आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत. जेवढा नंबर वरचा तेवढा त्याच्या संगीताचा मानसिक त्रास जास्त, अशा पध्दतीने! का आवडत नाही त्याची कारणे शक्य आहे तिथे दिली आहेत. तर होउन जाऊ द्यात एकदा!
१. राजेश रोशन
याचं हे ..... हो... सुरु झालं की वाटतं की किशोरसारख्या गुणी गायकाचा इतका वाईट उपयोग दुसर्या कुणीच केला नाही. सपक चाली, एकदम खालच्या सा वरुन वरच्या षडजावर उड्या... छ्या! एकही गाणे कधी आवडले नाही. मागे मार्मिक मधे शुध्दनिषाद यांनी ह्याचा उल्लेख 'स्वर्गीय बापाने मरताना पोराच्या हाती नुसताच बेंडबाजा दिला असे वाचल्याचे स्मरते.
२. उषा खन्ना
उडत्या चाली, पण कधी आकर्षक वाटल्याच नाहीत.
३. भप्पी लहरी
चोरीव आणि त्याच्यासारख्याच उबगवाण्या
४. रवि
बर्याचशा चाली म्हणजे दळण आणि त्याच्या नावावरच्या काही उत्कृष्ट चाली त्यानेच दिल्या असतील का याविषयीची दाट शंका.(उदाहरणार्थ : लागेना मोरा जिया)
५. लक्ष्मीकांत प्यारेलाल
पारसमणी सारख्या काही उत्तम चालींनंतर पार ढेपाळले आणि 'हाथी मेरे साथी' नंतर तर त्यांच्या प्रत्येक गाण्यात कुठल्यातरी म्युझिक पीस मधे हत्ती ओरडायला लागला.
६. राम लक्ष्मण
लक्ष्मी प्यारे नंतरचे बँडवाले!
७. शंकर (जयकिशन नंतरचा)
तरी वरील रत्नांपेक्षा पुष्कळ बरा.
वरील यादी ही आणखीही वाढवता येईल पण त्या उरलेल्या मंडळींनी काहीवेळा बरे संगीत दिले आहे म्हणून त्यांना या यादीत जागा नाही.
फक्त जुन्या संगीतकारांचाच विचार केला आहे कारण नवीन संगीतकारांचे संगीत माझ्या डोक्यावरुन जाते.
मिपावर अनेक जाणकार आहेत. त्यांना काय वाटते हे जाणण्याची इच्छा आहे.
प्रतिक्रिया
24 May 2011 - 9:25 pm | आशु जोग
यात रहेमानचे नाव नाही घातले
तो फार बोर माणूस आहे
24 May 2011 - 9:56 pm | अर्धवट
हॅ हॅ हॅ.. नवा अवतार वाटतं
एकंदरीत वाटचाल, एकोळी धागे वगैरे अगदी अपेक्षीत आहे
24 May 2011 - 9:31 pm | नितिन थत्ते
राजेश रोशन आपल्याला आवडतात ब्वॉ. म्हणजे थोर संगीतकारांच्या यादीत त्यांचे नाव येणार नाही कदाचित; पण मला आवडतात. त्यांनी भरपूर हिट्ट गाणी दिली आहेत.
उदा. ज्यूली, लूटमार, कामचोर (आणि राकेश रोशनचे पिक्चर), याराना, मि. नटवरलाल, काला पत्थर वगैरे.
तसेच भप्पी लाहिरींचे.
नावडत्या संगीतकारांत ए आर रहमानचे* नाव माझ्या यादीत वर आहे. फारच सिन्थेटिक संगीत देणारा म्हणून.
अण्णू मलिक रहमान पेक्षा जास्त चांगला वाटतो.
राम लक्ष्मण नावडताच.
*मला संगीतातलं काही कळतं असा संशय मुळीच माझ्या मनात नाही.
24 May 2011 - 9:52 pm | मृत्युन्जय
अण्णू मलिक रहमान पेक्षा जास्त चांगला वाटतो
_/\_ _/\_ _/\_ _/\_ यापुढे तुम्ही काँग्रेसभक्त का आहात हा प्रश्न मला पडायचा नाही. असते एकेकाची आवड.
एक बोलु का? तुम्हाला रेहमान आवडत नसेल तर हरकत नाही. कदाचित तुमच्याइतके संगीकळातत नसेल मला. पण अन्नु मलिक त्याच्याहुन चांगला कसा हो? (इथे ३-४ कळवळुन बोलणार्या करूण चेहेर्याच्या स्मायली आहेत असे समजुन घ्यावे)
24 May 2011 - 10:55 pm | योगी९००
एक बोलु का? तुम्हाला रेहमान आवडत नसेल तर हरकत नाही. कदाचित तुमच्याइतके संगीकळातत नसेल मला. पण अन्नु मलिक त्याच्याहुन चांगला कसा हो?
हेच म्हणावे वाटले...
24 May 2011 - 11:25 pm | चिरोटा
सोहनी महिवाल्,एक जान है हम मधली गाणी खूप चांगली नसली तरी ठीक आणी मुख्य म्हणजे ओरिजनल असावीत. रेफ्युजी चित्रपटातील गाणी सुश्राव्य नाहीत असे अण्णुचा शत्रु पण म्हणू शकणार नाही(गाणी ओरिजिनल आहेत की नाहीत हे मात्र अण्णुलाच विचारावे लागेल).
25 May 2011 - 11:12 am | सोत्रि
चिरोटाजी,
असेलही अन्नु मलिक चांगला पण तो रेह्मान पेक्षा चांगला कसा?
फक्त सोहनी महिवाल्,एक जान है हम ची गाणी चांगली म्हणून?
- सोकजी (रेहमानमय)
24 May 2011 - 9:31 pm | अन्या दातार
यादीतल्या नावांशी १००% सहमत. :)
जोगसाहेबांशी १००% असहमत.
24 May 2011 - 11:50 pm | आशु जोग
माफी असावी
तुम्हाला रहेमान आवडतो असे दिसते आहे
25 May 2011 - 2:00 am | अन्या दातार
आठवा: रोजा, बाँबे, गझिनी, सपने, गुरु, दिल से, ताल, स्वदेस, रंग दे बसंती, साथिया...............
आणि तेलुगुमध्ये ये माया चेसावे मधल्या या गाण्यासाठी त्याचे शंभर गुन्हे माफ!
25 May 2011 - 11:44 am | आशु जोग
होय रोजा गझिनी
24 May 2011 - 9:57 pm | हुप्प्या
राजेश रोशनची गाणी इतकी वाईट वाटत नाहीत. पण काही काही साफ चोरलेली आहेत. बातो बातो मे ह्या सिनेमातली गाणी मला आवडायची (कभी खुशी कभी गम तारारमपमपम.., न बोलो तुम न मैने कुछ कहा वगैरे) पण ही सरळसरळ प्रसिद्ध इंग्रजी बालगीतांवरुन उचलली आहेत असे कळून चुकले. यारानातील छू कर मेरे मन को हे एका रवींद्र संगीतातील रचनेवरून सरळ उचललेले आहे. त्यामुळे जेव्हा हा सिनेमा बंगालमधे प्रदर्शित झाला तेव्हा ह्या गाण्यावर बंदी घालावी अशी मागणी झाली होती.
ज्युलीमधील (१९७५ चा) गाणी आवडतात आणि ती चोरलेली आहेत असे अद्याप कळलेले नाही. त्यामुळे संशयाचा फायदा द्यायला हवा. पण तरी बापाची सर नाही हे खरे.
ए आर रहमान, हा माणूस माझा कमालीचा नावडता. माझ्या लेखी तो माझा सगळ्यात नावडता संगीतकार आहे. मला त्याचे संगीत कधीही आवडलेले नाही. हिंदीचा/उर्दूचा गंधही नसल्यामुळे त्याच्या हिंदी गाण्यात शब्द कसेबसे ठोकूनठाकून बसवलेले असतात असे वाटते. कित्येकदा तमिळ चाल आधीच तयार असते आणि आता त्यात हिंदी शब्द कोंबायचे अशा पद्धतीने त्याने अनेक गाणी बनवली आहेत असे वाटते. (उदा. बॉम्बे) भाषेचा लहेजा संभाळता न येणारा संगीतकार म्हणजे नको वाटतो.
कधीतरी त्याची हाईप संपेल अशी आशा.
बप्पी लहिरी सुरवातीच्या काळात खूप चांगली गाणी द्यायचा पण नंतर आचरटपणा, उचलेगिरी वाढली.
नौशादची सुरवातीची गाणी सुरेख होती पण नंतरच्या काळातली त्याची काही गाणी अगदी बकवास वाटतात.
जाता जाता: सज्जाद हुसेन हा एक अत्यंत प्रतिभावंत पण अहंकारी आणि लहरी संगीतकार होता. त्याच्या लेखी नौशाद हा अत्यंत सामान्य, सुमार संगीतकार.
बहुतेक संगीतकार सुरवातीला अगदी उत्तम संगीत बनवतात. पण जेव्हा ते पुढे येतात तेव्हा त्यांची प्रतिभा आटते किंवा
मागणीच्या प्रमाणात चांगले संगीत बनवणे अवघड जात असावे.
24 May 2011 - 11:47 pm | आशु जोग
छान लिहिलेत
माहितीपूर्णही आहे
25 May 2011 - 1:48 pm | मी_ओंकार
ए आर रहमान, हा माणूस माझा कमालीचा नावडता. माझ्या लेखी तो माझा सगळ्यात नावडता संगीतकार आहे. मला त्याचे संगीत कधीही आवडलेले नाही. हिंदीचा/उर्दूचा गंधही नसल्यामुळे त्याच्या हिंदी गाण्यात शब्द कसेबसे ठोकूनठाकून बसवलेले असतात असे वाटते. कित्येकदा तमिळ चाल आधीच तयार असते आणि आता त्यात हिंदी शब्द कोंबायचे अशा पद्धतीने त्याने अनेक गाणी बनवली आहेत असे वाटते. (उदा. बॉम्बे) भाषेचा लहेजा संभाळता न येणारा संगीतकार म्हणजे नको वाटतो.
गाणी लिहीणारा तो गीतकार. शब्द (ठोकून बसवलेले वगैरे) हे गीतकाराचे असतात.
संगीत देणारा - चाल लावणारा / चाल बनवणारा तो संगीतकार.
शब्द चांगले नाहीत म्हणून रेहमान वाईट हे काही कळले नाही.
- ओंकार.
25 May 2011 - 8:57 pm | प्रदीप
हे गाणे ह्यावरून उचलले आहे, ते त्यावरून... असली चर्चा अनेक संगीताशी संबंधित फोरांवर सुरू असते. ८० च्या दशकानंतरच्या संगीताची माहिती नाही, पण ४७ - ८०च्या काळातील हिंदी चित्रपट संगीतात अशा 'चोर्यां'ची अनेक उदहरणे सापडतात, एका संस्थळावर ह्याविषयी विस्तृत माहिती आहे (विकास ह्यांनी तो दुवा दिलेला आहे). ह्या काळातील तथाकथित 'चोर्यां'विषयी एक लक्षात घ्यावे की सर्वसाधारणपणे गीताचा मुखडा कुठल्या परदेशी गीतावर आधारित असायचा, ते मूळ गीत इजिप्त्शियन असे किंवा पाश्चिमात्य असे. काही असले तरी ह्या काळांतील 'चोर्या' ह्या तद्दन चोर्या नसत. गीताचा मुखडा दुसर्य गीतावरून बेतलेला असे. परंतु गाण्यातील अंतर्याच्या चाली, प्रील्यूड, कोडा, इंटरल्यूड, दोन ओळींमधील मधील पीसेस, ठेका, ती वाजवणारी वाद्ये-- थोडक्यात इतर सर्व काही--त्या त्या संगीतकाराची स्वतःची असत. म्हणजे गाण्याची फ्रेम दुसर्या गाण्यावर बेतलेली असली तरीही पुढची सर्व डेव्हलपमेंट संगीतकाराने स्वतः केलेली असे, व ती अनेकदा इतकी प्रभावी असे की मूळ गीताचा अंश त्यात अगदी थोडकाच रहावा. गीताचे अॅडॉप्टेशन सुरेख केलेले असे. तेव्हा त्या काळांतील गीतांबद्दल तरी 'चोरी'चा फारसा बागुलबोवा करण्यात हंशील नाही.
आणि मग नक्की चोरी कशाकशास म्हणायची? अनेकदा गीते भारतीय लोकसंगीतावरून घेतलेली आहेत, शास्त्रीय संगीतातील चीजांवर आधारलेली आहेत, सुगम संगीतावर (ठुमर्य, कजर्या इ.) आधारलेली आहेत. त्यांनाही 'चोरी'च म्हणायचे का?
शेवटी जे आपल्या समोर आले ते आपणास आवडते की नाही, हे महत्वाचे.
नौशादांचे त्यांच्या नंतरच्या काळातील संगीत आपल्याला आवडत नाही, हे समजले. पण हे आपले मत आहे, इतकेच पुरे आहे ना! त्याच्या पुष्ट्यर्थ सज्जादचे उर्मट वक्तव्य देण्याची गरज भासू नये. (सज्जादने फार संगीत दिले असे नाही, पण जे काही दिले त्यातील एकाद-दोन झगझगीत गाणी वगळता इतर सर्व सुमार होती, हे माझे त्याच्या संगीताविषयीचे मत आहे. ती सर्वच गाणी अरबस्थानातील वाळवंटात गाण्यासाठी आहेत असे सर्व संगीत आहे-- उंटांच्या गळ्यातील घंटांसकट. एकासारखे दुसरे गाणे, काहीही वैविध्य नाही. सज्जाद कुशल मेंडोलिनवदक होता, आणि संगीतकार म्हणून त्याचा दबदबाही होता. पण त्याच्या उर्मटपणाच्या आख्ययिकच जास्त चर्चिल्या जातात!)
नौशाद सुमारे तीस+ वर्षे कार्यरत राहिले. इतक्या प्रदीर्घ काळात ननवे प्रयोग करणे हे तसे कठीणच काम. अन्य कुणी संगीतकाराने ते केले असल्याचे मला तरी आठवत नाही. सगळ्यांचे तसेच होत असावे.
25 May 2011 - 11:15 pm | विकास
ह्या काळातील तथाकथित 'चोर्यां'विषयी एक लक्षात घ्यावे की सर्वसाधारणपणे गीताचा मुखडा कुठल्या परदेशी गीतावर आधारित असायचा, ते मूळ गीत इजिप्त्शियन असे किंवा पाश्चिमात्य असे.
खरे आहे. बर्याचदा जसे एखाद्या रागदारीवर आधारीत संगीत असते तसे कधी कधी दिसते, विशेष करून जुन्या संगितकारांच्या संदर्भात. मात्र नंतरच्या काळात जसेच्या तसे कॉपी करणे यात काहीच गैर वाटेनासे झाले. बप्पी लेहरी कदाचीत अशा पद्धतीतील आद्य संगितकार असावा.
शेवटी जे आपल्या समोर आले ते आपणास आवडते की नाही, हे महत्वाचे.
असेच म्हणतो.
26 May 2011 - 12:43 am | हुप्प्या
<<
नौशादांचे त्यांच्या नंतरच्या काळातील संगीत आपल्याला आवडत नाही, हे समजले. पण हे आपले मत आहे, इतकेच पुरे आहे ना! त्याच्या पुष्ट्यर्थ सज्जादचे उर्मट वक्तव्य देण्याची गरज भासू नये.
<<
पुष्ट्यर्थ वगैरे काही नाही. "जाता जाता" असा जो त्या परिच्छेदाच्या आधी शब्दप्रयोग केला आहे त्याचा अर्थ, ह्या संदर्भात आठवण झाली म्हणून असा आहे. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असा आजिबात नाही. गैरसमज नसावा.
अजून एक आठवण म्हणजे शिरीष कणेकरांच्या कुठल्यातरी लेखात लता मंगेशकरचे विधान आहे की राजेश रोशन बापाकडून काहीही शिकला नाही अशा अर्थाचे. म्हणजे लतादिदीच्या लेखी राजेश रोशन (रोशनच्या तुलनेत) यथातथाच आहे. अर्थात हिंदी संगीताचे सुवर्णयुग जिने अनुभवले आणि घडवलेही तिला नवे संगीतकार फिके वाटणे स्वाभाविकच आहे.
सज्जाद हुसेनची जी काही गाणी ऐकली ती चांगलीच वाटली आहेत. त्याच्या विक्षिप्तपणामुळे आणि अहंकारामुळे त्याला जास्त सिनेमे मिळाले नसावेत. फिल्म इंडस्ट्रीमधे प्रसिद्ध व्ह्यायच्या आधी केलेला अहंकार फार महाग पडतो.
24 May 2011 - 10:37 pm | लॉरी टांगटूंगकर
हिमेशभाइच्या आधि रेहमान चे नाव बघुन हळह्ळ वाटलि.(इथे डोके फोडत अस्लेल्या करूण चेहेर्याच्या स्मायली आहेत असे समजुन घ्यावे)
24 May 2011 - 11:08 pm | योगी९००
हिमेश रेशमिया
अन्नू मलिक
प्रितम
बाकी रवी आणि राजेश रोशन नावडते असे नव्हतेच.. त्यांची बरीच गाणी (जरी चोरलेली असली) तरी गुणगुणावीशी वाटायची...
रवी - वक्त, हमराज,निकाह अजून आवडतात..
राजेश रोशन - जुली, स्वामी (पल भर ये क्या हो गया)
24 May 2011 - 11:24 pm | पक्या
राजेश रोशन डोक्यात जाईल इतका काही वाईट संगीतकार नाही. त्याची बरीच गाणी ऐकायला चांगली वाटतात.
24 May 2011 - 11:47 pm | विजुभाऊ
तुम्हाला
हिमेश रेशमिया
अमर उत्पल ( शहेनशहा)
आनंद मिलिंद
जतीन ललीत
यांच्या बाबतीत काही ऐकीवात आहे का?
24 May 2011 - 11:56 pm | प्रियाली
बहुधा कल्याणजींचे सुपुत्र अतिशय त्रासदायक संगीत देतात.
25 May 2011 - 9:45 am | गोगोल
गाणी बरी होती ना.
25 May 2011 - 1:27 am | विकास
एखादे गाणे आवडले म्हणजे तो संगितकार आवडता होतो अशातला भाग नसतो. प्रत्येक संगितकाराचे एखादे गाणे तरी आवडू शकेलच तर काही किमान गुणगुणता येतील.
बाकी बप्पी लेहरीवर चाल चोरण्याचा योग्य आरोप होतो. मात्र इतर संगिताच्या क्षेत्रातील ऋषींची कुळं आणि नद्यांची मुळं बघितली की नथिंग बट डिप्रेशन येते. :(
25 May 2011 - 5:51 am | नगरीनिरंजन
यात अन्नू मलिकचे नाव नाही हे पाहून आधी आश्चर्य वाटले, पण मग कळले की बरेच लोक त्याला संगीतकार मानत नाहीत. जुडवातली त्याच्याच आवाजात रेकलेली त्याची गाणी(?) ऐकल्यावर बहिरा माणूसही त्याला संगीतकार समजणार नाही.
25 May 2011 - 8:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
25 May 2011 - 6:39 am | रेवती
हिमेसभाईपेक्षा सगळे बरे!;)
25 May 2011 - 7:41 am | पैसा
हिमेसभाईलाच!
25 May 2011 - 1:49 pm | स्मिता.
अगदी अगदी १००% खरंय.
हिमेशपुढे अन्नू मलिकचं 'उंची है बिल्डींग' सुद्धा सुसह्य वाटतं.
25 May 2011 - 9:19 am | प्यारे१
मागे कुणाचा तरी 'आय डोन्ट हेट इन प्लुरल्स' वाला धागा आला होता.
साथियाँ मधले चुपके से लग जा गले, ओ हमदम, शीर्षक गीत ऐकल्यानंतर ती गाणी लगेच भावण्याचं कारण गुलझार साब असावेत. हल्ली चाल/संगीत आधी आणि नंतर त्याला साजेसे शब्द असा प्रकार असतो. अर्थातच रेहमान तामिळ्भाषिक असल्याने त्याच्या मनात थोडेफार तामिळ शब्द चाल देताना ही अभिप्रेत असावेत. इथे गुलझार यांनी चपखल शब्द बसवल्याने ती गाणी गुणगुणावीशी वाटतात. मात्र हिंदुस्तानी मधील एकही गाणे आणी त्याचे शब्द म्हणजे शब्दशः छळ आहे.
अन्नू मलिक (तोच उंची है बिल्डींग वाला ) जेव्हा बाजीगर मधली गाणी, पंछी नदियाँ पवन के झोकें सारखी गाणी देतो तेव्हा तो आवडतोच.
चांगले घ्या बाकी टाकून द्या. सिम्पल.
25 May 2011 - 9:49 am | गोगोल
म्हणायला हरकत असू नये पण ह्या तथाकथित नामांकीत संगीत कारांनी केलेल्या चोर्या पाहून अस म्हणावस वाटत की या वाईट गोष्टी यांच्याबाबतीत एक्सेपशन नसून अधून मधून दिलेल्या चांगल्या चाली याच एक्सेपशन आहेत.
साजिद खाननी या चोरी कामावर बरेच टी व्ही शो केले आणि म्हणून मग त्याच्या त्या शो वर बंदी आली असे ऐकून आहे.
25 May 2011 - 10:16 am | मृत्युन्जय
चोर्या चोर्या काय आरडी ने पण केल्या. अण्णु ने केल्या त्यात काही विशेष नाही. विशेष हे की आरडीनी बरीच ओरिजिनल गाणी दिली. मध्यंत्यरी एका कार्यक्रमात अण्णुवर आरोप झाला की तो गाणी चोरतो त्यावर उसळुन तो उत्तरला की कोण म्हणतो की मी गाणी चोरतो. आता हीच चाल घ्या अगदी ओरिजिनल आहे. त्यानंतर त्याने जे गाणे म्हणुन दाखवले त्याची चाल शेम टु शेम शनिदेवाच्या आरतीची होती. मला त्याचे कौतुक वाटले. तो खोटे पण अगदी धडधडीत बोलतो.
बाकी अन्नुची सुद्धा काही गाणी आवडतात पण ती चोरलेली नसतील असे छातीठोकपणे सांगता येत नाही. एका दशकापुर्वी अन्नुने एकच चाल २ चित्रपटांच्या गाण्यांसाठी वापरली. दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होउ घातले होते आणि त्याची गाणी आलटुन पालटुन वाजायची. गंमत म्हणजे दोन्ही गाणी मूळ माकारेना या इंग्लिश(की इटालियन) गाण्यावरुन चोरली होती. एवढा महान चोट्टेपणा केवळ अन्नु मलिक करु शकणा.
कुठलाही संगीतकार २०% पेक्षा जास्त ओरिजिनल गाणी देउ शकत नाही हा जावईशोध सुद्धा त्याचाच. मी अन्नुची बरीच गाणी ऐकली आहेत. त्याची ती २०% तली गाणी कोणी ऐकली आहेत काय?
25 May 2011 - 10:32 am | मुलूखावेगळी
माझ्या अल्प ज्ञानानुसार मला असे वाटते कि १ गाण्यात संगीतकार्,गीतकार ,गायक आणि पिक्चरायझेशन ह्या सर्व बाबींचे योगदान असते.
संगीतकाराऐवजी मी गाने गायकावरुन निवडते
तेव्हा कोनताच संगीतकार डिस्लाईक नाही.
वरील यादीत ल्या भप्पी साठी मात्र+१००
बाकिंसाठी नाहीच कारन त्यांची काही गाणे चांगली आहेत
25 May 2011 - 12:22 pm | प्रास
भप्पीदांची 'चलते चलते' (१९७६) आणि 'शराबी' (१९८४) चित्रपटामधली गाणी एकदा तरी ऐकाच...... ही विनंती.
25 May 2011 - 1:38 pm | मुलूखावेगळी
मला त्याची आनि कोनाचीही चांगली गाणी आवडतात .
भप्पीचा अवतार बघुनच तो डोक्यात जातो.
पोळ्याचा बैलासारखा/नंदीबैलासार्खा सजलेला दिसतो ना म्हनुन
आनि मी वर बोल्लेय ना गायका साठी ऐकते गाने
संगीतकार म्हनाल तर आर डी न रहमान जास्त फेव आहेत
8 Jun 2011 - 3:15 pm | विजुभाऊ
भप्पीदांची 'चलते चलते' (१९७६) आणि 'शराबी' (१९८४) चित्रपटामधली गाणी एकदा तरी ऐकाच...... ही विनंती.
शराबीतले " दे दे प्यार दे"
आणि एस डी बर्मन चे "रामा मेघ दे पानी दे छाया दे रे रामा मेघ दे" आणि एकत्र ऐकून पहा ही तुम्हाला विनन्ती.
25 May 2011 - 12:26 pm | मराठी_माणूस
ए आर रेहमान, अन्नु मलिक, बप्पी, नविन बरेचसे ज्यांच्या पेक्षा उषा खन्ना, राकेश रोशन, एल पी, रवि, हे केंव्हाही सरस
25 May 2011 - 2:20 pm | योगी९००
राकेश रोशन??
राजेश रोशन असे पाहिजे होते..
25 May 2011 - 11:50 am | बबलु
रोचक धागा.
जरा वेळ मिळाला की सविस्तर प्रतिक्रिया देइन.
रूमाल टाकून ठेवलाय.
25 May 2011 - 12:13 pm | गवि
बप्पी लाहिरीची गाणी अत्यंत मस्त असतात.
त्याला उगीच टाकाऊ ठरवू नये.
-जिमी जिमी आजा.
-झूम झूम झूम बाबा.
-इन्तेहा हो गई इन्तजार की. (शराबी)
-दे दे प्यार दे
-पग घुंगरू बांध.
-यार बिना चैन कहां रे.
-याद आ रहा है तेरा प्यार..
-रंबा हो
-हरी ओम हरी (प्यारा दुश्मन)
-कोई यहां नाचे नाचे.
-बम्बई से आया मेरा दोस्त
-हम को आजकल है इन्तजार (सैलाब)
आणि किती म्हणू.
त्याची अनेक गाणी ऐकून कोणाचीही पावलं ताल धरतात. डिस्को स्टाईल संगीत भारतात आणण्यात आर डी खेरीज बप्पीच होता.
आणि इतर असंख्य वाद्यांचा उपयोग त्याने प्रथम केला.
चांगला आहे तो.
25 May 2011 - 2:24 pm | योगी९००
बप्पीदांची खालील गाणी विसरलात असे दिसते..
ऐतबार (आवाज दी है आज एक नजर ने... आणि किसी नजर को तेरा..)
तोहफा ..(तोहफा तोहफा आणि एक आंख मारू तो. ही गाणी जरी सो सो असली तरी गाण्याचा ठेका मात्र एकदम मस्त होता. मात्र जितू जयाप्रदा आणि श्रीदेवीला नाचताना नाही बघवत..)
25 May 2011 - 10:58 pm | गोगोल
कोई यहां नाचे नाचे????
सिरीयसली?
26 May 2011 - 1:23 pm | गवि
तेही ठीकच आहे की.
ढिंगचॅक गाणे आहे एकदम.
आणि बप्पीदाचेच आहे. डिस्को डान्सरमधले.
26 May 2011 - 1:30 pm | नगरीनिरंजन
25 May 2011 - 12:48 pm | तिमा
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
मीही संगीतकारांचा घाऊक तिटकारा करत नाही. कदाचित, स्वर्गीय रोशनजींच्यामुळे राजेश रोशनकडून माझ्या अपेक्षा वाढल्या असतील. पण तुलनेने त्यांचे समकालीन संगीतकार हे एवढे थोर होते की त्यापुढे हे सामान्य वाटायचे.
हल्लीच्या काही गाण्यांमधे, गायकाचा आवाज, त्याच्या शरीराच्या नक्की कुठल्या भागातून येतोय हेच कळत नाही आणि मग अशा गाण्यांपुढे ते सात संगीतकार सुध्दा उजवे वाटतात.
25 May 2011 - 5:26 pm | चावटमेला
हिमेसभाईंना प्रचंड बहुमताने विजयी करून टाकावे.. हिमेसभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
25 May 2011 - 8:33 pm | प्रदीप
छान, वेगळ्या धर्तीचा धागा!
माझी मते:
असेच म्हणतो.
रवि: दळणबाज हे खरेच! त्याच्या 'दस लाख' मधील 'गरिबों की सुनो..' ने प्रचंड वात आणला होता. आणि 'हमराज' मधील महेंद्र कपूरचे 'ऐ हवा' ऐकवत नव्हते!
(पण गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत तरी तो मल्याळी फिल्म्सना संगीत देत होता, म्हणे! तसे असेल तर तो सगळ्यात जास्त कार्यरत राहिलेला संगीतकार म्हटला पाहिजे!)
लक्ष्मीकांत- प्यारेलालः तुमच्या मतांशी सहमत नाही. अत्यंत गुणी संगीतकार द्वयी, पण (तथाकथित जाणकारांत )तितकेच बदनाम!
कल्याणजी- आनंदजी-- मला अजिबात आवडले नाहीत. त्यांच्या संगीतात मला कायम काहीतरी अत्यंत खोटे, पोकळ (phoney) वाटत राहिले आहे.
शंकर-जयकिशन माझे सर्वात आवडते संगीतकार आहेत, पण ७१ नंतर शंकर संपलाच!
25 May 2011 - 10:24 pm | आशु जोग
लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी कायम सस्ता माल वापरला
शब्बीरकुमार, मो अजीज वगैरे (लता, रफी पेक्षा ते स्वस्त)
त्यामुळे गाणी अगदीच फिकी वाटतात
बर चित्रपट अमिताभचा असेल तर संगीताला महत्व नसेच
आणि त्यांना मिळालेला रफी, लता हे सुद्धा नंतरच्या काळातले(जरा वयस्कर)
उदा रफीची सुरुवातीची गाणी घ्या आणि परदा है परदा सारखी गाणी आठवा
फरक कळेल
26 May 2011 - 11:46 am | प्रदीप
लक्ष्मी-प्यारे ह्यांनी संगीतकार म्हणून सुरूवात १९६४ च्या 'पारसमणी'पासून केली. तेव्हा लता व रफी दोघेही उमेदीत होते. आता काही तथाकथित जाणकारांच्या मते लताने १९६० साली गायन-सन्यास घ्यायला हवा होता, ह्यावरून गेले तर मग लक्ष्मी-प्यारेंना मिळालेले लता-रफी 'नंतरच्या काळातले' हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
लताने सर्वाधिक गाणी ह्यांच्यासाठी गायलीत, आणि लता हा 'सस्ता माल' नसावा! शब्बीरकुमार, मोहमद अझीझ हे रफी गेल्यानंतर त्याची 'जागा घेण्यासाठी' घेतले गेले असे मला वाटते.
'पर्दा है पर्दा' मधील रफी मला 'सुहानी रात ढल चुकी' तील रफीपेक्षा वेगळा जरूर वाटतो, पण इंफिरीयर अजिबात नाही. माझे कानच खराब आहेत, त्याला काय करणार?
26 May 2011 - 1:19 am | हुप्प्या
मला तरी रवीची अनेक गाणी आवडतात.
वक्त, गुमराह, काजल, भरौसा, खानदान, आदमी और इन्सान, धडकन, धुंद, निकाह अशा काही सिनेमातील काही गाण्यात त्याने आपली प्रतिभा नक्कीच दाखवली आहे.
मी त्याला इतका टाकाऊ समजत नाही.
8 Jun 2011 - 1:09 am | सुधीर काळे
उषा खन्नांचे "दिल देके देखो"साठी दिलेले संगीत भन्नाट होते. अतीशय आवडत असे व आजही त्यातली गाणी जुनी वाटत नाहींत. तसेच ओ. पी. नय्यरसाहेबांच्या संगीताबद्दल म्हणता येईल!
सगळ्यात न आवडणारा: "हात नका लाऊ त्याच्या सीडीला" फेम हिमेसभाईच! आवाजही तद्दन टाकाऊ!!
सगळ्यात जास्त आवडणारे संगीतकारः मदन मोहन (बिचारे अकाली दिवंगत झाले) आणि सचिनदेव बर्मन!
'कयामतसे कयामततक'चे संगीतकार आनंद-मिलिंद यांनी पाश्चात्य संगीतामागे भरकटत जाणार्या सिनेसंगीताला 'लायनी'त आणले म्हणून तेही आवडतात.
जय हो!
26 May 2011 - 7:41 am | ५० फक्त
लई भारि धागा, पण वर मुवेने लिहिलंय त्याला १००० +, मला तर गाणं या एकाच गोष्टीशी घेणं देणं असतं बाकी कोण काय याची काही गरजच नसते. त्यामुळं संगितकार त्यांची स्टाईल, वरचा ग खालचा ध असले प्रश्न मला पडत नाहीत.
26 May 2011 - 10:24 am | हुप्प्या
http://www.youtube.com/watch?v=9VFYkdtMf00
अन्नू मलिकची ही एक उत्कृष्ट रचना. उंच बिल्डींग लिफ्ट बंद हैच्या तोडीची!
उल्लू के पठ्ठे या वरवर पहाता शिवी वाटणार्या वाक्प्रचाराचा असा लवचिकपणे वापर करुन त्याची एक आगळीच रंगत निर्माण केली आहे. जगातील विविध कानाकोपरातील नृत्य शैली, विविध भाषा अशी साहित्य कलेची रेलचेल आहे म्हणा ना!
आणि दस्तुरखुद्द अन्नूजींचा आवाज म्हणजे काय सोन्याला सुगंधच!
26 May 2011 - 11:43 am | किसन शिंदे
हिमेश रेशमिया..
प्रीतम...
साजिद वाजीद...
भप्पी लहिरी...
एक बोर्डरच संगीत सोडल तर अन्नू मलिकही या यादीत बसू शकेल..
26 May 2011 - 1:06 pm | समीरसूर
मला ए. आर. रहमान अजिबात आवडत नाही. कधीही त्याची गाणी मी आवडीने ऐकली आहेत असे झाले नाही.
"चुपकेसे लगजा गले, रात की चादर तले.." हे 'साथिया' मधले गाणे मात्र मला खूप आवडते. बाकी "जय हो..." अत्यंत बकवास वाटते. त्या गाण्याला ऑस्करच काय, अखिल भुसारी कॉलनी भाजी विक्रेता संघाचा 'साँग ऑफ द डे' हा ही पुरस्कार मी दिला नसता. खूप तांत्रिक संगीत, अत्यंत सदोष गायकी, घाणेरडे उच्चार, कंटाळवाण्या चाली, आणि वेगवेगळ्या आवाजांचा इलेक्ट्रॉनिक गोंधळ यामुळे रहमानची गाणी मला ऐकायला आवडतच नाहीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
राजेश रोशनची काही गाणी चांगली आहेत.
"दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया हैं..." (आखिर क्यों?)
"तुम से बढकर दुनिया में न देखा कोई और जुबां पर..." (कामचोर)
"थोडा हैं थोडे की जरूरत हैं..." (बातों बातों में)
"छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा..." (याराना)
"परदेसिया तुने ये किया, सब कहते हैं तुमने मेरा दिल ले लिया..." (मि. नटवरलाल)
ही गाणी चांगली वाटतात. पण जास्त संख्या उबग आणणार्या गाण्यांची आहे हे नक्की! पण राजेश रोशनची गाणी खूप हिट होतात हे खरे. उदा. "मुंगडा, मुंगडा...", "जाती हुं मैं, जल्दी हैं क्या...", "वादा न तोड, तू वादा न तोड..." (हे गाणे तर हॉलिवूडच्या एका चित्रपटात वापरले होते), "कहो ना प्यार हैं..." इत्यादी.
बप्पी लाहिरीची गाणी धमाल असतात (असायची). वर यादी आहेच. ढिंगचाक गाणी (किशोर आणि आशा) ठेका धरायला लावायची आणि अजूनही आवडतात.
"ताथय्या ताथय्या हो हो.." (हिंमतवाला)
"तोफा तोफा.." (तोहफा)
"कोई यहाँ आहा नाचे नाचे" (डिस्को डान्सर)
"आय एम अ स्ट्रीट डान्सर" (इल्जाम)
"इंतेहा हो गयी..." (शराबी)
"आज रपट जाये तो..." (नमक हलाल)
"किसी नजर को तेरा इंतजार आज भी हैं..." (ऐतबार)
"मंजिलों पे आके लुटते हैं दिलो के कांरवा..." (शराबी)
"तम्मा तम्मा लोगे..." (थानेदार)
"यार बिना चैन कहां रे..." (साहेब)
ही आणि अशी बरीच गाणी चांगली वाटतात ऐकायला.
मला नौशाद आणि शंकर जयकिशन आवडत नाहीत. रटाळ चाली वाटायच्या त्यांच्या. 'मुघल-ए-आझम' मधली एक ती "हम भी देखेंगे" ही कव्वाली सोडली तर नौशाद मला आवडले नाहीत कधी. शंकर-जयकिशनची राज कपूरची गाणी कधीच आवडली नाहीत. कल्याणजी-आनंदजी पण आवडते नाहीत. एका "नीले नीले अंबर पे चांद जब आये..." साठी त्यांच्या बाकीच्या गाण्यांकडे दुर्लक्ष करता येते. :-)
26 May 2011 - 1:16 pm | गवि
बप्पीदांची गाणी आठवून दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी राजेशजींच्या गाण्यांमधे तुम्ही दिलेले
"थोडा हैं थोडे की जरूरत हैं..." (बातों बातों में)
हे बातों बातों में ऐवजी खट्टा मीठा मधे असावे अशी शंका आहे.
26 May 2011 - 3:03 pm | समीरसूर
बरोबर आहे. माझे थोडे कन्फ्युजन झाले. धन्यवाद. :-)
26 May 2011 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते
या धाग्यावर प्रदीपदांच्या प्रतिक्रियांची वाट बघत होतो. त्या आल्या. अजून एकाची वाट बघत आहे. :)
26 May 2011 - 3:43 pm | शैलेन्द्र
ह्म्म....
28 May 2011 - 6:26 am | गोगोल
कोण?
26 May 2011 - 2:52 pm | रणजित चितळे
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो0.
जतीन ललीत
सोनीक ओमी
उषा खन्ना
हिमेश रेषमीया
आनंद मिलींद
अमर उत्पल
बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत.
धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
26 May 2011 - 2:52 pm | रणजित चितळे
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो).
जतीन ललीत
सोनीक ओमी
उषा खन्ना
हिमेश रेषमीया
आनंद मिलींद
अमर उत्पल
बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत.
धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
26 May 2011 - 2:53 pm | रणजित चितळे
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो).
जतीन ललीत
सोनीक ओमी
उषा खन्ना
हिमेश रेषमीया
आनंद मिलींद
अमर उत्पल
बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत.
धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
26 May 2011 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर बॉ देवबाप्पांचे संगीत आवडते. आणि देवबाप्पा मिपाचे सदस्य देखील आहेत.
बाकी सगळे संगीतकार आपण फाट्यावर मारतो.
6 Jun 2011 - 1:26 pm | वाहीदा
देवबाप्पा इज टू गुड !
(परा, सगळी अक्षरे बघ कशी मी मराठीत लिहीली आहेत ;-) )
31 May 2011 - 11:34 am | योगप्रभू
संगीतावर (म्हणजे म्युझिक या अर्थाने) प्रेम करणार्याला कुणाचाही द्वेष/राग/तिरस्कार वाटू नये.
संगीतकार म्हणजे प्रत्येक वेळी महान कलाकृती निर्माण करेल, अशी अपेक्षा का ठेवावी?
सिद्धहस्त लेखक कधी कधी अगदी सुमार लिहून जातात. घरचेच उदाहरण घ्या. आपली आई/पत्नी कितीही सुगरण असल्या तरी कधीकधी त्यांचीही पाककृती बिघडते. यावरुन एकदम त्यांची संभावना कस्पटासमान करता येत नाही.
राजेश रोशनने संगीत दिलेली ज्युली (१९७५) चित्रपटातील गाणी मला आवडतात. प्रीती सागरने गायलेले 'माय हार्ट इज बीटिंग' हे गाणे कधीही ऐकले तरी मजा येते. आता कधी राजेशची भट्टी बिघडली म्हणून त्याला एकदम भिकार ठरवायचे का?
मला वाटते, आपण प्रत्येकाचे चांगले ते घ्यावे आणि आनंद लुटावा.
मला प्रदीप यांची पोस्ट आवडली. सहमत आहे. आवडलेल्या एखाद्या गाण्याची चाल घेऊन त्याला भारतीय रुपडे दिले असेल तर त्याला चोरी म्हणू नये. चित्रपट कथांच्या बाबतीत असे सर्रास म्हटले जाते. इरिक सीगलच्या 'मॅन, वूमन अँड चाईल्ड' या कादंबरीवरुन प्रेरणा घेऊन 'मासूम' हा चित्रपट तयार केलाय. पण भारतीय वातावरणाला चपखल बसलाय की नाही?
छाया चित्रपटातील 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे घ्या. याची चाल म्हणजे मोझार्टची क्र. ४० ची सिंफनी. संगीतकार सलील चौधरी यांनी त्याचा वापर करुन इतके सुंदर गाणे बनवले आहे आणि तलत व लतानेही त्यात बहार आणली आहे. आता याला आपण चोरी म्हणू का?
31 May 2011 - 11:37 am | योगप्रभू
संगीतावर (म्हणजे म्युझिक या अर्थाने) प्रेम करणार्याला कुणाचाही द्वेष/राग/तिरस्कार वाटू नये.
संगीतकार म्हणजे प्रत्येक वेळी महान कलाकृती निर्माण करेल, अशी अपेक्षा का ठेवावी?
सिद्धहस्त लेखक कधी कधी अगदी सुमार लिहून जातात. घरचेच उदाहरण घ्या. आपली आई/पत्नी कितीही सुगरण असल्या तरी कधीकधी त्यांचीही पाककृती बिघडते. यावरुन एकदम त्यांची संभावना कस्पटासमान करता येत नाही.
राजेश रोशनने संगीत दिलेली ज्युली (१९७५) चित्रपटातील गाणी मला आवडतात. प्रीती सागरने गायलेले 'माय हार्ट इज बीटिंग' हे गाणे कधीही ऐकले तरी मजा येते. आता कधी राजेशची भट्टी बिघडली म्हणून त्याला एकदम भिकार ठरवायचे का?
मला वाटते, आपण प्रत्येकाचे चांगले ते घ्यावे आणि आनंद लुटावा.
मला प्रदीप यांची पोस्ट आवडली. सहमत आहे. आवडलेल्या एखाद्या गाण्याची चाल घेऊन त्याला भारतीय रुपडे दिले असेल तर त्याला चोरी म्हणू नये. चित्रपट कथांच्या बाबतीत असे सर्रास म्हटले जाते. इरिक सीगलच्या 'मॅन, वूमन अँड चाईल्ड' या कादंबरीवरुन प्रेरणा घेऊन 'मासूम' हा चित्रपट तयार केलाय. पण भारतीय वातावरणाला चपखल बसलाय की नाही?
छाया चित्रपटातील 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे घ्या. याची चाल म्हणजे मोझार्टची क्र. ४० ची सिंफनी. संगीतकार सलील चौधरी यांनी त्याचा वापर करुन इतके सुंदर गाणे बनवले आहे आणि तलत व लतानेही त्यात बहार आणली आहे. आता याला आपण चोरी म्हणू का?
6 Jun 2011 - 12:49 pm | मैत्र
कोणाला एकदम वाईट म्हणण्यात अर्थ नाही.
रवी / बप्पीदा / रहमान ला अजिबात आवडत नाही म्हणणार्यांना वर अनेक उत्तरं दिली आहेत.
रहमान बद्दल थोडं -- तो खूप कृत्रिम संगीत देतो. खूप जास्त वाद्य वापरतो वगैरे गोष्टी अनेकांना आवडत नाहीत ...
या चित्रपटातलं एकूणच सर्व संगीत उत्तम आहे
रोजा, लगान, जोधा अकबर, तक्षक, भगत सिंग, गजनी, देल्ही ६, स्वदेस
ह्या गाण्यां मध्ये रहमान वर घेतले जाणारे नेहमीचे आक्षेप लागू होत नाहीत:
ऋत आ गई रे - १९४७ अर्थ
चुपके से - साथिया
सुनता है मेरा खुदा - पुकार
नहीं सामने - ताल
करिये ना - ताल
कभी नीम नीम - युवा
लुका छूपी - रंग दे बसंती
अल्बम -- जन गण मन -- सर्व नामवंत कलाकारांना घेऊन केलेलं.
अल्बम -- माँ तुझे सलाम -- वंदे मातरम - केवळ वाद्यसंगीत असलेलं वंदे मातरम
स्पिरीट ऑफ युनिटी कॉन्सर्ट्स - टायटल म्युझिक
भारतबाला प्रॉड्क्शन्स साठी केलेलं काम ...
ही फक्त वानगी दाखल यादी आहे. यात तथाकथित पाश्चिमात्य धर्तीची गाणी धरलेली नाहीत ज्यात म्युझिक सिंथेसाईज केलेलं आहे पण अतिशय गाजलेली आणि चांगली गाणी आहेत.