टोमॅटो सुप

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
30 Apr 2011 - 4:03 am

साहित्यः

टोमॅटो - ४
कांदा - १
लसुण - ३ पाकळ्या
तेजपान - १
काळी मिरी - ४-५
बेसिलची पाने - ३-४
मैदा - २ चमचे
ब्रेड - २ स्लाईस
ऑलिव्ह ऑइल - २ चमचे
साखर - १ चमचा
क्रिम सजावटीसाठी

कृती:

१. कांदा लांब चिरुन घ्यावा. लसुण बारीक चिरावा.
२. भांड्यामधे ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात तेजपान, काळी मिरी, चिरलेला कांदा आणि लसुण टाकुन परतुन घ्यावे.
३. त्यात २ चमचे मैदा टाकुन निट मिक्स करावे.
४. त्यात टोमॅटोचे मोठे तुकडे करुन टाकावेत. त्यात बेसिलची पाने व चवीनुसार मिठ टाकुन २ कप गरम पाणी टाकावे. ह्यावर झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे शिजु द्यावे.
५. टोमॅटो शिजल्यावर ते गाळुन घ्यावे. गाळणी मधे राहिलेल्या टोमॅटो व कांद्याची मिक्सर मधे प्युरी करुन घ्यावी.
६. एका मोठ्या भांड्यामधे मिक्सर मधुन काढलेली प्युरी परत एकदा गाळुन घ्यावी. त्यात आधी गाळलेले पाणी टाकावे.
७. हे सुप १० मिनिटे मंद आचेवर उकळु द्यावे. त्यात चवीनुसार साखर व काळी मिरी पावडर टाकावी.
८. दुसर्‍या पॅन मधे १/२ चमचा ऑलिव्ह ऑइल टाकुन त्यात ब्रेड्चे तुकडे भाजुन घ्यावेत.
९. Serving bowl मधे हे ब्रेड्चे तुकडे व त्यावर टोमॅटो सुप ओतावे. त्यावर क्रिम व बेसिलच्या पानाने garnish करुन गरम serve करावे.

टिपः

१. सुप serve करताना त्यात वरतुन mozarella cheese टाकावे. खुप मस्त चव लागते.

Tomato soup 1

tomato soup 2

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 Apr 2011 - 6:31 am | रेवती

फोटू आणि पाकृ दोन्ही आवडले.
मी साधारण असेच करते फक्त थोडी सेलरी आणि अगदी बोटभर तुकडा हिरवी ढब्बू मिरची घालते.
मोझ्झारेला चीजची कल्पना आवडली.

आभारी आहे.
सेलरी मला जास्त आवडत नाही, पण ढोबळी मिरची पण टाकतात, हे माहीत नव्हते.
आणि मोझ्झारेला चीज खरच खुप मस्त लागते. एकदा नक्की try कर. :)

रामदास's picture

30 Apr 2011 - 9:02 am | रामदास

माझ्यासाठी नवीन आहे. पण हे माझे आवडते सूप असल्यामुळे प्रयोग करीन (करवून) घेईन.

ऑलिव्ह ऑइल नसल्यास त्या जागी तुम्ही बटर वापरु शकता.

प्राजक्ता पवार's picture

30 Apr 2011 - 1:36 pm | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही छान आहेत .

अन्या दातार's picture

30 Apr 2011 - 2:13 pm | अन्या दातार

वेळखाऊ काम आहे असं दिसतंय.

सोप्पा उपायः मी सरळ मॅगीचे सूपचे पाकिट आणतो अनि ५ मिनिटात करुन पितो! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2011 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार

झकासच दिसतय की.

बादवे हे सुप टोमॅटो शिवाय कसे करतात कोणी सांग शकेल काय ?

बादवे हे सुप टोमॅटो शिवाय कसे करतात कोणी सांग शकेल काय ?

वात्रट परा!

सानिकास्वप्निल's picture

30 Apr 2011 - 4:07 pm | सानिकास्वप्निल

मस्त दिसतय सुप
मला टोमॅटो सुप आवडत नाही :( पण मोझ्झारेला चीज असल्यामुळे एकदा बनवून बघते :)

मस्तच दिसतय सूप. मला माझ्या बिघडलेल्या सुपची आठवण आली.... :(

- (आयुष्यात नंतर सूप न बनवणारा ) पिंगू

गणपा's picture

30 Apr 2011 - 11:07 pm | गणपा

फोटू ही सुरेख आलाय.
चीज ऐवजी लसुण-जीर्‍याची (साजुक) तुपातली फोडणी देउन हा प्रकार महिन्यातुन एकदा तरी असतोच. :)

आत्मशून्य's picture

30 Apr 2011 - 11:36 pm | आत्मशून्य

पण त्यामधे "Mrunalini" या आकाराचे तवंग, पदार्थ,की सजावट की आणखी काही अन्डॉक्युमेंटेड असे काही जे तरंगताना दीसत आहे, ते काय आहे ?

Mrunalini's picture

1 May 2011 - 3:30 am | Mrunalini

हा हा हा हा...
मस्त....

प्राजु's picture

30 Apr 2011 - 11:40 pm | प्राजु

मस्त!! :)

स्मिता.'s picture

1 May 2011 - 3:38 am | स्मिता.

मस्त दिसतंय सुप. पहिला फोटो बघून तों पा सु.

निवेदिता-ताई's picture

1 May 2011 - 8:24 am | निवेदिता-ताई

खुप सुंदर दिसतेय..............मस्तच.