कूलिंग चार्जेस...

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
26 Apr 2011 - 11:48 pm
गाभा: 

उन्हाळा आलाय.. नागपुरात तर चांगलंच तापतंय. अशात नागपुरहून मुंबईला जायला रेल्वेस्टेशनवर पोहचलो. रात्रीची वेळ असली तरी गरमी वाटत होती. पाण्याची बाटली घेतली. पैसे विचारले तर म्हणे "पंधरा रुपये". मी किंमत पाहीली, बारा रुपये.. दुकानदाराला विचारलं, "तीन रुपये कशाचे?" तर म्हणे कुलिंग चार्जेस.. मी भांडून शेवटी न-थंड बॉटल बारा रुपयांतच घेतली...
मुंबईत दुपारी घसा सुकला म्हणून कोल्ड्रींक घ्यायला दुकानात गेलो. पुन्हा तेच.. २७ रुपयांची बॉटल ३० रुपयांत.. पुन्हा ३ रुपये कुलिंग चार्जेस.. नरडा सुकत होता म्हणून झकत घेतली. (पाण्यासारखं कोल्ड्रींक कुठं न-थंड पिणार?) पण दुकानदाराला म्हणालोच, " कोल्ड्रींकचे कसले कुलिंग चार्जेस? ते काय गरम करुन देणार का?" तोही साला वस्ताद निघाला. म्हणे, "देऊ की मागितल्यास.."

मला खरंच कळत नाही.. एवढी ढळढळीत लूट? आणि ती सर्रास चालू असते.. भिकार्‍याला भिक न देण्यामागे "फुकट खाण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात" असल्याच्या गप्पा मारतो आपण, आणि दुकानदाराचा माजुर्डेपणा, हरामीपणा मात्र निमुटपणाने सहन करतो.. "नसेल घ्यायचं तर निघा" म्हणण्याची हिम्मत असते त्याच्यात कारण की सगळेच चोरी हाच हक्क मानतात..

कुणी म्हणेल की "फ्रिजचा विजेचा खर्च नसतो का?" पण तो खरंच असा कितीसा असतो की प्रत्येक बॉटलवर २-३ रुपये जास्त घ्यावेत? आणि त्याला काही MRP इतके पैसे द्यावे लागत नाही माल घ्यायला. मार्जिन असतंच की.. टिव्हीवर मारे "जागो ग्राहक जागो" वाले MRP वर बार्गेनिंग करण्याचा हक्क सांगतात आणि आम्ही इथं जास्तीचे पैसे निमुटपणाने देतो. बरं, सांगता कोणाला? हा भ्रष्टाचार / लुबाडणूक नाही ? "कुणी आमंत्रण दिलं नव्हतं दुकानात यायला" असं म्हणून नाही भागणार, कारण की खिंडीत गाठून लाच खाणारा सरकारी नोकर आणि सगळे मिळून लुबाडणूक करणारे हे दुकानदार ह्यांची जातकुळी एकच, "येतोच की झकत, जाणार कुठे? सगळीकडे हेच आहे."

जाता जाता एक मोठी चोरी सांगतो. विमानाच्या तिकीटावरील तपशील :
Passenger Service Fee - Rs. 229 /-
Passenger Transport Service Tax - Rs. 100/-
Other Services Tax @ 10.3 %
एकाच तिकीटात तीन वेळा सर्विस फी /टॅक्स !? आंणि आपण मारे "जागरुक ग्राहक" असल्याच्या गफ्फा मारायच्या ??

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

27 Apr 2011 - 12:38 am | सुधीर१३७

किती मनावर घ्याल राव ??????? :(

खिशात सुट्टे पैसे ठेवत जा मालकं. आधी बाटल्या फोडा व मोजुन मापुन थेवढेच पैसे द्या.

आनंदयात्री's picture

27 Apr 2011 - 12:59 am | आनंदयात्री

गणपाशेठशी सहमत. चिगोशेठ 'नागपुर फास्ट' चे हिरो बरका !!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2011 - 5:24 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो बाटल्या फोडा म्हणजे तशा नव्हे हो. बाटली उघडा आधी. आणि मग २७ रुपयेच देऊन चालू लागा.

कोल्ड्रींक प्यायलाच हवे का?
पाणी आणि लिंबाचे सरबत (उसाचा रस) हे थरमॉसमध्ये रोज घेऊन फिरणे इतके त्रासदायक ठरेल काय?
जोपर्यंत आपण या सेवांवर अवलंबून असतो, म्हणजे पर्यायी व्यवस्था करीत नाही तोपर्यंत तक्रार करून उपयोग नाही. कधी कधी व्यवस्था करता येत नाही हे मान्य आहे, त्यावेळेस पैसे खर्च झाले तर काही वाटत तरी नाही. नागपुरातून निघताना, तेही अश्या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्याबरोबर दोन चार बाटल्या पाणी का नेले नाही हा प्रश्न तुम्हाला विचारला तर काय वाटेल? बाकीचे फसवतात म्हणून तक्रार करण्याचा उपयोग एका मर्यादेनंतर होणार नाही. दर दहाव्या पावलाला आपल्याला फसवायला बसलेले असतात असे लोक्......मग काय करायचे? सरकारी कामे करून घेताना आपला नाईलाज असतो. काही प्रसंगात आपणच खिंड निर्माण करून लुबाडणूक करून घेतो.
तुम्हाला पूर्वी असायची तशी प्रामाणिक माणसे आणि वागणूक अपेक्षित आहे काय?
पूर्वी माणसे प्रवासाला निघताना आपापली दशमी आणि फिरकीचा तांब्या भरूनच निघत असत.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2011 - 2:06 pm | कानडाऊ योगेशु

रेवतीतैंशी सहमत.

पण केवळ कोल्ड्रिंकलाच नाही तर दूध आणि दह्या सारख्या थंड मिळणार्या गोष्टींवर देखील कूलिंग चार्ज लावला जातो.

मोठ्या मॉलमध्ये एम.आर.पीवर वॅट लावतात पण तिच वस्तु ह्या अश्या दुकानदारांकडुन घेतली तर ते वॅट लावत नाही.

हाच काय तो थोडाफार फायदा.

आधी अश्या गोष्टींचा त्रास व्ह्यायचा पण आता जास्त लक्ष देत नाही.

अगदी राहवलेच नाही तर मी मुद्दामुन १२-१३ रू. ची वस्तु घेतल्यानंतर मुद्दामुन १००चीच नोट काढतो आणि त्याने जे २-३ रू.जास्त घेतले ते सुट्टे दिल्याचे कमिशन असे म्हणुन मनाची समजुत घालतो.

(अजुन एक गंमत म्हणजे घरी येणार्या दूधाच्या १ लिटरच्या पिशवीवर १ रू. डिलिव्हरी चार्ज घेतला जातो.पण तुम्ही अजुन एक लिटर दूध घेतले तरी त्यावर पुन्हा १ रु. डिलिव्हरी चार्ज.

एक लिटर दूध टाकायला दूधवाल्याला यावेच लागले असते ना मग दूसर्या लिटरवर चार्ज कशासाठी?

रेवतीतैंच्या म्हणण्यानुसार मग आता म्हैस पाळावी का? (ह.घ्या.) )

चिगो's picture

27 Apr 2011 - 4:42 pm | चिगो

विचार चांगला आहे, ताई. पण मला सांगा, खरच तीन-चार बॉटल्स सोबत घेवून फिरणं जमतं का प्रत्येकवेळी? एक बॉटल घेऊन फिरायचं आणि स्टेशनवर भरायची म्हटल्यास तेही शक्य नाही आजकाल, कारण की पाण्याच्या बॉटल्स आल्या तेव्हापासून रेल्वे-बस स्टेशनवरचे नळ सुकायला लागलेयत !
निंबू-पाणी घ्यायचं म्हटलं तर तेही आता महाग झालंय. आणि पाणीपुरीनंतर कुठल्याही पाण्याबद्दल मनात शंका येते हो..

तुम्हाला पूर्वी असायची तशी प्रामाणिक माणसे आणि वागणूक अपेक्षित आहे काय?<<

नाही.. आधी थंड कोल्ड्रींक-पाणी सुद्धा MRP वरच मिळायचे. पण मग कुणीतरी ही "कुलिंग चार्जेस"ची शक्कल काढली, आणि लोक निमुटपणे ऐकतात नी घेतात, हे कळल्यावर आता रुढ झालीय. मी तर गावात १० रु.चे रिचार्ज कुपन ११-१२ रुपयांना विकतांना आणि विकत घेतांनाही पाहीलयं.
प्रामाणिकपणाची अपेक्षा नसली तरी बेमुर्वतपणाची आणि उर्मट लुबाडणूकीची चिड वाटते, एवढंच...

छोटा डॉन's picture

27 Apr 2011 - 4:49 pm | छोटा डॉन

>>प्रामाणिकपणाची अपेक्षा नसली तरी बेमुर्वतपणाची आणि उर्मट लुबाडणूकीची चिड वाटते, एवढंच...

सहमत आहे.

बाकी ह्या यादीत अनेक वस्तु जोडता येतील, पुण्यातले भामटे तर प्रत्येक गोष्टीत पैसा काढायला पाहतात ...
असोच.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी ह्या यादीत अनेक वस्तु जोडता येतील, पुण्यातले भामटे तर प्रत्येक गोष्टीत पैसा काढायला पाहतात ...
असोच.

डाण्रावांनी ताबडतोब पुण्यातुन तोंड काळे करावे आणि पैसे वाचवावे अशी विनंती.

पुण्यातले भामटे तर प्रत्येक गोष्टीत पैसा काढायला पाहतात
अर्रर्र्.......तुमची शहराची निवडच चुकली डॉनराव! दुसर्‍यांना कशाला नावं ठेवताय.
मुंबई, दिल्ली, बंगलोर ही शहरे मस्तच. कोणी कोणाला लुबाडत नाही. तिथे जावा.

श्रावण मोडक's picture

27 Apr 2011 - 11:09 pm | श्रावण मोडक

पाण्याच्या बॉटल्स आल्या तेव्हापासून रेल्वे-बस स्टेशनवरचे नळ सुकायला लागलेयत !

सुकायला लागलेले नाहीत. सुकवले जाताहेत. अन्यथा त्या बाटल्या खपणारच नाहीत. त्या दृष्टीने सुकायला लागलेयत हे शब्द अवतरणातलेच वाचले.

चिगो's picture

29 Apr 2011 - 11:27 am | चिगो

सुकायला लागलेले नाहीत. सुकवले जाताहेत.<<
तेच हो. पण सरकारी माणूस आपल्या जातीतल्यांना डायरेक शिव्या कसा हाणंल? म्हणून शालजोडीतून हाणायचा..
मजबुरी समजा, राव.. (ह्येलाच "व्येवसायिक नितीमत्ता" म्हण्त्यात का?) ;-)

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2011 - 7:48 am | पिवळा डांबिस

तुमची भावना समजली चिगो!
पण मुंबईत ३० रू ना मिळणारी पाण्याची बाटली नागपूरात १५ रू ना मिळते याचाही आनंद साजरा करा की!!!!
;)
आणि समजा तुम्ही १०० बाटल्या नागपुरात घेतल्या असत्यात आणि त्या मुंबईत आल्याबरोबर विकल्या असत्यात तर १५०० रू फायदा झाला असता की!!! नाहीतरी नागपूर-मुंबई ट्रीप करणारच होतात!!!!
ये मराटी लोगको बिजनेस करनेका समझताच नै!!!!!
:)
-यल्लोराम नॉटीमल

चिगो's picture

27 Apr 2011 - 4:45 pm | चिगो

अरे बॉब्बा.. हे तर माहीतच नव्हतं.. आणि सरकारी नोकरी करतांना बिझन्येस करता येत नाही ना काका..
पण तुमची आयडीयाची कल्पना आवडली ब्वॉ..

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2011 - 7:53 am | अविनाशकुलकर्णी

बर्याच थ्ठिकाणी रांजणात बाटल्या थंद करतात..आत बर्फ असतो...पण तो शवागरा तिल असतो.....प्रेताची विल्हे वाट लागल्यावर तो उरलेला बर्फ विकतात .तो बर्फ १/२ किमतिला मिळतो...

अश्या ठिकाणी तिथे कुलिंग चार्ज घेत नाहित असे कळते..
असे वाचण्यात आले..

चिरोटा's picture

27 Apr 2011 - 8:31 am | चिरोटा

पाणीपुरी प्रमाणे आता बाहेर पाणी प्यायची पण ईच्छा गेली.

तिमा's picture

27 Apr 2011 - 8:54 am | तिमा

ठिकाणी 'स्पाइन चिलिंग चार्जेस" घेत असतील!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2011 - 5:29 pm | llपुण्याचे पेशवेll

पुणे रेल्वे स्टेशन च्या आसपास असा बर्फ स्वस्तात मिळतो. त्यामुळे त्या भागातले गुर्‍हाळवाले बर्‍याचदा तोच बर्फ वापरतात असे पूर्वी सकाळमधे वाचल्याचे स्मरते. त्यामुळे तेव्हा घराबाहेर कुठेही बर्फ खाऊ नका असे सकाळ वाल्यांनी सुचवले देखील होते.
शवागारातला बर्फ अनेक ठीकाणी रस्त्यावर सरबते विकणारेही वापरतात त्यामुळे मी रस्त्यावर सरबत फ्रुटप्लेट वगैरे कधीच खात नाही.

मुलूखावेगळी's picture

28 Apr 2011 - 5:43 pm | मुलूखावेगळी

शवागारातला बर्फ अनेक ठीकाणी रस्त्यावर सरबते विकणारेही वापरतात त्यामुळे मी रस्त्यावर सरबत फ्रुटप्लेट वगैरे कधीच खात नाही.

+१
बाकि मी पन परवा ३५ रुपये दिले २३ रुपयांच्या कोल्ड्रिन्क ला.

स्वानन्द's picture

27 Apr 2011 - 10:28 am | स्वानन्द

मागे याच विषयावर माझा अनुभव इथे लिहीला होता.
http://www.misalpav.com/node/10496

तुमचा त्रागा समजू शकतो.

नरेशकुमार's picture

27 Apr 2011 - 11:07 am | नरेशकुमार

औघड आहे. जास्त पैशे जातात प्रत्येक वेळीला.

मदनबाण's picture

27 Apr 2011 - 11:59 am | मदनबाण

चिगोराव... असं टकुर्‍याला त्रास घेउन काय फायदा ? अवं हिथ सगळीच चोर मंडळी हायेत तर रोखणार कोणाला ?
आता बघा ना औषध कंपन्यांच्या रोज जाहिराती टिव्हीवर पाहतो...त्यातली काही औषधे परिणामकारक नसतातच ! तरी देखील लोकांचे या औषधावर करोडो रुपये खर्च होत आहेत....मग त्यांच्या विक्रीवर / जाहिरातीवर सरकार / ग्राहकमंच बंदी का आणत नाही बरं ?
(संदर्भ :--- http://theindianawaaz.com/index.php?option=com_content&view=article&id=1...)
असो...
जाता जाता :--- डोंबिवली फास्टचा इफेक्ट प्रत्येक सामान्य माणसाच्या अंगात भिनला पाहिजे असे म्हणेन...
http://www.youtube.com/watch?v=NXlfy8_w3YE&feature=related

भारीबंडू's picture

27 Apr 2011 - 12:26 pm | भारीबंडू

लुट आहे सरळ सरळ
आयपील सामन्यादरम्यान १ पेप्सी ७० रुपये (१०० मिली पेक्षा पण कमी ) आणि पाण्याचे ५ छोटे ग्लास १०० रुपये अशी लुट होत आहे
आणि कोणत्याही मल्तिप्लेक्ष मध्ये जा नि शित्पेयाचा दर विचारा जरा

शेगावला संस्थानाच्या कँटीन मध्ये १२ रुपये किमतीची बॅली कंपनीची मिनरल वॉटर ची बाटली ८ रुपयाला मिळते....

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार

चिगो लेका पाण्यातुन घ्यायला चालु कर बर ;)
तुम्हा लोकांना नखरेच फार.

चिगो's picture

27 Apr 2011 - 4:50 pm | चिगो

पाण्यातूनच घेतो मी..;-) वोडकात कधी मधी लिम्का. आणि पाणी असो का कोल्ड्रींक, "कु.चा." दोन्हीवर असतात रे दादा..

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार

अरे म्हणजे साध्या पाण्यातुन रे. कशाला उगाच गार वैग्रे ? ;)

नाहितर सरळ आपला फ्लास्क वापरावा.

चिगो's picture

28 Apr 2011 - 5:06 pm | चिगो

>>अरे म्हणजे साध्या पाण्यातुन रे. कशाला उगाच गार वैग्रे ?<<
हल्ली मिपावर हे "वैग्रे"चं प्रस्थ बरंच वाढलंय, त्यावरुन मनात विचार आला..
हिंदीत वगैरे= वगैरा, तर वैग्रे = वैग्रा ?

अवांतर : कुणाची तरी स्वाक्षरी होती ना, "माझा हा प्रतिसाद तुम्हाला अश्लील तर वाटत नाही ना"?..

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

हल्ली मिपावर हे "वैग्रे"चं प्रस्थ बरंच वाढलंय,

त्याच काये की सध्या पंगाशेठना लांब लांब प्रतिसादात लिहिण्यातुन वेळ मिळत नाही. मग आम्हीच ठरले की त्यांच्या ऐवजी आपणच मराठी भाषेत काही अमुल्य शब्दांची भर घालावी.

चिगो's picture

29 Apr 2011 - 11:23 am | चिगो

मग आम्हीच ठरले की त्यांच्या ऐवजी आपणच मराठी भाषेत काही अमुल्य शब्दांची भर घालावी.<<
वा, नक्कीच ! तुम्ही, टारु, धमु आणि इतर मिपाकर मित्र मराठी (आमची तरी) समृद्ध करताहात, ह्यात आम्हाला संदेह नाय.. :-)

धमाल मुलगा's picture

27 Apr 2011 - 10:19 pm | धमाल मुलगा

हल्ली काही काही दुकानदार मला ह्याच अट्टाहासामुळं कोल्ड्रिंक्स विकत नाहीत आता.

पण फोकलीचे फुकटचं लुबाडायचं काही सोडत नाहीत.