मांचुरियनला जरी आपण चायनीज म्हणत असलो तरी ती चिनी आवरणातली भारतीय सुंदरी आहे.
साहित्य भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी,१ वाटी किसलेली गाजरे,१ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट,१ टीस्पून सोया सॉस,
प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर ,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार,१/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम)
तळणीसाठी तेल
कृती- कोबी,गाजर एकत्र करणे.मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे.आलं,लसूण मिरची पेस्ट घालणे,सोयासॉस घालणे,मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे.सोया सॉस मध्ये मीठ असते आणि अजिनोमोटोही खारट त्यामुळे मीठ घालताना ते लक्षात ठेवणे.
सगळे एकत्र करणे,भात घालणे आणि मळणे.गोळे करणे आणि सोनेरी रंगावर तळून काढणे.एक भजे तळून पाहणे,जर भजे तुटते आहे असे वाटले तर अजून थोडा भात मिश्रणात घालणे व परत मळणे,ह्याने भजी तुटणार नाहीत.
साहित्य ग्रेव्हीसाठी - ७,८ लसूण पाकळ्या,बोटभर आलं,४,५ हिरव्या मिरच्या : सर्व बारीक चिरून, १टी स्पून मिरपूड ,१टेस्पून साखर
१ ते १.५टे स्पून सोयासॉस,२ टे स्पून कॉर्न फ्लोअर,१ टे स्पून तेल,१ लहान कांदा,१ लहान सिमला मिरची लाल किवा हिरवी,२कांदापाती बारीक चिरून, १कप पाणी,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार
कृती-कांदा आणि सिमला मिरची बारीक चौकोनी चिरणे.तेल गरम करून त्यावर कांदा,सि.मिरची परतून घेणे.आलं,लसूण,हिरव्या मिरच्या यांचे तुकडे त्यावर घालणे,परतणे.साखर,मीठ,मिरपूड,अजिनोमोटो,सोयासॉस घालून परतणे.कॉर्न फ्लोअरची अगदी थोड्या पाण्यात पेस्ट करून घेणे ती त्यात घालणे.कपभर पाणी घालून सारखे करणे.४ ते ५ मिनिटे शिजवणे.कांदापात बारीक चिरून घालणे.
सर्व्ह करायच्या आधी १०,१५ मिनिटे ग्रेव्हीत भजी घालणे व सर्व भजी ग्रेव्हीत नीट घोळवणे.
फ्राईड राईस बरोबर गरम गरम सर्व्ह करणे.
फ्लॉवर मांचुरिअन साठी- ग्रेव्ही वरील प्रमाणेच
फ्लॉवरचे तुरे हलके वाफवून घेणे.मैदा,कॉर्नफ्लोअर,सोया सॉस,मीठ,अजिनोमोटो,आले लसूण मिरची पेस्ट एकत्र करणे.पाणी घालून भज्यांच्या पीठाप्रमाणे भिजवणे.फ्लॉवरचे तुरे त्यात घोळवून त्यांची भजी तळणे. व ती वरील ग्रेव्हीत घालणे.
चिकन मांचुरिअन- ग्रेव्ही वरीलप्रमाणेच.
फ्लॉवर मांचुरिअन च्या भज्यांप्रमाणे पीठ तयार करणे.चिकन ब्रेस्ट पिसेस त्यात थोडे मुरवणे व भजी तळणे.
प्रतिक्रिया
13 May 2008 - 5:35 pm | ऋचा
:P मस्तच आता करुन पहायला हरकत नाही..
13 May 2008 - 5:38 pm | राजे (not verified)
वाह !
आज माझी आवडती डीश (थाळी =ज्यांना कळत नाही त्याच्यासाठी)
स्वाती धन्यवाद.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
13 May 2008 - 6:33 pm | शितल
बरेच दिवस मनात आहे करायचे आता तुमच्या लेखी मार्गदर्शना नुसार करावयास सोपे जाईल.
तुमच्या घरातल्या॑ची चैनी आहे. मस्त मस्त नुसते खा.
13 May 2008 - 6:38 pm | वरदा
ह्या विकेंडला नवर्याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय....
14 May 2008 - 12:05 am | विसोबा खेचर
ह्या विकेंडला नवर्याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय....
सोप्पं दिसतंय? हा हा हा वरदा, मला त्या फ्रेंडची अंमळ काळजीच वाटते! :))
आपला,
(वरदाला मुळीच स्वयंपाक करता येत नाही यावर ठाम विश्वास असलेला!) तात्या.
तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! :)
बाकी, मिपाच्या भगिनीवर्गातला आपापसात चाललेला सुखसंवाद वाचायला चांगला वाटतो आहे! स्वाती, मी पण येईन हो तुझ्या जर्मनीला. मस्तपैकी खादाडी करीन तुझ्याकडे आठ दिवस! :)
व्हेज मांचुरियनची पाकृ झकास! फोटूही सुरेखच आला आहे.. :)
तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
14 May 2008 - 12:07 am | स्वाती दिनेश
आपण चिकन मांचु पण करु पाहिजे तर आणि स्प्रिंग रोल्स,:)
13 May 2008 - 6:41 pm | प्राजु
ये तूने क्या किया?? रेसिपी दे दी और फोटो भी दिया... जले पे नमक क्यों छीडका??
स्वाती, सह्ही फोटो आणि रेसिपी....
माझा विचार बदलला आहे. आता रिटर्न फ्लाईट जर्मनीत हॉल्ट घेऊनच पुढे न्यू यॉर्कला जाईल.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 May 2008 - 11:06 pm | स्वाती दिनेश
ये,स्वागत आहे! इथून जाताना तुमच्या अमेरिकन कट्ट्यासाठी काय देऊ बोल?म्हणजे तसं तयारीला लागायला बरं,:)
13 May 2008 - 7:29 pm | वरदा
प्राजु मग जर्मनी वरून पॅक करुन खूप पदार्थ घेऊन लगेच इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्ट्यासाठी माझ्याकडे येईल आणि मी पण चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेईन 8>
13 May 2008 - 7:41 pm | स्वाती राजेश
मला एक डीश पार्सल करा..:)
स्वाती छान आहे फोटो, आणि रेसिपी सुद्धा....
13 May 2008 - 11:08 pm | स्वाती दिनेश
अग येते आहेस ना तू जर्मनीत? मग ये की इथे..एक डिश काय हवे तेवढे खायला घालते...शेवटी आपण नावभगिनी ना?
13 May 2008 - 11:23 pm | चकली
मांचुरिअन माझी आवडती डीश आहे. माझे मांचुरिअन चे बरेच प्रयोग झाल्यावर मला पाण्याऐवजी vegetable stock वापरून जास्त चांगली चव येते असे वाटते.
आणि corn starch ने ही थोडा फरक पडतो. बाकी रेसीपी ए - १ !
चकली
http://chakali.blogspot.com
13 May 2008 - 11:32 pm | स्वाती दिनेश
पाण्यापेक्षा व्हेज स्टॉकने नक्कीच जास्त चांगली चव येत असेल,:)
13 May 2008 - 11:35 pm | वरदा
किती गं हुशार सुगरणी तुम्ही सगळ्या..आता आणेन व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा....
14 May 2008 - 12:46 am | वरदा
तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही!
आणि यासाठी तात्यांनी ८ दिवस अमेरिकेत रहायला यावे त्याशिवाय मी तुम्हाला खायला घालणार नाही :)))
14 May 2008 - 1:43 am | ईश्वरी
छान आहे रेसिपी. मी ही करायचे मान्चुरिअन पण एवढ्यात केलं नाही. आता करीन म्हणते.
ह्या मान्चुरिअनची जी ग्रेव्ही आहे त्यातील सिमला मिरची वगळून भजी न टाकल्यास ते चायनीज (hot n sour) सूप होऊ शकेल..
याच ग्रेव्ही मधे भाज्या(सिमला मिरची, कान्दा, कान्दा पात ) न वापरता एक फेट्लेले अंडे घातल्यास एग ड्रॉप सूप होईल. फेट्लेले अंडे एकदम न ओतता थेंब थेंब घालून ढवळावे .
फक्त ग्रेव्हीइतके सूप घट्ट असू नये. पाण्याऐवजी व्हेजिटेबल / चिकन स्टॉक वापरावा.
फोटो मस्त.
ईश्वरी
14 May 2008 - 7:37 am | पल्लवी
स्वाती ताई.. अहाहा.. सक्काळी सक्काळी भूक चाळवलीस ग.. मस्तच.. ग्रेव्हीला आलं-लसणाची काय सही चव येते.. =P~
14 May 2008 - 7:40 am | सहज
व्हेज मांचुरिअन - डिमिस्टीफाईड!!
सॉलीड आवड्या!!!