मी दिनांक १९ एप्रिलला माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.
माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.
आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची गोष्टज म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.
प्रतिक्रिया
3 May 2011 - 10:28 am | टारझन
युयुत्सु काका .. पार्टी पायजेल आं आता ... :)
- पार्टित्सु
3 May 2011 - 10:36 am | गवि
२ तारखेला सकाळी १०:२४ ला अमावास्या लागली. आणि लादेनची हत्या आदल्या रात्रीच झाली आहे (कदाचित कित्येक दिवस आधी पण अगदी ऑथराईझ्ड बातमी घेतली तरी १ मे च्या मध्यरात्री..)
२ मे ला पहाटे बातमी जाहीर झाली देखील. मग अमावास्या सुरु झाली.
अमावास्येच्या आधीच ही घटना घडून गेली होती. अमावास्येचा इफेक्ट जोरदार दिसतोय. आधीच प्रभाव झाला.
अर्थात तेवढी एरर चालत असावी.
पाकिस्तानात आदल्या रात्रीच अमावस लागू झाली असल्यास ही कुशंका मागे घेत आहे.
3 May 2011 - 10:49 am | अभिज्ञ
हाण तिच्याxxx...
काय तर्क लावलाय साहेबांनि...
युयुत्सु साहेब तुम्हाला जाहिर शिसान.
;)
अभिज्ञ.
अवांतर : परवाच एका लेखात संजोप रावांनी कोणाला तरि उपक्रमावरच्या एकाचि भेट घेउन दोघांनाहि एकदम उपचार करण्याचा सल्ला दिल्याचे आठवते.
त्याम्च्या बरोबर अजुन एका साहेबांना पाठवता येईल काय?
3 May 2011 - 11:17 am | महेश हतोळकर
युयुत्सु साहेबांचा विजय असो.
सरांच्या कृपेने मीही एक भाकीत करतो.
आज दि. ३-०५-२०११ पासुनचा एक सप्ताह एका मोठ्या समुदायाला मानसिक स्थैर्य देणारा असेल. पण हे स्थैर्य अल्पायु असेल. साधारणपणे २-३ सप्ताहात ते नाहिसे होईल.
3 May 2011 - 11:18 am | विकाल
हेच भाकीत ओसामा ईतकचं दाऊद्ला कधी खरं ठरेल ओ..???
आपला जन समुदाय पणं मोठा आहे की..???
3 May 2011 - 12:18 pm | नगरीनिरंजन
बर्याच लोकांना गुढीपाडवा अशुभ जाणार आणि त्याच्या आसपास त्रास होणार अशीही पुडी सदर धागाकर्त्याने सोडल्याचे आठवते; पण त्या पुडीच्या पडताळ्याचा धागा आल्याचे आठवत नाही.
3 May 2011 - 4:35 pm | युयुत्सु
वाईट घटना तुलनेने जास्त घडत असतात. त्यामुले त्याबाबत भविष्य वर्तवले आणि पडताळ्याचे उदाहरण दिले की "हे काय नेहमीचेच आहे" असे कुचेष्टा करणारे लोक म्हणतात. म्हणून मी गुढी-पाड व्या चा ट्रॅक ठेवला नव्हता. तरी पण शंका काढलीच आहे म्हणून सांगतो की ११ मार्चला जपान मध्ये झालेल्या भूकंपा नंतर सुरु झालेल्या फुकूशिमा हाहाकाराने गुढी पाडव्या पर्यंत उग्र रूप धारण केले होते. या वेळचं वैशिष्त्ट्य असं की या वेळेस शुभ घटना घडेल असे सूचित होत होते. ते त्या प्रमाणे तसे घड्ले.
4 May 2011 - 4:31 pm | नगरीनिरंजन
पण तो धागा तुम्ही १६ मार्चला काढला. म्हणजे ज्या भूकंपाने फुकुशिमा झाले तो जास्त अशुभ की रिअॅक्टरने उग्र रूप धारण केले ते जास्त अशुभ यात गल्लत केलीत असे दिसतेय.
शिवाय ११ मार्चला त्सुनामी आली. त्या त्सुनामीने १०००० बळी घेतले. इतक्या मोठ्या अशुभ घटनेचा तुम्हाला आधी पत्ता लागला नाही पण ती झाल्यावर तिच्या परिणामांकडे बोट दाखवून पाहा माझे भाकित असे म्हणणे म्हणजे खरोखर कहर आहे. (त्या धाग्यात भारतीयांच्या मुहूर्त म्हणून ठराविक दिवस पाळण्यावर टिप्पणी होती आणि तो बर्याच भारतीयांना अशुभ आहे असे ध्वनित करणारा होता असे मला वाटते.)
असो. यावेळचे पाहू.
ओसामा मेला यात काय शुभ घडले ते थोडे विस्तार करून सांगू शकाल काय?
उद्या उर्वरित अल कायदाने या घटनेचा सूड म्हणून ठिकठिकाणी हल्ले केले तरीही ओसामाचा मृत्यु शुभच म्हणायचा का?
3 May 2011 - 1:18 pm | विनायक प्रभू
कौल काढावा काय?
जाडी कातडी कोणाची?
एमएलएम
नाडी
भविष्य
3 May 2011 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा!
आमचे युयुत्सुराव म्हणजे भारताचे नॉस्ट्रेडेमस आहेत असे आम्ही म्हणतो ते काय उगाच नाही.
भेंडी पण स्वतःच्या टेर्या बडवण्यात मश्गुल असणार्या कोणीच त्यांच्या ह्या पराक्रमाची दखल घेतली नाही ह्याचे दु:ख वाटते.
3 May 2011 - 5:38 pm | यकु
कहर!!!!!!
5 May 2011 - 1:13 am | इंटरनेटस्नेही
+१
3 May 2011 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा
AAPAN JOTISHI AAHAT KAY?SARVA JN APLYA BHAKITANCHI TAVALI UDVTAT NA,MG ME DETO HE AVHAN SVIKARUN TYANA CHOKH UTTR DENYACHI HI SANDHI TUMHI GMAVU NAKA....JOTISH SHASTRAT 1 ASA NIYAM AHE,KI 'KUNACHAHI MRUTYU VARTAVU NAYE' SANGU NAYE....THIK AHE JIVANTA MANSACHA MRUTYU SANGUN KASHALAA TYACHE URLELA AAYUSHYA KHARAB KRAYCHA?....YA MANVTA VADI JOTISH SHASTRIYA VICHAR SRNILA ANUSRUN,AAPAN MAZE-MRUTA ZALELYA MANSANCHE MRUTYU DIN(DATE'S) OLAKHNYACHE AAVHAN SVIKARTA KAY?ME APLYALA 10 DIVANGT/MELELYA MANSANCHE JANMA DIVAS/TIME/PLES HE KUNDLI SATHI LAGNARE GHATK PATHVTO,APLYALA KAMIT KAMI 6 TE 8 JANACHYA BABTIT MINIMAM TE MAXIMAM BHAKIT VRTAVTA ALE PAHIJE....BOLA...KEVHA SVIKARTAY HE AAVHAN?.....
3 May 2011 - 7:02 pm | श्रावण मोडक
प्रश्न नेमका, पण शब्दांचे खेळ करण्यास पूर्ण वाव असलेली संभाव्य परिस्थिती. 'मृत व्यक्तीचे भविष्य?' 'हे कसे शक्य होईल', असे प्रश्न येतील. 'शास्त्रा'त त्याला वाव नसावा बहुदा. ;)
आता त्यापलीकडे युयुत्सूंनी आव्हान स्वीकारलेच आणि दिलेच उत्तर तर त्यात ६० ते ८० टक्क्यांची शक्यता कशाच्या आधारे ठरवायची? पासींग तर ३५ टक्क्यांनाही होतं राव आज काल. ;)
3 May 2011 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तो वरचा प्रश्न तुम्ही वाचला आहेत काय? आणि वाचला असलात तर देवनागरीतल्या मराठीत लिहाल काय?
(ना पास) अदिती
4 May 2011 - 8:57 pm | आळश्यांचा राजा
श्रावण मोडकांना लोटांगण!
त्यांनी आम्हांसारख्या आळशी मंडळींसाठी देवनागरीत टंकन करून द्यावे ही नम्र विनंती!
6 May 2011 - 8:19 pm | अत्रुप्त आत्मा
लिहिता येत नाहि,तोवरचाच हा "प्रश्न" आहे,आनि"हे" त्या-वरच उत्तर आहे....बाय...बाय...आदितिबाय....आज ह्या पेक्षा जादा काय सुचत नाय.....
3 May 2011 - 7:12 pm | टारझन
ते "जाहिर" आणि "आव्हान" मराठीत कसं काय टंकलं हो "पापड" राव ? :)
- फाफडा
3 May 2011 - 7:51 pm | सुहास..
आपण ज्योतिषी आहात का ? सर्व जण आपल्या भाकितांची टवाळी उडवतात ना , मग मी देतो हे आव्हान स्विकारुन त्यांना चोख ऊत्तर देण्याची ही संधी तुम्ही गमवु नका....ज्योतिष्य शास्त्रात १ असा नियम आहे, की 'कुणाचाही मृत्यु वर्तवु नये' सांगु नये....ठिक आहे, जिवनात माणसाचा मृत्यु सांगुन कशाला त्याचे उरलेले आयुष्य खराब करायचे ? ....या मानवतावादी जोतिष्य शास्त्रीय विचारसरणीला अनुसरुन, आपण माझे मृत्यु झालेल्या माणसाचे मृत्यु दिन ओळखण्याचे आव्हान स्विकारता काय ? मी आपल्याला १० दिवंगत/मेलेल्या माणसाचे जन्म दिवस/वेळ/जागा हे कुंडलीसाठी लागणारे घटक पाठवितो, आपल्याला ६ ते ८ जणांच्या बाबतीत कमीत कमी ते जास्तीत जास्त भाकित वर्तवता आले पाहिजे .....बोला ...केव्हा स्विकारताय हे आव्हान ?.....
१ ) बोलती बंद करणारा आव्हानात्मक आणि काहीसे नम्र आव्हान आवडले .
२ ) प्रश्न एक नंबरी असल्याने मराठीत भाषांतर करुन दिले आहे .
३ ) असे आव्हान कोण्या ज्योतिष्याने स्विकारल्याचे एकण्यात नाही .(ज्या टिन पाटाने काहीसे असे आमचे आव्हान स्विकारले ते सध्या आमच्या पासुन आधीच काळे केलेले तोंड लपवुन फिरत आहेत.)
४ ) हे सर्व उत्सुकतेपोटी आणि आमच्या क्षुद्र ज्ञानात भर पडावी म्हणुन आहे , हुतुतुंचा...आपल हे..युयुत्स्युंचा अपमान करण्याचा हेतु नाही . ;)
धन्यवाद .
वाश्या
5 May 2011 - 4:52 pm | नारयन लेले
बाकि सर्व जाउदे फक्त प्.ब॑गाल मध्ये कोणाचे सरकार येणार याचे भाकित सा॑गुनच टाका.
बर्याच जणाना उत्सुकत्ता आहे.
तुमचे उत्तर बरोबर आलेतर , तुमच्याशि स॑पर्क कसा करवा हेहि कळवा.
विनित
5 May 2011 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा
aapan maze kam far sope kelet,mana pasun dhanyavad...me marathi typing chya prantat navin ahe, gamabhana cha typing chart samor asunahi 2 shabda lihayla 10 minita lagat aahet.tyamule jo vishay by hart lihila janar,tyat typing cha adthala aala ki aashay nit na vyakta honyachi bhiti aste....aplya kahi gamtidar dharma bandhavani mazya aadnyanachi khilli udvli ahe...tya peksha mala aapan keleli madat molachi vatte....vishaya cha gambhirya aplyalA AHE,ETARANA HA VISHAY GAMBHIR AHE,HECH AJUN KALLELA NAHIYE...ASO...PUNHA 1KDA AABHAR...
3 May 2011 - 7:00 pm | मीली
पापड साहेब आधी मराठी टायपिंग करा बरे, काही वाचायला गेले तर डोळे फिरायला
लागले आहेत!
5 May 2011 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा
HAMNE ABHI TO ENTRI MARI HE,JARA TYYAR TO HONE DO,USIME THODI MADAD KARO,NA KI KHALI SALAH DO....BAKI AAMCHA KAM MR.SUHAS YANI PUDHE NELAY...TE TUMHI VACHA MHANJE FIRNARE DOLE ANI TYABAROBAR MENDU HI SHANTA HOIL....
3 May 2011 - 7:36 pm | लिखाळ
आपण वर्तवलेले भाकित खरे ठरले असेल तर आपले अभिनंदन.
चिकित्सक लोक बाकी परामर्श घ्यायला समर्थ आहेतच :)
3 May 2011 - 9:03 pm | अजातशत्रु
मराठी अनुवाद केल्या बद्दल सुहास यांचे आभार......
बाकी आव्हान आवडले बुवा...;)
आता उत्सुकता आहे पुढे काय ????
3 May 2011 - 10:02 pm | आत्मशून्य
"रेडा गाभणा" झाला म्हणून अभीनंदन म्हणतो.
@अजातशत्रु
तूम्ही म्हणजे फारच भोळे बूवा, कसली आलीय ऊत्सूकता यात ? माननीय युयूत्सू साहेबांना हे आव्हान झेपणे या जन्मात शक्य आहे असं वाटतय वाटतं तूम्हाला ?
5 May 2011 - 8:25 pm | अजातशत्रु
@आत्मशून्य
माननीय युयूत्सू साहेबांना हे आव्हान झेपणे या जन्मात शक्य आहे असं वाटतय वाटतं तूम्हाला ?
त्याबद्दल अतीशय खात्री होती........;)
आणी उत्सुकता यासाठि होती की ते कोणती पळवाट शोधणार...
बाकी अशी वेळ आली की हे लोक अशीच काही तरी थातुर मातुर उत्तरं देतात नेहमी प्रमाणेच,
थोडं विषयांतर आहे पण ते ससाबा महाशय पुर्ण हयातीत आपले जादुचे प्रयोग दाखवायला डॉ. कोउर ना कधीच भेटले नाहीत
(हे पुरावा सिद्ध आहे)
अशीच काही तरी थातुर मातुर उत्तर
त्यांच्याशी याबाबत केलेला पत्र व्यवहार आजही अ.नि.स. कडे उपलब्ध आहे.
उघडे पडायची भिती असावी, शेवटि दोघेही गेले केस बंद !!!!!!!
मी आपले आह्वान अनेक कारणांसाठी स्वीकारू शकत नाही. त्यातले प्रमुख कारण असे, माणसाचा मृत्यू वर्तवणे हा माझ्या अभ्यासाचा विषय कधीच नव्हता.
@ युयूत्सू
आपल्या अभ्यासाचा नेमका विषय काय आहे कळेल का?,
आय मीन जे आक्षेप आहेत ते जर आपल्याला लागु/मान्य नसतील तर तुमचा ज्या विषयात चांगला अभ्यास / अनुभव आहे तो वाचकांसाठी दिलात तर बरे होईल.. आणी त्या वरच तुमचं नेक्स्ट प्रेडीकेशन येउ दयात.( पुढील २ दिवसांत आले तर फार् बरे)
@पराग दिवेकर
हा इतका गंभीर विषय आहे???:०
मला हे माहीतच न्हवतं, मी तर हे एक निव्वळ मनोरंजन म्हणुन बघत होतो,
( जसं आपण तमाशा/शिनेमा मनोरंजनासाठी असतो तसं ऐकायचं-पहायचं- सोडुन द्यायचं )
अवांतर :"रेडा गाभणा" झाला म्हणून अभीनंदन म्हणतो.@आत्मशून्य
आता रेड्याचं खरवस ही मिळेल =)
अतीअवांतर :युयूत्सू साहेबांकडे पोपट आहे का? =)
कि असच भविष्य वर्तवतात??/
6 May 2011 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा
आपन हा विशय मनोरनजन म्हनुन पाह्तो,पन जोतिशि लोक हा विशय सिरियस आहे,असच मान्तात आनि सान्ग्तातहि....म्हनुनच आपनहि त्याकदे सिरियस्लि पहिल पहिजे. म्हन्जे जोतिशि लोकन्च्या मनातल्या मनोरन्जक गोश्ति बाहेर येतिल....पराग
6 May 2011 - 2:48 am | आत्मशून्य
मेलो.
@ युयूत्सू
मग साहेब माणसाचा मृत्यू एन्कॅश करणे हा तूमच्या मार्केटींगचा वीषय आहे हे पण सवीनय नाकारा बरं.
ठीक आहे, ओळीनी,ती सर्वच्या सर्व कारणे इथे व्यवस्थीत व क्रमवार लीहा म्हणजे नंतर कोणताही संभ्रम ऊरणार नाही.
4 May 2011 - 10:03 am | अमोल केळकर
वाचनिय तसेच अभ्यासपुर्ण धागा :)
धन्यवाद
अमोल केळकर
4 May 2011 - 10:17 am | विजुभाऊ
कोणतेही भाकीत बरोबर ठरण्याची नैसर्गीक शक्यता ५०% च्या आसपास असते.
याचा अर्थ वर्तवलेली ५०% भाकीते खरी ठरतील असा होत नाही.
भाकीतातले किती प्रत्यक्ष परिस्थितीशी साधर्म्य दाखवते यावर भाकीताचा खरेखोटेपणा ठरवला जातो.
अर्थात वदलेले भाकीतांचा किती प्रमाणात खर्या घटनांशी संबन्ध लावता येतो त्यावर ते स्वीकारावे की नाही हे ठरते अर्थात स्वीकारले गेले नाही तर काहीही फरक पडत नाही पण स्वीकारले गेले तर मात्र आर्थीक आणि सामाजीक स्थितीत फरक पडतो.
उदा: पनामा कालवा खणण्याची योजना राबवणार्या इसमास आदीवासीनी तुझा मृत्यू पंखावर बसून येईल असे भाकीत / शाप वर्तवल्याचा उल्लेख आहे.
प्रत्यक्षात तो मलेरीयाने मेला. ( डासाला पंख असतात........ मलेरीयाचा व्हायरस.डासाच्या पंखावर बसून आला)
4 May 2011 - 7:27 pm | रमताराम
कोणतेही भाकीत बरोबर ठरण्याची नैसर्गीक शक्यता ५०% च्या आसपास असते
विजुभाउ, नको हो... अगदी नको.... प्लीज! असले काहीतरी नका ठोकून देऊ.
6 May 2011 - 4:15 am | Nile
=)) =))
हे आले संख्या शास्त्रज्ञ... =)) अहो तुमचं सायन्स का काय ते काय पन सांगूदे ५०% म्हणजे ५०%. तुम्ही बरोबर असण्याची शक्यता पण ५०%च आहे नाही का? ;-)
4 May 2011 - 1:36 pm | झंम्प्या
हा विशय खुपच तापत चाल्लाय. युयुस्तु साहेबांनी प्रयत्न करावा, अशी माझी इच्छा आहे. असो...
4 May 2011 - 5:30 pm | स्वलेकर
चालु द्या आम्हि वाचत आहोत
4 May 2011 - 5:39 pm | नरेशकुमार
शब्द तोंडातुन भायेरच पडेनासे झालेयंत
5 May 2011 - 11:02 am | युयुत्सु
नगरीनिरंजन
आपल्या प्रतिसादाला उत्तर द्यावे की नाही या संभ्रमात होतो. पण तरीही द्यायचा असे ठरवले आहे.
११ मार्चच्या त्सुनामीचा मला आधी पत्ता लागला नाही असे तुम्ही म्हटले. यात मला फारसे वावगे वाटत नाही. आकाशातल्या प्रत्येक घटनेकडे मी डोळा लावून बसलेलो नाही. आणि व्यावहारीक पातळीवर ते मला शक्य नाही. सध्या माझा अभ्यास ल्युनेशन्स आणि त्या अनुषंगाने घडणार्या घटना एवढ्या पुरताच मर्यादित आहे.
त्सुनामी आल्यानंतर त्यामुळे होणारा विध्वंस किती हा प्रश्न उरतोच. गुढीपाडव्याच्या सुमारास झालेली मंगळ-हर्षल युती(sudden release of energy) आगी दर्शवत होती. त्यामुळे मी काही "कहर" केला आहे असे मला वाटत नाही.
अमेरीका अतिरेक्याना कुठूनही शोधून काढू शकते आणि कारवाई करु शकते हा संदेश सामान्य जनते साठी "शुभ" संदेश आहे, जो या घटनेतून मिळाला. शिवाया ९/११ ज्या पीडीताना न्याय मिळाला ही पण शुभ घटनाच आहे.
अशुभ ग्रह रचना भविष्यात होतच राहणार आहेत, त्यांचा आविष्कार कशा रुपाने होणार एवढाच प्रश्न आहे. "या घटनेचा सूड म्हणून ठिकठिकाणी हल्ले" हे अशुभ ग्रह योगात होऊ शकते.
पराग दिवेकर
मी आपले आह्वान अनेक कारणांसाठी स्वीकारू शकत नाही. त्यातले प्रमुख कारण असे, माणसाचा मृत्यू वर्तवणे हा माझ्या अभ्यासाचा विषय कधीच नव्हता.
5 May 2011 - 12:53 pm | विसोबा खेचर
chhaan chhaan..!
5 May 2011 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा
mr.tarzan me ajun marathi typing chya prantat navin ahe,gambhir vishay aslya mule lipi peksha sadhya vishayala mahatva dyave,ya hetune me tasa lihilay....te 2 shabda devnagrit lihayla mala 10 minite lagli....tevha powr stearing vr hat base pryanta emarjanci mhanun sadhya gaditun gela tr bighdat nahi...mazya mymarathi chi krupa mazyavr 1kda purna hou de,,,mhanje me ya english aaya cha hat sodun dein...
5 May 2011 - 7:35 pm | नरेशकुमार
मनापासुन बोल्तो आहे.
तोडलंस रे भावा तोडलंस.
मि इथं आल्तो तेवा मला तर वाचायला सुद्धा येत नव्हते. (मंजे वाचलेले कळत नव्हते).
रट्टे खाउन खाउन आता बघ मि कधि कधि १०-१२ ओळिंचा पॅरा पन लिहु शक्तो. आनि प्रतिदास पन द्यायला लागलो. इंटरनेटवर ४ मानसे ओळखतात आता मला, माझे ३-४ लेखन पन इथं प्रसिध झालेलि आहे. त्याला प्रसिताद पन आलेले आहेत. मि नेहमि ते उघडुन पाहतो. खुप मस्त सुख मिळ्ते.
तुमि काय घाबरु नका, बिन्धास्त लिहा.
मिसळ्पाव जिन्दाबाद.
गर्व से कहो हम मिसळ्पाव है.
5 May 2011 - 8:57 pm | अजातशत्रु
गर्व से कहो हम मिसळ्पाव है
@नरेशकुमार
चाबुक प्रतिक्रिया........:)
पराग दिवेकर मिपा...मराठी अंतरंग, मराठीमध्ये चर्चा, (आणी मुद्दे पटले नाहीत तर भांडण्याचे) एक उत्तम संकेतस्थळ आहे अशा या मिपा परिवारात आपले स्वागत आहे.....
शेवटि आपला मराठी बाणा जपायलाच हवा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!!
धन्यवाद निलकांत साहेब...
5 May 2011 - 7:02 pm | विकाल
"emarjanci "
हा पण उच्चारा प्रमाणे विंग्राठीत लिहिलात...??
अहो, त्याचं स्पेलिंग आहे ओ...!!!
5 May 2011 - 7:38 pm | नरेशकुमार
कदाचित टायपिन्ग करताना त्यांना ईमर्जन्सि आली असावि.