भरली वांगी (stuff brinjals)

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
8 May 2011 - 1:07 pm

भरली वांगी (stuff brinjals)
( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.भु.दे.घे.)

साहित्य : (वाटणा करिता )ओल्या नारळाचा कीस २ वाट्या ,धणेपूड १ मोठा स्पून ,१ स्पून मिरची पावडर,एक स्पून गरम मसाला ,आल ,लसून ,कोथिंबीर .
वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या
वांग्याला आडवे उभे काप देऊन हा मसाला त्या मध्ये भरा

२ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,

फोडणीसाठी - जीर,मोहरी.कढीपत्ता ,एक दालचिनीचा छोटा तुकडा,हिंग
कृती :-
कढइत ३ चमचे तेल टाकून त्यात आधी मसाला भरलेली वांगी छान परतून घ्या ,ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .

आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घाला
नंतर कांदा गुलाबी परतून घ्या ,टमाटर घाला छान परतून घ्या आता पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,मीठ आणि हळद घाला आणि त्यात उरलेला मसाला घालून हलवत राहा .

वांगी कच्ची वाटत असतील तरं किंचित पाणी घाला परतून
परतून छान कोरडी करून घ्या ,कोथिंबीर घाला .
भरली वांगी चापण्यासाठी तयार आहेत

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

8 May 2011 - 1:19 pm | किसन शिंदे

जो बोला वो करके दिखाया....
तो शेवटचा फोटो तर जीवघेणा आहे...:)

अवांतर : वांग्यांचे देठ काढायचे विसरलीस का?

पियुशा's picture

8 May 2011 - 1:20 pm | पियुशा

अवांतर : वांग्यांचे देठ काढायचे विसरलीस का?

विसरले नाहि मला वान्ग्याचे देठ आवड्तात :)
धन्यु

नन्दादीप's picture

8 May 2011 - 1:23 pm | नन्दादीप

यम्मी..... लय भारी.

शेवटचा फोटो बघून तर बादलीभर लाळ गळाली ग.....!!!!!

सानिकास्वप्निल's picture

8 May 2011 - 1:26 pm | सानिकास्वप्निल

छान ...मस्त :)

झक्कास!!

आज मेस बंद असल्याने आमच्याकडे हाच बेत आहे. :)
पण आम्ही नारळाच्या किसाऐवजी कूट वापरतो.

ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क !! वांगी हा माझा सर्वांत नावडता प्रकार आहे ... नुस्तं वांगं म्हंटलं तरी भुक मरते . फोटु पाहुन तर पुढचा आठवडा भर जेवीन की नाही माहित नाही.
काय अक्कल सुचली आणि पाकृ क्लिक केली ! :(

असो !

( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.धु.दे.घे.)

त्यामुळ हा अभिनव प्रकार आवडला

,आल ,लसून ,कोथिंबीर .

आल कुठे मिळते ? आल नसेल तर अंड टाकले तर चालेल काय ?

वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या

मी मिक्सी कुठे मिळते ? इकडे अमेरिकेत कुठे मिळते काय ?

ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .

अवघड दिसते पाकृ .

आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घाला

हे जीरवायचं की तडतडवायचं ?

नंतर कांदा गुलाबी परतून घ्या

गुलाबी ? कोणत्या जातीचे कांदे वापरता तुम्ही ? जर्मनीत निळे कांदे मिळतात.

पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,

परतवायची की तळायची वांगी ? काय झोल आहे नक्की ? अशाने कोळसा व्हायचा वांग्याचा

एकंदरीत पहिला प्रयत्न हुकला तर आहेच , पण हे खाऊन बाकीच्यांची वांगी खायची वासना मेली तर त्याचे पाप तुमच्या माथी लागले नाही तर मिळवली.

- बबुशा

यकु's picture

8 May 2011 - 2:33 pm | यकु

काय टारझनभय्या वांगेआळीकर
वांगे आवडत नाहीत तर मग वांगेआळीत कसे राहाता?

पंगा's picture

8 May 2011 - 6:17 pm | पंगा

ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .

'ब्रावणे' म्हणजे नक्की काय?

@ टारझन
काय अक्कल सुचली आणि पाकृ क्लिक केली !

मराठी आनि हिन्ग्लिश वाचता येत ना रे तुला? मग एवढ धड्धडीत भरलि वान्गि (stuff brinjals)लिहिलेल असताना वाचता नाहि आले ?
कुठला ;)

टारझन's picture

9 May 2011 - 10:33 am | टारझन

व्यक्तिगत टिका होते आहे , संपादक मंडळाने दखल घ्यावी.
माझा प्रतिसाद सदर लेखिकेच्या लेखनावर आणि लेखनातल्या मॅटर असताना माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करणार्‍या सदस्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी संपादक मंडळाला विनंती करण्यात येते.

- ढगुशा

निवेदिता-ताई's picture

8 May 2011 - 1:59 pm | निवेदिता-ताई

पण आम्ही नारळाच्या किसाऐवजी कूट वापरतो.
आम्ही दोन्ही वापरतो...

टोमॅटो नाही वापरत...त्यामुळे तवंग कमी येतो ..

योगप्रभू's picture

8 May 2011 - 2:19 pm | योगप्रभू

पियुशा,

वांगी शिजवताना प्रेशर पॅनचा उपयोग केला तर अगदी लोण्यासारखी मऊ होतात. शेवटचा फोटो बघून मनाचे समाधान झाले.

भरले वांगे करताना देठ तर ठेवला पाहिजेच. खाताना तो काढून फेकून द्यायचा, पण आधीच कापायचा नाही कारण देठही शिजल्याने वांग्याला छान चव येते.

खोबरे आणि कुटाचा एकत्रित वापर म्हणजे चैनच. पण वांगे वातुळ, शेंगदाणा पित्तकारक आणि तेल व खोबरे वजन वाढवणारे त्यामुळे ही डिश ओरपणार्‍यांचे लवकरच अंगाने भरलेले वांगे होण्याची शक्यता अधिक.

आमच्याकडची कृष्णाकाठची काळीभोर वांगी एकदम चवदार. सातारा, सांगली, कराडवरुन कुणी अशी वांगी आणली की मग मजाच मजा. :)

>>>आमच्याकडची कृष्णाकाठची काळीभोर वांगी एकदम चवदार. सातारा, सांगली, कराडवरुन कुणी अशी वांगी आणली की मग मजाच मजा<<
कृष्णा काठची हिरवी वांगी प्रसिद्ध आहेत. काळी नाहीत. अप्रतिम असतात चवीला.

-पटवर्धन्(सांगलीकर)

योगप्रभू's picture

10 May 2011 - 12:21 am | योगप्रभू

<<कृष्णा काठची हिरवी वांगी प्रसिद्ध आहेत. काळी नाहीत. >>

कृष्णा नदी आमच्याइथून पुढे सांगलीला आल्यावर बहुतेक वांग्याचा रंग बदलत असेल. आम्ही पण कृष्णाकाठचेच, पण छोटी अंड्याच्या आकाराची आणि काळी-जांभळी वांगी खात आलो आहोत.

असो. वाद नको. तुमची हिरवी वांगी आम्हाला द्या. आमची जांभळी खाऊन बघा. :)

हिरवी वांगी तिकडे जळगावकडे होतात. त्याचीच भरीत पार्टी करतात. तीही खाल्ली आहेत.
आमच्याकडे भरताचे वांगेपण काळे-जांभळेच असते.

- (सर्वभोक्ता) योगप्रभू

काळी वांगी माहिती नाही.. पण सांगलीला आम्ही नेहमीच हिरवी-पांढरी काटेरी वांगी आणतो. ती खूप आवडतात आणि चवही अप्रतिम असते.

आवांतर : योगप्रभू आपण पहिलेच भेटलात मला, कृष्णाकाठचे जे हिरव्या वांग्याचे नाही तर काळ्या वांग्याचा अभिमान बाळगून आहात. :)

शिल्पा ब's picture

10 May 2011 - 7:16 am | शिल्पा ब

खरं सांगायचं तर काटेरी वांग्यांना जी चव असते ती दुसर्या वांग्यांना नसते.

अविनाशकुलकर्णी's picture

8 May 2011 - 2:26 pm | अविनाशकुलकर्णी

एक टांगेची कोंबडीच...मस्त आवडता पदार्थ

मुलूखावेगळी's picture

8 May 2011 - 3:00 pm | मुलूखावेगळी

मस्त्त ग
सुंदर फोटु
मी फक्त त्याची ग्रेव्ही खाते. त्यामुळे पॅन मधली नाही खता येत. अति शिजल्याने ग्रेव्ही अनि वांगे मिक्स होते

छान प्रगति आहे, किमान पाक्रु टाकण्यात तरी असं लिहिणार होतो, पण वांगं हे आमच्या घराचं पेशलिटि आहे, त्यामुळे छान झाली असावी भाजी असे म्हणतो , जो पर्यंत धागाकर्ता / कर्ती प्रत्यक्ष खाय्ला बोलवणार नाहीत तो वर उगा चवीचे कॉतुक का क्ररा नाही का ? आणि हे आवाहन किंवा आव्हान कसे ही समजले तरी चालेल.

बाकी आमच्याक्डे, शेंगा/ति़ळाचे कुट आणि काळा मसाला घालुन ही भाजी करतात, ती पण कल्हई केलेल्या पितळ्याच्या पातेल्यात.

इरसाल's picture

9 May 2011 - 12:37 pm | इरसाल

आयला काय पण नशीब आहे. इथे भरली वांगी आणि आज डब्यात पण भरली वांगी. पण इथे हिरवी वांगी मिळत नाहीत त्यामुळे जांभळ्या वान्ग्यांवर भागवावे लागतेय.
विश्वास नाही वाटत तर हे बघा.

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2011 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

वाह !
जबर्‍याच पाकृ. काल नेमकी घरी साधारण अशाच प्रकारची पाकृ कुठल्याश्या खवय्या प्रॉग्रॅम मध्ये बघुन केली. त्यांनी ह्या पाकृचे नाव 'ढकल वांगी' असे दिले होते.

अवांतर :- भरली वांगी (stuff brinjals)

हे इंग्रजी मध्ये देण्याचे कारण कळले नाही. मध्ये कुठल्याश्या आगामी कट्ट्याच्या धाग्यावर काही विचारवंतानी 'कट्ट्याला येण्याची इच्छा असलेल्या मिपाकरांनी दारु पिउन येउ नये' वैग्रे मिपाकरांना अक्कल नसल्यासारखे दिलेले सल्ले ह्या निमित्ताने आठवले :)

असो...

ajay wankhede's picture

9 May 2011 - 11:23 pm | ajay wankhede

शेवट चा फोटु लय भारि
नागपुर कडे सावजी लोकात वान्ग्याचं खुपच फ्याड आहे
म्हन्तात
बान्गा भात खाईस
डोरे बटारिस....

शिल्पा ब's picture

10 May 2011 - 12:01 am | शिल्पा ब

मस्त...उद्याच करुन बघते.

रश्मि दाते's picture

10 May 2011 - 5:42 pm | रश्मि दाते

म्स्त मीपण करणार आहे उद्या.

रमताराम's picture

10 May 2011 - 6:43 pm | रमताराम

भरल्या वांग्यांच्या रेशिपीमधे टमाटू नि कांदा? काय पंजाब्याची रेशिपी हाय काय ही? एवढं सगळं भरताड घातल्यावर वांग्याची काय चव लागणार हो. वांग्याची चवच एवढी स्वर्गीय असते की फक्त वांगी, काळा मसाला नि अंमळ दाण्याचा कूट एवढ्यावरच अशी फर्मास भरली वांगी होतात की यंव रे यंव. (पु.ल. म्हणतात तसे खरा संगीतकार एक दोन वाद्यात सुरांचा स्वर्ग उभा करतो...) आमचे खानदेशी दोस्त तिकडले भले मोठे वांगे कुटाऐवजी अख्खे भाजके दाणे घालून बनवत. ती ही एक वेगळी चव. मज्जानु लाईफ.

(साधासोपा) रमताराम

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 9:40 am | विसोबा खेचर

वांग्याची चवच एवढी स्वर्गीय असते की फक्त वांगी, काळा मसाला नि अंमळ दाण्याचा कूट एवढ्यावरच अशी फर्मास भरली वांगी होतात की यंव रे यंव.

सहमत.. + सोबत नेमका चिंच-गुळही हवा..

अन्य कशाची खरंच गरज नसते..

तात्या.

पियुशा's picture

11 May 2011 - 11:29 am | पियुशा

@ रमताराम एकदा करुन बघा वान्ग्याचि चव छान लागेल ,आनि दान्याच कुट घातलेल वान्ग म्हनजे अप्रतिम !
पन माझ्या आज्जिला दान्याचा कुट घातलेल वान्ग अज्जिबत आवडत नाहि म्हनुन तिच्यासथि हा प्रकार केला होता :)

नरेशकुमार's picture

11 May 2011 - 10:50 am | नरेशकुमार

तोंडाला पानि सुटले.
जिव उतविळ झाला. पोटात भुकेने खड्डा पड्ला. पोटातल्या माष्या ओरडायला लागल्या.
कधि एकदा घरी जाउण करतोय, असं झालंय

मुलूखावेगळी's picture

11 May 2011 - 11:16 am | मुलूखावेगळी

कधि एकदा घरी जाउण करतोय, असं झालंय

कोनाच्या घरी जाउन करनार तुम्ही ? ;)

नरेशकुमार's picture

11 May 2011 - 11:38 am | नरेशकुमार

हे बघा मि माझ्या नाकासमोर सरळ चालनार मनुक्श्य.
माझ्या हापिसातले माझे काम संपले कि माझ्या घरि जानार, आनि माझ्या स्वताच्या हाताने मि आनालेल्या वांग्याची भाजि मिच कर्नार. आनि मि केलेली भाजि मात्र आम्हि दोघे(च) मिळुन वाटून खानार.

स्वगत : काय रे देवा, हल्लि काय बोलायचि सोय नाही.