http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...
वेबजगत
खमंग मिसळ-पाव
पुणे असो वा सातारा, कोल्हापूर असो वा नाशिक.. गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे. ही मिसळ-पाव खाताना सोबत कुटुंबीय किंवा दोस्त असले तर गप्पांची लज्जत आणखी वाढते. फर्मास ‘मिसळ-पाव’मध्ये विविध चवीचे पदार्थ असतात व अस्सल मराठीपण असतो. हेच नाव धारण केलेली मराठमोळी, धमाल वेबसाइट आहे. www.misalpav.com जगभर पसरलेल्या मराठी नेट भटक्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची कला, त्यांच्या अभिव्यक्ती माय मराठीतून सादर करण्याची संधी देणारे हे अस्सल मराठमोळं व्यासपीठ आहे. इतले धमाल पोस्ट/ ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील. या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा. खरंतर इथला बराच मजकूर इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित व्हावा इतका दर्जेदार आहे. प्रथमच पाहणाऱ्यांनी संपादकीय धोरण’ वाचून पुढे नवे लेखन, काथ्याकूट किंवा माझे लेखन’सारख्या दालनातील प्रत्येक उपशीर्षकावर क्लिक करून पुढे वाचत जावे. आवर्जून येथे सदस्यत्व घ्या व तुमच्या कलाकृती व प्रतिक्रिया अपलोड करा. दिवाळी अंक, गप्पांची चावडी, वाचनालय, व्याख्यानमाला या सर्वाचा एकत्रित अनुभव नियमित देणारे हे संकेतस्थळ नक्की पाहा.
विवेक मेहेत्रे
सर्व मिपा प्रेमी चे अभिनंदन.
मिपा अजून उत्तरोत्तर प्रसिद्ध राहो ही प्रर्थना.
प्रतिक्रिया
7 May 2011 - 4:00 pm | कलंत्री
आज ही बातमी वाचून बराच आनंद झाला. मिपा जेंव्हा बाल्यावस्थेत होते तेंव्हा बर्याच लोकांनी बरेच कष्ट घेऊन मिपाची वाढ होईल हेच पाहिले.
मात्र आहे तेथेच न थांबता बरीच वाटचाल करावयाची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
मराठी गाण्याचा दृकश्राव्य खजिना, मुलांच्या गोष्टी मुलांच्याच आवाजात ऐकण्याची सोय, चित्रपट परिक्षणे इत्यादी इत्यादी.
7 May 2011 - 4:24 pm | स्पा
क्या बात क्या बात :)
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हि च प्रार्थना
7 May 2011 - 4:33 pm | नारयन लेले
मि.पा. चे त्रिवार आभिन॑दन !
विनित
7 May 2011 - 4:51 pm | चिरोटा
अभिनंदन!!!मिपाच्या संस्थापकांचे, ते चालवणार्यांचे आणि त्यावर वाचनिय लिखाण करणार्यांचे.
7 May 2011 - 5:01 pm | ऋषिकेश
लोकसत्ताने घेतलेली दखल बघुन एक मिपाकर म्हणून आनंद झाला :)
7 May 2011 - 6:30 pm | विकास
लोकसत्ताने घेतलेली दखल बघुन एक मिपाकर म्हणून आनंद झाला
असेच म्हणतो.
येथे माहिती दिल्याबद्दल, कलंत्रीसाहेबांना धन्यवाद
इतले धमाल पोस्ट/ ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील. या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा.
चपखल!
10 May 2011 - 8:21 am | सुधीर काळे
लोकसत्तेतील वरील बातमी वाचून आनंद झाला. कलंत्रीसाहबांना धन्यवाद.
7 May 2011 - 5:59 pm | तिमा
आजच वाचले होते. याचे श्रेय तात्या, नीलकांत, संपादक मंडळ व मिपाला श्रीमंत करणारे मिपावरचे साहित्यिक यांनाच जाते.
7 May 2011 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा
हे लै झाक झाल बघा,आता बघु किति लोक-सत्ता गाजवायला येतात ते.त्यान्ना म्हनाव,आमच्या तर्रिला तोन्ड लावन सोप न्हाई,,आम्चि तर्र्रि नुसतिच तिखट न्हाय,चरचरित बि असतिया...हित निसते खिशात पैसे असुन जमनार न्हाई,पचवायचिबि तयारि लागल...तवा चान्ग्ल टाईट असाल तरच या........................................पराग दिवेकर.
7 May 2011 - 7:16 pm | चिगो
मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हीच शुभेच्छा..
तात्यांचे, निलकांतचे आणि संमंचे तसेच सर्व मिपाकरांचे अभिनंदन... :-)
7 May 2011 - 8:20 pm | आनंदयात्री
मस्त बातमी. मिपाला "प्रेस कव्हरेज" नावाचा वेगळा विभाग सुरु करावा लागेल असे वाटते, मिपा आणि मिपाकर दोघंही प्रिंट मिडियात कुठेना कुठे झळकतच आहे.
8 May 2011 - 10:03 am | इनोबा म्हणे
सहमत आहे.
7 May 2011 - 9:14 pm | आत्मशून्य
.
7 May 2011 - 9:47 pm | अजातशत्रु
हि बातमी वाचून मनापासून आनंद झाला.. आणी या परीवारात आम्ही ही सदस्य आहोत याचा अभिमान..
@याचे श्रेय तात्या, नीलकांत, संपादक मंडळ व मिपाला श्रीमंत करणारे मिपावरचे साहित्यिक यांनाच जाते
सहमत
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हिच सदिच्छा आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..
8 May 2011 - 1:59 am | विनायक बेलापुरे
मिपाचे नाव वर्तमानपत्रात येउन कौतुक झाले याचा आनंद आहेच पण या शब्दात मिपाचे कौतुक व्हावे याचा जास्त मोठा आनन्द आहे.
दर्जेदार लिखाण देणारया मिपाकरांचे , नीलकांत आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
8 May 2011 - 7:37 am | नरेशकुमार
मीपामध्ये लोकसत्तेची दखल घेतल्याबद्दल (खरेतर) लोकसत्तेचे अभिनंदन करायला पायजे.
8 May 2011 - 12:50 pm | प्यारे१
न कु शी पहिल्यांदाच सहमत.
8 May 2011 - 9:51 am | विदेश
कलंत्री, लोकसत्ता आणि समस्त मिपाकरांचे ! आवर्जून दखल घेतली गेल्याबद्दल ' मिसळपाव " चेही !!!
8 May 2011 - 10:26 am | चिंतामणी
आत्तापर्यन्त मिपावरचे शिलेदार प्रिंट मिडीयात चमकत होते.
आता खुद्द मिपाचीच दखल प्रिंट मिडीयाने घेतली आहे हे पाहून आनंद झाला.
8 May 2011 - 12:07 pm | स्वाती दिनेश
छान बातमी! वाचून आनंद झाला.
स्वाती
8 May 2011 - 12:40 pm | किसन शिंदे
इवलेसे रोप लावियेले इंटरनेटच्या दारी।
तयाचा वेलू गेला गगनावरी॥
मिसळपावचे हार्दिक अभिनंदन....
8 May 2011 - 8:36 pm | शशिकांत ओक
आता समस्त मिपाकरांनो,
मस्त पैकी एक मिसळपाव जवळच्या हाटेलात मारुन आनंद साजरा करा.
मी केला. धमाल आणि मजा आली.
खेळीमेळीचे वातावरण ठेवले की नाडी वात आणणार नाही...
8 May 2011 - 8:48 pm | आनंदयात्री
>>मी केला.
काय केला हो काका ?
>>धमाल आणि मजा आली.
अरे वा वा .. धमाल आला होता हे ऐकुन आनंद झाला .. ही मजा कोण ? तीने कधी सदस्यत्व घेतले ?
10 May 2011 - 10:00 am | चिंतामणी
गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे.
लोकसत्ताच्या लेखातील हे पहीले वाक्य दाताखाली आलेल्या खड्यासारखे आठवत होते.
:(
10 May 2011 - 10:18 am | गवि
सेम हियर.
नशीब "वरण" नाही म्हटले. :)
शिवाय माझ्यामते खमंग हा शब्द मिसळीसारख्या अर्धद्रव पदार्थाला वापरत नाहीत. तो थालीपीठ किंवा तत्सम खुसखुशीत / कुरकरीत पदार्थाला वापरतात. चू.भू.दे.घे.
9 May 2011 - 10:50 am | विसोबा खेचर
आनंद झाला, समाधान वाटले.
नीलकांताचा, सर्व मिपाकरांचा आणि लोकसत्तेचा मी ऋणी आहे..
तात्या.
10 May 2011 - 7:20 am | नगरीनिरंजन
संस्थापक, संचालक आणि संपादक यांचे अभिनंदन!