मिपा चा सर्वर

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in काथ्याकूट
11 May 2011 - 1:14 pm
गाभा: 

सध्या मिपाचा सर्वर खुपच गंडला आहे. मिपा हळु चालतेय की गोगलगाय यावर सध्या जोरात चर्चा आणि अभ्यास चालु आहे. धागे टंकायला घेतले की ते प्रकाशित होतीलच याची काही खात्री नसते (हे "मै सुबह घर से निकलता हू तो शाम को घर पहुचांगा की नही मुझे मालूम नही होता" या धर्तीवर वाचावे). सकाळी मिपाचा पहिला धागा उघडताना किमान ४ वेळा रिफ्रेश करावे लागते.

मिपाबद्दल किंवा व्यवस्थापनाबद्दल मला अजिबात तक्रार नाही कारण विनामोबदला, पदरचे पैसे खर्च करुन, संकेतस्थळ उत्पन्नाचा स्त्रोत म्हणुन न वापरता, संकेतस्थळ चालवणे अवघडच नाही तर अशक्य आहे. अश्या परिस्थितीत याहुन चांगल्या सुविधा देता येतील असे वाटत नाही.

पण आहे त्या सुविधांमध्येही फार तगतग न करता , सगळ्यांनी सहकार्य केले तर सर्वरवरचा ताण थोडा कमी करता येइल असा निष्कर्ष काही तज्ञांशी केलेल्या थोड्या चर्चेअंती निघाला आहे. चूक की बरोबर मला माहित नाही. मिपावरच अनेक तज्ञ आहेत ते सांगु शकतील. काही सुचना अश्या:

१. थोड्या दिवसांपुर्वी इतर कुठल्यातरी संकेतस्थळावर वाचले होते की खरडींमुळे देखील सर्वर वर ताण येउ शकतो. खरडवही मिपाची शान आहे. कुठल्याही अ‍ॅक्टीव्ह सदस्याच्या किमान हजारभर खरडी होतील असे वाटते, उदा.: माझ्या स्वतःच्या खवमध्ये १०००+ खरडी आहेत, स्पावड्याच्या खवमध्ये २०००+ आहेत, पराच्या खरडींची संख्या साधारण १८ हजार आहे. धम्याच्या खरडी २५०००+ असतील. या सगळ्या खरडी उडवल्या, किमान १ जानेवारी २०११ च्या आधीच्या उडवल्या तरी सर्वरवरचा ताण कमी होणे शक्य आहे काय?

२. मिपावर " मदत पाहिजे " चे १०० एक धागे असतील. त्यातील सगळेच्या सगळे माझ्यामते तरी कालबाह्य आहेत. त्यात कुठलेही साहित्यिक मुल्य नाही. त्या धाग्यांची गरजही आता संपली असावी, त्यांचा कार्यभाग साधला गेला असावा. काही अजुनही उपयोगी ठरु शकतील मात्र त्यांची संख्या फारच कमी असावी. संपादकांनी स्वतःच्या अखत्यारीत योग्य तो निर्णय घेउन असे धागे उडवले तरी हरकत नसावी.

३. पाकृंची संख्या सध्या उंदरांच्या प्रजननापेक्षा जास्त वेगाने वाढते आहे. कोणी काय प्रकाशित करावे हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. तसा तो कोणाचाच नाही. मी लिहितो तेही काही खुप उच्च साहित्यिक मुल्यात मोडत नाही. पण बर्‍याच पाकृ अगम्य आहेत. त्या उडवता येतील.

४. बरेच कौल खोडसाळ असतात. ते चालु करण्यामागे लोकांचा काय हेतु असतो माहित नाही. पण असले कौल सर्वरचा ताण मात्र वाढवत असणार. उदा.: वायुपुत्राचे आगमन झाले आहे हा कौल? काय उपयोग आहे त्या कौलाचा. कोणीतरी त्या कौलावरच प्रतिक्रिया दिलेली आहे नवीन बाटलीतील जुनी दारु म्हणुन. ते चुकीचे आहे असे मलातरी मनापासून वाटत नाही. असल्यास त्या सदस्याची आगाऊ जाहीर माफी मागतो. परंतु तसे असले अथवा नसले जरी, तरी कौल तद्दन फुटकळ, फालतु, निरुपयोगी आणि अवाजवी आहे. असले अनेक कौल उडवता येतील.

इतर कोणाकडे काही उपाय असतील तर ते ही सांगावे. हे उपाय बरोबर आहेत की नाही आणि त्याचा काही उपयोग होइल की नाही हे ही सांगावे. नाहितर नीलकांत ने कितीही उपाय केले तरी मूळ समस्या तशीच राहिल.

प्रतिक्रिया

पप्पुपेजर's picture

11 May 2011 - 2:18 pm | पप्पुपेजर

मी काही मदत करू शकतो का ? खरडी उडवून फायदा होऊ शकेल कारण सर्वर वरचा स्कॅनिंग लोड कमी होईल.

स्पा's picture

11 May 2011 - 2:19 pm | स्पा

आभार मृत्युंजय ....
सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेस :)

सहमत..म्हणजे मिपा फार गंडत आहे याच्याशी. त्यामुळे नवा धागा टाकणे पुढे ढकलले आहे. दोन-तीन दिवस न गंडता चालेल त्या सुदिनी मी पुढे काही लिहायला आतुर आहे.

मी मिपावरच लेखन थेट टाईप करतो आणि त्यामुळे मिपा हाच माझा बेसिक एडिटर आहे. तो मला सर्वात सोयीचा आणि आवडता एडिटर आहे (सेव्ह करायची सोय नसली तरी)

बाकी
काही धागे / मजकूर/ खव एंट्रीज उडवून या एरर जातीलसे वाटत असेल तर जरुर असे काही करायला हरकत नसावी, कोणाचीच.

पण येणार्‍या एरर्स या सर्वरवर अधिक कंटेंट झाल्याने आहेत की कनेक्शन्सची संख्या वाढल्याने / लोक पुन्हापुन्हा रिफ्रेश करत असल्याने / बँडविड्थ रिलेटेड आहेत? आपल्याला कळणे शक्य नाही.

नुसता स्टेशनरी टेक्स्टचा फाईलसाईझ कमी करुन "लोड" कमी होईल का हा प्रश्न आहे.

मला वाटते नीलकांत यांना नेमका प्रॉब्लेम डायग्नोस झालाच असणार आणि नेमकी उपाययोजना ते करतच असणार. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ही उपयुक्त ठरेल..

स्वानन्द's picture

12 May 2011 - 12:25 am | स्वानन्द

>>नुसता स्टेशनरी टेक्स्टचा फाईलसाईझ कमी करुन "लोड" कमी होईल का हा प्रश्न आहे.

हेच म्हणतो. लोड वाढण्यामध्ये मिपावर वाढलेली ( हजर ) सभासद व पाहुण्यांची संख्या हे महत्वाचे कारण असावे असे वाटते.

जाऊ दे.. जास्त डोकं चालवण्यापेक्शा... ज्याने मिपा उपलब्ध करून दिले, जो त्याचा सांभाळ करतो आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून चालणे बरे!

(सरपंचास काळजी )

खव आणि काही धाग्यांच्या साफ सफाईने किती ताण कमी होईल सांगता येत नाही. पण जर साफ सफाई करायची आहे असठरवल तर सगळ्यात आधी ते कोपर्‍यातल डस्टर उचला आणि तो खरड फळा साफ करा. पार २००८-९ पासुनच्या रेघोट्या दिसत आहेत तिथे.

बाकी खव, व्यनी हे (जरी त्याच जाहिर वाचन होत असल तरी) प्रत्येक सभासदाच्या खाजगी गोष्टी आहेत. आणि त्या उडवण्याचा हक्क ही मिपाने प्रत्येकाला दिला आहेच. ज्यांनी त्यांनी आपल्या बुद्द्धीला पटेल त्या प्रमाणे ही स्वतःच्या घरातली सफाई स्वतःच करावी.

काथ्याकुट्,कविता, जनातलं मनातलं,कौल थोडक्यात काय तर पाककृती सकट सगळ्याच विभागात असे असंख्य धागे दाखवुन देउ ज्यात पांचटपणा झालेला आहे. खरतर पाकृ विभाग सोडला तर सपक लिखाण इतरत्रच जास्त आढळुन येईल. अस असं असताना निव्वळ आमच्या लाडक्या पाकृ विभागाचं नाव घेउन आमच्या भावनांना दुखावल्या बद्दल मृत्युंजयाचा जाहिर निषेध!!!. :)

बाकी हेच निलकांताला व्यनीतुन सांगता आलं असतं, अस राहुन राहुन वाटत.

मृत्युन्जय's picture

11 May 2011 - 4:19 pm | मृत्युन्जय

मालक जाहीर माफी मागतो. आक्षेप पाकृ विभागाला नाही हो आणि तुमच्या पाकृला तर नाहीच नाही :).

मदतीचे धागे तर सोल्लिड असतात. डोक्याला शॉट लागतो. नीलकांतला व्यनि केला असता तर हा त्रास जाहीरपणे कसा व्यक्त करणार आणि शिवाय इतरही कोणाच्या काही सुचना असतील तर त्याही कळतील असा एक विचार होता.

माझ्या खरडी मी उडवायचा प्रयत्न केला. पण एक एक खरडी उडवणे अवघड जाते. मलाच एवढे अवघड जाते तर खरडसम्राटांची काय वाट लागेल. त्यामुळे व्य्वस्थापनाने काही केले तर बरे होइल असे वाटले.

बादवे माझा आक्षेप खरडींनाही नाही. धाग्यत पराचा आणि धम्याचा उल्लेख आहे तो केवळ रेफरन्स म्हणुन. खुप जुन्या खरडींचा फारसा उपयोग होत नाही म्हणुन ती सुचना होती आणि खरडवही हा वैयक्तिक मामला असल्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यानेच हे होउ शकेल असे म्हटले.

असो धाग्यामुळे अनाहूतपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेलेल्या असल्यास क्षमस्व

अरे मित्रा तो गमती गमतीतला निषेध होता. मुऑफी वैग्रे काही नको :)
दिल पे मत ले यार.
बाकी व्यानी केला आहेच. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 May 2011 - 5:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युंजय, मला वाटते की उपाय करण्याआधी मुळात मिपा गेले काही दिवस हळू का चालते आहे याचा नीट तपास आधी करायला हवा, मालक तो करत असतीलच. विदागारात विदा जास्त झाल्यामुळे, हे एक कारण असू शकते. पण इतरही अनेक असू शकतात. जसे की मिपा वरचा लोड वाढणे वगैरे वगैरे. सर्वर लॉग्ज वाचून नेमके कारण कळण्यास मदत होऊ शकते.

पण वाढता विदा हे कारण असेल असे गृहीत धरले तर तुम्ही म्हणता ते उपाय योजता येतील. पण कुणाला कुठला धागा अनावश्यक वाटावा हे खूपच व्यक्तीसापेक्ष आहे. तरीही तुमच्या बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे.

स्मिता.'s picture

11 May 2011 - 5:30 pm | स्मिता.

सध्या मिपा फारच गंडलेलं आहे. प्रॉब्लेम नक्की कश्यामुळे होतो ते माहिती नाही.
पण जर डेटा लोड मुळे हे होत असल्यास जुन्या खरडी, जुने कौल आणि मदत हवी धागे, शंभरी केलेले पण काहिच अर्थ नसलेले 'सगळ्याच विभागातले' थिल्लर धागे आणि खरडफळा साफ केला तर बराच लोड कमी होईल.

अर्थात सगळ्या धाग्यांमधून निरर्थक धागे शोधून उडवणे वाटते तितके सोपे नसावे. त्यासाठी काहितरी निकष लावले जावेत.

सुहास..'s picture

11 May 2011 - 5:38 pm | सुहास..

खरतर पाकृ विभाग सोडला तर सपक लिखाण इतरत्रच जास्त आढळुन येईल. अस असं असताना निव्वळ आमच्या लाडक्या पाकृ विभागाचं नाव घेउन आमच्या भावनांना दुखावल्या बद्दल मृत्युंजयाचा जाहिर निषेध!!!. >>>

शे फ ग ण पा शी स ह म त !!
मृत्युंजयाचा(खालच्या आवाजात ) जाहिर निषेध
डेमीशेफ
वाश्या

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2011 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

मी काय म्हणतो, काही लोकांनी डायरी लिहायला सुरुवात केली तरी मिपाचे आणि मिपाकरांचे बरेचशे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

गेले वर्षभर लॉग-इन न केलेली खाती देखील उडवुन टाकायला हरकत नसावी.

मी काय म्हणतो, काही लोकांनी डायरी लिहायला सुरुवात केली तरी मिपाचे आणि मिपाकरांचे बरेचशे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

और ये लगा बी एस एन एल छक्का !!!!!

रमताराम's picture

11 May 2011 - 8:21 pm | रमताराम

:D. काय रे, अलिकडे एखाद्या डायरी प्रकाशकाची एजन्सी घेतलीयेस की काय रे भाऊ (ह. घे रे बाबा.)

विकास's picture

11 May 2011 - 8:35 pm | विकास

काही लोकांनी डायरी लिहायला सुरुवात केली तरी मिपाचे आणि मिपाकरांचे बरेचशे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

मिपा - मिपाकरांचे माहीत नाही पण, सर्वरवरचाच नाही तर संपादकांवरचा ताण पण नक्कीच कमी होईल. ;) पण मग प्रतिसाद कसे देयचे किंवा इतरांकडून अपेक्षा करायची?

त्या ऐवजी असे केले तर?: धर्म, राजकारण, राजकारणातला धर्म, धर्मातले राजकारण, अर्थ कारण, गांधीजी, सर्व क्रांतीकारक, सोनीयाजी, काँग्रेस, भाजपा, संघ, कम्युनिस्ट, नक्षलवादी, चित्रपट, नाटके, आणि एकमेकांशी खोडसाळपणा करणारे धागे, या सर्वांवर बंदी घातली तर? ;)

विकासजी लिस्टमधुन 'नाडी' सुटली काय ? ;)

विकास's picture

11 May 2011 - 9:05 pm | विकास

विकासजी लिस्टमधुन 'नाडी' सुटली काय ?

खरचं की! :-)

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2011 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

..

चिंतामणी's picture

11 May 2011 - 7:31 pm | चिंतामणी

परन्तु "पाकृंची संख्या सध्या उंदरांच्या प्रजननापेक्षा जास्त वेगाने वाढते आहे." असे वाक्य लिहून या चांगल्या धाग्याचे स्वतः Devaluation केले असे मला वाटते.

टारझन's picture

11 May 2011 - 8:01 pm | टारझन

पाकृच नव्हे तर इतर प्रकारांतही ढेकणांच्या प्रजननापेक्षा जास्त वेगाने धागे पडत आहेत , असे वाक्य हवे होते.

बाकी तांत्रीक , प्रशासकिय बाबतीत बोलण्याचा आपला अधिकार नाही.

- चिंतातुरमणी

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 7:59 pm | विसोबा खेचर

माझ्या अंदाजाप्रमाणे व्यक्तिगत खरडवह्या आणि सार्वजनिक खरडफळ्यामुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण येत असावा.

तात्या.

आत्मशून्य's picture

11 May 2011 - 10:09 pm | आत्मशून्य

व एक एक मोड्यूल डीसेबल करत मीपा टेस्ट व ओप्टीमाइझ करत रहा. नवीन अ‍ॅड केलेले फीचर तर त्रास दायक ठरत नाहीत ना यापासून सूरूवात करावी.

सोम्यागोम्या's picture

11 May 2011 - 10:28 pm | सोम्यागोम्या

हा धागा उघडण्यास ४७ सेकंद लागले. आधी नेमकी समस्या काय आहे. ती अ‍ॅडमिन ना सापडली आहे का? त्यानुसार उपाय सुचवता येतील.
तूर्तास एचटीटीपॉ वॉच व एम एस चे आय ई डेव्हेलपर टूलबार हे टूल्स समस्या शोधण्यास उपयुक्त ठरू शकतात.

मराठमोळा's picture

12 May 2011 - 12:36 am | मराठमोळा

वरील बर्‍याच जणांशी सहमत आहे.

(मीदेखील काही फार उच्च लिहितो अशातला भाग नाही तरीही लिहिण्याचं टाळलं होतं, पाणचट धाग्यांची संख्या वाढली आहे हे वैयक्तीक मत) मिपा उघडेनाच म्हणून त्रास होऊ लागला तेव्हा काही दिवस स्वतःहुन लोड कमी करावा म्हणून साईटला हिट नाही केले, खरडी जास्त करत नाही, कारण बरेचशे मिपाकर माझ्या जीमेलवर आहेत.

हे सगळे त्रास कमी करण्यास माझ्यासरख्या सामान्य माणसाची कोणतीही मदत हवी असल्यास करण्यास उत्सुक. :)

नरेशकुमार's picture

12 May 2011 - 6:15 am | नरेशकुमार

हे सगळे त्रास कमी करण्यास माझ्यासरख्या सामान्य माणसाची कोणतीही मदत हवी असल्यास करण्यास उत्सुक.
मिपा फास्ट झालं पाहिजे.

चिरोटा's picture

12 May 2011 - 2:45 pm | चिरोटा

खरडवह्यांतले प्रतिसाद उडवणे,'फालतु' लेख उडवणे हे उपाय होवू शकत नाहीत. समजा उद्या खरोखरच चांगल्या लेखांची संख्या वाढली,चांगल्या कौलांची संख्या वाढली तर?
वर म्हंटल्याप्रमाणे प्रॉब्लेम नक्की कशामुळे होतोय ते कळल्यावर उपाय सांगता येईल.मोठ्या प्रमाणावर येणारा डेटा हा प्रश्न अनेकांना भेडसावतो.

स्मिता.'s picture

12 May 2011 - 6:23 pm | स्मिता.

जरी प्रथमदर्शनी वाटत असलं की खूप जास्त डेटा आहे म्हणून मिपा हळू झाले आहे तरी तो सर्व डेटा एका वेळी समोर आणला जात नाही. कोणतेही पान उघडले तरी त्यावर लागणारा मोजकाच डेटा रिट्रिव्ह होतो. आधी म्हणजे मिपा व्ह्यवस्थित होते तेव्हा जेवढा डेटा समोर येत होता तेवढाच आताही येत आहे.

नक्की कारण काय माहिती नाही, पण खूप जास्त डेटामधून मोजकाच डेटा क्वेरी टाकून काढला जात असेल आणि त्या डेटाबेसला इंडेक्सिंग नसेल तर थोड्याश्या डेटा रिट्रिव्हल करताही बराच वेळ लागतो. त्यामुळे एक उपाय म्ह्णून डेटाबेसला इंडेक्सिंग नसल्यास करून घ्यायला हरकत नाही. तसेच क्वेरी रिफाईन करता येईल.

मिपा खुपच स्लो आहे..
त्यामुळे आजकाल जास्त धागे ओपनच करत नाही.. कारण ते वेळ घेतात
प्रतिक्रिया देणे ही बंदच करतोय ..
मिपा व्यवस्थीत होइ पर्यंत नो प्रतिसाद. हा शेवटचाच

कृपया लवकर साईट निट व्हावी ही इच्छा ...

प्रत्येक पेजला पुन्हा पुन्हा रिफ्रेश करत राहून निरनिराळ्या एरर्स पाहून शेवटी बराच कंटाळा येतो आणि रसही जातो.
पुन्हा लिहिलेली कॉमेंट पूर्वदृश्य आणि फायनल साठवणीच्या डबल स्टेपमधून जिवंत राहून पोस्टवर प्रकटेलच असे नाही. किंवा रिफ्रेश करुन करुन पाच वेळा डुप्लिकेट होईल.

त्यामुळे सध्या मर्यादा घातलेली बरी.

मिपा ठीक झाल्यावरच आता टंकन...

आनंदयात्री's picture

12 May 2011 - 7:34 pm | आनंदयात्री

ओक्के.

विनायक प्रभू's picture

14 May 2011 - 2:37 pm | विनायक प्रभू

आता सर्वरच काम करत नाय तर काय करणार?
लॉग इन होतच नाय?
किती ही वेळा रिफ्रेश करा पण कायच फरक पडत नाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2011 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर जरा चक्कर टाकून येऊ म्हटल तर 'फटाल येरर' ने स्वागत केले आणि लॉगीन व्हायला दहा मिनिटे लागली. मिपाच्या तांत्रिक विभागात काम करणार्‍या मित्रांनी वेळ मिळेल तेव्हा जरा या सर्वरच्या भानगडीत लक्ष घातलं पाहिजे असे वाटते.

अवांतर, विषयांतर प्रतिसादामुळे मिपावर लोड येत असेल तर मला कळवा. जरा वेळ मिळाला की, मी स्वच्छता मोहीम हाती घेईन. :)

आमचं ज्या फटाल येररच्या फुलांनी स्वागत केले ती फुले माहितीस्तव डकवत आहे. :)

Fatal error: Out of memory (allocated 8912896) (tried to allocate 19456 bytes) in /home/misalpav/public_html/sites/all/modules/modules/flag/flag.inc on line 401

असो, येतो.

-दिलीप बिरुटे