मराठी चित्रपटांचे कसे होणार

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
24 May 2011 - 9:35 am
गाभा: 

मराठी चित्रपटाची चिंता करावी अशी स्थिती आहे का
आणि आपण हिंदीशी तुलना करीत असाल तर...

हे पहा

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rzr...

तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2011 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मराठी चित्रपटाची चिंता करावी अशी स्थिती आहे का ?
आपण दिलेल्या दुव्याचा अर्थ काढला तर ’मराठी चित्रपट’ आता दर्जेदार बनत आहेत
असे म्हणायला हरकत नाही.

>>>आणि आपण हिंदीशी तुलना करीत असाल तर...
हिंदी चित्रपटांची मराठी चित्रपटाशी तुलना करु नये असे वाटते. हिंदी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. आपलं जे आहे ते बरं आहे, असे वाटते. काय म्हणता !

*बजेट,तंत्रज्ञ, तांत्रिक गोष्टी, वगैरे तर आपण (मराठीवाले)अजून बरेच मागे आहोत. (अंदाजपंचे)

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

24 May 2011 - 10:51 am | आशु जोग

>> *बजेट,तंत्रज्ञ, तांत्रिक गोष्टी, वगैरे तर आपण (मराठीवाले)अजून बरेच मागे आहोत.
दिलीप बिरुटे

असे का वाटते आपल्याला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2011 - 12:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>असे का वाटते आपल्याला
मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट सर्वच बाबतीत हटकेच असतो (अपवाद सोडून द्या) म्हणून तसे वाटले.
बाकी, अभ्यास करुन, गुगलुन, किंवा असलेल्या माहितीचे विश्लेषण करुन असे मत नोंदविले पाहिजे, पण मला बॉ वरील गोष्टीत हिंदीवाले भारी पडतील असे उगाच वाटते.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

24 May 2011 - 10:09 am | प्यारे१

लिंक वाचली.
तोच लेख इथे दिला असता तर काय झोळीत धोंडा पडला असता का? ;)

जर मराठी चित्रपटांचे बरे चालले आहे तर आणखी चांगले चालण्यासाठी काय करावे लागेल हे सांगा ना मग.....

चिरोटा's picture

24 May 2011 - 10:26 am | चिरोटा

आशु, ती लिंक इकडून उघडत नाही. आपण आपले मत इथे का नाही मांडत? सगळे ते गूगलवरच कशाला?

आशु जोग's picture

24 May 2011 - 10:45 am | आशु जोग

चिरोटा

>>आशु, ती लिंक इकडून उघडत नाही. आपण आपले मत इथे का नाही मांडत? सगळे ते गूगलवरच कशाला?

ती पी डी एफ आहे चित्रं वगैरे वाली म्हणून लिंक दिली

इथे चित्रे कशि टाकाची माहीत नाही
जरा शिकतो आहे सांभाळून घ्या

मराठी_माणूस's picture

24 May 2011 - 10:38 am | मराठी_माणूस

लिंक उघडत नाही

नगरीनिरंजन's picture

24 May 2011 - 10:40 am | नगरीनिरंजन

(लिंक देण्याच्या पद्धतीवरून) हा युयुत्सुंचा डुआयडी तर नाही?

आशु जोग's picture

24 May 2011 - 10:48 am | आशु जोग

>>(लिंक देण्याच्या पद्धतीवरून) हा युयुत्सुंचा डुआयडी तर नाही?

नाही मै जहा खडा रहेता हूं वहीसे लाइन शुरु होती है

मी कुणाची नव्हे माझी इतर लोक कॉपी करतील (मजा बर का)

आशु जोग's picture

24 May 2011 - 10:49 am | आशु जोग

.

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 11:20 am | मृत्युन्जय

कृपा करा आणि दुसरीकडच्या स्वतःच्याच लेखांच्या लिंका इथे देउन इथल्या एकोळी धाग्यांची संख्या वाढवु नका. तुम्ही मिपाचा प्लॅटफॉर्म वापरता आहात ना? मग टाका ना मिपावर लेख. परा, गवि, विनित यांचे पण स्वतःचे ब्लॉग्स आहेत पण ते असे लिंका टाकुन दुसरीकडे लेख वाचायला लावत नाहीत.

बाकी मराठी चित्रपटांचे कसे होणार हा प्रश्न आजघडीला तरी पडता कामा नये. उत्तम चित्रपट येत आहेत. कधी नव्हे ती मराठी चित्रपटांची तिकिटे ब्लॅक होत आहेत. तिकीटे ब्लॅक होण्यात कधी आनंद होइल असे वाटले नव्हते.

आणि खरे सांगायचे तर मराठीचे कसे होणार, मराठी शाळांचे कसे होणार, मराठी चित्रपटांचे कसे होणार, मराठी नाटकांचे कसे होणार असले चिंतामणी धागे काढुन काही होइल असे वाटत नाही. मराठी साहित्याबद्दल दर साहित्य संमेलनात गळे काढले जातात. परिस्थिती जैसे थे च आहे सुधारही नाही आणि बिघाडही नाही.

आणि हो, वहिनीची माया, सासुची माया, वहिनीच्या बांगड्या , दादाचे पैंजण असले चित्रपट काढण्यापेक्षा मराठी चित्रपटसृष्टी बुडाली तरी चालेल आणि सुदैवाने आजकाल असे चित्रपट निघत नाही आहेत.

सोत्रि's picture

24 May 2011 - 4:57 pm | सोत्रि

जियो, मृत्युंजय,

प्रतिक्रिया लिहवी म्हणून खाली आलो आणी तुमचा प्रतिसाद दिसला.
माझ्या मनात जे होते ते लिहुन तुम्ही माझे कष्ट वाचवलेत.

आशु जोग's picture

24 May 2011 - 8:49 pm | आशु जोग

मृत्युन्जय ,
अज्ञान लपवायला टोपणनाव बरे पडते हे तुमचे लिखाण वाचून मला कळले

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 9:30 pm | मृत्युन्जय

आशु जोग माझे खरे नाव मिपावर बर्‍याच जणांना ठाउक आहे अन एक धाग्यावर माझे फोटोही आहेत हे तुम्हाला माहिती नाही हे कळाले.

बाकी नक्की कुठल्या अज्ञानाबद्दल बोलताय तुम्ही काका? माझ्या प्रतिसादातुन कुठले अज्ञान उघड झाले जरा कळु तरी द्यात. की असले बकवास एकोळी धागे काढल्याचा निषेध केला म्हणुन जळजळ बाहेर पडते आहे ;)

आशु जोग's picture

25 May 2011 - 12:16 am | आशु जोग

मृत्युन्जयकाका,

काय झालय
तुम्ही इतके का रागावलेले आहात
माझ्या लिखाणात वावगं काय आहे

मृत्युन्जय's picture

25 May 2011 - 10:04 am | मृत्युन्जय

जोग काका तुम्ही माझे प्रतिसाद वाचले नाहीत काय? मी आपल्या लिखाणात काही वावगे आहे असे कुठेच लिहिलेले नाही आहे. आक्षेप एकोळी चारोळी लिंकाळेश्वर धाग्यांना आहे. तुम्ही न वाचताच प्रतिसाद देता असे दिसतय. असो, मोठे व्हा.

ओके
म्हणजे तुम्ही रागावलेले नाही आहात तर

छान

सविता's picture

26 May 2011 - 11:34 am | सविता

आणि समोर चा बोलतोय ते मनातल्या मनात पटत असूनही... ते उघड पणे मान्य करायचे नसल्यास असंबद्ध उत्तरे देणे बरे पडते हे तुमची प्रतिक्रिया वाचून मला कळले

>>कृपा करा आणि दुसरीकडच्या स्वतःच्याच लेखांच्या लिंका इथे देउन इथल्या एकोळी धाग्यांची संख्या वाढवु नका.
+१

>>>दादाचे पैंजण

मी पडले इकडे खुर्चीतून!!

मितभाषी's picture

26 May 2011 - 12:51 pm | मितभाषी

अस्तित्वात नसलेल्या चिंता कशाला करतो भावड्या. उगाच बावळ्यापणा.....

अन्या दातार's picture

24 May 2011 - 11:25 am | अन्या दातार

मराठी आणि हिंदीशी तुलना करता, मला तेलुगु पिक्चर जास्त सरस वाटतात. कथा, पटकथा, दिग्दर्शन, तांत्रिक सर्वच बाबतीत. एकदा सविस्तर लिहिन म्हणतोय यावर.

सोत्रि's picture

24 May 2011 - 5:07 pm | सोत्रि

मागच्याच आठवड्यात मगधीरा नामक तेलुगु पिक्चर पाहिला तांत्रिकदृष्या अतिशय दर्जेदार पिक्चर.
एक नंबर.

गोगोल's picture

28 May 2011 - 6:03 am | गोगोल

मला तर २० वर्षांची नटी आणि ६० वर्षांचा बाप्या यामागचे गणित काही कळत नाही.

ईन्टरफेल's picture

24 May 2011 - 9:15 pm | ईन्टरफेल

सब खेत मे ढोर पांग्या !
.
,
.
.
आसा चित्रपट येनार हाय म्हने
.
.
..
.
.
.
..
बघु एकदा
.
.
.

हिन्दि काय ईग्रजि आमाला दोन्हिहि समझत नाय

सुहास..'s picture

25 May 2011 - 12:02 am | सुहास..

सब खेत मे ढोर पांग्या ! >>>
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

च्या या जग्या च्या तं !!

माझ्या मते कथा, संगीत आणि तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपट हिंदीच्या/तोडीचेच आहेत. आता फक्त मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन जमलं पाहिजे..
उदा. बालगंधर्व बरोबरच आणखी एक दोन चांगले चित्रपट रिलिज झाले.. थोड्या थोड्या अंतराने झाले असते तर सगळे चांगले चालले असते असं वाटतं.

तुम्ही गजर आणि तार्‍यांचे बेट म्हणत आहात का

मराठीतील सर्वात भव्य समजल्या जाणार्या बालगंधर्व चित्रपटाच्या फक्त 150 प्रिंट्स प्रदर्शित झाल्या आहेत. मागे थ्री ईडियट्स च्या दहा हजार प्रिंट्स प्रदर्शित झाल्याचे स्मरते. सांगली / मिरज तसेच महाराष्ट्राच्या कित्येक भागात बालगंधर्व दोन आठवडे उशीरा प्रदर्शित झाला. कितीही कटू वाटले, तरी मराठी चित्रपटांना पुणे मुंबई व नाशीक वगळता इतर कोठेही (महाराष्ट्रातही) प्रेक्षकवर्ग नाही, हे सत्य आहे.

सविता's picture

26 May 2011 - 12:23 pm | सविता

मराठी ही प्रादेशिक भाषा आहे.... तुम्ही उठसूट हिन्दीशी का तुलना करता? तमीळ, तेलगु एक वेळ ठिक आहे...

हिन्दी चित्रपट पुर्ण देशात प्रदर्शित होणार.... त्याच्या बर्‍याच प्रती ठिक आहेत... मराठी फक्त महाराष्ट्रात होणार... कसा बरे तो तेवढ्याच प्रती काढणार?

मार्केटिंग वाईट आहे हे मान्य.. पण दाक्षिणात्य चित्रपटांसाठी, नायक-नायिकांसाठी जो आंधळा वेडेपणा तिकडे आहे... तो महाराष्ट्रात नाही ( आणि तेच बरे आहे) त्यामूळे तो चित्रपट चालून चालून किती चालेल, नफा किती होईल याला मर्यादा आहेत, त्यामुळे अर्थातच होणारा खर्च पण कुठेतरी मर्यादित होणार!

शेवटी फायदा व्हावा म्हणून कोणीतरी चित्रपट काढणार ना!

मराठी चित्रपटांना पुणे मुंबई व नाशीक वगळता इतर कोठेही (महाराष्ट्रातही) प्रेक्षकवर्ग नाही, हे सत्य आहे.
काहो तुमच्या महाराष्ट्रातील ही गावे वगळता इतर सर्वत्र लोक काय दुसरी भाषा बोलतात का?
कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा अहमदनगर औरंगाबाद येथे सर्वत्र मराठी चित्रपट उत्तम चालतात.
सांगली / मिरज तसेच महाराष्ट्राच्या कित्येक भागात बालगंधर्व दोन आठवडे उशीरा प्रदर्शित झाला.
हा दोष प्रेक्षकांचा ? चित्रपटाची हवा संपल्यानन्तर चित्रपट पोहोचवणे हे वाईट मार्केटिंगचे उत्तम लक्षण आहे.
मराठी चित्रपट एकवेळ उत्तम दर्जा दाखवतील पण त्याचे मार्केटिंग मात्र अजिबात करीत नाहीत. हे चित्रपटाम्चे दुर्दैव आहे.
रजनीकांत स्टाईल चित्रपट करायला मराठी कलाकार समर्थ आहेत पण तसे मार्केटिंग करायला हवे.

श्रीरंग's picture

27 May 2011 - 12:41 am | श्रीरंग

कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा अहमदनगर औरंगाबाद येथे सर्वत्र मराठी चित्रपट उत्तम चालतात.

विजुभाऊ, खरंच असं नाहिये हो. एका प्रथितयश मल्टिप्लेक्स श्रुंखलेचे मालक माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टी व चर्चेमधे जे समजले / समजते, ते इथे सांगितले, एवढेच.

काहो तुमच्या महाराष्ट्रातील ही गावे वगळता इतर सर्वत्र लोक काय दुसरी भाषा बोलतात का?
वास्तविक, याच गावांमध्ये इतर भाषिकांची संख्या वेगाने वाढते आहे. (मुळात, येथे कोणत्याही शहरांची तुलना करण्याचा अजिबात हेतू नव्हता. गैरसमज करून घेऊ नये)

बाकी, मराठी चित्रपटांच्या उत्तम दर्जाबद्दल व आशयघनतेबद्दल तिळमात्र शंका नाही. मार्केटिंगमध्ये मात्र अजून बरीच मजल मारणे बाकी आहे हे म्हणणे पटले.

आशु जोग's picture

27 May 2011 - 11:41 pm | आशु जोग

श्रीरंग आणि सविता यांच्याकडून चांगली माहीती मिळाली

वैभव राजम's picture

25 Jan 2012 - 8:58 pm | वैभव राजम

काही मराठी सिनेमे अपवादात्मक रित्या उत्तम आहेत , त्यात शंका नाहीच !!!
पण , काही कारनास्त्वे हे सिनेमे मागे पडतात .... त्यांचा मार्केटिंग व्यवस्थित होत नाही किंवा त्यांना योग्य तितका प्रेक्षक वर्ग मिळत नहीं वगैरे वगैरे ....
प्रेक्षक वर्गाच्या बाबतीत मराठी सिनेमांची हिन्दिशी तुलना सोडाच !!!
त्यांची तमिळ व तेलुगु या सिनेमांशी पण तुलना केली जाऊ शकत नाही !!!
तमिळ , तेलुगु या प्रादेशिक भाषा असल्या तरी त्यांचे सिनेमे हे फक्त त्यांच्या राज्यताच प्रदर्शित हॉट नाहीत , तर ते भारतातील इत्तर प्रमुख शहरात (मुंबई , दिल्ली , कलकत्ता ई. ) देखील प्रदर्शित केले जातात ,इतकाचा नव्हे तर या सिनेमांचं प्रदर्शन हिंदी प्रमाणेच भारता बाहेर ही केलं जातं .....
अणि , मराठी सिनेमांचं विदेशी किंवा भारतातील इतर प्रमुख शहरांत तर सोडा , आपुल्या महाराष्ट्रात देखील सर्वत्र ठिकाणी प्रदर्शन होत नहीं !!! एवढीच आशा करतो की , हे चित्र नजिकच्या भविष्यात बदललेलं दिसेल !!!!!

आशु जोग's picture

29 Jan 2012 - 11:13 am | आशु जोग

आपण सारे जण लेख वाचून प्रतिक्रिया देत आहात
हे पाहून बरे वाटले