कॅमेर्‍याची निवड

शरद's picture
शरद in काथ्याकूट
15 Apr 2011 - 10:22 am
गाभा: 

निवड कॅमेऱ्याची
जालावर सर्व कॅमेर्‍यांची माहिती सहज उपलब्ध असतांना या लेखाची गरज काय ? असे तुम्हाला वाटेल. पण इथे मी कुठल्याही कॅमेर्‍याची माहिती किंवा त्याचे फायदे तोटे सांगणार नसून तुमच्या गरजेप्रमाणे खरेदीच्या वेळी आपल्याला पाहिजे असलेला कॅमेरा कसा निवडावा एवढेच सुचवणार आहे.
पूर्वी बरे होते.कॅमेरा निवडावयाचा म्हणजे आपला खिसा तपासावयाचा. हलक्या दर्जाचे [रु. १५०० पर्यंत], मध्यम दर्जाचे [रु १५००ते ३०००] व भारी [३००० च्या वर]. हे देखील सेकंड हॅंड. मी सुरवात कोडॅकच्या डबड्याने [मामाने दिलेला] केली, नोकरी लागल्यावर पैसे जमवून एक जूना फ़ॉगलॅंडर घेतला. फ़ारा वर्षांनी निकॉन एफ़-३. एक स्वप्नच साकार केले. गेले ते दिन गेले.....
दिवस बदलले आहेत. आता तरूण मुलांच्या खिशातही पैसे खुळखुळताहेत व मुख्य म्हणजे तुम्हाला निवड करावयास भरपूर वाव आहे. जगातला कुठलाही कॅमेरा १५ दिवसात हिंदुस्थानात मिळू लागतो. पावती व वॉरंटीसकट. ईन्टरनेटवर व मासिकांमध्ये सर्व माहिती दिलेली असते. वॉरंटी नको असेल तर ग्रे मार्केटमध्ये ३०-४० टक्के पैसेही वाचतात. मग अडचण काय ?
खरी अडचण ही आहे की निवडीला फ़ार मोठा वाव आहे. पूर्वी चारचाकी खरेदी करावयाची म्हणजे फ़िऍट की अंबॅसिडॉर यातच निवड करावयाची असे. सोपे होते. आता प्रत्येक sector मध्ये १५-२० गाड्या आहेत.अवघड आहे. तेच कॅमेऱ्या बाबतीत. मी काही वर्षांपूर्वी केन्यात सफ़ारीकरता गेलो होतो. निकॉन व त्याच्या ४ लेन्सेसचे ओझे नेण्याऐवजी डिजिटल कॅमेरा नेण्याचे ठरविले. निकष ठरविले ते असे :
[१] लेन्स .... कॅमेऱ्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट.पूर्वी कंपन्या स्वत;च्या नावाच्या लेन्सेसच [मग त्या कोणीही तयार केलेल्या असोत] वापरत .असा तसे उरले नाही. म्हणून शक्य असेल तर लाईका. झैस, निकॉन , कॅनन अशा सर्वमान्य लेन्सेसच घ्याव्यात. मी लाईका लेन्स पसंत केली.[लेन्सेस घ्याव्यात म्हणजे ह्यातील लेन्सेस असलेले कॅमेरे पसंत
करावेत.]
[२] पिक्झल्स .... ७ मेगापिक्झल्स पुरेसे होतात.
[३] फ़ोकल लेन्थ .. वन्य जनावरांचे फ़ोटो काढावयाचे असल्याने जास्तीत जास्त टेली हवी. मी १२x म्हणजे [३५ ते ४२० एमेम] लेन्स असलेला कॅमेरा निवडला.
[४] Raw Format ...जाणकार व भरपूर वेळ असलेल्या छायाचित्रकारांकरिता एक दैवी देणगी. आवष्यक.
[५] इमेज स्टॅबिलायझर ...हलत्या पशूंचे फ़ोटो, शटर स्पीड कमी, चालती गाडी, [अणि वाढलेले वय] इत्यादी लक्षात घेता उपयोगी. उडत्या पक्षांचे फ़ोटो उत्तम येतात.
[६] किंमत ..... रु. २०,००० पेक्षा कमी.
या सर्वांचा विचार करून मी Panasonic DMC FZ-8 हा कॅमेरा निवडला.पॅनासॉनिक ही एलेक्ट्रॉनिक्स मधील कंपनी, कॅमेरा क्षेत्रात तशी नवीन असली तरी उत्तम कॅमेरे बनविते. मी खुश आहे. [ सदाशिव पेठेत बरीच वर्षे काढलेल्याकडून शिफ़ारशीची याहून फ़ार अपेक्षा करूच नये !] किंमत. ग्रे मार्केटमध्ये रु. १६,०००.
तर सांगावयाचा मुद्दा आपण कशा प्रकारची चित्रे काढू इच्छितो हे प्रथम ठरवा व मगच कोणता कॅमेरा उपयोगी पडेल ते ठरवता येईल. कॅमेऱ्यात बऱ्याच सुविधा असतात. त्यांची यादी पुढे देत आहे व त्यातील कोणकोणत्या कितपत उपयोगी ते सांगणार आहेच. पण प्रथम एक उदाहरण घेऊ.
एक मोठा समुदाय ज्यांना घरच्या माणसांचे, समारंभाचे, सहलीला गेल्यानंतर तिथले फ़ोटो असे बरेचसे Documentary Type फ़ोटो काढावयाचे असतात. छायाचित्रकलेत फ़ार वेळ व डोके खर्च करावे अशी इच्छा नसते. त्यांची निवड सोपी कारण गरज कमी. त्यांनी
[१] किंमत .... फ़ार खर्च करू नये. आपण ज्या सुविधा वापरण्याची शक्यता नाही, त्याच्या करिता पैसे खर्च कशाला करावयाचे? [जन्म कोकणातला, म्हणून असले सल्ले !]
[२] पिक्झल्स ७ मेगा रगड झाले.
[३] झूम .... ३x [35 ते 105 एमेम] पुरेशी होते. निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे आणि समारंभाचे फ़ोटो काढावयास पुरेशी. झूम बघताना Optical Zoom पहावयाची. Digital Zoom ही तांत्रिक फ़सवाफ़सवी असते.
[४] मोड्स ... Auto Mode सगळ्या कॅमेऱ्यात असतोच, इतर असले तर उत्तम,[जर श्री. धनंजय A M च वापरत असतील तर इतर मोड्सची फ़ार गरज नसावी.]
[५] मीटरिंग मोड ... असल्यास उत्तम, नसल्यास फ़ार बिघडत नाही.
[६] इतर ..... साधे कॅमेरेही इतर बऱ्याच सुविधा देतात.मॅन्युअल वाचून कळते का बघावे; नाहीतर वेळ व इच्छा असेल तर मला व्य.नि. करावा.
हे झाले सर्वसाधारण लोकांकरिता. पण मिपाचे छायाचित्रकार काही साधेसुधे छायाचित्रकार नाहीत. त्यांना नक्कीच काही तरी वरील दर्जाची कला निर्माण करावयाची आहे. त्यांच्याकरिता कॅमेऱ्याने जास्त सुविधा पुरवावयास पाहिजेत.आता काही सुविधा आणि त्यांचा उपयोग कोठे होतो ते पाहू.
[१] भिंग .... सर्वसाधारणपणे [३५ एमेम कॅमेऱ्यानुसार ] ३५ एमेम फ़ोकल लेन्थने सुरवात होते. वर सांगितल्याप्रमाणे सेमि-वाईड म्हणता येईल अशी सुरवात आहे. झूम रेशो हा ऑप्टिकल व डिजिटल या दोन प्रकारात देतात. ऑप्टिकल महत्वाची. वन्य पशुपक्षाचे फ़ोटो काढावयाचे उद्दिष्ट नसेल तर ५x [ 35-165 mm] च्यावर जाण्याचे कारण नाही. एक लक्षात ठेवा. इमेज स्टॅबिलाझर नसेल तर २०० एमेम वरची लेन्स वापरताना स्टॅंड लागतोच. अडचणीचा होतो. त्या ऐवजी खालच्या फ़ोकल लेन्थने फ़ोटो काढून Crop-Enlarge करणे जास्त सोपे. शिवाय आणखी एक गोष्ट माहित पाहिजे की जास्त फ़ोकल लेन्थला ऍपर्चरही कमी असते. कमी प्रकाशात स्पीडही बदलतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता ५x पेक्षा जास्त झूम तुम्ही १०० पैकी ५ फ़ोटोतही वापरत नाही. फ़ार महत्व देऊ नका. डिजिटल झूम हा crop-enlarge चाच प्रकार आहे. शक्य तो वापरू नये.
[२] फ़्लॅश .... सगळ्या कॅमे़ऱ्यात असतोच. पॉवर कमी जास्त असते. २० फ़ूटापर्यंत पोचत असेल तर पुरतो. ही रेंज वाईड-टेली लेन्सप्रमाणे बदलते हे लक्षात ठेवावे.red eye reduction व manual operation ही असावे.
[३] ऍपरचर .... डिजिटलमध्ये निवडावयास फार वाव नसतो. ३.५ ते ८ असेल तर समाधान मानावे.
[४] मोड्स ..... Auto, Manual, Shutter Priority , Apperture Priority इतकी पाहिजेतच. इतर बरीच असतात पण त्यात आपला control नसतो.
[५] मीटरिंग मोड्स ... जेवढे जास्त तवढे उत्तम. उच्च दर्जाच्या छायाचित्रकलेत उपयोगी पडतात.
[६] फ़ोकस ... मॅन्युअल, ऒटो नोर्मल, ऑटो मॅक्रो इतके पाहिजेतच.
[७] सेंसिटिव्हिटी ...ISO 100 ते 1200 इतकी असावीच.
[८] स्पीड ....८ ते १/२००० सेक. इतका अथवा याहूनही जास्त रेंजचा.
[९] मोशन पिक्चर मोड .. उपयोगी पडतो.साधारणत; दर्जा फ़ार वरचा नसतो.
[१०] अवांतर ... जास्त पैसे न मोजता मिळाले तर आनंदच.
केस,मॅन्युअल, प्रोग्रॅम सिडी [असली तर, इंग्लिश भाषेतील,] वॉरंटी वगैरे न विसरता.
आपली गरज व वरील दहा गोष्टी यांचा विचार करून घेतलेला कॅमेरा तुम्हाला बरेच दिवस सुंदर चित्रे काढावयास मदत करेल.[हल्लीच्या बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे बरेच दिवस म्हणजे २-३ वर्षे ! ]
सुंदर छायाचित्रांकरिता मन ;पूर्वक शुभेच्छा !
शरद

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

15 Apr 2011 - 10:54 am | ५० फक्त

शरद सर, छान माहिती मी सध्या फुजी एस १८०० कॅमेरा वापरतो आहे , त्याबद्दल काही सागाल काय, म्हणजे त्याचे चागले वाईट गुण खोड्या वगैरे.

धमाल मुलगा's picture

15 Apr 2011 - 9:59 pm | धमाल मुलगा

मोठ्या हौसेनं फोटोग्राफीसाठी कॅमेर्‍याची माहिती मिळवायला धागा उघडला खरं, पण आमच्या मठ्ठ डोक्यात ऑटो मोड च्या पलिकडं फारसं घुसत नाही हेच खरं! :(

शरदराव,
एकदा डिट्टेलवार शिकवणीच घ्या आमच्यासारख्या ढ विद्यार्थ्यांची.

पुणेकर असाल तेव्हा (कॅमेरा घेऊन) घरी भेटावयास या. दोन दिवसात एक्स्पर्ट करून सोडतो.
(मठ्ठ मुलांचा शिक्षक)
शरद

सूर्य's picture

16 Apr 2011 - 8:07 pm | सूर्य

घर कुठे आहे? पुढचा विकेंड तुमच्या घरी... मला फोटोशॉपची सुद्धा माहीती हवी आहे.. व्य.नि. करत आहे.

- सूर्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2011 - 11:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपयोगी माहिती. धन्यवाद शरद साहेब.

-दिलीप बिरुटे

रामपुरी's picture

16 Apr 2011 - 5:06 am | रामपुरी

२/३ वर्षं नाही हो.. १ वर्षात पॉईंट - शूट मॉडेल आउटडेटेड करतात हल्ली. डीएसएलआर चालतो २ वर्षं कसाबसा.

नितिन थत्ते's picture

16 Apr 2011 - 8:40 am | नितिन थत्ते

उपयोगी माहिती.

मी दिवाळीत कॅनन घेतला. १२ एमपी आणि १२ एक्स (ऑप्टी). १२ एक्स घेतला हे फार बरे झाले.

पण फोटो काढायची फारशी वेळ आलीच नाही अजून. :(

मोहनराव's picture

16 Apr 2011 - 1:33 pm | मोहनराव

उत्तम माहिती आहे परंतु मला तांत्रिक माहितीची उकल करून सांगितली असता तर खूप बर झाला असता. (शिकाऊ फोटोग्राफर)