बंगाल

chipatakhdumdum's picture
chipatakhdumdum in काथ्याकूट
14 May 2011 - 5:55 pm
गाभा: 

बंगाल निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. ममतादीदींचा इतिहास पाहीला, तर प्रशासनावर पकड ठेवण्याबद्द्ल त्या कधीच प्रसिध्द नाहीत. रेल्वे खात्याचा काय कारभार कसा चालला आहे, हे जगाला चांगलच माहीत आहे. विषेशतः ज्यांची कारकीर्द विरोधी बाकांवर बसण्यात जाते, ते दीर्घ काल, नव्हे, पूर्ण टर्म सुद्धा नीट शासन करू शकत नाहीत, अस भारतातल्या अनेक उदाहरणांवरून आजपर्यंत दिसून आलेल आहेत. आठवा, युतीचे महाराष्ट्रातील शासन. चांगला गोलंदाज कप्तान झाला, म्हणून तो लगेच चांगला फलंदाज होइल अस नव्हे. म्हस पाण्याबाहेर आली की नंतरच कळत की दुधाला कशी आहे. बंगाली लोकांना शुभेच्छा.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

14 May 2011 - 8:05 pm | वेताळ

फॅमिली पॅक आणुन एकटेच प्या.

वेताळ's picture

14 May 2011 - 8:06 pm | वेताळ

फॅमिली पॅक आणुन एकटेच प्या.

तिमा's picture

15 May 2011 - 10:37 am | तिमा

प्रिय नेत्या ममतादिदी यांची तुलना दुभत्या म्हशीबरोबर केल्याबद्दल तीव्र निषेध!

रमताराम's picture

16 May 2011 - 11:57 am | रमताराम

एकुण बंगालचा प्रवास आगीतून फुफाट्यात असाच असणार आहे. बंगाली लोकांचे दुर्दैव हे की त्यांना हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत.

sagarparadkar's picture

16 May 2011 - 4:09 pm | sagarparadkar

ममतादीदी राज्याच्या प्रशासनातील जुनाट डावी आणि गेली ३४ वर्षं फोफावलेली आडमुठी मार्क्सिस्ट प्रवृत्ती निर्दाळून काढू शकतील, तरच काही चांगलं काम बंगालमधे होऊ शकेल.

अन्यथा, पुढील निवडणुकीत त्यांच्या प्रशासनिक अपयशाचे डांगोरे पिटून परत डावी, पोथीनिष्ठ आणि विकासद्वेष्टी विचारसरणी सत्तेवर येणार हे नक्की ...

नितिन थत्ते's picture

16 May 2011 - 8:42 pm | नितिन थत्ते

>>विकासद्वेष्टी विचारसरणी सत्तेवर येणार हे नक्की

कायतरी गल्लत होते आहे का?

बंगालच्या जनतेने विकासद्वेष्टी (सध्याच्या पॅराडाईमनुसार) विचारसरणीच अंगिकारलेली आहे. इंडस्ट्रीला पायघड्या घालू पाहणार्‍यांना त्यांनी पराभूत केले आहे आणि इंडस्ट्रीला हाकलून देणार्‍या नेतृत्वाला स्वीकारले आहे.

sagarparadkar's picture

17 May 2011 - 11:53 am | sagarparadkar

मी लिंक वरील बातमी वाचली नाहिये अजून, पण पूर्वीच्या बातम्या आणि त्या-त्या वेळचे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील अग्रलेख वाचून तरी असं वाटतंय की हे बंगालमधील डावे राज्यकर्ते अचानक झोपेतून दचकून जागे झाले आणि एकदम 'सेझ' च्या चीनी मॉडेलवरच विकासाचा आग्रह धरून सरधोपटपणे तेच धोरण राबवायला लागले, जे बहुतेक तेथील जनतेला मान्य नसावं. त्यात नंदीग्राममधील हिंसाचाराची भर पडल्यामुळे जनमत एकदमच विरुद्ध गेले असणार, नाहीतर ३४ वर्षं राज्य करायची संधी दिली असतानासुद्धा पुरेसा विकास करता न आल्यामुळेच तर आता पराभूत झाले ना?