गेल्या आठवड्यात पुण्याहून मुम्बईला येताना एक चित्रकार सहप्रवासी भेटले.
ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. बोलताना त्यानी पलीकडल्या माणसाला विचारले की गौतम बुद्धाच्या डोक्यावर जे दिसते ते त्यांचे केस आहेत( बुचडा बांधलेले) की डोक्यावरचा मुकुट आहे.
माझ्या मनात जे सहज आले ते म्हणजे बुद्धाच्या डोक्यावर जे आहे ते कुरळे केस आहेत.
त्या चित्रकारांचे म्हणणे की तो मुकूट नाही किंवा ते केस देखील नाहीत.
बुद्धा प्रमाणेच महावीराची मूर्तीदेखील त्या प्रमाणेच आहे. आणि महावीर आणी बुद्धा यांच्या कालावधीत फारसा फरक नाही.
त्या चित्रकाराचे म्हणणे की बुधाने सर्वसंगपरीत्याग केलेला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर मुकूट असणे शक्य नाही. तसेच बौद्ध धर्माप्रमाणे भिक्षुंचे डोके पूर्णपणे भादरलेले असते. शेंडीसुद्धा नसते.
त्यामुळे डोक्यावर केस असणे शक्य नाही.
तुम्हाला काय वाटते बुद्धाच्या डोक्यावर नक्की काय असेल?
त्या चित्रकारानी बुद्धाच्या डोक्यावर जे आहे त्या बद्दल विषद करून सांगितले.
उत्तर फारच समर्पक होते.
बुद्धाचे चित्र /पुतळे ज्याने सुरुवातीला केले त्याला अपेक्षीत असणारे प्रतीक आणि आपण त्याचा सध्या घेत असलेला अर्थ यात फारच तफावत आहे.
बुद्धाच्या डोक्यावर
गाभा:
प्रतिक्रिया
25 May 2011 - 11:04 pm | गोगोल
बॉल?
26 May 2011 - 12:49 pm | गोगोल
पण नवीन फायर्फॉक्स च्या टॅब मध्ये हा लेख उघडल्यास त्या टॅब चे टायटल "बुद्धाच्या डोक्यावर | मिसळपाव" असे दिसते.
जाता जाता प्रस्तुत लेख आणि हा लेख यावरून सलमानच्या डोक्यावर असे विडंबन सुचुन गेले.
25 May 2011 - 11:11 pm | धनंजय
ते "उष्णीष" आहे.
साधारणपणे मस्तक उन्हापासून झाकणार्या कुठल्याही वस्तूला (पागोटे असो वा केसांचा बुचडा) उष्णीष म्हणतात.
परंतु बुद्धाच्या बाबतीत तो त्याच्या मस्तकाचाच वाढीव भाग आहे, तो वाढीव प्रज्ञेमुळे आहे, असे मानण्याची पद्धत काही बौद्ध लोकांत आहे. जैन लोकांत (महावीराबद्दल) ही कल्पना तितकीशी प्रचलित नाही. पण श्रमण महावीराच्या मूर्तीच्या डोक्यावरही कधीकधी केसांचा बुचडा असतो खरा.
25 May 2011 - 11:41 pm | प्रियाली
+१
बुद्धाच्या ३२ शारीरिक लक्षणांपैकी उष्णीष एक आहे असे वाटते.
25 May 2011 - 11:16 pm | महानगरी
गौतम बुध्दाच्या डोक्यावर जो उंचवटा आहे त्याला उष्णीष म्हणतात. सामान्य माणसाहून बौध्दिक अधिकत्व दाखवण्यासाठी ह्या लक्षणाचा उपयोग केला जातो. गौतम बुध्द व महावीर हे महापुरुष असल्यामुळे मूर्ती व चित्रकारांनी तत्कालीन मूर्तीशास्त्राप्रमाणे त्यांच्या लक्षणांचे चित्रांकन केले आहे. ह्या उंचवट्यावर काहीजणांनी अधिक कलाकारी दाखवून कुरळ्या केसांप्रमाणे दिसणारी रचना केली आहे.
25 May 2011 - 11:56 pm | आशु जोग
माहीतीपूर्ण चर्चा
25 May 2011 - 11:57 pm | आशु जोग
माहीतीपूर्ण चर्चा
26 May 2011 - 8:44 am | नितिन थत्ते
चित्रातल्या न्यायाधीशाच्या डोक्यावर कायतरी असतं बघा !! तसलं शिरस्त्राण असावं.
26 May 2011 - 9:22 am | चिंतामणी
आणि माहीतीपूर्ण चर्चा चालू आहे.
अजून माहिती मिळण्याची अपेक्षा करीत आहे.
26 May 2011 - 9:57 am | गवि
..
तरीही बुद्धाचा केस जपून ठेवणार्यांची कमाल म्हणायची.
अनेक शिल्पे/पुतळे यात सरळसरळ केसच दिसतात. कुरळे / जटेसारखे किंवा कधीकधी पानांसारखे डिझाईन.
आता ते केस नाहीतच असे मूळ गृहीतच धरायचे आणि त्याचे इंटरप्रिटेशन इतरच काही करायचे असे ठरवलेच तर त्याला काही इलाज नाही.
26 May 2011 - 11:31 am | राही
बुद्धचरित्राचा अथवा बौद्धधर्म-साहित्याचा अभ्यास नाही.पण जर गौतम बुद्धाने जुन्या सनातन धर्मानुसार संन्यास घेतला असेल तर केशवपन झालेले असेल. ज्या धर्माविरुद्ध त्याने बंड केले त्याचेच आचरण त्याने उत्तरायुष्यात केले असेल हे तर्कसुसंगत वाटत नाही. केश राखले असणे शक्य आहे. त्याच्या निर्वाणानंतर पुढे कधीतरी केशवपनाची प्रथा सुरू झाली असावी. तसेही कठोर तपाचरण व इतर कृतींद्वारा-जसे दीक्षाप्रसंगी डोक्यावरचा एकएक केस उपटून काढणे-शरीरपीडन हे जैन धर्मात बसते, बौद्ध धर्मात नाही.
जाताजाता :महान योग्यांचा मेंदू हा अधिक प्रगत व विस्तृत असतो आणि हा मेंदूचा विस्तार लंबमज्जेच्या टोकाशी मोठी गाठ,आवाळू या स्वरूपात दिसतो अशी समजूत हिंदू अध्यात्ममार्गीयांमधेसुद्धा आहे. बुद्धाच्या आणि महाविराच्या डोक्याचा विस्तार हा याच संकल्पनेला दृश्य रूपात आणताना घडलेला प्रकार असू शकेल.
26 May 2011 - 9:58 pm | अजातशत्रु
जुन्या सनातन धर्मानुसार म्हणजे नेमका कोणता धर्म म्हणायचे आहे?
आणी त्याने कोणत्या धर्माविरुद्ध बंड केले?
ते समजले नाहि,
बुध्दाने केश राखले असणे शक्य आहे.
तसेच बुध्दाने जेव्हा पहिले प्रवचन दिले त्यास बहुतेक धम्मसंगती म्हणतात (चु.भु.)
तेव्हा पहिले पाच बौध्दभिक्षू होते आणी त्यांचे केशवपन झाले असे दाखवले आहे,
आणी जेव्हा जेव्हा ते प्रवचन करण्यास जात तेव्हा
त्याच्या बरोबर असणारे सर्व भिक्षु हे भगवे वस्त्र आणी केशवपन केलेले दाखवण्यात आले आहेत,
त्यामुळे त्याच्या निर्वाणानंतर पुढे कधीतरी केशवपनाची प्रथा सुरू झाली असावी असे वाटत नाहि,
बाकी जाणकार यावर प्रकाश टाकतीलच,
26 May 2011 - 12:21 pm | विजुभाऊ
त्या चित्रकाराम्चे म्हणणे होते की बुद्धाला ज्ञान प्रापत झाले होते. बुद्धांचे सहस्त्रधार चक्र जागॄत झालेले होते
त्यामुळे डोक्यावर कुरळ्या केसांप्रमाणे दिसतात ती हजारो प्रकाश चक्रे आहेत . डोक्यावर टेंगुळासारखा दिसणारा भाग हा बुद्धाची प्रज्ञ दर्शवतो.
चित्रकाराने अजून एक मजेशीर गोष्त सांगितली.
कोणीतरी त्याना शंकर आणि बुद्धाच्या ध्यानस्थ चेहेर्यातील फरक विचारला.
दोन्ही मूर्तींच्या चेहेर्यात फरक आहे. एक ध्यान क्रोध दाखवते.दुसरे तृप्ती दाखवते
26 May 2011 - 12:29 pm | अन्या दातार
>>कोणीतरी त्याना शंकर आणि बुद्धाच्या ध्यानस्थ चेहेर्यातील फरक विचारला.
दोन्ही मूर्तींच्या चेहेर्यात फरक आहे. एक ध्यान क्रोध दाखवते.दुसरे तृप्ती दाखवते
भगवान बुद्धांच्या चेहर्यावर तृप्ती आहे हे मान्य. पण शंकराच्या चेहर्यावर क्रोध मात्र कधी पाहण्यात आला नाही.
26 May 2011 - 3:26 pm | शैलेन्द्र
म्हणजे शंकर भगवान आपण पाहीलेत म्हणायचं... बाकी चालुद्या
26 May 2011 - 3:43 pm | स्वानन्द
अहो त्यांच काय घेऊन बसलाय... त्या चित्रकाराने तर बुद्ध आणि शंकर दोन्ही पाहिलेले दिसताहेत!!
26 May 2011 - 9:33 pm | अजातशत्रु
योगबलाने असे घडू शकते,
बाकी इथे बुध्दा बद्दल जाणकारांकडून नवीन माहिती मिळत आहे,
आणखी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
26 May 2011 - 7:25 pm | मूकवाचक
मला ओशोन्च्या ध्यानस्थ जेहेर्यावर लबाडी आणि जे. कृष्णमूर्तिन्च्या धानस्थ चेहेर्यावर हट्ट आणि दुराग्रह दिसतो.
दोघान्चेही मूलाधार चक्र पक्के जागृत होते इतकीच खात्री वाटते. बाकी चालू द्या.
26 May 2011 - 7:32 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!! लै जबरी हाणलाय राव!
26 May 2011 - 4:50 pm | प्रचेतस
बुद्धाच्या डोक्यावर जे कुरळे वस्त्र दाखवले आहे ते 'उष्णीष' हे बरोबरच आहे. पण सुरुवातीला ही प्रथा नव्हती. सुरुवातीचा संघ हा हीनयानपंथीय अर्थात हे नाव नंतरच्या महायांनानीच त्यांना दिले. हीनयानांत मूर्तीपूजेची प्रथा नव्हती. त्यामुळे बुद्धाच्या/बोधीसत्वाच्या मूर्ती कोरायचा पर्यायाने उष्णीष दाखवायचा काही संबंधच नव्हता. पण नंतरच्या महायानांनी साधारण ४ थ्या, ५ व्या शतकात बुद्धमूर्ती कोरायला सुरूवात केली. तत्कालीन प्रथेनुसार डोक्यावर वस्त्र धारण न करणे हे काहीसे असंस्कृतपणाचे मानले जायचे. तेव्हा बुद्धाच्या डोक्यावर वस्त्र हे हवेच. तेव्हा ते दाखवण्यासाठी उष्णीषही कोरले गेले. गौतम बुद्ध हा मूळचा राजा-राजवंशातला, तेव्हा हे दर्शवण्यासाठी राजचिन्ह म्हणून डोक्यावरील उंचवटाही कोरण्यात आला (राज्यत्याग केल्यामुळे राजमुकूट दाखवता येत नाही). कुरळे/सुरकुतलेले वस्त्र हे ज्ञानाचे लक्षण म्हणून समजण्यात येत असावे. चू.भू.दे.घे.
कार्ले लेणी येथे महायानांनी खोदलेली ही बोधीसत्व मूर्ती.
26 May 2011 - 6:41 pm | तिमा
एकच एक बुद्ध,
बाकी सारे निर्बुद्ध !
26 May 2011 - 7:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी
ह्या शिल्पकलेतही गांधारशैली अन मागधशैली असा फरक असल्याने त्या कुरळ्या केशरचनेतील कुरळेपणातही फरक आहे.गांधारशैलीतील कुरळीकेशरचना आपल्या संस्कारभारतीतल्या चक्रासारखी तीन वेटोळ्यांची असल्याची माहिती सांची येतील गुप्ता नावाच्या गाईडने दिल्याचे स्मरते.
26 May 2011 - 10:01 pm | विजुभाऊ
मी एकदा कर्ला केव्ह्ज ला गेलो होतो तेंव्हा एक हेअर स्टायलिस्ट तिथे शिल्पांतील मूर्तींच्या केशरचनेच्या अभ्यासासाठी तिथे आला होता.
त्याने मला त्याकाळी प्रचलीत असलेल्या साधना कट , बॉय कट ,तसेच बॉब कट दाखवला होता
27 May 2011 - 11:35 am | राही
जुना सनातन धर्म या शब्दांद्वारे मला बुद्धपूर्व वैदिक धर्म असे म्हणायचे होते. गौतम बुद्धाने वेदप्रामाण्याविरुद्ध, यज्ञादि वेदपुरस्कृत कर्मकांडांविरुद्ध बंड केले हे सर्वश्रुत आहे.'हिंदू" हा शब्द धर्म या संदर्भात त्या काळी प्रचलित नव्हता म्हणून सनातन शब्द वापरला.
बौद्धांमध्ये केशवपन केव्हा सुरू झाले याबद्दल नक्की माहिती मला नाही. प्रतिसादात केवळ एक तर्क व्यक्त केला होता. हिंदू धर्मात मात्र संन्यास स्वीकारताना स्वतःचे पूर्वायुष्य पुसून टाकण्याचे प्रतीक म्हणून स्वतःचे श्राद्ध आणि केशवपन करण्याची प्रथा आहे. हिंदू संन्यासी केश राखीत नाहीत. ते मस्तकावर उष्णीष ही पांघरतात. श्रीपादश्रीवल्लभ,श्री नरसिंह सरस्वती,स्वामी वासुदेवानंद सरस्वती या सर्वांची चित्रे आणि फोटो असेच आहेत. समर्थ रामदासांना मात्र चित्रामधे सकेश चितारलेले पाहिलेले आहे.