http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201986.cms
रिझर्व बँकेने राज्य सहकारी बँकेचा ताबा घेऊन तडफदार युवा नेते अजितदादाजीराव पवार यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. केंद्र सरकारने हे केले आहे म्हणजे त्याचे कर्ते करविते कोण असणार हे सांगायला नको. जिनकी इजाझत के बिना परिंदा भी पर नही मारता अशा थोर लोकांच्या प्रेरणेनेच हे केले गेले आहे.
पण काका पुतण्याच्या प्रतिक्रियेत फरक आहे. पुतण्या संतापाने गुरगुरतो आहे तर काका सबुरीची भाषा करतो आहे.
काका मुत्सद्दीपणा म्हणून असे करत आहेत का पुतण्याला परस्पर चाप लागल्यामुळे सुखावले आहेत ते सांगणे अवघड आहे.
असा एक प्रवाद आहे की काकांना पुतण्या डोईजड होऊ लागला आहे आणि त्यांना आपल्या कन्येला पुढे आणायचे आहे.
कोटीच्या कोटी रकमा वाटायचे एक केंद्र हातातून गेल्यामुळे अजितरावजीदादासाहेब चवताळले असतील तर त्यात आश्चर्य नाही.
प्रतिक्रिया
9 May 2011 - 8:49 pm | नितिन थत्ते
मग तुमचं मत काय आहे? चांगलं झालंय की वाईट?
9 May 2011 - 9:05 pm | हुप्प्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखेच सत्तातुर असल्यामुळे खरोखर ह्यातून राजकीय भूकंप होतो का हे एक निव्वळ पेल्यातील वादळ ते काळच सांगेल.
पण दोन उन्मत्त पक्षांना ह्या निमित्ताने शत्रू बनवले गेले तर बरेच होईल.
9 May 2011 - 10:15 pm | नितिन थत्ते
अर्थव्यवहारात शिस्त आणण्याच्या दृष्टीने चांगले की वाईट असे विचारले होते.
आपणास देखील या कृतीचा निव्वळ राजकीय भूमिकेतून विचार करताना पाहून "राजकारणी केवळ राजकीय विचार करतात" म्हणून त्यांना तरी दोष का द्यावा असा प्रश्न निर्माण झाला.
9 May 2011 - 10:59 pm | हुप्प्या
ही एक राजकीय खेळीच आहे. ह्यात अर्थव्यवहारात शिस्त यावी वगैरे कुठलाही उद्देश नाही. तसे मानणे माझ्या मते भोळसटपणाचे आहे.
ज्या पक्षाचे हात अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत (म्हणजे काँग्रेस) त्यांना अचानक अर्थव्यवहारात क्रांतिकारक सुधारणा कराव्यात आणि घडी पूर्ववत करावी असे वाटेल असे मला जराही वाटत नाही. युवानेते अजितरावजीदादा काँग्रेसमधे असते तर कदाचित हे सगळे झालेही नसते.
तेव्हा ह्या राजकीय उलथापालथीमुळे होणारे राजकीय परिणाम ह्यावरच माझे मत केंद्रित आहे.
9 May 2011 - 8:57 pm | वाटाड्या...
'वेळप्रसंगी आता टोकाची भूमिका घेण्यास मागेपुढे बघणार नाही' असं म्हणताहेत मग आता ब्रिगेडला सांगणार का गाडी भरुन घेऊन जा आणि हाणामार्या करा...आणि आपल्या 'टगे'गिरीला जागा...
- वा'टग्या
11 May 2011 - 1:32 pm | भारी समर्थ
हे तर नुसतेच बोललेत, पण तिकडे दुसरे काका-पुतणे 'बचपनसे' हाणामार्यात पटाईत आहेत त्यांना गोंजारा किंवा 'ते तसलंचै' म्हणून स्विकारा...
भारी समर्थ
9 May 2011 - 9:44 pm | तिमा
जो 'सहकारी बँकेत पैसे ठेवतो तो एक महामूर्ख' हे मी स्वानुभवावरुन लिहू शकतो. तिथून पैशाचा फक्त बाहेरच्या दिशेनेच' वन वे' असतो.
9 May 2011 - 10:49 pm | विजुभाऊ
झालेली गोष्ट एक चांगली घटना म्हणून पुढे यावी.
आमदार राजू शेट्टी म्हणतात की कमी किमतीला जप्त केलेल्या मालमत्ता विकणे , ज्यानी कर्जे बुडविली त्यानीच त्या मालमत्ता घेण्यास पुढे येणे अशा प्रकारे हा जनतेच्या भागधारकांच्या पैशावर मारलेला डल्ला आहे.
ज्यानी बुडीत कर्जांच्या मालमत्ता विकत घेतल्या त्यांची नावे समोर यावीत. आणि तेच लोक जर त्यावेळेस संचालक पदंवर असतील तर तो संगनमताने केलेला डाव आहे. ह्या विरुद्ध सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे.
अर्थात काँग्रेस पक्ष हीए घटना हे राष्त्रवादीला नामोहरम करण्याचे एक हत्यार म्हणून वापरणार आहे त्यामुळे असे गुन्हे दाखल होणे अवघड आहे.
11 May 2011 - 12:42 pm | भारी समर्थ
अहो सरकारने जरी गुन्हे दाखल नाही केले, तरी राजू शेट्टींसारखे 'प्रामाणिक' नेते का नाही या पवारांवर गुन्हे दाखल करत? त्यांना रोखलंय का राव कुणी? कॅमेर्यासमोर नुसती तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा असं केलं तर ज्या शेतकर्यांनी त्यांना वर्गणी गोळा करून उभं केलंय, त्याच्याशी प्रतारणा तरी होणार नाही. शेवटी तेही पडले राजकारणीच की हो. पवारांवर झालेले आणि आजकाल होणारे आरोप नुसतेच चॅनेल्सवर 'चर्चासत्र' घडवून आणण्यात उपयोगी पडत आहेत.
तिथे अर्धा-एक तासाच्या कार्यक्रमात कसं कळणार की कोण बरोबर आणि कोण चुकीचं ते... पण त्यातून एक मात्र होइल की, 'दाढीवाल्या मामां'सारखे काही आक्रस्ताळे पत्रकार 'निष्पक्ष पत्रकारिता' या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकतील.
जाऊ द्या, पुरावे समोर न ठेवता ढगात गोळ्या मारणार्यांच्या आरोपांवर, काही 'चॅनेल गुंडां'च्या स्वघोषीत निकालावर आणि निव्वळ अज्ञानावर असली मतप्रदर्शनं होणं हीच तर आजच्या युवकांची लक्षणं झालीयेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे ते हेच बहूदा... (बिनडोक) युवाशक्तीचा विजय असो!!!
भारी समर्थ
10 May 2011 - 1:42 am | योगप्रभू
महाराष्ट्राची एकंदर दुर्दशा आणि येथील हेव्यादाव्यांचे राजकारण बघता संपूर्ण राज्यावरच प्रशासक नेमण्याची वेळ आलीय.
रिझर्व्ह बँकेला दोष देऊन उपयोग नाही. ती बँक कधीही आकसाने कारवाई करत नाही. अनियमितता किंवा आर्थिक गैरव्यवहार दिसून आल्यास बँकर्स बँक या नात्याने रिझर्व्ह बँक सातत्याने इशारे देते. ते धुडकाऊन मस्ती दाखवली, की एक दिवस कुणालाही कल्पना न देता अचानक कारवाई केली जाते आणि ते बरोबरच आहे. पोलिस छापा घालणार असल्याचा सुगावा लागल्यावर हातभट्टीवाले गायब होतात. धनदांडगे लोक कायद्याचा आधार घेऊन कारवाईचा विचका करतात. त्यामुळे अशा कारवाईची कल्पना दिली जात नाही. याआधीही अनेक खासगी बँकावर असाच मोरॅटोरियम जारी केला गेला आहे.
10 May 2011 - 8:45 pm | हुप्प्या
भारतात कुठलाही सरकारी विभाग भ्रष्टाचार, वशिलेबाजी, राजकीय हस्तक्षेप यापासून मुक्त नाही. सैन्य, गुप्तचर खाते, न्यायालये ह्या "पवित्र" मानलेल्या संस्थाही ह्यातून वाचलेल्या नाहीत. तेव्हा रिझर्व बँक निष्कलंक, निष्पाप , रामशास्त्री बाण्याची आहे असे मी मानायला तयार नाही.
इथेही राजकीय प्रेरणेने ही कारवाई झाली असण्याची शक्यता आहे. किंबहुना निर्णय निरपेक्षपणे झाला आहे असे तसा नि:संदिग्ध पुरावा मिळाल्याशिवाय मी तरी मानणार नाही.
पण निदान ह्यावेळेस तरी ह्या कारवाईबाबत माझी काही तक्रार नाही.
10 May 2011 - 2:01 pm | चिरोटा
सहमत आहे.आर बी आय स्वतःचे निर्णय स्वतः घेते.महाराष्ट्राला स्वतःच्या बापाची जहागिरी मानणार्यांना जरा चाप बसला हे चांगले झाले.एका प्रतिक्रियेत पवार म्हणतात-
मग काँग्रेसला पाठिंबा देताय तरी कशाला? अर्थात पवारांचा ईतिहास पाहता -"मतभेद विसरून आम्ही पुन्हा कामाला लागलो आहोत" अशी प्रतिक्रिया संध्याकाळपर्यंत ते देवू शकतात.
10 May 2011 - 2:40 pm | गणपा
हा बहुतेक काकाचा डाव असावा पुतण्यास जमिनीवर आणायचा.
नसल्यास या परिस्थीचा या कामासाठी पुरेपुर वापर करण्यात काका तरबेज (पक्षी कावेबाज) आहे. :)
10 May 2011 - 7:37 pm | चिंतामणी
काका करू शकतात तसे.
अनेक वर्षाच्या मित्राला असेच केले होते ना.
10 May 2011 - 4:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ह्यो घड्याळ काका, संधी मिळाली तर उसातला स्वातंत्र देवतेचा पुतळा विकून खाईल, एक छोटीशी सहकारी बँक किस झाड की पत्ती हाय त्येंसनी :D
10 May 2011 - 8:40 pm | धमाल मुलगा
>>संधी मिळाली तर उसातला स्वातंत्र देवतेचा पुतळा विकून खाईल
नुसतं न्हवं, विकून सोत्ता खाईल, अन ढेकर दुसर्याच कुणाला तरी येइल...ज्याला ढेकर, तो गजाआड! :D
11 May 2011 - 12:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी अगदी!!
वरुन काका त्येला निरोप धाडतील, थोडे दिवस भत्ता खावा, जरा धुराळ खाली बसलं की तुझी पन सोय करतो :D
10 May 2011 - 10:13 pm | सदाहरित
अण्णा , तात्या, दादा अन भाऊच्या राज्यात महाराष्ट्र नक्किच विकला जाणार!
जय महाराष्ट्र !
11 May 2011 - 12:29 am | अविनाशकुलकर्णी
भिम शक्ति+शिवशक्ति..हा पर्याय होवु शकतो का?
11 May 2011 - 9:58 am | चिरोटा
सहकारी बॅंक स्थापून घोटाळे करायला?
11 May 2011 - 11:26 am | प्यारे१
मी ऐकले ना सगळ्यांचे? आता मला बोलू द्या. मी चर्चा सोडून उठून जाईन मला बोलू द्या.
सह्याद्रीएवढ्या उंचीच्या आमच्या साहेबांना सत्तेतून खाली आणण्याचा प्रयत्न हर प्रकारे सगळ्या विरोधकांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे आणि पूर्ण महाराष्ट्रात जनाधार लाभलेले आमचे साहेब एकटेच असे नेते आहेत.
त्याबरोबरच अतिशय तडफेनं काम करणारे दादा यांचा असणारा कामाचा धडाका ज्यांना बघवत नाही,सगळे प्रयत्न संपल्यावर सत्ता मिळणे शक्य नाही म्हणून काहीही करुन साहेबांचे चरीत्र डागाळण्याचा हा डाव आहे.
आणि बँकेवर वर्चस्व असणे काय चुकीचे आहे? आम्ही काय व्यवसाय , धंदा करायचा नाही का? कारखाने कुणाचे नाहीत? गिरण्या कुणाच्या नाहीत? त्याला सर्वमान्य प्रकारे रीतसर कर्ज घेऊन पैसे मिळवून देण्याचे विकासाचे काम दादा करत आहेत.
ही कारवाई म्हणजे विकासाला विरोध करणार्यांचे निव्वळ षडयंत्र आहे.
- आ. (आमदार) धर्मेंद्र भेकाड
11 May 2011 - 7:33 pm | आशु जोग
मजकूर सोडून बाकी घाण
करणार्यांना बॅन का करीत नाही
12 May 2011 - 10:11 pm | अविनाशकुलकर्णी
शरदे रचिला पाया,अजित झालासे कळस! ....................
13 May 2011 - 1:20 pm | समीरसूर
आता पी-कंपनीचा घडा भरला आहे असे वाटते. धडाधड आरोप होतात. स्पष्टीकरण देता देता हवालदिल होणार्या मोठ्या साहेबांची भंबेरी उडते, आणि त्यामुळे त्यांचे बरबटलेले हात अधिकच स्पष्ट दिसतात.
राष्ट्रवादीने गुंडगिरीचा जो पायंडा महाराष्ट्रातल्या राजकारणात पाडला त्याला तोड नाही. लोकसत्ताच्या २०१० दिवाळी अंकात महाराष्ट्राच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांवर एक सुरस लेख आला होता. कोण कसे होते, कुणाचे स्वभाव कसे होते वगैरे सगळी माहिती दिलेली होती. त्यात शरदरावांविषयी काही फार चांगले लिहिलेले नव्हते. भारतात कधीच कुणालाच कुठल्याच क्षणी शरद पवार विश्वासू वाटले नाहीत असे अगदी ठळकपणे लिहिले होते. शिवाय त्यांनी एका जुन्या मुख्यमंत्र्याशी केलेल्या दगाबाजीचे उदाहरण देऊन असल्या 'धूर्त' राजकारणाने शरदरावांचे कसे नुकसान केले हे देखील लिहिलेले होते. आजच्या घडीला फक्त एक कावेबाज, घोटाळेबाज, आणि धटिंगण राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा उरलेली आहे. त्यांच्या या गुणधर्मांमुळेच राष्ट्रावादीला कधीच हवे तसे यशही मिळाले नाही आणि शरदरावांची पंतप्रधान होण्याची मनीषा देखील कधी पूर्ण होऊ शकली नाही. दिल्लीमध्ये शरदरावांचा पंतप्रधान म्हणून कधीच विचार झाला नाही कारण शरदराव कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतील याचा नेम नव्हता. सगळे नेते शरदरावांपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांना स्वतःला खुशी वाटत असेल पण शेवटी त्यांच्या या प्रतिमेने त्यांचे जबर नुकसान केले. अजितदादांसारखे स्वबळावर मोठे न होऊ शकणारे नेते शरदरावांच्या गुंडशैलीमुळे पुढे आले आणि डोईजड झाले. कालच्या 'फू बाई फू' मध्ये शरदरावांना जागांचे शौकीन म्हणून हिणवले गेले. जनमानसात त्यांची प्रतिमा 'लँड माफिया' म्हणून अगदी घट्ट झालेली आहे. आता काँग्रेस एकामागून एक आघात करत राष्ट्रवादीला खिळखिळे करण्याचा स्तुत्य प्रयत्न करीत आहे. आयपीएल असो, बलवा असो, लवासा असो, राज्य सहकारी बँक असो, अली हसन असो...आज बिनदिक्कत शरदरावांशी या भानगडी येऊन नतमस्तक होतात.
राज्य सहकारी बँकेच्या कहाण्या ऐकून तर मन थक्क होते. हजारो रुपये भत्ता म्हणून घेणे, लक्षावधी रुपयांच्या गाड्या घेणे, कर्ज थकवणे, मालमत्ता आपल्याच चमच्यांना कवडीमोलाने विकणे...राज्य सहकारी बँकेवर बलात्कार करून-करून तिचे वाभाडे काढण्यात यांनी कुठलीच कसर सोडली नाही. काँग्रेस काही खूप स्वच्छ आहे असे नाही परंतु राष्ट्रवादीच्या राजकारणाचा पायाच इतका भयंकर आहे की सामान्य माणूस त्या 'स्कॉर्पिओ' संस्कृतीपासून चार हात लांब राहणेच पसंत करतो. शरदरावांची राजकारणाची फिलॉसॉफी इतकी भयावह आहे की त्यातून निपजणारे नेते हे गुंडगिरी, विश्वासघात, भ्रष्टाचार या सद्गुणांचे बाळकडू घेऊनच राजकारण करणार हे नक्की. ब्राह्मण-मराठा द्वेष पी-कंपनीच्या घाणेरड्या राजकारणाचे अपत्य आहे; त्यातूनच छावा, ब्रिगेड, नाद करायचा नाय, बघतोस काय, मुजरा कर....इत्यादी समाजविघातक प्रवृत्तींचा जन्म झाला आणि त्यांना बळ मिळाले. मागे जितेंद्र आव्हाड नावाच्या खास राष्ट्रवादीच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने अनुपम खेरच्या वक्तव्यावरून अत्यंत अश्लाघ्य खेळी खेळली होती. "डॉ. आंबेडकरांसारख्या महान नेत्याने लिहिलेली घटना फेकून द्यायच्या गोष्टी अनुपम खेर करीत आहेत" असे भयंकर विधान करून आव्हाडसाहेबांनी एका विशिष्ट समाजाला डिवचण्याचे राजकारण केले होते. त्यांच्या असल्या घाणेरड्या राजकारणाला सुज्ञ लोकांनी भीक घातली नाही हे योग्यच झाले. अशी ही माजोर्डी राष्ट्रवादी वृत्ती मोडून निघणे ही आजच्या महाराष्ट्राची गरज आहे. जमिनी घशात घालून कोट्यवधी रुपये कमावणे, जिकडे-तिकडे हिस्सा असणे, मोठ्या मोठ्या उद्योगांमध्ये भागीदारी असणे इत्यादी गोष्टींचा शरदरावांच्या बाबतीत इतका जास्त बोभाटा झाला की आता त्यांच्या गुळमुळीत, निरर्थक, संधीसाधू वक्तव्यांवर आणि धोरणांवर कुणी विश्वास ठेवील असे वाटत नाही. ते तसे न होवो यातच महाराष्ट्राचे हित आहे. त्याची आता सुरुवात झालेली आहे.
14 May 2011 - 12:39 am | चिंतामणी
समीरसूर- आत्ता शब्द सापडत नाहीत प्रतिक्रीया द्यायला. त्यामुळे कृतीने सांगतो
___/\___
14 May 2011 - 1:10 am | चिंतामणी
दोन वेळा प्रकाशीत झाल्याने प्र.का.टा.आ.
14 May 2011 - 2:38 pm | आशु जोग
मजकूर सोडून बाकी घाण
करणार्यांना बॅन का करीत नाही
14 May 2011 - 4:00 pm | अप्पा जोगळेकर
मस्त प्रतिसाद.