म्हणी व वाकप्रचार यांचा उगम.

आपल्या नेहमीच्या बोलण्यात बरेच वेळा आपण म्हणी, वाकप्रचार याचां उपयोग करतो. बर्‍याच वेळा आश्या म्हणी व वाकप्रचार यांच्या मागे काही धटना, गोष्टी धडलेल्या असतात. आपल्या पैकी कुणाला जर आश्या गोष्टी आठवत असतील तर त्याची इथे देवाण-घेवाण करु.

(जर असा घागा आधीच कुणी चालू केला असेल तर सरपंचाना हा धागा उडवण्याची नम्र विनंती. )

सुरुवात मीच करतो.

ऊंटावरचा शहाणा.

एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती. ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्‍याची एकदम लाडकी होती. उकाड्याचे दिवस होते आणि म्हैस भलतीच तहानलेली होती. अंगणात एक भला मोठ्ठा रांजण होता जो त्या शेतकर्‍याच्या घरात पिढ्यांन पिढ्यां पासून होता. म्हैशीनं रांजणात डोकावून पाहील. तिला तळाशी पाणी दिसलं आणि कसबस तिने घातल डोक आतं. पाणी पिउन झाल्यावर डोक काही बाहेर येइना. बिचारी जोर जोरात हंबरायला लागली, शेतकरी धावत बाहेर आला. त्याने पण म्हैशीच अडकलेल डोक बाहेर काढायचा बराच प्रयत्न केला पण काही जमेना. रांजण फोडून म्हैशीला सोडवाव तर तो रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला. शेतकर्‍याच मन धजेना.

शेतकर्‍याची ही धडपड तिथून ऊंटावरून जाणार्‍या एका वाटसरूनं पाहिली. तो शेतकर्‍याला म्हणालाकी तो त्याला म्हैशीच डोक बाहेर काढायला मदत करेल. पण तो त्याच्या ऊंटावरून खाली येणार नाही. आणि अंगणातल दार छोट असल्याने ऊंट काही आत येइना. शेवटी शेतकर्‍यानं कुदळ फावडं घेउन भींत फोडली नि त्या शहाण्याला वाट करून दिली. वाटसरूनही वरून पाहिल म्हैशीच डोक बऱ्यापैकी अडकल होत. त्याने शेतकऱ्याला विचारल कि रांजण आणि म्हैस यात त्याला काय जास्त प्रिय आहे. शेतकर्‍याला बिचार्‍याला दोन्हीच प्रिय, पण त्यतल्या त्यात रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला त्यामुळे त्याने रांजण सांगितल.

झालं, या शहाण्याने शेतकर्‍याला म्हैशीची मान कापायला सांगितली. रांजण वाचावायचा म्हणून शेतकर्‍यानं जड मनाने म्हैशीला मारल. पण तिच डोक आतच राहील. शेवटी म्हैशीच डोक बाहेर काढण्यासाठी शहाण्याने तो रांजणही फोडायला लावला.

जर शेतकर्‍याने ऊंटावरच्या शहाण्याचा सल्ला न ऐकता आधिच तो रांजण फोडला असता तर, त्याला अंगणाची भींतही फोडावी लागली नसती आणि त्याची लाडकी म्हैस पण वाचली असती.

तेव्हा पासून जो कुणी असा सल्ला देउ लागला की ज्यात ऐकणार्‍याच फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आसेल तर तो सल्ला देणार्‍याला ऊंटावरचा शहाणा ही उपाधी मिळु लागली.

अजुन एक गोष्ट.
गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं

एका गावात एक कुंभार होता. त्याच्याकडे एक गाढव आणि एक शिंगरू होतं. उकाड्याचे दिवस होते, माठांना चांगलीच मागणी होती. त्यामुळे कुंभाराने गाढवाला जरा जास्तच कामाला जुंपल होतं. बिचार गाढव मातीसाठी सकाळ पासून खेट्या मारित होतं, त्या शिंगराला काही काम न धंदा, ते आपलं नुसतच गाढवासंगे फेर्‍या मारित होतं. (कुंभाराने काही त्याला कामाला जुंपलं न्हवत.) शेवटी अतिश्रमाने नि उकाड्याने गाढव नि शिंगरू दोन्ही मरतात. त्यातल्या त्यात गाढव निदान ओज्याने नि श्रमाने तरी मरतं पण शिंगरू मात्र नुसतच हेलपाट्यान मरतं.

तेव्हा पासून गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं ही म्हण रुजू जाली.

कुणाला हातावर तुरी देणे का वाक्प्रचार कसा रुढ झाला याची माहीती आहे का?

काय सा॑गु

मला म्हणी माहित आहेत पण त्या मागची स्टोरी ना बॉ सा॑गु शकत. Sad

आता

आता म्हणींची ष्टोरी म्हणजे लै झाला बॉ!!! Rolling Eyes

भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी"

"भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" ही म्हण कशावरुन आली असेल याचे मला नेहमी कुतुहल आहे.
( यात काहीही जातिवाचक नाही )
वागायला भट असणारा विजुभाऊ

त्याचप्रमाणे

"बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' हे कुठुन आलं?
कुअणाची शादी?
आणि कुठला वाला अब्दुल्ला नक्की/

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

भैय्या

ओ विजुभौ हल्ली भैय्याला दिली मुंबई भैय्या हात पाय पसरी अस वाचलय Wink
(मुंबई ऐवजी ज्याला हव त्याने आप-आपल्या शहराच नाव टाकवं.)

मस्त ष्टोरी! :)

उंटावरच्या शहाण्याची ष्टोरी आवडली रे गणप्या! मस्त आहे! Smile

बाकी, म्हणींच्या उगमकथा हा काथ्याकुटाचा धागा छान आहे...

आपला,
उंटावरचा तात्या!

तेल गेलं तुप गेलं हाती आलं धुपाटणं.

एक पुजारी असतो.
त्याची बायको त्याला तेल आणायला सांगते. पण तेल घेऊन येण्यासाठी एक धुपाटणं देते. (पुजारी नेहमी गरीब असतात. Smile )
पुजारी दुकानात जातो आणि तेल घेतो तो दुकानदार त्याला सांगतो की तुप सुध्दा छान आहे.
पण त्याच्याकडे तुप न्यायला दुसरं भांड नसतं.

तेंव्हा तो दुकानदार त्याला सांगतो की धुपाटण्याची खालची बाजु वर करुन त्यात तुप घ्या.
आणि कसलाही विचार न करता पुजारी धुपाटणं उलटं करतो.

आणि घरी गेल्यावर बायको तेल मागते. तेंव्हा तो परत धुपाटणं सरळ करतो.

त्यामुळे तेल जातं तुप जातं आणि त्याच्याक्डे उरत धुपाटणं.

Smile :)

छान धागा

छान धागा गणपाराव. दोन्ही गोष्टी आवडल्या.
बाकी आमच्या शरुबाबाची "मि नहि त्यतलि कडि घाल आतलि" ही अत्यंत प्रिय म्हण आहे, तो सांगेल त्याची श्टोरी Smile)

खालमुंडी पाताळ धुंडी

ह्याच काहीतरी लिवा Smile

मस्त आहे - चला मी ही प्रयत्न करुन बघतो.

टांगा पलटी, घोडे फरार
या आशयाची म्हणं संस्कृत मध्ये होती - 'नष्टाश्वदग्धरथन्यास'- घोडा हरवलेला आणि रथ जळालेला.
तमोदीपन्याय - अंधार बधायला दिवा.

भटाच्या बायकोला स्वयंपाक करताना घरातली तुरीची डाळ संपल्याचे लक्षात आले. तीने भटाला बाजारातून डाळ आणायला सांगीतले. त्यावर भटाने तिला विचारले काय करणार ? ती म्हणाली आमटी, भट म्हणाला वरण. या वरुन दोधात जोरात भांडण झालं अगदी मारा-मारी पर्यंत....आणिम्हणं पडली - बाजारात तुरी भट भटीणीला मारी

परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नॄणाम् धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मन:
- लोका सांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.

न भूतपूर्व न कदापि वार्ता हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट: ।
तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धि

न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे
आग लागल्यावर विहीर खणणे

मस्त धागा !!!

मस्त धागा सुरु केला आहे.

ब-याच म्हणींची स्टोरी आपल्याला माहित नसते, या निमित्ताने ब-याच म्हणींचा उलगडा होईल असे वाटते.
'गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट' याची स्टोरी कोणास माहित आहे का ?

मला नं तुला, घाल कुत्र्याला

प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे आभार...

बिरुटेशेठ खरय तुमच म्हणणं, या म्हणी, वाक्यप्रचार आपण अगदी लाहान पणापासुन ऐकत आलोय. कधी काळी आज्जी आजोबा, आई बाबां कडुन या म्हणी कश्या पडल्या या सुसर कथाही ऐकल्या असतिल. हल्ली इंग्रजी माध्यमात जाणार्‍या आपल्या मुलांना या म्हणी नि वाक्यप्रचार तरी माहिति असतील का ही शंका आहे. आणि हल्लीची मुलं पण इतकी चौकस असतात (त्यामानाने आम्ही कीती बावळट होतो) कि विचारुनका. एखादा वाक्यप्रचार वा म्हण बोलता बोलता निघुन गेली की माझी ३ वर्षांची चीमुरडी तर इतके प्रश्न विचारुन भंडावुन सोडते कि बस. म्हणुन हा उपापोह. Smile

माझ्या तर्फे अजुन एक गोष्ट.

खुप वर्षांपुर्वी एका लहान खेड्यात एक ब्राम्हण राहत होता. त्याच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य नांदत होतं. ब्राम्हणाची बायको या सर्वाला जाम वैतागली होती. रोज च्या रोज त्याची काही ना काही कारणांवरून भांडणं होत असत. ब्राम्हणाच भिक्षुकी हेच मुख्य उदरभरणाच माध्यम होतं, कधी काळी एखादी पुजा, मुंज वा एखादं लग्नाकार्य असलं तर तेवढेच चार दिवस काय ते बरे जायचे.

एकदा असच एका पुजेच आमंत्रण त्याला आल होतं. ब्राम्हण छान सत्यनारायणाची पुजा मांडली, उल्कामुक राजाची कथा सांगीतली, सगळ यथासांग पार पडलं. घरी जाताना यजमानाने पाच पुरणपोळ्या ब्राम्हणाला बांधून दिल्या. पुरणपोळ्या पाहुन ब्राम्हणाची बायको खुप खुष जाली. लगेच तिने दोन ताटं आणून एका ताटात दोन पुरणपोळ्या वाढून नवर्‍याला दिल्या, आणि स्वतः तीन घेतल्या. ब्राम्हणाला आला राग. म्हणाला मी जाउन पुजा सांगून आलो त्यामुळे मला तीन पुरणपोळ्या हव्या. तर बायकोच म्हणणं की मी धरात इतके कष्ट उपसते म्हणून मलाच तीन पुरणपोळ्या. होता होता त्यांच भांडण खुप वाढलं. शेजारी-पाजारी गोळा झाले. लोकांनी सांगीतलं की अरे भांडू नका, अडीच-अडीच पोळी घ्या. पण दोधे जाम हट्टाला पेटलेले, कुणाच ऐकतील तर शप्पथ.

शेवटी भांडून भांडून दोघे थकले व तसेच उपाशी पोटी झोपले. सकाळी जाग आल्यावर त्याना भांडणाचा पश्चाताप झाला आणि दोघांनी पोळ्या वाटून घ्यायच ठरवलं. ताटाकडे लक्ष गेलं, पाहातात तर काय, एक कुत्रं मजेत शेवटची पुरणपोळी हादडत होत. भांडणाच्या नादात ब्राम्हणाची बायको पोळ्या जाकून ठेवायला विसरली आणि ब्राम्हण दार लावायला. लागले परत भांडायला. ब्राम्हण बायकोवर खेकसला मला नं तुला, घाल कुत्र्याला.

मस्त रे गणपा !!!

'मराठी म्हणी व वाक्प्रचार कोश' हे स. ध.झांबरे......यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. त्याच्यात किती तरी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. पण गणपासेठ आपण देत आहात तशा कथा किंवा तशी माहिती त्याच्यात नाही. आपल्या म्हणींच्या निमित्ताने येणा-या कथा आम्ही आवर्जून वाचतोय. येऊ दे आणखी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही फक्कड मराठमोळ्या म्हणी

खाई त्याला खवखवे
सुंठेवाचून खोकला गेला
अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून
कशात काय अन फाटक्यात पाय
घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या
पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा
पाटलाचं घोडं महाराला भुषण
पादऱ्याला पावट्याचे निमित्त

तरण्या

तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या

हा हा हा Smile) Smile)

पुराला

पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा

म्हणजे काय?
जरा अर्थ तरी सांगा. Waiting

सोप्पय

पुर आल्यावर गटारांमधले पाणी पहिल्यांदा न्हाणीतल्या आउट्लेट मधुन रिव्हर्स येउन घरात शिरते, म्हणुन ते अडवायला तिथे बोळा कोंबतात, पण दार तर उघडेच असते की हो, तिथुन पाणी शिरतेच. असा अर्थ असावा.

-सज्जनयात्री Smile

पुरला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा

अग ऋचा,
पुर्वी न्हाणीघर मुख्य घरात नसे, ते अंगणात असे. आणि सांडपाणी वाहुन नेण्या करता एक छोटा पाइप असे जो बाहेर रस्त्याच्या गटारा पर्यंत जात असे.
त्या पाइप मधुन एखादा किडा वा साप घरात येउ नये म्हणुन त्यात, बोळा कोंबुन ठेवत. पण एवढे प्रयत्न करुन अंगणाचा मुख्य दरवाजा मात्र सताड उघडा. त्यावरुन ही म्हण अस्तित्वात आली आसा कयास आहे.

--(शंकानिरसनी ) गणपा.

अजुन कही म्हणी.

बरं
कळाले.. Whew!
धन्यवाद आनंदयात्री,गणपा .

अजुन कही म्हणी.

बैल गेला नी झोपा केला.
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तिथे येती रोगी नाना
नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

कथा

कथा दिल्याबद्दल धन्यवाद...
चला आता म्हणींचे नेमके अर्थ ही कळतील Smile

म्हणी

पोटाला नाई आटा आन म्हन चोटाला उटन वाटा
ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं
मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली
शुभ बोल रे नार्‍या त म्हन मांडवाला लागली आग
ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाई पन गुन लाग्ला.

प्रकाश घाटपांडे

:))

मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली

हा हा हा! अश्या काही स्त्रिया माझ्या परिचयाच्या (म्हणजे फक्त ओळखीत बरं का!) आहेत! खूप छान आहे त्यांचा स्वभाव! आवडतो मला! त्याही आवडतात! Smile

आपला,
(कडीकुलपातला) तात्या.

काही नेहेमीच्या आणि काही नविन...

आधीच उल्हास अन् त्यात फाल्गून मास
आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं
बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ
काही नवीन.....
बायकोनी दिली झोळी अन् मेव्हणी दळण दळी
आयडिया केली आणि वाया गेली
ह्त्यार भारी तर गि-हाइक दारी
Smile
- डोम

अशीच १ फार

अशीच १ फार टुकार म्हण आहे आमच्या कोकणात..

हागलं नाही पोट गेलं

अर्थ माहीत नाही Confused

म्हणी..

म्हणी बर्‍याच माहिती आहेत पण त्यामागच्या गोष्टी मात्र सगळ्याच माहित नव्हत्या,त्या वाचायला मजा येते आहे..
स्वाती

बैल गेला नि झोपा (झापा) केला .....

मंडळी प्रोत्साहना बद्दल आभर, आज अजून एका म्हणीची उगम कथा सांगतोय पहा आवडते का,

आपण लाहान पणापासून बैल गेला नि झोपा (झापा) केला ही म्हण ऐकत आलोत.
पण लेको जर मी तुम्हाला आज अस सांगीतल की ही म्हण चुकीची आहे तर ?

गावी अंगणात (गोठ्याला) जे फाटक असायचं त्याला झापा म्हणत. त्यामुळे मला वाटायच कि कदाचीत गोठ्याला झापा नसावा आधी नी एखादा बैल पळून गेल्या नंतर मग झापा केला असेल.(हल्ली गावात गायी, बैल , बैलगाड्या राहील्याच कुठे, घोडे (दुचाक्या हो) आले नी गोठ्याची गॅरेजं झाली) पण खरी म्हण आहे बाईल गेलिया झोंपा केला. यामागची ही मजेशिर कथा .....

एका गावत एक तरुण राहत होता. त्याच एका सुंदर मुली (बाई)वर प्रेम जडलं. पण होता बिचारा गरिब. त्याने बरिच वचनं देउन तिला लग्नाला राजी केलं. बाईने काही महिने कळ काढली, पण निदान राहत घर(झोपा) तरी चांगल असाव म्हणून तिने त्याच्याकडे भुणभूण लावली की चांगल घर बांध. बिचारा तरुण पै पै साठवत राहीला. पण दरम्यान वैतागून बाई त्याला सोडून निघून गेली व तिने दुसरा घरोबा केला.
काही काळाने पैसे जमल्यावर त्या तरुंणाने चांगल घर (झोपा) बांधल. तेव्हा लोक म्हणाले की बाईल गेलिया जोपा केला.
सारः एखादी गोष्ट जर वेळिच नाही केली तर नंतर ती करुन सुद्धा तिच महत्व राहात नाही

काळाच्या ओघात 'बाईल'च बैल नि 'गेलिया'च गेला कधी झालं कळलच नाही. Smile)

"म्हणीच्या

"म्हणीच्या गोष्टी "असे अनमोल प्रकाशनचे पुस्तक आहे यात खुपगोष्टी आहेत म्हणीवरुन.

गाड्या बरोबर नळ्याची यात्रा.

बैलगाडीच्या चाकांच्या आंसावर ल्युब्रिकेशन साठी वंगण( तेल)लागते. ते ठेवण्यासाठी एक बांबूची ( किंवा पत्र्याची) नळी व त्यांत ,तेल लावण्यासाठी चिंधी बांधलेली तार
( किंवा काडी)असते. गाड्याबरोबर त्या नळ्याची पण यात्रा होत असते.
तसेच एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर साधारण माणसाला आवश्यक नसतांना यात्रा घडणे वा मान मिळणे, म्हणजे "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा."