साहित्यः
पापलेट स्वच्छ करून तुकडे करणे
१ वाटी खोवलेले खोबरे
१ मध्यम कांदा बारीक चिरून
२-३ लसुण पाकळ्या
३-४ आमसुलं
१ टेस्पून धणे
५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ चवीनुसार
१ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक)
तेल
६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी. (हे ऐच्छिक आहे)
पाकृ:
पापलेटच्या तुकड्यांना थोडी हळद व थोडे मीठ लावून ठेवावे.
धणे व मिरच्या १/२ तास गरम पाण्यात भिजवून ठेवणे.
नंतर ओले खोबरे, लसुण, धणे, मिरच्या व कांदा एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. (कांद्यातील १ टेस्पून कांदा बाजुला काढून ठेवणे.)
वाटलेला तयार मसाला.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून १ टेस्पून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगले परता.
कालवणासाठी लागेल तसे पाणी घालून उकळी आणा.
त्यात माश्यांचे तुकडे, मीठ, गरम मसाला व आमसुलं घाला , सुमारे १० मिनिटे शिजवावे.
तिरफळाचे पाणी गाळून कालवणात घालावे व ४-५ मिनिटांनी शिजवून गॅस बंद करावा
चिरलेली कोथिंबीर घालावी व चपाती, भाताबरोबर सर्व्ह करावी.
प्रतिक्रिया
7 May 2011 - 11:38 pm | कौशी
कधी येउ जेवायला.....
8 May 2011 - 1:03 am | चिंतामणी
कधी येउ जेवायला.....
मी मत्स्यप्रेमी आहे. एव्हढी भारी पाकृ (आणि फटुसुद्धा) आहे. पण काय उपयोग???????????
खायला परवनागी असली तरी घरी करायला नाही परवानगी. मग काय करायचे?? :(
म्हणूनच विचारले "कधी येउ जेवायला." :D
8 May 2011 - 1:36 pm | सानिकास्वप्निल
:) कधीही या..आम्हाला आवडेल
8 May 2011 - 11:06 pm | चिंतामणी
पण त्यासाठी राणिच्या देशात यायचे की तु मातृभुमीला आल्यावर खाद्य मैफल ठेवायची??
:-/
10 May 2011 - 1:27 pm | सानिकास्वप्निल
जिथे जमेल तुम्हाला तिथे :)
7 May 2011 - 11:41 pm | प्राजु
कातिल!!!!
7 May 2011 - 11:53 pm | पंगा
माफ़ कीजिएगा, आप के धागे में ग़लती से चला आया| आप के हाथ देखे, बहुत हसीं हैं... इन्हें ज़मीं पे मत रखिएगा - मैले हो जाएंगे|
8 May 2011 - 2:14 am | chipatakhdumdum
'मालवणी' माश्याच्या आमटीत गरम मसालो खयसून इलो..?
8 May 2011 - 2:23 am | सानिकास्वप्निल
गरम मसाला थोडाच घातला आहे...छान चव येते म्हणून :)
8 May 2011 - 2:23 pm | टारझन
व्वाह !! मार डाला ... आत्ताच एक व्हेज मधला फडतुस प्रकार पाहुन तोंडातली लाळ सुकली होती ... पण ही पाकृ पाहुन तोंड लाळावले ... :) लै भारी ;)
- खानावळी फस्त करी
8 May 2011 - 6:54 pm | राही
गोवा आणि सिंधुदुर्ग प्रदेशात कच्चे खोबरे वापरून केलेल्या आमटीत गरम मसाला सहसा वापरत नाहीत. गोव्यात तर लसूणही नसते. ओरिजिनल सिंधुदुर्गी फिशकरीतही बहुधा नसावी.
8 May 2011 - 10:54 pm | सुहास..
मार डाला !!
मार डाला !!
मार डाला !!
मार डाला !!
मार डाला !!
मार डाला !!
9 May 2011 - 10:50 am | विसोबा खेचर
काय बोलू..?..!
16 May 2011 - 9:32 pm | विनोद कोकने
आज सोमवार आहे .पुढच्या आठवड्यात !!!
19 May 2011 - 2:03 pm | खादाड अमिता
ते त्रीफळा चूर्ण ज्याचे बनव्तात ते का?
करी मस्त दिस्तिये!