गोगोल यांना हवी असलेली कोलम्बी भात पाककॄती.
साहित्यः-१)३ पेले बासमती तांदूळ,२)२ चमचे धणे,३)२० सुक्या लाल मिरच्या(किंवा आपल्या तब्येतीनुसार),
४)२५ लसणीच्या पाकळ्या,५)१ इंच आले,६)१ मोथ कांदा,७)सुके खोबरे,८)५-६ लवंगा,
९)२ दालचिनीचे तुकदे,१०) २ मसाला वेलची,११)साफ केलेली कोलंबी.१२)तूप,१३) २ कांदे तळण्यासाठी,
१४)थोडे शहाजिरे.
कॄती:- प्रथम लसुण्,खोबरे,आलं,कांदा,धणे,सुक्या मिरच्या यांची कच्ची गोळी वाटावी.भरपूर तुपात प्रथम कांदा
तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावांअंतर त्याच तुपात लवंग्,दालचिनी,मसाला वेलची फोडणीस टाकावी.
त्यावर वाटलेली गोळी चंगली परतून घ्यावी. नंतर त्यात कोलंबी शिजत टाकावी.
बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यातच ठेवावे.एका पातेल्यात पाणी तापत ठेवून त्यात
मिठ,शहाजिरे व एक दालचिनी टाकावी व चांगला सळ्सळीत भात करून घ्यावा.आता एका पातेल्यात
प्रथम सर्वात खाली कोलम्बीचा थर त्यावर भाताचा थर त्यावर तळलेला कांदा असे सर्व लावून चांगली वाफ
काढावी व नंतर निट ढ्वळून घ्यावे.व ताव मारायला सुरवात करावी.
प्रतिक्रिया
14 Apr 2011 - 12:19 am | चिरोटा
मस्तच्.पोट भरलेले असूनही भूक लागली.
टोमॅटो नाही घालायचा का ह्यात?
14 Apr 2011 - 1:36 am | प्राजु
फाऊल!! :-|
14 Apr 2011 - 4:09 am | सानिकास्वप्निल
ह्यात नारळाचे दूध नाही का घालत तुम्ही??
नारळाच्या दूधात कोलंबी भात शिजवला तर त्याची चव एकदम झकास :)
फोटो असता तर अजून मजा आली असती, पा़कृ छान आहे :)
14 Apr 2011 - 5:11 am | प्राजु
फोटो असता तर अजून मजा आली असती
म्हणूनच फाऊल!! :P
14 Apr 2011 - 1:17 pm | मराठमोळा
गंध आणि चव घेता येत नाही इथुन तर कमीत कमी डोळ्यांना तरी दाखवा तो कोलंबी भात.. :)
14 Apr 2011 - 2:46 pm | ज्योति प्रकाश
मी आज कोलंबी भात केला नव्ह्ता.गोगोल भाऊंना पा.कॄ्. हवी होती म्हणुन दिली.त्यामुळे फोटो टाकला नाही.
17 Apr 2011 - 11:39 am | चिंतामणी
आता लौकरच करायचे ठरवा. करताना फोटो काढा आणि................................................................................................................
.....................................................................................
..................................................................................
.......................................................................................
खायला बोलवा.
14 Apr 2011 - 5:35 am | गोगोल
हजारो धन्यवाद.
करून पाहणार आणि फोटू पण टाकणार.
14 Apr 2011 - 12:49 pm | यशोधरा
नारळाच्या दुधात कोलंबी शिजवली तर मस्त चव येईल. :)
किंवा,
एका पातेल्यात प्रथम सर्वात खाली कोलम्बीचा थर त्यावर भाताचा थर त्यावर तळलेला कांदा असे सर्व लावून - ह्यात थोडे थोडे नारळाचे दूध सोडून (टीस्पूनप्रमाणे ) - चांगली वाफ काढावी.
छान आहे पाकृ. :)
14 Apr 2011 - 2:13 pm | शाहिर
मस्त !!!!
कोलंबी बिर्यानि चि पद्धत दिल्यास आनन्द होइल
16 Apr 2011 - 8:44 am | अविनाशकुलकर्णी
कोळंबी किति वेळ शिजवावि? जास्त शिजली कि रबरा सारखि होते असे वाचण्यात आले आहे
17 Apr 2011 - 11:29 am | ज्योति प्रकाश
कोलंबी चांगली वाफ आल्यावर ५ मिनिटे शिजू द्यावी.भात शिजलेलाच असतो.