सुरळीच्या वड्या

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
13 Apr 2011 - 5:48 pm

.

साहित्यः
१ वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ)
२ वाट्या पाणी
३/४ वाटी ताक
१ इंच आले+२-३ हिरव्या मिरच्या भरड वाटून किंवा पेस्ट
मीठ चवीनुसार
१/२ टेस्पून हळद
१/२ छोटी वाटी खवलेले ओले खोबरे
१/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर

फोडणी चे साहित्यः

२ टेस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून तीळ
चिमूटभर हिंग

पाकृ:

पीठ चाळायच्या चाळणीत बेसन, आले+मिरची पेस्ट, मीठ, हळद, ताक व पाणी घालून गाळून घेणे म्हणजे गुठळी होणार नाही.

.

जाड बुडाच्या पातेल्यात गाळलेले मिश्रण घालून गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.

.

मिश्रण घट्टसर होत आले की झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे.

.

शिजलेले मिश्रण असे दिसेल.

.

स्टीलची ताटं पुसून कोरडी करावी , पाणी , तेल अजिबात लावू नये.

तयार मिश्रण गरम असतानाच ताटावर पटपट पसरावे.

.

त्यावर सुरीने उभ्या रेषा माराव्यात व त्यावर तयार फोडणी , खोबरे, कोथंबीर घालावी.

.

अलगदपणे पट्टी गुंडाळून वड्या तयार कराव्यात.

.

पुदिनाच्या चटणीसोबत खायला द्याव्यात. (नुसत्याही खायला छान लागतात :) )

.

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Apr 2011 - 5:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

शॉल्लीट दिसतय..... करून पाहील पाहिजे.....

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 5:54 pm | पुष्करिणी

वा वा वा...मला सुव फार्फार आवडतात,
ते शेवटचं नाजूकपणे वड्या गुंडाळायचं काम जमेल की नाही याची शंका वाटतेय..पण नक्कीच करुन बघेन

विशाखा राऊत's picture

13 Apr 2011 - 6:06 pm | विशाखा राऊत

एकदम आवडते :)..
मस्तच दिसत आहे..

स्मिता.'s picture

13 Apr 2011 - 6:27 pm | स्मिता.

काय मस्त दिसत आहेत त्या वड्या! मला खूप आवडतात.

एकदा करायला घेतल्या होत्या पण बेत फसला. पीठ शिजवताना त्यात गाठी झाल्या. पसरवल्यावरही ते काही पोळीसारखं एकसंध झालं नाही. शेवटी कैरीच्या डाळीसारखं चमच्याने खाल्लं होतं. पुन्हा करायची हिम्मतच झाली नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

आआआआआआआआआआआआ

अरे हा आयडी बॅन करा रे !

आता आज चकण्याला कावेरीत सुरळीवड्याच. ठरले !

अवांतर :- बर्‍याच दिवसांनी '१ इंच आले' वाचनात आले. 'टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट' आठवले ;)

मस्त दिसताहेत वड्या. भारी !

गणपा's picture

13 Apr 2011 - 6:35 pm | गणपा

माझं आवडतं खाद्य. :)

पैसा's picture

13 Apr 2011 - 6:51 pm | पैसा

मस्त दिसतायत!

मस्त जमल्या वड्या, पण खोबरे-कोथिंबिर पसरण्यात इतका चिक्कूपणा का?

दुकानांत तयार मिळणार्‍या सुरळी वड्या फक्त बाहेरुन गुंडाळी करतात आणि मग त्यावर नावापुरते खोबरे कोथिंबिर पेरतात. खरी सुरळीवडी तीच जी सारणाला पोटात घेऊन गुंडाळली जाते.

हे सुरळी वडी प्रकरण म्हणजे 'उडाला तर पक्षी, नाहीतर बेडूक' या कॅटॅगरीतले. पीठ सैल झाले, की ताटाला चिकटत नाही आणि घट्ट झाले, की मग पिठले म्हणून खाणे आले. म्हणून नवी म्हण. 'साधली तर सुरळीवडी, नाहीतर पाटवडी'

हे पीठ बरोबर शिजले आहे, याची अचूक वेळ म्हणजे पीठाला जीभ येणे. म्हणजे स्पॅट्युलावर मिश्रण उचलून भांड्यात पडू दिल्यास ते पताकेसारखे दिसते. (हा एक फोटो हवा होता इथे)

जेव्हा तेल लावलेल्या ताटलीवरची ती सुरळी वडी हलक्या हाताने अलवार गुंडाळली जाते तेव्हा तिच्यावरची चमक बघण्यासारखी असते.

सानिकास्वप्निल's picture

13 Apr 2011 - 8:19 pm | सानिकास्वप्निल

अहो काय सांगू माझ्या नवर्‍याला जास्त खोबरे-कोथिंबीर घातलेली आवडत नाही :( म्हणून कमी घातले...प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अगदी बरोबर शिजलेल्या पीठाला जीभ येणे म्हणजे पीठ तयार , तसा फोटो काढला ही असता,पण काय करू सगळे फोटो काढा आणी पा़कृ पण बनवा सगळं एकत्र जमवणं तसं कठीणच होत.

मी पा़कृ मधे सांगितले आहे की ताट्लीला तेल, पाणी लावायचे नाही कारण वडी उचलणं कठीण होतं, मिश्रण शिजवताना हळद घातली तर वड्या छान चकचकीत दिसतात.

चतुरंग's picture

13 Apr 2011 - 7:33 pm | चतुरंग

माझा आवडता प्रकार. :)
(कोथिंबीर्-खोबर्‍याचं सारण मात्र भरपूर हवं बॉ! नाहीतर मजा नाय! :()

-रंगा

सखी's picture

13 Apr 2011 - 7:38 pm | सखी

नेहमीप्रमाणेच पाकृ व फोटु खासच, म्हणजे आम्ही खलासच! वरच्या योगप्रभूंच्या टीपाही आवडल्या.

मी या धाग्यावर आलोच नाही, फटु पाहीलेच नाहीत आणि जळजळसुद्धा झालीच नाही!
हुश्शऽऽऽऽऽ!!! वाचलो!!! :-)

(इनोचा मोठा डोस, सुरळी के वडी के नाम)

--असुर

हेच काय ते करुन बघायचं राह्यलंय !! करुन बघेन आणि फोटुही डकवेन, डकवेपर्यंत वड्या शिल्लक राह्यल्या तर !!

निवेदिता-ताई's picture

13 Apr 2011 - 8:27 pm | निवेदिता-ताई

मी ही करुन बघेन.............खुप मस्त झालेला दिसतोय......

आवडीचा पदार्थ...

पण या साठी खूप वेळ जातो म्हणून केला जात नाही...कोणी आयता दिला तर आवडतोच.

निवेदिता-ताई's picture

13 Apr 2011 - 8:28 pm | निवेदिता-ताई

फोटो ही खूप छान...:)

दीविरा's picture

13 Apr 2011 - 10:12 pm | दीविरा

शेवटचा फोटो जबरदस्त :)

माझ्या ह्या वड्या बरेचदा फसल्यात :(

मी ह्यात अगदी थोडासा मैदा घालते, त्यामुळे वड्या चकचकित होतात

प्राजु's picture

13 Apr 2011 - 10:33 pm | प्राजु

मी ही अशाच करते.
माझीही अत्यंत आवडीची डिश आहे.

एकदा मी २ वाट्या पाण्याऐवजी, थोडासा पालक शिजवून तो २ वाट्या पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घातला होता. आणि घातला होता. त्याने रंग हिरवा आला होता वड्यांचा. चवीलाही तशा चांगल्या लागत होत्या. कधीतरी वेगळाप्रकार म्हणून ठीक आहेत.. एरवी या पिवळ्या धम्मक वड्याच आवडतात.

रेवती's picture

13 Apr 2011 - 10:45 pm | रेवती

पाकृ सगळ्यांची आवडती आहे.
फोटू छान काढलाय.

छान वड्या. खायला कधी मिळणार ते सांगा!!!!!!!!!! फटू पण लई भारी.................

आतापर्यंत ही पाक्रु अति किचकट म्हणून कधी केली नव्हती. आता नक्कीच करुन बघेन.

पियुशा's picture

14 Apr 2011 - 9:52 am | पियुशा

कधि खान्याचा योग आला नाहि
पा क्रु झक्कास असनार करुन बघते नक्कि :)

मदनबाण's picture

14 Apr 2011 - 10:11 am | मदनबाण

खल्लास !!! :) अळुवडी नंतर मला सर्वात जास्त आवडणारा खाद्य पदार्थ. :)

प्यारे१'s picture

14 Apr 2011 - 10:26 am | प्यारे१

येकदम सरस छे।

सारो सारो

सहज's picture

14 Apr 2011 - 10:35 am | सहज

सानिकाताई _/\_

धन्यु

चावटमेला's picture

14 Apr 2011 - 10:40 am | चावटमेला

मस्तच दिसतायेत ह्या सुरळीच्या वड्या. बाकी तो शिजलेल्या मिश्रणाचा फोटु अगदी आम्रखंडासारखा दिसतोय :)
हे सुरळीच्या वड्या करायचं काम मात्र अगदीच बेभरवशाचं असतं, थेट पाकिस्तानच्या टीम सारखं - खेली तो टीम , नही तो तुक्का :)

RUPALI POYEKAR's picture

14 Apr 2011 - 1:06 pm | RUPALI POYEKAR

एकदम झकास, प्रयत्न करुन बघेन

माझी एकदम आवडती डिश.. तोंडाला पाणी सुटलय.

- सूर्य

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 1:26 pm | प्राजक्ता पवार

माझी आवडती पाकृ.
फोटो एकदम मस्तं आहे .

सविता००१'s picture

15 Apr 2011 - 7:53 am | सविता००१

माझी आवडती पाकृ.
झक्कास फोटो

साती's picture

18 Apr 2011 - 10:31 am | साती

सहीच.
पण हे करायला साधारण किती वेळ लागतो ?

सौप्र's picture

18 Apr 2011 - 6:32 pm | सौप्र

छान...सध्यातरी शेवटच्या फोटोशीच मतलब आहे... पण वेळ मिळाला की करून बघेन.. बाकी सुरळीच्या वड्यांची पाककॄती म्हणलं की "वार्‍यावरची वरात" नाटकाची आठवण होते :-).

डावखुरा's picture

18 Apr 2011 - 7:37 pm | डावखुरा

लय भारी ...एकच नंबर....
माझा खुपच आवडता पदार्थ,,....
सानिकास्वप्निल लगे रहो....अजुन येउ द्या....
फोटो कृती छानच....आईला आठवण करुन द्यावी लागणारे...

अनिंद्य's picture

18 May 2020 - 1:12 pm | अनिंद्य

सोपी (वाटणारी) क्रमवार कृती आणि सुरेख प्लेटिंग !

मी खोबरं अजिबात खात नाही पण या पदार्थासाठी थोड़ा अपवाद करतो :-) कधीच न चुकवता जे पदार्थ सौंना करता येतात त्या पैकी हा एक.

वरुन chilly oil चा शिडकाव केल्यास १ गुण जास्तीचा.