हिच का देशभक्तांची किंमत??

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
13 Apr 2011 - 11:27 pm
गाभा: 

आत्ताच ईसकाळवर एक बातमी वाचनात आली.

"कॉंग्रेस संदेश' या मुखपत्राच्या ताज्या अंकात भगतसिंग व राजगुरू या क्रांतिवीरांना आदरांजली वाहताना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने तो राजकीय वादाचा विषय ठरला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या तिघांनाही ब्रिटिशांनी 23 मार्च 1931 ला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर लाहोरपासून 50 किलोमीटरवरील हुसेनवाला येथे त्यांच्या मृतदेहांचे गुपचूप दहनही केले. या ठिकाणी आजही स्मृतिस्तंभ आहे. लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री संपादक असलेल्या "कॉंग्रेस संदेश' या पाक्षिकाच्या ताज्या अंकात या तिघांनाही आदरांजली वाहताना, पंजाबातील लियालपूर येथे जन्मलेले भगतसिंग हे जाट शीख समाजाचे, तर पुण्यानजीक खेड येथे जन्मलेले राजगुरू हे देशस्थ ब्राह्मण समाजाचे होते, असा स्पष्ट उल्लेख छापण्यात आला आहे. सुखदेव (थापर) यांच्या जातीचा उल्लेख मात्र यात केलेला नाही.

(सवीस्तर बातमी येथे वाचा)

धर्म निरपेक्षतेचे धडे शिकवण्याची आपलीच लायकी आहे असे मानणारे नेते आता कुठे आहेत? असा आचरटपणा करायचे घैर्य येते कोठुन????

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

13 Apr 2011 - 11:33 pm | आत्मशून्य

देशभक्तांचा असा अपमान करणार्‍या हरामखोरांना चपला सूध्दा घालायची संधी न देता हूसकावून दीले पाहीजे.

माझ्यामते असल्या जातीयेवादी बातम्यांची चर्चाही होता कामा नये.
नको त्या गोष्टी सगळ्यांसमोर पुन्हा ठेवायची गरज काय?
जातीयता नको म्हणताना तीच गोष्ट मतं मिळवण्यासाठी राजकारणी करत असतात आणि पब्लीक गाढवासारखं त्यांची ओझी वहात असतं. बरेच दिवसात जातीवरून काही घडले नाही की एखाद्यानं असलं काही बोलायचं तर दुसर्‍यानं त्यावरून गोंधळ घालायचा. यानं मुद्दा अधोरेखितच होतो.

गरज एव्हढ्यासाठी आहे की दुस-याच्या डोळ्यातील कुसळ दिसणा-यांच्या, अर्थातच स्वतःचे डोळ्यातीळ मुसळ न दिसणा-या भोंदु राजकारण्यांची कृती काय आहे हे समाजास दाखवणे आहे.

धनंजय's picture

14 Apr 2011 - 12:03 am | धनंजय

उल्लेख करायला नको होता.

मूळ संदर्भ कोणी बघितलेला आहे काय? लालबहादुर शास्त्र्यांचा पुत्र अनिल शास्त्री हा विशेषकरून जातीयवादी असल्याची कुप्रसिद्धी असली तर ठीक. नाहीतर संदर्भ बघितलेला बरा. "अमुकतमुक वेगवेगळ्या जातीच्या आणि राज्यांतल्या लोकांनी जातिभेदाला आणि प्रदेशभेदाला बाजूला ठेवून संघटन केले..." वगैरे संदर्भ असेल तर कदाचित "अमुक-अमुक" जातीचा उल्लेख चालून जाईल.

- - -
(यू. एस. अमेरिकेतील शेरॉड नावाच्या कृषि अधिकार्‍याबद्दल झालेल्या गदारोळाची आठवण झाली. या कृष्णवर्णीय अधिकारी बाईंनी कुठल्याशा भाषणात असे काहीसे म्हटले होते "एकदा मला गोर्‍या शेतकर्‍याला सरकारी मदत नाकारावीसा वाटला, कारण पूर्वी गोर्‍या शेतकर्‍यांनी काळ्या शेतकर्‍यांना लुबाडले होते. पण मग मला लगेच उपरती झाली. त्या शेतकर्‍याला मी मदत केली आणि आमची मैत्री झाली..." त्यातील पहिले वाक्य म्हणतानाची चित्रफीत काही लोकांनी प्रसिद्ध केली, आणि म्हटले, बघा "या सरकारमधील काळे लोकच कसे हीन प्रकारे वर्णभेद करत आहेत." वगैरे. सरकारने तिला बडतर्फ केले. पूर्ण संदर्भात वाक्याचा मथितार्थ नेमका उलट होता, ते कळल्यावर राष्ट्रपती ओबामासह मंत्र्यासंत्र्यांना शेरॉड यांची माफी मागावी लागली.
- - -

भडकमकर मास्तर's picture

14 Apr 2011 - 12:15 am | भडकमकर मास्तर

मूळ संदर्भ अगदी विरुद्धार्थी नसला तरी फरसा तापदायक नाही असे वाटते...

टीवी वरील बातमीत संपूर्ण वाक्य दाखवलेले होते तेव्हा फार आपत्तिजनक वाटले नाही...

अमुक माणसाचा अमुक तारखेला अमुक गावी अमुक समाजात जन्म झाला इतके वाक्य....

उगीच कशाचाही बाऊ करायचा... वाक्य सत्य असल्यास विषय संपला...
यात काय शहीदांचा अपमान झाला ?

आजकालच्या फुटाफुटाल अपमान होण्याच्या जमान्यात आणि कशाचेही राजकारण होण्याच्या जमान्यात संपादकांनी काळजी घ्यायला हवी होती इतकेच....

चिरोटा's picture

14 Apr 2011 - 12:28 am | चिरोटा

यात काय शहीदांचा अपमान झाला ?

शहिदांचा अपमान नाही पण संपादकांनी आणि त्या पाक्षिकाने स्वतःची ईज्जत काढून घेतली आहे असले उल्लेख करुन.

ते पाक्षीक कॉंग्रेसचे अधीकृत पाक्षीक आहे.

संपादक अनील शास्त्री (लाल बहादुर शास्त्रींचे चिरंजीव) आहेत.

अन्या दातार's picture

14 Apr 2011 - 12:11 am | अन्या दातार

जरा डोळे उघडुन बघा या बातमीकडेपणः
भारताच्या अमेरिकेतील राजदूत मीराकुमारी यांनी सोनिया गांधींचा धर्म ख्रिश्चन आहे अधिकृत भाषणात सांगितल्याचे कळल्यावर, त्यांच्या भाषणातील ती वाक्ये वेबसाईट वरुन गायब करण्यात आली.
आपला धर्म लपवण्याचा इतका अट्टाहास का याचे कारण कळत नाही
आणि दुसरीकडे मात्र देशभक्तांच्या जातीवरुन राळ उडवायची.

मीराकुमारी यांनी तो उल्लेख भारतातल्या विविधततेतील एकतेच्या संदर्भात केलेला होता.
तो काढून टाकण्यामागची भूमिका समजली नाही.त्यात वाईट काहीच नाही.

आपल्या मुखपत्रात देशभक्त शहीदांच्या जातीचा मुद्दाम उल्लेख करण्यामागचेही कारण समजले नाही.
असे करणे मात्र वाईट आहे.

०७:१२ पासून पुढे पहा.

नारयन लेले's picture

14 Apr 2011 - 1:29 pm | नारयन लेले

यात काय शहीदांचा अपमान झाला आसे वाटत नाही पण जातियवादी नाही म्हणणार्या कॉंग्रेस म्हध्ये किती जातियवादी विचार
भरलेले आहेत त्याचि जाणीव होते हे खरे.
केवळ मता साठि काहिही करतिल हे लोक.

विनित

ऋषिकेश's picture

14 Apr 2011 - 2:02 pm | ऋषिकेश

अपमान काय तो कळला नाही
मात्र, सगळ्यांनीच जातीचा उल्लेख (कोणाच्याही) शक्य तितका टाळावा या भावनेशी सहमत.

खरां तर 'नेहमी' टाळावा असे म्हणणार होतो; मात्र जेव्हा एखाद्या घटनेला जात जबाबदार असते तेव्हा तो उल्लेख टाळता येत नाही. शिवाय भारतीय संस्कृतीमधे काहि सामाजिक सोहळे, चालीरीती, सवयी या जातींशी निगडीत आहेत. त्यामुळे तो अभ्यास करताना/ माहिती देता-घेताना जातीचा उल्लेख होणे स्वाभाविक पणे होतो.

थोडक्यात, जात ही एखाद्याची 'ओळख' बनु नये असे वाटते

विकास's picture

15 Apr 2011 - 4:18 am | विकास

"अपमान काय तो कळला नाही", याच्याशी तसेच इतर प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. फक्तः

मात्र जेव्हा एखाद्या घटनेला जात जबाबदार असते तेव्हा तो उल्लेख टाळता येत नाही.

हे वाक्य दुधारी शस्त्र ठरू शकते. एकदा का हे मान्य केले, तर उद्या एखाद्या विशिष्ठ धर्मियांनी, धर्माच्या नावाखाली जर काही अत्याचार केले तर त्या धर्माचा तसा उल्लेख देखील टाळा असे म्हणता येणार नाही. शिवाय एखाद्या जातीतील कुणाच्या बापजाद्यांनी (म्हणजे आधीच्या पिढ्यांमध्ये) काही अनिष्ठ गोष्टी / अत्याचार इत्यादी केले असले तर त्याचा इतिहास म्हणून सांगताना आत्ताच्या पिढ्यांचा पण केवळ त्या जातीच्या सर्वांचा उद्धार करणे मात्र टाळणे गरजेचे आहे असे वाटते.

नितिन थत्ते's picture

15 Apr 2011 - 8:14 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

>>एखाद्या जातीतील कुणाच्या बापजाद्यांनी (म्हणजे आधीच्या पिढ्यांमध्ये) काही अनिष्ठ गोष्टी / अत्याचार इत्यादी केले असले तर त्याचा इतिहास म्हणून सांगताना आत्ताच्या पिढ्यांचा पण केवळ त्या जातीच्या सर्वांचा उद्धार करणे मात्र टाळणे गरजेचे आहे असे वाटते.

अशा जातीचा उद्धार होतो तो त्या बापजाद्यांच्या पापांसाठी नाही तर त्या जातीतले लोक मोठ्या प्रमाणात आपल्या तथाकथित श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातही टेंभा मिरवतात म्हणून. त्या तथाकथित श्रेष्ठ जातीत जन्मलो म्हणून आपल्याला ऑपॉप मान मिळावा अशी अपेक्षा ठेवतात म्हणून. एका क्रांतिकारकाची जात कळल्यावर एका प्रतिसादकाला स्वतःचा अभिमान वाटतो म्हणून.

बाकी सहमतच आहे.

विकास's picture

15 Apr 2011 - 4:00 pm | विकास

अशा जातीचा उद्धार होतो तो त्या बापजाद्यांच्या पापांसाठी नाही तर त्या जातीतले लोक मोठ्या प्रमाणात आपल्या तथाकथित श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातही टेंभा मिरवतात म्हणून. त्या तथाकथित श्रेष्ठ जातीत जन्मलो म्हणून आपल्याला ऑपॉप मान मिळावा अशी अपेक्षा ठेवतात म्हणून. एका क्रांतिकारकाची जात कळल्यावर एका प्रतिसादकाला स्वतःचा अभिमान वाटतो म्हणून.

याचा अर्थ, असे चुकीचे वागणार्‍या व्यक्तीमुळे तुम्हाला ती व्यक्ती चुकीची आहे असे वाटून तिचा उद्धार करण्याऐवजी, जातीय चष्म्यातून पहात, जातीचा उद्धार करणे समर्थनीय वाटते तर!

फक्त मग असेच जर कोणी पुढे जाऊन कुठल्याही धर्माबद्दल केले आणि अतिरेक्यांपेक्षा / दहशतवाद्यांपेक्षा त्यांच्या धर्माचा उद्धार करू लागले तर?

म्हणून माझ्या दृष्टीने जात - धर्म यांचा (आपल्या भाषेतील) उद्धार करणेच गैर.

नितिन थत्ते's picture

15 Apr 2011 - 4:03 pm | नितिन थत्ते

माझ्या प्रतिसादातली अधोरेखिते दुर्लक्षण्यासारखी नाहीत.

विकास's picture

15 Apr 2011 - 4:07 pm | विकास

माझ्या प्रतिसादातली अधोरेखिते दुर्लक्षण्यासारखी नाहीत.

तसेच अधोरेखीत वाक्य हे धर्माच्या (श्रेष्ठत्वा/) नावाखाली हल्ले करताना वापरले गेले आणि म्हणून त्या धर्माचा उद्धार केला तर चालणार आहेत का?

पंगा's picture

15 Apr 2011 - 4:12 pm | पंगा

एका क्रांतिकारकाची जात कळल्यावर एका प्रतिसादकाला स्वतःचा अभिमान वाटतो म्हणून.

मनुष्यस्वभाव कोणालाच चुकलेला नाही.

- ४११०३०मध्ये आमच्या शेजारी राहणार्‍या एका बाईंना 'टीव्हीवरच्या सगळ्या कार्यक्रमांनंतर दिसणार्‍या क्रेडिट्समध्ये बहुतांश आडनावे कोकणस्थांची दिसतात' (हे त्यांचेच निरीक्षण!) या बाबीचा प्रचंड अभिमान होता. (जशी काही ती त्यांची वैयक्तिक अचीवमेंट होती.)

- मुंबईत मी जिथे नोकरी करीत होतो, त्या कंपनीत नाडकर्णी-केणी-लाड-देसाय वगैरे आडनावांचा सुकाळ होता. अशा आडनावांचे कंपनीत एकंदरच प्रमाण भरपूर असल्यामुळे संख्याशास्त्रीयदृष्ट्या त्यांपैकी त्या कंपनीच्या उच्चपदस्थांतही अशी आडनावे भरपूर असणे मला वाटते नैसर्गिकच असावे. तर कोणत्याही संभाषणात या उच्चपदस्थांपैकी कोणाच्याही नावाचा अगदी सहज उल्लेख जरी आला, तरी आमचा एक सहकर्मी लगेच 'जीएसबी! जीएसबी!!!' करून कॉलर अशीअशी करून दाखवीत असे. (जसे काही यात त्याचे स्वतःचे काही कर्तृत्व होते.)

त्यामुळे, मला वाटते, हा प्रकार तत्त्वतः जरी समर्थनीय नसला, तरी, वी आर ऑल ह्यूमन्स, यू नो, आणि ही ह्यूमन ट्रेट मला वाटते बर्‍यापैकी युनिवर्सल असावी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Aug 2012 - 1:14 pm | पुण्याचे वटवाघूळ

अशा जातीचा उद्धार होतो तो त्या बापजाद्यांच्या पापांसाठी नाही तर त्या जातीतले लोक मोठ्या प्रमाणात आपल्या तथाकथित श्रेष्ठत्वाचा आजच्या काळातही टेंभा मिरवतात म्हणून. त्या तथाकथित श्रेष्ठ जातीत जन्मलो म्हणून आपल्याला ऑपॉप मान मिळावा अशी अपेक्षा ठेवतात म्हणून. एका क्रांतिकारकाची जात कळल्यावर एका प्रतिसादकाला स्वतःचा अभिमान वाटतो म्हणून.

थत्ते असे काहीतरी लिहितात म्हणूनच तर मी थत्तेंचा मोठ्ठा फॅन आहे.

केवळ त्या जातीच्या सर्वांचा उद्धार करणे मात्र टाळणे गरजेचे आहे असे वाटते

सहमत आहेच
मला फक्त त्या घटनेचे वर्णन करताना, विश्लेषण करताना वगैरे जातीचा उल्लेख करणे गरजेचे होते म्हणून नेहमी हा शब्द वापरता येणार नाही असे म्हणायचे होते

मला फक्त त्या घटनेचे वर्णन करताना, विश्लेषण करताना वगैरे जातीचा उल्लेख करणे गरजेचे होते म्हणून नेहमी हा शब्द वापरता येणार नाही असे म्हणायचे होते

मला कल्पना आहे आणि गैरसमज नव्हताच.

फक्त एकंदरीत जात आणली तर चालते पण तोच नियम धर्माच्या बाबतीत, विशेषकरून अल्पसंख्यांकांच्या धर्माविरुद्ध त्याच नियमाने कोणी वापरू शकते असे वाटते, म्हणून हे दुधारी शस्त्र म्हणले.

तिमा's picture

14 Apr 2011 - 2:29 pm | तिमा

जातीचा उल्लेख जर इतका तापदायक वाटत असेल तर सरकारी अर्जात वा मतगणनेच्या वेळी जात का विचारतात ?
स्वतःच्या जातीचा व धर्माचा अभिमान असण्यात काय गैर आहे ? गैर आहे ते दुसर्‍या जातीचा व धर्माचा द्वेष करणे वा त्यांना कमी लेखणे.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2011 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

तर पुण्यानजीक खेड येथे जन्मलेले राजगुरू हे देशस्थ ब्राह्मण समाजाचे होते

काय सांगता काय ? चला... नविन टार्गेट मिळाले.

आता लवकरच आम्ही :-

१) राजगुरु हे देशभक्त नव्हतेच.
२) राजगुरु हे इंग्रजांचे हेर होते.
३) राजगुरुंचा जन्म खेडचा नाहीच.

हे सिद्ध करु आणि मग त्यांचे पुतळे हटवणे, त्यांच्या नावाच्या पाट्या, गांव / तालुके ह्यांची नावे बदलणे ह्यासाठी आंदोलन उभारु.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Apr 2011 - 8:50 pm | llपुण्याचे पेशवेll

राजगुरु ब्राम्हण असल्याचे कळल्याने स्वतःचा अभिमान वाटून गेला.

पंगा's picture

14 Apr 2011 - 9:04 pm | पंगा

मूळ धाग्याच्या भावनेशी हे विसंगत नाही काय?

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2011 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ
खरे आहे.

गोडसेंनी गांधीवध केला म्हणुन ब्राम्हणांची घरे, व्यवसाय सरसकट जाळणे, इंदिराबैच्या हत्येनंतर शीखांचे हत्याकांड होणे, कोंडदेवांचा पुतळा हटणे हे मात्र सगळे सुसंगत आहे.

पुप्या तुम्हारा चुक्याच.

पंगा's picture

15 Apr 2011 - 3:44 pm | पंगा

गोडसेंनी गांधीवध केला म्हणुन ब्राम्हणांची घरे, व्यवसाय सरसकट जाळणे, इंदिराबैच्या हत्येनंतर शीखांचे हत्याकांड होणे, कोंडदेवांचा पुतळा हटणे हे मात्र सगळे सुसंगत आहे.

ईदर यू आर विथ अस, ऑर अगेन्स्ट अस.

बाकी चालू द्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Apr 2011 - 4:39 pm | llपुण्याचे पेशवेll

पुप्या तुम्हारा चुक्याच.
सहमत आहे. म्हणूनच 'आत्मभान' जागे झाले आहे परत. :)

नितिन थत्ते's picture

14 Apr 2011 - 3:05 pm | नितिन थत्ते

वरीजिनल मजकूर पहायला मिळाला नाही.
जालावर काँग्रेस संदेशचा अंक उपलब्ध दिसला तो जुना आहे.

बाकी चालू द्या.

जातीचा उल्लेख नको होता हे मान्य.

थोर व्यक्तींच्या जातीचा उल्लेख बर्‍याच ठीकाणी पाहण्यात येतो. तो टाळणे आवश्यक वाटते. अगदी विकिपिडिया देखील जातीचा उल्लेख करते हे बघून खेद वाटतो. एक उ.दा.
http://en.wikipedia.org/wiki/Lokmanya_Tilak

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Apr 2011 - 7:54 pm | निनाद मुक्काम प...

जगात देशभक्ती व देशद्रोह ह्या दोन प्रवृत्ती आहेत .त्या सर्व जाती धर्मात आढळतो .
म्हणूनच व्यक्तीच्या कार्याचा उल्लेख करतांना जात टाळावी .
अझर व जडेजा अशी जोडी क्रिकेट मध्ये होतीच .की
पण उत्तर भारतात जातीय राजकारण नेहमीच वर्चस्व राखून आहे .म्हणूनच त्या वृत्त पत्रात असा उल्लेख आला त्यात नवल ते काय .
आता ह्या लोकांनी धर्म निरपेक्ष लिखाण त्यांच्या राज्यात करणे म्हणजे लालू ने हजारे ह्यांना उपोषणाला पाठिंबा म्हणून जंतर मंतर येथे उपोषण करण्या सारखे होईन
अवांतर ( एक व्रात्य विचार'' लालू खरच उपोषणाला बसले तर रात्री तेथील हिरवळीचे चारयात रुपांतर होऊन ती फस्त केली जाईन'')

येथे तुम्हाला आदरणीय सोनिया गांधी ह्यांचा उल्लेख स्पष्ट पणे दिसेन .
हि फीत मी मिपा वर आधीच देवीस च्या लेखात दिली होती .
अर्थात ही फीत अमेरिकन सरकारला टोमणे मारणारी असून ती आपल्याच वाहिनीने भारतात दाखवली आहे
.
अवांतर
( भारतात जातीचे बरेच राजकारण चालते. पण .आम्ही पडलो सरकारी अस्पृश्य तेव्हा येथे जाहीर रीत्या नमूद करतो .आमची पत्नी रोमन केथेलिक आहे .( सध्या चे पोप हे जर्मन असून माझ्या सासरच्या शेजारील गावातून पुढे आले आहेत. ).
ह्या भांडवलावर काही अनिवासी भारतीय म्हणून फायदे मिळणार असतील . तर अजून तपशील जाहीर करेन .
बायको चर्च मध्ये जात नाही व पक्की नास्तिक आहे ..पण मी तिचे हदय परिवर्तन करून आणेन .कारण बाबा बर्व्यांसह आमचा देखील अश्या परिवर्तनावर विश्वास आहे .)
ज्यू राष्ट्रात बिना विसा जायला मिळत असेल तर आमची सुद्धा धर्म परिवर्तन करायची तयारी आहे
.''नाही तरी आम्ही बा बा आहोत .
( बाटलेला बामन )
नि मु पो ज

माझी माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करावी, पण मी असे वाचले आहे कीं या वेळच्या जनगणनेत (census) जात समाविष्ट करायचा आग्रह आवर्जून बर्‍याच पक्षांनी केला होता व तो मान्यही करण्यात आला!
त्यामुळे यावेळी सर्व राजकीय पक्षांना कुठल्या मतदारसंघात जातीवर भर द्यायचा/द्यायचा नाहीं, दिल्यास 'कुठल्या जाती'वर भर द्यायचा याबद्दलची झकास सोय झालेली आहे. (प्रत्यक्षात तसे केले गेले आहे कीं नाहीं हे समजून घ्यायला आवडेल.)
आता जर जनगणनेतच अगदी 'टिच्चून' जातींचा उल्लेख असेल तर या विषयाला कशाला महत्व द्यायचे? एक चूक केली कीं दुसरी ओघानेच येते!
पण आपल्या पासपोर्टमध्ये मात्र जातीचा उल्लेख कित्येक वर्षे नसतो ही एक जमेची बाजू म्हणायला हरकत नाहीं.