वाचता वाचता

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
13 Apr 2011 - 12:01 pm
गाभा: 

कालच एका दमात प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबींच्या Myth and Reality या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्‍याच वर्षांची कोसंबींचे लिखाण वाचण्याची इच्छा पूर्ण झाली. पुस्तकाचा परिचय करून देणं माझ्या (मराठी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या फ्रेन्च मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर गैरसोयीचा इतिहास पुसून टाकायचे काम केले जाते. पण हे पुस्तक वाचल्यावर गैरसोय निर्माण करणारे विद्वान पण कसे अडगळीत जातात हे बघायला मिळते. आतापर्यंत प्रा. कोसंबी भेटत राहिले ते इतर विद्वानानी केलेल्या टिपण्यांमधून पण ते उत्सवमूर्ती विद्वान कधिच बनल्याचे दिसून आलेले नाही.

या पुस्तकात एक रंजक माहिती वाचायला मिळाली. श्रद्धाळु आणि भावुक लोकाना हे पचवणे कठिण जाईल. गणपती ही अनार्यांची म्हणून नीच देवता असल्याचे मला माहिती होते (काळाच्या ओघात गणपतीचे ब्राह्मणीकरण झाले). पण वरील पुस्तकात पृ २१-२२ वर कोसंबी म्हणतात की गणपतीची आई पार्वती असली तरी बाप शंकर नव्हता!!

असो. दैवते आणि त्यांचा प्रसार याबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे पुस्तक अवश्य वाचावे.

पुराणकथा आणि वास्तव
दामोदर धर्मानंद कोसंबी
अनु. वसंत तुळपुळे
लोक वाङ्मय गृह

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 1:59 pm | मृत्युन्जय

गणपतीची आई पार्वती असली तरी बाप शंकर नव्हता

खरेच आहे ते. पार्वतीने गणपतीला तिच्या अंगच्या मळातुन उत्पन्न केले. त्यामुळेस शंकर जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा त्यांनी गणपतीला ओळखले नाही. गणपती अयोनीज होता. रुढार्थाने शंकराच्या वीर्यापासुन जन्मलेला नव्हता.

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 2:08 pm | नगरीनिरंजन

प्रतिसाद देणार नव्हतो पण आता एक आलाच आहे तर लिहीतो.
आर्य पद्धतींच्या आधी मातृसत्ताक पद्धतीत कानीन (म्हणजे ससंतती) स्त्रियांची लग्ने होणे हे सर्वमान्य होते. अगदी महाभारत काळापर्यंत या पद्धती चालू होत्या पण नंतर आर्यांच्या वर्चस्वाने बंद पडल्या. तत्पूर्वी आर्य पुरुषांनीही अशा कानीन स्त्रियांशी विवाह केलेच.
असो.
अनार्य म्हणून नीच वगैरे असं भडकावू लिहून उगाचच ट्यार्पी खेचण्याचा क्षीण प्रयत्न लक्षात येईल इतपत ढोबळ आहे.

चिंतामणी's picture

13 Apr 2011 - 2:12 pm | चिंतामणी

दैवते आणि त्यांचा प्रसार याबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे पुस्तक अवश्य वाचावे.

कशासाठी वाचायचे? हे पुस्तक म्हणजे प्रमाण आहे का?

गणपती ही अनार्यांची म्हणून नीच देवता असल्याचे मला माहिती होते

अनार्य म्हणजे निच याचे प्रमाण काय आहे??? जरा खुलासा केल्यास ज्ञानात भर पडेल.

योगप्रभू's picture

13 Apr 2011 - 2:19 pm | योगप्रभू

<<पण वरील पुस्तकात पृ २१-२२ वर कोसंबी म्हणतात की गणपतीची आई पार्वती असली तरी बाप शंकर नव्हता!! >>

'बाप' हा शब्द कोसंबींनी वापरला असल्यास त्या विशिष्ट वाक्याला अवतरण चिन्ह टाकावे. मात्र हे वाक्य युयूत्सू यांचे असेल तर त्यांनी शब्द जपून वापरावेत, ही विनंती. भावना दुखावण्याचा मुद्दा नाही, पण पितृत्वाच्या चिकित्सेवरुन जेम्स लेनने महाराष्ट्रात केलेली धुळवड आता नव्या रुपात नको साजरी व्हायला.

असो. गणपतीच्या जन्माच्या कथेतच शंकर हे त्याचे जन्मदाते पिता नव्हते, हे स्पष्ट उल्लेखले आहे. पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवून तो सजीव केला, असे गोष्टीत सांगितले जाई. पण ते मान्य होण्यासारखे नाही. आयुष्यभर अंघोळ केली नाही तरी अंगावर पुतळा बनवण्याइतका मळ साचणार नाही. म्हणजेच हा पुतळा मातीचा असावा, हे पटते. अष्टविनायक चित्रपटातील गाण्यातील 'गिरीजात्मज हा तिने बनवला पुतळा मातीचा' ही ओळ जवळची वाटते.

शंकरांना अटकाव करताना झालेल्या संवादात हा सजीव पुतळा म्हणतो, की ' मी माझ्या आईचा म्हणजे पार्वतीचा मुलगा आहे.' इथे तो सत्य तेच सांगतोय. 'मी शंकर-पार्वतीचा पुत्र आहे' असे तो म्हणत नाही.

मग शंकर गणपतीचे पिता कसे ठरले? त्यासाठी कथेचा पुढचा भाग महत्त्वाचा. संतापाच्या भरात त्या मुलाचे डोके उडवल्यावर तो बालक पुन्हा अचेतन झाला. पार्वतीने आक्रोश मांडल्यावर शंकरांना पश्चाताप झाला. मुलाच्या धडावर हत्तीचे डोके बसवल्यावर त्याला सजीव केले ते शंकरांनी. निर्मितीच्या वेळी पुतळा सजीव झाला तेव्हा केवळ पार्वतीच त्याची जन्मदात्री होती. पण दुसर्‍या खेपेस त्याला सजीव केले ते शंकरानी. म्हणून ते पिता मानले जातात.

याखेरीज कोसंबींनी काही नवे संशोधन मांडले असल्यास त्याचा तपशील देणार का? तुम्ही पुस्तक वाचलंय.

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 2:25 pm | मृत्युन्जय

एक नंबर प्रतिसाद.

निर्मितीच्या वेळी पुतळा सजीव झाला तेव्हा केवळ पार्वतीच त्याची जन्मदात्री होती. पण दुसर्‍या खेपेस त्याला सजीव केले ते शंकरानी. म्हणून ते पिता मानले जातात.

कविकल्पनांचा आधार घेतल्या शिवाय दैवत कथांचे स्प्ष्टीकरण देता येतच नाही का?

योगप्रभू's picture

13 Apr 2011 - 6:39 pm | योगप्रभू

<<कविकल्पनांचा आधार घेतल्या शिवाय दैवत कथांचे स्प्ष्टीकरण देता येतच नाही का?>>

मी तर उलट विचारेन, की दैवतकथा किंवा पुराणकथांचा उद्देश अत्यंत मर्यादित असताना त्याची चिकित्सा इतिहास, विज्ञान, सामाजिक संदर्भ अशा निकषांवर करण्याची काही गरज असते का?

केवळ कथासूत्र समोर ठेऊन मला उमगलेला अर्थ समोर मांडला, एवढेच. मूळ कथालेखक मी नसल्याने त्याला स्पष्टीकरण म्हणणार नाही.

युयुत्सु's picture

13 Apr 2011 - 3:52 pm | युयुत्सु

जेम्स लेनने महाराष्ट्रात केलेली धुळवड आता नव्या रुपात नको साजरी व्हायला.

धुळवड नक्की कोणी केली ... जेम्स लेनने की त्याच्या लिखाणाने अपचन झालेल्यानी?

युयुत्सु's picture

13 Apr 2011 - 4:05 pm | युयुत्सु

कोसंबींचे मूळ वाक्य - "पार्वतीला झालेला मुलगा शिवाचा नव्हता आणि शिवाने या मुलाचा शिरच्छेद केल्यानंतर त्या जागी हत्तीचे डोके लावण्यात आले, असे पुराणकथा सांगते."

देवादिकांच्या आणि पुराणाच्या कथा मला नेहमी रोचक आणि एंटरटेनिंग वाटतात . सगळं काही स्क्रिप्ट केल्या सारखं असतं .. हे म्हणजे तु पाप केल्या सारखं कर .. मी शाप दिल्या सारख करतो .. मग तो शाप पुढे कधीतरी उपयोगी येतो :)

माझा मुळ प्रश्न हा आहे की जर गणपती बालक असताना त्याचा शिरच्छेद झाला होता , आणि जर त्याला हत्तीचं डोकं बसवलं होतं तर मग ते मर्ज कसं झालं ? रेशो / प्रमाण यात किती फरक आहे ?

बाकी नखाचा मळ काढला की झाला राक्षस तयार , कान साफ केले की झाला राक्षस तयार .. अरे मेडिकल सायन्स वगैरे काही प्रकार आहे की नाही ? :)

भरपुर प्रश्न आहेत ,कोणी खंबीर उत्तरं देणार असेल तर कळवा बॉ :)

मी_ओंकार's picture

13 Apr 2011 - 6:40 pm | मी_ओंकार

- टारूनाथ मोसंबी .

युयुत्सु's picture

13 Apr 2011 - 3:41 pm | युयुत्सु

गणपती च्या मूळ शरीरात अ‍ॅण्टी बॉडीज तयार होऊन ते रिजेक्ट कस झाल नाही, ही पूढची शंका असेलच! :)

टारझन's picture

13 Apr 2011 - 3:50 pm | टारझन

सगळं संक्षिप्तात लिहीता येणार नाहीच ! काही टिनेज मधलेपण प्रश्ण अनुत्तरीत आहे . भावना दुखावतात म्हणुन लिहीता येत नाही :(

बाकी लज्जागौरी ची आठवण झाली ..

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 3:50 pm | मराठमोळा

वाचता वाचता चांगलच चावलंत की वो.. :)

ह्म्म्म
आता काही लेखकांची नाव वाचुन पुढे जाउन त्यांच लिखाण वाचाव की नाही हा विचार करतोय.
विचारांशी देण घेण नाही पण तो मांडायची (ट्यार्पी खेचायची) पद्धत चीप वाटते.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

एकाच प्रतिसादाऐवजी पाच प्रतिसादात उत्तर विभागुन प्रतिसाद संख्या वाढवायची कल्पना खूप आवडली.

लेखनाविषयी काय बोलावे ? गणपतीधर्मी अथवा शंकर ब्रिगेड, पार्वती सेवा संघ वगैरेची भिती नसल्याने ठोकावे आपल्याला हवे ते :)

असो...

अध्ये मध्ये लोकांच्या लेखनावर प्रतिक्रीया द्यायला आणि ते वाचायला येत जा सवड मिळाली तर.

अध्ये मध्ये लोकांच्या लेखनावर प्रतिक्रीया द्यायला आणि ते वाचायला येत जा सवड मिळाली तर.

आ हाहा हा.. आरे ती पाचलग ब्रिगेड ची माणसं .. :) अशी कशी कुठेही प्रतिक्रीया देतील ? :)

शंकर ब्रिगेड, पार्वती सेवा संघ

हे मात्र आवडले... ;)

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 4:38 pm | पुष्करिणी

हे म्हणजे अगदीच डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखं झालय.

शंकर हे गणपतीचे बायोलॉजिकल फादर नव्हते हे तर आम्हांला आधीपासूनच माहित आहे, त्याकरता दामोदर कोसंबींचं पुस्तक वाचायची काय गरज? तुम्हांला गणेशजन्माची दुसरी कथा माहित असेल तर ती सांगता का इथे.

आणि गणपतीची जन्माची कथा इतिहास म्हणून नकाच वाचू.

पक्का इडियट's picture

13 Apr 2011 - 5:19 pm | पक्का इडियट

>>>>तुम्हांला गणेशजन्माची दुसरी कथा माहित असेल तर ती सांगता का इथे.

मला तरी माहित नाही पण एक कथा इथे आहे ब्वा http://www.shivdharma.com/sanskritik_itihas.asp

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 6:07 pm | पुष्करिणी

गणपतीबाप्पा मो$रया :)

चतुरंग's picture

13 Apr 2011 - 4:52 pm | चतुरंग

काहीतरी दोनचार वाक्यात टाकून राळ उडवतच राहायची का हो?
प्रतिसादाचेच भुकेले असाल तर सरळ एक धागा काढा ना - "वाचकहो, मला १०० प्रतिसाद द्या." म्हणून! देऊ आम्ही.
पण हे असले केस उपटू धागे नका ब्वॉ काढू!

-रंगाजी ब्रिगेड

टारझन's picture

13 Apr 2011 - 5:07 pm | टारझन

रंगाजी ब्रिगेड च्या सहि साठी रंगाला १००० प्रतिसाद फ्री .. =)) =))

नरेशकुमार's picture

13 Apr 2011 - 6:00 pm | नरेशकुमार

श्रद्धाळु आणि भावुक लोकाना हे पचवणे कठिण जाईल.

ब्वॉर !

गणपती ही अनार्यांची म्हणून नीच देवता असल्याचे मला माहिती होते (काळाच्या ओघात गणपतीचे ब्राह्मणीकरण झाले).

पुन्हा एकदा.. ब्वॉर !

पण वरील पुस्तकात पृ २१-२२ वर कोसंबी म्हणतात की गणपतीची आई पार्वती असली तरी बाप शंकर नव्हता!!

आता शेवटचं.... ब्वॉर !

ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे पुस्तक अवश्य वाचावे.

बादवे एक क्वेश्चन : सदर पुस्तकाची पाणे वापरता येन्याजोगी आहेत काय ?

कोन कोनाचा फादर असु दे का नसु दे, ...व्हुज फादर्स व्हाट गोज् !

वेताळ's picture

13 Apr 2011 - 6:10 pm | वेताळ

वर प्रतिक्रिया दिलेल्या बर्‍याच प्रतिसादकर्त्यांचा अगोदर संभाजी ब्रिग्रेडला कडाडुन विरोध होता.

अजातशत्रु's picture

13 Apr 2011 - 6:49 pm | अजातशत्रु

नखाचा मळ काढला की झाला राक्षस तयार , कान साफ केले की झाला राक्षस तयार .. अरे मेडिकल सायन्स वगैरे काही प्रकार आहे की नाही ?

भरपुर प्रश्न आहेत ,कोणी खंबीर उत्तरं देणार असेल तर कळवा बॉ........
...........सहमत

मागे या विषयावर मि एक पुस्तक वाचल्या चे स्मरतेय......पुस्तकाचे नाव "गणपती ची प्रेत यात्रा"

शिर्षक वाचून धक्का बसला ना..... तसा तो तेव्हा मलाहि बसला होता.....

त्या मधिल काहि भाग मि इथे मि.पा. करान साठी देणार आहे.....

तुर्तास रजा घेतो..

गुगल बुक्समध्ये सापडले .पुस्तकाचा आवाका फार मोठा वाटतो. गणपतीचा जन्म हा त्यातला एक छोटासा भाग वाटतो आहे. कदाचीत आणखी काही संकल्पना ही त्यात चर्चा करण्यासारख्या असतील .एक विनंती. संपूर्ण पुस्तकाबद्दल एकसंध लेख लिहावा.

श्रावण मोडक's picture

13 Apr 2011 - 8:27 pm | श्रावण मोडक

हो. पुस्तकाचा आवाका प्रचंडच आहे. अभ्यासाची ही पद्धती नवी नव्हेच. देवतेला उद्देशून करण्यात आलेला नीच या शब्दाचा प्रयोगही रुढार्थाने घेत नसतात अशा अभ्यासांमध्ये. 'आर्यांनी आज गणेशाला स्वीकारले. तो स्वीकार्ह नव्हता तेव्हा आर्याच्या लेखी गणेश ही नीच देवताच होती,' अशा आशयाची मांडणी असते ही.
पण...
असो.
रामदास, तुमचा प्रतिसाद असा एकमेव प्रतिसाद ठरू नये, इतकेच. बाकी चालूच राहते.

आत्मशून्य's picture

13 Apr 2011 - 10:59 pm | आत्मशून्य

पून्हा पून्हा पून्हा असंच लीहीत रहा. बूध्दीवाद्यांच्या दांडगाइला अजीबात घाबरू नका. यश तूमच्या पाठीशी कीव्हां हातात म्हटले तरी चालेल.

मिसळपाव सदस्या चित्रा यांनी मागे दा. ध. कोसंबी यांची ओळख करून देणारा उत्तम लेख लिहिला होता, तो जरूर वाचावा.
"दामोदर धर्मानंद कोसंबी"

बाकी मला "मिथ अँड रिअ‍ॅलिटी" हे पुस्तक फारच आवडले. मूळ इंग्रजीत लिहिलेले पुस्तक वाचले आहे. त्याचे आता मराठीत भाषांतर उपलब्ध झालेले आहे, हे युयुत्सु यांच्या लेखातून कळले. मराठीत भाषांतर उपलब्ध आहे, हे फार चांगले झाले. यातील बरेचसे मूळ संशोधन महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या भागांत केलेले आहे.

मात्र या उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण पुस्तकातील एक यःकश्चित तपशील युयुत्सु यांनी उद्धृत केला आहे, ते काही पटले नाही.

नारयन लेले's picture

14 Apr 2011 - 2:38 pm | नारयन लेले

समाजात दुही निर्माण होयील व श्रद्धाळु आणि भावुक लोकानच्या भावना॑चा विचार करुन लिखाण केलेले बारे.

शेवटि पुराण कथा या पुराण समजुन घ्याव्यात/वाचव्यात.

विनित

http://dharmanandkosambi.com/

दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यावर त्यांच्या वडीलांचा खूप प्रभाव होता. धर्मानंद कोसंबींचे समग्र साहित्य मराठीतून ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. नवा धागा काढण्यापेक्षा युयुत्सूचा मुद्देसूद असलेला हा धागा वर काढतोय.