लहानपणापासून आपल्याला 'लाच घेणे ' हा हक्क आहे हे आपोआपच माहिती होते. रोज वर्तमानपत्रातून येणार्या बातम्या आणि रस्त्यावर वाहतूक पोलिसांबरोबर चालणारे व्यवहार पाहून आपली तशी पक्की खात्रीच होते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच / आमिष न देता कोणतेही काम करणे शक्य नाही हे आपणांपैकी प्रत्येकाला माहितीच आहे, नाही का?
यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्याला पकडणार (अशीच पद्धत आहे). या पद्धतीत सकारण कालापव्यय होऊन लाच खाणार्यांचे आणखीच फावते आणि लाच खाणार्यांची संख्या आपोआपच वाढत जाते. लाच घेणार्यावर शिक्षा होऊ नये म्हणून आधीच बातमी देऊन त्याला वाचविले जाते. अॅन्टी करप्शनला, पोलिसांना, वकिलांना, न्यायालयांना काम मिळते. वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्या, पत्रकार यांना बातम्या मिळतात, चघळायला विषय मिळतो. टी. आर. पी. वाढतो. एखादे काम होण्यासाठी जेव्हा लाच दिली जात नाही, तेव्हा त्या कामाची व्यवस्था कसे तज्ज्ञ व्यवस्थापन वाट लावते हे माहीत असल्याने तो तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही. ज्याला लाचखोरी करायची आहे त्याच्याकडे अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवा, मग त्यांना वेळ देऊन समोरच्याला शिक्षा करा इतका वेळ असेलच असे नाही, व इतके करून हवे ते काम होईल याची तर काहीच शाश्वती नाही.
तेव्हा असा विचार मनात आला, की कदाचित लाचखोरीची सवय लागण्यासाठी लाच घेणे व देणेही हक्कच आहे वगैरेची माहिती सर्वांना का देऊ नये व आजच्या सोकावलेल्या व्य्वस्थेचे काय होईल याबाबत आपणा मिपाकर तज्ज्ञ व्यक्तिंची मते जाणून घ्यायला उत्सुक कारण इथे भ्रष्टाकारणन करणे हा "शिष्ट" आचार आहे. अश्यावेळी फक्त "लाच न घेणे व न देणे" हाच गुन्हा का मानु नये व लाच देण्या-घेण्याबद्दल शिक्षा नसावी / तो गुन्हा नसावा. यामुळे लाच न घेणार्याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहिल की "हा लाच देत नाही तर याचे काम का करायचे , झाले की हा कशावरून त्रास देणार नाही?"
विचार अगदीच पुरातन आहे म्हणून चर्चेला ठेवला आहे, तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 3:04 pm | चिरोटा
ह्या विषयावर 'साधक्-बाधक'चर्चा हल्लीच झाली ना?
12 Apr 2011 - 4:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सदर विषयाचा चावुन चावुन चोथा झालेला आहे अस म्हणा ;)
12 Apr 2011 - 8:01 pm | शिल्पा ब
हेच विचारायला आले होते.
12 Apr 2011 - 4:10 pm | कुंदन
>>अॅन्टी करप्शनला, पोलिसांना, वकिलांना, न्यायालयांना काम मिळते...
काथ्या कुटायला निमित्त मिळते.
12 Apr 2011 - 8:43 pm | राजेश घासकडवी
तिरकस लेखन आवडलं.
लाच देणं व घेणं याचे नियम शाळांमधूनच शिकवले गेले तर सर्व प्रक्रियेत एक सोपेपणा येईल.
लाच न देता कामं करवून घेणारे व न घेता कामं करणारे यांना तुरुंगात डांबणं हाच योग्य उपाय राहील. मग हा पांढरा बाजार कसा माजलाय याबद्दल काथ्याकूट करता येईल.
12 Apr 2011 - 9:11 pm | सुधीर१३७
लाच देणं व घेणं याचे नियम शाळांमधूनच शिकवले गेले तर सर्व प्रक्रियेत एक सोपेपणा येईल.
लाच न देता कामं करवून घेणारे व न घेता कामं करणारे यांना तुरुंगात डांबणं हाच योग्य उपाय राहील. मग हा पांढरा बाजार कसा माजलाय याबद्दल काथ्याकूट करता येईल.
>>>>>>>>>>>>
..........अगदी अगदी..................... सहमत................