हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात.
हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.
हलव्याचे कालवण
लागणारे जिन्नस:
हलव्याच्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
वाटण : ओले खोबरे पाव वाटी, आले, लसुण, मिरची कोथिंबीर
तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
मिठ
चिंचेचा कोळ
क्रमवार पाककृती:
हलवा कापुन हलव्याच्या डोक्याचा व शेपटाचा भाग रश्यासाठी वापरा व मधला भाग तळण्यासाठी वापरा.
कालवण :
हलव्याच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या. भांड्यात तेल तापवुन त्यावर लसुण पाकळ्यांची खमंग फोडणी द्या. लगेच त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन वाटण, चिंचेचा कोळ टाका. मग कालवणासाठी च्या तुकड्या त्यात टाका. मिठ टाका. उकळी आल्यावर कालवण ७-८ मिनीटांत तय्यार.
तळण्यासाठी :
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
हवे असल्यास आल, लसुण वाटण किंवा लसणाच्या ५-६ ठेचलेल्या पाकळ्या.
पाककृती
साहित्यातले जिन्नस एकत्र तुकड्यांना लावा. तवा चांगला तापल्यावर तेल टाकुन हवे असल्यास लसुण टाकुन त्यावर तुकड्या मस्त मिडीयम गॅसवर खरपुस तळा.
अधिक टिपा :
तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते.
पुन्हा केल्यावर फोटो नक्की टाकते.
प्रतिक्रिया
21 Apr 2011 - 1:11 pm | टारझन
ह्या क्षेत्रातल्या पाकृ म्हणजे तुमचे होम ग्राउंडच :) रेडी पाकृचे फोटु नसले तरी ठिकाय ..
अवांतर :
बाकी मला ह्या माश्याचं नाव मोठं विचित्र वगैरे वाटतं :) कसा मागायचा तो मासा . जर मासेवाली असेल तर ? ;)
- ( गाजर हलवा प्रेमी ) टारझन
21 Apr 2011 - 1:38 pm | गणपा
अगो कुठे फेडशील ही पापं? आज संकष्टी.... :)
बाकी हलवा हा एके काळी पापलेटा पेक्षा महाग मिळायचा. चुलत भावंडच ती.
पण पापलेट सारखी याची खवलं लगेच निघत नाहीत.
त्यामुळे नीट साफ नाही केली तर पोटात खुप दुखते. पापलेट हलवे बांगडे बोंबील असले मासे इकडे मिळत नाहीत. :(
सध्या केवळ वाट पहाणंच हातात आहे.
21 Apr 2011 - 1:38 pm | गवि
गरिबांचे पापलेट..स्वस्त आणि मस्त... :)
21 Apr 2011 - 4:52 pm | प्रियाली
हलवा पापलेटपेक्षा स्वस्त असतो का? मला नाही वाटत किंमतीत फार फरक असतो असे. असो.
हलवा खाऊन बरीच वर्षे झाली पण चंदेरी रंगामुळे आणि खवले नसल्याने पापलेट जास्त आवडते. :)
21 Apr 2011 - 4:54 pm | गवि
निम्म्याने असतो किंमतीला हो...असं काय म्हणता..
21 Apr 2011 - 4:57 pm | प्रियाली
बरीच वर्षे झाली खाऊन ना म्हणून आठवत नाही. तसा हलवा पापलेटपेक्षा आकाराने बराच मोठा असतो नाही का?
24 Apr 2011 - 5:22 pm | स्वाती२
प्रियाली, देशात स्वस्त असतो पण इथे सरागात सारखाच असतो भाव.
22 Apr 2011 - 9:21 am | विसोबा खेचर
---- !!!
22 Apr 2011 - 9:41 am | निकिता_निल
कच्चे तुकडे असुनही डोळ्यांसमोर तेलात तळलेले हलवा आणि पापलेटचे तुकडे दिसायला लागलेत.
मत्स्यप्रेमि निता
24 Apr 2011 - 5:42 pm | रेवती
पाकृ, फोटू आवडले.
24 Apr 2011 - 8:01 pm | जागु
पापलेट स्वस्त असते तर हलवा महाग असतो.
पापलेट पेक्षा हलवा चविलाही चांगला असतो.
25 Apr 2011 - 4:36 am | गवि
पापलेट स्वस्त असते तर हलवा महाग असतो....?????????
>>>>>>>
I think then it must be different at different locations & times.
I have always seen white pomphret in the range RS 600-1000 per kg (small to large..not very small ones) and halwa in 350-400. Hence bought it many times instead of paplet or surmai.
Locations: thane & vashi
Aso...
25 Apr 2011 - 11:58 pm | खादाड अमिता
गेल्या आठवड्यात गवि आले होते तेव्हा केलेल्या हलवा तुकडी चे फोटो. जागू ताई, तुम्ही केलेला नक्कीच ह्याहून खूप छान असणार!
![](http://healthyfeasts.files.wordpress.com/2011/04/halwa.jpg)
26 Apr 2011 - 1:09 pm | गवि
तू केलेलाही मस्त होता गं खादाडताई.
आता पुढची व्हिजिट जागुताईकडे कशी जमवता येईल?
तिने बोलावले तर मज्जा..
26 Apr 2011 - 2:09 am | सुनील
निव्वळ अप्रतिम!
26 Apr 2011 - 6:46 pm | नि३
हे शिर्षकात मासे २५) काय आहे. म्हणजे मासे समजले पण हे २५) काय आहे????
26 Apr 2011 - 7:10 pm | प्रभो
हि जागूताईने टाकलेली माश्यांची २५वी पाकॄ आहे. :)