ओसामा मारला गेला

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in काथ्याकूट
2 May 2011 - 8:52 am
गाभा: 

ओसामा मारला गेला

आत्ताच आलेल्या वृत्तानुसार ओसामा बीन लादेन पाकिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये मारला गेला आहे. मृतदेहाची DNA चाचणी करून अमेरिकेच्या संस्थानी कान्फर्मेशन दिला आहे. साधारणे तो एक आठवद्यापूर्वी मारला गेला असावा. थोड्याच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रकाश टाकतील

माझ्या मते एका दहशतीच्या युगाचा अंत झाला आहे , पाकिस्तानच्या धोंगीपणा सुध्डा उघड झाला आहे. जाणकारांची मते जाणून घ्यावीशी वाटतात.

(चु.भु.द्या.घ्या)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 May 2011 - 9:01 am | प्रचेतस

सकाळी सकाळी एक चांगली बातमी वाचावयास मिळाली.
बीबीसी सीएनएन पण दुजोरा देताहेत.

दहशतीच्या एका युगाचा अंत झालाय हे तर खरेच पण आता कोणी नविन ओसामा जन्म घेत नाही ना हे पण बघावे लागेल.
ओसामाच्या अंतावर ओबामा प्रकाश टाकतील हे वाचून नावातील साम्यामुळे व कृतीतील विरोधाभासामुळे अंमळ मौज वाटली. :)

माझीही शॅम्पेन's picture

2 May 2011 - 9:26 am | माझीही शॅम्पेन

ह्या निमित्ताने अमेरिकेतील ९-११ हल्ल्यातील मृताना (३००० मारले गेले) , भारतात आणि जगात झालेल्या कित्येक दहशाती कृत्यात मारल्या गेलेल्या सर्वाना श्रधांजली !!!

ओबमानी आत्ताच अतिशय संतुलित शब्दात ह्या वृत्ताला दुजोरा दिला , संतुलित ह्या साठी ह्याची जगभर विपरीत प्रतिक्रिया उमटू शकते ह्याचा त्यानी बराच विचार केलेला दिसतोय , कारण बीन लादेनला मारताना हे युध्ध इस्लामच्या विरूध्ध नाही !
हे त्यानी स्पष्ट केल आहे !

(अवांतर१ :बाराबाद एक इमारती मध्ये ओसामा मारला गेला
अवांतर २ - ओबमच ओसामा आहेत अशी एक थेयरी आहे , ती पण काही काळासाठी चर्चीली जाणार नाही
)

कारवाईची अधिकृत माहिती कुठे वाचावी ?

एका दहशतवाद्या ने दुसर्‍या दहशतवाद्याला यमसदनास पाठवले .

- टारझन टाइम्स

काही जालीय लादेन उडवायचे सत्र हाती घेणे आहे ,

- टमरिका

वाहीदा's picture

2 May 2011 - 6:29 pm | वाहीदा

आधी ,
टोळी युध्द हे दक्षिण मुंबईत जोरदार होतं आता जागतिक स्तरावर आलं एवढाच काय तो फरक !
जर ओसामा खरंच मारला गेला असेल तर ,
एका दहशतवाद्या ने दुसर्‍या दहशतवाद्याचा गेम केला !
अन नसेल तर...
बातें करलो.. जी भरलों ..
अजी किसने रोका है ??
बडें मजे की बात है, इसमें भी धोका हैं ! ;-)
शेवटी अमेरिकेवर किती विश्वास ठेवावा हे नेहमीच प्रश्नांकीत राहील.
हिंदी सिनेमा 'तेरे बीन लादेन' आठविला

चिगो's picture

3 May 2011 - 11:14 am | चिगो

येक सुधारणा आहे टार्स...
एका (सर्टीफाईड शांतताप्रिय*) दहशतवाद्या ने दुसर्‍या दहशतवाद्याला यमसदनास पाठवले .

*त्येन्ला नोबेल पीस प्राईझ मिळाले आहे म्हटलं..
अवांतर : बोलाच्याच कढीला ऊत येवून ढेकर देण्याचा प्रकार होता ते पीस प्राईझ म्हणजे...

अमेरिका हे स्वयंघोषित 'सर्टीफाईड शांतताप्रिय'' राष्ट्र आहे .
आपल्याकडे कसे स्वयंघोषित 'शांतता प्रिय'(?) गुंड लोकसभेत जाऊन राडेबाजी करतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ची दादागीरी / राडेबाजी अमेरिका करते. मानसिकता तीच आहे .

Who created Osama?? Americans did to exterminate the Russians. Now that their need has been fulfilled they term Osama who was at one point their best friend, later on a terrorist. It is symptomatic of the American way of functioning.

माझीही शॅम्पेन's picture

8 May 2011 - 9:12 pm | माझीही शॅम्पेन

अमेरिका हे स्वयंघोषित 'सर्टीफाईड शांतताप्रिय'' राष्ट्र आहे .

हे असो किंवा नसो.
भारताने ओसामाच काय घोड मारल होत म्हणून त्यानी भारताला अमेरिका अँड इस्त्रायलच्या पंक्तीत बसवावे ?
भारतात झालेल्या कित्येक दहशतवादी कारवायमध्ये अल-कायदाचा हात होता.
त्यामुळे त्याला कोणी का यम-सदनास (की जहन्नुम) मध्ये पाठवल तरी ती आनंदाची घटना आहे.

अमेरिका अन ओसामा आमच्यासाठी दोघेही सारखेच !
ओसामा मारला गेला हे आनंदाची बातमी आहेच
पण त्याबरोबरच जर बुश ला ही जहान्नुमची राह कोणी दाखविली असती तर आनंद द्विगुणित झाला असता
असो खालील बातमी तुम्ही वाचली असेलच तरी ही परत एकदा देत आहे

Chandigarh: Union Home Secretary GK Pillai on Saturday dismissed the possibility of an Al-Qaeda attack on India, saying the terror network was not a significant threat for the country.
Speaking at a seminar entitled, 'Strategies to Combat Internal Security Problems in India', at the Panjab University's Golden Jubilee Auditorium, Pillai said India had never been a prime target for Al-Qaeda's terror plots.
Pillai also expressed hope that the roots of terrorism would weaken across the world after Osama's death.
Addressing the issue of cross border terrorism at the seminar, Pillai said India had handed over to Pakistan a list of its most-wanted terror suspects.
He also said the country needed a modern police force to strengthen internal security, adding that nearly 18 lakh cops would be needed in India by 2016.

किसन शिंदे's picture

2 May 2011 - 9:32 am | किसन शिंदे

कदाचित तो एक आठवड्यापूर्वीच मारला गेला असावा....पण हे सांगताहेत आता.

किसन्राव, अहो लग्नाची गडबड होती ना एका आठवड्यापूर्वी! ;-)

खालिद's picture

2 May 2011 - 9:42 am | खालिद

१९९३ नंतर दाऊद ला फरफटत आणू असे ऐकले होते; त्याची आठवण झाली.

फक्त इथे लादेन मारला गेला एवढाच फरक!!!

गवि's picture

2 May 2011 - 9:55 am | गवि

तेरे बिन लादेन नावाचा एक सिनेमा दोनेक महिन्यांपूर्वी पाहिला त्याची तीव्रतेने आठवण झाली.

..

खरंच असं काही झालं असेल तर फारच छान.. पण त्याने काही फरक पडेल का?

कोणताही दहशतवादी निसर्गनियमानेही म्हातारा होऊन मरणारच. त्यामुळे कशाचा अंत होईल का? त्याच्याहून कडव्या कोणालातरी त्याने उभे केले असेलच ना? ती जागा घ्यायला नवे तयार असतीलच.

अभिज्ञ's picture

2 May 2011 - 10:03 am | अभिज्ञ

ओसामाचा मृत्यु.
२ मे २०११
-- ०२-०५-२०११
--"०२+०५+२" ०११
--"९" ११

अभिज्ञ.

ईश आपटे's picture

2 May 2011 - 10:07 am | ईश आपटे

योग्य... संख्याशास्त्राचा चांगला पुरावा आहे...

सहज's picture

2 May 2011 - 12:47 pm | सहज

अचूक...अभिज्ञ यांनी टाकलेल्या गळाला मासा लागल्याचा चांगला पुरावा आहे...

रमताराम's picture

2 May 2011 - 1:14 pm | रमताराम

आता पॉस्ट्राडेमसच्या भक्तांची वाट पाहतोय. ;)

अभिज्ञ's picture

2 May 2011 - 1:49 pm | अभिज्ञ

अचूक...अभिज्ञ यांनी टाकलेल्या गळाला मासा लागल्याचा चांगला पुरावा आहे...

;)

अभिज्ञ

चिरोटा's picture

2 May 2011 - 8:33 pm | चिरोटा

कसले हे लॉजिक?

२ मे २०११
-- ०२-०५-२०११
--"०२+०५+२" ०११
--"९" ११

मुंबई हल्ला २६-११ म्हणजे वरच्या फॉर्मॅट प्रमाणे- ११-२६ . म्हणजे कसाबला २०२६ साली फाशी देणार काय? की ९-११ चे हे लॉजिक फक्त अमेरिकेलाच लागू पडते?

आता... बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, कुमार केतकर ,तिस्ता सेटलवाड, महेश भट्ट , दिग्वीजय सिंग, रामविलास पास्वान, लालु, सीताराम येचुरी , ही सारी मंडळी दु:खात बुडून जातील .... अमेरिकेच्या निषेधाला थोड्याच वेळेत सुरुवात होईल.
एनडीटिव्ही ने अगोदरच रडायला व निषेधाची सुरुवात केली आहे.................. इतर प्रो-इस्लामिक विचारवंत व चॅनेल काय अक्कल पाजळतात ह्याची उत्सुकता आहे....

विजुभाऊ's picture

2 May 2011 - 10:25 am | विजुभाऊ

ओसामा ला ठार करण्यात अमेरीकेला यश आले. त्याला ठार करणे हे अर्थातच प्रतीकात्मक आहे.
तसाही अलकायदा आता संघटना अवस्थेत नावापुरती उरली आहे. ओसामा सदोदीत आजारीच असायचा . त्याचे आता कशावरच नियन्त्रण नाही. ना त्याच्याकडे कोणती सत्ता उरली आहे. त्याच्या मृत्यू मुळे फारसा लश्करी फायदा होण्यासारखा नव्हता.
गेल्या ऑगस्टमध्येच अमेरीकेला ओसामा तेथे रहात आहे हे ठाऊक होते.
तरिही अमेरीकन सैन्याने कारवाई करायला त्यानी नऊ महिने घेतले.
वारंवार ठीकाणे बदलणारा ओसामा एकाच ठीकाणी नौ महिने राहतो. हे न पटणारे वाटते.
सद्दम हुसेन ला जेंव्हा पकडले तेंव्हा त्याबद्दलचे छायाचित्रीकरण अमेरीकेने टीव्हीवर दाखवले होते. ओसामा वर काराई करूनही त्याची छायाचित्रे दाखवली गेली नाहीत. हे देखील अतर्क्य वाटते.
अमेरीकन सरकार कोणतीही गोष्ट जेंव्हा करते किंवा करीत नाही त्यामागे त्यांचे आर्थीक हितसंबन्ध असतात.

अफगाणीस्थानमधून सैन्य मोकळे करायल काहितरी निमित्य हवे होते. शिवाय ओसामाला तसेच सोडून अफगाणीस्थानमधून बाहेर पडणे हे अमेरीकेसाठी अत्यंत नालस्तीप्रद ठरले असते.
अमेरीक बहुते सैन्याला तीन चार महेने विश्रान्ती देईल आणि बहुतेक दुसर्‍या कोणत्यातरी देशाचा बळी घेईल.
तो देश बहुतेक बहुतेक इराण किंवा न जाणो पाकिस्तानच असू शकेल

ओसामा मारला गेला पण शेवटी तो कुठे ,कुठल्या देशात मारला गेला हे महत्वाचे नव्हे काय?पृथ्वीवरच्या सगळ्या राक्षसीवृत्ती असलेल्यांना काहि काळापुरता का होईना सुरक्षित निवारा देण्यासाठी पाकिस्तानने धर्मशाळा उघडली आहे असे दिसतय?

पिवळा डांबिस's picture

2 May 2011 - 10:41 am | पिवळा डांबिस

वर्ल्ड ट्रेड सेन्टरमध्ये म्रूत्यूमुखी पडलेल्या सुमारे ३००० माणसांच्या हत्येला आज न्याय मिळाला!!!
अभिनंदन, प्रेसिडेन्ट ओबामा!!!!!

किसन शिंदे's picture

2 May 2011 - 10:57 am | किसन शिंदे

प्र का टा आ.

विजुभाऊ's picture

2 May 2011 - 11:11 am | विजुभाऊ

वर्ल्ड ट्रेड सेन्टरमध्ये म्रूत्यूमुखी पडलेल्या सुमारे ३००० माणसांच्या हत्येला आज न्याय मिळाला!!!
इराक मध्ये वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्षन च्या कारणावरून केलेल्या कारवाइत मृत्यूमुखी पडलेल्या असंख्य इराकी नागरेकांच्या हत्येला न्याय कधी मिळेल कोण जाणे?

पिवळा डांबिस's picture

2 May 2011 - 12:03 pm | पिवळा डांबिस

अमेरिकेच्या निषेधाला थोड्याच वेळेत सुरुवात होईल.
एनडीटिव्ही ने अगोदरच रडायला व निषेधाची सुरुवात केली आहे..................
त्यासाठी एनडी टीव्हिपर्यंत कशाला जायला हवं?
हे घ्या इथेच हजर आहेत.....
अर्थातच ही कोल्हेकुई फाट्यावर मारली आहे!!!!!!
असो...
या निषेधवाल्यांशी वाद घालून वेळ घालवायची अजिबात इच्छा नाही. गावात आनंदोत्सव सुरू झालाय, त्यात सामील होणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे!!!!

अर्थातच ही कोल्हेकुई फाट्यावर मारली आहे!!!!!!
तुमच्या साठी हा टीना ( There Is No Alternative फॅक्टर आहे.
असो. एकतर आमच्या सोबत असाल नाहीतर विरुद्ध असाल तर विरुद्ध जायचे धाडस कोण करणार.
असो.
ओसामाला मारून अमेरीकेने फक्त प्रतीकात्मक विजय मिळवला आहे असे म्हणूयात फारतर.
त्यामुळे समाधानाने आता अमेरीका तेथून सैन्य काढून घेवू शकेल आणि ते इतरत्र गुंतवू शकेल.
या निषेधवाल्यांशी वाद घालून वेळ घालवायची अजिबात इच्छा नाही.
कोणी केला आहे निषेध? आणि कशाचा?
आम्ही फक्त इराक मधील नागरीकाना न्याय कधी मिळेल एवढेच विचारले. तर इतक्या क्याप्सेकम्स का लागल्या ;)

पण जोपर्यंत ह्या वृत्ताची पुष्टी / दुजोरा अल-कैदा देत नाही तोपर्यंत हे खरे मानावे का?
कारण हे वृत्त फक्त ओबामा यांनी दिलेले आहे, अफगाण लोकांनी नव्हे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2011 - 10:52 am | निनाद मुक्काम प...

ओबामाने केला ओसामाचा गेम
वचनपूर्तीचे राजकारण केल्याने ओबामा ह्यांची दुसरी टर्म ( अध्यक्ष पदाची ) पक्की झाली आहे .
अलकायदा कडून आता खरा लादेन जिवंत आहे .अशी बातमी लवकरच येईन ( असे मला वाटते .)
मुळात लादेन हे अमेरिकेचे निर्मिलेले अपत्य असून त्यांचा वापर रशियन फौजा अफगाण मधून हुसकावण्यासाठी सी आय ए ने आय एस आय च्या मदतीने केला .
पाकिस्तानी अध्यक्ष झरदारी ह्यांच्यावर नजीकच्या काळात जीवघेणा हल्ला होणे क्रमप्राप्त आहे ( वड्याचे तेल वांग्यावर काढणार आता अल कायदाची लोक )
अवांतर -काही महिन्यापूर्वी ह्या संघटनेचे ३ लोक पाकिस्तानमधून दाउद च्या मदतीने जर्मनीत दाखल झाले अशी बातमी देताच फ्रंक फ्रुट मध्ये सार्वजिनक वाहतुकीच्या इथे प्रचंड प्रमाणात पर प्रांतीयांची तपासणी झाली .
आज पास पोर्ट घेऊन जावे लागणार .( मागे पोलिसांनी अचानक ट्रेन मध्ये येऊन अत्यंत नम्रपणे सर्व परप्रांतीय लोकांची तपासणी केली .ती करण्या अगोदर त्यांचा त्यामागील हेतू नम्र भाषेत सांगितला .माझी जन्म तारीख वायरलेस मधून कळवली .थोड्यावेळात त्यांना ऑल क्लीअर चा इशारा मिळाला .
जर्मनीत सर्वच नागरिकांना आपले ओळख पत्र सैदैव जवळ बाळगावे लागते .ही माहिती देखील नव्याने कळली .व अनेकदा ते जर्मन लोकांची सुद्धा अशी तपासणी करतात .
अर्थात शाहरुख सारखा माझा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नव्हता .म्हणून माझीच तपासणी का बरे केली म्हणून प्रसारमाध्यमात शिमगा करायची ,मला गरज नव्हती .
अर्थात आज जर्मन भाषा शिकण्याच्या माझ्या क्लास मध्ये तणावाचे वातावरण असणार कारण मोरेको ,इजिप्त , सिरीया ,इराक मधील काही नागरिक सुद्धा माझ्या क्लास मध्ये आहेत .
त्यामुळे सौथ अमेरिकन व काही युरोपियन विद्यार्थ्यांनी काही वक्तव्ये केले तर ठिणगी उडण्याची शक्यता आहे .( लादेन खूप लोकांनी देवदूत होता )
असो मी गांधीच्या देशाचा एक शांतता प्रिय नागरिक अशी इमेज बनविली असल्याने मी कुंपणावरून गंमत जमंत पाहीन .
आज क्लास मध्ये राडा होणार हे नक्की .

दीप्स's picture

2 May 2011 - 11:38 am | दीप्स

खरंच असं काही झालं असेल तर फारच छान .......

विनायक बेलापुरे's picture

2 May 2011 - 11:42 am | विनायक बेलापुरे

ओसामा बिन लादेन याला मारला काय किंवा तसाच स्वतःच्या मरणाने मरु दिला काय याला सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये फारसे महत्व शिल्लक राहिले नव्हते. पण ओसामा जिवंत राहणे हा अमेरिकेचा पॉइंट ओफ ऑनर झाला होता. त्यामुळे मानसिक समाधानापलिकडे अमेरिकेच्या हाती फारसे काही लागले नाही. तरीही ते समाधानच किती महत्वाचे असू शकते हे अमेरिकेत चाललेल्या जल्लोषावरुन दिसून येते.

ओसामा गेली १० वर्षे सापडत नव्हता. अमेरिकेचे अश्यासाठी अभिनंदन कराय्चे की की
१) त्यानी १० वर्ष्रे ओसामा या व्यक्तिविरुद्ध अथक युद्ध चालवले. सर्व तर्हेची राजनैतिक उठाठेव, उच्च तंत्रद्यान , प्रचंड पैसा, प्रचार इतका जोर लावून ही ओसामा बिन लादेन सापडत नव्हता ही नामुष्कीची वेळ अमेरिकेवर आलेली होती.
२)इस्लाम विरुद्ध अमेरिका अनेकदा संघर्ष छेड्ला गेला पण अमेरिकेने स्वतःच्या राजनैतिक प्रयत्नामुळे आणि मुख्य मिडियाचा वापर करुन तसा भडका उडण्यापासून रोखायचा प्रयत्न केला.
३) महत्वाची गोष्ट म्हणजे - पाकिस्तान. जे त्याला दडवून ठेवायचा प्रयत्न करत होते त्यांचीच मदत घेउन अमेरिकेला हे काम कराय्चे होते. म्हणजे जो त्यांचा पार्टनर तोच पूर्णपणे विरोधक ही आहे. अमेरिकेचे हे काम किती अवघड होते हे लक्षात येते.
४) विझिरिस्तान किंवा स्वात भागातच ओसामा लपून असल्याच्या वावड्या उठवुन ते थेट त्याच्या किडनी फेल आहेत , तो जास्त जगणार नाही, किंवा त्याचा म्रुत्यू झाला अश्या तर्हेच्या वावड्या पाकिस्तानी व जगभरातील इस्लामिक धार्जिण्या मिडियाने उठवल्या होत्या. पण ओसामा सापडला तो म्हण्जे थेत त्यांच्या अंगणातच खेळताना.
५) अब्बोट्टाबाद इस्लामाबाद पासून अवघ्या ६० कि.मी. अंतरावर आहे. ते एक मिलिट्री बेस असणारे शहर आहे.
६) ओसामा बिन लादेन जिथे सापडला त्याच्या शेजारी मिल्ट्री अकेडमी आहे. याचा अर्थच सर्व काही पुरेसे स्प्ष्ट करणारा आहे.
७) सात दिवसापूर्वी जेंव्हा बराक ओमाबानी हल्ल्याची अनुमती दिली त्याच्यानंतर अल कायदा न्युक्स घेउन जगावर हल्ला करेल अश्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याचा ही अर्थ उघड व्हायला हरकत नाही.
८)ओसामा बिन लादेनची अमेरिकेच्या हातात जिवंत पडण्याची इछ्छा नव्हती. अवघड परिस्थीतीत सहकार्यानीच मला संपवावे अश्या त्याच्या आज्ञा होत्या. त्यामुळे त्याच्या डोक्यात नेमकी गोळी कोणी घातली हे अजुन तरी गूढच आहे.

आता जी काही अल कायदा शिल्लक आहे ती कुठे ना कुठे नक्की बदला घेणार. पण त्याच बरोबर अल कायदाचे जे आधीच पडलेले विविध गट आहेत ते अधिक विभाजनाच्या अवस्थेला जाण्याचीच जास्त शक्यता आहे.

अमेरिकेने निदान ९-११ च्या दोषीला, स्वतःच्या देशावर हल्ला करणार्याला ढेर तरी केले. तो त्यांच्या हातात तरी नव्हता. पण अफजल गुरु किंवा कसाब यांचे काय ?

अप्पा जोगळेकर's picture

8 May 2011 - 4:30 pm | अप्पा जोगळेकर

अत्यंत समर्पक प्रतिक्रिया आहे. आवडली.

मी आमच्या शेजारच्या दुकानातून सिगारेटी विकत घेत होतो... तिथल्या टीव्हीवर पाहातो तर छिन्नविछिन्न चेहरा दाखवत होते.. म्हटले आंय...असला भयानक चेहरा टीव्हीवर? सरकत्या पट्ट्या पाहिल्या तर दिसले लादेन खल्लास! चलो ठीक है!

Nile's picture

2 May 2011 - 12:06 pm | Nile

खोटा चेहरा. पूअर वर्क ऑफ फोटोशॉप*. (खरा चेहरा अजून सीएनएन, एनबीसीच काय फॉक्सनेही दाखवला नाहीए हो!) इंडियातल्या न्युजचॅनला लोकांना येडं बनवताना काहीही वाटत नाही का असा प्रश्न पडतो. (*एनडीटीव्हीवर पाहिला तो फोटो)

गवि's picture

2 May 2011 - 12:06 pm | गवि

आपला यशवंत सिगारेट ओढतो हे जास्त भयानक आणि दु:खदायक वाटले.

असो.

यकु's picture

2 May 2011 - 12:13 pm | यकु

:(

आपला यशवंत सिगारेट ओढतो हे जास्त भयानक आणि दु:खदायक वाटले. >>

आणि आपले गवि रॉयल चॅलेंज घेतात हे जास्त भयानक आणि दु:खदायक वाटले नाही ;)

गवि रॉयल च्यालेंजच काय पण अगदी खोपडी जरी पीत असले तरी यशवंताने सिगरेट ओढण्याबाबतीतल्या भावना अशाच राहणार..

त्यापुढे जाऊन, गवि स्वत: सिगरेट जरी पीत असले तरी या भावना तशाच राहणार कारण आपल्यासारखाच आपला मित्र यात अडकला हे पाहून आनंद होईल का?

सिगरेट ह न सोडणारा सापळा आहे.

असो.

प्रदीप's picture

2 May 2011 - 12:09 pm | प्रदीप

गेले काही दिवस पाकिस्तान व अमेरिका ह्यांच्यामधील नवरा-बायकोचची धुसफूस चव्हाट्यावर आली होती-- म्हणजे एकमेकांवर दबाव आणण्यासाठी तशी ती मुद्दाम आणण्यात आली होती. अफगाणीस्तानातून अमेरिकेने माघार घेण्याची जाहीर केलेली वेळ जवळ येते आहे, तसतसे पाकिस्तानने आपल्या मागण्या जास्तच प्रकर्षाने मांडण्यास सुरूवात गेली आहे. अमेरिकेचे ड्रोन अ‍ॅटॅक्स थांबवण्यात यावेत, किंवा त्यांच्याविषयीची आगावू माहिती पाकिस्तानी सैन्यास (पर्यायाने त्यांच्या गुप्तचर संस्थेस) पुरवण्यात यावी अशा त्यांच्या मागण्या होत्या. उत्तरादाखल अमेरिकेच्या सरकारी संस्थांचे अधिकारी (सी. आय. ए. चे प्रमुख व इतर संबंधित अधिकारी) पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे अल-कायदाशी संबंध आहेत असे जाहीरपणे म्हणू लागले होते. तेव्हा ह्या नवरा-बायकोंत लवकरच काही करार होणार असे दिसू लागले होते.

आता अमेरिकेस अफगाणिस्तानातून 'यशस्वी माघार' घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ह्या मोबदल्यात अमेरिकेतर्फे पाकिस्तानास अफगाणीस्तानात काही अधिक सवलती दिल्या आहेत काय? तसे झाल्यास त्याचा भारतावर काय परिणाम होईल, हे पहाणे आता आपल्या दृष्टिने महत्वाचे ठरावे.

विकास's picture

2 May 2011 - 8:14 pm | विकास

तेव्हा ह्या नवरा-बायकोंत लवकरच काही करार होणार असे दिसू लागले होते.

अमेरिका नवरदेव असेलही कदाचीत पण तो पाकीस्तानला बायको समजत असेल असे वाटत नाही.

आता अमेरिकेस अफगाणिस्तानातून 'यशस्वी माघार' घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहमत आहे. पण मला वाटते ओबामाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे (आपण पण उल्लेख केल्याप्रमाणे) अफगाणिस्तानातून २०१४ पासून सैन्य बाहेर काढणे चालू होणार आहे. अत्यंत योजनाबद्ध केलेला हा हल्ला आणि ओसामावध (आय होप, इथे वध म्हणले म्हणून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. ;) ) हा केवळ एका अध्यायाची समाप्ती आहे असे वाटते. रेगन-बूश (मोठा) च्या काळात केलेली चूक आत्ता अमेरिका करेल असे वाटत नाही. त्यामुळे पाकीस्तानातून अमेरिका हलेल अथवा त्यांना वार्‍यावर सोडेल असे वाटत नाही. कारण ते अमेरिकेच्या हिताचे देखील नाही. विशेष करून जो पर्यंत पाकीस्तानकडे अण्वस्त्रे आहेत अशी भिती आहे तो पर्यंत....

ह्या मोबदल्यात अमेरिकेतर्फे पाकिस्तानास अफगाणीस्तानात काही अधिक सवलती दिल्या आहेत काय?

हा शीतयुद्धाचा काळ नाही. त्यामुळे जरी काही सवलती दिल्या असल्या तरी त्या वरकरणीच असतील असे वाटते. अमेरीकेचा आज पाकीस्तानवर विश्वास असावा अशी शक्यता फार कमी आहे. किंबहूना तसा विश्वास अनेक काळ गुप्तचर संघटनांचा नसावा पण जुन्या संबंधांमुळे आणि माझ्या लेखी भारताच्या भितीमुळे राजकारणी आणि सामान्य जनतेस पाकीस्तान बद्दल जरा जवळीक होती. आज ती पूर्ण लयास गेली असे म्हणावेसे वाटते...

... कारण सर्वांनी वाचले असावेच, पण लादेन जिथे रहात होता ते पाकीस्तानी सैनिकी शिक्षण संस्थेच्या बाजूस होते. २००५ साली ते ठिकाण बांधले होते आणि सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था तेथे होती. खालील गुगल मॅप बघा: (A)

View Larger Map
जी गोष्ट सर्वसामान्य भारतीयाला गेली दहा वर्षे माहीत होती त्याचा यांना आत्ता साक्षात्कार झाला आहे असे वाटते. तरी देखील काही महाभाग म्हणतात की पाकीस्तान कॉम्प्लेसंट (आत्ममग्न?) होते/असावे! एक गोष्ट रेडीओवर ऐकली त्याप्रमाणे पाकीस्तानला पण आता बीन लादेन डोईजड झाला असावा त्यामुळे मदत केली असावी. मात्र या धाडीमधे पाकीस्तानातील कुणालाही काही माहीती असेल असे वाटत नाही. आणि आता ते बोलू सुद्धा शकणार नाहीत - तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

प्रदीप's picture

2 May 2011 - 8:58 pm | प्रदीप

एक गोष्ट रेडीओवर ऐकली त्याप्रमाणे पाकीस्तानला पण आता बीन लादेन डोईजड झाला असावा त्यामुळे मदत केली असावी.

असे अगदी असेल असे वाटत नाही. खरे तर ओसामास आता निव्वळ एक आयकॉनिक महत्व राहिले असावे. त्याची प्रकृति बर्‍यापैकी ढासळल्याच्या बातम्या गेली अनेक वर्षे येत आहेत (दोन्ही किडनी निकामी- म्हणजे तो डायलिसीसवर जगत असावा). अशा परिस्थितीत तो संघटनेच्या कार्यात स्वतः खूप भाग घेत असल्याशी शक्यता कमीच असावी. आता अल- कायदा ही संघटना इतकी बांधली गेली आहे, की त्याच्या जाण्यामुळे तिला विशेष फरक पडू नये, असे मत अल्-जझिरावर काही तज्ञ व्यक्त करीत असतांना आज पाहिले. थोडक्यात त्याला संघटनेच्या अ‍ॅक्टिव्ह कार्यात आता 'किंमत' राहीली नसावी. पाकिस्तानचा आतापर्यंतचा अ-पाकिस्तानी नागरीकांना (जे अल कायदाचे छोटे-मोठे कार्यकर्ते होते) अमेरिकेच्या हाती सोपवण्याचा इतिहास पाहता, हे त्याच दिशेने अजून एक पुढचे पाऊल नसेल ना? म्हणजे इतर काही पदरात पाडून घेण्यासाठी एक अजून (ह्यावेळी जरा मोठा) बळीचा बकरा द्यायचा?

त्यामुळे जरी काही सवलती दिल्या असल्या तरी त्या वरकरणीच असतील असे वाटते. अमेरीकेचा आज पाकीस्तानवर विश्वास असावा अशी शक्यता फार कमी आहे.

इथे प्रश्न विश्वासाचा नाही. विश्वास कशाबद्दल? अफगाणीस्तानाचे भले पाकिस्तानकडून होईल का, ह्याविषयी? अफगाणीस्तानातून माघार घेण्यास अमेरिका उत्सुक आहे. पण अर्थात काहीतरी 'भरीव' पाडून न घेता अशी माघार घेणे नामुष्कीचे ठरेल. तेव्हा जनतेच्या डोळ्यात भरेल असे यश प्राप्त करून माघार घेणे तेथील सरकारला जरूरीचे आहे. अफगाणिस्तान कुणाच्याही हवाली करण्यास ह्या परिस्थितीत अमेरिकेस फारसे कष्ट पडू नयेत.

विकास's picture

2 May 2011 - 9:23 pm | विकास

असे अगदी असेल असे वाटत नाही.

सहमतच आणि अगदी रेडीओ होस्टने पण लगेच अशा अनेक थिअरीज येत राहतील असे म्हणले...किंबहूना मला पाकीस्तानने अजिबात मदत केली नसावी (पक्षी: माहिती दिली नसावी) असे वाटते. मग ते डोईजडपणामुळे असोत अथवा बळीचा बकरा म्हणून असोत. कारण पाकीस्तानी सरकार आणि सैन्यात त्याला मानणारे भरपूर होते असे वाटते.

खरे तर ओसामास आता निव्वळ एक आयकॉनिक महत्व राहिले असावे.

खरे आहे. मात्र त्याला मारल्यामुळे जो काही संदेश दिला गेला आहे तो केवळ आयकॉनिक नाही असे वाटते.

आता अल- कायदा ही संघटना इतकी बांधली गेली आहे, की त्याच्या जाण्यामुळे तिला विशेष फरक पडू नये,

त्या संदर्भात एका तज्ञ स्त्रीचे मत ऐकले त्याप्रमाणे (अलकायद्याविरोधातील) या लढ्यात पाकीस्तानपेक्षा येमेन अधिक महत्वाचे ठरणार आहे.

ता.क. : आत्ताच मुशार्रफबाबूंचे मत वाचले. त्यांना जरी ओसामाला मारणे ही सकारात्मक वाटचाल वाटली असली तरी अमेरीकेने पाकच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला असे वाटले. तसेच ओसामा पाकीस्तानात मिळाला हे ऐकून आश्चर्य वाटले!

राजेश घासकडवी's picture

2 May 2011 - 12:16 pm | राजेश घासकडवी

दहशतवाद्यांचा शिरोमणी गेला. अजून बराच चिल्लर खुर्दा शिल्लक असावा. तो संपून जग शांततेकडे वाटचाल सुरू करो ही शुभेच्छा.

नगरीनिरंजन's picture

2 May 2011 - 1:07 pm | नगरीनिरंजन

ठीक झालं. जगात अमेरिका हीच एकमेव अनिर्बंध महासत्ता राहो ही प्रार्थना, म्हणजे भविष्यात आणखी एखाद्या लादेनला ते जन्म देणार नाहीत.

मन१'s picture

2 May 2011 - 1:16 pm | मन१

असं कुणीतरी म्हणणार् याची खात्री आहे, वाट पाहतोय.
पुढील कॉन्स्पिरसी थिअरीवर् शेकडो प्रबंध आणि लाखो पानं खर्च पडणार हे नक्की:-
१.लादेन मेलेलाच नाही.तो मुशर्रफ/झरदारी/मनमोहन/ओबामा ह्यापैकी कुणाच्या तरी घरात सुरक्षित् आहे!
२.लादेन म्हणुन कुणी नव्हतच. निव्वळ एक काल्पनिक व्यक्तिमत्व उभं करण्यात आलं होतं.
३. लादेन मरुन् खरं तर् दहा-बार वर्षे होउन गेली होती, फक्त त्याचा बागुलबुवा उभा करण्यात येत होता.
४.लादेन आणि हिंदुत्ववाद.

--मनोबा

चिरोटा's picture

2 May 2011 - 1:29 pm | चिरोटा

४.१- हिंदु धर्मातही असे लादेन आहेत आणि जगाला अजून तेवढाच धोका आहे.
५- खरे तर ओबामालाच मारायचे होते पण ऐनवेळी कुणीतरी बा चा सा केला.

अवतार's picture

2 May 2011 - 2:10 pm | अवतार

आश्चर्य वाटलेच पण त्याचे कारण वेगळे आहे. १३ एप्रिल २०११ या दिवशी मी
http://beforeitsnews.com/story/557/477/BIN_LADEN_-_KILLED_Dec_2001_-_PHO... या दुव्यावर लादेनच्या मृत्यूची बातमी वाचली. ह्या बातमीमध्ये लादेनचे छायाचित्र दिले होते. हे तेच छायाचित्र आहे जे वृत्त वाहिन्यांवर दाखविले जात आहे (Fox News आणि इतर देखील). आज सकाळी लादेनच्या मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर या संस्थळाला परत भेट दिली तेव्हा बातमी तशीच आहे, पण 'ते' छायाचित्र मात्र गायब आहे. खरे म्हणजे ह्या संस्थळावरील बातम्या फारश्या विश्वासार्ह नसतात. म्हणूनच मी त्या दिवशी त्या बातमीकडे दुर्लक्ष केले. पण जगभरातून इतरही अनेक लोकांनी १३ एप्रिल ह्या दिवशी ती बातमी वाचली होती. त्यांच्या प्रतिक्रिया तेथेच वाचायला मिळतील. त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये देखील त्या छायाचित्राचा उल्लेख आहे. त्यामुळे गूढ अजूनच वाढले आहे.

स्मिता.'s picture

2 May 2011 - 2:12 pm | स्मिता.

ओसामा मेला काय आणि जिवंत आहे काय, याचा सध्या तरी फार काही फरक होता असं वाटत नाही. तो खरंच मेला की नेहमीप्रमाणे अमेरीकेने काहितरी वावड्या उठवल्या आहेत देव जाणे. वर कोणीतरी म्हणालंय तसं ओबामांनी त्यांची दुसरी टर्म सुरक्षीत करून घेण्यासाठीचा प्रयत्न वाटतोय.

असो. जर अमेरीकेने खरोखरच त्याला मारला असेल तर राज्यकर्त्यांनी ९/११ मध्ये मारल्या गेलेल्यांचा प्रतिकात्मक बदला घेतला आणि सामान्य जनतेला समाधान मिळवून दिले. आपण २६/११ आणि सर्वच हल्ल्यांचा बदला कधी घेणार आहोत देव जाणे.

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2011 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

ओसामा ह्या आयडीने स्वत: आत्महत्या केल्याची आमची विश्वसनीय खबर आहे. काही लोक उगाच आपण त्याला गोठवले, बॅन केले वैग्रे फुकाच्या गप्पा मारत आहेत आणि काही टुंग्रुस त्यांच्या पाठिशी आहेतच.

ओसामा नव्या आयडीने कधीच कार्यरत झालेला आहे.

मृतदेहाची DNA चाचणी करून अमेरिकेच्या संस्थानी कान्फर्मेशन दिला आहे.

......

नेहमी पडणारा प्रश्न. अशा केसमधे तो ओसामाच आहे हे "डीएनए" चाचणीने निश्चित कसे करतात. म्हणजे सध्या मिळालेला (उदा. मृतदेहातला) डीएनए कशाशी मॅच करुन ठरवतात.. ? याआधी ओसामाचा काही अवयव / रक्त काढून ठेवून घेतले होते का नमुन्याला?

आधीचा सॅम्पल कुठून मिळतो? ओसामाचा बाप, मुलगा, भाऊ यांच्या सॅम्पलवरुन काही मिळवतात का ?

..खरेच अशा बाबतीत डीएनए टेस्टविषयी वाचले की नेहमी हा विचार मनात येतो.

धनंजय's picture

2 May 2011 - 5:07 pm | धनंजय

काही शक्यता : बिन लादीन कुटुंब तसे मोठे आहे, आणि ओसामा बिन लादेनचे अनेक नातलग बिगर-अल-कायदा बिगर-आतंकवादी आहेत. त्यांच्या डी-एन-एशी जुळवणूक करता येते. (म्हणजे प्रत्येक औरस भावा-बहिणीशी ५०% डीएनए जुळते, सावत्र भावाबहिणीशी २५%, चुलत भावांशी त्याहून कमी... पण प्रत्येक नातेवाइकाकडून अधिक-अधिक मॅच मिळत जाऊ शकते. असे करत करत मॅच करता येते.) अफगानिस्तानात ज्या ठिकाणी ओसामा बिन कादेनची वस्ती होती, त्या ठिकाणांवर पुढे अमेरिकन फौजांनी कब्जा मिळवला. अशा ठिकाणी बिन-लादेनने वापरलेल्या वस्तू - त्याचे डी.एन.ए असलेल्या - मिळाल्या असू शकतील.

(वैद्यकीय अभ्यासप्रकल्पांत डी.एन.ए.चा अभ्यास करत असताना ज्या व्यक्तीने अनुमती दिली, त्याबरोबर त्याच्या काही नातलगांबद्दल डी.एन.ए माहिती आपोआप कळते. या ठिकाणी ती माहिती नातलगांच्या अनुमतीशिवाय मिळालेली आहे काय, आणि ही बाब नैतिकतेच्या दृष्टीने अयोग्य आहे काय? याबाबत बरीच चर्चा चालू असते.)

'बोस्टन लीगल' या मालिकेतील 'द बॅड सीड' या भागात एकाच शुक्रजंतूपेढीतून मिळालेल्या शुक्रजंतूंमधून जन्माला आलेल्या आणि एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या मुलामुलीचे वडील एकच असल्याची शक्यता मुलाच्या आईने व्यक्त केल्यानंतर, त्या पेढीने शुक्रजंतूदान केलेल्या व्यक्तीची माहिती गोपनीय असल्याने ती देण्यास नकार दिला. मात्र या भागात डीएनए चाचणी ही पूर्णपणे खात्रीलायक नसल्याने त्यावर विसंबणे अशक्य असल्याचे त्या आईचे म्हणणे होते. (पुढे कोर्टात केस दाखल होऊन कोर्टही हा दावा मान्य करते).
(www.boston-legal.org/script/BL05x05.pdf)

अशा परिस्थितीत चुलत वगैरे नातेवाईकांमधून खात्रीलायक माहिती मिळू शकते का?

विकास's picture

2 May 2011 - 8:19 pm | विकास

सहमत.

त्याशिवाय या हल्ल्यात ओसामाचा मोठा मुलगा देखील मारला गेला आहे. तो ओसामा असल्याची खात्री तेथे हजर असलेल्या त्याच्या अजून काही कुटूंबियांकडून केली गेली आहे. पूर्ण खात्री असल्याशिवाय अमेरीकन सरकारने हे जाहीर केले नसते याची खात्री आहे. तरी देखील अजून काही दिवसात त्याची जुनी पण अप्रकाशीत अथवा त्याच्या नावाने खोटी चित्रफीत आली तर आश्चर्य वाटणार नाही.

मस्तानी's picture

3 May 2011 - 2:59 am | मस्तानी

ओसामाची डी एन ए चाचणी कशी केली असेल त्याविषयी इथे थोडे कळू शकेल

http://www.pbs.org/wgbh/nova/insidenova/2011/05/osama-bin-laden-dna-matc...

विकास's picture

3 May 2011 - 8:43 am | विकास

सीएनएनवरील डॉ. संजय गुप्ता यांनी देखील सांगितले की लादेनची बहीण बॉस्टनला होती. ती कॅन्सरने गेली. तीचा मृतदेह परत उकरून काढण्याची परवानगी घेऊन तीचे डिएनए सँपल अमेरीकन सरकारने मिळवले होते. त्या व्यतिरीक्त त्याच्या नात्यातील इतर काही जणांचे डिनए सँपल त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्याच्याशी तात्काळ मॅच करणे सहज शक्य होते. मात्र अमेरीकन सरकार आणि माध्यमे जरी १००% मॅच झाले असे म्हणत असले तरी संजय गुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे तसे समजणे अवघड आहे. फक्त अनेक सॅपलशी जर त्याचे सँपल मिळत असेल तर शक्यता वाढत जाते.

विजुभाऊ's picture

2 May 2011 - 2:32 pm | विजुभाऊ

मायला खरच की.
वाचावे ते नवलच.तेथे लादेनचे एक डोळा फुटला असल्याचे छायाचित्र दिसत आहे. मात्र त्यात दिसतो तितका ओसामा तरुण नसावा. तसेच तो मृत्यूपूर्वी किडनेच्या आजाराने त्रस्त होता म्हणे. त्या मानाने छायाचित्रातील चेहेरा बराच बरा वाटतोय

दिग्वीजय सिंग काय म्हणतात त्याची उत्सुकता आहे ......ह्याचे एक सॅम्पल " हे फेक एन्काउंटर आहे . इशरत जहा, सोहराबुद्दीन प्रमाणे ह्यामागे जातियवादी शक्ती आहेत. सुप्रीम कोर्टच्या आदेशा खाली एसाआयटी नेमुन ह्याची चौकशी झाली पाहिजे. "

नितिन थत्ते's picture

2 May 2011 - 3:03 pm | नितिन थत्ते

दिग्विजय सिंग यांनी काय करावे हे तुम्ही सुचवत आहात का?

सुधीर काळे's picture

2 May 2011 - 3:52 pm | सुधीर काळे

व्वा, नितिन,व्वा!
दिग्गू तसे स्वयंभू आहेत त्यांना सल्ल्याची गरज नसते. त्यांनी तोंड उघडल्यानंतर Damage control करण्यात काँग्रेसी लोकांचा घाम निघतो!

आपटे काळजी नसावी
दिग्विजयसिंग लवकरच अजीज बर्नी नामक तथाकथित राष्ट्रवादी लेखकाने खरडलेल्या "RSS is the actual killer of Bin Laden" अश्या आशयाच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मिरवताना दिसतीलच...........घाबरत नाहित ते कुणाला?

दिग्वीजय व इतर सेक्युलरिष्टांसाठी वातावरण तयार होत आहे..
हि बातमी वाचा
http://timesofindia.indiatimes.com/india/Who-says-Osama-was-a-terrorist/...

आणि महेश भट्ट व त्याची मादक कन्या पूजा भट्ट ह्यांची प्रतिक्रिया बघा ..ट्विटर वरची
Mahesh Bhatt: While you 'rightfully' celebrate the killing of Osama bin Laden, who will hang the other terrorist George 'Butcher' Bush.

Pooja Bhatt: Refuse to celebrate Osama's death. Next we'll all be screaming 'throw him to the lions' on a daily basis! Lust for blood is perverse.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2011 - 6:35 pm | निनाद मुक्काम प...

आपटे साहेब
हे वक्तव्य फक्त भट्ट ह्यांनी केले म्हणून तुम्ही आक्षेप घेत आहात का ?
बुश ह्यांच्या कारकिर्दीत गोन्ताना बे सारखा अंदमानच्या हून भयानक नरक जिनेव्हा कन्वेन्शन ची पायमल्ली करून बांधला .
आपल्या काही हजार निरपराध नागरिकांच्या हत्येचा बदला अमेरिकेने दहा वर्षात अफगाण मधील १५ हजार निरपराध नागरिक ( ज्यात बहुसंख्य महिला व लहान मुले ) होती .
त्यांनी तालिबानी मारले ते ह्यात १५ हजारात येत नाहीत
आज भारताचे अफगाण शी चांगले संबन्ध असून त्यांच्या विकास काम आपला सक्रीय सहभाग असतो .
.
सद्दाम व लादेन हे अमेरिकेने अनुक्रमे इराण व रशिया विरुद्ध उभे केले . व त्यांचा कार्यभाग संपल्यावर त्यांना वार्यावर टाकले .

भारताचा खरा शत्रू हाफिज ( लष्करे तय्यबा ) व दाउद
( व हमीद गुल ) ज्याने आय एस आय व माजी पाकिस्तानी सैनिकांची व कट्टर पंथीय संघटना ह्यांची एकत्र फळी भारताविरुद्ध उभे करत आहे .
लादेन चा भारताशी काहीच संबंध नव्हता .
सद्दाम फासावर गेला तेव्हा त्यांचा गौरव करणारा संपादकीय लेख सामन्यात आला होता . ( सद्दाम अमेरिकेचा जरी शत्रू असला तरी भारताचा जुना मित्र होता व त्याच मैत्रीला जागून आपल्या माजी तेलमंत्री नाईक ह्यांनी त्यांच्याशी भेटून तेल विकत घेतले होते .
थोडक्यात काय तर कसाब किंवा लष्करेचा हाफिज फासावर गेला म्हणून काय अमेरिकन चेपू किंवा त्वितर अभिनंदनाचे मथळे देणार नाहीत .(मुळात अमेरिकन लोकांसाठी इंटरपोल ने जाहीर केलेला नंबर १ गुन्हेगार लादेन महत्वाचा नंबर ३ दाउद त्यांना माहित सुद्धा नाहीत
.
व दाउद ज्यादिवशी मारल्या जाईन त्या दिवशी खरा भारतीय आनंद व्यक्त करेल ( त्याने हजारो करोड भारतात विविध धंद्यात गुंतवून आपली अर्थव्यवस्था पोखरली आहे .त्याला फरपट आणण्याची भाषा जुनी झाली .ती जो आणेन तो भारतीय पंतप्रधान कोणत्याही पार्टीचा असो तरी मला कौतुक वाटेल .बाकी प्रभाकरन मेला म्हणून श्रीलंकेत जल्लोष झाला मात्र तामिळनाडू शांत होते .तेव्हा भारतीय प्रसार्माध्येमे व सुजाण भारतीय नागरिक ह्यांनी सूचक मौन पाळले ( कारण आपला ''आवडता क्रांतिकारी व नावडता दहशतवादी'' हि जगमान्य व्याख्या आहे .)
आपली काही लोक मात्र जसे काय दहशतवाद संपला ह्याच थाटात ख़ुशी व्यक्त करत आहेत .( मुळात अलकायदा ही वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरल्या गेली होती व त्यामुळे शीण झाली होती .
लादेन आजारामुळे जवळ जवळ निवृत्त झाला होता .मात्र त्यांच्या मृत्यूमुळे ह्या संघटनेला बळ मिळेल .( प्रसार माध्यमांनी वाईट हाउस च्या बाहेरील जल्लोष दाखवला पण अरब देशातील दृश्ये दाखवली नाही .)

उदाहरण ( गफाडी ह्यांच्यावर हल्ला करणार नाही हा शब्द अमेरिका व नाटो ह्यांनी फिरवून त्यांच्या घरावर हल्ला केला .तेव्हा त्यांचा अरब हा जर्मनी येथे शिकलेला मुलगा व ३ नातू मारल्या गेले .हा मुलगा राजकरणात नव्हता . व केवळ २९ वर्षाचा होता .त्यांचे शव टीवीवर पाहून गफाडी विरोधक नागरिक अचानक अमेरिका विरोधी नारे द्यायला लागले आहेत
माझे आवडते नेते केमेरून ह्यांनी फार छान विधान केले '' मी ओबामा ह्यांचे अभिनंदन करतो त्यानी ओबामा ह्यांच्या मृत्यूचे आदेश दिले ''
ओसामा ह्यांचे निवास स्थान काही फार गुप्त नव्हते .मात्र आतच त्याला मारण्याचा उद्देश जगाचे लक्ष लिबियातील घडामोडी पासून विचलीत करण्याचे असेल .किंवा तालिबानशी बोलणी अमेरिकेने आधीच सुरु केली आहेत .त्यांचे अस्तित्व मान्य करून तेथून काढता पाय २०१५ पर्यत अमेरिकन सैन्याला जायचे आहे .तेव्हा लादेन ची हत्या ज्या वेळी झाली ते पाहून सरकार ह्या सिनेमातील डायालोग आठवला .

चिरोटा's picture

2 May 2011 - 8:25 pm | चिरोटा

सहमत आहे. बुशच्या बापानेही बर्‍यापैकी वाट लावली होती. ईराकमध्ये ५ लाख लहान मुले मॅडेलिन अल्ब्राईट्च्या/बुशच्या धोरणामुळे मृत्युमुखी पडली होती.

विकास's picture

2 May 2011 - 8:46 pm | विकास

मॅडेलिन अल्ब्राईट्च्या

? समजले नाही...

पुष्करिणी's picture

3 May 2011 - 5:28 pm | पुष्करिणी

>>'' मी ओबामा ह्यांचे अभिनंदन करतो त्यानी ओबामा ह्यांच्या मृत्यूचे आदेश दिले '' ??

'सा' चा 'बा' !!!

आत्मशून्य's picture

6 May 2011 - 11:42 pm | आत्मशून्य

मटा वरती बातमी वाचली की दीग्वीजयनं कूठतरी ओसामाचा ऊल्लेख "ओसामाजी" असा केला. ह्या आधी तो फक्त राहूल व सोनीया यांच्यामागेच "जी" लावायचा अर्थातच भाजपन यावर स्पश्टीकरण मागीतलय. मानलं भाउ, चक्क भवीष्य वर्तवल.

ओसामा बिन लादेन कालवश झाल्याची बातमी सकाळी-सकाळी वाचली. त्यांना (घाई-घाईत) जलसमाधी दिली असेही वाचले. याबद्दल कुणाला जास्त माहिती आहे काय? असल्यास वाचायला आवडेल. याबद्दलची माहिती जरूर पोस्ट करावी!

ओबामांनी त्यांना रविवारी मारले असे सांगितले. तो कालचा रविवारच होता असा समज मात्र झाला! खरे तर अमेरिकेत कुठलीही गोष्ट गुप्त रहात नाहीं. 'व्हाईट-हाऊस'मधून तर 'चाळणीसारखी गळती असते' असे म्हटले जाते. (White House leaks like a sieve). ती बातमी फुटली नाहीं त्यावरून कालच मारले गेले असावेत. मग कालच मारले गेले असतील तर इतक्यात ठार मारणे, त्यांची DNA तपासणी करणे आणि जलसमाधी हे सारे 'चट मंगनी, पट ब्याह' स्टाइलने का केले गेले बॉ?

ते खरेच ओसामा बिन लादेन होते कीं कुणी तोतया होता हे त्यांच्या बोटांचे ठसे, त्यांची बुब्बुळे आणि त्यांच्या दातांची परिक्षा करून नक्की व्हायच्या आधीच जलसमाधी कशी काय दिली गेली? इतकी घाई कशाला केली? तीही जलसमाधी कशाला? म्हणजे माशांनी शरीर खाऊन टाकावे व त्याचा मागमूसही लागू नये म्हणून? अमेरिकेत नेऊन शवविच्छेदन न करता कशाला जलसमाधी दिली?

शेवटी ते त्यांच्या 'माहेरी'च (पाकिस्तानात) सापडलेले दिसतात. तेही अबोटाबाद या इस्लामाबादपासून केवळ १००-१२५ किमीवर असलेल्या शहरात. वझीरिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानच्या सीमेवरही नव्हे! म्हणजे पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आला.

इतकी वर्षे ते पाकिस्तानी सैन्य आणि ISI च्या संरक्षणाखाली होते असे वाटायला खूपच जागा आहे!

आत्मशून्य's picture

2 May 2011 - 6:44 pm | आत्मशून्य

ती बातमी फुटली नाहीं त्यावरून कालच मारले गेले असावेत.................... ते खरेच ओसामा बिन लादेन होते कीं.......

ते जे कोणी होतं ते अनेक वचनी नक्कीच न्हवतं. बाकी अमेरीकेच्या अध्यक्षाने स्वतः पूश्टी केली असेल तर घटना असत्य मानायला जागा नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2011 - 7:00 pm | निनाद मुक्काम प...

@इतकी वर्षे ते पाकिस्तानी सैन्य आणि ISI च्या संरक्षणाखाली होते असे वाटायला खूपच जागा आहे!
अहो काका

हिलरी बाई पाकिस्तानात येऊन गेल्या तेव्हा म्हणाल्या की पाकिस्तान मधील नेते व लष्कर ह्यांना माहित आहे की लादेन कोठे आहे ते .
देवीस प्रकरण धड्ण्याच्या आधी घडलेल्या घडामोडी
१) सी आय ए चा पाकिस्तान मधील प्रमुखाचे नाव आय एस आय ने जाहीर केले .त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला व त्याला माधारी बोलावण्यात आले .
२) देवीस हा लष्करे तय्यबा व तालिबान व अलकायदा ह्यांचे संबन्ध शोधात होता व तो पाकिस्तानी अणु कार्यक्रम ची माहिती गोळा करत होता
देवीस प्रकरण हे आय एस आय व सी आय ए ह्यांचे भांडण होते .व ह्यांचे दूरगामी परिणाम होणार होते .
देवीस ची सुटका झाल्यावर
( काही दिवस व महिन्यःच्या अंतराने )
१) आय एस आय चीफ शुजा पाषा अमेरिकेत भेट देऊन आले .( द्रोण हल्ले थांबवा नाहीतर तुमची रसद आमच्या भागातून आम्ही बंद करू हि धमकी जे ८०% पाक मधून होते व त्या बदल्यात ह्यांना शस्त्र व पैसे मिळतात )
२) अंतर्गत सूत्रानुसार आय एस आय व सी आय ए दोस्ताना तुटला .म्हणजेच बोलणी फिस्कटली .
२) सी आय ए ने त्यांचे द्रोण हल्ले करण्याचा तट पाकिस्तानातून अफगाण मध्ये वळवला .
३) देवीस सारखी अनेक माणसे माघारी बोलावली किंवा त्यांची माहिती शेअर केले .
४) मात्र आय एस आय चे कृपा दृष्टी असलेला लादेन ला मारतांना पाकिस्तानी सरकारला विश्वासात न घेऊन सी आय ए ने आय एस आय ला इशारा दिला आहे .
( सी आय ए ने जर आय एस आय वर अशीच वक्र दृष्टी ठेवली तर आपली रॉ पाकिस्तानात सुमडीत येत्या काही महिन्यात मजबूत राडा करणार )
तेव्हा खरे मला आनंद होईल .
आज आमच्या क्लास मध्ये सारे अरब प्रचंड तणाव ग्रस्त होते व दबक्या आवजात चर्चा चालू होती ( लादेन त्यांच्या देशात अमेरिकेच्या उद्दाम पणाला तोंड देणारा एक हिरो म्हणून लोकप्रिय होता ).
अवांतर - मुंबईच्या डोंगरी भागात कोणीपण डी कराचीत नक्की कुठे राहतो ते सांगेन .
त्यांच्यावर हवाई हल्ला कोण करणार हा यक्ष प्रश्न आहे .
इजिप्त ने आपले नवे रंग दाखवायला सुरु केले आहेत .
त्यांनी वेगळे फिलीस्तानी राष्टाची मागणी केली आहे ( ह्या आधी मुबारक हे अमेरिका व ज्यू राष्ट्राशी दोस्ताना ठेवून होते .)
अमेरिकेला हे प्रकरण जड जाणार आहे .कारण आज इजिप्त उद्या अजून एक अशी सारी अरब राष्ट्रे पेटून उठली तर ज्यू राष्ट्राच्या अस्तित्वाला धोका असेल .
लादेन ची हत्या राजनैतिक मुहूर्त पाहून झाली आहे .( आपण ज्यू राष्ट्राने आता अमेरिकेवर दबाव आणून असाच एक हवाई हल्ला करून पाकिस्यानी अण्वस्त्र शमता उध्वस्त करावी .)
हीच भीती व शक्यता हमीद गुल ने नुकतीच वर्तवली आहे .

आत्मशून्य's picture

3 May 2011 - 2:54 am | आत्मशून्य

त्या डेवीस प्रकरणाचा अन लादेनच्या ठावठीकाणा जाणने याचा नक्कीच खोल संबंध आहे, ऊगीच नाय अमेरीकेने सर्व राजनैतीक संबंध तोडायची धमकी दीली होती.

माझीही शॅम्पेन's picture

3 May 2011 - 4:48 am | माझीही शॅम्पेन

ओसामाच्या हत्येचे जगभर दूरगामी परिणाम होणार आहेत.

१. सध्या ओसामाची अल-कायदा वर पकड असो वा नसो , त्याच्या हत्ये नंतर अमेरिका जे कोणी # २ ते ५ आहेत त्याच्यावर लक्ष द्यायला सुरूवात करेल खास करून आयमन अल-झवहिरी , एका वृत्तनुसार ओसामाला घडवण्यात त्याचा महत्वाचा हात होता.

http://www.voanews.com/english/news/middle-east/The-Status-of-al-Qaida-L...

२. सध्या लिबीया मध्ये चालू असलेल्या अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्न-चिन्ह लागले आहे , एकीकडे इजिप्त मधील लोकशाही मर्गानी आंदोलन यशस्वी होत असताना लिबीयवर गडाफींवर हल्लासत्र सुरू केल्याने शेजारी राष्ट्र (सौदी अरेबिया) सावध झाले आहेत. ह्या मुळे ही राष्ट्र हळू हळु चीन आणि रशियाकडे वळू लागली आहेत. (व्यापार , तेलाचे करार इत्यादी ) इथे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गादाफफी कडे प्रचंड पैसा आहे , जे ओसामाचे झाले ते त्याचे केव्हाही होई शकते तर तो त्याचा पैसा अल-कायदा पुनुर्जिवित करण्यासाठी वापरु शकतो.

३. ओबमाना २०११२ मध्ये होण्यारा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल.

४. जे अल-कायदा वा ओसामाला पाठिंबा देतात ते बदला घेण्यासाठी सज्ज होऊ शकतात.

आत्मशून्य's picture

2 May 2011 - 4:43 pm | आत्मशून्य

चला जोन रेंब्मो चा आता नावीन चीत्रपट ज्यामधे रेम्बो लादेनला पाकीस्तानात जाउन कसा ठार मारतो हे बघायला ऊत्सूक.

तिमा's picture

2 May 2011 - 5:41 pm | तिमा

लादेन कधी मेला , कसा मेला हे महत्वाचे नाही, पण तो मेला ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. त्यावर एवढी चर्चा होईल असे वाटले नव्हते. विशेषतः दिग्गु, तिस्ता अशा आणि अशासारख्या फडतुस व्यक्तिंना महत्व देण्याची गरजच नाही.

प्रत्येक चॅनेलवर काहीतरी वेगळं सांगत आहेत. कुणाच्या मते ओसामा तिथे पाच वर्षांपासून राहात होता तर दुसरे सांगताहेत की दीड वर्षं. आणि म्हणे गेले वर्षभर अमेरिका त्या ठिकाणी ओसामाच्या मागावर आहे. (अमेरिका इतके दिवस गप्प बसणं शक्य आहे??) ओसामाच्या घराच्या आकाराबद्दल आणि किमतीबद्दल पण असेच चालू आहे. भरीस भर म्हणून एका ठिकाणी एक बायको आणि मुलगा अटक केल्याचं दाखवतायत तर लगेच दुसरीकडे दोन बायका आणि चार मुलं म्हणे!!!! आणि या सगळ्यात त्या जुन्यापुराण्या फोटोशॉप्ड फोटोचं दळण आहेच.
नक्की बातमी काय आहे हेच कळेनासं झालंय.
बरं, एवढं सगळं होऊनही ओसामा मेल्याचा दृश्य पुरावा (फोटू/व्हिडिओ असलं काहीही) नाही. सद्दामला जगासमोर फाशी देणार्‍यांनी ओसामाला असा कसा काय समुद्रात सोडला? (हे ऐकताना उगीच एमटी आयवा मारू मधल्या जलसमाध्या आठवल्या. पण जहाजावरच्या लोकांसाठी जलसमाधी अभिमानाची बाब असते. पण ओसामाचं काय?)

धमाल मुलगा's picture

2 May 2011 - 6:06 pm | धमाल मुलगा

अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणुक कधी आहे म्हणे?
क्यांपेनिंग कधीपासून सुरू होतंय ते?

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2011 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा

ओसामा मारला गेला,हे तर चान्गलेच झाले.पन हा १का युगाचा अन्त नाहि,तर हा दहशतवादातल्या चालु प्रवाहातल्या फक्त एका प रिनामाचा अन्त आहे...व्यक्ति गेलेलि आहे,विचार अजुन जायचा आहे...हे आपन ध्यानात थेवलेले बरे.

अविनाशकुलकर्णी's picture

2 May 2011 - 6:54 pm | अविनाशकुलकर्णी

धन्य ते राष्ट्रपती..व धन्य ती जनता..
ओसामाला पाक अफगाण सीमेवर शूर सैनिकांनी कंठ स्नान घातले व या नरा धामाला व मानवतेच्या शत्रूस यम सदनास पाठवले..
सारी अमेरिकन जनता आनदाने बेहोष होवून रस्तावर नाच ताना दिसली..
राष्ट्र तेज व गौरवासाठी असे करावे लागते..तरच राष्ट्र जिवंत रहाते..
भारतीयाना असा आनंद राज्य कर्ते अनुभवायास देतील का? ....
का कासाबास व गुरूस बिर्याणी भोजन आनंद देत रहातील

चिंतामणी's picture

2 May 2011 - 8:05 pm | चिंतामणी

ओसामा मारला गेला

बर मग?

अशी मिपा ब्रांड प्रतिक्रीया नसल्याचे पाहून डवॉले पाणावले.

चिरोटा's picture

2 May 2011 - 8:18 pm | चिरोटा

मी "कोण ओसामा? "ह्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.

चिंतामणी's picture

3 May 2011 - 11:51 am | चिंतामणी

मान्य.

"कोण ओसामा? " ही सुद्धा मिपा ब्रांड प्रतिक्रीया आहे.

नितिन थत्ते's picture

2 May 2011 - 8:51 pm | नितिन थत्ते

पण काही मिपा ब्रॅण्ड प्रतिक्रिया (कसाब-अफजल-बिर्याणी) पाहून मिपाकर अगदीच वाया गेले नाहीत याची खात्री पटली. :)

पाषाणभेद's picture

3 May 2011 - 1:08 am | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ
आमाला हे असं व्हनार याची आधीच खबर व्हती. त्याचमुळं आमी हे (http://www.misalpav.com/node/17849) एक दिवस आधीच लिवेल व्हतं. फकस्त ओबामा म्हनालं व्हतं की 'बाबारे सांभाळून लिही. काही गुप्त भाषेत लिहीले तर बरं'.

बाकी काय नाय बाबा.

मस्त चाललयं आमचं.

आत्मशून्य's picture

3 May 2011 - 2:58 am | आत्मशून्य

आत्ता मी हीच प्रतीक्रीया कवीतेखाली लीहणार होतो की ती कवीता तूम्ही लादेनला डेडीकेट केली आहे काय म्हणून :)

एका न्युज वाल्यांनी (एन डी टी व्ही) तर ओबामाच्या डोक्यात गोळी लागली म्हणुन न्युज दाखवली

From General

दैत्य's picture

3 May 2011 - 2:00 am | दैत्य

ओ...नवीण ऐकलं का? 'ऊस-आंबा' झाडावरून पडला म्हने ....पडला म्हंजी पाडला....दादा म्हंत्यात, आपल्या शेजारच्यांच्याच झाडावर व्ह्ता त्यो!

ह्या धाग्याला विनोदी रूप येत चालले आहे.
त्या ससाबाच्या धाग्यासारखे करूया आपण. डोताना.

विकाल's picture

3 May 2011 - 11:52 am | विकाल

काही शंका...

१. ओसामा पाक मिलीट्री अकादमी १०० मी वर रहात होता.(म्ह्णजे घटना स्थळ).
रात्री १ वा कवायत चालू झाली.
झालेले स्फोट ६ किमी वर ऐकु गेले.(संदर्भः सोहेब आथर चा लाईव्ह ब्लोग)

२. पण पाक मिलीट्री अकादमी १०० मी वर असून आंधळी न बहीरी??

३. आलेले हवाई जहाज पाकिस्तानी नाही... हे सामान्यांना माहिती पण पाक लष्कराला नाही..??

परदेशी विमाने आल्याची माहिती देणारी यंत्रणा नाही...?? (हे शक्य आहे का गवि, एन्लाईट्न अस...)

४. ढोबळ पणे सांगता येईल की... ओबामा ने झरदारीचे नाक दाबून ओसामाचा पत्ता साफ केला. पाक चा नकार वगैरे सर्व फालतूपणा आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 May 2011 - 10:07 pm | निनाद मुक्काम प...

अगदी हाच मुद्दा पाकिस्तानी कुटतज्ञ प्रसार माध्यमांत विचारला गेले .
मूळ प्रश्न हा आहे .की नक्की विमान कुठून आले ( अफगाण किंवा पाकिस्तान )
हा प्रदेश उडान मुक्त असल्याने ही विमाने तेथे उडालीच कशी ( एक तर्क असा आहे की अमेरिका म्हणते त्या प्रमाणे त्यांची कारवाई पाकिस्तानी सरकारला माहीत नव्हती .पण जेव्हा ही तीन विमान त्या भागात आली तेव्हा त्याबद्दल काहीच हालचाल पाकिस्तान कडून कशी नाही झाली .)
ओबामा म्हणतात एकाही अमेरिकन मृत्यू झाला नाही मग ३ पैकी एक विमान खाली पडले त्याचे काय ?( कहर म्हणजे ते म्हणतात की ते दुर्घटना ग्रस्त झाले )
सद्दाम ह्यांचे पकडणे व फाशी हे जगासमोर अमेरिकेने दाखविले
प्रभाकरन चा मृत देह दिसला .
मग लादेन चा दाखवायला काय समस्या होती .
पाकिस्तानमधील कट्टर पंथीय खुद्द शुजा पाशा व किंवा कयानी ह्यांची अजून अधिकृत विधान केले नाही आहे .
त्यांना आपण काय पवित्र घ्यायचा ह्याबद्दल साशंक आहे .
बाकी देवीस च्या प्रकरणाचा ह्या च्याशी नक्की संबन्ध आहे .
माझ्या मते आय एस आय ने स्वतः ला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर होऊ नये ह्या साठी लादेन ला सी आय ए च्या हवाली केला ( आमच्या कडील अरब आज पाकिस्तानी सरकार खोटे बोलत आहेत .त्यांच्या मदतीशिवाय शक्यच नव्हते. असे म्हणत होते .)
थोडक्यात शुजा पाशा अमेरिकेत लादेन चा पत्ता देऊन आले
ह्या सर्व प्रकरण मला माया डोळस च्या इन कौन्तर सारखे वाटते .
डी चा डोक्यावर हात होता तेव्हा माया मुंबईत बिनधास्त फिरत होता .मात्र तोच हात त्यांच्या डोक्यावरून उचलल्या गेला आणी अर्धे पोलीस दल लोखंड वाला कोम्प्लेस मध्ये पोहोचले .

परदेशी विमाने आल्याची माहिती देणारी यंत्रणा नाही...?? (हे शक्य आहे का गवि, एन्लाईट्न अस...)

आलेले विमान आपले आहे की नाही हे जाणणारी उपकरणे समजा तिथे नसतील तरी त्या विमानाने नेहमीची आवश्यक रेडिओ फ्रीक्वेन्सी ट्यून केलेली नसेल आणि ते विचारलेल्या प्रश्नांना काहीच उत्तर देत नसतील किंवा समाधानकारक उत्तर देऊ शकत नसतील तर बाय डिफॉल्ट ते घुसखोरच समजले जाते.

शिवाय साध्या पॅसेंजर किंवा शिकाऊ विमानालाही फ्लाईट सुरू करण्यापूर्वी देशाच्या डिफेन्स विभागाकडून एक क्लिअरन्स नंबर मिळवावा लागतो. तो नंबर ते रेडिओवर सांगू शकले नाहीत तर ती फ्लाईट अन ऑथराईझ्ड ठरतेच.

याउपर तिथल्या लष्करी किंवा हवाईदलाच्या तळाला काहीच माहिती नसेल तर त्यांची धन्य.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 May 2011 - 10:12 pm | निनाद मुक्काम प...

हेच आता पाक प्रसार माध्यमांत सांगत आहेत
.व एक तर्क असा आहे की ३ पैकी एक विमान पडले ते पाकिस्तानी सैन्याने पाडले
.( पण हे अमेरिका व पाकिस्तान ने कबूल केले तर लादेन ला पाकिस्तान संरक्षण देत होते हे सिद्ध होईल व पुढच्या ५ वर्षात अमेरिकन सैन्य माधारी येणार आहे तेव्हा पाकिस्तानी मदत अमेरिकेला दुर्लभ होईल कारण अमेरिकेत पाकिस्तानच्या विरुद्ध असंतोष निर्माण होईन .)
आता त्यांना अशी भीती वाटत आहे .की अमेरिका अश्याच पद्धतीने त्यांचा अण्वस्त्र तळ उध्वस्त करेन .

हेच म्ह्णायचं आहे .....!!

पाक च्या संमतीनं हे झाल आहे.. अन यात ओसामा नजर्कैदेत असण्याची शक्यता अधिक...!!

पुष्करिणी's picture

3 May 2011 - 5:53 pm | पुष्करिणी

पाकिस्तानला अमेरिकेच्या हल्ल्याची माहिती नसावी हे खरं वाटत नाही. झरदारीबाबांनी आज तशी कबूली दिलीय पेपरात तरीही खोटं वाटतं. ओसामाला मारल्याचा सूड म्हणून तालिबान आणि इतर अतिरेकी पाकिस्तानवर निशाणा साधतील म्हणून असावं हे.
त्या कंपांउंड मधे काही लोकांना पकडलं गेलय आणि ते पाकिस्तानी सरकारच्या ताब्यात आहेत म्हणे. ओसामा शिवाय मारल्या गेलेल्या लोकांचे मॄतदेहही तिथेच असावेत.

तुर्तास पाकिस्तानची अवस्था "धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय "अशी झाली आहे.....ओसामावर अमेरिकेद्वारा केल्या गेलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता हे उघडपणे मान्य केले तर इस्लामी कट्टरतावाद्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल ... हे टाळण्यासाठी सध्या बिचार्‍यांची तारेवरची कसरत सुरु आहे........पाकिस्तान अवघ्या जगासाठी डोकेदुखी ठरलाय हे आता तरि जागाच्या लक्षात आले असावे....पाकिस्तानला कुठल्याही मार्गाने पुरवली जाणारी आर्थिक रसद पुर्णपणे बंद करणे .. व महत्वाच्या देशानी सगळे संबंध तोडणे हा एकच पर्याय पाकिस्तानला धडा शिकवण्यास उरला आहे....

पूर्ण नाव ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन.
वडिल मुहम्मद बिन लादेन हे ऐश्‍वर्यसंपन्न उद्योगपती आणि सौदी राजघराण्याशी संबध असणारी बडी असामी होते.
ओसामाने अर्थशास्त्र आणि व्यापाराचे शिक्षण घेतले.पण त्याची खरी आवड होती ती धर्म आणि तत्त्वज्ञ. प्रारंभी कुराण आणि मुख्यत: जिहाद या संकल्पनेचे विश्‍लेषण करण्यावर ओसामाने आपले लक्ष केंद्रित केले. तो प्रतिगामी असल्यामुळे जगात शरिया या इस्लामी कायद्याचे पुनरुज्जीवन आणि लोकशाही, कम्म्युनिझम, सोशॅलिझम किंवा इतर कुठल्याही गोष्टि मानत न्हवता अशा विचारप्रणालीला विरोध करणे हेच ओसामाच्या जिवनातील प्रमुख सूत्र होते.
जगात अफगाणिस्तान हे एकमेव मुस्लीम राज्य असल्याचे ओसामाचे म्हणणे होते.
इस्त्राइलच्या निर्मितीला विरोध आणि इस्त्राइलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकाशी युद्‌ध हेच त्याच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले होते.
आत्यंतिक धार्मिकतेकडे झुकणाऱ्या त्याच्या या विचारसरणीने ओसामा तालिबानींचे स्फुर्तीस्थान बनला होता,रशियन कम्म्युनिझमला विरोध करण्यासाठी जन्माला आलेल्या विविध संघटना अल-कायदामध्ये विसर्जित करून ओसामा जगभरातील दहशतवाद्यांचे स्फुर्तीस्थान बनला होता.
त्या नंतर त्याने ९/११ घडवुन आणले..
ओसामा बद्दल विस्त्रुत माहिती साठी खाली लिंक उपलब्ध आहे.
http://lekhsangrah.wordpress.com/2011/05/03/%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%BE%...

असाच एक क्रुर धर्मवेडा एडॉल्फ हिटलर, जर्मनी देशाचा हुकूमशहा.नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या बेसुमार कत्तली यामुळे इतीहासात नोंद झालेले आहे आता यात लादेनची भर पडली आहे.

अमेरीकेने अटक करून फाशीची शिक्षा देण्यात आलेला इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या थडग्याला त्यांच्या अनुयायांनी पवित्र क्षेत्रा सारखे महत्त्व दिलेले आहे.
तसा प्रकार पुन्हा होऊ नये यामुळे लादेन सारख्या अतिरेक्याचे अनुयायी/ समर्थक त्याचं 'पवित्र स्मारक' उभारतील आणि त्याला जिहादच्या नावावर अल्ला साठी शहीद बनवितील ते ठिकाण 'पवित्र जागा' किंवा 'तीर्थक्षेत्र' बनू नये या भीतीपोटी ओसामा बिन लादेनच्या मृतदेहाचे दफन सोमवारी सकाळी इस्लामी परंपरेनुसार? समुद्राच्या तळाशी केले / का मृतदेह समुद्रात वहावला, ते अजुन कळले नाहि या अंत्यविधीचा तपशीलवार वृत्तांत उपलब्ध होऊ शकलेला नाही.अमेरिकन सरकारने लादेनचे दफन समुदाजवळ केले, एवढीच माहिती मिळतेय. लादेनचा मृतदेह स्वीकारण्यासाठी कोणत्याही देशाचे सरकार पुढे येणे कठीण असल्यामुळेही असे करण्यात आले असावे, पण त्याला दफन करायला २-गज जमीन हि मिळू शकली नाहि हि शोकांतिका मात्र नक्कीच,का ती तशीमिळू द्यायची न्हवती? असंही असेल.

यातुन आपला देश काहि शिकनारे कि नाहि???

साला आपले सर्वच राज्यकर्ते हे भेकड राज्यकर्ते,
तिकडे पाकिस्तानात गिलानी/जरदारीला हे कसले पुरावे पाठवतात??
का नुसतीच लवलेटर्स पाठवतात हे त्यांनाच माहित,
नाही कारण तिकडुन नेहमी नकारच येतो हो =)
आणी नुसत्या मुळमुळीत चर्चा..साला अमेरीकेने तर त्याला त्यांच्याच घरात घुसून मारलं...

आणी यांनी.. त्या अफजलगुरु/ कसाबला घर जावईच करुन घेतलयं..
कसाब ला बिर्याणी,उर्दू पेपर,टीवी.अशा सुविधा मग तो शिक्षा तरी कसली भोगतोय?
अमेरिकेने ओसामा ला शोधण्यासाठी १० वर्षे जंग जंग पच्छाडलेय लाखो डॉलर्स खर्च केले पण शेवटी देशाच्या शत्रुला कंठस्नान घातलेच आणि आमच्या देशात शत्रू हातात असूनही त्याला घरजावई करुन त्याचे लाड पुरविले जात आहेत.
११ फाशीच्या केसेस पेंडिंग आहेत (किती वर्षे माहीत नाही )
आणी सगळे सोपस्कर झाले राष्ट्रपतिंची स्वाक्षरी हवी आहे ते करायला त्यांच्याकडे वेळ नाही.

हो पण त्या ससाबाच्या मयताला जायला (फोटो काढुन घ्यायला) वेळ आहे.ते देश-हिताच काम.

बाकीचे राज्यकर्ते ( देश हिताचे ) घोटाळे करण्यातच खुप बिझी आहेत.
.

आणी आपले राज्यकर्ते प्रत्येक हल्ला / बॉम्बस्फोटांची पुण्यतिथी/ आणी शहिदांना श्रध्दांजली साजरी करण्यातच धन्यता मानत आहोत...

आता अजुन एका पुण्यतिथीची भर पडली म्हणायची .......!!

अनामिका's picture

4 May 2011 - 11:41 am | अनामिका

http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/8157596.cms
सदरच्या दुव्यावरील बातमी वाचली आणि अंमळ जीव सुखावला पण क्षणभरच,लगेच भानावर आले कारण हे असले काही करावयाचे असते हे आमच्या भ्रष्टाचार करण्यात व हुजुरेगीरी करण्यात धन्यता मानणार्‍या नेत्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी देखिल येणार नाही....

ओसामाचा आदराने ओसामाजी असा उल्लेख करणारे तसे कमीच असतील (संख्येने आणि डोक्यानेही!). नाही म्हणायला सुधीरजी काळेजीही न चुकता ह्या नराधमाचा अनेकवचनी उल्लेख करून त्याला नको इतक्या उंच पातळीवर नेत आहेत. ह्या सैतानाची खरी पातळी पाताळात आहे आणि सध्या तो तिथेच पडिक आहे.

असो.
काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाच्या लांबलचक परंपरेला जागून दिग्विजयसिंगाने ओसामाचा ओसामाजी असा उल्लेख केला. त्याला मुस्लिम धर्माच्या रितीनुसार दफन न केल्याबद्दल माफक अश्रूपात केला.
आता बोंबाबोंब झाल्यावर मी असे म्हटलोच नव्हतो. माध्यमांनी विपर्यास केला. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे वगैरे नेहमीचे यशस्वी वाक्यप्रयोग होतीलच. पण
ओसामाची बाजू घेतल्यामुळे मुस्लिम व्होट बँक खूष होते असे वाटणे आणि असे असेल तर तसे असणे दोन्ही अत्यंत घातक आहे.

खुद्द ओसामा दिग्विजयसिंग आणि अगदी माता सोनियाच्या धर्माबाबत फार सहिष्णू नव्हता. निदान हे तरी लक्षात यायला हवे.

ओसामाच्या साग्रसंगीत अंत्यसंस्काराबाबत जागरुक असणारे ९/११ जळून खाक झालेल्या लोकांबद्दल इतकीच कणव दाखवतील का?

बातमी
http://72.78.249.107/esakal/20110506/4857755358367623478.htm

सामनाचा संताप
http://www.saamana.com/2011/May/06/agralekh.htm

माझीही शॅम्पेन's picture

6 May 2011 - 10:57 pm | माझीही शॅम्पेन

अतिशय चांगला मुद्दा मांडलात
दिग्विजय सिंगान्सारखे बिनडोक नेत्याने लादेनच्याच बरोबर जल-समाधी दिली पाहिजे ! मला पूर्ण खात्री आहे की हाय-कमांडच पाठिंबा असल्याशिवाय हा माणूस वारंवार अशी विधान करणार नाही

अवांतर : - बाकी मी सध्या भारतात नसल्याने कोणी काय तारे तोडताय ते जाणून घ्यायला आवडेल :)

आनंदयात्री's picture

6 May 2011 - 11:05 pm | आनंदयात्री

हामरिक्केत असाल तर ९:३० पीएम ईएसटी ते १०:३० पीएम ईएसटी ला डीडी न्युज बघत जा, बातम्या सगळ्या असतात आणि सगळ्या मुख्य वर्तमानपत्रांचा आढावा असतो.
(त्यानंतर उर्दु आणि संस्कृतमध्येही बातम्या असतात दहा दहा मिनिटे.)

माझीही शॅम्पेन's picture

6 May 2011 - 11:23 pm | माझीही शॅम्पेन

सध्या मुक्काम काही दिवसांचाच आहे , हे असे "तारे" डिडी वर बघण्यापेक्षा बरेच रोचक :) कार्यक्रम पाहतोय !!!

किशोरअहिरे's picture

7 May 2011 - 1:34 am | किशोरअहिरे

पाकिस्तान चे आजुन विभाजन होत आहे.. वजिरिस्तान आधी पासुनच तालिबान च्या हाताशी आहे
तसेच अख्ख्या पाकिस्तानात शिया आणी सुन्नी वरुन होणार्या चकमकी ज्याला आता नजिकच्या काळात तरी अंत दिसत नाही.
तसेच पाकिस्तानच्या मिल्ट्रीची द्विधा मनस्थिती... त्यामूळे पाकिस्तान चे आजुन विभाजन शक्य आहे असे दिसते..
नुकताच चीन ने अमेरिकाला दम भरला अशी बातमी होती.. पण पाकिस्तान चे विभाजन करुन आणी त्यांच्यात न मीटनारी भांडने लावुनच अमेरिका तिथुन काढता पाय घेईल.. (ब्रिटीश लोकांनी तसेच केले ना.. आणी त्यांना साथ द्यायला आपल्या देशातील ऊगाच महात्मा झालेले गांधी आणी नेहरु आहेतच :( )

बादवे १९९७ साली ब्रिटेन ची राणी भारतात बिना व्हिसा आली होती कारण तिचे म्हणने होते की ती आपल्याच प्रांतात येत आहे :( आणी अर्थातच आपल्या षंढ सरकारने ह्याबद्दल काहीच केले नाही ..

आत्मशून्य's picture

7 May 2011 - 9:17 pm | आत्मशून्य

ब्रिटीश लोकांनी तसेच केले ना..
मला ब्रीटीशांनी नक्की काय केले असं तूम्हाला म्हणायचय हे जाणून घ्यायचे आहे.