आलू टिक्की ......
बटाटा - 500 ग्राम (8-10)
ब्रेड - 4
हिरवे मटर - 100 ग्राम
धने पाउडर - एक छोटा स्पून
अमचूर पाउडर - अर्धा स्पून
गरम मसाला - अर्धा स्पून
हिरवी मिरची तुकडे -2 , 3
कोथिंबीर
मीठ ------ स्वादानुसार
रिफाइन्ड तेल / देशी घी - 3 -४ स्पुन
विधि
बटाटा कुकर मध्ये शिजवून घ्या ,मटार गरम पाण्यात उकळून घ्या, मटार थंड झाले कि मिक्सी मध्ये बारीक करून घ्या
कढईत २ चमचे तेल घाला त्यात धने पावडर आणि हिरवी मिरची परतून घ्या ,नन्तर बारीक केलेले मटार गरम मसाला ,मीठ आणि आमचूर पावडर घालून छान मिक्स करा हा झाला मसाला तय्यार !आता बटाटा थंड झाला कि तो स्मश करून घ्या त्यात थोड मीठ घाला ,ब्रेड स्लाईस पण मिक्सी मध्ये बारीक करून घ्या .आता बटाटा आणि ब्रेड चा चुरा कणिक मळतो तसा छानपैकी मळून घ्या. आता हे मिश्रणाचे गोळे बनवा हाताला पाणी लावून हाताने पुरण पोळी बनवताना जशी वाटी बनवतो तशी वाटी बनवून त्यात वरील मसाला भरा आणि तोंड बंद करून थोडा गोलाकार आणि चपटा हलकेच हातावर थापून पॅन मध्ये थोड तेल घालून शालो फ्राय करा आलू टिक्की सॉस बरोबर किंवा वरून दही ,शेव ,आणि चाट मसाला भुरभुरून ताव मारा
:)
(फोटो : आन्तरजालावरुन साभार )
प्रतिक्रिया
28 Apr 2011 - 1:09 pm | Mrunalini
मस्त आहे पाकृ :)
28 Apr 2011 - 1:11 pm | Mrunalini
मस्त आहे पाकृ :)
28 Apr 2011 - 1:28 pm | RUPALI POYEKAR
सहज आणि सोपी पाकृ
28 Apr 2011 - 1:43 pm | टारझन
तरी म्हंटलं फोटु चांगला कसा आला ?
असो .. आलु टिक्की खाणे कधीच सोडल्या गेले आहे .
28 Apr 2011 - 2:48 pm | खादाड अमिता
एकदम खमन्ग!
28 Apr 2011 - 2:54 pm | दीविरा
फोटो बाजी मारून जातो
:)
29 Apr 2011 - 10:57 pm | निवेदिता-ताई
असेच म्हणते :)
28 Apr 2011 - 4:03 pm | ५० फक्त
आलु टिक्की मार बुक्की,
ओ पियुषा, जरा श्री. गणपांच्या पाक्रु बघा की प्रत्येक पायरीचे फोट बिटो देत जा की, आता संशय यायला लागलाय उगा इथं पोरं पाक्रु टाकायला लागले म्हणुन उगा क्मापिटिशीन म्हणुन टाकता का काय पाक्रु. नेट वरुन फोटो आणि अजुन कुठुन तरी टेक्स्ट टाकताय बळंच,
28 Apr 2011 - 4:32 pm | किसन शिंदे
:D :D
मी थोडसे वेगळे म्हणेन...पाककृती बरोबरच ती (पाकक्रुती)करतानाचा फोटू पण टाकला पाहिजे व्हता. ;)
29 Apr 2011 - 1:37 am | आत्मशून्य
हा हा हा..... बाकी आम्ही फक्त मक् आलू टीक्कीच खाल्या आहेत.
29 Apr 2011 - 9:34 am | पियुशा
@ ५० फक्त ,पिन्गु,किसन
मि गनपाशि काय काम्पिटिशन कर्नार?
आम्हि नवशिके आहोत गनपाजि कुटॅ मि कुटे :)
आनि स्टेप बाय स्टेप फोटो काधेपर्यन्त पाक्रु. चा कोळ्सा व्हायला बसलाय
तरि प्रयत्न करेन नक्कि :)
आनि हो आम्हि आनतरजालावरुन पहिल्यान्दाच फॉटो घेतलाय यापुधे मि स्वत काधलेलाच देइन भले तो कसाहि असो ;)
28 Apr 2011 - 4:07 pm | गवि
स्वतः बनवून फोटो काढला की जास्त चांगले वाटते.
बाकी पदार्थ झकासच.
28 Apr 2011 - 5:47 pm | सुधीर१३७
तुम्ही आलु-टिक्कीत मटार मिक्सीमधून बारीक करून घ्यायला सांगताय आणि फोटूत मात्र आख्खे मटार दिसतायत......
.... स्वतः पा.कृ. केल्यावरच देत जा.......... स्वतःकेल्याच्या फटुसकट.......... :wink:
29 Apr 2011 - 4:28 am | पिंगू
पीयूषा, आलू टिक्की खायला आवडते. पण जरा स्टेप बाय स्टेप माहिती देत चल..
- पिंगू
29 Apr 2011 - 10:08 am | उदय के'सागर
तुम्हि इथे ब्रेड चा वापर केला आहे, पण ज्यान्ना ब्रेड विशेश अवड्त नाहि ते ब्रेड च्या एवजि पोहे वापरु शकतात. पोहे (एक मुठ्भर) साधारणतः २ तास पाण्यात भिजत घालवे, थोड पाणि जस्तच असायला हव. त्यचा मग मस्त लगदा तय्यार होतो, हे ब्रेड ला छान पर्याय म्हणुन वापरु शकतो.
29 Apr 2011 - 10:35 am | मुलूखावेगळी
छन ग
पन..
उधार के फोतु नहि जमेन्गे
@उदय, ब्रेड, पोहे ऐवजी रव्यात घोळवुन पन चालेल कि
29 Apr 2011 - 10:47 am | उदय के'सागर
@मुलूखावेगळी: तुम्हि "rava(रवा) fry" म्हणताय का? मि actually पोह्याचा वापर इथे starch म्हणुन सुचवत होतो. पण sorry confusion झाल असेल तर :)
29 Apr 2011 - 11:04 am | मुलूखावेगळी
हो त्यात ब्रेड किन्वा पोहे ऐवजी रव्यात घोळवुन तळाय्चे. स्टार्च मीन्स? मी बाइन्ड होन्यासाठी रवा बोल्ले.
29 Apr 2011 - 12:12 pm | ५० फक्त
ओ, बाईंड व्ह्यायला ब्रेडक्रम किंवा बटर चुरा करुन / रवा भाजुन / तांदळाची जाडसर पिठी वापरतात आणि ते पण कटलेटला , आलु टिक्कीला नाही.
29 Apr 2011 - 1:51 pm | मुलूखावेगळी
हो का असे असते का? मी ओप्शन दिला होता :(
तुम्हाला इत्के सखोल ज्ञान आहे ?
अरे वा !! छुपे शेफ निघालात तुम्ही.
आता येउ द्या तुमच्य पाक्रु
29 Apr 2011 - 10:47 am | मनि२७
मस्त आहे... ह्या वीकएंड ला करून पाहते...
30 Apr 2011 - 5:27 pm | धनुअमिता
मस्त आहे..पाकू. नक्की करुन बघेन.
30 Apr 2011 - 5:43 pm | धनुअमिता
मस्त आहे..पाकू. नक्की करुन बघेन.
2 May 2011 - 5:29 pm | कच्ची कैरी
मस्त ग पीयू !!!!!!!!!!!!
4 May 2011 - 8:27 pm | अविनाशकुलकर्णी
खुप मस्त..
5 May 2011 - 11:13 am | विसोबा खेचर
जबरा..!
5 May 2011 - 8:35 pm | दीप्स्_मुम्बै
एकदम मस्त
5 May 2011 - 8:35 pm | दीप्स्_मुम्बै
एकदम मस्त