्ता नुसत्या चर्चांच्या फैरी झडवायच्या, अन मतदानादिवशी बायका-पोरांना घेऊन पिकनिकला पळायचं... मग आणखी काय होणारे?
10 Jun 2011 - 6:31 pm | मी-सौरभ
अन् बरेच बामण तर अमेरिकेत अन युरोपात हायत. ते कशाला मत द्यायाला येतील?
10 Jun 2011 - 6:32 pm | रेवती
आज धम्या एकदम फॉर्मात येऊन र्हायलाय!
पुढच्या निवडणुकीत उभा र्हातोयस काय?
10 Jun 2011 - 6:35 pm | धमाल मुलगा
त्यात काय एव्हढं.
मतं देणार काय ते आधी सांगा. ;)
11 Jun 2011 - 12:05 am | पिवळा डांबिस
मतं देणार काय ते आधी सांगा.
आसं कदी आसतं व्हय?
आदी वेव्हाराचं बोला!!!
तुमी काय देनार?
मंग मत देयाचं का नाय ते ठरवू आमच्या जातपंचायतीत!!!!
:)
11 Jun 2011 - 12:46 am | विकास
यावरून एक विनोद आठवला (सुधीर गाडगीळांनी सांगितला होता).
दिल्लीत एकदा विचारले की "दो और दो कितने?" याचे उत्तर पुढारी कसे देतील. त्यावर मग नक्कला करत अटलबिहारी, अर्जुनसिंग, मुलायमसिंग, लालूप्रसाद, ममता बॅनर्जी वगैरेंच्या नकला करत ते कसे सांगतील ते सांगितले. (उदा. अर्जुनसिंगः वैसे तो दो और दो पांच होते है, लेकीन हम मध्यप्रदेश मे जाकर कार्यकर्ताओंसे बातचीत करके आपको बताएंगे, वगैरे..) .
पण नंतर गाडी शरद पवारांकडे वळली. "साहेब, दोन आणि दोन किती?" साहेबांनी शांतपणे प्रतिप्रश्न केला, "देयचेत का घेयचेत"? ;)
10 Jun 2011 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार
ती एकगठ्ठा मते द्यावीत अशा लायकीचे किती लोक निवडणुकीत उमेदवार असतात ? ;)
10 Jun 2011 - 7:52 pm | धमाल मुलगा
प्रस्थापितांना धक्का देण्याचा कधी एकत्रित प्रयत्न करण्याचा विचार तरी केला कुणी?
आधी ते होऊद्या, मग 'लायक' उमेदवार शोधा. पळवाटा किती काळ दाखवणार?
ह्या असल्या मनोवृत्तीपायी डीएसकेसारखे लोकही मायावतीकडं गेलेच ना? मुळ मुद्दा आहे तो सपोर्ट करण्याचा. एकगठ्ठा ताकद दाखवण्यासाठी तो उमेदवार लायकच हवा का? आजवर किती काळ नालायक उमेदवारांची हडेलहप्पी सहन करत आलो आहोतच ना? मग एखाद्या वेळी आणखी एखादा कोणीतरी समजा चुकीचा निघालाच तर सहन करण्याची तयारी नको?
सगळंच आयतं, सुखासुखी कसं मिळेल?
प्रत्येकानं स्वतःच्या परीनं काय म्हणून प्रयत्न केले? (लाखभर लोकसंख्येतली चार-दोन उदाहरणं उगा फेकू नयेत. त्यांना किती लोक सक्रिय पाठिंबा देतात तेही पहावे.)
ह्या सर्व बाबींचा विचार करुन कृती केल्याखेरीज ह्या सर्व बाजारगप्पा निव्वळ अरण्यरुदन आहेत.
10 Jun 2011 - 8:35 pm | आनंदयात्री
पहिल्यांदाच असहमत. 'ब्राह्मणांची एकगठ्ठा मते' या कल्पनेशी असहमती दाखवतो. याने जातीयवादाला खतपाणी घातल्यासारखे होईल असे वाटते.
(अर्थात माझे विचार इथे दुटप्पी होतात कारण निवडणुकांच्या अँगलने पाहिले तर 'हिंदुंची एकगठ्ठा मते' मला हवीच आहेत ;) )
10 Jun 2011 - 8:53 pm | धमाल मुलगा
गम्मत अशी आहे, की एक मोठा सेट, त्याचा सबसेट, त्याचे सबसेट्स...अशी उतरंड आहे. आणि प्रत्येक उतरंड स्वतःचं महत्व सिध्द करण्याच्या धडपडीत असते.
>>जातीयवादाला खतपाणी घातल्यासारखे होईल असे वाटते.
ह्म्म...
ब्राम्हण सोडून इतर जातींच्या एकगठ्ठा मतांच्या प्रयत्नांनी जातीयवाद होत नाही काय?
बीग्रेड आणि इतर संघटनांमधून वैश्विक बंधूभावाचे प्रदर्शन होते काय?
रिपब्लिकन पार्टीतून काय होते?
समाजवादी पार्टी नक्की कोणाला हाताशी धरते?
राजकारणामधून समाजात झिरपत मिळणारी नगण्यतेची वागणूक सहन करत राहण्याऐवजी, असलेली संख्या निवडणूकीच्या वेळी काही प्रमाणात का होईना सद्यस्थितीतलं चित्र पालटू शकत असेल आणि त्यायोगे जर किमान दखलपात्रता मिळत असेल तर इतरांना लागू असलेला न्याय इथे मात्र जातियवादावर का आणि कसा जातो?
10 Jun 2011 - 9:06 pm | आनंदयात्री
ते जातियवादी आहेतच. मला वाटते ते लोक थर्ड क्लास आहेत म्हणुन आपण सबस्टँडर्ड का व्हायचे ?
11 Jun 2011 - 4:23 pm | अजातशत्रु
ते लोक थर्ड क्लास यावर फर्स्ट कलास चर्चा चालु आहे....
बाकी चालू द्या.....
10 Jun 2011 - 11:06 pm | विकास
असहमतीशी सहमत... :-)
माझी तर जातीवरून लिहीण्यालाच असहमती आहे आणि उद्या कोणीच धर्माबद्दल बोलणार नसेल तर तो देखील न बोलण्याशी सहमती आहे. पण तो वेगळा मुद्दा झाला.
बाकी मूळ चर्चेतील मुद्दा वाचताना मला केवळ वृत्तीच्या संदर्भात पाकीस्तानी नेत्यांची आठवण झाली. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी आणि स्वतःच्या माणसांचे त्यांच्या दैन्यावस्थेवर चुकून जाऊ शकलेले लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते पण असाच भारताचा वापर करत आले आहेत. त्याचे परीणाम त्यांच्या देशावर आणि माणसांवर काय झालेत हे पाहून तसल्या वृत्तीचा कोणिही वापर करू नये आणि कोणी केल्यास आपण त्याला बळी पडू नये असे वाटते.
असो.
अवांतरः धमुशेठ तुम्ही जर येथे काही राष्ट्रवादीच्या विरोधात लिहीत असाल तर साहेबांच्याच गावचे पाणी पिणारे असल्याने आपला conflict of interest धरला जाईल आणि मार्क कापले जातील. ;)
13 Jun 2011 - 2:08 pm | धमाल मुलगा
आमचंही हेच म्हणणं आहे की हो.
पण अशी गोष्ट केवळ एकाच समुहाकडूनच एकतर्फी व्हावी अशी अपेक्षा असेल तर ते कसं जमावं?
म्हणजे इतरांनी बक्कळ राजकारण करावं, आणि त्याचा सरळसरळ तोटा/परिणाम ज्यांना भोगावा लागतो त्यांनी मात्र असं काही केलं तर मात्र ओरड व्हावी...ह्याचा अर्थ कसा काढायचा?
सायबांच्या इरोदात आमी कशाला जाऊ? आँ?
आमी हितं कितीबी बोंबाललो तरी चार बामनं काय एकत्र येनार हैत का? सोडून सोडा वो.. आमच्या ह्या कृतीनं आमाला जमलंच तर थोडाफार हातभारच लागंल की पक्षकार्याला.
13 Jun 2011 - 10:06 am | अत्रुप्त आत्मा
+१०१
10 Jun 2011 - 6:22 pm | तिमा
हा शुध्द विसरभोळेपणा आहे. त्याबद्दल त्या थोर, माननीय व्यक्तिंबद्दल उगाच शंका घेऊ नयेत.
10 Jun 2011 - 7:16 pm | दत्ता काळे
अखेर ते राजकारण आहे. मत मिळवण्यासाठी जी नाणी 'चलनी' आहेत तीच ते वापरणार. मग त्यात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे हे येत नाहीत. आंबेडकर तर सगळ्यात मोठ्ठे 'नाणे' आहे. ते वापरायचा सर्वांनाच मोह आहे. फक्त परिषदेचं नांव " ठराविक सामाजिक हक्क परिषद" असं असायला हवं होतं.
किती बामणं मतं द्यायला जातात? कुणाला देऊ, का देऊ म्हणून वायफळ गप्पा मारायला पुढं, पण एकत्रित एकगठ्ठा मतांची ताकद दाखवायचं डोकं चालत नाही म्हणून सगळं सोसावं लागतं. बाकी काही नाही. हे सगळ्यात महत्वाचं. धमुशी सहमत.
10 Jun 2011 - 7:31 pm | मनिमौ
आत मते देताना फक्त बामन लोकानाच मते द्या मग बघ्या काय होता आहे ते
11 Jun 2011 - 11:54 am | विवेक मोडक
पण,
किती बामणं निवडणुकीत उभे रहातात?
(कलमाडी ब्राह्मणच ना??)
10 Jun 2011 - 8:10 pm | चिरोटा
सोईस्कर विसरभोळेपणा!!.
राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये, त्यांनी पुरस्क्रूत केलेल्या ब्रिगेडियर्समध्ये द्वेष भरवायचा आणि जातीचे राजकारण करायचे हा त्यांचा लॉन्ग टर्म गोल आहे.विकिपिडियात बघितलेत तर राज्याची एकूण लोकसंख्या आहे -११ कोटी. त्यात ब्राम्हण ५%, ३०% मराठा आणि ६५% ईतर. ह्या ६५ टक्केवाल्यांविरुद्ध बरळून राजकारण करणे अर्थातच कठीण आहे.१० कोटीच्या(११ कोटी - १ कोटी बाहेरचे. अंदाजे!!) ३०% हिशोब केलात तर संख्या लक्षणिय होते.
भारतातल्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या राज्यांमध्ये जातीचे(जातिद्वेषाचे) राजकारण यशस्वी होते हा ईतिहास आहे.उत्तर प्रदेशात ते मायावतींनी ते करुन दाखवले. बिहारमध्ये ते लालूंनी करुन दाखवले.तसाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येईल ह्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना खात्री आहे.
10 Jun 2011 - 8:40 pm | रेवती
सोईस्कर विसरभोळेपणा!!.
अगदी हेच!
मला नाही वाटत राजकारण्यांना (मनात असूनही) वेळ मिळत असेल असले हेवेदावे करायला....
मग ज्यांना वेळ आहे त्यांच्याकडे हे काम सोपवायचे.
रोजचे लाखांचे उत्पन्न सोडून त्यांना स्वजातियांमध्ये तरी कशाला इंटरेस्ट असेल?
आपापल्या मुला, नातवंडाचं आर्थिक भलं पाहतील की लोकांच्या कल्याणाचं राज्य करतील?
10 Jun 2011 - 10:42 pm | नर्मदेतला गोटा
फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज
हे फुले + डॉ आंबेडकर + शाहू महाराज
असे वाचावे
म्हणजे तो तो जाती समूह
म्हणजेच निवडणूकीत विजय
10 Jun 2011 - 11:42 pm | योगप्रभू
ते जातीचे वाद नेऊन घाला की हो बोगारवेशीत. काय तरी गाणं-गिणं होऊन जाऊद्या.. हुच्चपणा कशाला पायजे म्हणतो मी.
आपला
रावसाहेब, बेळगाव
11 Jun 2011 - 1:39 am | विकास
पर्यावरण मंत्रालयाने आजच (राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी) राज्यसरकारला लवासा प्रकल्पावर कारवाई करायचे आदेश दिले आहेत.
11 Jun 2011 - 4:27 pm | अजातशत्रु
पवारांचे शेअर्स बुडणार बहुतेक..
11 Jun 2011 - 7:41 am | विजुभाऊ
राष्ट्रवादी हा सोयीस्कर पक्ष आहे. सोनीयाना विरोध या नावाखाली पक्ष काढला. खरे तर त्या मागचा उद्देश दिल्लीत स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवायची हाच होता. अर्थात पवार काकांचा हा कावा महाराष्ट्रातील जनतेने चांगलाच ओळखला.
दिल्लीत खरेतर यशवंतरावांनंतर जनमानसाचा एवढा मोठा पाठिंबा असलेला नेता हवा होता. पण निव्वळ आर्थीक आणि राजकीय फायद्यासाठी अगोदर त्यानी राजीव गांधींचे पाय धरले आणि नंतर पुन्हा नवा स्वतंत्र पक्ष काढला आणि महाराष्ट्राच्या पायावर धोंडा मारून घेतला.
11 Jun 2011 - 9:55 am | अमोल केळकर
कालच्या मेळाव्यामुळे सायन - पनवेल महामार्गावरच्या वाहतूकीची पुरती वाट लागली . दादरहून - बेलापूरल जायला ( संध्याकाळी मेळावा झाल्यानंतर ) अडीच तास लागले.
त्यामुळे पवार मामा, दादांना नम्र विनंती की पुढील १३ व्या वर्धापन दिनाचा मेळावा पुणे, बारामती इथे आयोजीत करावा
अमोल केळकर
11 Jun 2011 - 10:19 am | जयंत कुलकर्णी
पुण्याला कशाला ?
"रागवल्याची स्मायली" !
11 Jun 2011 - 1:14 pm | नर्मदेतला गोटा
>> ते जातीचे वाद नेऊन घाला की हो बोगारवेशीत. काय तरी गाणं-गिणं होऊन जाऊद्या.. हुच्चपणा कशाला पायजे म्हणतो मी.
पवार साहेब गाणं म्हणतात ?
11 Jun 2011 - 5:36 pm | योगप्रभू
गाणं-गिणं होऊन जाऊ द्या, हे त्या तात्याला म्हणलो की हो मी :)
तात्या,
रांष्ट्रवादीत ब्राह्मण म्हणजे आमटीतली कढीलिंबाची दोन पाने (वास येण्यापुरती घालायची असतात. खाताना बाजूला काढून ठेवायची)
स्थापनेपासून आजवर या पक्षात दोनच ब्राह्मण. १) प्रवक्ता गुरुनाथ कुलकर्णी २) आमदार सुधाकरपंत परिचारक. त्यातील गुरुनाथ कुलकर्णींचे नुकतेच निधन झाले. परिचारक जातीमुळे नव्हे, तर स्वतःच्या कामगिरीमुळे टिकले आहेत.
'प्रवेश निषिद्ध' परिसरात मुद्दाम कशाला जायचे कर्वे-आगरकरांचे फलक मिरवत?
11 Jun 2011 - 11:16 pm | नर्मदेतला गोटा
तुमी मत देत नाही म्हणून
तुमी मत देणार असाल तर लावतील फोटो ते कर्व्यांचे न आगरकरांचे
बाकी गाण्याचे म्हणाल तर
बी ग्रेड वाले छानच गाणं म्हणतात
12 Jun 2011 - 12:17 am | विजुभाऊ
पवार तसे लै हुशार आहेत. त्यांच्या बहुतेक सर्व बीगर राजकीय संस्थांमध्ये ते ब्राम्हणाना महत्वाच्या पदांवर बसवतात. राजकीय संस्थात मात्र मायनस ४ .
असोत बापुडे.
13 Jun 2011 - 4:34 pm | नारयन लेले
आगदि सहमत
पवारानि हे शाहाणपण यशवन्तराव चव्हाणाचे कडुन घेतले आसणार कारण यशवन्तराव चव्हाणाचे सेक्रेटरि डो॑गरे नामक ब्राम्हण होते शीवाय पवार स्वथाला यशवन्तरावा॑चे शिश्य समजतात त्यामुळे गुरुमन्त्राचे ते पालन करतात. त्यात रजकिय फायद्याचे ही आहेना.
विनित
13 Jun 2011 - 5:50 pm | अमोल केळकर
मग पवारांनी ब्राम्हण सेक्रेटरी का नाही ठेवला ??? गुरुंचे आचरण करायचे एवड्गी साधी गोष्ट साहेब विसरले???
अमोल केळकर
13 Jun 2011 - 10:20 pm | नर्मदेतला गोटा
मायनस ४
खलास
12 Jun 2011 - 3:38 pm | तिमा
ब्राह्मण या शब्दातला साधा 'ब्रा' लिहायलाही मिपावर कायमची बंदी घालावी.
12 Jun 2011 - 8:14 pm | सांगलीचा भडंग
प्रत्तेक राजकीय पक्ष वळ आली कि 'सोयीस्कर' मुद्दा घेतो आणि पाहिजे ते विसरतो ........