इडली सांबार

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
16 May 2008 - 12:08 pm

" अरे वा,म्हणजे तुम्ही इडल्याही करता.." पुलंची 'रविवारची (एव्हरग्रीन)कहाणी 'पाहत होते.त्यातली इडलीची रेसिपी ऐकून मला इडल्या करायची हुक्की आली..

इडली : साहित्य- १ वाटी उडीद डाळ, २.५ वाट्या उकडा तांदूळ(जर्मनीत पार बॉइल्ड राईस म्हणून एक प्रकारचा तांदूळ मिळतो तो उकड्या तांदूळासारखाच असतो बराचसा..)मीठ,तेल,हवे असल्यास १ चमचा मेथी दाणे
कृती-उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला,७/८ तास.मेथी दाणे उडदाच्या डाळीत टाका. नंतर ते वेगवेगळेच बारीक वाटा आणि मग एकत्र करा.(तुमच्याकडे मिक्सर आहे ना,मग प्रश्नच मिटला,:))नंतर त्यात मीठ घाला(बेताचं हं,शेतातलं नाही,शेतात मीठ पिकत का कधी?)उबदार जागी ७,८ तास ठेवा.(उद्य्या पीठ फुगून येईल)
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा,इडली स्टँडला तेलाचा हात लावा व त्यात पीठ घाला.साधारण १५ मिनिटे एका घाण्याला लागतात.

सांबार : साहित्य-२ वाट्या तूर डाळ,२ ते ३ चमचे सांबार मसाला(मला एमटीआर सांबार पावडर आवडते),१ चमचा तिखट,१ लाल सुकी मिरची,१ मध्यम कांदा,१ लहान टोमॅटो,मुळा व दुधी भोपळयाच्या फोडी वाटीभर ,२ शेवग्याच्या शेंगा, हवा असल्यास १ लहान बटाटा, मीठ चवीनुसार,फोडणीचे सामान,कोथिंबिर सजावटीसाठी.१/२ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ,थोडा गूळ(ऑप्शनल)
कृती- डाळ शिजवून घ्या.डाळीबरोबरच शेंगाही शिजवा. तेलावर खमंग फोडणी करून घ्या,त्यात लाल मिरची ,कांदा घालून परता,सांबार मसाला व तिखट घालून परता. कांदा जरा गुलाबी झाला की इतर भाज्या घालून परता.शेंगा घाला. झाकण ठेवून एक वाफ आणा.चिंचेचा कोळ व डाळ घाला,पाणी घालून हवे तसे पातळ करा.उकळी आली की मीठ व हवा असल्यास गूळ घाला. खळखळून उकळू द्या. कोथिंबिर घालून सजवा.
गरम गरम इडली सांबार पुलंची रविवारची कहाणी पाहत खा,:)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 12:12 pm | विसोबा खेचर

वा स्वाती!

झक्कास व सर्वांना आवडणारी पाकृ! फोटूही झकास...

अवांतर - आम्ही एकदा इडलीचं व्यक्तिचित्र रंगवायचा यत्न केला होता, इच्छुकांना ते इथे वाचता येईल..! :)

तात्या.

मनस्वी's picture

16 May 2008 - 12:17 pm | मनस्वी

स्वातीताई.. छान सोप्पी आहे रेसिपी. सांबारला रंगही मस्त आलाय.
मी रेडिमेड पीठ आणायचे.. आता तुझ्या पद्धतीने करून बघीन :)
माझी आवडती डिश आहे. रविवारी ब्रेकफास्टचा बेत पक्का झाला.
मला हिरवी हिरवी तिखट तिखट चटणी जास्त आवडते.

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 12:21 pm | विसोबा खेचर

रविवारी ब्रेकफास्टचा बेत पक्का झाला.

वा, आम्ही काही मिपाकरांनीही यावं का? :)

तात्या.

मनस्वी's picture

16 May 2008 - 12:24 pm | मनस्वी

मी पुणेकर असले तरी.. माझ्याकडे येण्यासाठी निमंत्रणाची वाट अजिबात बघू नये.
:)

सहज's picture

16 May 2008 - 12:21 pm | सहज

दोन आठवड्यातुन एकदा तरी होतेच.

एक सुचवणी - हे पीठ जास्त भिजवायचे [फ्रीज मधे टिकते काही दिवस] मग पुढचे ३-४ दिवस भुकेच्या वेळेला पटकन डोसा किंवा उत्तप्पा टाकता येतो.

इडली सांबार एक एव्हरग्रीन डिश आहे!!

मनस्वी's picture

16 May 2008 - 12:41 pm | मनस्वी

उत्तप्प्यासाठी १ आयडिया..
आपण वरून टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकतो. त्याबरोबर ढोबळी मिरची बारीक चिरुन टाकली की छान लागते.

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 12:36 pm | स्वाती दिनेश

एव्हरग्रीन तर खरंच! सहजराव म्हणाले तसे डोसे,उत्तपे ही करता येतील.
आणखी एक- आवडत असल्यास एखाद दोन वांगीही सांबारात घालता येतील.
अवांतर-तात्या, मिसळीचं व्यक्तिचित्र कधी ?

स्वाती राजेश's picture

16 May 2008 - 7:14 pm | स्वाती राजेश

रेसिपी मस्त ...:)
फोटोही छान....
पण इथे थंड हवेच्याठिकाणी काही वेळेला पीठ आंबत नाही, अशावेळी ओव्हन प्रिहीट करावा. नंतर बंद करावा व त्यात पीठ भिजवलेले पातेले ठेवावे म्हणजे दुसर्‍यादिवशी पीठ चांगले आंबते..:)

चतुरंग's picture

16 May 2008 - 7:52 pm | चतुरंग

परवाच हाणल्या गरमागरम इडल्या वाफाळते सांबार आणि झणझणीत चटणीसोबत! ;)

हवा थंड असेल तर ओवन प्रीहीट करण्यासोबतच अर्धा कांदा इडलीच्या पिठात बुडवून ठेवावा मस्त फुगून येते पीठ!

चतुरंग

यशोधरा's picture

16 May 2008 - 7:57 pm | यशोधरा

पण मग कांद्याचा वास नाही का लागत पिठाला??
स्वाती ताई, मी जर्मनीचं ति़कीट काढते आता, आणि मुक्कामाला तुमच्याकडे!! :)

चतुरंग's picture

16 May 2008 - 8:06 pm | चतुरंग

कांद्यातल्या विशिष्ठ वायूची पिठातल्या पाण्याबरोबर रिऍक्शन झाली की अत्यंत सौम्य असे सल्फ्यूरिक आम्ल निर्माण होते आणि पीठ लवकर आंबते आणि पिठाच्या मूळ वासाव्यतिरिक्त कुठलाच वास शिल्लक रहात नाही!

चतुरंग

फोटो बघुन ह्या वाक्याची अनावर आठवण झाली :))
ह.घ्या!!
इडली सांबारची कृती दिल्या बद्दल धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 9:34 pm | स्वाती दिनेश

"इडली शेपरेट लाना सांबारमे बुडाके मत ले आना" :)
लेकिन हमको इडली सांबारमे बुडाकेच आवडती है..:)
मला वाटत होतंच की अजून असे कोणी बोलले कसे नाही..:)

वरदा's picture

16 May 2008 - 9:55 pm | वरदा

माझा मिक्सर मी आधी वर्णन केल्याप्रमाणे खूप छान नाहीये..उकडा तांदूळ थोडा जाडसर रहातो मग इडलीचा रवा वापरते मी...फक्त प्रॉब्लेम हा त्याचे दुसर्‍या दिवशी डोसे नाहि करता येत्...पण इडली एकदम हलकी होते...
स्वाती आणि चतुरंग ह्यांच्या टिप्स बरोबरच पीठ भिजवतानाच मीठ घालून पहा. त्यानेही पीठ फुगुन येते पटकन...

वरदा's picture

16 May 2008 - 9:56 pm | वरदा

तु दिलेल्या फोटोतली चटणी कोथंबीरीची वाटत नाही कुठली आहे आणि कशी केलीस तेही सांग मला...

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 10:12 pm | स्वाती दिनेश

अग, ती चटणी पुडी आहे डाळ्याची,दह्यात कालवलेली,मला ती इडलीबरोबर खूप आवडते..रेसिपी विचारू नकोस,मला येत नाही, :) मी भारतातून परत येताना माझ्या काकूकडून मी ती चटणी घेतेच घेते,:) काकू ती चटणी सहीच करते,ह्या वेळी तिला रेसिपी विचारेन,:)
मीठ- पीठ भिजवताना मी मीठ घालते,(लिहिलय की ग :))कारण मीठ फरमेंटिंग एजंट म्हणून चांगले काम करते.अवन प्रिहिट करते मी ही हिवाळ्यात किवा हीटर समोर पातेले ठेवते. कांद्याचे माहित नव्हते,चतुरंग धन्यवाद!
स्वाती

वरदा's picture

16 May 2008 - 11:03 pm | वरदा

वाचलं नाही गं...आता दिसलं....
माझ्या काकूकडून मी ती चटणी घेतेच घेते
मग काकूचा पत्ता दे मी गेले की घेऊन येते त्यांच्याचकडून..... ;)