http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने आपण कसे बारा गावचे पाणी प्यायलो आहोत हे एका अनोख्या पद्धतीने समजावयाचा प्रयत्न केला! पाणीपुरीत मानवनिर्मित पाणी घालायची नापाक पाकक्रिया (बहुधा) पहिल्यांदाच ऐकली. आशा आहे की ही शेवटचीच असेल.
त्याची ही "शूक्रिया" अदा करण्याची कृती एका जागरूक मुलीने कॅमेर्यात बंदिस्त केली आणि चव्हाट्यावर आणली. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली.
रस्त्यावरील पाणीपुरी खाणे काही दिवस तरी अवघड होणार बहुधा. ह्याचा फायदा घेऊन मनसेने आपल्या आवडत्या लोकांना (पक्षी भय्ये) धुवून काढले. तमाम फेरीवाल्यांना गाशा गुंडाळून पळून जावे लागले. नुकतीच ही घटना घडलेली असल्यामुळे ह्या ठेलेवाल्यांना लगेचच सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही.
असले गलिच्छ कृत्य करणार्याला जन्माची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कुणाला तसे करावेसे वाटू नये. पण हातावर पोट असणार्या सगळ्या लोकांना मारहाण करून त्यांना परागंदा करून काय होणार? बहुधा ते लोक गुन्हेगारी, चोरीमारी वगैरे उद्योग करू लागतील नाहीतर भीक मागतील. त्यांना त्यांच्या प्रांतात परत पाठवता येत नसेल तर निदान काही उद्योग करू द्या. फक्त आरोग्यखात्याने आपले काम करावे. हप्ते घेऊन उरले उपकारापुरते असे होऊ देऊ नये असे वाटते.
तुमचे काय म्हणणे?
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 3:41 am | प्रशु
परप्रांतीयां बद्द्ल ची आपली कळकळ समजण्यासारखी आहे. पाणी पुरी चे नाव बदलुन शिवांबुपुरी ठेवावे..
18 Apr 2011 - 2:02 am | आत्मशून्य
शीवांम्बू मधे फक्त स्वतःच्या शरीरातील कंटेंन्ट असावे लागतात अस ऐकुनै.
15 Apr 2011 - 3:44 am | गणपा
परवाच सचित्र मेल आला होता. :(
लोकजागृती करावी म्हणुन काही मित्रांना पाठवला, पण मग वाटल उगाच पाठवला (निदान चित्रं काढुन पाठवायला हवा होता.) :(
काही दिवस????
राव सध्या पाणीपुरीची (एकंदर हात गाडीवर मिळणार्या सर्वच पदार्थांची) इच्छा साफ मेली आहे.
अशी दळभद्री (sick) लोकं समाजात रहायच्या लायकीची नाहीत. तो मानसीक रोगी असावा.
15 Apr 2011 - 4:03 am | शिल्पा ब
http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0
हा व्हीडीओ...साधारण ५८ से. नंतर पहा. अत्यंत गलिच्छ प्रकार. ज्या मुलीने हा प्रकार उघडकीस आणला तिचे अभिनंदन...उगाच आपल्याला काय त्याचे असं म्हणुन ती अन तिचे कुटुंब गप्प बसले नाही हे अनुकरणीय आहे.
बाकी तुमचे "त्यांना त्यांच्या प्रांतात परत पाठवता येत नसेल तर निदान काही उद्योग करू द्या." या वाक्याने भलतंच मनोरंजन झालं. त्यांना उद्योग करुच देताहेत तरी असले प्रकार घडताहेत याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? आपण जिथे राहतो तिथले नियम तरी पाळायला नकोत? आणि या घटनेत तर हा माणुस त्याच्या गिर्हाईकांना त्याचं स्वत:चच पाणी काढुन देतोय!!
घाण मेली!!
15 Apr 2011 - 4:24 am | पाषाणभेद
साल्यांना असेच ठोकायला पाहिजे.
कित्येक पाणिपुरीवाले अन भेळवाले भैटे लोक रस्त्यातच विधी करून अन मग भेळ, पुरी विकतांना मी पाहिले आहे.
त्यातलाच एक प्रकार म्हणजे तंबाखू खावून तेच हात वडापाव अन इतर सामग्री करतांना वापरतात.
अतिशय गल्लीच्छ प्रकार केला आहे त्याने. अन इतरांच्या बाबतीत सहिष्णूता दाखवायची काय गरज आहे?
आता सुरू व्हा चॅनेलवाले अन हिंदी भाषीक लोक अन म्हणा:
'मनसेवाले ऐसेही है म्हणून'.
जय मनसे!
15 Apr 2011 - 5:00 am | रेवती
ईऽऽऽ गं बाई!
काय तरी मेले लोक असतात एकेक!
यांना कशाला दाखवायची दयामाया.......द्या पाठवून त्यांच्या गावाला.
एकतर तिथे रोजगार नाही........इथे येउन पोटला जे काही मिळतय ते राखायचं तर.......
माझी तर बाहेर पाणीपुरी खायची इच्छाच मेली!
15 Apr 2011 - 5:13 am | नरेशकुमार
त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड हाटेलात जाउन पानी-पुर्या खातो.
15 Apr 2011 - 8:27 am | विनीत संखे
तिथे वेटर 'असं' करत नसेल कशावरून?
15 Apr 2011 - 9:09 am | नरेशकुमार
गप बसायचं ठवरलंय !
18 Apr 2011 - 2:00 am | आत्मशून्य
पाणी पूरी घरीच बनवावी यापूढे
15 Apr 2011 - 5:30 am | चतुरंग
असे गलिच्छ प्रकार बघितल्यावर बाहेर गाड्यांवर खायचे नसते उपद्व्याप सांगितलेत कोणी असे वाटू लागले आहे :(
(पोटात ढवळलेला)बेरंगा
15 Apr 2011 - 5:37 am | हुप्प्या
तमाम परप्रांतियानी सुखेनैव हवे ते धंदे नियमबियम न पाळता मुंबईत उघडावेत असे मला आजिबात वाटत नाही. परंतु त्यांच्या सामानाची नासधूस करणार्यांनी ह्याचा विचार केला आहे का की असे लोक आता काय करतील? जर विधीनिषेध नसेल तर ते चोर्यामार्या करायला मागेपुढे पहाणार नाहीत. तशात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या आहेत. घरे रिकामी असतातच. अशा लोकांना थेट आपल्या गावी पोचवून यावे.
जास्त योग्य उपाय म्हणजे अशा बेकायदा फेरीवाल्यांना हवी तिथे टपरी उघडता येता कामा नये. महापालिकेचे आरोग्य खाते जागरुक असले पाहिजे. निव्वळ चिरीमिरी घेऊन डोळ्यावर कातडे ओढून बसणारी जमात सरकारात आहे म्हणून असे प्रकार घडतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून लोक असे कायदा हातात घेतात. (त्या पाणीपुरी प्रकरणाच्या मूत्रधाराला आय मीन सूत्रधाराला निव्वळ १००० रु. इतका दंड झाला आहे म्हणे. खरे तर त्याला कुठल्यातरी सार्वजनिक मुतारीत.... असो.)
माझ्या माहितीप्रमाणे ठाणे व मुंबईत शिवसेनेची महापालिका आहे. त्यांनी आपली खाबूगिरी सोडून ह्यात लक्ष घालावे. पण आता मनसेने ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे शिवसेना मूग गिळून बसणार हे ओघाने आलेच.
चांगले व्हिडियो कॅमेरे असणारे फोन आणि अन्य उपकरणी उपलब्ध होऊ लागली आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण सगळ्यात जास्त त्या मुलीचे जिने हे प्रकरण उघडकीस आणले.
15 Apr 2011 - 12:18 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत.
15 Apr 2011 - 9:05 am | पंगा
- "एका वेळचे" पाणी साधारणपणे किती पाणीपुर्यांना पुरेल? दिवसभर धंदा करायचा तर एक माणूस तो "हाताळू" शकेल का? दिवसभराच्या "पुरवठ्या"साठी साधारण किती भय्ये/बिहारी लागतील?
- खाताना गिर्हाइकाला काहीच पत्ता लागणार नाही? (काहीही काय?)
- 'फोटोशॉप'सारखे व्हिडियोमध्ये "करामती" करू शकणारे सॉफ्टवेअर कुठले?
- विक्रेता जो "हस्तोद्योग"/"लघुउद्योग" करत असल्याचा दावा आहे, तो सगळा प्रकार व्हिडियोत टेबलाखाली / टेबलाआड चालताना दिसतो. तो नेमके काय करत होता याची पडताळणी कोणी केली आहे?
- मुलगी चेहर्यावरून तरी बनेल वाटते. (पण हा मुद्दा कुठल्याही कोर्टात टिकणार नाही म्हणून एवढा एकच मुद्दा सोडून देऊ.)
- कशाकशावर विश्वास ठेवाल?
- थोडक्यात काय, मोडतोड नि नासधूस करायला (आणि भय्यांना पिटायला) आम्हाला काही कारण लागत नाही. कारण हवेच असले तर ते आम्ही कसेही बनवू शकतो. एकाने बनवले की त्यावर विसंबून हजारजण येतातच पिटायला, ग्यारंटीड!
जय महाराष्ट्र!
15 Apr 2011 - 9:10 am | प्यारे१
आपण 'भय्या' आहात गागाभट्ट हे ठाऊक आहे. त्यांना सहानुभूति दाखवलीत तर मान्य हो एकवेळ पण ह्या किळसवाण्या प्रकाराचे समर्थन कसे करु शकता तुम्ही?????
15 Apr 2011 - 9:15 am | नरेशकुमार
मे बी टेस्टी लागत असेल, काय सांगाव !
15 Apr 2011 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>"एका वेळचे" पाणी साधारणपणे किती पाणीपुर्यांना पुरेल?
सदरील पाणीपुरीवाला पाणीपुरीसाठी त्या पाण्याचा वापर करत नव्हता.
(बातमीवरुन)
>>>खाताना गिर्हाइकाला काहीच पत्ता लागणार नाही?
मुद्दा बाद.
>>>'फोटोशॉप'सारखे व्हिडियोमध्ये "करामती" करू शकणारे सॉफ्टवेअर कुठले ?
माहिती नाही.
>>>तो नेमके काय करत होता याची पडताळणी कोणी केली आहे ?
स्वच्छतागृहाची जवळ कुठे सोय नसल्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे
तांब्याचा वापर सु-साठीच करत असावा हे स्पष्ट दिसत आहे.
>>>>मुलगी चेहर्यावरून तरी बनेल वाटते.
कै च्या कैच. मुलगी कशावरुन बनेल वाटते ? (बनेल पणाची काही लक्षणे ?)
>>>मोडतोड नि नासधूस करायला आम्हाला काही कारण लागत नाही.
एवढ्याच गोष्टीशी सहमत.
-दिलीप बिरुटे
15 Apr 2011 - 10:22 am | पंगा
त्या परिस्थितीत:
ही वाक्ये केवळ टंकलेखनाचा सराव करण्याकरिता घातलेली असतीलही कदाचित.
व्हिडियो पुन्हा एकदा नीट पाहिला.
समजा, आपण म्हणता तसे धरून चालू. जवळपास जर स्वच्छतागृहाची सोय नसेल - सार्वजनिक बांधकाम खाते याची दखल घेईल काय? - तर अडल्या वेळेस बाकी काहीही न सुचून आपण म्हणता तसे त्याने हा उपाय अमलात आणला असू शकेलही. (अर्थात, "प्रत्यक्ष" पुराव्याविना ही केवळ अटकळच होऊ शकते, पण तरीही तूर्तास ग्राह्य धरू.)
("शुभकार्या"करिता नव्हे, तर "कार्यसिद्धी" झाल्यावर टेबलाखालीच
हात धुण्यासाठीही तांब्याचा वापर केलेला असू शकतो, अशी एक शंका व्हिडियो पाहिल्यावर येते. पण तीही तूर्तास सोडून देऊ.)
पण, (महत्त्वाचा मुद्दा), त्यानंतर त्याने त्या तांब्याचे पुढे नेमके काय केले, याबाबत व्हिडियोत काहीही दाखवलेले नाही. सबब, तो(च) तांब्या या विक्रेत्याने खाद्यासंबंधी कोणत्याही गोष्टीसाठी वापरला, याला काहीही पुरावा नाही. तेच "पाणी" पाणीपुरीसाठी वापरले वगैरे ही तर खूप पुढची शक्यता.
असला "पुरावा" कुठल्याही कोर्टात कितपत टिकेल याबाबत साशंक आहे.
नाही म्हणजे, नाइलाजाने का होईना, पण त्या विक्रेत्याने आपल्या खाद्यविक्रीच्या टेबलाजवळच लघुशंका केली (असल्यास) ही बाब घृणास्पद आहेच. त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करायचे नाही. पण खाद्यविक्रीच्या टेबलाजवळ लघुशंका करणे आणि तेच "पाणी" कच्चा माल म्हणून वापरणे यात भला मोठा फरक आहे, आणि पैकी दुसरे कृत्य केलेले असण्याचा काहीही पुरावा नाही (किंवा असल्यास निदान या व्हिडियोवरून तरी तो स्पष्ट होत नाही). सबब, अशा निष्कर्षाला काहीही आधार नाही, हा ताणलेल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे, आणि अशा निष्कर्षाच्या आधारावर मारहाण नि नासधूस हा (दुर्दैवी नसता तर) हास्यास्पद म्हणण्यासारखा प्रकार आहे. (तसेही कोणत्याही कारणाकरिता मारहाण नि नासधूस यांचे समर्थन होऊ शकत नाही.)
बाकी, अशा अतिरंजित "बातम्यां"वर ज्या प्रकारे, ज्या स्केलवर आणि ज्या सहजतेने विश्वास ठेवला जातो, आणि त्यावरून काहीही करण्याकडे कल दिसतो, त्यावरून देशात ठिकठिकाणी होणार्या खळबळजनक घटनांबद्दलच्या लोकप्रिय कानगोष्टींच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उत्पन्न होते.
आम्हाला वाटली. काही हरकत?
बाकी "भय्याने सर्वांना पाणी पाजले" याला काही पुरावा लागत नाही. त्यावरून मारहाण, तोडफोड करायला काही पुरावा लागत नाही. "मुलगी बनेल वाटते"ला का लागावा? आम्हाला वाटली, बास. मामला खतम.
(गंभीरपणे उत्तर द्यायचे झाले, तर हा सगळा इन्स्टंट प्रसिद्धीचा स्टंट वाटतो, बाकी काही नाही. म्हणून 'बनेल वाटते' असे म्हटले. 'वाटते' म्हणजे 'असलीच पाहिजे' असे नाही. 'असल्यास आश्चर्य वाटणार नाही', इतकेच.)
15 Apr 2011 - 11:15 am | प्यारे१
छान छान.
किळसवाणेपणाचा कळस (तांब्या) करणार। किती हुश्शार म्हणून पाठ स्वतःच थोपटणार।
पाणीपुरीवाला एकदाच करणार। यांची संततधार निश्चित॥
15 Apr 2011 - 2:57 pm | रमताराम
तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै फ्यान होतो. पण दुर्दैवाने तुमचा 'शहरी पर्यावरणवादी' झाला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
मनसेने केलेल्या तोडफोडीला तुम्ही प्रसिद्धी स्टंट वगैर म्हणत असाल तर तो मुद्दा मी सोडून देतो. मु़ळात ते किळसवाणे कृत्य करणार्या माणसावरून सारे पाणीपुरीवाले अस्वच्छच असतात, सारे भैय्ये 'असलेच' असतात वगैरे 'घाऊक द्वेष' करणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे असे मी मानतो. उद्या ही बातमी बीबीसी/सीएनएन वर वाचून/पाहून सारे भारतीय असेच असतात यासाठी परदेशातील भारतीयांची हॉटेल्स तेथील भूमिपुत्रांच्या संघटनांनी फोडली, तोडली, नष्ट केली तर मनसेच्या येथील कृत्याचे समर्थक करताना तिकडील त्या कृत्यालाही समर्थनीय मानावेच लागेल. त्यामुळे तत्त्वतः मला तोडफोड मान्य नाही.
परंतु मुळात तो विडिओ खोटा असण्याची शक्यता नि ती मुलगी बनेल वगैरे असण्याची शक्यता वगैरे व्यक्त करणे म्हणजे तुम्ही हल्ली निव्वळ वादासाठी वाद घालत आहात असे वाटते आहे. सदर बातमी ही झी २४ तास वर मी दोन दिवसांपूर्वी पाहिली. त्यात 'अंकिता राणे' (ती मुलगी ती मुलगी असा सर्वनामाने उल्लेख का करताहेत सारे कुणास ठाऊक.) ची तपशीलवार मुलाखत झाली. त्यात तिने त्या पाणीपुरीवाल्याला हे कृत्य करताना किमान चार पाच वेळा आधी पाहिले होते. नंतर आपल्या आई-वडिलांना मित्रांनाही दाखवले होते. मग सार्यांच्या सल्लामसलतीने त्याचा वीडीयो रेकॉर्ड केला. तरीही तुम्ही तो खोटा वा 'अल्टर्ड' आहे असा तुमचा दावा असेल तर तो सिद्ध करणे तुमची जबाबदारी आहे. किमान तशी शंकार येण्यामागचे संयुक्तिक (मला वाटते म्हणून हे अर्थातच संयुक्तिक मानता येणार नाही.) स्वतः काहीही न करता इतरांचे श्रेय हिरावून घेण्यासाठी अशी बेजबाबदार विधाने करत संशय निर्माण करण्याचे महत्कृत्य करणारे अशी तसदी फारशी घेत नाहीत हे अनुभवाने ठाऊक आहेच.
तुम्हाला ती मुलगी बनेल वाटली. याउलट आम्हाला ती शामळू वाटली. इतरांच्या मदतीशिवाय ती काहीही करू शकेल असे मुळीच वाटले नाही. पुन्हा तुमचाच मुद्दा, तुम्हाला तसे वाटले आम्हाला असे वाटले, क्विट्स.
जालावर अकलेचे तारे तोडत सातत्याने मूर्तिभंजनाचे विकृत सुख भोगत रहाणार्या विद्वानांपेक्षा आपली सामाजिक जबाबदारी अल्पशी का होईना पार पाडल्याबद्द अंकिता राणे या मुलीचे हार्दिक अभिनंदन.
15 Apr 2011 - 3:22 pm | छोटा डॉन
रराशेठ, एवढा चांगला प्रतिसाद लिहल्याबद्दल आभारी आहे.
:)
- छोटा डॉन
15 Apr 2011 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
ज ब र्या द स्त !
ररा एक ६० आपल्याकडून :)
15 Apr 2011 - 4:03 pm | पक्का इडियट
+२
ररा एक अख्खा खंबा (शुद्ध [!] ) आमच्याकडून...
15 Apr 2011 - 3:44 pm | गणपा
दंडवत रारा.
मुद्देसुद प्रतिसाद.
15 Apr 2011 - 8:34 pm | अर्धवट
म्हातारबा..
लै दणकट प्रतिसाद..
आणी काही लोकांच्या प्रतिक्रीयांकडे आता योग्य चष्मा घालून पाहण्यात येइल.
राणेतैंचे अभिनंदन
15 Apr 2011 - 8:42 pm | माझीही शॅम्पेन
+ १
ज ब रा !!! एकदम कडक !!! साले काही लोक उगाचाच वैचारिक हस्त-मुत्रन करून राहीले इकडे
16 Apr 2011 - 1:03 am | हुप्प्या
उत्तम प्रतिसाद.
जाता जाता, "ती मुलगी" हे सर्वनाम नाही. "ती" हे सर्वनाम पण "मुलगी" सामान्य नाम आहे. असो. अंकिता राणेचे अभिनंदन. तिला राज्य वा राष्ट्रीय पातळीवरील एखादा पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे.
पंगाशेठ एकतर वादासाठी वाद घालत आहेत किंवा त्यांच्या कुण्या निकटच्या नातेवाईकांचा पाणीपुरीचा स्टॉल असेल. असू द्या. कधी कधी भावना सद्सद्विवेकबुद्धीचा ताबा घेऊ शकते. अशा लोकांना त्या भय्याने स्वतःच्या डोळ्यासमोर "धारोष्ण" पाणीपुरीचे पाणी भरुन दिले तरी ते त्यालाही दृष्टीभ्रम मानतील! उद्या त्या लोट्यातल्या पाण्याचे रासायनिक पृथ:करण करुन त्यात लघवीचे अंश सापडले तरी पोलिसानीच त्यात धार कशावरून सोडली नसेल असे प्रश्न विचारतील. तेव्हा गाढ झोपलेल्याला उठवणे अवघड पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे अशक्य हे लक्षात घेणे.
मला वाटते पाण्याची कमतरता भरून काढण्याकरता हे कृत्य हा भय्या करत नसावा. डोके फिरलेले असेल किंवा कुठल्या तरी नेहमीच्या गिर्हाईकावर खुन्नस असेल. एखादा दादागिरी करत असेल, उधारी चुकवत नसेल किंवा जनरलीच तो भय्या त्याच्या कामावर वैतागलेला असेल आणि त्याचा राग तो गिर्हाईकांवर काढत असेल.
16 Apr 2011 - 11:13 am | रमताराम
"ती मुलगी" हे सर्वनाम नाही. "ती" हे सर्वनाम पण "मुलगी" सामान्य नाम आहे.
छान. काय आहे, म्हातारपणी अंमळ विसरायला होते गणित. तसेही गणित हा अवघड विषय आहे म्हणतात. सुधारल्याबद्दल आभार.
अवांतरः शाळेला सुट्ट्या लागल्या का हो?
16 Apr 2011 - 3:57 am | मेघवेडा
जबरदस्त!! आपल्याकडूनही एक खंबा लागू तुम्हांला! :)
15 Apr 2011 - 9:35 am | नगरीनिरंजन
>>- "एका वेळचे" पाणी साधारणपणे किती पाणीपुर्यांना पुरेल?
हे तुम्ही घरी प्रयोग करून पडताळणी करू शकता. बाकी कोणाला अनुभव असेल असे वाटत नाही.
>>- खाताना गिर्हाइकाला काहीच पत्ता लागणार नाही?
पत्ता लागेल असे तुम्हाला वाटते म्हणजे तुम्हाला चव कशी असते त्याची माहिती आहे?
>>- 'फोटोशॉप'सारखे व्हिडियोमध्ये "करामती" करू शकणारे सॉफ्टवेअर कुठले?
गूगलबाबा सांगेल.
>>तो नेमके काय करत होता याची पडताळणी कोणी केली आहे?
हे मान्य आहे. कदाचित तो तांब्यातले पाणी सायफन करून ब्लॅडरमध्ये भरत असण्याची शक्यता आहे. फुल्ल मार्क्स तुम्हाला!
>>- मुलगी चेहर्यावरून तरी बनेल वाटते.
वाटू शकते. काही काही लोकांना न पाहताही ते बनेल आहेत असे मला वाटते.
>>- कशाकशावर विश्वास ठेवाल?
ज्याचा त्याचा प्रश्न
>>- थोडक्यात काय, मोडतोड नि नासधूस करायला (आणि भय्यांना पिटायला) आम्हाला काही कारण लागत नाही.
अगदी बरोबर. जे करायची इच्छा आहे आणि करायची शक्ती आहे ते करायला कारण कशाला पाहिजे? इच्छा हेच कारण असावे बहुतेक.
15 Apr 2011 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं प्रतिसाद ननि.
15 Apr 2011 - 12:55 pm | सूर्य
जबरदस्त प्रतिसाद, आवडला
- सूर्य.
15 Apr 2011 - 1:29 pm | मृत्युन्जय
+ १
15 Apr 2011 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाणीपुरीवाल्याचा सु-प्रताम मराठी वाहिन्यावर काल दिवस वाजत होता.
च्यायला,रस्त्यावरील पाणी-पुरी खाण्याची इच्छाच मेली आहे.
घाणेरडे साले, असे लोक रस्त्यावर चोपले पाहिजेत.
महानगरपालिकेने जागोजागी स्वच्छतागृहे उभारली पाहिजेत.
वगैरे चर्चेसाठी शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
15 Apr 2011 - 12:56 pm | सूर्य
अशा लोकांना, सक्तमजुरीची शिक्षा दिली पाहीजे.
- सूर्य.
15 Apr 2011 - 9:55 am | टारझन
गप्प रहायचे ठरवले आहे .
- पाणित पुरे
15 Apr 2011 - 10:30 am | वेताळ
मागिल वर्षी मी एका राजस्थानी आईस्क्रिम विक्रेत्याला प्रार्त्यविधी गाड्यावरचा तांब्या घेवुन जाताना पाहिले. थोड्या वेळात तो कामकाज आटपुन आला व हात न धुताच त्याने आईस्क्रिम भरायला सुरुवात केली. बहुधा पाणी बचत ची जाहिरात त्याने खुप मनसे घेतली होती.
15 Apr 2011 - 10:39 am | निनाद मुक्काम प...
त्या मुलीचे नाव राणे असून
तिचे खास अभिनंदन
मध्यंतरी मुंबईत पाणीपुरी वाल्यांचे पेव फुटले होते .
मनसे च्या पहिल्या आंदोलनानंतर त्यानी मराठी युवकांना पाणीपुरी व इतर धंद्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते .
मराठी पाणीपुरीवाले रस्त्यावर दिसले नाहीत मग ह्यांचे फावणार च .
बाकी आमचे वडील बी एम सी मध्ये होते .त्यामुळे ह्या रस्त्यावरील विक्रेत्यांचे राजकारण्यांना हफ्ता जात असल्याने त्यांच्यावर मनात असून कारवाई करता येत नाही हे सत्य माहित आहे .
उलट त्यांच्यावर कारवाई होत असेल तर तशी पूर्वसूचना त्यांच्यापर्यंत जाते .
बाकी मुंबईत माटुंगा येथे मनीज किंवा सायन येथे गुरुकृपा अशी अनेक परप्रांतीयांनी व्रत म्हणून चालवलेली खानपान सेवा आढळून येईन .
ह्या गलिच्छ प्रकाराला वाचा फोडण्यासाठी व आळा घालण्यासाठी सरकार अनधिकृत विक्रेत्यांच्या विरोधात कोणती अधिकृत कारवाई करणार आहे .ह्या प्रतीक्षेत मी आहे .
बाकी रस्त्यावरील भेळ व इतर पदार्थ आपण ठरवून खाऊ शकत नाही .पण अनेक गरीब लोक ह्या खाद्यापदार्थांवर जगतात .व तेच हि समांतर अर्थव्यवस्था चालवायला हातभार लावतात .
15 Apr 2011 - 10:39 am | निनाद मुक्काम प...
त्या मुलीचे नाव राणे असून
तिचे खास अभिनंदन
मध्यंतरी मुंबईत पाणीपुरी वाल्यांचे पेव फुटले होते .
मनसे च्या पहिल्या आंदोलनानंतर त्यानी मराठी युवकांना पाणीपुरी व इतर धंद्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते .
मराठी पाणीपुरीवाले रस्त्यावर दिसले नाहीत मग ह्यांचे फावणार च .
बाकी आमचे वडील बी एम सी मध्ये होते .त्यामुळे ह्या रस्त्यावरील विक्रेत्यांचे राजकारण्यांना हफ्ता जात असल्याने त्यांच्यावर मनात असून कारवाई करता येत नाही हे सत्य माहित आहे .
उलट त्यांच्यावर कारवाई होत असेल तर तशी पूर्वसूचना त्यांच्यापर्यंत जाते .
बाकी मुंबईत माटुंगा येथे मनीज किंवा सायन येथे गुरुकृपा अशी अनेक परप्रांतीयांनी व्रत म्हणून चालवलेली खानपान सेवा आढळून येईन .
ह्या गलिच्छ प्रकाराला वाचा फोडण्यासाठी व आळा घालण्यासाठी सरकार अनधिकृत विक्रेत्यांच्या विरोधात कोणती अधिकृत कारवाई करणार आहे .ह्या प्रतीक्षेत मी आहे .
बाकी रस्त्यावरील भेळ व इतर पदार्थ आपण ठरवून खाऊ शकत नाही .पण अनेक गरीब लोक ह्या खाद्यापदार्थांवर जगतात .व तेच हि समांतर अर्थव्यवस्था चालवायला हातभार लावतात .
15 Apr 2011 - 10:42 am | आंसमा शख्स
गलिच्छ प्रकार!
बाहेर खाणे टाळा - हे सांगायला नको, कारण आपल्याला प्राथमिक शाळेपासून हे शिकवलेले आहे. या लोकांना मारझोडीने काय होणार? आपण बाहेरचे खाणे न खाणे आपल्या आवाक्यातील गोष्ट आहे. कुणी कसा धंधा करावा ही नाही. जे योग्य नाही ते करायला जाऊ नये.
खुदाच्या कृपेने सर्वांना चांगली रोजीरोटी व चांगले शिक्षण मिळो.
15 Apr 2011 - 10:58 am | मनराव
पाणीपूरी वाल्यांवर अता संक्रांत आली.....
हे बघा उधारण.......http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7981165.cms
ह्यो अनखी एक लेख..........http://www.misalpav.com/node/15303
मनसेचे
15 Apr 2011 - 11:01 am | मृत्युन्जय
सगळ्या भैयांवर संक्रांत आणण्यात काही हशील नाही. जे शिवांबु पुरी खायला घालतात त्यांना फक्त मारा ;) . आता शिवांबु पुरीवाले वेगळे कसे काढायचे हे मला विचारु नका ;)
15 Apr 2011 - 11:04 am | प्रचेतस
फटके मारा रे अश्या पाणीपुरीवाल्यांना.
गलिच्छ पाणीपुरीच्या निमित्ताने हा स्पावड्याचा पोलीस राईस हा लेख आठवला.
15 Apr 2011 - 12:03 pm | Nile
पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत बॉडीलँग्वेज वरुन लोट्यात "कुणाची शंका" यात वाद नको!
त्यामुलीने तो व्हिडीओ घेण्याचे कारण काय असावे? हा एक योगायोग असेल असे वाटत नाही, खासकरुन ती मुलगी समोरच राहत असल्याने तिने याआधीही हा प्रकार पाहिलेला असावा. म्हणजे साहेब निर्ढावलेले असु शकतील. बाकी धंद्याच्या जागेला खरंतर अनेक जण पवित्र वगैरे मानतात. तिथे अशी चुक चुकुनही होईल असे वाटत नाही. थोडक्यात पानीपुरीवाले के पानी मे कुछ... असो. फक्त, ते पाणी प्रत्यक्षात वापरण्याचा पुरावा नाही, पण व्हिडिओवरून अमेरीकेत असते तशी ज्युरी त्याला दोषी ठरवतील असेच वाटते.
इथून पूढे लोटा दिसला तर तिथे पूरी खायची नाही. ;-)
15 Apr 2011 - 12:35 pm | छोटा डॉन
एकदम नेमका प्रतिसाद, संपुर्ण सहमत ...
बाकी वरचे काही प्रतिसाद वाचुन गंमत वाटते आहे.
नेमके काय घडले व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असताना हा कमालीचा वितंडवाद आणि मुळ मुद्द्याला फाटे फोडणे हे खरोखर गंमतशीर आहे, असो, त्यांच्या दु:खात सहभागी आहे.
बाकी स्थानिक आणि परप्रांतिय असा वाद न उकरता तमाम घाणेरड्या आणि बेशिस्त विक्रेत्यांना 'ठोकायला' हवे ह्या मानसिकतेशी सहमत.
बाकी सध्या जे काही 'कोलॅटरल डॅमेज' होत आहे त्याचे वाईट वाटत नाही, आत्तापर्यंत जे पाहिले आहे त्या मानाने ही शिक्षा कमीच आहे ...
- छोटा डॉन
15 Apr 2011 - 12:38 pm | पक्का इडियट
सहमत आहे.
15 Apr 2011 - 12:52 pm | प्यारे१
>>>>त्या मुलीने तो व्हिडीओ घेण्याचे कारण काय असावे? हा एक योगायोग असेल असे वाटत नाही, खासकरुन ती मुलगी समोरच राहत असल्याने तिने याआधीही हा प्रकार पाहिलेला असावा. म्हणजे साहेब निर्ढावलेले असु शकतील.
त्या मुलीची मुलाखत झी चोवीस तास वाल्यांनी घेतली होती. त्यामध्ये तिने स्पष्ट सांगितले की तिने या विक्रेत्याला दोन- तीन दिवसांपासून हा प्रकार करताना बघितले होते आणि तसे तिने घरच्यांनाही बोलून दाखवले होते. तेव्हा तिचे म्हणणे काहीही सांगते म्हणून झटकण्यात आले.
आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ तिने तो व्हिडीओ घेतला आणि घरी आणि सोसायटीमध्येही सगळ्यांना दाखवला कारण समोरच असल्याने त्या विक्रेत्याकडे तेथील बरेच लोक जात असत.
अवांतर: वयोमानामुळे कमी दिसणे, मधुमेह अथवा इतर कारणांमुळे होणार्या त्रासाची अनुभूति असणे, घाई करावी लागणे ही उगाच समर्थनाची अथवा 'शंका' काढण्याची कारणे असू शकतात असा विचार मणात येऊन सहानुभूतिदारांबद्दल सहानुभूति नाही तर करुणा वाटली.
15 Apr 2011 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार
ब्लडी इंडीयन्स अॅंड ब्लडी इंडीयन पॉलिटिशियन्स.
घंटानाद
15 Apr 2011 - 1:00 pm | सूर्य
(वरती बोलुन झाल्यावर आता) गप्प बसायचे ठरवले आहे ;)
- सूर्य
15 Apr 2011 - 1:01 pm | पक्का इडियट
एकंदर चर्चा वाचून अनेकांना स्वच्छतेची खरोखर चाड आहे हे कळले. यानिमित्ताने आरोग्याची जाणीव जागृत व्हावी आणि उघड्यावरचे, बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड संयमाने काबुत राहिली तर ते सर्वांच्याच फायद्याचे आहे हे नक्की. (फक्त फार्मा कंपन्या सोडून त्यांचा धंदा बुडणार)
काही काही प्रतिसाद वाचून गंमत वाटली यापुढे असे प्रतिसाद देणारे "पाणी"वाले भैया असे समजायला हरकत नाही. अशी मंडळी बुद्धीवादाच्या नावाखाली ओकारी, गरळ, लघवी, विष्ठा इत्यादी प्रतिसादातून लिहीत असतातच हे सर्व मिपाकरांना ज्ञात आहेच.
15 Apr 2011 - 1:18 pm | नितिन थत्ते
>>बुद्धीवादाच्या नावाखाली ओकारी, गरळ, लघवी, विष्ठा इत्यादी प्रतिसादातून लिहीत असतातच
पुन्हा पुन्हा ओळख द्यावीशी का वाटते ते कळत नाही. जुनीच ओळख द्यायची असेल तर आयडी कशाला बदलावा?
15 Apr 2011 - 1:22 pm | पक्का इडियट
आमच्या लहानपणी मित्र मित्र खेळत असतांना मधेच पादल्याचा वास यायचा. जो पादला असायचा तोच सगळ्यात पहिले मी नाही असे डिक्लेअर करायचा. माझ्या प्रतिसादाला पहिलाच प्रतिसाद श्री थत्त्यांचा आलेला पाहून ती गोष्ट अचानक आठवली.
15 Apr 2011 - 1:45 pm | टारझन
>>बुद्धीवादाच्या नावाखाली ओकारी, गरळ, लघवी, विष्ठा इत्यादी प्रतिसादातून लिहीत असतातच
ह्या वाक्यात "पादणे" ह्या शब्दाचा ही समावेष करण्यात यावा अशी पक्का इडियट ला विनंती ;)
- पक्का इंडियन
15 Apr 2011 - 3:28 pm | विजुभाऊ
आमच्या लहानपणी मित्र मित्र खेळत असतांना
शाळाशाळा , शिवाशिवी , डॉक्टरडॉक्टर लंगडीपळती ,जोडीसाखळी हे खेळ ऐकले होते. लहानपणी खेळलो देखील आहे.
"मित्रमित्र" या खेळाचे नाव प्रथमच ऐकतो /वाचतो आहे.
हा खेळ कसा खेळातात, किती गडी असतात, त्याचे नियम काय असतात.जाणकारानी खुलासा करावा
15 Apr 2011 - 1:02 pm | योगप्रभू
वादात अधून मधून विश्रांती म्हणून हा विनोद...
स्वच्छतेबाबत काटेकोर असलेला एक माणूस हॉटेलात गेला. टेबल पुसलेले नव्हते. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने वेटरला ओरडून टेबल साफ करायला सांगितले. कळकट कपड्यातला पोर्या फडका घेऊन आला तसा हा माणूस उठून बाजूला उभा राहिला आणि ते काम संपल्यावर मगच बसला. मग त्याने वेटरला फर्मावले, 'जरा थंड पाणी घेऊन ये.' तो वेटर आला तोच मुळी पाच ग्लास एका हातात बोटांनी पकडून. वेटरची बोटे पाण्यात बुचकळलेली दिसताच या माणसाचे पित्त खवळले. तो ओरडला,'अरे काही स्वच्छतेची चाड आहे की नाही? खुशाल पिण्याच्या पाण्यात बोटे बुचकळतो.' त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अहो साहेब! एवढ्याशा कारणाने इतके संतापताय. आत जाऊन बघा. पिण्याचे पाणी काढून देणारा माणूस हौदात उभा आहे.' :)
15 Apr 2011 - 3:13 pm | स्मिता.
ईऽऽऽऽऽगं!! कसला किळसवाणा आणि गलिच्छ प्रकार आहे. वाचूनच पोटात ढवळून निघालं :(
काय काय खाणं सोडावं काही कळत नाही...
15 Apr 2011 - 3:18 pm | विशाखा राऊत
आत्ता परत कधीहि पाणीपुरी खावे असे वाट्णार नाही.. :(..
जा रे बाबांनो तुम्ही तुमच्या घरी परत जा आणी कुठे कशात काहीही करा
15 Apr 2011 - 4:19 pm | इरसाल
या वरून मागे कुठे तरी वाचल्याचे आठवले कि अमेरिकेत एक जणाला असेच सूप मध्ये अंतर्वस्त्रे ( वापरलेली) उकळताना पकडले होते.विशेष म्हणजे त्याच्याकडे तुफान गर्दी असायची.
15 Apr 2011 - 7:42 pm | तिमा
त्या भैय्याला 'एडस' झाला असेल म्हणून सर्वांनाच त्याचा प्रसाद मिळावा असे त्याला वाटत असेल.
16 Apr 2011 - 2:14 am | चंद्रू
पाणीपुरीचं ठिक हाये. ती तिर्थासारकी पवित्र मानली जात नाय. पण पंढरपुरच्या विठ्ठल मंदीराच्या तिर्थ कुंडात मागे एका बडव्याने अशीच लघवी(सॉरी लघुशंका) केली होती. तेवा आपण त्याला सोडून दिला कारन तो भय्या नव्हता तर बामन होता.
16 Apr 2011 - 2:47 am | शेखर
पकडुन पोलिसात का नाही दिला? फोटो का काढला नाही किंवा रेकॉर्डिंग का नाही केले?
16 Apr 2011 - 3:31 pm | चंद्रू
पोलिसात द्यायचा प्रश्नच नाय येत. पोलिसांच्या लपड्यात आपन पडत नाय. हां फोटो काडला नाय अणि रेकार्डींग केलं नाय हे तिथल्या लोकांनी चूकच केलं. तसं केलं असतं तर पंढरपुरच्या देवळातल्या सगळ्या बडव्यांना मारून झोडून पळवून लावता आलं असत. कुटली तरी संघटना बडवे हटावचं आंदोलन करते त्यांना बी हे सुचलं नाय. आता त्यांनी राजसायबांचं नेतृत्व स्विकारावं म्हनजे कोल्हापूरनंतर आता पुढचा कार्यक्रम पंढरपूरचाच घेऊ.
16 Apr 2011 - 3:53 pm | मनोहर काकडे
ठाण्यापासून कल्याणपर्यंत सगळे भय्ये पाणीपुरीवाले आता पळून गेलेत. काही गाडया व स्टॉल्सही तसेच टाकून गेलेत.
बेरोजगार मराठी तरूणांना ही फारच मोठी संधी आहे. पाणीपुरीचा धंदा सुरू करण्याची. वडापावचा कॉपीराईट आहे. मग पानी पुरी मनसेचा कॉपीराईट व्हायला काय हरकत आहे. आता शिवपाणीपूरी सुरू करायाला हवी. येवढी मोठी शिवउद्योगाची संधी मराठी तरूणांनी गमावली तर राडे करण्याशिवाय आपल्याला काहीच काम उरणार नाही. पाणीपुरीच्या धंद्यात खूप मोठी संधी आणि कमाई आहे.
लघवी करणारा भय्या फितूर भय्या असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
--!! पाणीदार पुरीवाला !!
16 Apr 2011 - 4:54 pm | निनाद मुक्काम प...
हे भय्ये स्वतःच्या राज्यात भुकेने मारण्यापेक्षा मरण्यापेक्षा जिवावरची बाजी लावून महाराष्ट्रात येतात .
आमचा विधर्भातील आत्महत्या करणारा शेतकरी का बरे मुंबईकडे धाव घेत नाही .
'' सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा ''
मुंबई कोणालाही उपाशी मारत नाही हे त्रिवार सत्य आहे .
अकोल्याला मामा कडे गेलो की अकोल्याची रेल्वे स्टेशन वरील कचोरी व झणझणीत गोलगप्पे नेहमीच खायचो ( त्या पाण्याची चवच निराळी )
मुंबईत त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
17 Apr 2011 - 12:37 am | चंद्रू
मुंबई कोणालाही उपाशी मारत नाही हे त्रिवार सत्य आहे .
एकदम सहमत !
दोन हातांना काम आणि जगण्यापुरतं अन्न मिलालं नसतं तर कशाला कोन मुंबईत येतंय. घाणीत आनी प्रदुषनात लोळायला? आमच्या गल्लीच्या नाक्यावर एक कचर्याचा डबा आहे. अख्र्या एरियाचा कचरा त्यात पडतो. दोन कुटुंबांची त्या कचरपट्टीवर ‘मालकी’ आहे. त्यातला कचरा गोळा करून ७/८ मानसं जगतात.
--ऐ दिल मुश्किल नही जीना यहाँ !!