साहित्यः
चिकन (Boneless) - २ Chicken breasts
कांदा - १ बारीक चिरुन
टोमॅटो - ४ बारिक चिरुन
काजु १ तास पाण्यात भिजवुन - १०-१२
दही - ४ चमचे
आले-लसुण पेस्ट - ३ चमचे
तिखट -४ चमचे
हळद - २ चमचे
गरम मसाला - २ चमचे
चिकन तंदुरी मसाला - १ चमचा
काळी मिरी पावडर - २ चमचे
मोठी काळी वेलची - १
हिरवी वेलची - १
दालचिनी - १ छोटा तुकडा
तेजपान - २
काळी मिरी - ४-५
लवंग - ४-५
जिरे - १ चमचा
कसुरी मेथी - १ चमचा
Fresh cream - ४ चमचे
मध - २ चमचे
बटर - ३ चमचे
तेल - २ चमचे
मिठ चवीनुसार
कृती:
१. चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
२. चिकनला दही, १ चमचा आले-लसुण पेस्ट, तिखट २ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा काळी मिरी पावडर, तंदुरी चिकन मसाला व चवीप्रमाणे मिठ घालुन १-२ तास marinate करावे.
३. चिकन १-२ तास मुरल्यावर ते Oven मधे भाजुन घ्यावेत.
४. दुसर्या कढई मधे तेल व बटर गरम करावे. त्यात सर्व आख्खा गरम मसाला टाकावा.
५. मसाला परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
६. ते परतल्यावर त्या मधे आले-लसुण पेस्ट टा़कुन परतावे.
७. हे झाल्यावर त्या मधे हळद, तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर टाकुन निट मिक्स करावे.
८. मसाल्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व भिजवलेले काजु टाकुन मिक्स करावे.
९. त्यात चवीप्रमाणे मिठ व कसुरी मेथीची पुड करुन टाकावी व गॅस बंद करावा.
१०. आता ह्या तयार केलेल्या मसाल्याची मिक्सर मधे एकदम fine puree करुन घ्यावी.
११. ही puree गाळणी मधुन गाळावी.
१२. कढई मधे बटर गरम करावे. त्यात गाळलेली puree टाकावी.
१३. त्याला थोडी उकळी आल्यावर त्यामधे चिकनचे तयार केलेले तुकडे टाकावेत व झाकन ठेवुन १-२ मिनिट उकळी येउ द्यावी.
१४. सर्वात शेवटी त्यात क्रिम व मध टाकावे.
१५. तयार झालेले बटर चिकन प्लेट मधे काढुन, वरतुन क्रिम टाकुन गरम serve करावे.
टिपः
१. आवडत असल्यास चिकनचे तुकडे with bone घेउ शकता.
२. मसाला मिक्सर मधे बारीक करण्या आधी त्यातुन काळी वेलची काढुन टाकावी.
३. ह्या डिशला मधामुळे एक वेगळीच चव येते.
४. आवडत असल्यास तुम्ही ह्यात लाल रंग वापरु शकता.
५. शाकाहारी लोक चिकन एवजी पनीर वापरु शकतात.
प्रतिक्रिया
11 May 2011 - 3:49 am | सानिकास्वप्निल
खुप छान आहे पा़कृ...मध घातल्यामुळे त्याची गोडसर चव छानच येईल :)
11 May 2011 - 4:07 am | Mrunalini
हो अगं, खुप छान लागते मध घालुन. नक्की try कर.
तु आत्ता टाकलेल्या cocktail / mocktail ची ;) पाकृ टाक ना...
11 May 2011 - 2:25 pm | सानिकास्वप्निल
हो नक्की ट्राय करून बघते :)
cocktail / mocktail ची पाकृ नंतर टाकेन
11 May 2011 - 8:26 am | प्राजु
खपले!!
11 May 2011 - 9:44 am | विसोबा खेचर
लै भारी..!
11 May 2011 - 10:41 am | नगरीनिरंजन
खल्लास!
11 May 2011 - 11:11 am | मालोजीराव
आहाहाहाहा..हे जरा वेगळा काहीतरी आहे, तेच तेच रेसिपी चं चिकन खाऊन कंटाळा आलेला.....नक्की करून बघणार या विकान्ताला....मंडळ आभारी आहे.
11 May 2011 - 11:18 am | नरेशकुमार
हिच पाक्रु भोपळा घालुन करता येइल काय ?
पाकिस्तान मध्ये भोपळा मिळतो काय ?
11 May 2011 - 12:43 pm | Mrunalini
नाहि हो, मला नाही वाटत ही पाकृ भोपळा घालुन चांगली लागेल.
आणि पाकिस्तानचे विचाराल तर, ते पण मला महित नाही. तुम्ही तिथे राहता का???
11 May 2011 - 1:14 pm | इरसाल
ट्याना हंडे घाळून खषे भानवायचे अशे व्हीचारायचे अशावे.
11 May 2011 - 11:28 am | स्वाती दिनेश
छान पाकृ आणि फोटो.
हे आमचे बटर चिकन..
स्वाती
12 May 2011 - 1:41 am | इंटरनेटस्नेही
बटर चिकन + बीअर.. स्वर्ग जर कुठे असेल तर तो इथे आहे!
12 May 2011 - 2:09 am | Mrunalini
आम्ही फक्त बटर चिकन मधेच स्वर्ग गाठतो.. ;)
12 May 2011 - 4:49 pm | प्यारे१
>>>>आम्ही फक्त बटर चिकन मधेच स्वर्ग गाठतो..
बटर चिकन खाऊन 'गाठाव्या लागणार्या जागेला' स्वर्ग म्हणतात काय???????
नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. ;)
12 May 2011 - 5:10 pm | प्यारे१
प्र का टा आ.
12 May 2011 - 5:22 am | स्वाती२
मस्तच! माझ्या लेकाला फार आवडते त्यामुळे नक्की करणार.
12 May 2011 - 7:35 am | ajay wankhede
क्यालोरिज किती सांगाल काय?
कारण आम्हि पण खाण्यासाठिच जगतो.
12 May 2011 - 9:49 am | Mrunalini
कॅलरीज किती असतील ते सांगता येणार नाही मला, पण नक्कीच जास्त असणार, कारण त्यात काजु आणि क्रिम वापरले आहे.
13 May 2011 - 8:41 pm | शोनू
किती वेळ अन टेम्परेचर काय ठेवावे ?
13 May 2011 - 8:53 pm | Mrunalini
Oven पहिले २५० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा. त्यानंतर त्याच temp. ला चिकन १५-२० मिनिटे भाजुन घ्यावे. ते भाजताना त्याला दर ५ मिनिटांनी बटर लावत रहावे. त्यामुळे चिकन dry होत नाही.